जोतिबा डोंगरावर यंदा वावर जत्रेच्या जोड्या आल्याच नाहित  जोतिबा डोंगर -  श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर (ता. पन्हाळा)  येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा यंदा कोरोनामुळे भाविकाविनाच पार पडली. आता तर वैशाख महिना सुरू झाला. डोंगरावर नव वधू-वरांची वावर जत्रा काढण्यासाठी या महिन्यात नव दापत्यांची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. पण या वावर जत्रेसाठी यंदा कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे.  दरवर्षी वैशाखात भरणाऱ्या या यात्रेला तुफान येणार नाही. वावर जत्रेचा काळाबरोबर वेशही बदललेला आहे. वावर जत्रेसाठी हिरवागार शालू नेसलेली वधू , नेहरू शर्ट, टोपी धोतर अथवा विजार घातलेला वर असा पेहराव असे पूर्वीच्या काळचे चित्र होते. ते वधू वर आज उतारवयात आहेत. त्यांची मुले, नातवंडे आता वावर जत्रेसाठी येत असून त्यांनी नव्या युगाशी गट्टी केलेली दिसत आहे. शालू ऐवजी जीन पँट त्यावर रंगीत टॉप घातलेल्या वधू  तर जोधपुरी सलवार कुर्ता झब्बा पायजमा, फरची टोपी, तयार फेटा घातलेला वर-वधू आता आलिशान मोटारीतून येताना दिसत आहेत. जोतिबा डोंगरावर वावर जत्रा विधी करण्यासाठी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गुजरात या राज्यातून  हजारोच्या संख्येने भाविक येताना दिसतात. यामध्ये नवदापत्य वधू-वरांची संख्या अधिक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात वावर जत्रा या विधिस मोठे धार्मिक महत्त्व असून उच्चशिक्षित कुटुंबेही हा विधी करताना दिसतात. डोंगरावर वावर जत्रा काढताना हिरवा शालू परिधान केलेली वधू सूट घातलेल्या वर असे चित्र मंदिर परिसरात दिसत असते. लग्न सोहळा झाल्यावर वधु वर  श्री ज्योतिबाच्या दर्शनासाठी येतात. यावेळी स्थानिक पुजाऱ्याकडून नवीन वधू-वराची वावर जत्रा विधी केला जातो. यासाठी पुजारी नवीन वधू-वरांची जोतिबाच्या मंदिरात पुन्हा देवाच्या साक्षीने लग्न गाठ बांधून पानसुपारीचा वीडा ठेवून जोडीने नमस्कार करून आपल्या कुलदैवताला आपल्या जोडीदाराची नावे सांगून लग्न सोहळ्याच्या निमित्ताने देवास संपूर्ण पोषाख अर्पण करतात. काही वधुवर आपल्या इच्छेने देवास जोडीने दक्षिणा देतात. व्यवहार या शब्दापासून पुढे वावर हा शब्द रूढ झाला आणि वावर जत्रा करून जोडीने आपल्या कुलदैवता पुढे आमच्या संसाराला बळकटी दे आमच्या आयुष्याची सुरुवात तुझ्या दारातून सुरू करतो आमचा संसार सुखी ठेव, असा आशीर्वाद मागतात. येथील मंदिर परिसरात डवरी लोकांकडून लग्नाचा गोंधळ घालण्याचा विधी होतो. वावरजत्रा झाल्यानंतर नववधु  श्री यमाई देवीच्या दर्शनासाठी जातात विधिवत दर्शन घेऊन मंदिराच्या मागील बाजूस लहान दगडांच्या, खापराच्या, उतरंडी लावून नवजीवनाची सुरवात तुझ्या दारातून करतो, अशी प्रार्थना करून यमाई देवीस मीठ-पीठ वाहतात ओटी भरतात. आजच्या धकाधकीच्या जगात वावर जत्रा  या विधीस पारंपारीक महत्व आहे. राज्यातील विविध भागातून तसेच कर्नाटकातून ही नवदांपत्ये डोंगरावर येतात आणि  या वावर जत्रेला डोंगरावर दर वर्षी तुफान आलेले दिसते. यंदा मात्र डोंगरावर १५ मार्चपासून मंदिर बंद आहे. भाविकांना येण्यास बंदी आहे. त्यामुळे वावर जत्रेसाठी नववधुवरांना येण्याची अडचण निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव नष्ट झाल्यावर डोंगर गर्दीने फूलणार आहे . हे पण वाचा - 'ती' कार सांगली हद्दीत घुसली, पोलिसांनी पाठलाग केला तर त्यात दिसलं वेगळंच...  खेटे झाल्यापासून डोंगरावर भाविक आलेले नाहीत. डोंगर अगदी शांत शांत आहे. वैशाख महिना सुरू आहे. वावर जत्रा यंदा कोरोना साथीमुळे आलेल्या नाहीत. नेहमी गजबजलेली पुजाऱ्यांची घरे कोरोनामुळे रिकामी दिसत आहेत.  -बाळकृष्ण सांगळे, पुजारी जोतिबा डोंगर  हे पण वाचा -  गुड न्यूज : भारतातच तयार होणार कोरोनाची लस!                                                       News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, May 1, 2020

