Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 14, 2020

सन्डे स्टार्टअप : बीडच्या तरुणाचे 'समजदार श्रीकांत' आता औरंगाबादेतून

औरंगाबाद : आपल्याला शेतकऱ्याला सुटाबुटात काम करताना पाहायचे आहे, असे म्हणणाऱ्या नामदेव आणेराव या तरुणाने एक चांगला स्टार्टअप सुरू केला आहे. शिकून दुसऱ्याकडे नोकरी करण्यात अनेकजण धन्यता मानतात. मात्र, पिंपळनेर (ता. बीड) येथील या अल्पशिक्षित शेतकरीपुत्राने स्वतःचा कारखाना उभारण्याचा करिष्मा केला आहे. आणि आता औरंगाबादेत हा कारखाना लॉन्च होत आहे. 

'समजदार ऍग्रो इक्विपमेंट' या शेतकरी उत्पादन कारखान्याची सुरवात वर्षभरापूर्वी झाली. याची सुरवात झाली, ती एका प्रयोगातून. नामदेव आणेराव यांनी शेत नांगरणारे 'श्रीकांत' नावाचे यंत्र तयार केले आणि त्यावर तीन वर्षे प्रयोग केले. याचे त्यांनी 'पेटंट'ही मिळविले. आता हे यंत्र व्यावसायिक स्वरूपात तयार करण्यासाठी नामदेव आणेराव सज्ज आहेत.

तुम्ही एलआयसी पॉलिसी काढली असेल, तर आधी हे वाचा

बैलजोडीच्या साहाय्याने जेवढी कामे एका शेतकऱ्याला करावी लागतात, तेवढीच कामे चारा-पाण्याच्या खर्चापेक्षा स्वस्तात करणारे यंत्र नामदेव आणेराव यांनी तयार केले आहे. वडील शेतात काम करीत असताना मनुष्यबळाअभावी थांबणाऱ्या कामातून ही संकल्पना आपल्याला सुचल्याचे नामदेव यांनी सांगितले. या कारखान्यात अनेक तरुणांना रोजगार मिळाला असून, गावातील हे तरुण आता हा कारखाना चालवतात. 

'मॅजिक'चा भक्कम पाठिंबा 

'सीएमआयए'च्या मराठवाडा ऍक्‍सिलरेटर फॉर ग्रोथ ऍण्ड इन्क्‍युबेशन कौन्सील (मॅजिक) या संस्थेने गेल्या चार वर्षांपासून या उद्योग उभारणीसाठी आणेराव यांना मदत केली आहे. संकल्पनेला बळ, आर्थिक रसद, कारखाना चालविण्याच्या तंत्राविषयीचे मार्गदर्शन मेंटॉर प्रसाद कोकीळ, सुनील रायठठ्ठा, मिलिंद कंक, आशिष गर्दे आदींनी त्यांना केले आहे. 

मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच

ग्राहकालाच केले भागीदार

ग्राहकाला भागिदारी देण्याचे काम नामदेव आणेराव यांनी केले. त्यांना कंपनीचे शेअर्स दिले आणि त्यातून पैसा उभा केला. यातून उभा राहिलेला पैसा घेऊन वेल्डिंगच्या कामात पारंगत असलेले नामदेव यांनी आपल्या कंपनीचे शेड उभे करून कामाची सुरवात केली आहे. आतापर्यंत त्यांनी १३ यंत्रांची ऑर्डर पूर्ण केली आहे. 

शासनाची सबसिडीही लागू

आणेराव यांच्या 'समजदार श्रीकांत'ला पश्चिम महाराष्ट्रातून मोठी मागणी आहे. त्यांना आतापर्यंत १६३ यंत्रांची ऑर्डर मिळाली असून, या यंत्रांना शासनाची ४० टक्के सबसिडीदेखील लागू झाली आहे. 

औरंगाबादेत होणार जोडणी

बीडमधल्या आपल्या लहानशा गावात राहून ही ऑर्डर पूर्ण करणे आता शक्य होणार नाही. त्यामुळे हा कारखानाच आता औरंगाबादला हलवण्याचे काम सुरू आहे. तसेच ही ऑर्डर वेळेत पूर्ण करण्यासाठी गुजरातच्या एका कंपनीची मदत घेतली जाणार आहे. यंत्राचे कास्टिंग आणि फोर्जिंग गुजरातमधील कंपनीकडून करून घेत औरंगाबादेत त्याची जोडणी करण्यात येणार असल्याचे नामदेव आणेराव यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सन्डे स्टार्टअप : बीडच्या तरुणाचे 'समजदार श्रीकांत' आता औरंगाबादेतून औरंगाबाद : आपल्याला शेतकऱ्याला सुटाबुटात काम करताना पाहायचे आहे, असे म्हणणाऱ्या नामदेव आणेराव या तरुणाने एक चांगला स्टार्टअप सुरू केला आहे. शिकून दुसऱ्याकडे नोकरी करण्यात अनेकजण धन्यता मानतात. मात्र, पिंपळनेर (ता. बीड) येथील या अल्पशिक्षित शेतकरीपुत्राने स्वतःचा कारखाना उभारण्याचा करिष्मा केला आहे. आणि आता औरंगाबादेत हा कारखाना लॉन्च होत आहे.  'समजदार ऍग्रो इक्विपमेंट' या शेतकरी उत्पादन कारखान्याची सुरवात वर्षभरापूर्वी झाली. याची सुरवात झाली, ती एका प्रयोगातून. नामदेव आणेराव यांनी शेत नांगरणारे 'श्रीकांत' नावाचे यंत्र तयार केले आणि त्यावर तीन वर्षे प्रयोग केले. याचे त्यांनी 'पेटंट'ही मिळविले. आता हे यंत्र व्यावसायिक स्वरूपात तयार करण्यासाठी नामदेव आणेराव सज्ज आहेत. तुम्ही एलआयसी पॉलिसी काढली असेल, तर आधी हे वाचा बैलजोडीच्या साहाय्याने जेवढी कामे एका शेतकऱ्याला करावी लागतात, तेवढीच कामे चारा-पाण्याच्या खर्चापेक्षा स्वस्तात करणारे यंत्र नामदेव आणेराव यांनी तयार केले आहे. वडील शेतात काम करीत असताना मनुष्यबळाअभावी थांबणाऱ्या कामातून ही संकल्पना आपल्याला सुचल्याचे नामदेव यांनी सांगितले. या कारखान्यात अनेक तरुणांना रोजगार मिळाला असून, गावातील हे तरुण आता हा कारखाना चालवतात.  'मॅजिक'चा भक्कम पाठिंबा  'सीएमआयए'च्या मराठवाडा ऍक्‍सिलरेटर फॉर ग्रोथ ऍण्ड इन्क्‍युबेशन कौन्सील (मॅजिक) या संस्थेने गेल्या चार वर्षांपासून या उद्योग उभारणीसाठी आणेराव यांना मदत केली आहे. संकल्पनेला बळ, आर्थिक रसद, कारखाना चालविण्याच्या तंत्राविषयीचे मार्गदर्शन मेंटॉर प्रसाद कोकीळ, सुनील रायठठ्ठा, मिलिंद कंक, आशिष गर्दे आदींनी त्यांना केले आहे.  मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच ग्राहकालाच केले भागीदार ग्राहकाला भागिदारी देण्याचे काम नामदेव आणेराव यांनी केले. त्यांना कंपनीचे शेअर्स दिले आणि त्यातून पैसा उभा केला. यातून उभा राहिलेला पैसा घेऊन वेल्डिंगच्या कामात पारंगत असलेले नामदेव यांनी आपल्या कंपनीचे शेड उभे करून कामाची सुरवात केली आहे. आतापर्यंत त्यांनी १३ यंत्रांची ऑर्डर पूर्ण केली आहे.  शासनाची सबसिडीही लागू आणेराव यांच्या 'समजदार श्रीकांत'ला पश्चिम महाराष्ट्रातून मोठी मागणी आहे. त्यांना आतापर्यंत १६३ यंत्रांची ऑर्डर मिळाली असून, या यंत्रांना शासनाची ४० टक्के सबसिडीदेखील लागू झाली आहे.  औरंगाबादेत होणार जोडणी बीडमधल्या आपल्या लहानशा गावात राहून ही ऑर्डर पूर्ण करणे आता शक्य होणार नाही. त्यामुळे हा कारखानाच आता औरंगाबादला हलवण्याचे काम सुरू आहे. तसेच ही ऑर्डर वेळेत पूर्ण करण्यासाठी गुजरातच्या एका कंपनीची मदत घेतली जाणार आहे. यंत्राचे कास्टिंग आणि फोर्जिंग गुजरातमधील कंपनीकडून करून घेत औरंगाबादेत त्याची जोडणी करण्यात येणार असल्याचे नामदेव आणेराव यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TO5Ur4
Read More
#WeCareForPune : घाबरू नका, वैद्यकीय सल्ला घ्या

