Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, May 1, 2020

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत वाढ

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत वाढ

May 01, 2020 0 Comments
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार ५०६ इतकी झाली आहे.  from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2WfSpRe https://ift.tt...
Read More
लॉकडाउनमुळे यापुढेही बंद राहणार वनपर्यटन... पर्यटकांची निराशा...

नागपूर : राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि व्याघ्रप्रकल्प आता राज्य शासनाचे आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. यापूर्वी हा निर्णय ३० एप्रिलपर्यंत लागू होता. मात्र, राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या कालवधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. शासनाचा आदेश येईपर्यंत ही वाढ केली आहे. 

राज्यात कोरोनामुळे जनजीवन ठप्प आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली वन्यजीव संरक्षित क्षेत्र देखील बंद आहेत. देशात लॉकडाऊन जाहीर होण्यापू्र्वीच ही क्षेत्र १५ एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला होता. त्यानंतर त्याचा कालावधी ३० एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आला होता. केंद्र शासनाने ३ मे पर्यंत टाळेबंदी केली आहे. त्यापुढील निर्णय अद्याप शासनाने जाहीर केलेला नाही. त्यामुळे वन विभागाने राज्य शासनाचे आदेशाची प्रतीक्षा करीत पुढील आदेश सर्व राखीव वनातील पर्यटन बंद केले आहे. टाळेबंदाबाबत निर्णय झाल्यानंतरच पुढील निर्णय होणार आहे. 

- शरद पवारांच्या आग्रहातून आकाराला आले हे मंडळ... आता केले जातेय केवळ राजकारण

राज्यातील सर्व वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील पर्यटन पुढील आदेश येई पर्यंत बंद करण्याचा निर्णय प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडून घेण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच पुढील किती दिवस राज्यातील राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांची दारे पर्यटनासाठी बंद असणार हे टाळेबंदीच्या निर्णयावर स्पष्ट होणार आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लॉकडाउनमुळे यापुढेही बंद राहणार वनपर्यटन... पर्यटकांची निराशा... नागपूर : राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि व्याघ्रप्रकल्प आता राज्य शासनाचे आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. यापूर्वी हा निर्णय ३० एप्रिलपर्यंत लागू होता. मात्र, राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या कालवधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. शासनाचा आदेश येईपर्यंत ही वाढ केली आहे.  राज्यात कोरोनामुळे जनजीवन ठप्प आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली वन्यजीव संरक्षित क्षेत्र देखील बंद आहेत. देशात लॉकडाऊन जाहीर होण्यापू्र्वीच ही क्षेत्र १५ एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला होता. त्यानंतर त्याचा कालावधी ३० एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आला होता. केंद्र शासनाने ३ मे पर्यंत टाळेबंदी केली आहे. त्यापुढील निर्णय अद्याप शासनाने जाहीर केलेला नाही. त्यामुळे वन विभागाने राज्य शासनाचे आदेशाची प्रतीक्षा करीत पुढील आदेश सर्व राखीव वनातील पर्यटन बंद केले आहे. टाळेबंदाबाबत निर्णय झाल्यानंतरच पुढील निर्णय होणार आहे.  - शरद पवारांच्या आग्रहातून आकाराला आले हे मंडळ... आता केले जातेय केवळ राजकारण राज्यातील सर्व वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील पर्यटन पुढील आदेश येई पर्यंत बंद करण्याचा निर्णय प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडून घेण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच पुढील किती दिवस राज्यातील राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांची दारे पर्यटनासाठी बंद असणार हे टाळेबंदीच्या निर्णयावर स्पष्ट होणार आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ykk7Eb
Read More
कोरोनाला हरविण्यासाठी एकजुटीने काम करा - संजय राठोड

यवतमाळ :  कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण जगावर पसरले आहे. आपल्या देशात, राज्यात आणि जिल्ह्यातही याची लागण झाली आहे. यवतमाळ शहरात तर या आठवड्यात सातत्याने रुग्णांची संख्या वाढल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. या परिस्थितीतून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शासन-प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. तरीसुद्धा कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त पोलिस अधिक्षक नुरुल हसन, अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी आदी उपस्थित होते. 

जिल्हा परिषदेत सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक
कोरोनाविरुद्धच्या लढाईत शासन आणि प्रशासनाला सामाजिक संघटनांचेही सहकार्य मिळत आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, ही सर्वांची लढाई आहे. नागरिकांच्या सहकार्यानेच ही लढाई जिंकता येईल. त्यासाठी नागरिकांनी शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे. लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे गरीब आणि गरजु नागरिकांना मदतीची आवश्यकता आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी, उद्योजकांनी, व्यावसायिकांनी व इतर नागरिकांनी समोर येऊन मदत करावी. ज्यांच्याजवळ शिधापत्रिका नाहीत, अशा लोकांसाठी धान्याच्या किट उपलब्ध करून द्याव्या. तसेच या संकटाच्या काळात प्रशासन आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

- शरद पवारांच्या आग्रहातून आकाराला आले हे मंडळ... आता केले जातेय केवळ राजकारण

जिल्ह्यातील गरीब व गरजू व्यक्तिंना 20- 25 दिवस पुरेल अशा जवळपास पाच हजार अन्नधान्य किटची व्यवस्था जि. प. शिक्षक कर्मचारी व खाजगी अनुदानित शिक्षक यांच्यावतीने करण्यात येईल. सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींकरीता पासेसची व्यवस्था करण्यात यावी. एका सामाजिक संघटनांच्या दोन ते पाच प्रतिनिधींना पासेस उपलब्ध करून द्याव्यात. तसेच आठवडा बदलला की पासेसचा रंग बदलवावा. सामाजिक संघटनांना प्रशासनाच्यावतीने मदत कार्याकरीता निधी उभारण्यासाठी सहकार्य करावे. गरजू लोकांची सामाजिक संघटनांनी दिलेली यादी तपासून सर्व शासकीय यंत्रणा व सामाजिक संघटना एकत्र येऊन सर्व गरीबांना मदत करतील. आरोग्याच्या दृष्टीने ज्या ठिकाणी संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो अशा भागात प्रथम प्राधान्याने सामाजिक संघटना आणि प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशा अनेक मुद्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीला जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाला हरविण्यासाठी एकजुटीने काम करा - संजय राठोड यवतमाळ :  कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण जगावर पसरले आहे. आपल्या देशात, राज्यात आणि जिल्ह्यातही याची लागण झाली आहे. यवतमाळ शहरात तर या आठवड्यात सातत्याने रुग्णांची संख्या वाढल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. या परिस्थितीतून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शासन-प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. तरीसुद्धा कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त पोलिस अधिक्षक नुरुल हसन, अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी आदी उपस्थित होते.  जिल्हा परिषदेत सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक कोरोनाविरुद्धच्या लढाईत शासन आणि प्रशासनाला सामाजिक संघटनांचेही सहकार्य मिळत आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, ही सर्वांची लढाई आहे. नागरिकांच्या सहकार्यानेच ही लढाई जिंकता येईल. त्यासाठी नागरिकांनी शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे. लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे गरीब आणि गरजु नागरिकांना मदतीची आवश्यकता आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी, उद्योजकांनी, व्यावसायिकांनी व इतर नागरिकांनी समोर येऊन मदत करावी. ज्यांच्याजवळ शिधापत्रिका नाहीत, अशा लोकांसाठी धान्याच्या किट उपलब्ध करून द्याव्या. तसेच या संकटाच्या काळात प्रशासन आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.  - शरद पवारांच्या आग्रहातून आकाराला आले हे मंडळ... आता केले जातेय केवळ राजकारण जिल्ह्यातील गरीब व गरजू व्यक्तिंना 20- 25 दिवस पुरेल अशा जवळपास पाच हजार अन्नधान्य किटची व्यवस्था जि. प. शिक्षक कर्मचारी व खाजगी अनुदानित शिक्षक यांच्यावतीने करण्यात येईल. सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींकरीता पासेसची व्यवस्था करण्यात यावी. एका सामाजिक संघटनांच्या दोन ते पाच प्रतिनिधींना पासेस उपलब्ध करून द्याव्यात. तसेच आठवडा बदलला की पासेसचा रंग बदलवावा. सामाजिक संघटनांना प्रशासनाच्यावतीने मदत कार्याकरीता निधी उभारण्यासाठी सहकार्य करावे. गरजू लोकांची सामाजिक संघटनांनी दिलेली यादी तपासून सर्व शासकीय यंत्रणा व सामाजिक संघटना एकत्र येऊन सर्व गरीबांना मदत करतील. आरोग्याच्या दृष्टीने ज्या ठिकाणी संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो अशा भागात प्रथम प्राधान्याने सामाजिक संघटना आणि प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशा अनेक मुद्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीला जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2yawJ0V
Read More
सह्याद्री अन् गड किल्ल्यांनी शोभतो, अभिमानाने माझा महाराष्ट्र डोलतो

उमरगा (जि. उस्मानाबाद) : कोरोनामुळे सद्य:स्थितीत प्रत्यक्ष कविसंमेलन घेणे शक्य नसल्याने येथील लेखक-कवींनी तयार केलेल्या 'माझी कविता' या व्हाॅटस्अॅप ग्रुपतर्फे शुक्रवारी (ता. एक) महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आॅनलाईन कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.

