Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, April 1, 2020

होम क्वॉरंटाइनचे शिक्के अन गटागटाने बसून करताहेत चिअर्स

नगर ः कोरोनाविरोधी लढ्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याची संधी पाहून नेप्ती (ता. नगर) येथील हातभट्टी दारूचा व्यवसाय तेजीत चालू आहे. चक्क हातावर "होम क्वारंटाईन'चे शिक्के असलेले आसपासच्या गावातील मंडळी गटागटाने गावात येतात.

शिवारातील हातभट्टीची दारू तयार होत असल्याच्या ठिकाणांजवळच्या शेतात, झाडाखाली व बांधावर बसून ते दारू पित असतात. त्यामुळे या परिसरातील रहिवासी व ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. 

नेप्ती गावातील हातभट्टी दारूचे उत्पादन हा विषय काही नवा नाही. कित्येक वेळा या भट्ट्यांवर पोलिस व राज्य उत्पादन शुल्क खात्याने स्वतंत्रपणे व कधी-कधी संयुक्तपणे छापे घालून त्या उद्‌ध्वस्त केल्या आहेत. त्याची प्रसिद्धीही राज्यभर झाली. परंतु काही दिवसांतच ही परिस्थिती "जैसे थे' होते. त्यामागचे नेमके कारण पुढे येत नसले, तरी पोलिस व राज्य उत्पादनशुल्क दोन्ही संबंधित खात्यांशी हातभट्टीवाल्यांची असलेली "सलगी' मात्र लपून राहत नाही. 

हातभट्टीवाल्यांची गावात व परिसरात मोठी दहशत असल्याने त्यांच्याविरुद्ध बोलण्यास कोणीच धजावत नाही. "सकाळ'ने मात्र हा विषय वारंवार प्रकाशात आणला. त्या वेळी संबंधितांकडून तात्पुरती मलमपट्टी होते. परंतु जखम मात्र बरी होत नाही. परिणामी नेप्तीकरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. 
सध्या कोरोनाची मोठी दहशत ग्रामीण भागातही आहे. त्यामुळे सरकारच्या सूचनांप्रमाणे ग्रामीण भागातील मंडळीही काळजी घेत आहेत. परंतु त्यांच्या घरांच्या परिसरातच सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत हातभट्टीचा "लाभ' घेणाऱ्या बेवड्यांच्या त्रासाने ही मंडळी त्रासली आहेत. 

ग्रामस्थ सापडले दुहेरी पेचात 
कोरोनाविरोधी लढ्यात व्यस्त असल्याने पोलिसांचे हातभट्टीवाल्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. पोलिस व संबंधितांकडे तक्रार करावी तर हातभट्टीवाल्यांकडून धोक्‍याची अडचण ग्रामस्थांना वाटत आहे. तक्रार नाही केली, तर कोरोनाच्या संसर्गाच्या धोक्‍याबरोबरच बेवड्यांच्या त्रासामुळे महिला व मुलेही त्रस्त झालेली आहेत. अशा दुहेरी पेचात नेप्तीतील ग्रामस्थ सापडले आहेत. हातभट्ट्या बंद करायच्या नसतील, तर किमान या बेवड्यांचा त्रास तरी कमी करा, असे आर्जव करण्याशिवाय या मंडळींपुढे पर्याय नाही. 
---- 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

होम क्वॉरंटाइनचे शिक्के अन गटागटाने बसून करताहेत चिअर्स नगर ः कोरोनाविरोधी लढ्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याची संधी पाहून नेप्ती (ता. नगर) येथील हातभट्टी दारूचा व्यवसाय तेजीत चालू आहे. चक्क हातावर "होम क्वारंटाईन'चे शिक्के असलेले आसपासच्या गावातील मंडळी गटागटाने गावात येतात. शिवारातील हातभट्टीची दारू तयार होत असल्याच्या ठिकाणांजवळच्या शेतात, झाडाखाली व बांधावर बसून ते दारू पित असतात. त्यामुळे या परिसरातील रहिवासी व ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.  नेप्ती गावातील हातभट्टी दारूचे उत्पादन हा विषय काही नवा नाही. कित्येक वेळा या भट्ट्यांवर पोलिस व राज्य उत्पादन शुल्क खात्याने स्वतंत्रपणे व कधी-कधी संयुक्तपणे छापे घालून त्या उद्‌ध्वस्त केल्या आहेत. त्याची प्रसिद्धीही राज्यभर झाली. परंतु काही दिवसांतच ही परिस्थिती "जैसे थे' होते. त्यामागचे नेमके कारण पुढे येत नसले, तरी पोलिस व राज्य उत्पादनशुल्क दोन्ही संबंधित खात्यांशी हातभट्टीवाल्यांची असलेली "सलगी' मात्र लपून राहत नाही.  हातभट्टीवाल्यांची गावात व परिसरात मोठी दहशत असल्याने त्यांच्याविरुद्ध बोलण्यास कोणीच धजावत नाही. "सकाळ'ने मात्र हा विषय वारंवार प्रकाशात आणला. त्या वेळी संबंधितांकडून तात्पुरती मलमपट्टी होते. परंतु जखम मात्र बरी होत नाही. परिणामी नेप्तीकरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे.  सध्या कोरोनाची मोठी दहशत ग्रामीण भागातही आहे. त्यामुळे सरकारच्या सूचनांप्रमाणे ग्रामीण भागातील मंडळीही काळजी घेत आहेत. परंतु त्यांच्या घरांच्या परिसरातच सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत हातभट्टीचा "लाभ' घेणाऱ्या बेवड्यांच्या त्रासाने ही मंडळी त्रासली आहेत.  ग्रामस्थ सापडले दुहेरी पेचात  कोरोनाविरोधी लढ्यात व्यस्त असल्याने पोलिसांचे हातभट्टीवाल्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. पोलिस व संबंधितांकडे तक्रार करावी तर हातभट्टीवाल्यांकडून धोक्‍याची अडचण ग्रामस्थांना वाटत आहे. तक्रार नाही केली, तर कोरोनाच्या संसर्गाच्या धोक्‍याबरोबरच बेवड्यांच्या त्रासामुळे महिला व मुलेही त्रस्त झालेली आहेत. अशा दुहेरी पेचात नेप्तीतील ग्रामस्थ सापडले आहेत. हातभट्ट्या बंद करायच्या नसतील, तर किमान या बेवड्यांचा त्रास तरी कमी करा, असे आर्जव करण्याशिवाय या मंडळींपुढे पर्याय नाही.  ----    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UXlWyn
Read More
धक्कादायक...शाळाखोल्यांत कोंडले परराज्यातील मजूर!

