Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, July 1, 2020

पुण्याच्या प्रदूषणात किंचित वाढ; ‘अनलॉक’नंतर नागरिकांची वर्दळ 

पुणे - लॉकडाउनमध्ये पुण्यातील हवेची गुणवत्ता ही चांगल्या श्रेणीची नोंदली गेली होती; परंतु लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर प्रदूषणात किंचित वाढ झाली. नागरिकांची वर्दळ आणि वाहनांच्या रहदारीमुळे हवेची गुणवत्ता आता चांगल्या श्रेणीतून समाधानकारक श्रेणीत पोचली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

जूनमध्ये शहरातील विविध खासगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये कामकाज सुरू झाले. तसेच अनलॉक १.० मुळे नागरिकही घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे हवेची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) आकडेवारीतून स्पष्ट झाले. २३ ते ३० जूनपर्यंत शहरातील हवेची गुणवत्ता ५१ ते १०० च्या मध्ये (मायक्रोग्रॅम प्रतिक्‍यूबिक घनमीटर) नोंदविली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) निरीक्षणानुसार जूनच्या सुरवातीस झालेल्या पावसामुळे प्रदूषणात जास्त वाढ झाली नाही; परंतु त्याचा अभ्यास  सुरू आहे, अशी माहिती आयआयटीएमचे शास्त्रज्ञ डॉ. गुफ्रान बेग यांनी दिली.

सफरद्वारे घेतलेल्या निरीक्षणातून असे समजले की, जून महिन्यातील काही दिवसांच्या पावसामुळे देशातील विविध शहरांमध्ये पीएम २.५ आणि नायट्रोजन ऑक्‍साईडमध्ये काही प्रमाणात घट झाली. मात्र, यामागचे संपूर्ण कारण अस्पष्ट आहे. तसेच आयआयटीएममार्फत या संबंधातील अभ्यास सुरू आहे.
- डॉ. गुफ्रान बेग, शास्त्रज्ञ, आयआयटीएम

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्याच्या प्रदूषणात किंचित वाढ; ‘अनलॉक’नंतर नागरिकांची वर्दळ  पुणे - लॉकडाउनमध्ये पुण्यातील हवेची गुणवत्ता ही चांगल्या श्रेणीची नोंदली गेली होती; परंतु लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर प्रदूषणात किंचित वाढ झाली. नागरिकांची वर्दळ आणि वाहनांच्या रहदारीमुळे हवेची गुणवत्ता आता चांगल्या श्रेणीतून समाधानकारक श्रेणीत पोचली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    जूनमध्ये शहरातील विविध खासगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये कामकाज सुरू झाले. तसेच अनलॉक १.० मुळे नागरिकही घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे हवेची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) आकडेवारीतून स्पष्ट झाले. २३ ते ३० जूनपर्यंत शहरातील हवेची गुणवत्ता ५१ ते १०० च्या मध्ये (मायक्रोग्रॅम प्रतिक्‍यूबिक घनमीटर) नोंदविली आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) निरीक्षणानुसार जूनच्या सुरवातीस झालेल्या पावसामुळे प्रदूषणात जास्त वाढ झाली नाही; परंतु त्याचा अभ्यास  सुरू आहे, अशी माहिती आयआयटीएमचे शास्त्रज्ञ डॉ. गुफ्रान बेग यांनी दिली. सफरद्वारे घेतलेल्या निरीक्षणातून असे समजले की, जून महिन्यातील काही दिवसांच्या पावसामुळे देशातील विविध शहरांमध्ये पीएम २.५ आणि नायट्रोजन ऑक्‍साईडमध्ये काही प्रमाणात घट झाली. मात्र, यामागचे संपूर्ण कारण अस्पष्ट आहे. तसेच आयआयटीएममार्फत या संबंधातील अभ्यास सुरू आहे. - डॉ. गुफ्रान बेग, शास्त्रज्ञ, आयआयटीएम News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2BXIJEt
Read More
नंदवाळला पालखी ट्रकमधून थेट मंदिरात

हळदी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या नंदवाळ (ता. करवीर) येथील आषाढी यात्रा साधेपणाने साजरी झाली. प्रत्येक वर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा यंदा मोजक्‍याच भाविकांच्या उपस्थितीत झाला. 

