Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, June 13, 2020

वो डायरेक्टर जिसने एक फिल्म बनाने में लगाए 14 साल, रचा इतिहास https://ift.tt/30H90RM
मद्यधुंद अवस्थेत तरूणाने फावड्याने फोडल्या गाड्या
कोरोना महाराष्ट्र: कोव्हिडच्या रुग्णांना नेमकी कोणती औषधं दिली जात आहेत?
लिफ्ट मागण्याचा केला बहाणा, अन....तीन महिन्यांनी अटक....झालं असं की...

औरंगाबाद: लिफ्ट मागण्याचा बहाणा करुन तिघा तरुणांनी दुचाकीस्वाराला बेदममारहाण करुन लुटल्याची घटना २९ फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास विजय नगर परिसरात घडली होती. प्रकरणात तब्बल तिन महिन्यांनी शुक्रवारी (ता.१२) रात्री आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले.

हेहीवाचाः पहिलाच पाऊस आला, संसार अन् मुके जीवही घेऊन गेला, औरंगाबाद जिल्ह्यातील परिस्थिती

शेख इरफान शेख लाल (२५, रा. नुराणी मस्जीत, गारखेडा गाव) असे आरोपीचे नाव आहे. प्रकरणात विकास भारकड (२३, रा. वाडोण बुद्रुक ता. उदगिर जि. लातूर ह.मु. जयभवानी नगर) याने तक्रार दिली. तक्रारीनुसार, विकास बीएसएनएल कंपनीचे कार्ड विक्री करुन आपला उर्दनिर्वाह चालवतो. २९ फेब्रुवारी विकासने बीएसएनलचे कार्ड एका ग्राहकाला विक्री केले होते, मात्र कार्डला काही अडचण आल्याने ग्राहकाने विकासला फोन करुन तक्रार केली.

तक्रारीचे निवारण करुन विकास रात्री साडेअकरा वाजता दुचाकीने (क्रं. एमएच१७ यू ५८४७) शिवाजीनगर येथून विजयनगर कडे जात होता. त्यावेळी कालिका माता मंदिर दोन तिन मुले उभी होती. त्यातील एकाने लिफ्टचा बहाणा करुन विकासला अडवले. तर उर्वरित दोघांनी विकासला दुचाकीवरुन खाली पाडले व कारगिल मैदानेकडे नेत बेल्टने बेदम मारहाण केली.

हेहीवाचाः मंदीराचा हलणारा कळस आम्ही कसा पाहू?  

तसेच त्याच्या बोटाचे नख हत्याराने कट करुन त्याच्या खिशातील रोख साडे चारशे रुपये, मोबाइल व दुचाकी बळजबरी हिसकावरुन नेली. प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करुन तब्बल तिन महिन्यांनी आरोपीला अटक केली 

सोमवारपर्यंत पोलिस कोठडी

संशयिताला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपीला सोमवारपर्यंत (ता.१५) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. कांबळे यांनी शनिवारी (ता.१३) दिले. सुनावणीदरम्यान सहाय्यक सरकारी वकील योगेश तुपे यांनी आरोपीच्या साथीदारांचा शोध घेऊन त्यांना अटक करणे आहे. तसेच गुन्ह्यात चोरलेली रोख रक्कम, मोबाइल व दुचाकी जप्त करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिले.

क्लिक करा:  कापूस खरेदी कधी करणार? म्हणणे मांडा! औरंगाबाद खंडपीठ ः मंगळवारी होणार याचिकेवर सुनावणी 

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लिफ्ट मागण्याचा केला बहाणा, अन....तीन महिन्यांनी अटक....झालं असं की... औरंगाबाद: लिफ्ट मागण्याचा बहाणा करुन तिघा तरुणांनी दुचाकीस्वाराला बेदममारहाण करुन लुटल्याची घटना २९ फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास विजय नगर परिसरात घडली होती. प्रकरणात तब्बल तिन महिन्यांनी शुक्रवारी (ता.१२) रात्री आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. हेहीवाचाः पहिलाच पाऊस आला, संसार अन् मुके जीवही घेऊन गेला, औरंगाबाद जिल्ह्यातील परिस्थिती शेख इरफान शेख लाल (२५, रा. नुराणी मस्जीत, गारखेडा गाव) असे आरोपीचे नाव आहे. प्रकरणात विकास भारकड (२३, रा. वाडोण बुद्रुक ता. उदगिर जि. लातूर ह.मु. जयभवानी नगर) याने तक्रार दिली. तक्रारीनुसार, विकास बीएसएनएल कंपनीचे कार्ड विक्री करुन आपला उर्दनिर्वाह चालवतो. २९ फेब्रुवारी विकासने बीएसएनलचे कार्ड एका ग्राहकाला विक्री केले होते, मात्र कार्डला काही अडचण आल्याने ग्राहकाने विकासला फोन करुन तक्रार केली. तक्रारीचे निवारण करुन विकास रात्री साडेअकरा वाजता दुचाकीने (क्रं. एमएच१७ यू ५८४७) शिवाजीनगर येथून विजयनगर कडे जात होता. त्यावेळी कालिका माता मंदिर दोन तिन मुले उभी होती. त्यातील एकाने लिफ्टचा बहाणा करुन विकासला अडवले. तर उर्वरित दोघांनी विकासला दुचाकीवरुन खाली पाडले व कारगिल मैदानेकडे नेत बेल्टने बेदम मारहाण केली. हेहीवाचाः मंदीराचा हलणारा कळस आम्ही कसा पाहू?   तसेच त्याच्या बोटाचे नख हत्याराने कट करुन त्याच्या खिशातील रोख साडे चारशे रुपये, मोबाइल व दुचाकी बळजबरी हिसकावरुन नेली. प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करुन तब्बल तिन महिन्यांनी आरोपीला अटक केली  सोमवारपर्यंत पोलिस कोठडी संशयिताला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपीला सोमवारपर्यंत (ता.१५) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. कांबळे यांनी शनिवारी (ता.१३) दिले. सुनावणीदरम्यान सहाय्यक सरकारी वकील योगेश तुपे यांनी आरोपीच्या साथीदारांचा शोध घेऊन त्यांना अटक करणे आहे. तसेच गुन्ह्यात चोरलेली रोख रक्कम, मोबाइल व दुचाकी जप्त करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिले. क्लिक करा:  कापूस खरेदी कधी करणार? म्हणणे मांडा! औरंगाबाद खंडपीठ ः मंगळवारी होणार याचिकेवर सुनावणी    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2B41C87
Read More
यंदा बाप्पाची मिळणार थेट घरपोच डिलिव्हरी; शेणखत-लालमातीच्या गणेश मूर्तींना भाविकांकडून प्रचंड मागणी 

मुंबई: कोरोना विषाणूंमुळे येऊ घातलेल्या गणेशोत्सवावर परिणाम होऊ शकतो. भाविकांना गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना कशी करावी त्याचे विसर्जन कसे होणार याची चिंता लागली आहे. कोरोनामुळे बाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे गणेश भाविकांसाठी 'गाो ग्रीन बाप्पा' चे पंकज कुंभार यांनी गणेश मूर्ती थेट घरपोच देण्याची सुविधा केली आहे.

 या मूर्ती पर्यावरणस्नेही असल्याने त्यांचे घरच्या घरी विसर्जन करणे सहज शक्य आहे. त्यामुळे भाविकांना गणेश मूर्ती आणण्यासाठी व विसर्जनासाठी बाहेर पडण्याची गरज नाही. शेणखत, कागदाचा लगदा, शाडू माती, लाल माती यांच्या मिश्रणातून गणपती बाप्पांच्या मूर्ती तयार केल्या जातात. 

हेही वाचा: दर्जेदार प्लाझ्मा निवडण्यासाठी पालिकेने आणले 'हे' तंत्रज्ञान; प्लाझ्मातील अॅंटीबॉडीजचे प्रमाणही समजणार....

गेली काही वर्षांपासून पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करण्याकडे लोकांचा कल आहे. तसेत राज्य सरकार पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्यसाठी जनजागृती केली आहे. याच विचारातून पंकज यांच्या पत्नी सोनारी कुंभार यांनी 'गो ग्रीन बाप्पा' संकल्पना प्रत्यक्षात आणली. पंकज कुंभार मूळचे कराडचे. त्यांच्या गावी फार पूर्वीपासून मातीच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. पंकज यांचे कुटूंब परंपरेने कुंभार आहेत. पंकज यांचे भाऊ शुभम कुंभार गावी मातीच्या मूर्ती तयार करतात. त्यानंतर त्या गणेशोत्सव आधी त्या मूर्ती मुंबईला आणल्या जातात. अंतिम फिनिशिंग करून ऑर्डर प्रमाणे मूर्तींचे पॅकिंग केले जाते आणि भाविकांना घरपोच गणपतीची डिलिव्हरी केली करण्यात येते, असे पंकज यांनी सांगितले. 

 या वर्षी आतापर्यंत 50 मूर्तींची ऑर्डर आली आहे. भाविकांकडून मूर्ती ऑर्डरसाठी मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे. परंतु या वर्षी 100 ते 125 मूर्ती बनवणे शक्य आहे. मर्यादितच ऑर्डर घेत आहोत. लॉकडाऊन कच्चा माल मिळणे कठिण झाले होते. एका मूर्ती तयार करण्यासाठी एक दिवस जातो. शुभम एकटेच मूर्ती तयार करतात. 10 इंचापासून ते 18 इंचापर्यंत गणेश मूर्ती तयार केल्या जातात, असे पंकज यांनी माहिती दिली. 

 ही मूर्ती पर्यावरणस्नेही आणखी एका कारणाने आहे ते म्हणजे या मूर्ती सोबत पंकज बेलाचे किंवा जास्वंदाचे कलम देतात. मातीची मूर्ती घरच्या घरी टपामध्ये विसर्जित करून खाली मातीचा गाळ राहिलेला असतो. तो गाळून कुंडीमध्ये सोबत दिलेले कलम लावता येते. प्रत्येक मूर्ती मागे एक नव्या रोपटाची निर्मिती दरवर्षी होते. 

हेही वाचा: डार्क नेटच्या माध्यमातून तरुणांना विकत होते गांजा; पोलिसांनी प्रसिद्ध मिठाईवाल्याच्या मुलासह दोघांना केली अटक..

