ऋषी कपूरच्या गाडीला कोल्हापुरात म्हशी आल्या आडव्या अन्‌... कोल्हापूर - चाळीस वर्षापूर्वीचा काळ. शिवाजी पेठेतील संध्यामठ गल्लीतून ऋषी कपूर यांची गाडी कांडगावकडे निघाली होती. वाटेत म्हशी आडव्या आल्या आणि त्यांनी गाडी थेट संध्यामठ गल्लीत वळवली. इतक्‍यात भोईटेंच्या घरातील पमा आणि इतर मुलींनी ऋषी कपूरऽऽऽ ऋषी कपूरऽऽऽ असा गलका केला आणि तितक्‍याच तिथे गल्लीतली सारी मंडळी जमा झाली...बॉलीवूडचे चॉकलेट हिरो म्हणून प्रदीर्घ काळ चित्रपट रसिकांच्या मनाला भुरळ घालणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज निधन झाले आणि त्यांच्या व एकूणच कपूर घराण्याविषयीच्या कोल्हापुरातील आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. दरम्यान, 1978 ला प्रदर्शित झालेल्या 'फुल खिले है गुलशन गुलशन' या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने ऋषी कपूर कोल्हापुरात होते. शहरासह कांडगाव (ता. करवीर), मरळी (ता. पन्हाळा) आदी परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. या चित्रपटात काही स्थानिक कलाकारांच्याही भूमिका होत्या. नगरसेविका सुरेखा शहा यांनी यांचीही या चित्रपटात भूमिका होती. शिवाजी पेठेतील आठवण शाहीर राजू राऊत आणि राजू ढेंगे यांनी शेअर केली. पाहा - ऋषी कपूर अन् कोल्हापुरचं अनोख नातं... पन्हाळा, मसाई परिसरात चित्रीकरणासाठी असायचा आग्रह... नाते तीन पिढ्यांचे... भारतीय सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या कपूर घराण्यावर कोल्हापूरकरांनी आणि कपूर घराण्याने कोल्हापूरवर नेहमीच भरभरून प्रेम केले. म्हणूनच 1996 साली 'प्रेम ग्रंथ' या चित्रपटाची निर्मिती करताना येथील पन्हाळा, मसाई परिसरात चित्रीकरणाचा आग्रह कपूर घराण्यातील सदस्यांनी धरला होता आणि त्यानुसार येथे चित्रीकरणही पूर्ण झाले. ग्रेट शोमन राज कपूर यांनी चेहऱ्याला पहिल्यांदा रंग लावला तो जयप्रभा स्टुडिओत. 'वाल्मिकी' या चित्रपटात नारद मुनींची भूमिका त्यांना चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी दिली होती. त्यापोटी मिळालेल्या पाच हजार रुपयांच्या मानधनातून त्यांनी आर. के. स्टुडिओसाठी चेंबूर येथे जागा खरेदी केली आणि त्यानंतर येथे उभारलेला हा स्टुडिओ ऋषी कपूर यांच्या एकूणच कारकिर्दीत मोलाचे योगदान देणारा ठरला. मुळात चाळीसच्या दशकात पृथ्वीराज कपूर यांचा मुक्कामच सहकुटुंब कोल्हापुरात होता. 'वाल्मीकी', 'महारथी कर्ण' आदी चित्रपटांची निर्मिती भालजींनी या काळात केली होती. त्यावेळी लहान असणाऱ्या राज कपूर यांच्यासह शशी कपूर यांच्याविषयीच्या आठवणी आजही येथील काही ज्येष्ठांच्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा तरळतात. महापालिकेत शिपाई म्हणून काम करणारे (कै.) संभाजी पाटील राज कपूर यांचे चाहते. त्यांनी पुढाकार घेऊन वाशी नाका येथे राज कपूर यांचा पुतळा उभारला असून, आजही पाटील कुटुंबीय व राज कपूर यांचे चाहते या पुतळ्याची देखभाल करतात. या पुतळ्याच्या अनावरमासाठी शशी कपूर स्वतः आले होते.       News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 30, 2020