एकुण पंच्याहत्तर कविंचा ग्रुप असलेल्या या समुहातील तब्बल तीस कविंनी या कविसंमेलनात आपला सहभाग नोंदवला. महाराष्ट्राचे गुणगान गाणाऱ्या एकापेक्षा एक सरस कविता या वेळी कविंनी सादर केल्या. 'माझी कविता' या ग्रुपची सुरवात करणारे कवी बालाजी मदन इंगळे यांनी 'माझा महाराष्ट्र' ही कविता सादर केली.

महाराष्ट्राची थोरवी वर्णन करणारी ‘सह्याद्री अन् गड किल्ल्यांनी शोभतो, अभिमानाने माझा महाराष्ट्र डोलतो’ ही कविता सादर केली. तर कवी राम पांचाळ यांनी 'जय जय महाराष्ट्र देशा' ही कविता सादर केली. महाराष्ट्राची वैशिष्ट्ये त्यांनी आपल्या कवितेतून मांडली. महाराष्ट्र भूमीचे गुण गाताना ते म्हणाले, की, ‘अनंत जीवन फुलवत आहे, कृष्णा-तापी-गोदावरी, गड धुरंदर मिरवत आहे, स्वराज्य रक्षक सह्यगिरी उद्वेग शौर्याचा चेतवित आहे. गडगडल्या ह्या दाहिदिशा, जय जय महाराष्ट्र देशा...’ 

हेही वाचाच - फिरते फिवर क्लिनिकद्वारे लातूरमध्ये तपासणी करा, जिल्‍हाधिकाऱ्यांकडे मागणी

कवी कमलाकर भोसले यांनीही महाराष्ट्राची ख्याती आपल्या कवितेतून वर्णिली. महाराष्ट्राची सामाजिक व भौतिक वैशिष्ट्ये कवितेतून सहजपणे मांडताना ते म्हणाले, की 'संतांच्या अनेक विभूती, अष्टविनायकाची ख्याती, शिवबाचे इथे शाहीर, बाबासाहेबांच्या लेखणीची धार, या महाराष्ट्रात माझ्या...' 
कवयित्री रेखा सूर्यवंशी यांनी 'महाराष्ट्र ,माझा' ही कविता सादर केली. महाराष्ट्राचे भारत देशातील स्थान कसे वरच्या दर्जाचे आहे हे सांगताना आपल्या कवितेत त्या म्हणाल्या, की 'भारत भूचा जणू आरसा,  संस्कृतीचा जपे वारसा, महाराष्ट्र माझा.. '

कवी विश्वनाथ महाजन यांनी गीताच्या रूपाने महाराष्ट्राची महती गाणारी रचना सादर केली. आपल्या कवितेत ते म्हणाले, की 'संतांची ही जननी सहिष्णुतेची गाणी, ज्ञाना नाथा मुक्ता, तुक्याची अभंग वाणी, 
विचारांची ही असे भूमी, महाराष्ट्र माझा... '
कवयित्री नेहा माने यांनी महाराष्ट्राची गाथाच आपल्या कवितेतून गायिली. 'महाराष्ट्राची गाथा' या आपल्या कवितेत त्या म्हणाल्या , '‘काय सांगू मी माझ्या महाराष्ट्राची गाथा, ऐकून नतमस्तक होतो लहान थोरांचा माथा’ 

कवी शिवराम अडसुळे यांनीही कविता सादर केली. शूरांचा, विरांचा महाराष्ट्र कसा आहे हे आपल्या कवितेमधून त्यांनी मांडले. 'वीरांचा महाराष्ट्र' या कवितेत ते म्हणाले, 'शिवरायांचा महाराष्ट्र, बलवान महाराष्ट्र, विरांचा महाराष्ट्र, शौर्यवान महाराष्ट्र'

महाराष्ट्राचे गुणगान गाणाऱ्या कविता या वेळी कविंनी सादर केल्या. काही कविंनी सामाजिक, राजकीय आशय व्यक्त करणाऱ्या कविता सादर केल्या. आपापल्या घरी बसून कविंनी या कविसंमेलनाचा आनंदही घेतला. या कविसंमेलनामध्ये योगिराज माने, सुधीर कांबळे, प्रमोद माने, राजेंद्र माळी, सुमन पवार, संजय काबडे, प्रा. लक्ष्मण बिराजदार, श्री. देशमाने , हनुमंत देशमुख, शंकर मुगळे, अनिता मुरकुटे, भावना नान्नजकर, पार्वती माशाळकर, रमेश ममाळे, शशिकला राठोड, अमोल मुळे, पुष्पा क्षीरसागर, भारत कांबळे, गिरीधर गोस्वामी, रुपचंद ख्याडे, रामदास कांबळे, तनुजा ख्याडे, प्रा. एन.जे. पवार, परमेश्वर सुतार आदी कविंनीही या आॅनलाईन कविसंमेलनात सहभाग घेतला. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सह्याद्री अन् गड किल्ल्यांनी शोभतो, अभिमानाने माझा महाराष्ट्र डोलतो उमरगा (जि. उस्मानाबाद) : कोरोनामुळे सद्य:स्थितीत प्रत्यक्ष कविसंमेलन घेणे शक्य नसल्याने येथील लेखक-कवींनी तयार केलेल्या 'माझी कविता' या व्हाॅटस्अॅप ग्रुपतर्फे शुक्रवारी (ता. एक) महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आॅनलाईन कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. एकुण पंच्याहत्तर कविंचा ग्रुप असलेल्या या समुहातील तब्बल तीस कविंनी या कविसंमेलनात आपला सहभाग नोंदवला. महाराष्ट्राचे गुणगान गाणाऱ्या एकापेक्षा एक सरस कविता या वेळी कविंनी सादर केल्या. 'माझी कविता' या ग्रुपची सुरवात करणारे कवी बालाजी मदन इंगळे यांनी 'माझा महाराष्ट्र' ही कविता सादर केली. महाराष्ट्राची थोरवी वर्णन करणारी ‘सह्याद्री अन् गड किल्ल्यांनी शोभतो, अभिमानाने माझा महाराष्ट्र डोलतो’ ही कविता सादर केली. तर कवी राम पांचाळ यांनी 'जय जय महाराष्ट्र देशा' ही कविता सादर केली. महाराष्ट्राची वैशिष्ट्ये त्यांनी आपल्या कवितेतून मांडली. महाराष्ट्र भूमीचे गुण गाताना ते म्हणाले, की, ‘अनंत जीवन फुलवत आहे, कृष्णा-तापी-गोदावरी, गड धुरंदर मिरवत आहे, स्वराज्य रक्षक सह्यगिरी उद्वेग शौर्याचा चेतवित आहे. गडगडल्या ह्या दाहिदिशा, जय जय महाराष्ट्र देशा...’  हेही वाचाच - फिरते फिवर क्लिनिकद्वारे लातूरमध्ये तपासणी करा, जिल्‍हाधिकाऱ्यांकडे मागणी कवी कमलाकर भोसले यांनीही महाराष्ट्राची ख्याती आपल्या कवितेतून वर्णिली. महाराष्ट्राची सामाजिक व भौतिक वैशिष्ट्ये कवितेतून सहजपणे मांडताना ते म्हणाले, की 'संतांच्या अनेक विभूती, अष्टविनायकाची ख्याती, शिवबाचे इथे शाहीर, बाबासाहेबांच्या लेखणीची धार, या महाराष्ट्रात माझ्या...'  कवयित्री रेखा सूर्यवंशी यांनी 'महाराष्ट्र ,माझा' ही कविता सादर केली. महाराष्ट्राचे भारत देशातील स्थान कसे वरच्या दर्जाचे आहे हे सांगताना आपल्या कवितेत त्या म्हणाल्या, की 'भारत भूचा जणू आरसा,  संस्कृतीचा जपे वारसा, महाराष्ट्र माझा.. ' कवी विश्वनाथ महाजन यांनी गीताच्या रूपाने महाराष्ट्राची महती गाणारी रचना सादर केली. आपल्या कवितेत ते म्हणाले, की 'संतांची ही जननी सहिष्णुतेची गाणी, ज्ञाना नाथा मुक्ता, तुक्याची अभंग वाणी,  विचारांची ही असे भूमी, महाराष्ट्र माझा... ' कवयित्री नेहा माने यांनी महाराष्ट्राची गाथाच आपल्या कवितेतून गायिली. 'महाराष्ट्राची गाथा' या आपल्या कवितेत त्या म्हणाल्या , '‘काय सांगू मी माझ्या महाराष्ट्राची गाथा, ऐकून नतमस्तक होतो लहान थोरांचा माथा’  कवी शिवराम अडसुळे यांनीही कविता सादर केली. शूरांचा, विरांचा महाराष्ट्र कसा आहे हे आपल्या कवितेमधून त्यांनी मांडले. 'वीरांचा महाराष्ट्र' या कवितेत ते म्हणाले, 'शिवरायांचा महाराष्ट्र, बलवान महाराष्ट्र, विरांचा महाराष्ट्र, शौर्यवान महाराष्ट्र' महाराष्ट्राचे गुणगान गाणाऱ्या कविता या वेळी कविंनी सादर केल्या. काही कविंनी सामाजिक, राजकीय आशय व्यक्त करणाऱ्या कविता सादर केल्या. आपापल्या घरी बसून कविंनी या कविसंमेलनाचा आनंदही घेतला. या कविसंमेलनामध्ये योगिराज माने, सुधीर कांबळे, प्रमोद माने, राजेंद्र माळी, सुमन पवार, संजय काबडे, प्रा. लक्ष्मण बिराजदार, श्री. देशमाने , हनुमंत देशमुख, शंकर मुगळे, अनिता मुरकुटे, भावना नान्नजकर, पार्वती माशाळकर, रमेश ममाळे, शशिकला राठोड, अमोल मुळे, पुष्पा क्षीरसागर, भारत कांबळे, गिरीधर गोस्वामी, रुपचंद ख्याडे, रामदास कांबळे, तनुजा ख्याडे, प्रा. एन.जे. पवार, परमेश्वर सुतार आदी कविंनीही या आॅनलाईन कविसंमेलनात सहभाग घेतला.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2SoNrQH
Read More
'धरण उशाला तरीही कोरड घशाला'...पाण्यासाठी 'इथं' रोजच होतेय फरपट!