भाविकही मनोभावाने पूजन केलेल्या मूर्तीचे विसर्जन करून त्याची आठवण म्हणून ते रोपट्याची तेवढीच निगा राखतात. भाविक त्या रोपट्याचे फोटो आम्हाला पाठवतात. अशा दृष्टीने पर्यावरणाचे संवर्धन करण्यास या मूर्तीच्या माध्यमातून हातभार लागत आहे, याचे खूप समाधान आम्हाला मिळते, अशा भावना पंकज यांनी व्यक्त केल्या. मूर्तीची ऑर्डर व मूर्ती पाहण्यासाठी www.gogreenbappa.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

now online delivery of  ganesh idols will available on go green bappa  

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

यंदा बाप्पाची मिळणार थेट घरपोच डिलिव्हरी; शेणखत-लालमातीच्या गणेश मूर्तींना भाविकांकडून प्रचंड मागणी  मुंबई: कोरोना विषाणूंमुळे येऊ घातलेल्या गणेशोत्सवावर परिणाम होऊ शकतो. भाविकांना गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना कशी करावी त्याचे विसर्जन कसे होणार याची चिंता लागली आहे. कोरोनामुळे बाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे गणेश भाविकांसाठी 'गाो ग्रीन बाप्पा' चे पंकज कुंभार यांनी गणेश मूर्ती थेट घरपोच देण्याची सुविधा केली आहे.  या मूर्ती पर्यावरणस्नेही असल्याने त्यांचे घरच्या घरी विसर्जन करणे सहज शक्य आहे. त्यामुळे भाविकांना गणेश मूर्ती आणण्यासाठी व विसर्जनासाठी बाहेर पडण्याची गरज नाही. शेणखत, कागदाचा लगदा, शाडू माती, लाल माती यांच्या मिश्रणातून गणपती बाप्पांच्या मूर्ती तयार केल्या जातात.  हेही वाचा: दर्जेदार प्लाझ्मा निवडण्यासाठी पालिकेने आणले 'हे' तंत्रज्ञान; प्लाझ्मातील अॅंटीबॉडीजचे प्रमाणही समजणार.... गेली काही वर्षांपासून पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करण्याकडे लोकांचा कल आहे. तसेत राज्य सरकार पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्यसाठी जनजागृती केली आहे. याच विचारातून पंकज यांच्या पत्नी सोनारी कुंभार यांनी 'गो ग्रीन बाप्पा' संकल्पना प्रत्यक्षात आणली. पंकज कुंभार मूळचे कराडचे. त्यांच्या गावी फार पूर्वीपासून मातीच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. पंकज यांचे कुटूंब परंपरेने कुंभार आहेत. पंकज यांचे भाऊ शुभम कुंभार गावी मातीच्या मूर्ती तयार करतात. त्यानंतर त्या गणेशोत्सव आधी त्या मूर्ती मुंबईला आणल्या जातात. अंतिम फिनिशिंग करून ऑर्डर प्रमाणे मूर्तींचे पॅकिंग केले जाते आणि भाविकांना घरपोच गणपतीची डिलिव्हरी केली करण्यात येते, असे पंकज यांनी सांगितले.   या वर्षी आतापर्यंत 50 मूर्तींची ऑर्डर आली आहे. भाविकांकडून मूर्ती ऑर्डरसाठी मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे. परंतु या वर्षी 100 ते 125 मूर्ती बनवणे शक्य आहे. मर्यादितच ऑर्डर घेत आहोत. लॉकडाऊन कच्चा माल मिळणे कठिण झाले होते. एका मूर्ती तयार करण्यासाठी एक दिवस जातो. शुभम एकटेच मूर्ती तयार करतात. 10 इंचापासून ते 18 इंचापर्यंत गणेश मूर्ती तयार केल्या जातात, असे पंकज यांनी माहिती दिली.   ही मूर्ती पर्यावरणस्नेही आणखी एका कारणाने आहे ते म्हणजे या मूर्ती सोबत पंकज बेलाचे किंवा जास्वंदाचे कलम देतात. मातीची मूर्ती घरच्या घरी टपामध्ये विसर्जित करून खाली मातीचा गाळ राहिलेला असतो. तो गाळून कुंडीमध्ये सोबत दिलेले कलम लावता येते. प्रत्येक मूर्ती मागे एक नव्या रोपटाची निर्मिती दरवर्षी होते.  हेही वाचा: डार्क नेटच्या माध्यमातून तरुणांना विकत होते गांजा; पोलिसांनी प्रसिद्ध मिठाईवाल्याच्या मुलासह दोघांना केली अटक.. भाविकही मनोभावाने पूजन केलेल्या मूर्तीचे विसर्जन करून त्याची आठवण म्हणून ते रोपट्याची तेवढीच निगा राखतात. भाविक त्या रोपट्याचे फोटो आम्हाला पाठवतात. अशा दृष्टीने पर्यावरणाचे संवर्धन करण्यास या मूर्तीच्या माध्यमातून हातभार लागत आहे, याचे खूप समाधान आम्हाला मिळते, अशा भावना पंकज यांनी व्यक्त केल्या. मूर्तीची ऑर्डर व मूर्ती पाहण्यासाठी www.gogreenbappa.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. now online delivery of  ganesh idols will available on go green bappa   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3huqqXQ
Read More
लाॅटरीला झळ; मटका, झुगार फोफावण्याची चिन्हे

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जीएसटी वाढीचा फटका बसल्यानंतर लॉकडाउनमुळे लॉटरी व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन थांबले आहे. नागरिकांना लॉटरीला पर्याय न राहिल्याने तसेच लॉकडाउन काळात रोजगाराची साधने कमी झाल्याने येत्या काही दिवसांत मटका व जुगार तेजीत येण्याची मोठी शक्‍यता निर्माण झाली आहे. 

जिल्ह्यात शेकडोच्या घरात लॉटरी एजंट व विक्रेते आहेत. लॉकडाउन जाहीर केल्याने याचा फटका अनेक मोठ्या उद्योगांसह खाजगी, लहान उद्योग तसेच व्यवसायांनाही बसला. यामुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले. नशीब आजमावण्याचा आणि अनैतिक व्यापार, धंद्यावर नियंत्रण येण्यासाठी शासनाने नागरिकांसाठी लॉटरीसारखा पर्याय उपलब्ध करून दिला; मात्र लॉकडाउनपूर्वी लॉटरीवर केंद्राने 28 टक्‍के जीएसटी कर लावल्याने याचा परिणाम लॉटरी विकणाऱ्या वितरक, लहान-मोठे एजंट यांच्यावर दिसून आला. अनेक ठिकाणचे लॉटरी व्यवसाय बंद झाले. परिणामी लॉटरी विकत घेणाऱ्यांची संख्याही रोडावली गेली. यामुळे लॉटरी विकत घेणाऱ्यांची संख्याही कमी झाली. 

राज्याच्या महसुलात लॉटरी व्यवसायातून भर पडते. वर्षभरात कोटींच्या घरात असलेले उलाढाल लॉकडाऊन काळामध्ये पूर्णपणे ठप्प झाली आहे. जुगार, मटका आणि सट्टा बाजाराला पर्याय म्हणून लॉटरी हा व्यवसाय असल्याने प्रतिष्ठित लोकांचा लॉटरी काढण्याकडे कल असायचा; मात्र 28 टक्के जीएसटी कर आकारल्याने आधीच संकटात असलेल्या लॉटरी व्यवसाय लॉकडाऊन काळात पूर्णपणे ठप्प झाल्याने लॉटरीवर अवलंबून असलेले विक्रेते, लहान-मोठे एजंट, फिरते विक्रेते असे अनेकजण बेरोजगारीच्या मार्गावर आले. 

लॉटरीवर 28 टक्‍के जीएसटी कर प्रणालीमुळे संकटात सापडलेला लॉटरी व्यवसाय सध्या लॉकडाउनमध्ये पूर्णतः ठप्प झाला आहे. त्यामुळे अनेक छोट्या-मोठ्या एजंटांचे रोजगार हिरावले गेले आहेत. या सर्वांचा विचार करून शासनाने पुन्हा लॉटरीला चांगले दिवस कसे येतील? यासाठी प्रयत्न करावा. 
- अनंत माधव, लॉटरी एजंट विक्रेते 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लाॅटरीला झळ; मटका, झुगार फोफावण्याची चिन्हे सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जीएसटी वाढीचा फटका बसल्यानंतर लॉकडाउनमुळे लॉटरी व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन थांबले आहे. नागरिकांना लॉटरीला पर्याय न राहिल्याने तसेच लॉकडाउन काळात रोजगाराची साधने कमी झाल्याने येत्या काही दिवसांत मटका व जुगार तेजीत येण्याची मोठी शक्‍यता निर्माण झाली आहे.  जिल्ह्यात शेकडोच्या घरात लॉटरी एजंट व विक्रेते आहेत. लॉकडाउन जाहीर केल्याने याचा फटका अनेक मोठ्या उद्योगांसह खाजगी, लहान उद्योग तसेच व्यवसायांनाही बसला. यामुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले. नशीब आजमावण्याचा आणि अनैतिक व्यापार, धंद्यावर नियंत्रण येण्यासाठी शासनाने नागरिकांसाठी लॉटरीसारखा पर्याय उपलब्ध करून दिला; मात्र लॉकडाउनपूर्वी लॉटरीवर केंद्राने 28 टक्‍के जीएसटी कर लावल्याने याचा परिणाम लॉटरी विकणाऱ्या वितरक, लहान-मोठे एजंट यांच्यावर दिसून आला. अनेक ठिकाणचे लॉटरी व्यवसाय बंद झाले. परिणामी लॉटरी विकत घेणाऱ्यांची संख्याही रोडावली गेली. यामुळे लॉटरी विकत घेणाऱ्यांची संख्याही कमी झाली.  राज्याच्या महसुलात लॉटरी व्यवसायातून भर पडते. वर्षभरात कोटींच्या घरात असलेले उलाढाल लॉकडाऊन काळामध्ये पूर्णपणे ठप्प झाली आहे. जुगार, मटका आणि सट्टा बाजाराला पर्याय म्हणून लॉटरी हा व्यवसाय असल्याने प्रतिष्ठित लोकांचा लॉटरी काढण्याकडे कल असायचा; मात्र 28 टक्के जीएसटी कर आकारल्याने आधीच संकटात असलेल्या लॉटरी व्यवसाय लॉकडाऊन काळात पूर्णपणे ठप्प झाल्याने लॉटरीवर अवलंबून असलेले विक्रेते, लहान-मोठे एजंट, फिरते विक्रेते असे अनेकजण बेरोजगारीच्या मार्गावर आले.  लॉटरीवर 28 टक्‍के जीएसटी कर प्रणालीमुळे संकटात सापडलेला लॉटरी व्यवसाय सध्या लॉकडाउनमध्ये पूर्णतः ठप्प झाला आहे. त्यामुळे अनेक छोट्या-मोठ्या एजंटांचे रोजगार हिरावले गेले आहेत. या सर्वांचा विचार करून शासनाने पुन्हा लॉटरीला चांगले दिवस कसे येतील? यासाठी प्रयत्न करावा.  - अनंत माधव, लॉटरी एजंट विक्रेते  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30Gdt72
Read More
आयुक्त मुंढेंची बदली रोखण्यासाठी नागपूरकरांनी लढवली ही शक्कल

नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी राजकीय नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर दबाव निर्माण केला जात असल्याच्या माहितीने शहरातील नागरिक चांगलेच खवळले आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मिडियाद्वारे आयुक्तांची बदली रोखण्यासंदर्भात सोशल मिडियावरून स्वाक्षरी मोहिम सुरू केली. गेल्या तीन दिवसांत 22 हजार नागरिकांनी स्वाक्षरी करीत आयुक्तांच्या संभाव्य बदलीला विरोध केला. 