जोतिबा डोंगरावर यंदा वावर जत्रेच्या जोड्या आल्याच नाहित  जोतिबा डोंगर -  श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर (ता. पन्हाळा)  येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा यंदा कोरोनामुळे भाविकाविनाच पार पडली. आता तर वैशाख महिना सुरू झाला. डोंगरावर नव वधू-वरांची वावर जत्रा काढण्यासाठी या महिन्यात नव दापत्यांची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. पण या वावर जत्रेसाठी यंदा कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे.  दरवर्षी वैशाखात भरणाऱ्या या यात्रेला तुफान येणार नाही. वावर जत्रेचा काळाबरोबर वेशही बदललेला आहे. वावर जत्रेसाठी हिरवागार शालू नेसलेली वधू , नेहरू शर्ट, टोपी धोतर अथवा विजार घातलेला वर असा पेहराव असे पूर्वीच्या काळचे चित्र होते. ते वधू वर आज उतारवयात आहेत. त्यांची मुले, नातवंडे आता वावर जत्रेसाठी येत असून त्यांनी नव्या युगाशी गट्टी केलेली दिसत आहे. शालू ऐवजी जीन पँट त्यावर रंगीत टॉप घातलेल्या वधू  तर जोधपुरी सलवार कुर्ता झब्बा पायजमा, फरची टोपी, तयार फेटा घातलेला वर-वधू आता आलिशान मोटारीतून येताना दिसत आहेत. जोतिबा डोंगरावर वावर जत्रा विधी करण्यासाठी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गुजरात या राज्यातून  हजारोच्या संख्येने भाविक येताना दिसतात. यामध्ये नवदापत्य वधू-वरांची संख्या अधिक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात वावर जत्रा या विधिस मोठे धार्मिक महत्त्व असून उच्चशिक्षित कुटुंबेही हा विधी करताना दिसतात. डोंगरावर वावर जत्रा काढताना हिरवा शालू परिधान केलेली वधू सूट घातलेल्या वर असे चित्र मंदिर परिसरात दिसत असते. लग्न सोहळा झाल्यावर वधु वर  श्री ज्योतिबाच्या दर्शनासाठी येतात. यावेळी स्थानिक पुजाऱ्याकडून नवीन वधू-वराची वावर जत्रा विधी केला जातो. यासाठी पुजारी नवीन वधू-वरांची जोतिबाच्या मंदिरात पुन्हा देवाच्या साक्षीने लग्न गाठ बांधून पानसुपारीचा वीडा ठेवून जोडीने नमस्कार करून आपल्या कुलदैवताला आपल्या जोडीदाराची नावे सांगून लग्न सोहळ्याच्या निमित्ताने देवास संपूर्ण पोषाख अर्पण करतात. काही वधुवर आपल्या इच्छेने देवास जोडीने दक्षिणा देतात. व्यवहार या शब्दापासून पुढे वावर हा शब्द रूढ झाला आणि वावर जत्रा करून जोडीने आपल्या कुलदैवता पुढे आमच्या संसाराला बळकटी दे आमच्या आयुष्याची सुरुवात तुझ्या दारातून सुरू करतो आमचा संसार सुखी ठेव, असा आशीर्वाद मागतात. येथील मंदिर परिसरात डवरी लोकांकडून लग्नाचा गोंधळ घालण्याचा विधी होतो. वावरजत्रा झाल्यानंतर नववधु  श्री यमाई देवीच्या दर्शनासाठी जातात विधिवत दर्शन घेऊन मंदिराच्या मागील बाजूस लहान दगडांच्या, खापराच्या, उतरंडी लावून नवजीवनाची सुरवात तुझ्या दारातून करतो, अशी प्रार्थना करून यमाई देवीस मीठ-पीठ वाहतात ओटी भरतात. आजच्या धकाधकीच्या जगात वावर जत्रा  या विधीस पारंपारीक महत्व आहे. राज्यातील विविध भागातून तसेच कर्नाटकातून ही नवदांपत्ये डोंगरावर येतात आणि  या वावर जत्रेला डोंगरावर दर वर्षी तुफान आलेले दिसते. यंदा मात्र डोंगरावर १५ मार्चपासून मंदिर बंद आहे. भाविकांना येण्यास बंदी आहे. त्यामुळे वावर जत्रेसाठी नववधुवरांना येण्याची अडचण निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव नष्ट झाल्यावर डोंगर गर्दीने फूलणार आहे . हे पण वाचा - 'ती' कार सांगली हद्दीत घुसली, पोलिसांनी पाठलाग केला तर त्यात दिसलं वेगळंच...  खेटे झाल्यापासून डोंगरावर भाविक आलेले नाहीत. डोंगर अगदी शांत शांत आहे. वैशाख महिना सुरू आहे. वावर जत्रा यंदा कोरोना साथीमुळे आलेल्या नाहीत. नेहमी गजबजलेली पुजाऱ्यांची घरे कोरोनामुळे रिकामी दिसत आहेत.  -बाळकृष्ण सांगळे, पुजारी जोतिबा डोंगर  हे पण वाचा -  गुड न्यूज : भारतातच तयार होणार कोरोनाची लस!                                                       News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2ybg0dQ

No comments:

Post a Comment