नाशिक : (गिलाणे) नांदगाव शहर व 56 खेडी नळ पाणीपुरवठा योजनेतून गिलाणे व परिसरातील खेड्यांना होणारा पाणीपुरवठा तांत्रिक कारणामुळे व जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तब्बल पंधरा दिवसांपासून ठप्प आहे. गिरणा धरण परिसरातील गावांची अवस्था धरण उशाला आणि कोरड घशाला अशी झाली आहे. कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असतांना पाण्यासाठी महिलांना दाहीदिशा पायपीट करण्याची नामुष्की आल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

महिलांची पाण्यासाठी पायपीट 

56 खेडी योजनेची कमकुवत असलेली पाईपलाईन फुटण्याच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. या कामाच्या दुरुस्तीसाठी जीवन प्राधिकरणाकडून हेतुपुरस्कर दिरंगाई होत असते. त्यामुळे अनेकदा पाणीपुरवठा विस्कळीत स्वरूपाचा होत असतो. त्यातच पाणीपुरवठा पूर्वसूचना न देता अनेक दिवसांपर्यंत बंद केला जातो. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून गिलाणे व परिसरातील गावांचा पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प झाल्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. असंख्य खेडयांसाठी जीवनदायीनी ठरलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नादगाव शहर व 56 खेडी नळ पाणीपुरोवठा योजना अनेक वर्षांपासून शेवटची घटका मोजत आहे. 

नियमित पाणी पुरवठ्याची मागणी

मध्यंतरी जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनिषाताई पवार यांच्या अथक प्रयत्नातून या योजनेच्या नुतनीकरणासाठी 100 कोटींचा निधी मंजूरही झाला आहे. परंतु अद्यापपर्यंत या योजनेत कुठलीच सुधारणा होत नसल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लॉकडाऊनच्या काळात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच तीव्र पाणीटंचाईमुळे महिला व अबालवृद्धांना पाण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा पायपीट करावी लागत आहे. वरिष्ठांनी तातडीने या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन पाणी पुरवठा नियमित करावा अशी मागणी परिसरातून होत आहे.

हेही वाचा > धक्कादायक! चक्क डॉक्टरकडूनच परिसरात कोरोनाबाधित रुग्ण असल्याची खोटी माहीती?

लॉकडाऊनच्या काळात विस्कळीत स्वरूपाचा पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. - भाऊसाहेब आहिरे, अध्यक्ष जाणताराजा मंडळ, गिलाणे

हेही वाचा > गावी परतल्याचे हसू चेहऱ्यावरच आटले अन् घरात पाऊल टाकायच्या आधीच वेशीवर क्वारंटाईन!

कोरोना संसर्गसारख्या गंभीर परिस्थितीत पाण्यासाठी दूरवर होणारी पायपीट महिलांसाठी अत्यंत त्रासदायक असून तातडीने पाणीपुरवठा पूर्ववत व्हावा हीच अपेक्षा. - सुरेखा पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्या, गिलाणे

हेही वाचा > हूश्श! नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास...अखेर 'त्या' नोटाचं उकललं गूढ

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

'धरण उशाला तरीही कोरड घशाला'...पाण्यासाठी 'इथं' रोजच होतेय फरपट! नाशिक : (गिलाणे) नांदगाव शहर व 56 खेडी नळ पाणीपुरवठा योजनेतून गिलाणे व परिसरातील खेड्यांना होणारा पाणीपुरवठा तांत्रिक कारणामुळे व जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तब्बल पंधरा दिवसांपासून ठप्प आहे. गिरणा धरण परिसरातील गावांची अवस्था धरण उशाला आणि कोरड घशाला अशी झाली आहे. कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असतांना पाण्यासाठी महिलांना दाहीदिशा पायपीट करण्याची नामुष्की आल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. महिलांची पाण्यासाठी पायपीट  56 खेडी योजनेची कमकुवत असलेली पाईपलाईन फुटण्याच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. या कामाच्या दुरुस्तीसाठी जीवन प्राधिकरणाकडून हेतुपुरस्कर दिरंगाई होत असते. त्यामुळे अनेकदा पाणीपुरवठा विस्कळीत स्वरूपाचा होत असतो. त्यातच पाणीपुरवठा पूर्वसूचना न देता अनेक दिवसांपर्यंत बंद केला जातो. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून गिलाणे व परिसरातील गावांचा पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प झाल्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. असंख्य खेडयांसाठी जीवनदायीनी ठरलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नादगाव शहर व 56 खेडी नळ पाणीपुरोवठा योजना अनेक वर्षांपासून शेवटची घटका मोजत आहे.  नियमित पाणी पुरवठ्याची मागणी मध्यंतरी जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनिषाताई पवार यांच्या अथक प्रयत्नातून या योजनेच्या नुतनीकरणासाठी 100 कोटींचा निधी मंजूरही झाला आहे. परंतु अद्यापपर्यंत या योजनेत कुठलीच सुधारणा होत नसल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लॉकडाऊनच्या काळात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच तीव्र पाणीटंचाईमुळे महिला व अबालवृद्धांना पाण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा पायपीट करावी लागत आहे. वरिष्ठांनी तातडीने या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन पाणी पुरवठा नियमित करावा अशी मागणी परिसरातून होत आहे. हेही वाचा > धक्कादायक! चक्क डॉक्टरकडूनच परिसरात कोरोनाबाधित रुग्ण असल्याची खोटी माहीती? लॉकडाऊनच्या काळात विस्कळीत स्वरूपाचा पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. - भाऊसाहेब आहिरे, अध्यक्ष जाणताराजा मंडळ, गिलाणे हेही वाचा > गावी परतल्याचे हसू चेहऱ्यावरच आटले अन् घरात पाऊल टाकायच्या आधीच वेशीवर क्वारंटाईन! कोरोना संसर्गसारख्या गंभीर परिस्थितीत पाण्यासाठी दूरवर होणारी पायपीट महिलांसाठी अत्यंत त्रासदायक असून तातडीने पाणीपुरवठा पूर्ववत व्हावा हीच अपेक्षा. - सुरेखा पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्या, गिलाणे हेही वाचा > हूश्श! नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास...अखेर 'त्या' नोटाचं उकललं गूढ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2KTtDRC
Read More
जोतिबा डोंगरावर यंदा वावर जत्रेच्या जोड्या आल्याच नाहित 

जोतिबा डोंगर -  श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर (ता. पन्हाळा)  येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा यंदा कोरोनामुळे भाविकाविनाच पार पडली. आता तर वैशाख महिना सुरू झाला. डोंगरावर नव वधू-वरांची वावर जत्रा काढण्यासाठी या महिन्यात नव दापत्यांची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. पण या वावर जत्रेसाठी यंदा कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. 