पुणे - तुम्ही परदेशात गेलेला नाही, परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातही आलेला नाही, तर तुम्ही कोरोनाच्या संसर्गाला घाबरू नका. सर्दी, खोकला असला तर काळजी घ्या. तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या. जर परदेशातून येऊन सर्दी, खोकला, ताप असल्यास तातडीने महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सध्या हवामानात बदल होत आहे. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. त्यातच दिवसा उन्हाचा चटका आणि पहाटे गारठा असे वातावरण पुणेकर सध्या अनुभवताना दिसतात, त्यामुळे सामान्यतः सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. नेमक्‍या, याच वेळी कोरोनाचे रुग्ण पुणे शहर आणि पिंपरी- चिंचवडमध्ये आढळले आहेत. सर्दी, खोकला, ताप अशीच या आजाराची लक्षणे आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसते. त्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य खात्याने हे आवाहन केले आहे. 

Corona Updates : देशात रुग्णांच्या संख्येत वाढ; पुण्यात नवीन रुग्ण नाही

परदेशात प्रवास केलाय?
परदेश प्रवास किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तीशी गेल्या काही दिवसांमध्ये संपर्क या दोन निकषांवर कोणी कोणत्या दवाखान्यात जायचं हे आता निश्‍चित केलं आहे. परदेश प्रवास किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तीशी संपर्क आलेल्यांनी आणि कोरोनाची लक्षणे दिसत असणाऱ्यांनी पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या दोन्ही निकषांमध्ये न बसणाऱ्यांनी इतर कोणत्याही वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

काम असेल तरच ऑफिसला या; राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त पुण्यात!

स्वॅब घेणे म्हणजे काय?
घशातील द्रवपदार्थाचा नमुना तपासणीसाठी घेण्याच्या प्रक्रियेला वैद्यकीय परिभाषेत स्वाब घेणे म्हणतात. हा स्वॅब तपासण्यासाठी ‘एनआयव्ही’ला पाठविला जातो. त्याच्या आधारावर त्या रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे किंवा नाही याचे निश्‍चित निदान होते.

खासगी रुग्णालयांचे सहकार्य
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढल्यास खासगी रुग्णालयांची मदत घेण्यात येणार आहे, त्यासाठी दहा रुग्णालयांची तपासणी करून तेथे आपत्कालीन व्यवस्थेत रुग्णांना दाखल केले जाईल. या दहा रुग्णालयांमधील ४२ खाटा राखून ठेवण्यात आल्या आहेत.

विलगीकरण कक्ष कुठे आहेत?
सिंहगड रस्त्यावर वडगावमधील राजयोग सोसायटीच्या परिसरातील लायगुडे रुग्णालयात आणि सारस बागेजवळील सणस मैदानाच्या परिसरात विलगीकरण कक्ष सुरू केले आहेत. परदेशातून आलेल्या नागरिकांना कोणतीही लक्षणे दिसल्यास त्यांना येथे ठेवले जाईल. त्यांचा त्रास वाढल्यास त्यांना डॉ. नायडू रुग्णालयात दाखल करण्यात येईल. या प्रत्येक ठिकाणी ४० जणांची निवासाची व्यवस्था सज्ज ठेवली आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