औरंगाबाद - कोरोना संसर्ग टाळण्यासाठी देशभारत लॉकडाऊन केल्याने अनेक मजूर आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. या मजुरांना थांबवून त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. गारखेडा परिसरातील महापालिकेच्या शाळेत ६० कामगारांची ‘व्यवस्था’ करण्यात आलेली आहे; परंतु येथे कुठलेही नियम पाळलेले नाहीत. गेटला कुलूप लावलेले असून असुविधांनी हे मजूर बेहाल झालेले आहेत. 

वेशीवरच अडविले
मुंबईहून मध्यप्रदेशात आणि जळगावहून सांगलीला जाणाऱ्या कामगार, मजुरांना पोलिसांनी औरंगाबादच्या वेशीवर अडविलेले आहे. या ५० ते साठ नागरिकांना गारखेडा येथील महापालिकेच्या शाळेत आणले. यातील दोन ते तीन नागरिक आजारी आहेत. त्यांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास आहे. त्यामुळे बाकीच्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नागरिकांनी या ठिकाणाहून पळ काढू नये म्हणून शाळेच्या गेटला चक्क कुलूप लावण्यात आले आहे. या शाळेत बंदिस्त केलेल्यांसाठी पाण्याची सुविधा व्यवस्थित नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पलायन करू नये म्हणून...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने प्रत्येकाला आहे त्या जागीच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत; मात्र हातावर पोट असलेल्या अनेकांनी घरचा रस्ता धरला आहे. गावी जाण्यासाठी वाहन मिळत नसल्याने अनेकांनी पायीच आपल्या प्रवासाला सुरवात केली. कोणी परराज्यातील आहे, तर कोणी दुसऱ्या शहरातील. अशा मजुरांना थांबवून त्यांचे समुपदेशन करावे; तसेच त्यांचे राहणे, जेवण अशा भौतिक सुविधाही उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना शासनाने दिल्या आहेत; पंरतु औरंगाबादेत पायी जाणाऱ्या लोकांना चक्क ‘बंदिवासा’त ठेवल्याचा आरोप या मजुरांनी केला आहे. मुंबईहून मध्यप्रदेशला आपल्या गावी निघालेल्या १४ जणांना पोलिसांनी वाळूज पंढरपूर येथे अडवले, तर जळगावहून सांगलीकडे निघालेल्या २२ लोकांना हर्सूल येथे पोलिसांनी अडवत चौकशी केली. यासह अजून दहा ते बारा भटक्यांना पकडून या सर्वांची रवानगी गारखेडा येथील महापालिकेच्या शाळेत केली आहे. तिथून त्यांनी पलायन करू नये म्हणून शाळेच्या गेटला कुलूप लावण्यात आले. 

हेही वाचा - जाॅर्डनहुन आलेले नऊ जण क्वारंटाईन

भौतिक सुविधांचा अभाव 
गारखेडा येथील या शाळेत पिण्यासाठी पाणीही पुरेसे नाही. दोन वर्ग खोल्यांमध्ये हे सर्व लोक राहत आहेत. या वर्गखोल्यांमध्ये ना गाद्या आहेत ना पांघरूण. तसेच या ठिकाणी बंदिस्त केलेल्या दोन तीन नागरिकांना ताप, कोरडा खोकला असा त्रास आहे. त्यामुळे बाकीच्या नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. आमचे कुटुंब घरी वाट पाहत आहे, त्यामुळे आमची तपासणी करावी, आमच्यात काही लक्षणे आढळ्यास बंदिस्त ठेवावे अन्यथा सोडून द्यावे, अशी मागणी हे नागरिक करीत आहेत. 