दरवर्षी वैशाखात भरणाऱ्या या यात्रेला तुफान येणार नाही. वावर जत्रेचा काळाबरोबर वेशही बदललेला आहे. वावर जत्रेसाठी हिरवागार शालू नेसलेली वधू , नेहरू शर्ट, टोपी धोतर अथवा विजार घातलेला वर असा पेहराव असे पूर्वीच्या काळचे चित्र होते. ते वधू वर आज उतारवयात आहेत. त्यांची मुले, नातवंडे आता वावर जत्रेसाठी येत असून त्यांनी नव्या युगाशी गट्टी केलेली दिसत आहे. शालू ऐवजी जीन पँट त्यावर रंगीत टॉप घातलेल्या वधू  तर जोधपुरी सलवार कुर्ता झब्बा पायजमा, फरची टोपी, तयार फेटा घातलेला वर-वधू आता आलिशान मोटारीतून येताना दिसत आहेत.

जोतिबा डोंगरावर वावर जत्रा विधी करण्यासाठी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गुजरात या राज्यातून  हजारोच्या संख्येने भाविक येताना दिसतात. यामध्ये नवदापत्य वधू-वरांची संख्या अधिक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात वावर जत्रा या विधिस मोठे धार्मिक महत्त्व असून उच्चशिक्षित कुटुंबेही हा विधी करताना दिसतात. डोंगरावर वावर जत्रा काढताना हिरवा शालू परिधान केलेली वधू सूट घातलेल्या वर असे चित्र मंदिर परिसरात दिसत असते. लग्न सोहळा झाल्यावर वधु वर  श्री ज्योतिबाच्या दर्शनासाठी येतात. यावेळी स्थानिक पुजाऱ्याकडून नवीन वधू-वराची वावर जत्रा विधी केला जातो. यासाठी पुजारी नवीन वधू-वरांची जोतिबाच्या मंदिरात पुन्हा देवाच्या साक्षीने लग्न गाठ बांधून पानसुपारीचा वीडा ठेवून जोडीने नमस्कार करून आपल्या कुलदैवताला आपल्या जोडीदाराची नावे सांगून लग्न सोहळ्याच्या निमित्ताने देवास संपूर्ण पोषाख अर्पण करतात. काही वधुवर आपल्या इच्छेने देवास जोडीने दक्षिणा देतात. व्यवहार या शब्दापासून पुढे वावर हा शब्द रूढ झाला आणि वावर जत्रा करून जोडीने आपल्या कुलदैवता पुढे आमच्या संसाराला बळकटी दे आमच्या आयुष्याची सुरुवात तुझ्या दारातून सुरू करतो आमचा संसार सुखी ठेव, असा आशीर्वाद मागतात. येथील मंदिर परिसरात डवरी लोकांकडून लग्नाचा गोंधळ घालण्याचा विधी होतो. वावरजत्रा झाल्यानंतर नववधु  श्री यमाई देवीच्या दर्शनासाठी जातात विधिवत दर्शन घेऊन मंदिराच्या मागील बाजूस लहान दगडांच्या, खापराच्या, उतरंडी लावून नवजीवनाची सुरवात तुझ्या दारातून करतो, अशी प्रार्थना करून यमाई देवीस मीठ-पीठ वाहतात ओटी भरतात. आजच्या धकाधकीच्या जगात वावर जत्रा  या विधीस पारंपारीक महत्व आहे. राज्यातील विविध भागातून तसेच कर्नाटकातून ही नवदांपत्ये डोंगरावर येतात आणि  या वावर जत्रेला डोंगरावर दर वर्षी तुफान आलेले दिसते. यंदा मात्र डोंगरावर १५ मार्चपासून मंदिर बंद आहे. भाविकांना येण्यास बंदी आहे. त्यामुळे वावर जत्रेसाठी नववधुवरांना येण्याची अडचण निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव नष्ट झाल्यावर डोंगर गर्दीने फूलणार आहे .

हे पण वाचा - 'ती' कार सांगली हद्दीत घुसली, पोलिसांनी पाठलाग केला तर त्यात दिसलं वेगळंच... 

खेटे झाल्यापासून डोंगरावर भाविक आलेले नाहीत. डोंगर अगदी शांत शांत आहे. वैशाख महिना सुरू आहे. वावर जत्रा यंदा कोरोना साथीमुळे आलेल्या नाहीत. नेहमी गजबजलेली पुजाऱ्यांची घरे कोरोनामुळे रिकामी दिसत आहेत. 

-बाळकृष्ण सांगळे, पुजारी जोतिबा डोंगर 

हे पण वाचा -  गुड न्यूज : भारतातच तयार होणार कोरोनाची लस!                                                    
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जोतिबा डोंगरावर यंदा वावर जत्रेच्या जोड्या आल्याच नाहित  जोतिबा डोंगर -  श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर (ता. पन्हाळा)  येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा यंदा कोरोनामुळे भाविकाविनाच पार पडली. आता तर वैशाख महिना सुरू झाला. डोंगरावर नव वधू-वरांची वावर जत्रा काढण्यासाठी या महिन्यात नव दापत्यांची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. पण या वावर जत्रेसाठी यंदा कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे.  दरवर्षी वैशाखात भरणाऱ्या या यात्रेला तुफान येणार नाही. वावर जत्रेचा काळाबरोबर वेशही बदललेला आहे. वावर जत्रेसाठी हिरवागार शालू नेसलेली वधू , नेहरू शर्ट, टोपी धोतर अथवा विजार घातलेला वर असा पेहराव असे पूर्वीच्या काळचे चित्र होते. ते वधू वर आज उतारवयात आहेत. त्यांची मुले, नातवंडे आता वावर जत्रेसाठी येत असून त्यांनी नव्या युगाशी गट्टी केलेली दिसत आहे. शालू ऐवजी जीन पँट त्यावर रंगीत टॉप घातलेल्या वधू  तर जोधपुरी सलवार कुर्ता झब्बा पायजमा, फरची टोपी, तयार फेटा घातलेला वर-वधू आता आलिशान मोटारीतून येताना दिसत आहेत. जोतिबा डोंगरावर वावर जत्रा विधी करण्यासाठी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गुजरात या राज्यातून  हजारोच्या संख्येने भाविक येताना दिसतात. यामध्ये नवदापत्य वधू-वरांची संख्या अधिक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात वावर जत्रा या विधिस मोठे धार्मिक महत्त्व असून उच्चशिक्षित कुटुंबेही हा विधी करताना दिसतात. डोंगरावर वावर जत्रा काढताना हिरवा शालू परिधान केलेली वधू सूट घातलेल्या वर असे चित्र मंदिर परिसरात दिसत असते. लग्न सोहळा झाल्यावर वधु वर  श्री ज्योतिबाच्या दर्शनासाठी येतात. यावेळी स्थानिक पुजाऱ्याकडून नवीन वधू-वराची वावर जत्रा विधी केला जातो. यासाठी पुजारी नवीन वधू-वरांची जोतिबाच्या मंदिरात पुन्हा देवाच्या साक्षीने लग्न गाठ बांधून पानसुपारीचा वीडा ठेवून जोडीने नमस्कार करून आपल्या कुलदैवताला आपल्या जोडीदाराची नावे सांगून लग्न सोहळ्याच्या निमित्ताने देवास संपूर्ण पोषाख अर्पण करतात. काही वधुवर आपल्या इच्छेने देवास जोडीने दक्षिणा देतात. व्यवहार या शब्दापासून पुढे वावर हा शब्द रूढ झाला आणि वावर जत्रा करून जोडीने आपल्या कुलदैवता पुढे आमच्या संसाराला बळकटी दे आमच्या आयुष्याची सुरुवात तुझ्या दारातून सुरू करतो आमचा संसार सुखी ठेव, असा आशीर्वाद मागतात. येथील मंदिर परिसरात डवरी लोकांकडून लग्नाचा गोंधळ घालण्याचा विधी होतो. वावरजत्रा झाल्यानंतर नववधु  श्री यमाई देवीच्या दर्शनासाठी जातात विधिवत दर्शन घेऊन मंदिराच्या मागील बाजूस लहान दगडांच्या, खापराच्या, उतरंडी लावून नवजीवनाची सुरवात तुझ्या दारातून करतो, अशी प्रार्थना करून यमाई देवीस मीठ-पीठ वाहतात ओटी भरतात. आजच्या धकाधकीच्या जगात वावर जत्रा  या विधीस पारंपारीक महत्व आहे. राज्यातील विविध भागातून तसेच कर्नाटकातून ही नवदांपत्ये डोंगरावर येतात आणि  या वावर जत्रेला डोंगरावर दर वर्षी तुफान आलेले दिसते. यंदा मात्र डोंगरावर १५ मार्चपासून मंदिर बंद आहे. भाविकांना येण्यास बंदी आहे. त्यामुळे वावर जत्रेसाठी नववधुवरांना येण्याची अडचण निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव नष्ट झाल्यावर डोंगर गर्दीने फूलणार आहे . हे पण वाचा - 'ती' कार सांगली हद्दीत घुसली, पोलिसांनी पाठलाग केला तर त्यात दिसलं वेगळंच...  खेटे झाल्यापासून डोंगरावर भाविक आलेले नाहीत. डोंगर अगदी शांत शांत आहे. वैशाख महिना सुरू आहे. वावर जत्रा यंदा कोरोना साथीमुळे आलेल्या नाहीत. नेहमी गजबजलेली पुजाऱ्यांची घरे कोरोनामुळे रिकामी दिसत आहेत.  -बाळकृष्ण सांगळे, पुजारी जोतिबा डोंगर  हे पण वाचा -  गुड न्यूज : भारतातच तयार होणार कोरोनाची लस!                                                       News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ybg0dQ
Read More
उरी में पाकिस्तान की फायरिंग में दो जवान शहीद, 4 नागरिक भी घायल https://ift.tt/2KTqgKs
किम जाँग-उन 20 दिवसांनंतर सार्वजनिक कार्यक्रमात दिसले
तमाम अटकलों को झुठलाकर फिर सामने आया किम जोंग, इस बार यहां दिखा https://ift.tt/2Wka0au

Thursday, April 30, 2020

ऋषी कपूरच्या गाडीला कोल्हापुरात म्हशी आल्या आडव्या अन्‌...

