'धरण उशाला तरीही कोरड घशाला'...पाण्यासाठी 'इथं' रोजच होतेय फरपट! नाशिक : (गिलाणे) नांदगाव शहर व 56 खेडी नळ पाणीपुरवठा योजनेतून गिलाणे व परिसरातील खेड्यांना होणारा पाणीपुरवठा तांत्रिक कारणामुळे व जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तब्बल पंधरा दिवसांपासून ठप्प आहे. गिरणा धरण परिसरातील गावांची अवस्था धरण उशाला आणि कोरड घशाला अशी झाली आहे. कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असतांना पाण्यासाठी महिलांना दाहीदिशा पायपीट करण्याची नामुष्की आल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. महिलांची पाण्यासाठी पायपीट  56 खेडी योजनेची कमकुवत असलेली पाईपलाईन फुटण्याच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. या कामाच्या दुरुस्तीसाठी जीवन प्राधिकरणाकडून हेतुपुरस्कर दिरंगाई होत असते. त्यामुळे अनेकदा पाणीपुरवठा विस्कळीत स्वरूपाचा होत असतो. त्यातच पाणीपुरवठा पूर्वसूचना न देता अनेक दिवसांपर्यंत बंद केला जातो. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून गिलाणे व परिसरातील गावांचा पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प झाल्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. असंख्य खेडयांसाठी जीवनदायीनी ठरलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नादगाव शहर व 56 खेडी नळ पाणीपुरोवठा योजना अनेक वर्षांपासून शेवटची घटका मोजत आहे.  नियमित पाणी पुरवठ्याची मागणी मध्यंतरी जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनिषाताई पवार यांच्या अथक प्रयत्नातून या योजनेच्या नुतनीकरणासाठी 100 कोटींचा निधी मंजूरही झाला आहे. परंतु अद्यापपर्यंत या योजनेत कुठलीच सुधारणा होत नसल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लॉकडाऊनच्या काळात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच तीव्र पाणीटंचाईमुळे महिला व अबालवृद्धांना पाण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा पायपीट करावी लागत आहे. वरिष्ठांनी तातडीने या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन पाणी पुरवठा नियमित करावा अशी मागणी परिसरातून होत आहे. हेही वाचा > धक्कादायक! चक्क डॉक्टरकडूनच परिसरात कोरोनाबाधित रुग्ण असल्याची खोटी माहीती? लॉकडाऊनच्या काळात विस्कळीत स्वरूपाचा पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. - भाऊसाहेब आहिरे, अध्यक्ष जाणताराजा मंडळ, गिलाणे हेही वाचा > गावी परतल्याचे हसू चेहऱ्यावरच आटले अन् घरात पाऊल टाकायच्या आधीच वेशीवर क्वारंटाईन! कोरोना संसर्गसारख्या गंभीर परिस्थितीत पाण्यासाठी दूरवर होणारी पायपीट महिलांसाठी अत्यंत त्रासदायक असून तातडीने पाणीपुरवठा पूर्ववत व्हावा हीच अपेक्षा. - सुरेखा पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्या, गिलाणे हेही वाचा > हूश्श! नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास...अखेर 'त्या' नोटाचं उकललं गूढ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, May 1, 2020

'धरण उशाला तरीही कोरड घशाला'...पाण्यासाठी 'इथं' रोजच होतेय फरपट! नाशिक : (गिलाणे) नांदगाव शहर व 56 खेडी नळ पाणीपुरवठा योजनेतून गिलाणे व परिसरातील खेड्यांना होणारा पाणीपुरवठा तांत्रिक कारणामुळे व जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तब्बल पंधरा दिवसांपासून ठप्प आहे. गिरणा धरण परिसरातील गावांची अवस्था धरण उशाला आणि कोरड घशाला अशी झाली आहे. कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असतांना पाण्यासाठी महिलांना दाहीदिशा पायपीट करण्याची नामुष्की आल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. महिलांची पाण्यासाठी पायपीट  56 खेडी योजनेची कमकुवत असलेली पाईपलाईन फुटण्याच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. या कामाच्या दुरुस्तीसाठी जीवन प्राधिकरणाकडून हेतुपुरस्कर दिरंगाई होत असते. त्यामुळे अनेकदा पाणीपुरवठा विस्कळीत स्वरूपाचा होत असतो. त्यातच पाणीपुरवठा पूर्वसूचना न देता अनेक दिवसांपर्यंत बंद केला जातो. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून गिलाणे व परिसरातील गावांचा पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प झाल्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. असंख्य खेडयांसाठी जीवनदायीनी ठरलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नादगाव शहर व 56 खेडी नळ पाणीपुरोवठा योजना अनेक वर्षांपासून शेवटची घटका मोजत आहे.  नियमित पाणी पुरवठ्याची मागणी मध्यंतरी जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनिषाताई पवार यांच्या अथक प्रयत्नातून या योजनेच्या नुतनीकरणासाठी 100 कोटींचा निधी मंजूरही झाला आहे. परंतु अद्यापपर्यंत या योजनेत कुठलीच सुधारणा होत नसल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लॉकडाऊनच्या काळात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच तीव्र पाणीटंचाईमुळे महिला व अबालवृद्धांना पाण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा पायपीट करावी लागत आहे. वरिष्ठांनी तातडीने या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन पाणी पुरवठा नियमित करावा अशी मागणी परिसरातून होत आहे. हेही वाचा > धक्कादायक! चक्क डॉक्टरकडूनच परिसरात कोरोनाबाधित रुग्ण असल्याची खोटी माहीती? लॉकडाऊनच्या काळात विस्कळीत स्वरूपाचा पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. - भाऊसाहेब आहिरे, अध्यक्ष जाणताराजा मंडळ, गिलाणे हेही वाचा > गावी परतल्याचे हसू चेहऱ्यावरच आटले अन् घरात पाऊल टाकायच्या आधीच वेशीवर क्वारंटाईन! कोरोना संसर्गसारख्या गंभीर परिस्थितीत पाण्यासाठी दूरवर होणारी पायपीट महिलांसाठी अत्यंत त्रासदायक असून तातडीने पाणीपुरवठा पूर्ववत व्हावा हीच अपेक्षा. - सुरेखा पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्या, गिलाणे हेही वाचा > हूश्श! नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास...अखेर 'त्या' नोटाचं उकललं गूढ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2KTtDRC

No comments:

Post a Comment