पहाटे साडेतीन वाजता करवीर तहसीलदार शीतल मुळे-भामरे, करवीरच्या सभापती अश्विनी धोत्रे, सरपंच अस्मिता कांबळे व मंदिर समिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महापूजा झाली. मंदिर समितीतर्फे विठ्ठल- रुक्‍मिणी व सत्यभामा यांच्या मूर्तीसह गाभाऱ्यात फुलांची सजावट झाली. पण, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांना नंदवाळ गावात येण्यास बंदी होती. या परिसरात आज शुकशुकाट राहिला. 

कालपासून नंदवाळ गावाकडे येणारे तिन्ही मार्ग बंद केले. ग्रामस्थांनीही मंदिराच्या बाहेर राहूनच दर्शन घेतले. मिरजकर टिकटी येथून येणारी पालखी ट्रकमधून थेट मंदिराच्या परिसरात आली. सकाळी 10 वाजता गावातील भीमाशंकर संस्थेच्या चौकात पालखी आल्यानंतर "ज्ञानोबा-तुकाराम'च्या गजरात सभामंडपात नेली. आरती झाल्यानंतर वारकरी व पोलिसांनी फुगडीचा फेर धरला. पालखी परत गेल्यानंतर मंदिर पुन्हा बंद केले.

दरम्यान, अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे प्रतिपंढरपूर वारी पालखीसोबतच्या वारकऱ्यांना नंदवाळ फाटा येथे फराळाचे वाटप झाले. वारकरी मंडळाचे जिल्हा संचालक सुग्रीव पाटील-वाकरेकर, करवीर तालुका सचिव सदाशिव सावंत, बापूसाहेब पाटील, तानाजी पाटील आदी उपस्थित होते. 

दृष्टिक्षेप 

- नंदवाळ गावाकडे येणारे तिन्ही मार्ग बंद 
- ग्रामस्थांनी मंदिराबाहेर राहूनच घेतले दर्शन 
- विठ्ठल- रुक्‍मिणी, सत्यभामा मूर्तीसह गाभाऱ्यात फुलांची सजावट
- आरतीनंतर वारकरी व पोलिसांनी धरला फुगडीचा फेर 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नंदवाळला पालखी ट्रकमधून थेट मंदिरात हळदी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या नंदवाळ (ता. करवीर) येथील आषाढी यात्रा साधेपणाने साजरी झाली. प्रत्येक वर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा यंदा मोजक्‍याच भाविकांच्या उपस्थितीत झाला.  पहाटे साडेतीन वाजता करवीर तहसीलदार शीतल मुळे-भामरे, करवीरच्या सभापती अश्विनी धोत्रे, सरपंच अस्मिता कांबळे व मंदिर समिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महापूजा झाली. मंदिर समितीतर्फे विठ्ठल- रुक्‍मिणी व सत्यभामा यांच्या मूर्तीसह गाभाऱ्यात फुलांची सजावट झाली. पण, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांना नंदवाळ गावात येण्यास बंदी होती. या परिसरात आज शुकशुकाट राहिला.  कालपासून नंदवाळ गावाकडे येणारे तिन्ही मार्ग बंद केले. ग्रामस्थांनीही मंदिराच्या बाहेर राहूनच दर्शन घेतले. मिरजकर टिकटी येथून येणारी पालखी ट्रकमधून थेट मंदिराच्या परिसरात आली. सकाळी 10 वाजता गावातील भीमाशंकर संस्थेच्या चौकात पालखी आल्यानंतर "ज्ञानोबा-तुकाराम'च्या गजरात सभामंडपात नेली. आरती झाल्यानंतर वारकरी व पोलिसांनी फुगडीचा फेर धरला. पालखी परत गेल्यानंतर मंदिर पुन्हा बंद केले. दरम्यान, अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे प्रतिपंढरपूर वारी पालखीसोबतच्या वारकऱ्यांना नंदवाळ फाटा येथे फराळाचे वाटप झाले. वारकरी मंडळाचे जिल्हा संचालक सुग्रीव पाटील-वाकरेकर, करवीर तालुका सचिव सदाशिव सावंत, बापूसाहेब पाटील, तानाजी पाटील आदी उपस्थित होते.  दृष्टिक्षेप  - नंदवाळ गावाकडे येणारे तिन्ही मार्ग बंद  - ग्रामस्थांनी मंदिराबाहेर राहूनच घेतले दर्शन  - विठ्ठल- रुक्‍मिणी, सत्यभामा मूर्तीसह गाभाऱ्यात फुलांची सजावट - आरतीनंतर वारकरी व पोलिसांनी धरला फुगडीचा फेर  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VE8wbI
Read More
महिला शेतकऱ्यांनी शोधला स्वावलंबनाचा मार्ग