मजुरांच्या व्यथा 
चौकशी केली असता मुंबईहून आलेले सर्व लोक मुंबईत वाहनचालकाचे काम करत असून हाताला काम नसल्याने राहण्याचे आणि खाण्याची व्यवस्था नसल्याने आपण स्वगावी जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर जळगावहून सांगलीला जाणारे सर्व लोक जळगाव येथे मार्केटिंगचे काम करत होते. आता पोलिसांनी रस्त्यात अडवल्याने अडचण झाली आहे. आम्हाला आमच्या घरी पोचवा, अशी विनंती या नागरिकांनी केली आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

धक्कादायक...शाळाखोल्यांत कोंडले परराज्यातील मजूर! औरंगाबाद - कोरोना संसर्ग टाळण्यासाठी देशभारत लॉकडाऊन केल्याने अनेक मजूर आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. या मजुरांना थांबवून त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. गारखेडा परिसरातील महापालिकेच्या शाळेत ६० कामगारांची ‘व्यवस्था’ करण्यात आलेली आहे; परंतु येथे कुठलेही नियम पाळलेले नाहीत. गेटला कुलूप लावलेले असून असुविधांनी हे मजूर बेहाल झालेले आहेत.  वेशीवरच अडविले मुंबईहून मध्यप्रदेशात आणि जळगावहून सांगलीला जाणाऱ्या कामगार, मजुरांना पोलिसांनी औरंगाबादच्या वेशीवर अडविलेले आहे. या ५० ते साठ नागरिकांना गारखेडा येथील महापालिकेच्या शाळेत आणले. यातील दोन ते तीन नागरिक आजारी आहेत. त्यांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास आहे. त्यामुळे बाकीच्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नागरिकांनी या ठिकाणाहून पळ काढू नये म्हणून शाळेच्या गेटला चक्क कुलूप लावण्यात आले आहे. या शाळेत बंदिस्त केलेल्यांसाठी पाण्याची सुविधा व्यवस्थित नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.  औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा पलायन करू नये म्हणून... कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने प्रत्येकाला आहे त्या जागीच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत; मात्र हातावर पोट असलेल्या अनेकांनी घरचा रस्ता धरला आहे. गावी जाण्यासाठी वाहन मिळत नसल्याने अनेकांनी पायीच आपल्या प्रवासाला सुरवात केली. कोणी परराज्यातील आहे, तर कोणी दुसऱ्या शहरातील. अशा मजुरांना थांबवून त्यांचे समुपदेशन करावे; तसेच त्यांचे राहणे, जेवण अशा भौतिक सुविधाही उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना शासनाने दिल्या आहेत; पंरतु औरंगाबादेत पायी जाणाऱ्या लोकांना चक्क ‘बंदिवासा’त ठेवल्याचा आरोप या मजुरांनी केला आहे. मुंबईहून मध्यप्रदेशला आपल्या गावी निघालेल्या १४ जणांना पोलिसांनी वाळूज पंढरपूर येथे अडवले, तर जळगावहून सांगलीकडे निघालेल्या २२ लोकांना हर्सूल येथे पोलिसांनी अडवत चौकशी केली. यासह अजून दहा ते बारा भटक्यांना पकडून या सर्वांची रवानगी गारखेडा येथील महापालिकेच्या शाळेत केली आहे. तिथून त्यांनी पलायन करू नये म्हणून शाळेच्या गेटला कुलूप लावण्यात आले.  हेही वाचा - जाॅर्डनहुन आलेले नऊ जण क्वारंटाईन भौतिक सुविधांचा अभाव  गारखेडा येथील या शाळेत पिण्यासाठी पाणीही पुरेसे नाही. दोन वर्ग खोल्यांमध्ये हे सर्व लोक राहत आहेत. या वर्गखोल्यांमध्ये ना गाद्या आहेत ना पांघरूण. तसेच या ठिकाणी बंदिस्त केलेल्या दोन तीन नागरिकांना ताप, कोरडा खोकला असा त्रास आहे. त्यामुळे बाकीच्या नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. आमचे कुटुंब घरी वाट पाहत आहे, त्यामुळे आमची तपासणी करावी, आमच्यात काही लक्षणे आढळ्यास बंदिस्त ठेवावे अन्यथा सोडून द्यावे, अशी मागणी हे नागरिक करीत आहेत.  मजुरांच्या व्यथा  चौकशी केली असता मुंबईहून आलेले सर्व लोक मुंबईत वाहनचालकाचे काम करत असून हाताला काम नसल्याने राहण्याचे आणि खाण्याची व्यवस्था नसल्याने आपण स्वगावी जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर जळगावहून सांगलीला जाणारे सर्व लोक जळगाव येथे मार्केटिंगचे काम करत होते. आता पोलिसांनी रस्त्यात अडवल्याने अडचण झाली आहे. आम्हाला आमच्या घरी पोचवा, अशी विनंती या नागरिकांनी केली आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3bNCZcL
Read More
कोरोना व्हायरस : तबलीगी जमात काय, ते काय काम करतात? - सोपी गोष्ट
राशि वालों को मिलेगा आर्थिक लाभ, जानें सभी राशियों का हाल https://ift.tt/2X1TgXq
पार्टनर से होगा प्यार या तकरार, जानें- आपकी राशि के लिए कैसा है गुरुवार https://ift.tt/2X0YOl9
Coronavirus : स्पेनमध्ये मृतांची संख्या ९ हजारांवर तर १ लाख २१३६ जणांना बाधा

मद्रिद - स्पेनमध्ये कोरोना व्हायरसचा फास आवळत चालला असून मृतांची संख्या बुधवारी ९ हजारांवर पोचली आहे. गेल्या चोवीस तासात ८६४ जण मृत्युमुखी पडले आहेत. तसेच एक लाखाहून अधिक नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाबाधित मृतांत इटलीनंतर स्पेनचा क्रमांक लागला आहे. आतापर्यंत स्पेनमध्ये ९ हजार ५३ जण मृत्युमुखी पडले असून देशभरात १ लाख २१३६ जणांना बाधा झाली आहे. याशिवाय बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसारावरून नागरिक चिंतेत असून त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकास शेवटचा निरोप देण्यासाठी देखील हजर राहण्यास नागरिक असमर्थ ठरत आहेत. 