#WeCareForPune : घाबरू नका, वैद्यकीय सल्ला घ्या पुणे - तुम्ही परदेशात गेलेला नाही, परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातही आलेला नाही, तर तुम्ही कोरोनाच्या संसर्गाला घाबरू नका. सर्दी, खोकला असला तर काळजी घ्या. तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या. जर परदेशातून येऊन सर्दी, खोकला, ताप असल्यास तातडीने महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे. आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  सध्या हवामानात बदल होत आहे. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. त्यातच दिवसा उन्हाचा चटका आणि पहाटे गारठा असे वातावरण पुणेकर सध्या अनुभवताना दिसतात, त्यामुळे सामान्यतः सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. नेमक्‍या, याच वेळी कोरोनाचे रुग्ण पुणे शहर आणि पिंपरी- चिंचवडमध्ये आढळले आहेत. सर्दी, खोकला, ताप अशीच या आजाराची लक्षणे आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसते. त्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य खात्याने हे आवाहन केले आहे.  Corona Updates : देशात रुग्णांच्या संख्येत वाढ; पुण्यात नवीन रुग्ण नाही परदेशात प्रवास केलाय? परदेश प्रवास किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तीशी गेल्या काही दिवसांमध्ये संपर्क या दोन निकषांवर कोणी कोणत्या दवाखान्यात जायचं हे आता निश्‍चित केलं आहे. परदेश प्रवास किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तीशी संपर्क आलेल्यांनी आणि कोरोनाची लक्षणे दिसत असणाऱ्यांनी पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या दोन्ही निकषांमध्ये न बसणाऱ्यांनी इतर कोणत्याही वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. काम असेल तरच ऑफिसला या; राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त पुण्यात! स्वॅब घेणे म्हणजे काय? घशातील द्रवपदार्थाचा नमुना तपासणीसाठी घेण्याच्या प्रक्रियेला वैद्यकीय परिभाषेत स्वाब घेणे म्हणतात. हा स्वॅब तपासण्यासाठी ‘एनआयव्ही’ला पाठविला जातो. त्याच्या आधारावर त्या रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे किंवा नाही याचे निश्‍चित निदान होते. खासगी रुग्णालयांचे सहकार्य कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढल्यास खासगी रुग्णालयांची मदत घेण्यात येणार आहे, त्यासाठी दहा रुग्णालयांची तपासणी करून तेथे आपत्कालीन व्यवस्थेत रुग्णांना दाखल केले जाईल. या दहा रुग्णालयांमधील ४२ खाटा राखून ठेवण्यात आल्या आहेत. विलगीकरण कक्ष कुठे आहेत? सिंहगड रस्त्यावर वडगावमधील राजयोग सोसायटीच्या परिसरातील लायगुडे रुग्णालयात आणि सारस बागेजवळील सणस मैदानाच्या परिसरात विलगीकरण कक्ष सुरू केले आहेत. परदेशातून आलेल्या नागरिकांना कोणतीही लक्षणे दिसल्यास त्यांना येथे ठेवले जाईल. त्यांचा त्रास वाढल्यास त्यांना डॉ. नायडू रुग्णालयात दाखल करण्यात येईल. या प्रत्येक ठिकाणी ४० जणांची निवासाची व्यवस्था सज्ज ठेवली आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2WaXtYB
Read More
कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायाला असा बसतोय फटका
भारत में 100 पार हुई कोरोना मरीजों की संख्या, पाकिस्तान बॉर्डर भी होगा सील https://ift.tt/3d2tpnM
पुणे- रांजणगाव प्रवास कधी होणार सुसाट ?

पुणे- नगर रस्त्यावर प्रवास करताना पुणे महापालिका हद्दीनंतर सुरू होणारा पुणे- रांजणगाव टप्पा प्रवाशांना सर्वाधिक त्रासदायक ठरत आहे. या टप्प्यात रोजच कुठे ना कुठे वाहतूक कोंडीत अडकवण्याचा अनुभव प्रवाशांना येतोच. या वाहतूक कोंडीची कारणे व त्यातून सुटका होण्यासाठी करण्याच्या उपाययोजनांचा आढावा...

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

खांदवेनगरला वॉर्डन हवा 
खांदवेनगरकडे वळणाऱ्या वाहनांमुळे कोंडी वाढते. या मधल्या टप्प्यात दुभाजकच नसल्याने पूर्वी समांतर रांगा लागून फारच कोंडी होत असे. मात्र काही स्थानिक उद्योजकांनी पुढाकार घेत येथे तात्पुरत्या स्वरूपात लोखंडी बॅरिगेट्‌स उभे केल्याने वाहतूक कोंडी कमी झाली. परंतु या टप्प्यात कायमस्वरूपी मोठ्या दुभाजकासह वळणाऱ्या वाहनांसाठी भुयारी मार्ग अथवा उड्डाण पुलाची गरज आहे. तसेच सध्या पोलिस वा ट्रॅफिक वॉर्डनची गरज आहे.  

Corona Updates : देशात रुग्णांच्या संख्येत वाढ; पुण्यात नवीन रुग्ण नाही

लोणीकंद व तुळापूर फाटा चौक प्रशस्त करावा
मरकळ औद्योगिक क्षेत्र व थेऊरकडे ये- जा करणारी जडवाहने लोणीकंद व तुळापूर फाटा या दोन्ही चौकांत वळत असतात. त्यामुळे पुणे व नगर बाजूकडील वाहनांच्या रांगा लागून प्रामुख्याने कोंडी होते. त्यातच तुळापूर फाटा चौकात हॉटेल व्यावसायिकांमुळे थांबणाऱ्या वाहनांचे व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळेही कोंडी वाढते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हे दोन्ही चौक अधिक प्रशस्त करण्याची व या दोन्ही ठिकाणी उड्डाण पूल किंवा भुयारी मार्गाचीच गरज आहे. 

काम असेल तरच ऑफिसला या; राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त पुण्यात!

साचणाऱ्या पाण्याबाबत कोरेगावात उपाय करावा
कोरेगाव येथे वढू बुद्रूक व पुढे ढेरंगेवस्ती व डिंग्रजवाडीकडे ये- जा करणाऱ्या वाहनांमुळे कोरेगावचा वढू चौक व डिंग्रजवाडी फाटा चौकात सायंकाळी काही प्रमाणात कोंडी होते. गावातील मुख्य रस्त्यावर पावसाळ्यात साठणाऱ्या पाण्यामुळेही पुणे व नगर बाजूकडे वाहनांच्या रांगा लागून मोठ्या प्रमाणात कोंडी होते. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने ड्रेनेजसह इतर काम सुरू केले आहे. मात्र पावसाळ्यात येथे साचणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार ठोस उपाययोजनेची गरज आहे. 

आर्थिक वादातून दांम्पत्यावर धारदार शस्त्राने वार; दोघे गंभीर जखमी

ठिकठिकाणी उड्डाण पुलांची गरज 
पुणे- शिरूर मार्गावर वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी रस्ता रुंदीकरण किंवा उड्डाण पूल हे प्रमुख पर्याय असले; तरीही आठपदरीकरणाच्या कामासाठी भूसंपादनाला लागणारा खर्च व वेळ लक्षात घेता ताब्यात असलेल्या जागेवर रुंदीकरण आणि वाघोली, कोरेगाव भीमा व शिक्रापूरसारख्या गर्दीच्या ठिकाणी उड्डाण पूल हे व्यवहारी पर्याय आहेत. यापूर्वी बीओटी तत्त्वावर सुमारे अडीच हजार कोटी रुपये खर्चाचा वाघोली ते शिक्रापूर हा सलग अंतराचा उड्डाण पूल प्रस्तावित होता. हा पर्याय त्यावेळी आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने रेंगाळला. मात्र आता सर्वत्र होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे या सलग अंतराच्या उड्डाण पुलाची गरज आहे.