 

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काही कठोर निर्णय घेतले. त्यांच्या निर्णयामुळे अनेक राजकीय नेत्यांच्या पोटात दुखणे सुरू झाले. यात महापालिकेतील सत्ताधारी भाजप तसेच विरोधी पक्ष कॉंग्रेसचेही नेते सामील आहे. या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा आग्रह धरला. त्यामुळे मुंबईपासून नागपूरपर्यंत आयुक्तांच्या बदलीची चर्चा रंगली आहे. राजकीय नेत्यांचा विरोध होत असला तरी आयुक्तांना नागरिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. 

 

आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयामुळे शहरात कोरोना नियंत्रणात असल्याची नागरिकांची भावना आहे. त्यांच्यामुळेच शहर सुरक्षित असल्याचेही अनेक नागरिक मानतात. एवढेच नव्हे तर सत्ताधाऱ्यांच्या मनमानीलाही लगाम त्यांनी लगाम लावली, असेही अनेकांचे मत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विलगीकरण, प्रतिबंधित क्षेत्र घोषित करणे, त्यात घट करणे, कोविड सेंटर तयार करणे, राजकीय नेत्यांचा विरोध झुगारून प्रशासकीय यंत्रणेकडून उपाययोजना राबविण्याचे काम त्यांनी केले. यातूनच जनसामान्यात त्यांच्याबाबत आपुलकी निर्माण झाली. 

धंद्यावर बसवण्याची धमकी देणारी 'लुटेरी दुल्हन' प्रीती दास पोलिसांच्या जाळ्या

आयुक्तांच्या बदलीची चर्चा ऐकताच यातील काही नागरिकांनी 'नागपूर सिटी निड्‌स तुकाराम मुंढे' अशी मोहिम सोशल मिडियाच्या माध्यमातून सुरू केली. 'डब्लू डब्लू डब्लू डॉट चेंज डॉट ऑर्ग' या वेबसाईटच्या माध्यमातून 11 जूनला रात्रीपासून ही मोहिम सुरू केली. तासभरातच एक हजार नागरिकांनी आयुक्त मुंढेंच्या बदलीचा विरोध करीत या वेबसाईटवर नोंद केली. गेल्या तीन दिवसांत आज रात्रीपर्यंत 22 हजार 102 नागरिकांनी आयुक्त मुंढेंच्या समर्थनार्थ वेबसाईटवर नाव नोंदविले. 

 

नागपुरात मुंढेची गरज, मुख्यमंत्र्यांना पत्र 
गेल्या सहा महिन्यांत आयुक्त मुंढे यांनी शहराचा चेहरा बदलवला. कोरोना या साथीच्या रोगात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. अगदी कमी खर्चात विलगीकरण, मजूर व परप्रांतीय मजुरांसाठी निवारा, भिकाऱ्यांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम, शहराचे सर्वेक्षण यामुळे कोरोनावर नियंत्रण शक्‍य झाले. त्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्‍वास असून अशा स्थितीत त्यांची बदली करू नये, असे ऑनलाईन पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात येणार आहे. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आयुक्त मुंढेंची बदली रोखण्यासाठी नागपूरकरांनी लढवली ही शक्कल नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी राजकीय नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर दबाव निर्माण केला जात असल्याच्या माहितीने शहरातील नागरिक चांगलेच खवळले आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मिडियाद्वारे आयुक्तांची बदली रोखण्यासंदर्भात सोशल मिडियावरून स्वाक्षरी मोहिम सुरू केली. गेल्या तीन दिवसांत 22 हजार नागरिकांनी स्वाक्षरी करीत आयुक्तांच्या संभाव्य बदलीला विरोध केला.    आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काही कठोर निर्णय घेतले. त्यांच्या निर्णयामुळे अनेक राजकीय नेत्यांच्या पोटात दुखणे सुरू झाले. यात महापालिकेतील सत्ताधारी भाजप तसेच विरोधी पक्ष कॉंग्रेसचेही नेते सामील आहे. या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा आग्रह धरला. त्यामुळे मुंबईपासून नागपूरपर्यंत आयुक्तांच्या बदलीची चर्चा रंगली आहे. राजकीय नेत्यांचा विरोध होत असला तरी आयुक्तांना नागरिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे.    आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयामुळे शहरात कोरोना नियंत्रणात असल्याची नागरिकांची भावना आहे. त्यांच्यामुळेच शहर सुरक्षित असल्याचेही अनेक नागरिक मानतात. एवढेच नव्हे तर सत्ताधाऱ्यांच्या मनमानीलाही लगाम त्यांनी लगाम लावली, असेही अनेकांचे मत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विलगीकरण, प्रतिबंधित क्षेत्र घोषित करणे, त्यात घट करणे, कोविड सेंटर तयार करणे, राजकीय नेत्यांचा विरोध झुगारून प्रशासकीय यंत्रणेकडून उपाययोजना राबविण्याचे काम त्यांनी केले. यातूनच जनसामान्यात त्यांच्याबाबत आपुलकी निर्माण झाली.  धंद्यावर बसवण्याची धमकी देणारी 'लुटेरी दुल्हन' प्रीती दास पोलिसांच्या जाळ्या आयुक्तांच्या बदलीची चर्चा ऐकताच यातील काही नागरिकांनी 'नागपूर सिटी निड्‌स तुकाराम मुंढे' अशी मोहिम सोशल मिडियाच्या माध्यमातून सुरू केली. 'डब्लू डब्लू डब्लू डॉट चेंज डॉट ऑर्ग' या वेबसाईटच्या माध्यमातून 11 जूनला रात्रीपासून ही मोहिम सुरू केली. तासभरातच एक हजार नागरिकांनी आयुक्त मुंढेंच्या बदलीचा विरोध करीत या वेबसाईटवर नोंद केली. गेल्या तीन दिवसांत आज रात्रीपर्यंत 22 हजार 102 नागरिकांनी आयुक्त मुंढेंच्या समर्थनार्थ वेबसाईटवर नाव नोंदविले.    नागपुरात मुंढेची गरज, मुख्यमंत्र्यांना पत्र  गेल्या सहा महिन्यांत आयुक्त मुंढे यांनी शहराचा चेहरा बदलवला. कोरोना या साथीच्या रोगात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. अगदी कमी खर्चात विलगीकरण, मजूर व परप्रांतीय मजुरांसाठी निवारा, भिकाऱ्यांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम, शहराचे सर्वेक्षण यामुळे कोरोनावर नियंत्रण शक्‍य झाले. त्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्‍वास असून अशा स्थितीत त्यांची बदली करू नये, असे ऑनलाईन पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात येणार आहे.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3htByE3
Read More
शरद पवार, कोकण आणि चक्रीवादळ

सिंधुदुर्ग - निसर्ग चक्रीवादाळाने रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतीवर आधारीत अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला. कोरोनाच्या काळातच हे संकट कोसळले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोकण दौरे केले; पण सगळ्यात जास्त चर्चेचा ठरला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांचा दौरा. इतक्‍या वयात आणि कोरोनाचा संसर्ग कोकणात वाढत असतानाही पवार यांनी केलेला हा दौरा त्यांचे कोकणशी, इथल्या मातीशी, कोकणी माणसाशी असलेले घट्ट नाते सांगायला पुरेसा आहे; पण या वादळाने केलेल्या नुकसानाचे स्वरूप सरकारी पंचनाम्यात, आणि नुकसानीच्या आकड्यात मावणारे नाही. हा "जाणता नेता' पुन्हा एकदा कोकणच्या कृषीक्षेत्राचा तारणहार ठरणार का? हा कोकणवासीयांना पडलेला प्रश्‍न आहे. 

"निसर्ग' चक्रीवादळ आले आणि होत्याचे नव्हते करून गेले. आंजर्ले (जि. रत्नागिरी) परिसरातील एका आपत्तीग्रस्ताने सांगितलेला किस्सा अंगावर शहारा आणणारा आहे. त्याने अगदी आपल्या जन्मापासून घरात बसून केवळ समुद्राची गाज ऐकली होती. कारण तिथे दाट नारळ, पोफळीच्या बागा होत्या. काही तासांसाठी ते चक्रीवादळ आले आणि सगळे उद्‌ध्वस्त करून केले. आता ते घर आणि समुद्रामध्ये फक्‍त कोसळलेल्या, उद्‌ध्वस्त झालेल्या झाडांचे अवशेष आहेत. घरात बसून समोरचा निळाशार समुद्र त्या आपत्तीग्रस्ताला चिडवतो आहे. ही स्थिती रत्नागिरी आणि रायगडमधील अनेक गावात आहे. कित्तेक शेतकरी आता पुन्हा कधीच उभे राहता येणार नाही अशा मानसिकतेत गेले आहेत. 

काही तासांच्या वादळाने गेले कित्येक पिढ्यांचा पोशींदा असलेल्या बागा उद्‌ध्वस्त केल्या आहेत; पण हे संकट कोरोनाच्या प्रभावामुळे तितकेसे चर्चेला आले नाही. नेत्यांचे दौरे झाले, पॅकेज जाहीर झाले; पण यातून कोकणातला हा शेतकरी उभा राहिल का? हा प्रश्‍न मात्र अजूनही सुटला नाही. या सगळ्या दौऱ्यात माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची कोकण भेट अधिक आत्मियतेची ठरली. संकटकाळात पवार मदतीला जातात यात नवे काही नाही; मात्र इतके वय आणि कोरोना संसर्गाचा धोका असतानाही त्यांनी केलेला दौरा लक्षवेधी म्हणावा लागेल. त्याची कारणेही तशीच आहेत.