उमरगा (जि. उस्मानाबाद) : तालुक्यातील व्हंताळ येथील शेतकरी कुटुंबातील महिलांनी एकत्र येऊन साधारणतः अडीच वर्षांपूर्वी स्थापन केलेला राजमाता जिजाऊ महिला बचतगट एकमेकांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता महिलांनी या भागात उत्पादित होणाऱ्या हळदीवर प्रक्रिया करून त्याचे पावडर पॅकिंग करून बाजारपेठेत विक्री सुरू केली आहे.

बचतगटाच्या अध्यक्ष छबूबाई नंदकुमार जाधव, सचिव रेखा महेश जाधव (पाटील) यांच्या पुढाकारातून अडीच वर्षांपूर्वी राजमाता जिजाऊ महिला बचतगटाची स्थापना करण्यात आली. महिलांनी दरमहा शंभर रुपयांप्रमाणे बचत करण्याचे ठरविले, तशी वाटचालही सुरू झाली. एकमेकींना अडीअडचणींना बचतगटाचा फायदा झाली.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

स्टेट बँकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक श्री. कांबळे यांनी बचतगटाचे चांगले काम पाहून तीन लाखांचे कर्ज दिले. त्यानंतर प्रत्येक महिलेने आपापल्या प्रयत्नांनी व्यवसाय करून संसारात मदत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शेतकऱ्याची होणारी फरपट, कष्ट, अस्मानी संकट, शेतीमालाला मेहनतीप्रमाणे भाव न मिळणे अशा झळा सोसाव्या लागत होत्या.

त्यामुळे बचतगटाच्या माध्यमातून छोटासा व्यवसाय, उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला. गावचे कृषिमित्र महेश राम जाधव (पाटील), कृषी सहायक पी. व्ही. तोरंबे, ‘आत्मा’चे अधिकारी श्री. गरजे, तालुका कृषी अधिकारी सुनीलकुमार जाधव यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आणि त्यातूनच एक विचार पुढे आला, की शेतीत कष्ट करून शेतकऱ्याच्या शेतीमालाला स्थिर व चांगला भाव मिळत नाही.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

शेतकऱ्यांनी राबराब राबून पोटच्या लेकरासारखं शेती सांभाळायची आणि शेवटी त्याच्या हातात काहीच उरत नव्हतं. याची चीड नेहमी यायची. म्हणून महिला बचतगटाचे तालुक्याचे अधिकारी श्री. नाईक, ‘आत्मा’चे श्री. गरजे यांच्याशी चर्चा करून शेतीवर आधारित महिला उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. परिसरातील एकुरगा व व्हंताळ परिसरात हळदीचे उत्पन्न शेतकरी चांगल्या प्रकारे व भरपूर कष्टाने घेतले जाते, येथेच हळद प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्याचे काम सुरू केले.

गटामार्फत शेतकऱ्यांची हळद सात हजार रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे घेतली जात आहे. त्याचे पावडर तयार करून गटाचा ब्रॅण्ड लावून व पॅकिंगद्वारे बाजारपेठेत नैसर्गिक, शुद्ध व आरोग्यदायी हळद पावडरची विक्री गटामार्फत सुरू असल्याचे गटाच्या अध्यक्ष छबूबाई नंदकुमार जाधव यांनी सांगितले. 

ग्रामीण भागात शेती व्यवसायाला व्यापकता मिळत नाही. निसर्गाचे असंतुलन शेती व्यवसायाला मारक ठरत आहे. बचतगटाच्या माध्यमातून हळद पावडर निर्मितीचा लघुउद्योग सुरू केला आहे. त्याला आणखी व्यापक स्वरूप प्राप्त होण्यासाठी बँकाची आर्थिक मदत, अधिकाऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. पावडर तयार करण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या हळद खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. त्यांना सध्या प्रतिक्विंटल सात हजार रुपये हमीभाव देण्याचा प्रयत्न करतोय. 
- रेखा जाधव (पाटील), सचिव, राजमाता जिजाऊ महिला बचतगट 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

महिला शेतकऱ्यांनी शोधला स्वावलंबनाचा मार्ग उमरगा (जि. उस्मानाबाद) : तालुक्यातील व्हंताळ येथील शेतकरी कुटुंबातील महिलांनी एकत्र येऊन साधारणतः अडीच वर्षांपूर्वी स्थापन केलेला राजमाता जिजाऊ महिला बचतगट एकमेकांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता महिलांनी या भागात उत्पादित होणाऱ्या हळदीवर प्रक्रिया करून त्याचे पावडर पॅकिंग करून बाजारपेठेत विक्री सुरू केली आहे. बचतगटाच्या अध्यक्ष छबूबाई नंदकुमार जाधव, सचिव रेखा महेश जाधव (पाटील) यांच्या पुढाकारातून अडीच वर्षांपूर्वी राजमाता जिजाऊ महिला बचतगटाची स्थापना करण्यात आली. महिलांनी दरमहा शंभर रुपयांप्रमाणे बचत करण्याचे ठरविले, तशी वाटचालही सुरू झाली. एकमेकींना अडीअडचणींना बचतगटाचा फायदा झाली. पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले   स्टेट बँकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक श्री. कांबळे यांनी बचतगटाचे चांगले काम पाहून तीन लाखांचे कर्ज दिले. त्यानंतर प्रत्येक महिलेने आपापल्या प्रयत्नांनी व्यवसाय करून संसारात मदत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शेतकऱ्याची होणारी फरपट, कष्ट, अस्मानी संकट, शेतीमालाला मेहनतीप्रमाणे भाव न मिळणे अशा झळा सोसाव्या लागत होत्या. त्यामुळे बचतगटाच्या माध्यमातून छोटासा व्यवसाय, उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला. गावचे कृषिमित्र महेश राम जाधव (पाटील), कृषी सहायक पी. व्ही. तोरंबे, ‘आत्मा’चे अधिकारी श्री. गरजे, तालुका कृषी अधिकारी सुनीलकुमार जाधव यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आणि त्यातूनच एक विचार पुढे आला, की शेतीत कष्ट करून शेतकऱ्याच्या शेतीमालाला स्थिर व चांगला भाव मिळत नाही. धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..! शेतकऱ्यांनी राबराब राबून पोटच्या लेकरासारखं शेती सांभाळायची आणि शेवटी त्याच्या हातात काहीच उरत नव्हतं. याची चीड नेहमी यायची. म्हणून महिला बचतगटाचे तालुक्याचे अधिकारी श्री. नाईक, ‘आत्मा’चे श्री. गरजे यांच्याशी चर्चा करून शेतीवर आधारित महिला उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. परिसरातील एकुरगा व व्हंताळ परिसरात हळदीचे उत्पन्न शेतकरी चांगल्या प्रकारे व भरपूर कष्टाने घेतले जाते, येथेच हळद प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्याचे काम सुरू केले. गटामार्फत शेतकऱ्यांची हळद सात हजार रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे घेतली जात आहे. त्याचे पावडर तयार करून गटाचा ब्रॅण्ड लावून व पॅकिंगद्वारे बाजारपेठेत नैसर्गिक, शुद्ध व आरोग्यदायी हळद पावडरची विक्री गटामार्फत सुरू असल्याचे गटाच्या अध्यक्ष छबूबाई नंदकुमार जाधव यांनी सांगितले.  ग्रामीण भागात शेती व्यवसायाला व्यापकता मिळत नाही. निसर्गाचे असंतुलन शेती व्यवसायाला मारक ठरत आहे. बचतगटाच्या माध्यमातून हळद पावडर निर्मितीचा लघुउद्योग सुरू केला आहे. त्याला आणखी व्यापक स्वरूप प्राप्त होण्यासाठी बँकाची आर्थिक मदत, अधिकाऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. पावडर तयार करण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या हळद खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. त्यांना सध्या प्रतिक्विंटल सात हजार रुपये हमीभाव देण्याचा प्रयत्न करतोय.  - रेखा जाधव (पाटील), सचिव, राजमाता जिजाऊ महिला बचतगट    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31CTwyG
Read More
सापडला कोरोना रूग्ण रात्री, तरी होणार नाही धावपळ, याची खात्री...

कोल्हापूर : "डंपर आहे तर बॅरिकेड नाही, बॅरिकेड आहे तर डंपर नाही...', अशी अवस्था महापालिकेच्या यंत्रणेची झाली होती. त्यासंबंधीचे वृत्त "सकाळ'मध्ये सोमवारी (ता. 28) प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने रात्रीच्या वेळीही स्वतंत्र यंत्रणा तैनात केली आहे. सायंकाळी सहा ते सकाळी सहापर्यंत कर्मचाऱ्यांची स्वतंत्र टीम तैनात असेल. 

कोरोना संकट काळात महापालिका प्रशासनाने रात्रीचा दिवस करून काम केले. शहराच्या कोणत्याही भागात दिवसा कोरोना रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य विभागाची यंत्रणा धावपळ करते. औषध फवारणी, बॅरिकेड लावून भाग सील करणे, यासंबंधी तातडीने उपाय योजले जातात. मात्र रात्रीच्या वेळी यंत्रणा कमी पडत होती. 

रंकाळा टॉवर येथे पाच दिवसापूर्वी कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर तातडीने साहित्य उपलब्ध होण्यास अडचण निर्माण झाली. ऐनवेळी औषध फवारणीवाला उपलब्ध झाला नाही. बॅरिकेट आणण्यासाठी डंपरची शोधाशोध करावी लागली. यंत्रणा लावण्यास रात्रीचे दोन वाजून गेले. त्याकडे "सकाळ' ने बातमीच्या माध्यमातून लक्ष वेधले होते. 

महापालिकेकडून औषध फवारणी करण्यासाठी ट्रॅक्‍टर, औषध फवारणी करणारा कर्मचारी, डंपर यांची रात्रीच्या वेळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. 
- निखील मोरे, उपायुक्त 

दृष्टिक्षेप 
- "सकाळ'मधील वृत्ताची महापालिकेकडून तत्काळ दखल 
- रात्रीच्या वेळी औषध फवारणीसाठी ट्रॅक्‍टर, कर्मचारी व्यवस्था 
- तातडीने रूग्णासाठी साहित्य उपलब्ध होणार 
- आरोग्य विभागालाही दिलासा 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सापडला कोरोना रूग्ण रात्री, तरी होणार नाही धावपळ, याची खात्री... कोल्हापूर : "डंपर आहे तर बॅरिकेड नाही, बॅरिकेड आहे तर डंपर नाही...', अशी अवस्था महापालिकेच्या यंत्रणेची झाली होती. त्यासंबंधीचे वृत्त "सकाळ'मध्ये सोमवारी (ता. 28) प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने रात्रीच्या वेळीही स्वतंत्र यंत्रणा तैनात केली आहे. सायंकाळी सहा ते सकाळी सहापर्यंत कर्मचाऱ्यांची स्वतंत्र टीम तैनात असेल.  कोरोना संकट काळात महापालिका प्रशासनाने रात्रीचा दिवस करून काम केले. शहराच्या कोणत्याही भागात दिवसा कोरोना रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य विभागाची यंत्रणा धावपळ करते. औषध फवारणी, बॅरिकेड लावून भाग सील करणे, यासंबंधी तातडीने उपाय योजले जातात. मात्र रात्रीच्या वेळी यंत्रणा कमी पडत होती.  रंकाळा टॉवर येथे पाच दिवसापूर्वी कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर तातडीने साहित्य उपलब्ध होण्यास अडचण निर्माण झाली. ऐनवेळी औषध फवारणीवाला उपलब्ध झाला नाही. बॅरिकेट आणण्यासाठी डंपरची शोधाशोध करावी लागली. यंत्रणा लावण्यास रात्रीचे दोन वाजून गेले. त्याकडे "सकाळ' ने बातमीच्या माध्यमातून लक्ष वेधले होते.  महापालिकेकडून औषध फवारणी करण्यासाठी ट्रॅक्‍टर, औषध फवारणी करणारा कर्मचारी, डंपर यांची रात्रीच्या वेळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.  - निखील मोरे, उपायुक्त  दृष्टिक्षेप  - "सकाळ'मधील वृत्ताची महापालिकेकडून तत्काळ दखल  - रात्रीच्या वेळी औषध फवारणीसाठी ट्रॅक्‍टर, कर्मचारी व्यवस्था  - तातडीने रूग्णासाठी साहित्य उपलब्ध होणार  - आरोग्य विभागालाही दिलासा  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2NQxeRC
Read More
खरेदी केलेल्या प्रमाणित स्वॅब कीटचे काय झाले?

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुक्ष्मजीव शास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत स्वॅब तपासणीसाठी वापरलेली काही कीट प्रमाणित नाहीत. अप्रमाणित कीटमधून केलेली तपासणी अधिकृत मानावी कशी तसेच जिल्हा परिषदेने खरेदी केलेल्या प्रमाणित कीटचे काय झाले, याची चौकशी व्हावी अशी मागणी प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. 

 देसाई यांनी दिलेली माहिती अशी, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लागणारे साहित्य भारतीय आर्युविज्ञान अनुसंधान परिषद, स्वास्थ्य अनुसंधान विभाग, स्वास्थ और परिवार कल्यान मंत्रालय (आयसीएमआर) संस्थेमार्फत तपासणी केलेली साहित्य तसेच स्वॅब तपासणीची कीट खरेदी करावीत, अशा सूचना केंद्र सरकारच्या आहेत.

त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी खरेदी केलेली कीट शेंडापार्क येथील सुक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या प्रगोयशाळेस दिली; मात्र आरसीएमआरआयने प्रमाणित केलेले कीट कोरोना येथील प्रयोगशाळेत चाचणीसाठी वापरली जात नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारच्या सूचनाचे पालन होत नाही. त्यामुळे सध्या वापरली जाणारी किटही अप्रमाणित आहेत का असा संशय आहे तसेच कोरोना स्वॅब तपासणी करणाऱ्यांत काही कर्मचारी प्रशिक्षित नाहीत तरीही ते तपासणी प्रक्रियेत कसे काम करतात सर्व बाबींची चौकशी व्हावी. 
मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री व हसन मुश्रीफ यांना पाठविले आहे. अशीही माहिती श्री देसाई यांनी दिली आहे. 

दरम्यान, याबाबत राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे यांच्याशी संपर्क साधला असता सध्या व्हीसीमध्ये असल्याने बोलू शकत नाही या प्रकरणाची माहिती घेऊन बोलेन असे सांगितले. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

खरेदी केलेल्या प्रमाणित स्वॅब कीटचे काय झाले? कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुक्ष्मजीव शास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत स्वॅब तपासणीसाठी वापरलेली काही कीट प्रमाणित नाहीत. अप्रमाणित कीटमधून केलेली तपासणी अधिकृत मानावी कशी तसेच जिल्हा परिषदेने खरेदी केलेल्या प्रमाणित कीटचे काय झाले, याची चौकशी व्हावी अशी मागणी प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.   देसाई यांनी दिलेली माहिती अशी, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लागणारे साहित्य भारतीय आर्युविज्ञान अनुसंधान परिषद, स्वास्थ्य अनुसंधान विभाग, स्वास्थ और परिवार कल्यान मंत्रालय (आयसीएमआर) संस्थेमार्फत तपासणी केलेली साहित्य तसेच स्वॅब तपासणीची कीट खरेदी करावीत, अशा सूचना केंद्र सरकारच्या आहेत. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी खरेदी केलेली कीट शेंडापार्क येथील सुक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या प्रगोयशाळेस दिली; मात्र आरसीएमआरआयने प्रमाणित केलेले कीट कोरोना येथील प्रयोगशाळेत चाचणीसाठी वापरली जात नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारच्या सूचनाचे पालन होत नाही. त्यामुळे सध्या वापरली जाणारी किटही अप्रमाणित आहेत का असा संशय आहे तसेच कोरोना स्वॅब तपासणी करणाऱ्यांत काही कर्मचारी प्रशिक्षित नाहीत तरीही ते तपासणी प्रक्रियेत कसे काम करतात सर्व बाबींची चौकशी व्हावी.  मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री व हसन मुश्रीफ यांना पाठविले आहे. अशीही माहिती श्री देसाई यांनी दिली आहे.  दरम्यान, याबाबत राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे यांच्याशी संपर्क साधला असता सध्या व्हीसीमध्ये असल्याने बोलू शकत नाही या प्रकरणाची माहिती घेऊन बोलेन असे सांगितले.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2NJiRP8
Read More
आज शिवराज मंत्रिमंडल का विस्तार, सिंधिया समर्थकों समेत 25 मंत्री ले सकते हैं शपथ https://ift.tt/2NM3d5D
ICC चेयरमैन पद की रेस में गांगुली, जानिए किससे मिल सकती है चुनौती https://ift.tt/38km1lS
गलवान जैसी झड़प नहीं दोहराने पर भारत-चीन में सहमति, 72 घंटों तक एक-दूसरे पर रखेंगे नजर https://ift.tt/3eS8NiB
Horoscope Today, 2 जुलाई: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/3gutQsj
बिहार: दागी उम्मीदवार क्यों, पार्टियों को चुनाव आयोग को बताना होगा https://ift.tt/31xv5Tf
सोपोर आतंकी हमले में सीकर का जवान शहीद, 6 महीने पहले ही हुआ था प्रमोशन https://ift.tt/3dT8CT9
लॉकडाऊन : बचतगटांची उत्पादने ॲमेझॉन, जीईएम ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर

लॉकडाऊन : बचतगटांची उत्पादने ॲमेझॉन, जीईएम ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर

July 01, 2020 0 Comments
कोरोना संकटकाळात बचतगटांचा व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांना मोठा फटका बसला होता.   from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/31As3xr ...
Read More
कोरोना व्हायरसः सोनं का महागलं? गुंतवणुकदारांनी काय करावं?