रांजणगावपर्यंत मेट्रो हवी
सध्या वेगवान प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने पुणे शहराच्या चोहोबाजूने मेट्रोचे जाळे वाढत आहे. मोठ्या शहरात उड्डाण पुलाचा खर्च व मर्यादेच्या तुलनेत मेट्रोची उपयुक्तता व सुलभता लक्षात घेता नगर रस्त्यावरही मेट्रोचा विस्तार प्रथम वाघोली, नंतर शिक्रापूर व पुढे रांजणगावपर्यंत झाल्यास वेगवान प्रवासी वाहतुकीचा मार्ग खुला होईल, तसेच औद्योगिक विकासालाही वेग येईल.

वाघोली- लोणीकंद बायपास सुरू करावा  
पुणे- शिरूर टप्प्यात वाघोलीतील वाहतूक कोंडी प्रवाशांना अतिशय त्रासदायक वाटते. रस्त्यालगतच्या टपरी, हॉटेल व्यावसायिकांच्या ग्राहकांची वाहने आणि खासगी व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे बेशिस्त पार्किंगवरही पोलिसांकडून सातत्याने कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र या प्रश्‍नावर आवाज उठवल्यामुळे या ठिकाणी रुंदीकरणाची कार्यवाही सुरू झाली आहे, ही समाधानाची बाब आहे. गावात किमान सहापदरीकरणाबरोबरच उंच व आकर्षक दुभाजक, सिग्नल यंत्रणा, ड्रेनेज यासह अंतर्गत रस्तेही पक्के व प्रशस्त करण्याच्या कामांना वेग आला आहे. मात्र येथे चोहोबाजूंनी वेगाने वाढणारी लोकवस्ती व केसनंदचा औद्योगिक परिसर लक्षात घेऊन या कामास आणखी गती देण्याबरोबरच येथून जुना जकातनाका येथे निघणारा पर्यायी मार्ग व बरेचसे काम झालेला वाघोली- लोणीकंद बायपास मार्गही सुरू करण्याची गरज आहे. वाघेश्‍वर मंदिर, छत्रपती शिवाजी पुतळा चौक, केसनंद फाटा येथे वाहतुकीमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी नागरिक यांची मोठी कसरत होते.

पेरणे फाटा व विजयस्तंभ चौकात उड्डाण पूल हवा
पेरणे व वढू खुर्द गावाकडे ये- जा करणारी वाहने पेरणेफाटा व विजयस्तंभ चौकात वळत असतात. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागून कोंडी होते. पेरणे फाटा चौकात रस्त्यालगतचे भाजीपाला व्यावसायिक, टपरीचालक, हॉटेल यांच्या ग्राहकांची वाहने व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे बेशिस्त पार्किंग विरुद्ध दिशेने येणारी वाहने, यामुळेही कोंडी वाढते. यावर ठोस तोडगा काढण्यासाठी रस्ता रुंदीकरणासह उड्डाण पूल हा पर्याय ठरेल.

सणसवाडी फाटा चौकातील बाजारामुळे होतेय कोंडी 
सणसवाडी फाटा येथेही मुख्य रस्त्यावर सायंकाळी भरणारा बाजार आणि हातगाडी व विक्रेत्यांची थांबणारी वाहने, अवैध प्रवासी वाहनांमुळे सायंकाळी कोंडी वाढते. तसेच, नरेश्‍वर व इस्पात रस्त्याकडे आणि सणसवाडी गावाकडे ये- जा करणाऱ्या वाहनांमुळे सणसवाडी फाटा चौकात सायंकाळी काही प्रमाणात कोंडी होते. येथेही उड्डाण पूल हाच योग्य पर्याय ठरेल. 