पवार पश्‍चिम महाराष्ट्राचे म्हणून ओळखले जात असले तरी कोकणात झालेली कृषी क्रांती, इथल्या नारळ, सुपारी, आंबा, काजूच्या बागांचे बरेचसे श्रेय पवारांनाच जाते. मनीऑर्डर संस्कृती बदलण्यात या बागायतींचा मोठा वाटा आहे, आणि ही बागायती, कोकण आणि पवार यांचे एक वेगळे नाते आहे. पूर्वी कोकणची ओळख खरिपाच्या काळात होणारी भात शेती अशीच होती. सगळ्यात आधी तत्कालीन कृषीमंत्री बाळासाहेब सावंत यांनी या भागात बागायती रूजवायचा प्रयत्न केला.

त्यांनी आणलेल्या फलोत्पादन योजनेत विशेषतः काजूच्या बिया शेतकऱ्यांना दिल्या जायच्या; पण बागायती विषयी फारशी जागृती नव्हती. बऱ्याच जणांनी या काजू बिया भाजून फोडून खाल्या. काहींनी लावल्या आणि ते बागायतदार झाले. यातून पुढे अशा योजनेविषयी जागृती मात्र निर्माण झाली. पुढे शरद पवारांचे पर्व सुरू झाले. अवघ्या महाराष्ट्राला जाणणारा नेता, अशी त्यांची ओळख निर्माण झाली. कोकणातील गावोगाव त्यांना ओळखणारी आणि विशेष म्हणजे ते ओळखत असलेली कष्टकऱ्यांची फौज तयार होवू लागली. त्यांनी फलोत्पादन योजना आणली. शंभर टक्‍के अनूदान मिळू लागले. यातून अनेक ठिकाणी पडीक जमिनीवर आंबा, काजूच्या बागा बहरू लागल्या.

शेकडो वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या नारळ, सुपारीच्या बागायतीचे क्षेत्र वाढू लागले. याच्याच जोडीने त्यांनी पर्यटनासाठीही प्रयत्न सुरू केले; पण हे प्रयत्न केवळ घोषणाबाजी नव्हती. आताच्या गणपतीपुळेच्या पर्यटन मॉडेलचे खूप मोठे श्रेय पवारांना जाते. 
सावंतवाडीचे माजी आमदार शिवराम दळवी यांनी याबाबत सांगितलेला किस्सा खुप बोलका आहे. त्या काळात दळवी यांनी आपल्या अन्य भागिदारांच्या मदतीने आंबोलीत मोठे हॉटेल सुरू केले. या मागची प्रेरणा स्वतः पवार होते. जुन्या पिढीतील अनेक बागायती क्षेत्रे, तिथल्या वाटा, तिथली कष्टकरी माणसे शरद पवारांना तोंडपाठ होती. ही आख्यायिका नाही. 2003 मध्ये गणपतीपुळे येथे झालेल्या मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यात याची प्रचिती तिथे उपस्थिती असलेल्यांना आली होती. काही जुने कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांना पवारांनी स्वतः स्टेजजवळ केवळ बोलवलेच नव्हते तर त्यांच्या बागा कुठे आहेत याचे वर्णनही सांगितले होते. या सगळ्या जिव्हाळ्यामुळे कोकणावर ओढवलेले संकट पाहून पवार कोकणवासीयांच्या भेटीला येणे साहाजीकच आहे; पण ही वेळ केवळ भावनीक भेटीची नाही. 

कोकणाचे नुकसान वेगळे 
या वादळाने कोकणात झालेले नुकसान इतर वेळच्या हानीपेक्षा वेगळे आहे. ऊस, द्राक्ष, कापूस आदी पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान प्रामुख्याने एक-दोन वर्षाशी संबंधीत असते; मात्र या वादळाने उद्‌ध्वस्त केलेल्या नारळ, सुपारीचे नुकसान एका पिढीशी संबंधीत आहे. नारळाचे झाड दीड ते दोन पिढ्यांपर्यंत उत्पन्न देते. सुपारी साधारण 30-40 वर्षे फळ देते; मात्र बाग उभी करण्यास 12 वर्षे लागतात. या 12 वर्षांत केवळ खर्च आणि कष्ट करायचे असतात. आता बहुसंख्य शेतकऱ्यांच्या उद्‌ध्वस्त बागा त्यांच्याकडे काही पिढ्यांपासून होत्या. त्या पुन्हा उभ्या करण्यासाठी पुढची 12 वर्षे जमिनीत पैसा ओतायला हवा. त्यातच हवामानातील बदलामुळे ही झाडे उत्पन्न देईपर्यंत टिकणार की नाही, हाही प्रश्‍न आहे. 

शेतकऱ्यांना हवे पाठबळ 
अनिश्‍चिततेच्या भोवऱ्यात कोकणचा बळीराजा अडकला आहे. केवळ एकरकमी पॅकेज देवून हा शेतकरी पुन्हा उभा राहणे कठीण आहे. या नुकसानाकडे सरकारी जीआरमधील निकषामधून न पाहता व्यावहारीक दृष्टीने पाहायला हवे. तसे पॅकेज आणि मदतीचा हात द्यायला हवा. कोकणात बागायती फुलवायला पवारांचा हातभार होता. आता चक्रीवादळाने उद्‌ध्वस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभे करायलाही त्यांच्या पाठबळाची अपेक्षा आहे.  

 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शरद पवार, कोकण आणि चक्रीवादळ सिंधुदुर्ग - निसर्ग चक्रीवादाळाने रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतीवर आधारीत अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला. कोरोनाच्या काळातच हे संकट कोसळले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोकण दौरे केले; पण सगळ्यात जास्त चर्चेचा ठरला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांचा दौरा. इतक्‍या वयात आणि कोरोनाचा संसर्ग कोकणात वाढत असतानाही पवार यांनी केलेला हा दौरा त्यांचे कोकणशी, इथल्या मातीशी, कोकणी माणसाशी असलेले घट्ट नाते सांगायला पुरेसा आहे; पण या वादळाने केलेल्या नुकसानाचे स्वरूप सरकारी पंचनाम्यात, आणि नुकसानीच्या आकड्यात मावणारे नाही. हा "जाणता नेता' पुन्हा एकदा कोकणच्या कृषीक्षेत्राचा तारणहार ठरणार का? हा कोकणवासीयांना पडलेला प्रश्‍न आहे.  "निसर्ग' चक्रीवादळ आले आणि होत्याचे नव्हते करून गेले. आंजर्ले (जि. रत्नागिरी) परिसरातील एका आपत्तीग्रस्ताने सांगितलेला किस्सा अंगावर शहारा आणणारा आहे. त्याने अगदी आपल्या जन्मापासून घरात बसून केवळ समुद्राची गाज ऐकली होती. कारण तिथे दाट नारळ, पोफळीच्या बागा होत्या. काही तासांसाठी ते चक्रीवादळ आले आणि सगळे उद्‌ध्वस्त करून केले. आता ते घर आणि समुद्रामध्ये फक्‍त कोसळलेल्या, उद्‌ध्वस्त झालेल्या झाडांचे अवशेष आहेत. घरात बसून समोरचा निळाशार समुद्र त्या आपत्तीग्रस्ताला चिडवतो आहे. ही स्थिती रत्नागिरी आणि रायगडमधील अनेक गावात आहे. कित्तेक शेतकरी आता पुन्हा कधीच उभे राहता येणार नाही अशा मानसिकतेत गेले आहेत.  काही तासांच्या वादळाने गेले कित्येक पिढ्यांचा पोशींदा असलेल्या बागा उद्‌ध्वस्त केल्या आहेत; पण हे संकट कोरोनाच्या प्रभावामुळे तितकेसे चर्चेला आले नाही. नेत्यांचे दौरे झाले, पॅकेज जाहीर झाले; पण यातून कोकणातला हा शेतकरी उभा राहिल का? हा प्रश्‍न मात्र अजूनही सुटला नाही. या सगळ्या दौऱ्यात माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची कोकण भेट अधिक आत्मियतेची ठरली. संकटकाळात पवार मदतीला जातात यात नवे काही नाही; मात्र इतके वय आणि कोरोना संसर्गाचा धोका असतानाही त्यांनी केलेला दौरा लक्षवेधी म्हणावा लागेल. त्याची कारणेही तशीच आहेत. पवार पश्‍चिम महाराष्ट्राचे म्हणून ओळखले जात असले तरी कोकणात झालेली कृषी क्रांती, इथल्या नारळ, सुपारी, आंबा, काजूच्या बागांचे बरेचसे श्रेय पवारांनाच जाते. मनीऑर्डर संस्कृती बदलण्यात या बागायतींचा मोठा वाटा आहे, आणि ही बागायती, कोकण आणि पवार यांचे एक वेगळे नाते आहे. पूर्वी कोकणची ओळख खरिपाच्या काळात होणारी भात शेती अशीच होती. सगळ्यात आधी तत्कालीन कृषीमंत्री बाळासाहेब सावंत यांनी या भागात बागायती रूजवायचा प्रयत्न केला. त्यांनी आणलेल्या फलोत्पादन योजनेत विशेषतः काजूच्या बिया शेतकऱ्यांना दिल्या जायच्या; पण बागायती विषयी फारशी जागृती नव्हती. बऱ्याच जणांनी या काजू बिया भाजून फोडून खाल्या. काहींनी लावल्या आणि ते बागायतदार झाले. यातून पुढे अशा योजनेविषयी जागृती मात्र निर्माण झाली. पुढे शरद पवारांचे पर्व सुरू झाले. अवघ्या महाराष्ट्राला जाणणारा नेता, अशी त्यांची ओळख निर्माण झाली. कोकणातील गावोगाव त्यांना ओळखणारी आणि विशेष म्हणजे ते ओळखत असलेली कष्टकऱ्यांची फौज तयार होवू लागली. त्यांनी फलोत्पादन योजना आणली. शंभर टक्‍के अनूदान मिळू लागले. यातून अनेक ठिकाणी पडीक जमिनीवर आंबा, काजूच्या बागा बहरू लागल्या. शेकडो वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या नारळ, सुपारीच्या बागायतीचे क्षेत्र वाढू लागले. याच्याच जोडीने त्यांनी पर्यटनासाठीही प्रयत्न सुरू केले; पण हे प्रयत्न केवळ घोषणाबाजी नव्हती. आताच्या गणपतीपुळेच्या पर्यटन मॉडेलचे खूप मोठे श्रेय पवारांना जाते.  सावंतवाडीचे माजी आमदार शिवराम दळवी यांनी याबाबत सांगितलेला किस्सा खुप बोलका आहे. त्या काळात दळवी यांनी आपल्या अन्य भागिदारांच्या मदतीने आंबोलीत मोठे हॉटेल सुरू केले. या मागची प्रेरणा स्वतः पवार होते. जुन्या पिढीतील अनेक बागायती क्षेत्रे, तिथल्या वाटा, तिथली कष्टकरी माणसे शरद पवारांना तोंडपाठ होती. ही आख्यायिका नाही. 2003 मध्ये गणपतीपुळे येथे झालेल्या मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यात याची प्रचिती तिथे उपस्थिती असलेल्यांना आली होती. काही जुने कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांना पवारांनी स्वतः स्टेजजवळ केवळ बोलवलेच नव्हते तर त्यांच्या बागा कुठे आहेत याचे वर्णनही सांगितले होते. या सगळ्या जिव्हाळ्यामुळे कोकणावर ओढवलेले संकट पाहून पवार कोकणवासीयांच्या भेटीला येणे साहाजीकच आहे; पण ही वेळ केवळ भावनीक भेटीची नाही.  कोकणाचे नुकसान वेगळे  या वादळाने कोकणात झालेले नुकसान इतर वेळच्या हानीपेक्षा वेगळे आहे. ऊस, द्राक्ष, कापूस आदी पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान प्रामुख्याने एक-दोन वर्षाशी संबंधीत असते; मात्र या वादळाने उद्‌ध्वस्त केलेल्या नारळ, सुपारीचे नुकसान एका पिढीशी संबंधीत आहे. नारळाचे झाड दीड ते दोन पिढ्यांपर्यंत उत्पन्न देते. सुपारी साधारण 30-40 वर्षे फळ देते; मात्र बाग उभी करण्यास 12 वर्षे लागतात. या 12 वर्षांत केवळ खर्च आणि कष्ट करायचे असतात. आता बहुसंख्य शेतकऱ्यांच्या उद्‌ध्वस्त बागा त्यांच्याकडे काही पिढ्यांपासून होत्या. त्या पुन्हा उभ्या करण्यासाठी पुढची 12 वर्षे जमिनीत पैसा ओतायला हवा. त्यातच हवामानातील बदलामुळे ही झाडे उत्पन्न देईपर्यंत टिकणार की नाही, हाही प्रश्‍न आहे.  शेतकऱ्यांना हवे पाठबळ  अनिश्‍चिततेच्या भोवऱ्यात कोकणचा बळीराजा अडकला आहे. केवळ एकरकमी पॅकेज देवून हा शेतकरी पुन्हा उभा राहणे कठीण आहे. या नुकसानाकडे सरकारी जीआरमधील निकषामधून न पाहता व्यावहारीक दृष्टीने पाहायला हवे. तसे पॅकेज आणि मदतीचा हात द्यायला हवा. कोकणात बागायती फुलवायला पवारांचा हातभार होता. आता चक्रीवादळाने उद्‌ध्वस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभे करायलाही त्यांच्या पाठबळाची अपेक्षा आहे.       News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30GNCMy
Read More
घाईगडबडीत काम...ठेकेदारावर कारवाईचीच मागणी

साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - मणेरी-कुडासे मार्गावरील मणेरी येथील पुलाचे काम पावसाळ्यात घाईगडबडीत आणि निकृष्ट दर्जाचे करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी मणेरी ग्रामस्थ आणि युवासेनेचे उपतालुकाप्रमुख भगवान गवस यांनी केली. 

गवस यांनी म्हटले आहे, की संबंधित ठेकेदाराने मणेरी-कुडासे मार्गाचे सुमारे पाच किलोमीटर रस्त्याचे काम 7 मार्चपर्यंत पूर्ण करणे आवश्‍यक होते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्यासाठी 2 कोटी 76 लाख रुपये मंजूर आहेत. 8 मार्च 2019 ते 7 मार्च 2020 या काळात ते काम पूर्ण करण्याचे आदेश असताना संबंधित ठेकेदाराने वर्षभरात ते काम सुरूच केले नव्हते.

काम पूर्ण न करता रस्त्यावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या त्या कामाचा बोर्ड लावणे आणि 15 मेनंतर पाऊस सुरू असताना केवळ एका पूलवजा मोरीचे काम त्या ठेकेदाराने हाती घेतले. त्याला गवस यांनी आक्षेप घेतला असता लॉकडाउनची सबब त्याने पुढे केली. प्रत्यक्षात लॉकडाउन सुरू होण्यापुर्वी काम पूर्ण करण्याची मुदत संपली होती; पण जिल्ह्यातील सगळीच कामे अडवून ठेवण्याच्या नादात त्याच्याकडून बहुतेक कामे वेळेत सुरू होत नाहीत आणि वेळेत पूर्णही होत नाहीत.

संबंधित खात्याचे अधिकारी आणि ठेकेदार यांचे साटेलोटे त्याला कारणीभूत आहेत. त्याचमुळे मणेरीत काम सुरू असताना संबंधित विभागाचा एकही अधिकारी कामावर देखरेखीसाठी नसल्याचे गवस यांनी भेट दिली तेव्हा दिसले. साहजिकच अंदाजपत्रकानुसार काम होण्याची शक्‍यता नसल्याने त्या कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. संबंधित विभागाचे मंत्री, पालकमंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

घाईगडबडीत काम...ठेकेदारावर कारवाईचीच मागणी साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - मणेरी-कुडासे मार्गावरील मणेरी येथील पुलाचे काम पावसाळ्यात घाईगडबडीत आणि निकृष्ट दर्जाचे करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी मणेरी ग्रामस्थ आणि युवासेनेचे उपतालुकाप्रमुख भगवान गवस यांनी केली.  गवस यांनी म्हटले आहे, की संबंधित ठेकेदाराने मणेरी-कुडासे मार्गाचे सुमारे पाच किलोमीटर रस्त्याचे काम 7 मार्चपर्यंत पूर्ण करणे आवश्‍यक होते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्यासाठी 2 कोटी 76 लाख रुपये मंजूर आहेत. 8 मार्च 2019 ते 7 मार्च 2020 या काळात ते काम पूर्ण करण्याचे आदेश असताना संबंधित ठेकेदाराने वर्षभरात ते काम सुरूच केले नव्हते. काम पूर्ण न करता रस्त्यावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या त्या कामाचा बोर्ड लावणे आणि 15 मेनंतर पाऊस सुरू असताना केवळ एका पूलवजा मोरीचे काम त्या ठेकेदाराने हाती घेतले. त्याला गवस यांनी आक्षेप घेतला असता लॉकडाउनची सबब त्याने पुढे केली. प्रत्यक्षात लॉकडाउन सुरू होण्यापुर्वी काम पूर्ण करण्याची मुदत संपली होती; पण जिल्ह्यातील सगळीच कामे अडवून ठेवण्याच्या नादात त्याच्याकडून बहुतेक कामे वेळेत सुरू होत नाहीत आणि वेळेत पूर्णही होत नाहीत. संबंधित खात्याचे अधिकारी आणि ठेकेदार यांचे साटेलोटे त्याला कारणीभूत आहेत. त्याचमुळे मणेरीत काम सुरू असताना संबंधित विभागाचा एकही अधिकारी कामावर देखरेखीसाठी नसल्याचे गवस यांनी भेट दिली तेव्हा दिसले. साहजिकच अंदाजपत्रकानुसार काम होण्याची शक्‍यता नसल्याने त्या कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. संबंधित विभागाचे मंत्री, पालकमंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fpFJ2a
Read More
एमआर ग्रूपच्या जूनैद खानने २५ लाखाला गंडविले, आणि आता नडला 

औरंगाबाद: एमआर ग्रुपमध्ये पैसे गुंतविल्यास आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून २५ लाख रुपयांचा गंडा घालणारा आरोपी जुनेद खान जावेद खान (३०, रा. मंजूरपुरा, ह.मु. स्टार रेसिडेन्सी, जालाननगर, रेल्वेस्टेशन परिसर) याच्या पोलिस कोठडीत मंगळवारपर्यंत (ता.१६) वाढ करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. कुलकर्णी यांनी शुक्रवारी (ता.१२) दिले. 

प्रकरणात अबूल हसन अली खुर्रम अली हाश्मी (३६, रा. दिलरस कॉलनी, हिमायत बाग परिसर) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, जुनेद खान याने साथीदार उबेद खान जावेद खान, झैद खान इजहार खान, अय्याज खान इजहार अहमद खान यांच्या मदतीने अबूल हसन यांना एमआर ग्रुपमध्ये २५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळेल, असे आमिष दाखवून २५ लाख रुपये गुंतविण्यास भाग पाडले होते.

हेहीवाचाः मंदीराचा हलणारा कळस आम्ही कसा पाहू?  

याप्रकरणी अबूल हसन अली हाश्मी यांच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी ६ जून रोजी आरोपीला अटक केली, तर न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीदरम्यान आरोपीने एमआर ग्रुपची स्थापना २०१३ मध्ये केल्याचे समोर आले.

तसेच ग्रुपच्या माध्यमातून आरोपीने २०० ते २५० गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचेदेखील स्पष्ट झाले. दरम्यान, आरोपीच्या कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागूल यांनी न्यायालयाकडे केली.

