उल्लेखनीय! जखमी प्राण्यांना मिळेल आता येथे आधार कणकवली (सिंधुदुर्ग) - महामार्ग चौपदरीकरणानंतर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांना धडकून वन्यप्राणी जखमी होण्याचेही प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. या प्राण्यांवर तातडीने उपचार व्हावेत, ते पूर्ण बरे व्हावेत यासाठी कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीत वन्यजीव शुश्रूषा केंद्राची उभारणी होणार आहे. त्यासाठी वनविभाग 50 लाख रुपये खर्च करणार आहे. या केंद्रांमध्ये वन्यप्राण्यांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका आणि पशुवैद्यकीय अधिकारीही सज्ज असेल. सिंधुदुर्गातील महामार्ग चौपदरीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. या वर्षअखेरपर्यंत सर्व उड्डाणपूल, नद्यांवरील पूल, मोऱ्या आदींची बांधकामे पूर्ण होऊन दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी सुरू होणार आहेत. चौपदरीकरणानंतर महामार्गावरून जा-ये करणाऱ्या वाहनांचाही वेग सुसाट असणार आहे. या भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांना धडकून जखमी होणाऱ्या वन्यप्राण्यांसाठी आता सावंतवाडी वनविभागामार्फत हक्काचे शुश्रूषा केंद्र उभे राहणार आहे. वन्यप्राण्यांवर तातडीने उपचार होण्यासाठी कणकवली तालुक्यात फोंडाघाट तर कुडाळ तालुक्यातील माणगाव-आंबेरी येथील वनविभागाच्या जागेत ही शुश्रूषा केंद्रे सुरू होणार आहेत. सावंतवाडीत अद्यापही जागेची निश्चिती झाली नसली तरी उपरलकर किंवा सावंतवाडी वनविभागाच्या जागेत या केंद्रांची उभारणी निश्चित केली आहे. वन्यप्राणी शुश्रूषा केंद्रामध्ये अपघातग्रस्त वन्यप्राणी ने-आण करण्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. याखेरीज तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारीही या केंद्रांमध्ये उपलब्ध असतील, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली. वर्ष अखेरपर्यंत कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीत वन्यप्राणी शुश्रूषा केंद्रांची उभारणी होणार आहे. अपघातग्रस्त वन्यप्राण्यांवर उपचार करण्याबरोबरच हवेत विहार करणाऱ्या पण विविध कारणांमुळे अपघातग्रस्त झालेल्या, आत्मविश्वास गमावलेल्या पक्षांनाही या केंद्रांमध्ये उपचार आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. या वन्यप्राणी शुश्रूषा केंद्रांमुळे जखमी अवस्थेतील वन्यप्राण्यांना नवजीवन मिळू शकणार आहे. तसेच हे केंद्र म्हणजे या प्राण्यांसाठी हक्काचे घरकुल ठरणार आहे. महत्वाची बाब म्हणजे अपघातग्रस्त झालेला वन्यप्राणी पूर्वपदावर येईपर्यंत, स्वतःची शिकार स्वतः करेपर्यंत त्याची शुश्रूषा या केंद्रात केली जाणार आहे. त्याकालावधीतील सर्व खर्च देखील वनविभाग करणार आहे. राज्यात काही मोजक्याच ठिकाणी वन्यजीव संवर्धन केंद्रे आहेत. यात कोल्हापूर येथील वन्यजीव संवर्धन केंद्राच्या धर्तीवर सिंधुदुर्गातील कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडीतील वनविभागाच्या जागेत, असे केंद्र उभे केले जाणार आहेत. यात सर्व वन्यप्राण्यांवर उपचाराची व्यवस्था आणि सज्जता असेल. - समाधान चव्हाण, उपवनसंरक्षक वनविभाग सावंतवाडी. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 16, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2UgLNAO Read More Read more No comments:
महामंडळांवरील नियुक्त्यांसाठी दोन्ही काँग्रेस आग्रही मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडल्यानंतर महत्वाच्या महामंडळावरील नियुक्त्यांचे निर्णय व्हावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आग्रही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने सुमारे २५ महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची नावे नियुक्तीसाठी निश्चित केली आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अत्यंत काटेकोरपणे या संभाव्य याद्या तयार केल्याचे समजल्याने काँग्रेसनेही आपल्याला हव्या असलेल्या मंडळींवर विचार केला आहे. - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकत्रित विनंती करीत यासंबंधी त्वरित बैठक बोलवावी अशी विनंती केली असल्याचे समजते. मात्र उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने यासंबंधात अद्याप हिरव झेंडा दाखवलेला नाही. राज्यभरात कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये याची काळजी घ्यायची असल्याने मुख्यमंत्री ठाकरे कमालीची दक्षता घेत आहेत. एका दिवसात ते जवळपास चार वेळा आरोग्य विभागाशी संपर्क साधत आहेत. या कामामुळे त्यांना महामंडळांवरील नियुक्त्यांचा विषय मार्गी लावण्यासाठी वेळ काढता आला नसल्याचेही त्यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याने नमूद केले. - कोरेगाव भीमा : नवलखा, तेलतुंबडे यांच्या अडचणीत वाढ; सुप्रीम कोर्टाचे आदेश पक्षांना नाराज न करण्याचे आव्हान राज्यातील सिंचन महामंडळे विदर्भ कृष्णा खोरे, म्हाडा, सिडको तसेच देवस्थान मंडळे अत्यंत महत्त्वाची मानली जातात.तेथे नियुक्ती करताना कोणते सूत्र अंमलात आणायचे? महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षांना कसे सांभाळायचे, त्यासाठीचे सूत्र कोणते?, हे प्रश्न लवकरच चर्चेला घ्यावे लागतील असे मानले जाते. नाराज निष्ठावंतांना तसेच संभाव्य पाठीराख्यांना सामावून घेण्याचे आव्हान तिन्ही पक्षांना लक्षात घ्यावे लागणार आहे. कोणताही पक्ष नाराज न होता या संबंधातले निर्णय येत्या महिन्यात मार्गी लागतील, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सामावून घेतले जाईल, अशी माहिती शिवसेनेतील एका उच्चपदस्थाने दिली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 16, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3b5FBCJ Read More Read more No comments:
काजू उत्पादक आक्रमक, काय आहेत मागण्या? दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - शेतकरी, व्यापारी आणि प्रक्रिया उद्योग करणाऱ्यांना आर्थिक फायदा होईल, असे धोरण ठरविण्यास शासनाला भाग पाडू, अशी ग्वाही जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज येथील काजू बागायतदारांना दिले. दोडामार्ग तालुका काजू उत्पादक शेतकरी संघाच्यावतीने विविध मागण्यांसाठी येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यावेळी ते शेतकऱ्यांशी बोलत होते. शेतकऱ्यांच्या काजूला योग्य हमीभाव मिळावा, काजूवरील आयातकर वाढवावा, कोकण काजू नावाने कोकणातील नसलेले काजू विकण्यावर बंदी घालावी, कोकणातील काजूला जीआय मानांकन मिळावे, काजू नुकसानीची भरपाई 100 टक्के मिळावी, 100 टक्के अनुदानावर सौरऊर्जा कुंपण मिळावे आदी मागण्यांसाठी काजू बागायतदार शेतकऱ्यांनी आज धरणे आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधले. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदनही तहसीलदारांमार्फत शासनाला दिले. श्री. सावंत म्हणाले, ""जीआय मानांकनासाठी लागणाऱ्या खर्चापैकी 75 टक्के रक्कम शासनाने द्यावी यासाठी प्रयत्न केले जातील. शेतकऱ्यांच्या काजू बी ला योग्य भाव मिळण्यासाठी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून काजूबियांची खरेदी केली जाईल.'' कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमवण्यावर शासनाकडून निर्बंध असल्याने दोन तासातच आंदोलन स्थगित केले. त्यानंतर सर्वांनी तेथील शिव मंदिरात चर्चा केली. यावेळी संघाचे पदाधिकारी चंद्रशेखर सावंत, गणेशप्रसाद गवस, दाजी देसाई, जिल्हा बॅंक संचालक प्रकाश गवस, गोपाळ गवस, बाबूराव धुरी, अण्णा शिरोडकर, अनिल मोरजकर, विठोबा पालयेकर, श्री. गवंडी, पांडुरंग गवस, अनिल शेटकर, राजेंद्र निंबाळकर, प्रेमानंद देसाई, राघोबा गवस, संतोष गणपत्ये, बाबी बोर्डेकरसह आदी उपस्थित होते. गुढीपाडव्यानंतर संयुक्त बैठक आपल्याला कोकणातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यामुळे लढ्याची व्याप्ती वाढवावी लागेल. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व काजू बागायतदार शेतकऱ्यांची संयुक्त बैठक गुढीपाडव्यानंतर लावू आणि आपल्या मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करू, असे सांगून श्री. सावंत यांनी कोरोनाबाबत सर्वांनी सावधगिरी बाळगून जनजागृतीही करावी, असे आवाहन केले. जिल्हा बॅंकेने काजू खरेदी करावा साधारण एका किलोला 145 बसणाऱ्या सुक्या काजूला 150 रुपये प्रतिकिलो दर मिळायला हवा. तो दर जिल्हा बॅंकेने काजू खरेदी करुन शेतकऱ्यांना द्यावा आणि नंतर तो काजू व्यापारी अथवा प्रक्रिया उद्योजकांना विकावा तसे केल्याने शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळेल आणि व्यापारी व प्रक्रिया उद्योजक जिल्हा बॅंकेशी जोडले जातील, अशी भूमिका शेतकरी संतोष गणपत्ये यांनी मांडली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 16, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/33nLdW3 Read More Read more No comments:
संकट ओढवल्यास सिंधुदुर्गात काय निर्णय घेणार? वाचा... ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून गावी आलेल्या एका 19 वर्षीय तरुणाला खबरदारी म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्या सर्व चाचण्यांचा अहवाल उद्या (ता. 17) मिळणार आहे. या रुग्णाला संशयित रुग्ण सुद्धा म्हणता येणार नाही, कारण त्याच्यात कोरोना विषाणूसंबंधी आजाराची लक्षणे नाहीत. त्यामुळे जिल्हावासीयांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक व शिक्षण सभापती सावी लोके यांनी केले आहे. यापुढे दुर्दैवाने जिल्ह्यावर संकट कोसळले तर 54/2 चा अधिकार वापरणार असल्याचेही सौ. नाईक यांनी स्पष्ट केले. येथील जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित रुग्ण आढळला असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समिधा नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन या बातमीचे खंडन केले. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, रवींद्र जठार, शारदा कांबळे, माधुरी बांदेकर, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील उपस्थित होत्या. नाईक म्हणाल्या, ""मुंबई येथील एका युवकाला काल (ता. 15) ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात खबरदारी म्हणून दाखल केले आहे. त्याच्यात कोरोनाशी संबंधित कोणतीही लक्षणे नाहीत. फक्त खबरदारी म्हणून त्याला रुग्णालयात भरती केले आहे. त्याच्या सर्व चाचण्या केलेल्या आहेत. देशात त्यातल्या त्यात महाराष्ट्र व केरळमध्ये कोरोनाचे संशयित रुग्ण जास्त आहेत. खबरदारी घेतल्यास या रोगावर मात करू शकतो. शासन आदेशान्वये शहरातील शाळांना 31 मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे, असेही नाईक म्हणाल्या. अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा कोरोना विषाणूबाबत सर्वच ठिकाणी अलर्ट जारी केला आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणा योग्य ती काळजी घेत आहे. त्याला स्थानिक जनतेने सहकार्य करणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर कोरोना विषाणूबाबत चुकीच्या पोस्ट करून जनतेत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. तसे दोन गुन्हे राज्यात देखील दाखल झाले आहेत. कोकण आयुक्तांनी आज व्हिसीमध्ये असे प्रकार सिंधुदुर्गात आढळल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील यांनी दिली काय आहे 54/2 जिल्ह्यात मोठे संकट कोसळल्यास त्यावर मात करून आवश्यक ती मदत करता यावी, यासाठी शासनाने 54/2 हा हेड निर्माण केला आहे. याचे अधिकार जिल्हा परिषद अध्यक्ष यांना शासनाने दिले आहेत. दुर्दैवाने अशी गंभीर स्थिती उद्भवल्यास 54/2 चा वापर करणार असल्याची माहिती अध्यक्षा नाईक यांनी दिली. जिल्ह्यातील शाळांसह महाविद्यालये 31 पर्यंत बंद कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तशी माहिती शिक्षण सभापती सावी लोके यांनी दिली. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आवश्यक ती खबरदारी घेत आहे. तेवढीच येथील जनतेनेही खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 16, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/33orV2O Read More Read more No comments:
Coronavirus: पुण्यात आजपासून तीन दिवस व्यापार बंद किराणा, दूध, भाजीपाला, औषधी दुकानांना वगळले पुणे - शहरातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून (मंगळवार) तीन दिवस व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघाने घेतला आहे. महासंघाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गुरुवारपर्यंत (ता. 19) शहरातील घाऊक आणि किरकोळ व्यापार बंद राहणार आहे. मात्र, या बंदमधून जीवनावश्यक वस्तू किराणा, दूध, भाजीपाला, औषधी दुकाने आदींना वगळण्यात आले आहे. - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप तीन दिवसांनंतर शहरातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय येत्या गुरुवारच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. बैठकीस सराफ, होजिअरी, कापड, ऑटोमोबाईल, प्लायवूड, स्टील, नॉन फेरस मेटल, पेपर, प्लॅस्टिक, इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक, मशिनरी व वेल्डिंग, कॉम्प्युटर, टॉईज, वॉच, सायकल, केमिकल आदी व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, वरिष्ठ उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, उपाध्यक्ष रतन किराड, सचिव महेंद्र पितळीया, सहसचिव हेमंत शहा, सहसचिव जयंत शेटे, खजिनदार मनोज सारडा, मोहन पटेल, दीपक शहा, शांतिलाल ओसवाल, नितीन काकडे, बॉबी माईनी, रवी जसनानी, सुरेश जेठवानी, प्रसाद देशपांडे, उमेश झंवर, मंगेश भालेराव, बक्षीसिंग तलवार, अभय गाडगीळ, सुरेश पोळेकर, प्रमोद चव्हाण आदी बैठकीस उपस्थित होते. - कोरेगाव भीमा : नवलखा, तेलतुंबडे यांच्या अडचणीत वाढ; सुप्रीम कोर्टाचे आदेश हे चालू राहणार - किराणा दुकान - औषधी दुकान - दूध डेअरी - फळे, भाजीपाला हे बंद राहणार - कापड दुकान - हार्डवेअर - मोबाईल शॉपी - स्टेशनरी आणि कटलरी - सराफी दुकान - इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स जीवनावश्यक वस्तूंअभावी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी येथील भुसार बाजार सुरूच ठेवण्यात येणार आहे. यामुळे बंदच्या काळातही किराणा माल, गूळ, भुसार आदी क्षेत्रातील व्यापार सुरळीतपणे सुरू राहणार आहे. - पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, दी पूना मर्चंट्स चेंबर या बंदमधून जीवनावश्यक वस्तू आणि औषधांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे भाजीपाला, दूध आणि औषधांची दुकाने नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. - फत्तेचंद रांका, अध्यक्ष, व्यापारी महासंघ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 16, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/38OZUTm Read More Read more No comments:
Video : द्रवपदार्थ घ्या, सशक्त राहा... आपण आरोग्याचा विचार करतो, तेव्हा शरीरात पाण्याचे पुरेसे प्रमाण (Hydrated) ठेवणे गरजेचे असते. विशेषत: उन्हाळ्यात त्याची अधिक गरज असते. - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुरेसे पाणी पिल्यामुळे खालील फायदे होतात. शरीराचे तापमान नियंत्रित राहते. शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोषक घटक वाहून नेण्याचे काम पाणी करते. शरीरपेशींमधील विषारी घटक बाहेर पडतात. शरीरात द्रव पदार्थांची पातळी राखली जाते. त्यामुळे, मानसिक सावधानता, एकाग्रता,विश्लेषणाची क्षमता चांगली राहते. पचन चांगले होते. त्वचेच्या पेशी पुनरुज्जीवित होतात. त्यांची लवचिकता वाढते. त्यातून वय वाढण्याची प्रक्रिया रोखली जाते. डोकेदुखी कमी होते. पाणी पिण्याविषयी थोडेसे... स्वत:च्या शरीरात पाण्याचे पुरेसे प्रमाण ठेवा. तहान लागण्याची वाट पाहू नका. दररोज तीनचार लिटर पाणी प्या. हवामान, ऋतू किंवा वैद्यकीय स्थितीवर ते अवलंबून असते. दिवसभरात सारख्या प्रमाणात पाणी प्यायला हवे. आपले शरीर श्वाच्छोश्वास, घाम आणि पचनाच्या माध्यमातून पाणी बाहेर टाकत असते. त्यामुळे, पाणी पिऊन शरीरात त्याचे पुरेसे प्रमाण राखणे महत्त्वाचे आहे. आपण पाण्यामध्ये अतिरिक्त पोषकद्रव्ये टाकूनही ते आणखी पोषक बनवू शकतो. 