कोल्हापूर - चाळीस वर्षापूर्वीचा काळ. शिवाजी पेठेतील संध्यामठ गल्लीतून ऋषी कपूर यांची गाडी कांडगावकडे निघाली होती. वाटेत म्हशी आडव्या आल्या आणि त्यांनी गाडी थेट संध्यामठ गल्लीत वळवली. इतक्‍यात भोईटेंच्या घरातील पमा आणि इतर मुलींनी ऋषी कपूरऽऽऽ ऋषी कपूरऽऽऽ असा गलका केला आणि तितक्‍याच तिथे गल्लीतली सारी मंडळी जमा झाली...बॉलीवूडचे चॉकलेट हिरो म्हणून प्रदीर्घ काळ चित्रपट रसिकांच्या मनाला भुरळ घालणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज निधन झाले आणि त्यांच्या व एकूणच कपूर घराण्याविषयीच्या कोल्हापुरातील आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला.

दरम्यान, 1978 ला प्रदर्शित झालेल्या 'फुल खिले है गुलशन गुलशन' या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने ऋषी कपूर कोल्हापुरात होते. शहरासह कांडगाव (ता. करवीर), मरळी (ता. पन्हाळा) आदी परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. या चित्रपटात काही स्थानिक कलाकारांच्याही भूमिका होत्या. नगरसेविका सुरेखा शहा यांनी यांचीही या चित्रपटात भूमिका होती. शिवाजी पेठेतील आठवण शाहीर राजू राऊत आणि राजू ढेंगे यांनी शेअर केली.

पाहा - ऋषी कपूर अन् कोल्हापुरचं अनोख नातं... पन्हाळा, मसाई परिसरात चित्रीकरणासाठी असायचा आग्रह...

नाते तीन पिढ्यांचे...

भारतीय सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या कपूर घराण्यावर कोल्हापूरकरांनी आणि कपूर घराण्याने कोल्हापूरवर नेहमीच भरभरून प्रेम केले. म्हणूनच 1996 साली 'प्रेम ग्रंथ' या चित्रपटाची निर्मिती करताना येथील पन्हाळा, मसाई परिसरात चित्रीकरणाचा आग्रह कपूर घराण्यातील सदस्यांनी धरला होता आणि त्यानुसार येथे चित्रीकरणही पूर्ण झाले. ग्रेट शोमन राज कपूर यांनी चेहऱ्याला पहिल्यांदा रंग लावला तो जयप्रभा स्टुडिओत. 'वाल्मिकी' या चित्रपटात नारद मुनींची भूमिका त्यांना चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी दिली होती. त्यापोटी मिळालेल्या पाच हजार रुपयांच्या मानधनातून त्यांनी आर. के. स्टुडिओसाठी चेंबूर येथे जागा खरेदी केली आणि त्यानंतर येथे उभारलेला हा स्टुडिओ ऋषी कपूर यांच्या एकूणच कारकिर्दीत मोलाचे योगदान देणारा ठरला.

मुळात चाळीसच्या दशकात पृथ्वीराज कपूर यांचा मुक्कामच सहकुटुंब कोल्हापुरात होता. 'वाल्मीकी', 'महारथी कर्ण' आदी चित्रपटांची निर्मिती भालजींनी या काळात केली होती. त्यावेळी लहान असणाऱ्या राज कपूर यांच्यासह शशी कपूर यांच्याविषयीच्या आठवणी आजही येथील काही ज्येष्ठांच्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा तरळतात. महापालिकेत शिपाई म्हणून काम करणारे (कै.) संभाजी पाटील राज कपूर यांचे चाहते. त्यांनी पुढाकार घेऊन वाशी नाका येथे राज कपूर यांचा पुतळा उभारला असून, आजही पाटील कुटुंबीय व राज कपूर यांचे चाहते या पुतळ्याची देखभाल करतात. या पुतळ्याच्या अनावरमासाठी शशी कपूर स्वतः आले होते.  

 

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ऋषी कपूरच्या गाडीला कोल्हापुरात म्हशी आल्या आडव्या अन्‌... कोल्हापूर - चाळीस वर्षापूर्वीचा काळ. शिवाजी पेठेतील संध्यामठ गल्लीतून ऋषी कपूर यांची गाडी कांडगावकडे निघाली होती. वाटेत म्हशी आडव्या आल्या आणि त्यांनी गाडी थेट संध्यामठ गल्लीत वळवली. इतक्‍यात भोईटेंच्या घरातील पमा आणि इतर मुलींनी ऋषी कपूरऽऽऽ ऋषी कपूरऽऽऽ असा गलका केला आणि तितक्‍याच तिथे गल्लीतली सारी मंडळी जमा झाली...बॉलीवूडचे चॉकलेट हिरो म्हणून प्रदीर्घ काळ चित्रपट रसिकांच्या मनाला भुरळ घालणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज निधन झाले आणि त्यांच्या व एकूणच कपूर घराण्याविषयीच्या कोल्हापुरातील आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. दरम्यान, 1978 ला प्रदर्शित झालेल्या 'फुल खिले है गुलशन गुलशन' या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने ऋषी कपूर कोल्हापुरात होते. शहरासह कांडगाव (ता. करवीर), मरळी (ता. पन्हाळा) आदी परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. या चित्रपटात काही स्थानिक कलाकारांच्याही भूमिका होत्या. नगरसेविका सुरेखा शहा यांनी यांचीही या चित्रपटात भूमिका होती. शिवाजी पेठेतील आठवण शाहीर राजू राऊत आणि राजू ढेंगे यांनी शेअर केली. पाहा - ऋषी कपूर अन् कोल्हापुरचं अनोख नातं... पन्हाळा, मसाई परिसरात चित्रीकरणासाठी असायचा आग्रह... नाते तीन पिढ्यांचे... भारतीय सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या कपूर घराण्यावर कोल्हापूरकरांनी आणि कपूर घराण्याने कोल्हापूरवर नेहमीच भरभरून प्रेम केले. म्हणूनच 1996 साली 'प्रेम ग्रंथ' या चित्रपटाची निर्मिती करताना येथील पन्हाळा, मसाई परिसरात चित्रीकरणाचा आग्रह कपूर घराण्यातील सदस्यांनी धरला होता आणि त्यानुसार येथे चित्रीकरणही पूर्ण झाले. ग्रेट शोमन राज कपूर यांनी चेहऱ्याला पहिल्यांदा रंग लावला तो जयप्रभा स्टुडिओत. 'वाल्मिकी' या चित्रपटात नारद मुनींची भूमिका त्यांना चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी दिली होती. त्यापोटी मिळालेल्या पाच हजार रुपयांच्या मानधनातून त्यांनी आर. के. स्टुडिओसाठी चेंबूर येथे जागा खरेदी केली आणि त्यानंतर येथे उभारलेला हा स्टुडिओ ऋषी कपूर यांच्या एकूणच कारकिर्दीत मोलाचे योगदान देणारा ठरला. मुळात चाळीसच्या दशकात पृथ्वीराज कपूर यांचा मुक्कामच सहकुटुंब कोल्हापुरात होता. 'वाल्मीकी', 'महारथी कर्ण' आदी चित्रपटांची निर्मिती भालजींनी या काळात केली होती. त्यावेळी लहान असणाऱ्या राज कपूर यांच्यासह शशी कपूर यांच्याविषयीच्या आठवणी आजही येथील काही ज्येष्ठांच्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा तरळतात. महापालिकेत शिपाई म्हणून काम करणारे (कै.) संभाजी पाटील राज कपूर यांचे चाहते. त्यांनी पुढाकार घेऊन वाशी नाका येथे राज कपूर यांचा पुतळा उभारला असून, आजही पाटील कुटुंबीय व राज कपूर यांचे चाहते या पुतळ्याची देखभाल करतात. या पुतळ्याच्या अनावरमासाठी शशी कपूर स्वतः आले होते.       News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2SlsFRZ
Read More
महाराष्ट्राच्या सामर्थ्याविषयी देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पाहा!

भारतासारख्या विशाल देशाचा महाराष्ट्र मुकुटमणी आहे. राज्याच्या विकासात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे योगदान दिले आहे. भाजपचे ते महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री.आज महाराष्ट्राकडे अन्य राज्ये आदराने बघतात. जगातल्या पुढारलेल्या देशांनाही मागे टाकणारा जीडीपी दर अन् विकास महाराष्ट्राला साधायचा आहे. महाराष्ट्राविषयी आपल्या भावना त्यांनी सकाळच्या प्रतिनिधी मृणालिनी नानिवडेकर यांच्याशी बोलताना व्यक्त केल्या...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रश्‍न - हीरक महोत्सवी वाटचालीत महाराष्ट्राने काय कमावले आहे?
उत्तर - देशातल्या सर्व राज्यांमध्ये खऱ्या अर्थाने महान ठरणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र हा आपला लौकीक. बाहेर वावरताना तर तो अधिक प्रकर्षाने जाणवतो. योग्य आणि अचूक व प्रवाही निर्णय, कालसुसंगत धोरणे अन् या समीकरणांना वेग देणारे गतीमान प्रशासन ही महाराष्ट्राची 60 वर्षातील कमाई आहे. सकल उत्पन्न वाढते ठेवणे, सामाजिक क्षेत्रात पथदर्शी निर्णय घेणे हे सामूहिक यश, तर सर्वाधिक भारतरत्ने जन्माला घालणारे राज्य ही त्या-त्या व्यक्तींच्या प्रयत्नांनी मिळालेले ललामभूत कोंदण. आज साठ वर्षांचा टप्पा गाठताना महाराष्ट्राचे हे अभिमानगीत आनंद देतेय. 

पुढच्या दहा-वीस वर्षात महाराष्ट्र कुठे असायला हवा?
    भारतातल्या या राज्याशी बरोबरी करायची ईर्षा अन्य राज्यांमध्येच नव्हे, तर बाहेरच्या देशांमध्येही निर्माण व्हायला हवी.

जरा नीट सांगा ना काय म्हणायचे आहे ते?
    आजच्या परिस्थितीतच सांगतो. सध्या कोरोनाचा कहर माजलाय. चीनमधील गुंतवणूक तेथेच मर्यादित न ठेवता ती बाहेरही विस्तारीत ठेवावी, असा बड्या कंपन्यांचा प्रयास आहे. जपानने तसे जाहीरही केलंय. संकट नेहमीच संधी घेवून येत असते. ही नवे पडाव शोधणारी गुंतवणूक महाराष्ट्राचे सर्वात मोठे शक्‍तीस्थळ ठरू शकते. ही गुंतवणूक आज युरोपात जावू शकत नाही. तेथील समस्या जगजाहीर आहेत. आफ्रिका अजून या संधी घेण्याच्या तयारीत नाही. त्यामुळेच ही गुंतवणूक आशियात येणार हे सरळ आहे. व्हिएतनामसारखे देश त्याचा लाभ घेण्यासाठी झटत आहेत. महाराष्ट्राने या संदर्भात पुढाकार घेतला, ईज ऑफ डुईंग बिझिनेसचे वातावरण निर्माण केले तर स्वप्नभूमीच्या शोधातल्या कंपन्यांना महाराष्ट्र तीर्थक्षेत्र वाटू शकेल. 

प्रगतीच्या वाटेवरची आव्हाने कोणती?
    आव्हानेही बरीच आहेत. जगाच्या रचना वारंवार बदलत असतात, त्यामुळे संपन्न प्रदेशांसमोरही आव्हाने असतातच. महाराष्ट्रात विकास सर्वदूर पसरलेला नाही. तो काही टापूतच मर्यादित आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये विकास पोहोचवण्याचे आव्हान आहे. त्यावर सर्व पक्षांनी एकत्रित तोडगा काढावा. दुसरे मोठे अन् सर्वाधिक चिंतेचे आव्हान म्हणजे शाश्‍वत शेतीचे. सिंचन मर्यादित. त्यातच वातावरणात सध्या होत असलेले अनाकलनीय बदल.

पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेणारी क्‍लायमेट रिझीलियन्ट शेतीव्यवस्था निर्माण करणे आव्हान आहे. शेतीत कालसुसंगत बदल युद्धपातळीवर करावेत. पाण्याचे नियोजन हेही मोठे आव्हान. तुटीच्या खोऱ्यांचे जलनियोजन करण्यासाठी जास्त पाणी असलेल्या प्रदेशातून पाणी अभाव्याच्या प्रदेशात वळवावे लागेल. आपण राज्य म्हणून हे करू शकलो तर प्रगतीची फळे महाराष्ट्रात सर्वदूर पसरतील. संघराज्यीय ढाच्यात राज्याराज्यांत स्पर्धा असतेच, ती निकोप असली की झाले. आयटीचा विचार केला तर ही स्पर्धा तेलंगणा, कर्नाटक, आंध्रशी आहे. उद्योगांबाबत बोलायचे तर गुजरात, तमिळनाडूशी, आरोग्य व्यवस्थापन अन् डिझास्टर मॅनेजमेंटबाबत बोलायचे तर केरळ, ओडिशाशी  स्पर्धा आहे. महाराष्ट्राने सर्व क्षेत्रात आघाडी मिळवावी. 

महाराष्ट्राच्या आजवरच्या वाटचालीतले सर्वात महत्वाचे क्षण कोणते?
    अनेक आहेत. पण, सिंहावलोकन करताना आठवायच्या त्या चांगल्या बाबी. पायाभूत सुविधांसाठी आज सुरू असलेले श्रम आपली संपत्ती आहे. राज्यनिर्मितीचा क्षण महत्वाचा. माझा त्यावेळी जन्मही झाला नव्हता. पण रोजगार हमी योजनेसारखा महत्वाचा कायदा महाराष्ट्रातून निर्माण झाला, तो दिवस सुवर्णाक्षरांचा. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाला तोही असाच संस्मरणीय. सेवा हमी कायद्याची मुहुर्तमेढ करणारा दिवसही सुवर्णक्षरांनी कोरावा असाच. कोयनेतील लेकटॅपिंगचा क्षणही मोलाचाच. आज राज्याच्या साठीचा हिरेजडित पाढा वाचताना मला स्मृतीकोशात साठवलेला एक क्षण तर आवर्जून आठवतोच आठवतो : दुष्काळी भागात लोकसहभागातून खणलेल्या कित्येक किलोमीटरच्या खड्ड्यात पावसाने हजेरी लावताच गंगा अवतीर्ण झाली तो. पाणी हेच जीवन आहे अन् महाराष्ट्रात पाणी आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