ऋषी कपूरच्या गाडीला कोल्हापुरात म्हशी आल्या आडव्या अन्‌... कोल्हापूर - चाळीस वर्षापूर्वीचा काळ. शिवाजी पेठेतील संध्यामठ गल्लीतून ऋषी कपूर यांची गाडी कांडगावकडे निघाली होती. वाटेत म्हशी आडव्या आल्या आणि त्यांनी गाडी थेट संध्यामठ गल्लीत वळवली. इतक्‍यात भोईटेंच्या घरातील पमा आणि इतर मुलींनी ऋषी कपूरऽऽऽ ऋषी कपूरऽऽऽ असा गलका केला आणि तितक्‍याच तिथे गल्लीतली सारी मंडळी जमा झाली...बॉलीवूडचे चॉकलेट हिरो म्हणून प्रदीर्घ काळ चित्रपट रसिकांच्या मनाला भुरळ घालणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज निधन झाले आणि त्यांच्या व एकूणच कपूर घराण्याविषयीच्या कोल्हापुरातील आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. दरम्यान, 1978 ला प्रदर्शित झालेल्या 'फुल खिले है गुलशन गुलशन' या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने ऋषी कपूर कोल्हापुरात होते. शहरासह कांडगाव (ता. करवीर), मरळी (ता. पन्हाळा) आदी परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. या चित्रपटात काही स्थानिक कलाकारांच्याही भूमिका होत्या. नगरसेविका सुरेखा शहा यांनी यांचीही या चित्रपटात भूमिका होती. शिवाजी पेठेतील आठवण शाहीर राजू राऊत आणि राजू ढेंगे यांनी शेअर केली. पाहा - ऋषी कपूर अन् कोल्हापुरचं अनोख नातं... पन्हाळा, मसाई परिसरात चित्रीकरणासाठी असायचा आग्रह... नाते तीन पिढ्यांचे... भारतीय सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या कपूर घराण्यावर कोल्हापूरकरांनी आणि कपूर घराण्याने कोल्हापूरवर नेहमीच भरभरून प्रेम केले. म्हणूनच 1996 साली 'प्रेम ग्रंथ' या चित्रपटाची निर्मिती करताना येथील पन्हाळा, मसाई परिसरात चित्रीकरणाचा आग्रह कपूर घराण्यातील सदस्यांनी धरला होता आणि त्यानुसार येथे चित्रीकरणही पूर्ण झाले. ग्रेट शोमन राज कपूर यांनी चेहऱ्याला पहिल्यांदा रंग लावला तो जयप्रभा स्टुडिओत. 'वाल्मिकी' या चित्रपटात नारद मुनींची भूमिका त्यांना चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी दिली होती. त्यापोटी मिळालेल्या पाच हजार रुपयांच्या मानधनातून त्यांनी आर. के. स्टुडिओसाठी चेंबूर येथे जागा खरेदी केली आणि त्यानंतर येथे उभारलेला हा स्टुडिओ ऋषी कपूर यांच्या एकूणच कारकिर्दीत मोलाचे योगदान देणारा ठरला. मुळात चाळीसच्या दशकात पृथ्वीराज कपूर यांचा मुक्कामच सहकुटुंब कोल्हापुरात होता. 'वाल्मीकी', 'महारथी कर्ण' आदी चित्रपटांची निर्मिती भालजींनी या काळात केली होती. त्यावेळी लहान असणाऱ्या राज कपूर यांच्यासह शशी कपूर यांच्याविषयीच्या आठवणी आजही येथील काही ज्येष्ठांच्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा तरळतात. महापालिकेत शिपाई म्हणून काम करणारे (कै.) संभाजी पाटील राज कपूर यांचे चाहते. त्यांनी पुढाकार घेऊन वाशी नाका येथे राज कपूर यांचा पुतळा उभारला असून, आजही पाटील कुटुंबीय व राज कपूर यांचे चाहते या पुतळ्याची देखभाल करतात. या पुतळ्याच्या अनावरमासाठी शशी कपूर स्वतः आले होते.       News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2SlsFRZ

No comments:

Post a Comment