बेशिस्तीला लगाम लावा, पोलिसी खाक्याच हवा! कोरोनारूपी महाराक्षसाने समस्त शहरालाच आपला विळखा घालायला सुरवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या एकअंकी संख्येची जागा आता तीन आकड्यांवर येऊन ठेपली आहे. कोरोनासुर दबा धरून बसलेला असूनही शहरातील विविध भागांतील काही रिकामटेकडे नागरिक मात्र हजारोंच्या संख्येने टिवल्याबावल्या करत रस्त्यावर हुंदडत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारपेठा सायंकाळी पाचनंतर बंद होत असताना हे रिकामटेकडे नेमके कोणत्या ‘मोहिमे’वर बाहेर हुंदडायला निघतात हा एक संशोधनाचा विषय आहे! परंतु आता मात्र अति होत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता अशा रिकामटेकड्यांची कसलीही गय न करता त्यांना पोलिसी खाक्या दाखविणेच गरजेचे आहे. दंडात्मक कारवाईलाही जे घाबरत नसतील त्यांना ‘थर्ड डिग्री’ उपचाराच हवेत, असा सार्वत्रिक सूर आहे.     कोरोनासुराला हरविण्यासाठी संयमाची आवश्यकता  कोरोनासुराला हरविण्यासाठी औरंगाबादकरांच्या मदतीची, अनावश्यक घराबाहेर न पडण्याची तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याची आणि संयमाचीही तितकीच गरज आहे. कोरोनाला हरविण्याची जबाबदारी केवळ शासन आणि प्रशासनाचीच नव्हे तर आपलेही तितकेच कर्तव्य आहे याचे भान सर्वांनी ठेवायलाच पाहिजे.    किमान कुटुंबीयांचा तरी विचार करा  मी कोरोनाला घाबरत नाही, कोरोना माझे काहीही वाकडे करू शकणार नाही, अशी बेताल वक्तव्य करणाऱ्यांनो, आपल्या जिवाची काळजी नसेल, तर किमान आपल्या कुटुंबातील सदस्यांची तरी काळजी करा. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांची तरी काळजी घ्या. विनाकारण बाहेर हुंदडायला पडण्याची खरेच गरज आहे का, हे एकदा आपल्या मनालाच विचारून पाहा. उत्तर तर नाहीच येणार आहे हे माहीत असूनही जिवावर उदार का झालात, असा प्रश्न रस्त्यावरील गर्दीकडे पाहिल्यावर पडतो.     लॉकडाउन करणे गरजेचे  कोरोनाला अजूनही काही शहरवासी ‘लाईटली’ घेत असतील तर पुन्हा एकदा किमान १५ दिवस कडक लॉकडाउन करणेच औरंगाबादकरांच्या हिताचे ठरेल, यात शंका नाही. पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी आता लॉकडाउन जाहीर करण्यास जास्त ढील न देता तत्काळ १५ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर करावा. मेडिकल, दूध आदी आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांनाही घरपोच सेवा देता येईल का, याचाही विचार प्रशासनाने नक्कीच करावा. असे केल्यासच कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होऊ शकते आणि शहरवासी कोरोनावर मात करून पुन्हा पूर्वीप्रमाणेच मुक्त श्‍वास घेऊ शकतील.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, July 2, 2020

बेशिस्तीला लगाम लावा, पोलिसी खाक्याच हवा! कोरोनारूपी महाराक्षसाने समस्त शहरालाच आपला विळखा घालायला सुरवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या एकअंकी संख्येची जागा आता तीन आकड्यांवर येऊन ठेपली आहे. कोरोनासुर दबा धरून बसलेला असूनही शहरातील विविध भागांतील काही रिकामटेकडे नागरिक मात्र हजारोंच्या संख्येने टिवल्याबावल्या करत रस्त्यावर हुंदडत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारपेठा सायंकाळी पाचनंतर बंद होत असताना हे रिकामटेकडे नेमके कोणत्या ‘मोहिमे’वर बाहेर हुंदडायला निघतात हा एक संशोधनाचा विषय आहे! परंतु आता मात्र अति होत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता अशा रिकामटेकड्यांची कसलीही गय न करता त्यांना पोलिसी खाक्या दाखविणेच गरजेचे आहे. दंडात्मक कारवाईलाही जे घाबरत नसतील त्यांना ‘थर्ड डिग्री’ उपचाराच हवेत, असा सार्वत्रिक सूर आहे.     कोरोनासुराला हरविण्यासाठी संयमाची आवश्यकता  कोरोनासुराला हरविण्यासाठी औरंगाबादकरांच्या मदतीची, अनावश्यक घराबाहेर न पडण्याची तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याची आणि संयमाचीही तितकीच गरज आहे. कोरोनाला हरविण्याची जबाबदारी केवळ शासन आणि प्रशासनाचीच नव्हे तर आपलेही तितकेच कर्तव्य आहे याचे भान सर्वांनी ठेवायलाच पाहिजे.    किमान कुटुंबीयांचा तरी विचार करा  मी कोरोनाला घाबरत नाही, कोरोना माझे काहीही वाकडे करू शकणार नाही, अशी बेताल वक्तव्य करणाऱ्यांनो, आपल्या जिवाची काळजी नसेल, तर किमान आपल्या कुटुंबातील सदस्यांची तरी काळजी करा. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांची तरी काळजी घ्या. विनाकारण बाहेर हुंदडायला पडण्याची खरेच गरज आहे का, हे एकदा आपल्या मनालाच विचारून पाहा. उत्तर तर नाहीच येणार आहे हे माहीत असूनही जिवावर उदार का झालात, असा प्रश्न रस्त्यावरील गर्दीकडे पाहिल्यावर पडतो.     लॉकडाउन करणे गरजेचे  कोरोनाला अजूनही काही शहरवासी ‘लाईटली’ घेत असतील तर पुन्हा एकदा किमान १५ दिवस कडक लॉकडाउन करणेच औरंगाबादकरांच्या हिताचे ठरेल, यात शंका नाही. पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी आता लॉकडाउन जाहीर करण्यास जास्त ढील न देता तत्काळ १५ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर करावा. मेडिकल, दूध आदी आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांनाही घरपोच सेवा देता येईल का, याचाही विचार प्रशासनाने नक्कीच करावा. असे केल्यासच कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होऊ शकते आणि शहरवासी कोरोनावर मात करून पुन्हा पूर्वीप्रमाणेच मुक्त श्‍वास घेऊ शकतील.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3goUkuS

No comments:

Post a Comment