महाराष्ट्राच्या सामर्थ्याविषयी देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पाहा! भारतासारख्या विशाल देशाचा महाराष्ट्र मुकुटमणी आहे. राज्याच्या विकासात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे योगदान दिले आहे. भाजपचे ते महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री.आज महाराष्ट्राकडे अन्य राज्ये आदराने बघतात. जगातल्या पुढारलेल्या देशांनाही मागे टाकणारा जीडीपी दर अन् विकास महाराष्ट्राला साधायचा आहे. महाराष्ट्राविषयी आपल्या भावना त्यांनी सकाळच्या प्रतिनिधी मृणालिनी नानिवडेकर यांच्याशी बोलताना व्यक्त केल्या... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप प्रश्‍न - हीरक महोत्सवी वाटचालीत महाराष्ट्राने काय कमावले आहे? उत्तर - देशातल्या सर्व राज्यांमध्ये खऱ्या अर्थाने महान ठरणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र हा आपला लौकीक. बाहेर वावरताना तर तो अधिक प्रकर्षाने जाणवतो. योग्य आणि अचूक व प्रवाही निर्णय, कालसुसंगत धोरणे अन् या समीकरणांना वेग देणारे गतीमान प्रशासन ही महाराष्ट्राची 60 वर्षातील कमाई आहे. सकल उत्पन्न वाढते ठेवणे, सामाजिक क्षेत्रात पथदर्शी निर्णय घेणे हे सामूहिक यश, तर सर्वाधिक भारतरत्ने जन्माला घालणारे राज्य ही त्या-त्या व्यक्तींच्या प्रयत्नांनी मिळालेले ललामभूत कोंदण. आज साठ वर्षांचा टप्पा गाठताना महाराष्ट्राचे हे अभिमानगीत आनंद देतेय.  पुढच्या दहा-वीस वर्षात महाराष्ट्र कुठे असायला हवा?     भारतातल्या या राज्याशी बरोबरी करायची ईर्षा अन्य राज्यांमध्येच नव्हे, तर बाहेरच्या देशांमध्येही निर्माण व्हायला हवी. जरा नीट सांगा ना काय म्हणायचे आहे ते?     आजच्या परिस्थितीतच सांगतो. सध्या कोरोनाचा कहर माजलाय. चीनमधील गुंतवणूक तेथेच मर्यादित न ठेवता ती बाहेरही विस्तारीत ठेवावी, असा बड्या कंपन्यांचा प्रयास आहे. जपानने तसे जाहीरही केलंय. संकट नेहमीच संधी घेवून येत असते. ही नवे पडाव शोधणारी गुंतवणूक महाराष्ट्राचे सर्वात मोठे शक्‍तीस्थळ ठरू शकते. ही गुंतवणूक आज युरोपात जावू शकत नाही. तेथील समस्या जगजाहीर आहेत. आफ्रिका अजून या संधी घेण्याच्या तयारीत नाही. त्यामुळेच ही गुंतवणूक आशियात येणार हे सरळ आहे. व्हिएतनामसारखे देश त्याचा लाभ घेण्यासाठी झटत आहेत. महाराष्ट्राने या संदर्भात पुढाकार घेतला, ईज ऑफ डुईंग बिझिनेसचे वातावरण निर्माण केले तर स्वप्नभूमीच्या शोधातल्या कंपन्यांना महाराष्ट्र तीर्थक्षेत्र वाटू शकेल.  प्रगतीच्या वाटेवरची आव्हाने कोणती?     आव्हानेही बरीच आहेत. जगाच्या रचना वारंवार बदलत असतात, त्यामुळे संपन्न प्रदेशांसमोरही आव्हाने असतातच. महाराष्ट्रात विकास सर्वदूर पसरलेला नाही. तो काही टापूतच मर्यादित आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये विकास पोहोचवण्याचे आव्हान आहे. त्यावर सर्व पक्षांनी एकत्रित तोडगा काढावा. दुसरे मोठे अन् सर्वाधिक चिंतेचे आव्हान म्हणजे शाश्‍वत शेतीचे. सिंचन मर्यादित. त्यातच वातावरणात सध्या होत असलेले अनाकलनीय बदल. पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेणारी क्‍लायमेट रिझीलियन्ट शेतीव्यवस्था निर्माण करणे आव्हान आहे. शेतीत कालसुसंगत बदल युद्धपातळीवर करावेत. पाण्याचे नियोजन हेही मोठे आव्हान. तुटीच्या खोऱ्यांचे जलनियोजन करण्यासाठी जास्त पाणी असलेल्या प्रदेशातून पाणी अभाव्याच्या प्रदेशात वळवावे लागेल. आपण राज्य म्हणून हे करू शकलो तर प्रगतीची फळे महाराष्ट्रात सर्वदूर पसरतील. संघराज्यीय ढाच्यात राज्याराज्यांत स्पर्धा असतेच, ती निकोप असली की झाले. आयटीचा विचार केला तर ही स्पर्धा तेलंगणा, कर्नाटक, आंध्रशी आहे. उद्योगांबाबत बोलायचे तर गुजरात, तमिळनाडूशी, आरोग्य व्यवस्थापन अन् डिझास्टर मॅनेजमेंटबाबत बोलायचे तर केरळ, ओडिशाशी  स्पर्धा आहे. महाराष्ट्राने सर्व क्षेत्रात आघाडी मिळवावी.  महाराष्ट्राच्या आजवरच्या वाटचालीतले सर्वात महत्वाचे क्षण कोणते?     अनेक आहेत. पण, सिंहावलोकन करताना आठवायच्या त्या चांगल्या बाबी. पायाभूत सुविधांसाठी आज सुरू असलेले श्रम आपली संपत्ती आहे. राज्यनिर्मितीचा क्षण महत्वाचा. माझा त्यावेळी जन्मही झाला नव्हता. पण रोजगार हमी योजनेसारखा महत्वाचा कायदा महाराष्ट्रातून निर्माण झाला, तो दिवस सुवर्णाक्षरांचा. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाला तोही असाच संस्मरणीय. सेवा हमी कायद्याची मुहुर्तमेढ करणारा दिवसही सुवर्णक्षरांनी कोरावा असाच. कोयनेतील लेकटॅपिंगचा क्षणही मोलाचाच. आज राज्याच्या साठीचा हिरेजडित पाढा वाचताना मला स्मृतीकोशात साठवलेला एक क्षण तर आवर्जून आठवतोच आठवतो : दुष्काळी भागात लोकसहभागातून खणलेल्या कित्येक किलोमीटरच्या खड्ड्यात पावसाने हजेरी लावताच गंगा अवतीर्ण झाली तो. पाणी हेच जीवन आहे अन् महाराष्ट्रात पाणी आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3f5JZUZ
Read More
महाराष्ट्र दिन : शाहिरांचा बुलंद आवाज, कोल्हापूरने दिला अभ्यासाचा साज...!

कोल्हापूर - संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला खऱ्या अर्थाने खमका आवाज दिला तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतील शाहिरांनी. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख असोत शाहीर आत्माराम पाटील असोत किंवा कोल्हापूरचे लोकशाहीर द. ना. गव्हाणकर अशा कैक शाहिरांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र, या शाहिरांच्या पोवाड्यांचा विविधांगी अभ्यास केला तो येथील सध्याच्या शाहिरांनी. विविध पोवाड्यांचा केवळ संगीतात्मकच नव्हे तर रूपकात्मक अर्थही समजून सांगण्यात इथल्या शाहिरांनी पुढाकार घेतला आणि या नसांनसांत रोमांच उभे करणाऱ्या या पोवाड्यांतील विविध पैलू सर्वांसमोर आणले. हिरकमहोत्सवी महाराष्ट्र दिन साजरा करत असताना आता नव्या पिढीसाठी हा अभ्यास नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.

- मैनेची पर्वा
नाही कुणा राहिली...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीतून साकारलेली आणि आजही साऱ्यांनाच तितकीच अंतर्मुख करणारी 'माझी मैना गावावर राहिली' ही छक्कड. वरवर पहाता ही एक प्रेमकथा वाटत असली तरी ती संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि तत्कालीन एकूणच परिस्थितीवर भाष्य करताना ती मराठी माणसांची तळमळ अधोरेखित करते. अर्थात त्यासाठी मैनेचे रूपक अण्णाभाऊंनी वापरले होते. मात्र, नंतरच्या काळात ती केवळ मनोरंजनासाठीची एक प्रेमकथा असल्याचा समज वाढू लागला आणि अशा काळात या रचनेचा खरा अर्थ समजून सांगण्याची वेळ आल्यानंतर ही रचना समजून सांगण्यासाठी शिवशाहीर डॉ. राजू राऊत यांनी त्यावर आधारित दुसरी रचना लिहिली आणि ती सर्वांसमोर आणली. आजही त्यांची ही "माझी मैना गावावर राहिली. तिची पर्वा कुणा नाही राहिली' ही रचना सर्वत्र नव्या पिढीसाठी हमखास सादर होते.

- गोंधळ संयुक्त
महाराष्ट्र चळवळीचा...

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शाहीर आत्माराम पाटील यांचा "संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा...' हा गोंधळ प्रचंड गाजला. अनेक दीर्घ पोवाडेही त्यांनी लिहिले. मात्र, नंतरच्या काळात त्यांच्या या शाहिरीचा तौलनिक अभ्यास संशोधनातून पहिल्यांदा पुढे आणला तो शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी यांनी. शाहीरी पोवाडा या पारंपरिक बाजाला कुठेही धक्का न लावता आत्माराम पाटील यांनी नवीन पोवाड्याचा बाज निर्माण केला. स्वतःची स्वतंत्र शैली, भूमिका घेवून त्यांनी शाहिरी केली. त्यांनी कुठल्याही प्रकारचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण न घेताही आणि फारसे शालेय शिक्षण झाले नसतानाही त्यांच्या रचना आणि सादरीकरणात शास्त्रीय संगीताचा कसा प्रभावी वापर झाला आहे, अशा विविध अंगांनी डॉ. नायकवडी यांनी हा अभ्यास मांडला आहे.

आजरेकर एकवटले

लोकशाहीर द. ना. गव्हाणकर यांचे मुळगाव आजरा तालुक्‍यातील महागोंड. राजाराम कॉलेजमधून इंग्रजी विषयात 1935 साली ते पदवीधर झालेले. नोकरीनिमित्त हे मुंबईला गेले आणि पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी झाले. त्यांच्या एकूणच कार्याची माहिती नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने समस्त आजरेकर एकवटले असून प्रत्येक वर्षी गव्हाणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.  