शिक्रापूर, रांजणगावात बेशिस्त पार्किंगचा फटका 
वाघोली पाठोपाठ सर्वाधिक वर्दळीचे चौक म्हणून शिक्रापुरातील चाकण चौक, पाबळ चौक हे ओळखले जातात. येथेही मुख्य रस्त्यालगत थांबणाऱ्या लाब पल्ल्यांच्या प्रवासी बस, अवैध प्रवासी वाहने, हातगाडी, विक्रेत्यांची गर्दी, ग्राहकांची वाहने, बेशिस्त पार्किंग, यामुळे सायंकाळी कोंडी वाढते. तसेच श्री क्षेत्र रांजणगाव येथे महागणपती दर्शनासाठी येणारे भाविक व पंचतारांकित वसाहतीमुळे वाहनांची मोठी गर्दी असते. सकाळी व सायंकाळी रांजणगाव, कारेगाव, सरदवाडी येथे कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसही मोठ्या प्रमाणात असतात. मोठ्या प्रमाणावर राहण्यासाठी आलेल्या कामगारांची कारेगावात वर्दळ असते.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणे- रांजणगाव प्रवास कधी होणार सुसाट ? पुणे- नगर रस्त्यावर प्रवास करताना पुणे महापालिका हद्दीनंतर सुरू होणारा पुणे- रांजणगाव टप्पा प्रवाशांना सर्वाधिक त्रासदायक ठरत आहे. या टप्प्यात रोजच कुठे ना कुठे वाहतूक कोंडीत अडकवण्याचा अनुभव प्रवाशांना येतोच. या वाहतूक कोंडीची कारणे व त्यातून सुटका होण्यासाठी करण्याच्या उपाययोजनांचा आढावा... आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  खांदवेनगरला वॉर्डन हवा  खांदवेनगरकडे वळणाऱ्या वाहनांमुळे कोंडी वाढते. या मधल्या टप्प्यात दुभाजकच नसल्याने पूर्वी समांतर रांगा लागून फारच कोंडी होत असे. मात्र काही स्थानिक उद्योजकांनी पुढाकार घेत येथे तात्पुरत्या स्वरूपात लोखंडी बॅरिगेट्‌स उभे केल्याने वाहतूक कोंडी कमी झाली. परंतु या टप्प्यात कायमस्वरूपी मोठ्या दुभाजकासह वळणाऱ्या वाहनांसाठी भुयारी मार्ग अथवा उड्डाण पुलाची गरज आहे. तसेच सध्या पोलिस वा ट्रॅफिक वॉर्डनची गरज आहे.   Corona Updates : देशात रुग्णांच्या संख्येत वाढ; पुण्यात नवीन रुग्ण नाही लोणीकंद व तुळापूर फाटा चौक प्रशस्त करावा मरकळ औद्योगिक क्षेत्र व थेऊरकडे ये- जा करणारी जडवाहने लोणीकंद व तुळापूर फाटा या दोन्ही चौकांत वळत असतात. त्यामुळे पुणे व नगर बाजूकडील वाहनांच्या रांगा लागून प्रामुख्याने कोंडी होते. त्यातच तुळापूर फाटा चौकात हॉटेल व्यावसायिकांमुळे थांबणाऱ्या वाहनांचे व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळेही कोंडी वाढते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हे दोन्ही चौक अधिक प्रशस्त करण्याची व या दोन्ही ठिकाणी उड्डाण पूल किंवा भुयारी मार्गाचीच गरज आहे.  काम असेल तरच ऑफिसला या; राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त पुण्यात! साचणाऱ्या पाण्याबाबत कोरेगावात उपाय करावा कोरेगाव येथे वढू बुद्रूक व पुढे ढेरंगेवस्ती व डिंग्रजवाडीकडे ये- जा करणाऱ्या वाहनांमुळे कोरेगावचा वढू चौक व डिंग्रजवाडी फाटा चौकात सायंकाळी काही प्रमाणात कोंडी होते. गावातील मुख्य रस्त्यावर पावसाळ्यात साठणाऱ्या पाण्यामुळेही पुणे व नगर बाजूकडे वाहनांच्या रांगा लागून मोठ्या प्रमाणात कोंडी होते. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने ड्रेनेजसह इतर काम सुरू केले आहे. मात्र पावसाळ्यात येथे साचणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार ठोस उपाययोजनेची गरज आहे.  आर्थिक वादातून दांम्पत्यावर धारदार शस्त्राने वार; दोघे गंभीर जखमी ठिकठिकाणी उड्डाण पुलांची गरज  पुणे- शिरूर मार्गावर वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी रस्ता रुंदीकरण किंवा उड्डाण पूल हे प्रमुख पर्याय असले; तरीही आठपदरीकरणाच्या कामासाठी भूसंपादनाला लागणारा खर्च व वेळ लक्षात घेता ताब्यात असलेल्या जागेवर रुंदीकरण आणि वाघोली, कोरेगाव भीमा व शिक्रापूरसारख्या गर्दीच्या ठिकाणी उड्डाण पूल हे व्यवहारी पर्याय आहेत. यापूर्वी बीओटी तत्त्वावर सुमारे अडीच हजार कोटी रुपये खर्चाचा वाघोली ते शिक्रापूर हा सलग अंतराचा उड्डाण पूल प्रस्तावित होता. हा पर्याय त्यावेळी आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने रेंगाळला. मात्र आता सर्वत्र होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे या सलग अंतराच्या उड्डाण पुलाची गरज आहे. रांजणगावपर्यंत मेट्रो हवी सध्या वेगवान प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने पुणे शहराच्या चोहोबाजूने मेट्रोचे जाळे वाढत आहे. मोठ्या शहरात उड्डाण पुलाचा खर्च व मर्यादेच्या तुलनेत मेट्रोची उपयुक्तता व सुलभता लक्षात घेता नगर रस्त्यावरही मेट्रोचा विस्तार प्रथम वाघोली, नंतर शिक्रापूर व पुढे रांजणगावपर्यंत झाल्यास वेगवान प्रवासी वाहतुकीचा मार्ग खुला होईल, तसेच औद्योगिक विकासालाही वेग येईल. वाघोली- लोणीकंद बायपास सुरू करावा   पुणे- शिरूर टप्प्यात वाघोलीतील वाहतूक कोंडी प्रवाशांना अतिशय त्रासदायक वाटते. रस्त्यालगतच्या टपरी, हॉटेल व्यावसायिकांच्या ग्राहकांची वाहने आणि खासगी व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे बेशिस्त पार्किंगवरही पोलिसांकडून सातत्याने कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र या प्रश्‍नावर आवाज उठवल्यामुळे या ठिकाणी रुंदीकरणाची कार्यवाही सुरू झाली आहे, ही समाधानाची बाब आहे. गावात किमान सहापदरीकरणाबरोबरच उंच व आकर्षक दुभाजक, सिग्नल यंत्रणा, ड्रेनेज यासह अंतर्गत रस्तेही पक्के व प्रशस्त करण्याच्या कामांना वेग आला आहे. मात्र येथे चोहोबाजूंनी वेगाने वाढणारी लोकवस्ती व केसनंदचा औद्योगिक परिसर लक्षात घेऊन या कामास आणखी गती देण्याबरोबरच येथून जुना जकातनाका येथे निघणारा पर्यायी मार्ग व बरेचसे काम झालेला वाघोली- लोणीकंद बायपास मार्गही सुरू करण्याची गरज आहे. वाघेश्‍वर मंदिर, छत्रपती शिवाजी पुतळा चौक, केसनंद फाटा येथे वाहतुकीमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी नागरिक यांची मोठी कसरत होते. पेरणे फाटा व विजयस्तंभ चौकात उड्डाण पूल हवा पेरणे व वढू खुर्द गावाकडे ये- जा करणारी वाहने पेरणेफाटा व विजयस्तंभ चौकात वळत असतात. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागून कोंडी होते. पेरणे फाटा चौकात रस्त्यालगतचे भाजीपाला व्यावसायिक, टपरीचालक, हॉटेल यांच्या ग्राहकांची वाहने व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे बेशिस्त पार्किंग विरुद्ध दिशेने येणारी वाहने, यामुळेही कोंडी वाढते. यावर ठोस तोडगा काढण्यासाठी रस्ता रुंदीकरणासह उड्डाण पूल हा पर्याय ठरेल. सणसवाडी फाटा चौकातील बाजारामुळे होतेय कोंडी  सणसवाडी फाटा येथेही मुख्य रस्त्यावर सायंकाळी भरणारा बाजार आणि हातगाडी व विक्रेत्यांची थांबणारी वाहने, अवैध प्रवासी वाहनांमुळे सायंकाळी कोंडी वाढते. तसेच, नरेश्‍वर व इस्पात रस्त्याकडे आणि सणसवाडी गावाकडे ये- जा करणाऱ्या वाहनांमुळे सणसवाडी फाटा चौकात सायंकाळी काही प्रमाणात कोंडी होते. येथेही उड्डाण पूल हाच योग्य पर्याय ठरेल.  शिक्रापूर, रांजणगावात बेशिस्त पार्किंगचा फटका  वाघोली पाठोपाठ सर्वाधिक वर्दळीचे चौक म्हणून शिक्रापुरातील चाकण चौक, पाबळ चौक हे ओळखले जातात. येथेही मुख्य रस्त्यालगत थांबणाऱ्या लाब पल्ल्यांच्या प्रवासी बस, अवैध प्रवासी वाहने, हातगाडी, विक्रेत्यांची गर्दी, ग्राहकांची वाहने, बेशिस्त पार्किंग, यामुळे सायंकाळी कोंडी वाढते. तसेच श्री क्षेत्र रांजणगाव येथे महागणपती दर्शनासाठी येणारे भाविक व पंचतारांकित वसाहतीमुळे वाहनांची मोठी गर्दी असते. सकाळी व सायंकाळी रांजणगाव, कारेगाव, सरदवाडी येथे कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसही मोठ्या प्रमाणात असतात. मोठ्या प्रमाणावर राहण्यासाठी आलेल्या कामगारांची कारेगावात वर्दळ असते. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cVUARv
Read More
#MokaleVha : नोकरी करण्यास पतीचा विरोध