महत्त्वाची बातमीः आता कोरोना रुग्णांवर घरीच होणार उपचार 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

एमआर ग्रूपच्या जूनैद खानने २५ लाखाला गंडविले, आणि आता नडला  औरंगाबाद: एमआर ग्रुपमध्ये पैसे गुंतविल्यास आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून २५ लाख रुपयांचा गंडा घालणारा आरोपी जुनेद खान जावेद खान (३०, रा. मंजूरपुरा, ह.मु. स्टार रेसिडेन्सी, जालाननगर, रेल्वेस्टेशन परिसर) याच्या पोलिस कोठडीत मंगळवारपर्यंत (ता.१६) वाढ करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. कुलकर्णी यांनी शुक्रवारी (ता.१२) दिले.  प्रकरणात अबूल हसन अली खुर्रम अली हाश्मी (३६, रा. दिलरस कॉलनी, हिमायत बाग परिसर) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, जुनेद खान याने साथीदार उबेद खान जावेद खान, झैद खान इजहार खान, अय्याज खान इजहार अहमद खान यांच्या मदतीने अबूल हसन यांना एमआर ग्रुपमध्ये २५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळेल, असे आमिष दाखवून २५ लाख रुपये गुंतविण्यास भाग पाडले होते. हेहीवाचाः मंदीराचा हलणारा कळस आम्ही कसा पाहू?   याप्रकरणी अबूल हसन अली हाश्मी यांच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी ६ जून रोजी आरोपीला अटक केली, तर न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीदरम्यान आरोपीने एमआर ग्रुपची स्थापना २०१३ मध्ये केल्याचे समोर आले. तसेच ग्रुपच्या माध्यमातून आरोपीने २०० ते २५० गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचेदेखील स्पष्ट झाले. दरम्यान, आरोपीच्या कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागूल यांनी न्यायालयाकडे केली. महत्त्वाची बातमीः आता कोरोना रुग्णांवर घरीच होणार उपचार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3flPwGd
Read More
कोरोनाचे निदान होणार आता खूप कमी दरात; वाचा सविस्तर

पुणे - खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना संसर्गाच्या रोगनिदान चाचणीच्या शुल्काला राज्य सरकारने शनिवारी कात्री लावली. त्यामुळे साडेचार हजार रुपयांना होणारी ही चाचणी आता रुग्णालयात दोन हजार २०० रुपयांना होईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना निदानासाठी रुग्णालयात नमुने घेतले तर त्याचा खर्च दोन हजार २०० रुपये आकारण्यात येईल तर, रुग्णाच्या घरी जाऊन नमुने संकलित केल्यास त्या शुल्कात ६०० रुपये वाढ होईल. राज्यात यापूर्वी खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमधून साडेचार हजार रुपये रोगनिदान चाचणीसाठी आकारण्यात येत होते. यात राज्य सरकारने आता सुमारे निम्म्याने दर कमी केले आहेत. 

धक्कादायक : पुण्यात दोन महिन्यांच्या बाळाचा कोरोनाने मृत्यू; घटना दडवली

खासगी प्रयोगशाळेतील कोरोना रोगनिदान चाचणीच्या शुल्कात कपात करण्यात येणार असल्याचे सर्वप्रथम वृत्त ‘सकाळ’ने ९ मे रोजी प्रसिद्ध केले होते. या शुल्क पुनर्रचनेचा विचार करण्यासाठी सरकारने एक स्वतंत्र समिती स्थापन केली होती. त्याचा अहवाल दोन दिवसांपूर्वी तयार होऊन सरकारकडे पाठविण्यात आला होता. त्या बाबत आरोग्य मंत्र्यांनी आज अंतिम निर्णय घेतला.  

मोठी बातमी : अग्रसेन पतसंस्थेच्या अध्यक्षांसह दहाजणांवर गुन्हा दाखल; 3 कोटींचे नियमबाह्य कर्ज वाटप

हे शुल्क निश्‍चित करताना समितीने प्रयोगशाळेतील वीजबिलापासून ते डॉक्‍टरांच्या वेतनापर्यंत सर्व घटकांचा विचार केला आहे. रुग्णाचा घेतलेला स्वॅब प्रयोगशाळेपर्यंत आणण्यासाठी रिएजंट आणि लिक्विड लागते. तसेच, प्रत्यक्ष तपासणीसाठी रोगनिदान किट आवश्‍यक असते. याचबरोबर पीपीई (पर्सनल प्रोटेक्‍शन इक्विपमेंट किट) अत्यावश्‍यक आहे. अशा प्रत्येक घटकाच्या किमतीवर समितीमध्ये अभ्यास करण्यात आला. प्रत्येक चाचणीचे साडेचार हजार रुपये शुल्क निश्‍चित केले. तेव्हा रिएजंट परदेशातून आयात करत होतो. ते आता देशात उत्पादन होत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या पुढे आल्या आहेत. त्यामुळे त्याचे दर आता कमी झाल्याने कोरोना रोगनिदान चाचणीचे शुल्कदेखील करण्यात आले आहे. 

निश्‍चित केलेल्या दरापेक्षा जास्त शुल्क आकारल्यास खासगी प्रयोगशाळांवर कारवाई केली जाईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे : १५ जूनपासून कडक लॉकडाउन अमलात येणार? महापालिका आयुक्त म्हणतात...!

निदान प्रणाली
९७ : एकूण प्रयोगशाळा
५५ : सरकारी
४२ : खासगी

रेमडेसिव्हिरच्या राज्यात चाचण्या
राज्यात लवकरच रेमडेसिव्हिर या विषाणूविरोधी (अँटिव्हायरल) औषधाच्या चाचण्या सुरू होणार आहेत. त्याबाबतचा अहवाल दोन ते तीन दिवसांत भारतीय औषध नियंत्रकांना सादर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्य सरकार बांगलादेशातील बेक्‍झिम्को या कंपनीकडून रेमडेसिव्हिर हे औषध खरेदी करणार आहे. हे औषध कोरोनाच्या रुग्णांवर गुणकारी ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राज्यातील १८ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांत रेमडेसिव्हिर  पुरवले जाईल, त्याचा वापर फक्त गंभीर रुग्णांवर केला जाणार आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास भारतीय कंपन्या रेमडेसिव्हिरचे उत्पादन सुरू करतील. भारतीय औषध प्राधिकरणाने 15 दिवसांपूर्वी मान्यता दिल्यानंतर या औषधाच्या वापराचा मार्ग मोकळा झाला होता.  राज्यात आपत्कालीन परिस्थितीतच या औषधाचा वापर केला जातो. या औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या राज्य सरकारच्या  आणि मुंबई महापालिकेच्या चार वैद्यकीय महाविद्यालयांत घेतल्या जाणार आहेत.

गंध, स्वादाचे अज्ञान कोरोनाचे लक्षण
आता गंध आणि स्वादाच्या क्षमतेमध्ये होणारी घट यांचाही कोरोनाच्या लक्षणांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता कोरोनाच्या रुग्णांमधील ९ लक्षणांचा अभ्यास करूनच त्यांची चाचणी घेण्यात येईल. विशेष म्हणजे कोरोनाच्या रुग्णांवरील उपचारासाठी हायड्रॉक्सिक्लोक्विन या औषधाच्या वापरास देखील आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. उत्तम निष्कर्ष हवे असतील उपचाराच्या पहिल्याच टप्प्यामध्ये याचा वापर होणे गरजेचे असल्याचे मंत्रालयाचे म्हणणे आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाचे निदान होणार आता खूप कमी दरात; वाचा सविस्तर पुणे - खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना संसर्गाच्या रोगनिदान चाचणीच्या शुल्काला राज्य सरकारने शनिवारी कात्री लावली. त्यामुळे साडेचार हजार रुपयांना होणारी ही चाचणी आता रुग्णालयात दोन हजार २०० रुपयांना होईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोना निदानासाठी रुग्णालयात नमुने घेतले तर त्याचा खर्च दोन हजार २०० रुपये आकारण्यात येईल तर, रुग्णाच्या घरी जाऊन नमुने संकलित केल्यास त्या शुल्कात ६०० रुपये वाढ होईल. राज्यात यापूर्वी खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमधून साडेचार हजार रुपये रोगनिदान चाचणीसाठी आकारण्यात येत होते. यात राज्य सरकारने आता सुमारे निम्म्याने दर कमी केले आहेत.  धक्कादायक : पुण्यात दोन महिन्यांच्या बाळाचा कोरोनाने मृत्यू; घटना दडवली खासगी प्रयोगशाळेतील कोरोना रोगनिदान चाचणीच्या शुल्कात कपात करण्यात येणार असल्याचे सर्वप्रथम वृत्त ‘सकाळ’ने ९ मे रोजी प्रसिद्ध केले होते. या शुल्क पुनर्रचनेचा विचार करण्यासाठी सरकारने एक स्वतंत्र समिती स्थापन केली होती. त्याचा अहवाल दोन दिवसांपूर्वी तयार होऊन सरकारकडे पाठविण्यात आला होता. त्या बाबत आरोग्य मंत्र्यांनी आज अंतिम निर्णय घेतला.   मोठी बातमी : अग्रसेन पतसंस्थेच्या अध्यक्षांसह दहाजणांवर गुन्हा दाखल; 3 कोटींचे नियमबाह्य कर्ज वाटप हे शुल्क निश्‍चित करताना समितीने प्रयोगशाळेतील वीजबिलापासून ते डॉक्‍टरांच्या वेतनापर्यंत सर्व घटकांचा विचार केला आहे. रुग्णाचा घेतलेला स्वॅब प्रयोगशाळेपर्यंत आणण्यासाठी रिएजंट आणि लिक्विड लागते. तसेच, प्रत्यक्ष तपासणीसाठी रोगनिदान किट आवश्‍यक असते. याचबरोबर पीपीई (पर्सनल प्रोटेक्‍शन इक्विपमेंट किट) अत्यावश्‍यक आहे. अशा प्रत्येक घटकाच्या किमतीवर समितीमध्ये अभ्यास करण्यात आला. प्रत्येक चाचणीचे साडेचार हजार रुपये शुल्क निश्‍चित केले. तेव्हा रिएजंट परदेशातून आयात करत होतो. ते आता देशात उत्पादन होत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या पुढे आल्या आहेत. त्यामुळे त्याचे दर आता कमी झाल्याने कोरोना रोगनिदान चाचणीचे शुल्कदेखील करण्यात आले आहे.  निश्‍चित केलेल्या दरापेक्षा जास्त शुल्क आकारल्यास खासगी प्रयोगशाळांवर कारवाई केली जाईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे. पुणे : १५ जूनपासून कडक लॉकडाउन अमलात येणार? महापालिका आयुक्त म्हणतात...! निदान प्रणाली ९७ : एकूण प्रयोगशाळा ५५ : सरकारी ४२ : खासगी रेमडेसिव्हिरच्या राज्यात चाचण्या राज्यात लवकरच रेमडेसिव्हिर या विषाणूविरोधी (अँटिव्हायरल) औषधाच्या चाचण्या सुरू होणार आहेत. त्याबाबतचा अहवाल दोन ते तीन दिवसांत भारतीय औषध नियंत्रकांना सादर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्य सरकार बांगलादेशातील बेक्‍झिम्को या कंपनीकडून रेमडेसिव्हिर हे औषध खरेदी करणार आहे. हे औषध कोरोनाच्या रुग्णांवर गुणकारी ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राज्यातील १८ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांत रेमडेसिव्हिर  पुरवले जाईल, त्याचा वापर फक्त गंभीर रुग्णांवर केला जाणार आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास भारतीय कंपन्या रेमडेसिव्हिरचे उत्पादन सुरू करतील. भारतीय औषध प्राधिकरणाने 15 दिवसांपूर्वी मान्यता दिल्यानंतर या औषधाच्या वापराचा मार्ग मोकळा झाला होता.  राज्यात आपत्कालीन परिस्थितीतच या औषधाचा वापर केला जातो. या औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या राज्य सरकारच्या  आणि मुंबई महापालिकेच्या चार वैद्यकीय महाविद्यालयांत घेतल्या जाणार आहेत. गंध, स्वादाचे अज्ञान कोरोनाचे लक्षण आता गंध आणि स्वादाच्या क्षमतेमध्ये होणारी घट यांचाही कोरोनाच्या लक्षणांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता कोरोनाच्या रुग्णांमधील ९ लक्षणांचा अभ्यास करूनच त्यांची चाचणी घेण्यात येईल. विशेष म्हणजे कोरोनाच्या रुग्णांवरील उपचारासाठी हायड्रॉक्सिक्लोक्विन या औषधाच्या वापरास देखील आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. उत्तम निष्कर्ष हवे असतील उपचाराच्या पहिल्याच टप्प्यामध्ये याचा वापर होणे गरजेचे असल्याचे मंत्रालयाचे म्हणणे आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3hkyY3n
Read More
व्हिडिओ : एका अवलिया युवकाच्या संघर्षाचा असा झाला `चिखल'...कुणीच दाद देईना

नागपूर : नागपूर नगरी म्हणजे "स्मार्ट सिटी', असा गाजावाजाही केला जातो आणि बाहेरून येणाऱ्यांना प्रथमदर्शनी तसे दिसतेही. नागपूर शहरातील काही भाग उदाहरणार्थ, सिव्हिल लाईन्स, रामदासपेठ असतीलही स्मार्ट. चकचकीत. परंतु, नागपूर शहरातील असे काही भाग आहेत, जे नागपूर शहरातील वाटणारच नाहीत. मोईज खान ज्या भागातील समस्येसाठी भांडत आहे, त्या भागाचे नावच "श्रीकृष्ण धाम झोपडपट्टी' आहे. झोपडपट्टी म्हटले की, डोळ्यापुढे गलिच्छ वस्ती डोळ्यासमोर येते. ही अशीच एक झोपडपट्टी आहे. परंतु ही झोपडपट्टी आणखी गलिच्छ करण्याचे काम स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी केले आहे. काय केले त्यांनी...

 

 

नागपूर शहरात साडेचारशेहून अधिक झोपडपट्टी वसाहती आहेत. नागपूर शहराच्या एकूण लोकसंख्येपैकी तब्बल एक तृतीयांश लोकसंख्या झोपडपट्टीत राहते, हे सांगितले तर नागपूर बाहेरच्या लोकांचा कदाचित विश्‍वासच बसणार नाही. अशीच एक झोपटपट्टी वसाहत "श्रीकृष्ण धाम झोपटपट्टी'. तब्बल अडीच हजार एवढी लोकसंख्या. म्हणजे एकूण चारशे घरे इथे आहेत. आजवर या झोपडपट्टीत घरोघरी नळ नव्हते. "24 बाय 7' अर्थात फुलटाइम पाणी देण्याचा नागपूर प्रशासनाचा दावा किती फोल होता, हे या झोपडपट्टीतील स्थितीवरून लक्षात येते. तर झाले असे...

अधिक वाचा - मुंढे साहेबऽऽ, सातशे जणांना क्वारंटाइन करण्याची वेळ कोणामुळे आली? आता माफी मागा...

"अमृत'च्या कामामुळे झाली सर्कस

सरकारने एक "अमृत' नावाची योजना आणली. या योजनेतून शहरात विकासकामे केली जातात. यातून श्रीकृष्ण धाम झोपडपट्टीतमध्ये घरोघरी नळ देण्याचे काम सुरू केले. या झोपडपट्टीत "एन्ट्री' करणारा जो मुख्य रस्ता आहे, त्या रस्त्याचे मोठ्या प्रमाणात खोदकाम केले गेले. ही पाचएक महिन्याच्या आधीची गोष्ट. रस्ते खोदले, मात्र काम अपूर्ण राहिले. या खोदकामामुळे आणि रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे या रस्त्याचे दृश्‍यच बदलले. आता पाऊसही आला. आता या रस्त्यावरून जाणे म्हणजे जणू सर्कस झाले आहे...

20 आमदारांच्या घरापुढील रस्ते कसे चकाचक?

श्रीकृष्ण धाम झोपडपट्टीत "एन्ट्री' करणारा हा रस्ता पूर्णतः चिखलमय झाला आहे. नागपूर शहरात जवळपास 20 आमदार राहतात. यापैकी सर्वच आमदारांच्या घराकडे जाणारे रस्ते चर चकचकीत असू शकतात. तर मग श्रीकष्ण धाम झोपडपट्टीतील अडीच-तीन हजार लोकांच्या घराकडे जाणारा एक रस्ता चिखलाने तुडूंब भरलेला का राहू शकतो? मोईज खानचा असा आरोपच आहे. हे खरेही आहे. बड्या लोकप्रतिनिधींची काळजी जर मनपा प्रशासन तातडीने घेत असेल, तर मग या अडीच हजार लोसंख्येचा विचार का केला जात नाही?

हेही वाचा - तीन हजार मुलींचा बाप अखेर कोसळला..पोरके करून गेला

भेटी लागी जीवा...सर्वच नगरसेवकांना भेटून झाले

या अडीच हजार लोकसंख्येचा हा प्रश्‍न मोईज खान यांना सतत सलत होता. त्याने निवेदन केले. महानरपालिकेच्या मंगळवारी झोनच्या सहायक आयुक्तांना भेटला. या झोपडपट्टीचा समावेश प्रभाग 11 मध्ये आहे. या प्रभागाचे नगरसेवक संगिताताई गिऱ्हे, अर्चना पाठक, संदीप जाधव आणि भूषण शिंगणे यांना भेटला. निवदेन दिली. त्यानंतर झोन सभापती गार्गी चोपडा यांनाही तो भेटला. एवढेच नव्हे तर महापौरांना भेटल्याचेही त्याने सांगितले. परंतु चिखलावर कुणालाही तोडगा काढता आला नाही. या प्रश्‍नी झोपडपट्टीतील चित्रा साखरे, पूजा ऍन्थोनी, मनीषा यादव, मीनाक्षी सहारे, झाडे यादव हेही प्रशासनाच्या मागे लागून आहेत.

तारीख पे तारीख! पर देखते है...

"सकाळ' प्रतिनिधीने नगरसेविका संगिता गिऱ्हे आणि मोईज खान यांचा थेट "कॉन्फरन्स कॉल'मध्ये संवाद घडवून आणला. गिऱ्हे मॅडम म्हणाल्या, ""रस्त्याचे खोदकाम सुरू होते, हे खरे आहे. होळीच्या सुट्यांसाठी मजूर घरी गेले आणि अचानक लॉकडाउनची घोषणा झाली. त्यामुळे काम थांबले. या प्रश्‍नावर तेथील लोकांसोबत मी बोलले आहे. त्यांना या परिस्थितीची कल्पना दिली आहे.'' याच "कॉन्फरन्स कॉल'मध्ये मोईज खानच्या समक्ष संगिता गिऱ्हे यांनी 15 जुलै ही पुन्हा काम सुरू करण्याची तारीख दिली. त्यावर मोईज म्हणाला, "सर, इसके पह्यले 11 तारीख दी थी. तारीख पे तारीख है. पर देखते है.''