यादरम्यान चीनमधून मोठ्या प्रमाणात सुरक्षेची साधने स्वीकारण्यास स्पेनने नकार दिला आहे. त्याचा दर्जा अत्यंत खराब असल्याने चीनमधून आयात केलेले साहित्य जमा केले नाही. यात टेस्टिंग किटचा देखील समावेश असल्याचे बीबीसीने म्हटले आहे. स्पेन सरकारने म्हटले की, या किटचा कोणताही फायदा झाला नाही. हे किट निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह अहवाल देण्यास अपयशी ठरले आहे. अशा निरपयोगी किटची संख्या ६० हजारावर आहे. यासंदर्भात चीनच्या दुतावासाने ट्विटरवरून खुलासा केला आहे. त्यात म्हटले की, स्पेन सरकारने ज्या कंपनीला किटचे कंत्राट दिले होते, त्याला विक्रीचा कोणताही परवाना नव्हता.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : स्पेनमध्ये मृतांची संख्या ९ हजारांवर तर १ लाख २१३६ जणांना बाधा मद्रिद - स्पेनमध्ये कोरोना व्हायरसचा फास आवळत चालला असून मृतांची संख्या बुधवारी ९ हजारांवर पोचली आहे. गेल्या चोवीस तासात ८६४ जण मृत्युमुखी पडले आहेत. तसेच एक लाखाहून अधिक नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे.  बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाबाधित मृतांत इटलीनंतर स्पेनचा क्रमांक लागला आहे. आतापर्यंत स्पेनमध्ये ९ हजार ५३ जण मृत्युमुखी पडले असून देशभरात १ लाख २१३६ जणांना बाधा झाली आहे. याशिवाय बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसारावरून नागरिक चिंतेत असून त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकास शेवटचा निरोप देण्यासाठी देखील हजर राहण्यास नागरिक असमर्थ ठरत आहेत.  यादरम्यान चीनमधून मोठ्या प्रमाणात सुरक्षेची साधने स्वीकारण्यास स्पेनने नकार दिला आहे. त्याचा दर्जा अत्यंत खराब असल्याने चीनमधून आयात केलेले साहित्य जमा केले नाही. यात टेस्टिंग किटचा देखील समावेश असल्याचे बीबीसीने म्हटले आहे. स्पेन सरकारने म्हटले की, या किटचा कोणताही फायदा झाला नाही. हे किट निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह अहवाल देण्यास अपयशी ठरले आहे. अशा निरपयोगी किटची संख्या ६० हजारावर आहे. यासंदर्भात चीनच्या दुतावासाने ट्विटरवरून खुलासा केला आहे. त्यात म्हटले की, स्पेन सरकारने ज्या कंपनीला किटचे कंत्राट दिले होते, त्याला विक्रीचा कोणताही परवाना नव्हता. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2R0Tevq
Read More
असा तयार करा घरच्या घरी मास्क!

जुने बनियन, टी-शर्ट आणि रुमाल वापरून मास्क तयार करता येऊ शकतो. असा मास्क ७० टक्क्यांपर्यंत परिणामकारक ठरतो असे तज्ज्ञांचे मात आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्र सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांच्या कार्यालयाने एक विस्तृत माहितीपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्याद्वारे घरात सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या वस्तूंपासून मास्क कसा तयार करायचा याबाबतच्या सूचना केल्या आहेत.

असा बनवा मास्क...

शंभर टक्के सुती कापडापासून तयार केलेले दोन थर असलेले मास्क सर्जिकल मास्कच्या तुलनेत ७० टक्क्यांपर्यंत परिणामकारक ठरतात.

हे मास्क कोरोनाच्या विषाणूहून पाच पट लहान आकाराचे सूक्ष्म कण रोखू शकतात

सुती कापडामुळे श्वास घेण्यात अडचण येत नाही, तसेच हे कापड सर्वत्र सहजासहजी मिळू शकते

हे मास्क स्वच्छ धुवून पुन्हा वापरता येतात

मास्क का वापरावा?

बाधा झालेल्या व्यक्तीमुळे हवेत पसरलेले लहान थेंब आपल्या श्वसनयंत्रणेत जाण्यापासून रोखण्यात मास्कमुळे मदत होते

गर्दीच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे

उष्णता, अल्ट्राव्हायोलेट लाईट, पाणी, साबण आणि अल्कोहल आदींचा उपयोग करून स्वच्छ केलेल्या मास्कमुळे विषाणू श्वसनयंत्रणेत जाण्याची शक्यता कमी होते

मास्कच्या मर्यादा
घरी तयार केलेल्या या मास्कमुळे विषाणूपासून पूर्णपणे संरक्षण होत नसले तरी संसर्गाचे प्रमाण घटण्यास मदत होते 

असा स्वच्छ करा मास्क
मास्क दररोज गरम पाणी आणि साबणाने स्वच्छ धुणे आवश्यक आहे. मास्क न धुता वापरू नये. 

मास्कचा वापर वाढण्यास मदत
या पद्धतीचे मास्क कुठलिही व्यक्ती किंवा एनजीओ तयार करू शकते. देशातील मास्क वापरण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी अशा प्रकारच्या मास्कची निर्मिती फायदेशीर ठरते

विश्लेषण काय सांगते 

एकूण लोकसंख्येपैकी ५० टक्के लोकांनी मास्कचा वापर केला तर उरलेल्या फक्त ५० टक्के लोकांनाच विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते

एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के नागरिकांनी मास्कचा वापर केल्यास विषाणूचा उद्रेक तातडीने थांबविता येऊ शकतो

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

असा तयार करा घरच्या घरी मास्क! जुने बनियन, टी-शर्ट आणि रुमाल वापरून मास्क तयार करता येऊ शकतो. असा मास्क ७० टक्क्यांपर्यंत परिणामकारक ठरतो असे तज्ज्ञांचे मात आहे.  बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप केंद्र सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांच्या कार्यालयाने एक विस्तृत माहितीपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्याद्वारे घरात सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या वस्तूंपासून मास्क कसा तयार करायचा याबाबतच्या सूचना केल्या आहेत. असा बनवा मास्क... शंभर टक्के सुती कापडापासून तयार केलेले दोन थर असलेले मास्क सर्जिकल मास्कच्या तुलनेत ७० टक्क्यांपर्यंत परिणामकारक ठरतात. हे मास्क कोरोनाच्या विषाणूहून पाच पट लहान आकाराचे सूक्ष्म कण रोखू शकतात सुती कापडामुळे श्वास घेण्यात अडचण येत नाही, तसेच हे कापड सर्वत्र सहजासहजी मिळू शकते हे मास्क स्वच्छ धुवून पुन्हा वापरता येतात मास्क का वापरावा? बाधा झालेल्या व्यक्तीमुळे हवेत पसरलेले लहान थेंब आपल्या श्वसनयंत्रणेत जाण्यापासून रोखण्यात मास्कमुळे मदत होते गर्दीच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे उष्णता, अल्ट्राव्हायोलेट लाईट, पाणी, साबण आणि अल्कोहल आदींचा उपयोग करून स्वच्छ केलेल्या मास्कमुळे विषाणू श्वसनयंत्रणेत जाण्याची शक्यता कमी होते मास्कच्या मर्यादा घरी तयार केलेल्या या मास्कमुळे विषाणूपासून पूर्णपणे संरक्षण होत नसले तरी संसर्गाचे प्रमाण घटण्यास मदत होते  असा स्वच्छ करा मास्क मास्क दररोज गरम पाणी आणि साबणाने स्वच्छ धुणे आवश्यक आहे. मास्क न धुता वापरू नये.  मास्कचा वापर वाढण्यास मदत या पद्धतीचे मास्क कुठलिही व्यक्ती किंवा एनजीओ तयार करू शकते. देशातील मास्क वापरण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी अशा प्रकारच्या मास्कची निर्मिती फायदेशीर ठरते विश्लेषण काय सांगते  एकूण लोकसंख्येपैकी ५० टक्के लोकांनी मास्कचा वापर केला तर उरलेल्या फक्त ५० टक्के लोकांनाच विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के नागरिकांनी मास्कचा वापर केल्यास विषाणूचा उद्रेक तातडीने थांबविता येऊ शकतो News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3bNBfAx
Read More
Coronavirus : होलसेल बाजारातच तुटवडा झाल्याने घाऊक बाजारात दरवाढ

पुणे - ‘होलसेल बाजारातच तुटवडा झाल्याने थोड्याशा वाढीव दराने माल खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे व्यवसाय कसा करायचा असा प्रश्‍न किरकोळ विक्रेत्यांना पडला आहे. सरकार व प्रशासनानेच यासंदर्भात मार्गदर्शन करावे,’’ असे आवाहन पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे करण्यात आले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र सध्या बंद आहे. सरकारच्या आदेशानुसार व नागरिकांची गरज म्हणून फक्त जीवनावश्‍यक वस्तूंचा व्यवसाय सुरू आहे. परंतु, अनेक किरकोळ किराणा दुकानदारांना अत्यावश्‍यक सेवेसाठीचे ओळखपत्र नोंदणी करूनही मिळत नाही. त्यामुळे पोलिसांकडून कारवाई होत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी होम डिलिव्हरी दिली जाते. पण, कामगारांना ओळखपत्र नसल्याने अडविले जाते. याबरोबरच काही नागरिक कोरोनापूर्वीचे भाव सांगून आता जादा दराने विक्री करीत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी देतात. परंतु, ते यामागचं वास्तव समजून घेत नाहीत, असे किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : होलसेल बाजारातच तुटवडा झाल्याने घाऊक बाजारात दरवाढ पुणे - ‘होलसेल बाजारातच तुटवडा झाल्याने थोड्याशा वाढीव दराने माल खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे व्यवसाय कसा करायचा असा प्रश्‍न किरकोळ विक्रेत्यांना पडला आहे. सरकार व प्रशासनानेच यासंदर्भात मार्गदर्शन करावे,’’ असे आवाहन पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे करण्यात आले आहे. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र सध्या बंद आहे. सरकारच्या आदेशानुसार व नागरिकांची गरज म्हणून फक्त जीवनावश्‍यक वस्तूंचा व्यवसाय सुरू आहे. परंतु, अनेक किरकोळ किराणा दुकानदारांना अत्यावश्‍यक सेवेसाठीचे ओळखपत्र नोंदणी करूनही मिळत नाही. त्यामुळे पोलिसांकडून कारवाई होत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी होम डिलिव्हरी दिली जाते. पण, कामगारांना ओळखपत्र नसल्याने अडविले जाते. याबरोबरच काही नागरिक कोरोनापूर्वीचे भाव सांगून आता जादा दराने विक्री करीत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी देतात. परंतु, ते यामागचं वास्तव समजून घेत नाहीत, असे किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UBlNSa
Read More
अजय देवगन की फिल्मों का बॉक्स ऑफिस रिपोर्ट, करियर की पहली फिल्म हिट और 100वीं फिल्म तानाजी सुपरहिट

अजय देवगन की फिल्मों का बॉक्स ऑफिस रिपोर्ट, करियर की पहली फिल्म हिट और 100वीं फिल्म तानाजी सुपरहिट

April 01, 2020 0 Comments
अभिनेता अजय देवगन का जन्म 2 अप्रैल 1969 को नई दिल्ली में हुआ। अपने करियर में वह 100 फिल्में कर चुके हैं। जनवरी में रिलीज हुई 'तानाजी...
Read More
Video : घरभर दरवळतोय कलेचा गंध...

कार्यमग्न राहणारी अनेक माणसं आपल्या जवळपास असतात. काही तरी अनोखं काम करण्यात रमणं ही कला तर आहेच, पण फार मोठी शक्तीही असते. सहजच बरेच काही करणाऱ्या अशाच काही लहानथोरांनी अनुभवलेले ‘बहराचे क्षण’ अनुभवू आजपासून....

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दीप्ती विसपुते ही शिल्पकार तरुणी आणि देवेंद्र भागवत हा चित्रकार, हे जोडपं घरातूनच आपापलं व्यावसायिक काम करतात. छंदाचं रूपांतर व्यवसायात करणं हे तसं फार कस पाहणार. या दोघांनी नेटानं आपल्या कलात्मक व्यवसायाबरोबर संगीताचा छंदही जोपासला आहे. त्यांची चार वर्षांची लेक मनवा ही कलेचं बाळकडू मिळाल्याने रोज तिला सुचतील तशा नव्या कलाकृती घडवते. त्यांच घर जणू एक जादूची गुफाच आहे. 

दीप्ती मातीपासून उत्तमोत्तम शिल्पाकृती घडवते. मातीशी हातांनी होणाऱ्या संवादात रमते. बच्चेकंपनीला मातीची ही नवलाई समजावण्याच्या ओढीने ती कार्यशाळा घेते. यासाठी तिचा खास स्टुडिओ आहे. तिथेच ती आईच्या हातातली जादू बघत आली. तोडी मोठी होताच तीही मातीत हात घालू लागली. मातीचा गोळा हातात घेऊन, त्यापासून काही करून पाहणं सततच झालं. जे काही तयार होईल, त्याला मग बाबांकडचे रंग घेऊन रूप देणं ओघाने आलंच. 

या विषयी देवेंद्र म्हणाला, ‘‘मनवाला रंग, ब्रश असा तिचा संच आणून दिला.  मी जेंबे वाजवतो, तेव्हा ती तिच्या खेळण्यातली गिटार घेऊन साथ देण्याचा प्रयत्न करते. दीप्तीच्या स्टुडिओत पहिल्यांदा चाकावर काम करताना माझ्या मनात साशंकता होती की, हे मला जमेल का? पण मनवाने अलीकडेच एके दिवशी चाकावर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. दीप्ती आणि मी जरा गडबडलो, पण मनवाने सहज बाउल बनवला.’’

दीप्तीने सांगितलं की, तिने आतापर्यंत बऱ्याच वस्तू बनवल्या आहेत. माझ्या कलाकृती भट्टीत भाजताना मनवाने तयार केलेली खेळणीही भाजते. नंतर तिला हव्या असल्यास ती त्यावर रंग देते. देवेंद्र म्हणाला, ‘‘दीप्ती गाते, सतार वाजवते. मनवाला त्यात सहभागी व्हायला आवडतं. दीप्ती बालगोपाळांसाठी गंमतशीर खेळणी तयार करायला शिकवणारे व्हिडिओ सध्या समाजमाध्यमावर टाकते. मनवा बोलते आणि वस्तू करून दाखवते.’

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video : घरभर दरवळतोय कलेचा गंध... कार्यमग्न राहणारी अनेक माणसं आपल्या जवळपास असतात. काही तरी अनोखं काम करण्यात रमणं ही कला तर आहेच, पण फार मोठी शक्तीही असते. सहजच बरेच काही करणाऱ्या अशाच काही लहानथोरांनी अनुभवलेले ‘बहराचे क्षण’ अनुभवू आजपासून.... बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दीप्ती विसपुते ही शिल्पकार तरुणी आणि देवेंद्र भागवत हा चित्रकार, हे जोडपं घरातूनच आपापलं व्यावसायिक काम करतात. छंदाचं रूपांतर व्यवसायात करणं हे तसं फार कस पाहणार. या दोघांनी नेटानं आपल्या कलात्मक व्यवसायाबरोबर संगीताचा छंदही जोपासला आहे. त्यांची चार वर्षांची लेक मनवा ही कलेचं बाळकडू मिळाल्याने रोज तिला सुचतील तशा नव्या कलाकृती घडवते. त्यांच घर जणू एक जादूची गुफाच आहे.  दीप्ती मातीपासून उत्तमोत्तम शिल्पाकृती घडवते. मातीशी हातांनी होणाऱ्या संवादात रमते. बच्चेकंपनीला मातीची ही नवलाई समजावण्याच्या ओढीने ती कार्यशाळा घेते. यासाठी तिचा खास स्टुडिओ आहे. तिथेच ती आईच्या हातातली जादू बघत आली. तोडी मोठी होताच तीही मातीत हात घालू लागली. मातीचा गोळा हातात घेऊन, त्यापासून काही करून पाहणं सततच झालं. जे काही तयार होईल, त्याला मग बाबांकडचे रंग घेऊन रूप देणं ओघाने आलंच.  या विषयी देवेंद्र म्हणाला, ‘‘मनवाला रंग, ब्रश असा तिचा संच आणून दिला.  मी जेंबे वाजवतो, तेव्हा ती तिच्या खेळण्यातली गिटार घेऊन साथ देण्याचा प्रयत्न करते. दीप्तीच्या स्टुडिओत पहिल्यांदा चाकावर काम करताना माझ्या मनात साशंकता होती की, हे मला जमेल का? पण मनवाने अलीकडेच एके दिवशी चाकावर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. दीप्ती आणि मी जरा गडबडलो, पण मनवाने सहज बाउल बनवला.’’ दीप्तीने सांगितलं की, तिने आतापर्यंत बऱ्याच वस्तू बनवल्या आहेत. माझ्या कलाकृती भट्टीत भाजताना मनवाने तयार केलेली खेळणीही भाजते. नंतर तिला हव्या असल्यास ती त्यावर रंग देते. देवेंद्र म्हणाला, ‘‘दीप्ती गाते, सतार वाजवते. मनवाला त्यात सहभागी व्हायला आवडतं. दीप्ती बालगोपाळांसाठी गंमतशीर खेळणी तयार करायला शिकवणारे व्हिडिओ सध्या समाजमाध्यमावर टाकते. मनवा बोलते आणि वस्तू करून दाखवते.’ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2wN6xZw
Read More
मुद्रांक शुल्कात एक टक्‍का कपात

पुणे - मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आलेल्या शहरात दस्तखरेदी, गहाणखतावर आकारण्यात येत असलेला एक टक्का मेट्रो सेस पुढील दोन वर्ष न आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तशा अध्यादेश राज्य सरकारकडून शनिवारी काढण्यात आला. त्याची अंमलबजावणी बुधवारपासून (ता. १) सुरू होणार आहे. त्यामुळे पुण्यात ७ ऐवजी ६ टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्याच्या अर्थसंकल्पात मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार सरकारकडून हे आदेश काढले आहेत. मुद्रांक शुल्कातील ही सवलत राज्यातील पुणे, पिपंरी-चिंचवड, मुंबई महानगर विकास प्राधिकरण आणि नागपूर या शहरांमध्येच लागू असणार आहे.

पुणे शहरात दस्तनोंदणीवर सध्या ५ टक्के मुद्रांक शुल्क, एक टक्का सेस आणि एक टक्का मेट्रोसेस असे सुमारे ७ टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाते. त्यामध्ये एक टक्का हा मेट्रो सेस म्हणून नव्याने आकारला जात होता. परंतु तो आता पुढील दोन वर्षांसाठी न आकरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे आता दस्तनोंदणी, तसेच गहाणखत यावर ६ टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. परिणाम नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुद्रांक शुल्कात एक टक्‍का कपात पुणे - मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आलेल्या शहरात दस्तखरेदी, गहाणखतावर आकारण्यात येत असलेला एक टक्का मेट्रो सेस पुढील दोन वर्ष न आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तशा अध्यादेश राज्य सरकारकडून शनिवारी काढण्यात आला. त्याची अंमलबजावणी बुधवारपासून (ता. १) सुरू होणार आहे. त्यामुळे पुण्यात ७ ऐवजी ६ टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्याच्या अर्थसंकल्पात मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार सरकारकडून हे आदेश काढले आहेत. मुद्रांक शुल्कातील ही सवलत राज्यातील पुणे, पिपंरी-चिंचवड, मुंबई महानगर विकास प्राधिकरण आणि नागपूर या शहरांमध्येच लागू असणार आहे. पुणे शहरात दस्तनोंदणीवर सध्या ५ टक्के मुद्रांक शुल्क, एक टक्का सेस आणि एक टक्का मेट्रोसेस असे सुमारे ७ टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाते. त्यामध्ये एक टक्का हा मेट्रो सेस म्हणून नव्याने आकारला जात होता. परंतु तो आता पुढील दोन वर्षांसाठी न आकरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे आता दस्तनोंदणी, तसेच गहाणखत यावर ६ टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. परिणाम नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2X0soqV
Read More
Coronavirus : भारतातील विषाणूची तीव्रता कमी