नोकरी करण्यास पतीचा विरोध
माझे लग्न होऊन दोन वर्षे झाली आहेत. मला एक वर्षाचा मुलगा आहे. मी उच्च पदवीधर आहे. परंतु लग्नाच्या वेळेस माझ्या पतीने मला नोकरी करणारी मुलगी नको आहे, असे सांगितले होते. आपल्याला मूल झाल्यानंतर त्याला तू पूर्ण वेळ द्यावा, अशी त्याची इच्छा होती. मलाही तेव्हा नोकरी करण्याची इच्छा नव्हती. आता मला एका नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळत आहे. माझ्या सासरची मंडळी याबाबत मला प्रोत्साहन देत आहेत. परंतु माझ्या पतीची याला तयारी नाही. नोकरीची एवढी चांगली संधी मी गमावली तर मला पुढे करिअर करणे अवघड होऊन जाणार आहे. म्हणूनच माझे सासरचे सर्व मला मदत करण्यास तयार आहेत. परंतु मी ही नोकरी मिळवली तर माझ्या पतीचा विश्‍वास गमवल्यासारखे होईल. मी नक्की काय करावे हे मला समजत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.

नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न करायचे नाही, असे बऱ्याच मुलांचे म्हणणे असते. कारण नोकरी करणारी मुलगी घरामध्ये लक्ष देत नाही, मुलांकडे तिचे लक्ष नसते, असा त्यांचा समज असतो. परंतु नोकरी आणि करिअर करणाऱ्या मुलीही व्यवस्थित संसार करू शकतात आणि चांगला समतोल ठेवू शकतात, ही उदाहरणे त्यांनी पाहिलेली नसतील. परिस्थितीनुसार आपल्याला आपल्या विचारांमध्ये बदल करावा लागतो. तुला आता चांगल्या पगाराची नोकरी मिळणार असेल आणि तुझ्या सासरचे सर्व लोक तुला सहकार्य करायला तयार असतील तर या बाबतीत विचार करायला हरकत नाही. यासाठी तुझ्या पतीशी मोकळेपणाने बोल. तुझ्या इतर कर्तव्यात कोणतीही कसूर होणार नाही, याबाबत त्याला विश्वास दे. संसार दोघांचा आहे. आपल्याला दोघांनाही मुलाला वेळ द्यायला पाहिजे, हे त्याला सांग. अर्थात वेळ देणे म्हणजे केवळ मुलांच्या सोबत असणे नव्हे तर मुलांना गुणात्मक वेळ देणे महत्त्वाचे असते. यासाठी दोघांनीही नोकरीवरून आल्यानंतर आणि सुटीच्या दिवशी मुलाला जास्तीत जास्त गुणात्मक वेळ देण्याचे ठरवले तर मुलावर योग्य संस्कार करणे तुम्हाला शक्य होईल. कोणताही निर्णय घेताना एकमेकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्या आणि सर्व परिस्थितीचा केवळ भावनात्मक विचार न करता प्रॅक्टिकल होऊन निर्णय घ्या.

संसार मोडतोय...
मी ३४ वर्षांचा उच्चशिक्षित आहे. माझा विवाह चार वर्षांपूर्वी मॅट्रिमोनिअल साईटवरून ठरवून पद्धतीने झाला. माझी बायकोसुद्धा उच्चशिक्षित असून, गेली दोन वर्षे ती नोकरी करत नाही. माझा स्वभाव शांत व सयंमी आहे. उलटपक्षी माझ्या बायकोचा स्वभाव अतिशय तापट व अस्थिर आहे. आम्ही दोघेहो लग्न झाल्यापासून वेगळे राहतो. लग्नानंतर काही दिवसांतच क्षुल्लक कारणांवरून वाद होऊ लागले. त्यामुळे आम्ही दोघेही गेली तीन वर्षे एकाच घरात दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपतो. या कालावधीत मी तिला समुपदेशनासाठी येण्याची विनंती केली. परंतु, तिने मला नकार दिला. ती नोकरी करत नसल्यामुळे आम्हा दोघांचा खर्च मी पाहत होतो. तरीसुद्धा माझ्याकडे ती सतत ज्यादा पैशांची मागणी करत असे आणि त्याबद्दल विचारणा केल्यावर वाद घालत असे. चार महिन्यांपूर्वी काही किरकोळ कारणांवरून आमच्यात वाद झाले. त्यानंतर लगेचच तिने मला तिच्या वकिलांमार्फत परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याविषयी नोटीस पाठवली. माझ्या घरच्यांनीसुद्धा घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला. तिच्या आई-वडिलांनीसुद्धा यामध्ये कोणतेही सहकार्य आम्हाला केले नाही. तिने माझ्याकडून एकरकमी पोटगीची मागणी केली व मी ती देण्यास तयार झालो. पुढील सहा महिन्यांची कोर्टाने मुदत दिली असली तरीसुद्धा परिस्थितीमध्ये काही बदल होतील, याची आशा कमी वाटत आहे. वरील सगळ्या गोष्टींमधून मला खूप मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास होत आहे. या सर्व त्रासांमधून मी बाहेर कसा बाहेर पडू शकेन याबद्दल मार्गदर्शन करावे.

