पाऊलखुणा मंदिरांच्या 1 : स्मृतीशिल्पांनी जपला यौद्ध्यांचा इतिहास (व्हिडिओ) पिंपरी : ताथवडे या गावाला प्राचीन इतिहास व जुनी परंपरा आहे. ढाल, तलवारी व धनुष्यबाण हातात घेऊन लढणाऱ्या वीरांच्या स्मृतीशिल्पांवरून हा इतिहास प्रकाशझोतात येत आहे. गावाचा रक्षक म्हणून ताथवडे चौकात असलेल्या या स्मृतीशिल्पांची नागरिक पूजा करतात. जवळपास 16 वृंदावन व एकल प्रकारातील मध्ययुगीन काळातील हे स्मृतीशिल्पे आहेत. यातील काही शिल्पांवर शेंदूर लावलेला आहे. मात्र, आजही ती चांगल्या अवस्थेत आढळून आलेली आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    ताथवडेमध्ये श्री नरसिंहाचे प्राचीन मंदिर आहे. पूर्वीचे लाकडी माडीचे मंदिर होते. विष्णूच्या दशावतारातील हा एक अवतार आहे. मात्र, काही वर्षापूर्वी मूर्तीवरचा शेंदूर काढल्यानंतर तो शांत स्वरूपातील नरसिंह असल्याचे दिसले. सध्याची नरसिंहाची मूर्ती ही पूर्वीची शेंदूर काढलेली मूर्ती आहे. काही अभ्यासकांच्या मते तो वामन अवतारातील देव असावा. चिंचवडगाव देवस्थानाच्या मोरया गोसावीची ही सासरवाडी असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. श्री म्हातोबाचे देखील या गावात मंदिर आहे. चैत्र पौर्णिमेला या गावाचा उत्सव, तर वैशाख पौर्णिमेला मंदिराचा उत्सव भरतो. पंचक्रोशीतील सर्वजण बगाडाच्या उत्सवास गर्दी करतात. शहरात नरसिंहाचे हे एकमेव मंदिर आहे. या मंदिराला सोन्याचा कळस आहे. मंदिरांची कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेते. मंदिरातील विविध उत्सवांसाठी भाविकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. संत तुकाराम महाराजांचे या मंदिरात कीर्तन... वारकरी परंपरेचा इतिहास या गावाला आहे. संत तुकाराम महाराज या मंदिरात कीर्तन करायला येत असल्याच्या नोंदी ठिकठिकाणी सापडलेल्या आहेत. मंदिराच्या बाहेर सती वृंदावन आहे. त्याबद्दलची माहिती उपलब्ध नाही. ग्रामस्थांनाही याबद्दल माहीत नाही. दगडाचा गाभारा मूळ रुपात ठेवून हे नवीन मंदिर बांधले असल्याची माहिती प्राचीन मंदिराचे अभ्यासक प्रणव पाटील यांनी सांगितले. News Story Feeds https://ift.tt/3dS2Zo5 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, July 2, 2020

पाऊलखुणा मंदिरांच्या 1 : स्मृतीशिल्पांनी जपला यौद्ध्यांचा इतिहास (व्हिडिओ) पिंपरी : ताथवडे या गावाला प्राचीन इतिहास व जुनी परंपरा आहे. ढाल, तलवारी व धनुष्यबाण हातात घेऊन लढणाऱ्या वीरांच्या स्मृतीशिल्पांवरून हा इतिहास प्रकाशझोतात येत आहे. गावाचा रक्षक म्हणून ताथवडे चौकात असलेल्या या स्मृतीशिल्पांची नागरिक पूजा करतात. जवळपास 16 वृंदावन व एकल प्रकारातील मध्ययुगीन काळातील हे स्मृतीशिल्पे आहेत. यातील काही शिल्पांवर शेंदूर लावलेला आहे. मात्र, आजही ती चांगल्या अवस्थेत आढळून आलेली आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    ताथवडेमध्ये श्री नरसिंहाचे प्राचीन मंदिर आहे. पूर्वीचे लाकडी माडीचे मंदिर होते. विष्णूच्या दशावतारातील हा एक अवतार आहे. मात्र, काही वर्षापूर्वी मूर्तीवरचा शेंदूर काढल्यानंतर तो शांत स्वरूपातील नरसिंह असल्याचे दिसले. सध्याची नरसिंहाची मूर्ती ही पूर्वीची शेंदूर काढलेली मूर्ती आहे. काही अभ्यासकांच्या मते तो वामन अवतारातील देव असावा. चिंचवडगाव देवस्थानाच्या मोरया गोसावीची ही सासरवाडी असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. श्री म्हातोबाचे देखील या गावात मंदिर आहे. चैत्र पौर्णिमेला या गावाचा उत्सव, तर वैशाख पौर्णिमेला मंदिराचा उत्सव भरतो. पंचक्रोशीतील सर्वजण बगाडाच्या उत्सवास गर्दी करतात. शहरात नरसिंहाचे हे एकमेव मंदिर आहे. या मंदिराला सोन्याचा कळस आहे. मंदिरांची कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेते. मंदिरातील विविध उत्सवांसाठी भाविकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. संत तुकाराम महाराजांचे या मंदिरात कीर्तन... वारकरी परंपरेचा इतिहास या गावाला आहे. संत तुकाराम महाराज या मंदिरात कीर्तन करायला येत असल्याच्या नोंदी ठिकठिकाणी सापडलेल्या आहेत. मंदिराच्या बाहेर सती वृंदावन आहे. त्याबद्दलची माहिती उपलब्ध नाही. ग्रामस्थांनाही याबद्दल माहीत नाही. दगडाचा गाभारा मूळ रुपात ठेवून हे नवीन मंदिर बांधले असल्याची माहिती प्राचीन मंदिराचे अभ्यासक प्रणव पाटील यांनी सांगितले. News Story Feeds https://ift.tt/3dS2Zo5


via News Story Feeds https://ift.tt/3dWP4NJ

No comments:

Post a Comment