नवी दिल्ली - अमेरिका, इटली आणि स्पेन या देशांच्या तुलनेत भारतातील कोरोना विषाणूच्या संसर्गाची तीव्रता-क्षमता (स्ट्रेन) लक्षणीयरित्या कमी असल्याचे भारतीय शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. जनुकीय पद्धतीनुसार सखोल पृथःकरण करण्यात आले. त्यात वुहानमध्ये आढळलेल्या नव्या विषाणूशी साधर्म्य दिसून आले. हा विषाणू तेवढा धोकादायक नाही.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘दी एनर्जी अँड रिसोर्सेस’ (टेरी) संस्थाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ रुप लाल यांच्या नेतृत्वाखालील १६ शास्त्रज्ञांच्या पथकाने हा अभ्यास केला.  इटली, स्पेन, अमेरिका, चीन आणि नेपाळ येथे झालेल्या अभ्यासातून संकलित करण्यात आलेली माहिती तुलनेसाठी वापरण्यात आली.लाल यांनी सांगितले की, SARS-CoV-2 (COVID19) हा विषाणू आपले स्वरूप बदलतो आहे.  

या अभ्यास गटातील महत्त्वाचे सदस्य विपीन गुप्ता यांनी सांगितले की, युरोपमध्ये या विषाणूने वेगाने आपल्या स्वरूपात बदल केले आणि त्यानंतर अमेरिकेत त्यात आणखी बदल होऊन स्वरूप धोकादायक बनले. भारतामधील विषाणू कमी क्षमतेचा का असावा?, या प्रश्नावर गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही या घडीला ठोस निष्कर्ष काढू शकत नाही, पण अमेरिकेच्या तुलनेत संसर्गाची तीव्रता कमी आहे हे म्हणू शकतो. 

या अभ्यासात भारतीय शास्त्रज्ञांना अमेरिकेतील विषाणूच्या सहा वेगवेगळ्या नमुन्यांची जनुकीय रचना आढळून आली. त्यात आगळे अमिनो आम्ल मिळाले आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : भारतातील विषाणूची तीव्रता कमी नवी दिल्ली - अमेरिका, इटली आणि स्पेन या देशांच्या तुलनेत भारतातील कोरोना विषाणूच्या संसर्गाची तीव्रता-क्षमता (स्ट्रेन) लक्षणीयरित्या कमी असल्याचे भारतीय शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. जनुकीय पद्धतीनुसार सखोल पृथःकरण करण्यात आले. त्यात वुहानमध्ये आढळलेल्या नव्या विषाणूशी साधर्म्य दिसून आले. हा विषाणू तेवढा धोकादायक नाही. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘दी एनर्जी अँड रिसोर्सेस’ (टेरी) संस्थाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ रुप लाल यांच्या नेतृत्वाखालील १६ शास्त्रज्ञांच्या पथकाने हा अभ्यास केला.  इटली, स्पेन, अमेरिका, चीन आणि नेपाळ येथे झालेल्या अभ्यासातून संकलित करण्यात आलेली माहिती तुलनेसाठी वापरण्यात आली.लाल यांनी सांगितले की, SARS-CoV-2 (COVID19) हा विषाणू आपले स्वरूप बदलतो आहे.   या अभ्यास गटातील महत्त्वाचे सदस्य विपीन गुप्ता यांनी सांगितले की, युरोपमध्ये या विषाणूने वेगाने आपल्या स्वरूपात बदल केले आणि त्यानंतर अमेरिकेत त्यात आणखी बदल होऊन स्वरूप धोकादायक बनले. भारतामधील विषाणू कमी क्षमतेचा का असावा?, या प्रश्नावर गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही या घडीला ठोस निष्कर्ष काढू शकत नाही, पण अमेरिकेच्या तुलनेत संसर्गाची तीव्रता कमी आहे हे म्हणू शकतो.  या अभ्यासात भारतीय शास्त्रज्ञांना अमेरिकेतील विषाणूच्या सहा वेगवेगळ्या नमुन्यांची जनुकीय रचना आढळून आली. त्यात आगळे अमिनो आम्ल मिळाले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2USKusi
Read More
अजय देवगन की फिल्मों का बॉक्स ऑफिस रिपोर्ट, करियर की पहली फिल्म हिट और 100वीं फिल्म तानाजी सुपरहिट

अजय देवगन की फिल्मों का बॉक्स ऑफिस रिपोर्ट, करियर की पहली फिल्म हिट और 100वीं फिल्म तानाजी सुपरहिट

April 01, 2020 0 Comments
अभिनेता अजय देवगन का जन्म 2 अप्रैल 1969 को नई दिल्ली में हुआ। अपने करियर में वह 100 फिल्में कर चुके हैं। जनवरी में रिलीज हुई 'तानाजी...
Read More