जोड्या विजोड असतात, असे म्हटले जाते. त्यामुळेच नवऱ्याच्या आणि बायकोच्या स्वभावातील आणि विचारातील तफावत आपण खूप ठिकाणी बघतो. हे मतभेद खूप टोकाला गेले तर वेळीच त्याच्यावर उपचार करणे गरजेचे असते. या उपचारांसाठी दुसरी व्यक्ती तयारच नसेल तर तिला कोणतीही जबरदस्ती आपण करू शकत नाही. कारण मुळात आपला प्रश्न मिटला पाहिजे हे स्वतः ठरवले तर त्यातून मार्ग निघू शकतो. नाहीतर कोणतेही मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक याच्यावर उपचार करू शकणार नाहीत. तुम्ही तुमच्याकडून प्रयत्न केले होते, परंतु तिची समुपदेशन उपचार करून घेण्याची तयारी नव्हती हे दिसून येते. आता आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून आयुष्याची नव्याने सुरुवात करणे हे तुमच्यासाठी योग्य ठरेल. लग्न मोडायला कोणालाच आवडत नाही, परंतु दोघांमधील मतभेद विकोपाला गेलेले असतील आणि ते सुधारण्याच्या कोणत्याही शक्यता नसतील तर नाते ताणून धरणे योग्य होणार नाही. न्यायालयामधील समुपदेशनाचा उपयोग होतो का, हेही एकदा पडताळून बघा. कदाचित तिचा निर्णय बदलू शकतो. तिथेही तुमच्या पत्नीने एकत्र राहण्याबाबत नकार दिला तर तिला तिच्या मार्गाने जाऊ द्या आणि तुम्ही तुमचा मार्ग निवडा. आपण चालत आहोत तो रस्ता खाचखळग्याचा आणि त्रासदायक असेल तर दुसरा रस्ता शोधून काढणे शहाणपणाचे ठरते, याची मानसिक तयारी करा. तुमचे इतर त्रास आपोआप थांबतील.

सुख न दिलेल्या पत्नीच्या सेवेची वेळ
माझे वय ७१ आहे. मी बँकेतून निवृत्त झालो आहे. माझे ३७ वर्षांपूर्वी नात्यातल्या मुलीशी लग्न झाले. बायको माझ्या प्रपंचात किंवा आमच्या घरात कधीच एकरूप झाली नाही. तिच्या विचित्र वागण्याने मला सुरवातीपासूनच घटस्फोट घेऊन वेगळे व्हावेसे वाटत होते. पण ती माझा राग शांत करीत असे. मी पण त्यावर विश्‍वास ठेवून सोडून देत होतो. मात्र तिचे वागणे सुधारले नाही. आजही तिचा त्रास चालू आहे. या बाईने ना कधी शारीरिक सुख दिले, ना कधी मानसिक सुख दिले, माझा प्रपंच असा झालाच नाही. आम्हाला मूल झाले नाही. गेल्या तीन वर्षांपासून ती पार्किन्सन्स या मेंदूच्या विकाराने आजारी आहे. त्यामुळे बायकोची सर्व सेवा मलाच करावी लागते. हे सर्व करताना मला शारीरिक कष्टाबरोबर मानसिक कष्ट होतात. ज्या बाईने आपल्याला संसारात कधीच सुख दिले नाही तिची सेवा करण्याची पाळी आपल्यावर आली याचे खूप वाईट वाटते. तिचा आजार बरा होणे नाही. मग मी असेच आयुष्य रडतरडत जगायचे का? माझी प्रकृती चांगली आहे. या बाईच्या सेवेत आयुष्य बरबाद करण्याची इच्छा नाही. दुसरे लग्न करून उर्वरित आयुष्य घालवावे, असे वाटते. पण हिला घटस्फोट कसा देऊ आणि अशा असह्य अवस्थेत तिची सोय कशी करू, मार्गदर्शन करावे.

‘मनासारखा मिळे सवंगडी, खेळाया मग अविट गोडी’ असे म्हटले जाते. आपल्या मनासारखा आयुष्याचा साथीदार मिळाला तर संसार उत्तम होतो. परंतु तो मनासारखा मिळाला नाही तर आयुष्यभर मनस्ताप आणि त्रास सहन करावा लागतो, अशी अनेक उदाहरणे आहेत. सुरुवातीला त्या व्यक्तीतले चांगले गुण आपल्याला दिसले तरीही नंतर ते चांगले गुण आयुष्यभर राहतील असेही नाही. आता या वयात आणि या परिस्थितीत तुम्हाला तुमच्या पत्नीला सोडून देता येणे अवघड आहे. हा विचार तुम्ही फार आधी करायला हवा होता. झालेल्या गोष्टी आपल्याला बदलता येत नाहीत, त्यामुळे आता आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करणे, हेच गरजेचे आहे. तुम्हाला तुमच्या पत्नीची सेवा करण्यात अडचणी असतील तर नर्सिंगची व्यवस्था तुम्ही करू शकता. तिच्यामध्ये अडकून राहण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला तुमचे छंद जोपासता येतील. समवयस्क मित्र-मैत्रिणींमध्ये रमता येईल. तुमचा आनंद तुम्हाला शोधता येईल. परंतु तिच्या या काळात तिला साथ देणे हे महत्त्वाचे आहे. आपले काही देणे असते ते देऊनच जावे लागते. जी परिस्थिती आपण बदलू शकत नाही त्या परिस्थितीला सामोरे जाणे फार महत्त्वाचे असते. नाहीतर ती परिस्थिती स्वीकारताना खूप त्रास, मनस्ताप होतो, चिडचिड वाढते आणि मानसिक त्रास व्हायला सुरुवात होते. त्यामुळे परिस्थितीचा स्वीकार करा आणि स्वतःचा आनंद स्वतः शोधायला सुरुवात करा.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