 

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

महाराष्ट्र दिन : शाहिरांचा बुलंद आवाज, कोल्हापूरने दिला अभ्यासाचा साज...! कोल्हापूर - संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला खऱ्या अर्थाने खमका आवाज दिला तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतील शाहिरांनी. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख असोत शाहीर आत्माराम पाटील असोत किंवा कोल्हापूरचे लोकशाहीर द. ना. गव्हाणकर अशा कैक शाहिरांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र, या शाहिरांच्या पोवाड्यांचा विविधांगी अभ्यास केला तो येथील सध्याच्या शाहिरांनी. विविध पोवाड्यांचा केवळ संगीतात्मकच नव्हे तर रूपकात्मक अर्थही समजून सांगण्यात इथल्या शाहिरांनी पुढाकार घेतला आणि या नसांनसांत रोमांच उभे करणाऱ्या या पोवाड्यांतील विविध पैलू सर्वांसमोर आणले. हिरकमहोत्सवी महाराष्ट्र दिन साजरा करत असताना आता नव्या पिढीसाठी हा अभ्यास नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. - मैनेची पर्वा नाही कुणा राहिली... लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीतून साकारलेली आणि आजही साऱ्यांनाच तितकीच अंतर्मुख करणारी 'माझी मैना गावावर राहिली' ही छक्कड. वरवर पहाता ही एक प्रेमकथा वाटत असली तरी ती संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि तत्कालीन एकूणच परिस्थितीवर भाष्य करताना ती मराठी माणसांची तळमळ अधोरेखित करते. अर्थात त्यासाठी मैनेचे रूपक अण्णाभाऊंनी वापरले होते. मात्र, नंतरच्या काळात ती केवळ मनोरंजनासाठीची एक प्रेमकथा असल्याचा समज वाढू लागला आणि अशा काळात या रचनेचा खरा अर्थ समजून सांगण्याची वेळ आल्यानंतर ही रचना समजून सांगण्यासाठी शिवशाहीर डॉ. राजू राऊत यांनी त्यावर आधारित दुसरी रचना लिहिली आणि ती सर्वांसमोर आणली. आजही त्यांची ही "माझी मैना गावावर राहिली. तिची पर्वा कुणा नाही राहिली' ही रचना सर्वत्र नव्या पिढीसाठी हमखास सादर होते. - गोंधळ संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा... संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शाहीर आत्माराम पाटील यांचा "संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा...' हा गोंधळ प्रचंड गाजला. अनेक दीर्घ पोवाडेही त्यांनी लिहिले. मात्र, नंतरच्या काळात त्यांच्या या शाहिरीचा तौलनिक अभ्यास संशोधनातून पहिल्यांदा पुढे आणला तो शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी यांनी. शाहीरी पोवाडा या पारंपरिक बाजाला कुठेही धक्का न लावता आत्माराम पाटील यांनी नवीन पोवाड्याचा बाज निर्माण केला. स्वतःची स्वतंत्र शैली, भूमिका घेवून त्यांनी शाहिरी केली. त्यांनी कुठल्याही प्रकारचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण न घेताही आणि फारसे शालेय शिक्षण झाले नसतानाही त्यांच्या रचना आणि सादरीकरणात शास्त्रीय संगीताचा कसा प्रभावी वापर झाला आहे, अशा विविध अंगांनी डॉ. नायकवडी यांनी हा अभ्यास मांडला आहे. आजरेकर एकवटले लोकशाहीर द. ना. गव्हाणकर यांचे मुळगाव आजरा तालुक्‍यातील महागोंड. राजाराम कॉलेजमधून इंग्रजी विषयात 1935 साली ते पदवीधर झालेले. नोकरीनिमित्त हे मुंबईला गेले आणि पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी झाले. त्यांच्या एकूणच कार्याची माहिती नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने समस्त आजरेकर एकवटले असून प्रत्येक वर्षी गव्हाणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.       News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VSHgH2
Read More
समाजकारण राजकारण - शोषितांना न्याय; देशात आघाडी

महाराष्ट्राने साठ वर्षांच्या वाटचालीत समाजातील शोषितांना न्याय देण्यापासून ते प्रगल्भ राजकारण करून देशात प्रगतीचा नवा लौकीक आणि आदर्श निर्माण केला. प्रशासनात आघाडी घेत कल्याणकारी राज्य निर्माण केले.

असा बदलत गेला महाराष्ट्र
वर्ष                                         सन 1962         सन 2019           
सर्वसाधारण मतदारसंघ             217         234
अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ      33                  29
अनुसूचित जमातींसाठी राखीव मतदारसंघ        14                 25
एकूण विधानसभा मतदारसंघ                    264                 288
मतदान                                       60.36 टक्के            61.1 टक्के
पुरुष मतदारांची टक्केवारी                      65.17                62.77
महिला मतदारांची टक्केवारी                    54.17                59.26
एकूण मतदार                                1,93,95,795    8,98,38,267
हक्क बजावलेले मतदार                     1,17,०6,674    5,48,87,०49
एकूण उमेदवारांची संख्या                     1,161    3,237
पुरुष उमेदवारांची संख्या                      1,125       2,997
महिला उमेदवारांची संख्या                        36                   239
विजयी पुरुष उमेदवारांची संख्या                   251                264
विजयी महिला उमेदवारांची संख्या                 13                 24        

पूर्ण शहरी 92 आणि निमशहरी 31 अशी शहरी तोंडवळ्याच्या विधानसभा मतदारसंघांची संख्या 123, तर ग्रामीण मतदारसंघ 165. 

गेल्या तीन दशकांमध्ये शहरी, निमशहरी विधानसभा मतदारसंघांमध्ये वाढ. 

शहरी आणि निमशहरी विधानसभा मतदारसंघांची वाढती संख्या, सेवा क्षेत्राचा विकास, 18 वर्षांच्या तरुणाला मतदानाचा हक्क मिळाल्याने तरुण मतदारसंख्येत झालेली वाढ अशा साऱ्या कारणांमुळे काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव राजकारणावर राहिलेला नाही. काँग्रेसचे विभाजन होऊन राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली स्थापना हेही त्यामागचे कारण.

महाराष्ट्रात शहरी लोकसंख्येने निम्मा भाग (45.22 टक्के) व्यापला आहे. स्वाभाविकच शहरे राजकारणाची केंद्रे झालीत.

शहरी लोकसंख्या अधिक असलेल्या 20 शहरांपैकी मुंबई, पुणे, नवी मुंबई, नागपूर ही महाराष्ट्रातील शहरे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

समाजकारण राजकारण - शोषितांना न्याय; देशात आघाडी महाराष्ट्राने साठ वर्षांच्या वाटचालीत समाजातील शोषितांना न्याय देण्यापासून ते प्रगल्भ राजकारण करून देशात प्रगतीचा नवा लौकीक आणि आदर्श निर्माण केला. प्रशासनात आघाडी घेत कल्याणकारी राज्य निर्माण केले. असा बदलत गेला महाराष्ट्र वर्ष                                         सन 1962         सन 2019            सर्वसाधारण मतदारसंघ             217         234 अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ      33                  29 अनुसूचित जमातींसाठी राखीव मतदारसंघ        14                 25 एकूण विधानसभा मतदारसंघ                    264                 288 मतदान                                       60.36 टक्के            61.1 टक्के पुरुष मतदारांची टक्केवारी                      65.17                62.77 महिला मतदारांची टक्केवारी                    54.17                59.26 एकूण मतदार                                1,93,95,795    8,98,38,267 हक्क बजावलेले मतदार                     1,17,०6,674    5,48,87,०49 एकूण उमेदवारांची संख्या                     1,161    3,237 पुरुष उमेदवारांची संख्या                      1,125       2,997 महिला उमेदवारांची संख्या                        36                   239 विजयी पुरुष उमेदवारांची संख्या                   251                264 विजयी महिला उमेदवारांची संख्या                 13                 24         पूर्ण शहरी 92 आणि निमशहरी 31 अशी शहरी तोंडवळ्याच्या विधानसभा मतदारसंघांची संख्या 123, तर ग्रामीण मतदारसंघ 165.  गेल्या तीन दशकांमध्ये शहरी, निमशहरी विधानसभा मतदारसंघांमध्ये वाढ.  शहरी आणि निमशहरी विधानसभा मतदारसंघांची वाढती संख्या, सेवा क्षेत्राचा विकास, 18 वर्षांच्या तरुणाला मतदानाचा हक्क मिळाल्याने तरुण मतदारसंख्येत झालेली वाढ अशा साऱ्या कारणांमुळे काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव राजकारणावर राहिलेला नाही. काँग्रेसचे विभाजन होऊन राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली स्थापना हेही त्यामागचे कारण. महाराष्ट्रात शहरी लोकसंख्येने निम्मा भाग (45.22 टक्के) व्यापला आहे. स्वाभाविकच शहरे राजकारणाची केंद्रे झालीत. शहरी लोकसंख्या अधिक असलेल्या 20 शहरांपैकी मुंबई, पुणे, नवी मुंबई, नागपूर ही महाराष्ट्रातील शहरे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3d6FRCa
Read More