10 SUPER HEALTHY द्रव पदार्थ कोमट पाणी + ताज्या लिंबाचा रस (लिंबू कापल्यानंतर त्यातील पोषक घटक कमी व्हायला लगेच सुरवात होते. त्यामुळे, फक्त ताज्या लिंबांचाच वापर करा.) प्रतिकारशक्ती वाढते. आवळा सरबत आवळाही प्रतिकारशक्ती वाढवतो. विविध संसर्गांपासून रक्षण करतो. कोणत्याही स्वरूपातील आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते. नारळपाणी यामध्ये ‘ब’, ‘क’ ही जीवनसत्वे, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आदी घटक असतात. हळद व काळीमिरीचे पाणी हळदीमध्ये करक्युमिन हा महत्त्वाचा पिवळा पदार्थ असतो. तो आपल्या शरीराला ॲटिऑक्सिडंट एंझाईम्स प्रक्रियेत मदत करतो. काळीमिरी तो शोषण्यात मदत करते. ताक आले, काळीमिरी, पुदिना घातलेले ताक प्या. ते प्रतिकारशक्ती वाढवते. आल्याचे पाणी ताज्या आल्यामध्ये जिंजेरोल हा संसर्गाविरुद्ध लढणारा पदार्थ असतो. त्यामुळे, नेहमी ताज्या आल्याचे तुकडे यासाठी वापरावेत.जिंजेरोल संसर्गाचा धोका कमी करतो. ग्रीन टी तुळशीची ताजी पाने, पुदिना घातलेला ग्रीन टी अधिक फायदेशीर असतो. वातावरणातील घटकांमुळे शरीरावर विषाणूंनी हल्ला केल्यावर ॲटिऑक्सिडंट ॲक्टिव्हिटींची तुमच्या शरीराला मदत होते. दालचिनीचा चहा दालचिनीही ॲटिऑक्सिडंट असते. मधुमेहावरही ती गुणकारी असून, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते. सूप्स : घरगुती आणि कोमट तुम्ही ब्रोकोली, लाल सिमला मिरची आणि पालक घालून घरामध्येच कोमट सूप अधिक पौष्टिक बनवू शकता. बदाम मिल्कशेक (सब्जाचे भिजवलेले बी, एक चमचा सूर्यफ्लॉवरचे बी किंवा जवस घालून हा मिल्कशेक तयार करा.) यामध्ये प्रथिने, ई जीवनसत्त्व आणि ओमेगा ३ फॅटी ॲसिड असते. त्यामुळे, तुमचे शरीर मजबूत होण्यात मदत होते. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 16, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2xKHNkD Read More Read more No comments:
इस्कॉन मंदिर में खत्म हुआ सैनिटाइजर तो हाथ साफ करने के लिए दिया गोमूत्र https://ift.tt/38SRmLi Latest news updates March 16, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
सोने की कीमत में भारी गिरावट, क्या यही है निवेश का सही मौका? https://ift.tt/38P6VUh Latest news updates March 15, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
Cancelled Trains: आज 400 से ज्यादा ट्रेनें रद्द, देखें पूरी लिस्ट https://ift.tt/2IPKyUc Latest news updates March 15, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
Horoscope Today, 16 March: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/38P4pxj Latest news updates March 15, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
हाथ धोएं-भीड़ में जाने से बचें, कोरोना पर सरकार ने सुझाए 10 उपाय https://ift.tt/2QlNL1U Latest news updates March 15, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
CM योगी @3: योगी आदित्यनाथ के वो बयान जिन्हें सुनकर लोग हुए हैरान https://ift.tt/2x0qCuO Latest news updates March 15, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
कोरोना: श्राइन बोर्ड की एडवाइजरी, घोषणा पत्र भरना हुआ जरूरी https://ift.tt/38RGb5p Latest news updates March 15, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments: