शरद पवार, कोकण आणि चक्रीवादळ सिंधुदुर्ग - निसर्ग चक्रीवादाळाने रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतीवर आधारीत अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला. कोरोनाच्या काळातच हे संकट कोसळले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोकण दौरे केले; पण सगळ्यात जास्त चर्चेचा ठरला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांचा दौरा. इतक्‍या वयात आणि कोरोनाचा संसर्ग कोकणात वाढत असतानाही पवार यांनी केलेला हा दौरा त्यांचे कोकणशी, इथल्या मातीशी, कोकणी माणसाशी असलेले घट्ट नाते सांगायला पुरेसा आहे; पण या वादळाने केलेल्या नुकसानाचे स्वरूप सरकारी पंचनाम्यात, आणि नुकसानीच्या आकड्यात मावणारे नाही. हा "जाणता नेता' पुन्हा एकदा कोकणच्या कृषीक्षेत्राचा तारणहार ठरणार का? हा कोकणवासीयांना पडलेला प्रश्‍न आहे.  "निसर्ग' चक्रीवादळ आले आणि होत्याचे नव्हते करून गेले. आंजर्ले (जि. रत्नागिरी) परिसरातील एका आपत्तीग्रस्ताने सांगितलेला किस्सा अंगावर शहारा आणणारा आहे. त्याने अगदी आपल्या जन्मापासून घरात बसून केवळ समुद्राची गाज ऐकली होती. कारण तिथे दाट नारळ, पोफळीच्या बागा होत्या. काही तासांसाठी ते चक्रीवादळ आले आणि सगळे उद्‌ध्वस्त करून केले. आता ते घर आणि समुद्रामध्ये फक्‍त कोसळलेल्या, उद्‌ध्वस्त झालेल्या झाडांचे अवशेष आहेत. घरात बसून समोरचा निळाशार समुद्र त्या आपत्तीग्रस्ताला चिडवतो आहे. ही स्थिती रत्नागिरी आणि रायगडमधील अनेक गावात आहे. कित्तेक शेतकरी आता पुन्हा कधीच उभे राहता येणार नाही अशा मानसिकतेत गेले आहेत.  काही तासांच्या वादळाने गेले कित्येक पिढ्यांचा पोशींदा असलेल्या बागा उद्‌ध्वस्त केल्या आहेत; पण हे संकट कोरोनाच्या प्रभावामुळे तितकेसे चर्चेला आले नाही. नेत्यांचे दौरे झाले, पॅकेज जाहीर झाले; पण यातून कोकणातला हा शेतकरी उभा राहिल का? हा प्रश्‍न मात्र अजूनही सुटला नाही. या सगळ्या दौऱ्यात माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची कोकण भेट अधिक आत्मियतेची ठरली. संकटकाळात पवार मदतीला जातात यात नवे काही नाही; मात्र इतके वय आणि कोरोना संसर्गाचा धोका असतानाही त्यांनी केलेला दौरा लक्षवेधी म्हणावा लागेल. त्याची कारणेही तशीच आहेत. पवार पश्‍चिम महाराष्ट्राचे म्हणून ओळखले जात असले तरी कोकणात झालेली कृषी क्रांती, इथल्या नारळ, सुपारी, आंबा, काजूच्या बागांचे बरेचसे श्रेय पवारांनाच जाते. मनीऑर्डर संस्कृती बदलण्यात या बागायतींचा मोठा वाटा आहे, आणि ही बागायती, कोकण आणि पवार यांचे एक वेगळे नाते आहे. पूर्वी कोकणची ओळख खरिपाच्या काळात होणारी भात शेती अशीच होती. सगळ्यात आधी तत्कालीन कृषीमंत्री बाळासाहेब सावंत यांनी या भागात बागायती रूजवायचा प्रयत्न केला. त्यांनी आणलेल्या फलोत्पादन योजनेत विशेषतः काजूच्या बिया शेतकऱ्यांना दिल्या जायच्या; पण बागायती विषयी फारशी जागृती नव्हती. बऱ्याच जणांनी या काजू बिया भाजून फोडून खाल्या. काहींनी लावल्या आणि ते बागायतदार झाले. यातून पुढे अशा योजनेविषयी जागृती मात्र निर्माण झाली. पुढे शरद पवारांचे पर्व सुरू झाले. अवघ्या महाराष्ट्राला जाणणारा नेता, अशी त्यांची ओळख निर्माण झाली. कोकणातील गावोगाव त्यांना ओळखणारी आणि विशेष म्हणजे ते ओळखत असलेली कष्टकऱ्यांची फौज तयार होवू लागली. त्यांनी फलोत्पादन योजना आणली. शंभर टक्‍के अनूदान मिळू लागले. यातून अनेक ठिकाणी पडीक जमिनीवर आंबा, काजूच्या बागा बहरू लागल्या. शेकडो वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या नारळ, सुपारीच्या बागायतीचे क्षेत्र वाढू लागले. याच्याच जोडीने त्यांनी पर्यटनासाठीही प्रयत्न सुरू केले; पण हे प्रयत्न केवळ घोषणाबाजी नव्हती. आताच्या गणपतीपुळेच्या पर्यटन मॉडेलचे खूप मोठे श्रेय पवारांना जाते.  सावंतवाडीचे माजी आमदार शिवराम दळवी यांनी याबाबत सांगितलेला किस्सा खुप बोलका आहे. त्या काळात दळवी यांनी आपल्या अन्य भागिदारांच्या मदतीने आंबोलीत मोठे हॉटेल सुरू केले. या मागची प्रेरणा स्वतः पवार होते. जुन्या पिढीतील अनेक बागायती क्षेत्रे, तिथल्या वाटा, तिथली कष्टकरी माणसे शरद पवारांना तोंडपाठ होती. ही आख्यायिका नाही. 2003 मध्ये गणपतीपुळे येथे झालेल्या मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यात याची प्रचिती तिथे उपस्थिती असलेल्यांना आली होती. काही जुने कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांना पवारांनी स्वतः स्टेजजवळ केवळ बोलवलेच नव्हते तर त्यांच्या बागा कुठे आहेत याचे वर्णनही सांगितले होते. या सगळ्या जिव्हाळ्यामुळे कोकणावर ओढवलेले संकट पाहून पवार कोकणवासीयांच्या भेटीला येणे साहाजीकच आहे; पण ही वेळ केवळ भावनीक भेटीची नाही.  कोकणाचे नुकसान वेगळे  या वादळाने कोकणात झालेले नुकसान इतर वेळच्या हानीपेक्षा वेगळे आहे. ऊस, द्राक्ष, कापूस आदी पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान प्रामुख्याने एक-दोन वर्षाशी संबंधीत असते; मात्र या वादळाने उद्‌ध्वस्त केलेल्या नारळ, सुपारीचे नुकसान एका पिढीशी संबंधीत आहे. नारळाचे झाड दीड ते दोन पिढ्यांपर्यंत उत्पन्न देते. सुपारी साधारण 30-40 वर्षे फळ देते; मात्र बाग उभी करण्यास 12 वर्षे लागतात. या 12 वर्षांत केवळ खर्च आणि कष्ट करायचे असतात. आता बहुसंख्य शेतकऱ्यांच्या उद्‌ध्वस्त बागा त्यांच्याकडे काही पिढ्यांपासून होत्या. त्या पुन्हा उभ्या करण्यासाठी पुढची 12 वर्षे जमिनीत पैसा ओतायला हवा. त्यातच हवामानातील बदलामुळे ही झाडे उत्पन्न देईपर्यंत टिकणार की नाही, हाही प्रश्‍न आहे.  शेतकऱ्यांना हवे पाठबळ  अनिश्‍चिततेच्या भोवऱ्यात कोकणचा बळीराजा अडकला आहे. केवळ एकरकमी पॅकेज देवून हा शेतकरी पुन्हा उभा राहणे कठीण आहे. या नुकसानाकडे सरकारी जीआरमधील निकषामधून न पाहता व्यावहारीक दृष्टीने पाहायला हवे. तसे पॅकेज आणि मदतीचा हात द्यायला हवा. कोकणात बागायती फुलवायला पवारांचा हातभार होता. आता चक्रीवादळाने उद्‌ध्वस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभे करायलाही त्यांच्या पाठबळाची अपेक्षा आहे.       News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, June 13, 2020

शरद पवार, कोकण आणि चक्रीवादळ सिंधुदुर्ग - निसर्ग चक्रीवादाळाने रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतीवर आधारीत अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला. कोरोनाच्या काळातच हे संकट कोसळले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोकण दौरे केले; पण सगळ्यात जास्त चर्चेचा ठरला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांचा दौरा. इतक्‍या वयात आणि कोरोनाचा संसर्ग कोकणात वाढत असतानाही पवार यांनी केलेला हा दौरा त्यांचे कोकणशी, इथल्या मातीशी, कोकणी माणसाशी असलेले घट्ट नाते सांगायला पुरेसा आहे; पण या वादळाने केलेल्या नुकसानाचे स्वरूप सरकारी पंचनाम्यात, आणि नुकसानीच्या आकड्यात मावणारे नाही. हा "जाणता नेता' पुन्हा एकदा कोकणच्या कृषीक्षेत्राचा तारणहार ठरणार का? हा कोकणवासीयांना पडलेला प्रश्‍न आहे.  "निसर्ग' चक्रीवादळ आले आणि होत्याचे नव्हते करून गेले. आंजर्ले (जि. रत्नागिरी) परिसरातील एका आपत्तीग्रस्ताने सांगितलेला किस्सा अंगावर शहारा आणणारा आहे. त्याने अगदी आपल्या जन्मापासून घरात बसून केवळ समुद्राची गाज ऐकली होती. कारण तिथे दाट नारळ, पोफळीच्या बागा होत्या. काही तासांसाठी ते चक्रीवादळ आले आणि सगळे उद्‌ध्वस्त करून केले. आता ते घर आणि समुद्रामध्ये फक्‍त कोसळलेल्या, उद्‌ध्वस्त झालेल्या झाडांचे अवशेष आहेत. घरात बसून समोरचा निळाशार समुद्र त्या आपत्तीग्रस्ताला चिडवतो आहे. ही स्थिती रत्नागिरी आणि रायगडमधील अनेक गावात आहे. कित्तेक शेतकरी आता पुन्हा कधीच उभे राहता येणार नाही अशा मानसिकतेत गेले आहेत.  काही तासांच्या वादळाने गेले कित्येक पिढ्यांचा पोशींदा असलेल्या बागा उद्‌ध्वस्त केल्या आहेत; पण हे संकट कोरोनाच्या प्रभावामुळे तितकेसे चर्चेला आले नाही. नेत्यांचे दौरे झाले, पॅकेज जाहीर झाले; पण यातून कोकणातला हा शेतकरी उभा राहिल का? हा प्रश्‍न मात्र अजूनही सुटला नाही. या सगळ्या दौऱ्यात माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची कोकण भेट अधिक आत्मियतेची ठरली. संकटकाळात पवार मदतीला जातात यात नवे काही नाही; मात्र इतके वय आणि कोरोना संसर्गाचा धोका असतानाही त्यांनी केलेला दौरा लक्षवेधी म्हणावा लागेल. त्याची कारणेही तशीच आहेत. पवार पश्‍चिम महाराष्ट्राचे म्हणून ओळखले जात असले तरी कोकणात झालेली कृषी क्रांती, इथल्या नारळ, सुपारी, आंबा, काजूच्या बागांचे बरेचसे श्रेय पवारांनाच जाते. मनीऑर्डर संस्कृती बदलण्यात या बागायतींचा मोठा वाटा आहे, आणि ही बागायती, कोकण आणि पवार यांचे एक वेगळे नाते आहे. पूर्वी कोकणची ओळख खरिपाच्या काळात होणारी भात शेती अशीच होती. सगळ्यात आधी तत्कालीन कृषीमंत्री बाळासाहेब सावंत यांनी या भागात बागायती रूजवायचा प्रयत्न केला. त्यांनी आणलेल्या फलोत्पादन योजनेत विशेषतः काजूच्या बिया शेतकऱ्यांना दिल्या जायच्या; पण बागायती विषयी फारशी जागृती नव्हती. बऱ्याच जणांनी या काजू बिया भाजून फोडून खाल्या. काहींनी लावल्या आणि ते बागायतदार झाले. यातून पुढे अशा योजनेविषयी जागृती मात्र निर्माण झाली. पुढे शरद पवारांचे पर्व सुरू झाले. अवघ्या महाराष्ट्राला जाणणारा नेता, अशी त्यांची ओळख निर्माण झाली. कोकणातील गावोगाव त्यांना ओळखणारी आणि विशेष म्हणजे ते ओळखत असलेली कष्टकऱ्यांची फौज तयार होवू लागली. त्यांनी फलोत्पादन योजना आणली. शंभर टक्‍के अनूदान मिळू लागले. यातून अनेक ठिकाणी पडीक जमिनीवर आंबा, काजूच्या बागा बहरू लागल्या. शेकडो वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या नारळ, सुपारीच्या बागायतीचे क्षेत्र वाढू लागले. याच्याच जोडीने त्यांनी पर्यटनासाठीही प्रयत्न सुरू केले; पण हे प्रयत्न केवळ घोषणाबाजी नव्हती. आताच्या गणपतीपुळेच्या पर्यटन मॉडेलचे खूप मोठे श्रेय पवारांना जाते.  सावंतवाडीचे माजी आमदार शिवराम दळवी यांनी याबाबत सांगितलेला किस्सा खुप बोलका आहे. त्या काळात दळवी यांनी आपल्या अन्य भागिदारांच्या मदतीने आंबोलीत मोठे हॉटेल सुरू केले. या मागची प्रेरणा स्वतः पवार होते. जुन्या पिढीतील अनेक बागायती क्षेत्रे, तिथल्या वाटा, तिथली कष्टकरी माणसे शरद पवारांना तोंडपाठ होती. ही आख्यायिका नाही. 2003 मध्ये गणपतीपुळे येथे झालेल्या मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यात याची प्रचिती तिथे उपस्थिती असलेल्यांना आली होती. काही जुने कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांना पवारांनी स्वतः स्टेजजवळ केवळ बोलवलेच नव्हते तर त्यांच्या बागा कुठे आहेत याचे वर्णनही सांगितले होते. या सगळ्या जिव्हाळ्यामुळे कोकणावर ओढवलेले संकट पाहून पवार कोकणवासीयांच्या भेटीला येणे साहाजीकच आहे; पण ही वेळ केवळ भावनीक भेटीची नाही.  कोकणाचे नुकसान वेगळे  या वादळाने कोकणात झालेले नुकसान इतर वेळच्या हानीपेक्षा वेगळे आहे. ऊस, द्राक्ष, कापूस आदी पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान प्रामुख्याने एक-दोन वर्षाशी संबंधीत असते; मात्र या वादळाने उद्‌ध्वस्त केलेल्या नारळ, सुपारीचे नुकसान एका पिढीशी संबंधीत आहे. नारळाचे झाड दीड ते दोन पिढ्यांपर्यंत उत्पन्न देते. सुपारी साधारण 30-40 वर्षे फळ देते; मात्र बाग उभी करण्यास 12 वर्षे लागतात. या 12 वर्षांत केवळ खर्च आणि कष्ट करायचे असतात. आता बहुसंख्य शेतकऱ्यांच्या उद्‌ध्वस्त बागा त्यांच्याकडे काही पिढ्यांपासून होत्या. त्या पुन्हा उभ्या करण्यासाठी पुढची 12 वर्षे जमिनीत पैसा ओतायला हवा. त्यातच हवामानातील बदलामुळे ही झाडे उत्पन्न देईपर्यंत टिकणार की नाही, हाही प्रश्‍न आहे.  शेतकऱ्यांना हवे पाठबळ  अनिश्‍चिततेच्या भोवऱ्यात कोकणचा बळीराजा अडकला आहे. केवळ एकरकमी पॅकेज देवून हा शेतकरी पुन्हा उभा राहणे कठीण आहे. या नुकसानाकडे सरकारी जीआरमधील निकषामधून न पाहता व्यावहारीक दृष्टीने पाहायला हवे. तसे पॅकेज आणि मदतीचा हात द्यायला हवा. कोकणात बागायती फुलवायला पवारांचा हातभार होता. आता चक्रीवादळाने उद्‌ध्वस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभे करायलाही त्यांच्या पाठबळाची अपेक्षा आहे.       News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/30GNCMy

No comments:

Post a Comment