नंदवाळला पालखी ट्रकमधून थेट मंदिरात हळदी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या नंदवाळ (ता. करवीर) येथील आषाढी यात्रा साधेपणाने साजरी झाली. प्रत्येक वर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा यंदा मोजक्‍याच भाविकांच्या उपस्थितीत झाला.  पहाटे साडेतीन वाजता करवीर तहसीलदार शीतल मुळे-भामरे, करवीरच्या सभापती अश्विनी धोत्रे, सरपंच अस्मिता कांबळे व मंदिर समिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महापूजा झाली. मंदिर समितीतर्फे विठ्ठल- रुक्‍मिणी व सत्यभामा यांच्या मूर्तीसह गाभाऱ्यात फुलांची सजावट झाली. पण, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांना नंदवाळ गावात येण्यास बंदी होती. या परिसरात आज शुकशुकाट राहिला.  कालपासून नंदवाळ गावाकडे येणारे तिन्ही मार्ग बंद केले. ग्रामस्थांनीही मंदिराच्या बाहेर राहूनच दर्शन घेतले. मिरजकर टिकटी येथून येणारी पालखी ट्रकमधून थेट मंदिराच्या परिसरात आली. सकाळी 10 वाजता गावातील भीमाशंकर संस्थेच्या चौकात पालखी आल्यानंतर "ज्ञानोबा-तुकाराम'च्या गजरात सभामंडपात नेली. आरती झाल्यानंतर वारकरी व पोलिसांनी फुगडीचा फेर धरला. पालखी परत गेल्यानंतर मंदिर पुन्हा बंद केले. दरम्यान, अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे प्रतिपंढरपूर वारी पालखीसोबतच्या वारकऱ्यांना नंदवाळ फाटा येथे फराळाचे वाटप झाले. वारकरी मंडळाचे जिल्हा संचालक सुग्रीव पाटील-वाकरेकर, करवीर तालुका सचिव सदाशिव सावंत, बापूसाहेब पाटील, तानाजी पाटील आदी उपस्थित होते.  दृष्टिक्षेप  - नंदवाळ गावाकडे येणारे तिन्ही मार्ग बंद  - ग्रामस्थांनी मंदिराबाहेर राहूनच घेतले दर्शन  - विठ्ठल- रुक्‍मिणी, सत्यभामा मूर्तीसह गाभाऱ्यात फुलांची सजावट - आरतीनंतर वारकरी व पोलिसांनी धरला फुगडीचा फेर  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, July 1, 2020

नंदवाळला पालखी ट्रकमधून थेट मंदिरात हळदी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या नंदवाळ (ता. करवीर) येथील आषाढी यात्रा साधेपणाने साजरी झाली. प्रत्येक वर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा यंदा मोजक्‍याच भाविकांच्या उपस्थितीत झाला.  पहाटे साडेतीन वाजता करवीर तहसीलदार शीतल मुळे-भामरे, करवीरच्या सभापती अश्विनी धोत्रे, सरपंच अस्मिता कांबळे व मंदिर समिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महापूजा झाली. मंदिर समितीतर्फे विठ्ठल- रुक्‍मिणी व सत्यभामा यांच्या मूर्तीसह गाभाऱ्यात फुलांची सजावट झाली. पण, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांना नंदवाळ गावात येण्यास बंदी होती. या परिसरात आज शुकशुकाट राहिला.  कालपासून नंदवाळ गावाकडे येणारे तिन्ही मार्ग बंद केले. ग्रामस्थांनीही मंदिराच्या बाहेर राहूनच दर्शन घेतले. मिरजकर टिकटी येथून येणारी पालखी ट्रकमधून थेट मंदिराच्या परिसरात आली. सकाळी 10 वाजता गावातील भीमाशंकर संस्थेच्या चौकात पालखी आल्यानंतर "ज्ञानोबा-तुकाराम'च्या गजरात सभामंडपात नेली. आरती झाल्यानंतर वारकरी व पोलिसांनी फुगडीचा फेर धरला. पालखी परत गेल्यानंतर मंदिर पुन्हा बंद केले. दरम्यान, अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे प्रतिपंढरपूर वारी पालखीसोबतच्या वारकऱ्यांना नंदवाळ फाटा येथे फराळाचे वाटप झाले. वारकरी मंडळाचे जिल्हा संचालक सुग्रीव पाटील-वाकरेकर, करवीर तालुका सचिव सदाशिव सावंत, बापूसाहेब पाटील, तानाजी पाटील आदी उपस्थित होते.  दृष्टिक्षेप  - नंदवाळ गावाकडे येणारे तिन्ही मार्ग बंद  - ग्रामस्थांनी मंदिराबाहेर राहूनच घेतले दर्शन  - विठ्ठल- रुक्‍मिणी, सत्यभामा मूर्तीसह गाभाऱ्यात फुलांची सजावट - आरतीनंतर वारकरी व पोलिसांनी धरला फुगडीचा फेर  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2VE8wbI

No comments:

Post a Comment