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

व्हिडिओ : एका अवलिया युवकाच्या संघर्षाचा असा झाला `चिखल'...कुणीच दाद देईना नागपूर : नागपूर नगरी म्हणजे "स्मार्ट सिटी', असा गाजावाजाही केला जातो आणि बाहेरून येणाऱ्यांना प्रथमदर्शनी तसे दिसतेही. नागपूर शहरातील काही भाग उदाहरणार्थ, सिव्हिल लाईन्स, रामदासपेठ असतीलही स्मार्ट. चकचकीत. परंतु, नागपूर शहरातील असे काही भाग आहेत, जे नागपूर शहरातील वाटणारच नाहीत. मोईज खान ज्या भागातील समस्येसाठी भांडत आहे, त्या भागाचे नावच "श्रीकृष्ण धाम झोपडपट्टी' आहे. झोपडपट्टी म्हटले की, डोळ्यापुढे गलिच्छ वस्ती डोळ्यासमोर येते. ही अशीच एक झोपडपट्टी आहे. परंतु ही झोपडपट्टी आणखी गलिच्छ करण्याचे काम स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी केले आहे. काय केले त्यांनी...     नागपूर शहरात साडेचारशेहून अधिक झोपडपट्टी वसाहती आहेत. नागपूर शहराच्या एकूण लोकसंख्येपैकी तब्बल एक तृतीयांश लोकसंख्या झोपडपट्टीत राहते, हे सांगितले तर नागपूर बाहेरच्या लोकांचा कदाचित विश्‍वासच बसणार नाही. अशीच एक झोपटपट्टी वसाहत "श्रीकृष्ण धाम झोपटपट्टी'. तब्बल अडीच हजार एवढी लोकसंख्या. म्हणजे एकूण चारशे घरे इथे आहेत. आजवर या झोपडपट्टीत घरोघरी नळ नव्हते. "24 बाय 7' अर्थात फुलटाइम पाणी देण्याचा नागपूर प्रशासनाचा दावा किती फोल होता, हे या झोपडपट्टीतील स्थितीवरून लक्षात येते. तर झाले असे... अधिक वाचा - मुंढे साहेबऽऽ, सातशे जणांना क्वारंटाइन करण्याची वेळ कोणामुळे आली? आता माफी मागा... "अमृत'च्या कामामुळे झाली सर्कस सरकारने एक "अमृत' नावाची योजना आणली. या योजनेतून शहरात विकासकामे केली जातात. यातून श्रीकृष्ण धाम झोपडपट्टीतमध्ये घरोघरी नळ देण्याचे काम सुरू केले. या झोपडपट्टीत "एन्ट्री' करणारा जो मुख्य रस्ता आहे, त्या रस्त्याचे मोठ्या प्रमाणात खोदकाम केले गेले. ही पाचएक महिन्याच्या आधीची गोष्ट. रस्ते खोदले, मात्र काम अपूर्ण राहिले. या खोदकामामुळे आणि रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे या रस्त्याचे दृश्‍यच बदलले. आता पाऊसही आला. आता या रस्त्यावरून जाणे म्हणजे जणू सर्कस झाले आहे... 20 आमदारांच्या घरापुढील रस्ते कसे चकाचक? श्रीकृष्ण धाम झोपडपट्टीत "एन्ट्री' करणारा हा रस्ता पूर्णतः चिखलमय झाला आहे. नागपूर शहरात जवळपास 20 आमदार राहतात. यापैकी सर्वच आमदारांच्या घराकडे जाणारे रस्ते चर चकचकीत असू शकतात. तर मग श्रीकष्ण धाम झोपडपट्टीतील अडीच-तीन हजार लोकांच्या घराकडे जाणारा एक रस्ता चिखलाने तुडूंब भरलेला का राहू शकतो? मोईज खानचा असा आरोपच आहे. हे खरेही आहे. बड्या लोकप्रतिनिधींची काळजी जर मनपा प्रशासन तातडीने घेत असेल, तर मग या अडीच हजार लोसंख्येचा विचार का केला जात नाही? हेही वाचा - तीन हजार मुलींचा बाप अखेर कोसळला..पोरके करून गेला भेटी लागी जीवा...सर्वच नगरसेवकांना भेटून झाले या अडीच हजार लोकसंख्येचा हा प्रश्‍न मोईज खान यांना सतत सलत होता. त्याने निवेदन केले. महानरपालिकेच्या मंगळवारी झोनच्या सहायक आयुक्तांना भेटला. या झोपडपट्टीचा समावेश प्रभाग 11 मध्ये आहे. या प्रभागाचे नगरसेवक संगिताताई गिऱ्हे, अर्चना पाठक, संदीप जाधव आणि भूषण शिंगणे यांना भेटला. निवदेन दिली. त्यानंतर झोन सभापती गार्गी चोपडा यांनाही तो भेटला. एवढेच नव्हे तर महापौरांना भेटल्याचेही त्याने सांगितले. परंतु चिखलावर कुणालाही तोडगा काढता आला नाही. या प्रश्‍नी झोपडपट्टीतील चित्रा साखरे, पूजा ऍन्थोनी, मनीषा यादव, मीनाक्षी सहारे, झाडे यादव हेही प्रशासनाच्या मागे लागून आहेत. तारीख पे तारीख! पर देखते है... "सकाळ' प्रतिनिधीने नगरसेविका संगिता गिऱ्हे आणि मोईज खान यांचा थेट "कॉन्फरन्स कॉल'मध्ये संवाद घडवून आणला. गिऱ्हे मॅडम म्हणाल्या, ""रस्त्याचे खोदकाम सुरू होते, हे खरे आहे. होळीच्या सुट्यांसाठी मजूर घरी गेले आणि अचानक लॉकडाउनची घोषणा झाली. त्यामुळे काम थांबले. या प्रश्‍नावर तेथील लोकांसोबत मी बोलले आहे. त्यांना या परिस्थितीची कल्पना दिली आहे.'' याच "कॉन्फरन्स कॉल'मध्ये मोईज खानच्या समक्ष संगिता गिऱ्हे यांनी 15 जुलै ही पुन्हा काम सुरू करण्याची तारीख दिली. त्यावर मोईज म्हणाला, "सर, इसके पह्यले 11 तारीख दी थी. तारीख पे तारीख है. पर देखते है.'' News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dZyayR
Read More
सव्वादोन लाख रुपये वीजबिल पाहून लागला 'करंट' 

नागपूर : महावितरणचा आखणी एक प्रताप उघडकीस आला आहे. महालात राहणाऱ्या कला पंडित यांना एक महिन्याचे 2 लाख 16 हजार 420 रुपयांचे वीजबिल पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कुणीही राहत नसलेल्या बंद फ्लॅटचे हे बिल आहे. अव्वाच्या सव्वा आलेल्या वीजबिलाचा पंडित यांनी धसका घेतला असून त्यांची प्रकृती खालावली आहे. 

विदर्भ राज्य आंदोलन समितीने या प्रकरणाला वाचा फोडली आहे. कला पंडित यांच्या मालकीचा महालातील छोटे आयचित मंदिराजवळ असणाऱ्या गोपाळकृष्ण अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. जून 2019पर्यंत कला पंडित याच फ्लॅटमध्ये वास्तव्यास होत्या. त्या नियमित बिलाचा भरणा करीत होत्या. जून 2019 मध्ये त्या फ्लॅट सोडून नातेवाइकांकडे राहण्यासाठी गेल्या. तेव्हापासून त्यांचे घर बंदच आहे. यानंतरही कर्तव्यभावनेतून जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर 2019 च्या वीजबिलांचा नियमित भरणा केला. ऑक्‍टोबर 2019 मध्ये त्यांना तब्बल 2 लाख 16 हजार 420 रुपयांचे वीजबिल पाठविण्यात आले. या बिलाचा धसका घेत त्या आजारी पडल्याने त्यांची सून प्रिया पंडित यांनी सांगितले.

बिलासंदर्भात त्यांनी 30 नोव्हेंबर 2019 रोजी तक्रार केली. त्यांना 2 हजार 200 रुपये व्याजासह बिल पाठविण्यात आले. दरमहा शंभर रुपये प्रमाणे हफ्ते पाडून देण्यात आले. ऑक्‍टोबर ते जानेवारीदरम्यान त्यांनी वाढीव 400 रुपये भरले. मार्च 2020 मध्ये पुन्हा त्यांना 1 लाख 42 हजारांचे बिल पाठविण्यात आले. याबाबतचीही तक्रार केली. पण, अद्याप महावितरणने बिल दुरुस्त करून दिले नाही. विदर्भ राज्य आंदोलन समितीने महावितरणच्या या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदविला आहे. बिलात दुरुस्ती करून देण्यासोबतच कला पंडित यांना झालेल्या मानसिक त्रासासाठी महावितरणने नुकसानभरपाई देण्याची मागणी समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी केली आहे. 

हेही वाचा : रेल्वेच्या बोगद्याखाली घातक शस्त्रांसह होते बसून; मग सुरू झाला 'खेळ' 

वैदर्भीयांचे वीजबिल माफ करण्याची मागणी 
कोरोनाच्या संकटामुळे उद्योग, व्यापार, शेती, रोजगार सर्वच बंद आहे. शासनाने ही बाब लक्षात घेऊन विदर्भातील जनतेचे वीजबिल माफ करावे. 200 युनिटपर्यंत मोफत वीज द्यावी. त्यानंतरच्या युनिटसाठी निम्म्या दराने बिलाची आकारणी करावी, अशी विदर्भ राज्य आंदोलन समितीची मागणी आहे. या मागणीसाठी समितीने 7 जूनपासून आंदोलन आरंभले असून, लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सव्वादोन लाख रुपये वीजबिल पाहून लागला 'करंट'  नागपूर : महावितरणचा आखणी एक प्रताप उघडकीस आला आहे. महालात राहणाऱ्या कला पंडित यांना एक महिन्याचे 2 लाख 16 हजार 420 रुपयांचे वीजबिल पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कुणीही राहत नसलेल्या बंद फ्लॅटचे हे बिल आहे. अव्वाच्या सव्वा आलेल्या वीजबिलाचा पंडित यांनी धसका घेतला असून त्यांची प्रकृती खालावली आहे.  विदर्भ राज्य आंदोलन समितीने या प्रकरणाला वाचा फोडली आहे. कला पंडित यांच्या मालकीचा महालातील छोटे आयचित मंदिराजवळ असणाऱ्या गोपाळकृष्ण अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. जून 2019पर्यंत कला पंडित याच फ्लॅटमध्ये वास्तव्यास होत्या. त्या नियमित बिलाचा भरणा करीत होत्या. जून 2019 मध्ये त्या फ्लॅट सोडून नातेवाइकांकडे राहण्यासाठी गेल्या. तेव्हापासून त्यांचे घर बंदच आहे. यानंतरही कर्तव्यभावनेतून जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर 2019 च्या वीजबिलांचा नियमित भरणा केला. ऑक्‍टोबर 2019 मध्ये त्यांना तब्बल 2 लाख 16 हजार 420 रुपयांचे वीजबिल पाठविण्यात आले. या बिलाचा धसका घेत त्या आजारी पडल्याने त्यांची सून प्रिया पंडित यांनी सांगितले. बिलासंदर्भात त्यांनी 30 नोव्हेंबर 2019 रोजी तक्रार केली. त्यांना 2 हजार 200 रुपये व्याजासह बिल पाठविण्यात आले. दरमहा शंभर रुपये प्रमाणे हफ्ते पाडून देण्यात आले. ऑक्‍टोबर ते जानेवारीदरम्यान त्यांनी वाढीव 400 रुपये भरले. मार्च 2020 मध्ये पुन्हा त्यांना 1 लाख 42 हजारांचे बिल पाठविण्यात आले. याबाबतचीही तक्रार केली. पण, अद्याप महावितरणने बिल दुरुस्त करून दिले नाही. विदर्भ राज्य आंदोलन समितीने महावितरणच्या या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदविला आहे. बिलात दुरुस्ती करून देण्यासोबतच कला पंडित यांना झालेल्या मानसिक त्रासासाठी महावितरणने नुकसानभरपाई देण्याची मागणी समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी केली आहे.  हेही वाचा : रेल्वेच्या बोगद्याखाली घातक शस्त्रांसह होते बसून; मग सुरू झाला 'खेळ'  वैदर्भीयांचे वीजबिल माफ करण्याची मागणी  कोरोनाच्या संकटामुळे उद्योग, व्यापार, शेती, रोजगार सर्वच बंद आहे. शासनाने ही बाब लक्षात घेऊन विदर्भातील जनतेचे वीजबिल माफ करावे. 200 युनिटपर्यंत मोफत वीज द्यावी. त्यानंतरच्या युनिटसाठी निम्म्या दराने बिलाची आकारणी करावी, अशी विदर्भ राज्य आंदोलन समितीची मागणी आहे. या मागणीसाठी समितीने 7 जूनपासून आंदोलन आरंभले असून, लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UJnxIC
Read More