#MokaleVha : नोकरी करण्यास पतीचा विरोध नोकरी करण्यास पतीचा विरोध माझे लग्न होऊन दोन वर्षे झाली आहेत. मला एक वर्षाचा मुलगा आहे. मी उच्च पदवीधर आहे. परंतु लग्नाच्या वेळेस माझ्या पतीने मला नोकरी करणारी मुलगी नको आहे, असे सांगितले होते. आपल्याला मूल झाल्यानंतर त्याला तू पूर्ण वेळ द्यावा, अशी त्याची इच्छा होती. मलाही तेव्हा नोकरी करण्याची इच्छा नव्हती. आता मला एका नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळत आहे. माझ्या सासरची मंडळी याबाबत मला प्रोत्साहन देत आहेत. परंतु माझ्या पतीची याला तयारी नाही. नोकरीची एवढी चांगली संधी मी गमावली तर मला पुढे करिअर करणे अवघड होऊन जाणार आहे. म्हणूनच माझे सासरचे सर्व मला मदत करण्यास तयार आहेत. परंतु मी ही नोकरी मिळवली तर माझ्या पतीचा विश्‍वास गमवल्यासारखे होईल. मी नक्की काय करावे हे मला समजत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न करायचे नाही, असे बऱ्याच मुलांचे म्हणणे असते. कारण नोकरी करणारी मुलगी घरामध्ये लक्ष देत नाही, मुलांकडे तिचे लक्ष नसते, असा त्यांचा समज असतो. परंतु नोकरी आणि करिअर करणाऱ्या मुलीही व्यवस्थित संसार करू शकतात आणि चांगला समतोल ठेवू शकतात, ही उदाहरणे त्यांनी पाहिलेली नसतील. परिस्थितीनुसार आपल्याला आपल्या विचारांमध्ये बदल करावा लागतो. तुला आता चांगल्या पगाराची नोकरी मिळणार असेल आणि तुझ्या सासरचे सर्व लोक तुला सहकार्य करायला तयार असतील तर या बाबतीत विचार करायला हरकत नाही. यासाठी तुझ्या पतीशी मोकळेपणाने बोल. तुझ्या इतर कर्तव्यात कोणतीही कसूर होणार नाही, याबाबत त्याला विश्वास दे. संसार दोघांचा आहे. आपल्याला दोघांनाही मुलाला वेळ द्यायला पाहिजे, हे त्याला सांग. अर्थात वेळ देणे म्हणजे केवळ मुलांच्या सोबत असणे नव्हे तर मुलांना गुणात्मक वेळ देणे महत्त्वाचे असते. यासाठी दोघांनीही नोकरीवरून आल्यानंतर आणि सुटीच्या दिवशी मुलाला जास्तीत जास्त गुणात्मक वेळ देण्याचे ठरवले तर मुलावर योग्य संस्कार करणे तुम्हाला शक्य होईल. कोणताही निर्णय घेताना एकमेकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्या आणि सर्व परिस्थितीचा केवळ भावनात्मक विचार न करता प्रॅक्टिकल होऊन निर्णय घ्या. संसार मोडतोय... मी ३४ वर्षांचा उच्चशिक्षित आहे. माझा विवाह चार वर्षांपूर्वी मॅट्रिमोनिअल साईटवरून ठरवून पद्धतीने झाला. माझी बायकोसुद्धा उच्चशिक्षित असून, गेली दोन वर्षे ती नोकरी करत नाही. माझा स्वभाव शांत व सयंमी आहे. उलटपक्षी माझ्या बायकोचा स्वभाव अतिशय तापट व अस्थिर आहे. आम्ही दोघेहो लग्न झाल्यापासून वेगळे राहतो. लग्नानंतर काही दिवसांतच क्षुल्लक कारणांवरून वाद होऊ लागले. त्यामुळे आम्ही दोघेही गेली तीन वर्षे एकाच घरात दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपतो. या कालावधीत मी तिला समुपदेशनासाठी येण्याची विनंती केली. परंतु, तिने मला नकार दिला. ती नोकरी करत नसल्यामुळे आम्हा दोघांचा खर्च मी पाहत होतो. तरीसुद्धा माझ्याकडे ती सतत ज्यादा पैशांची मागणी करत असे आणि त्याबद्दल विचारणा केल्यावर वाद घालत असे. चार महिन्यांपूर्वी काही किरकोळ कारणांवरून आमच्यात वाद झाले. त्यानंतर लगेचच तिने मला तिच्या वकिलांमार्फत परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याविषयी नोटीस पाठवली. माझ्या घरच्यांनीसुद्धा घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला. तिच्या आई-वडिलांनीसुद्धा यामध्ये कोणतेही सहकार्य आम्हाला केले नाही. तिने माझ्याकडून एकरकमी पोटगीची मागणी केली व मी ती देण्यास तयार झालो. पुढील सहा महिन्यांची कोर्टाने मुदत दिली असली तरीसुद्धा परिस्थितीमध्ये काही बदल होतील, याची आशा कमी वाटत आहे. वरील सगळ्या गोष्टींमधून मला खूप मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास होत आहे. या सर्व त्रासांमधून मी बाहेर कसा बाहेर पडू शकेन याबद्दल मार्गदर्शन करावे. जोड्या विजोड असतात, असे म्हटले जाते. त्यामुळेच नवऱ्याच्या आणि बायकोच्या स्वभावातील आणि विचारातील तफावत आपण खूप ठिकाणी बघतो. हे मतभेद खूप टोकाला गेले तर वेळीच त्याच्यावर उपचार करणे गरजेचे असते. या उपचारांसाठी दुसरी व्यक्ती तयारच नसेल तर तिला कोणतीही जबरदस्ती आपण करू शकत नाही. कारण मुळात आपला प्रश्न मिटला पाहिजे हे स्वतः ठरवले तर त्यातून मार्ग निघू शकतो. नाहीतर कोणतेही मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक याच्यावर उपचार करू शकणार नाहीत. तुम्ही तुमच्याकडून प्रयत्न केले होते, परंतु तिची समुपदेशन उपचार करून घेण्याची तयारी नव्हती हे दिसून येते. आता आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून आयुष्याची नव्याने सुरुवात करणे हे तुमच्यासाठी योग्य ठरेल. लग्न मोडायला कोणालाच आवडत नाही, परंतु दोघांमधील मतभेद विकोपाला गेलेले असतील आणि ते सुधारण्याच्या कोणत्याही शक्यता नसतील तर नाते ताणून धरणे योग्य होणार नाही. न्यायालयामधील समुपदेशनाचा उपयोग होतो का, हेही एकदा पडताळून बघा. कदाचित तिचा निर्णय बदलू शकतो. तिथेही तुमच्या पत्नीने एकत्र राहण्याबाबत नकार दिला तर तिला तिच्या मार्गाने जाऊ द्या आणि तुम्ही तुमचा मार्ग निवडा. आपण चालत आहोत तो रस्ता खाचखळग्याचा आणि त्रासदायक असेल तर दुसरा रस्ता शोधून काढणे शहाणपणाचे ठरते, याची मानसिक तयारी करा. तुमचे इतर त्रास आपोआप थांबतील. सुख न दिलेल्या पत्नीच्या सेवेची वेळ माझे वय ७१ आहे. मी बँकेतून निवृत्त झालो आहे. माझे ३७ वर्षांपूर्वी नात्यातल्या मुलीशी लग्न झाले. बायको माझ्या प्रपंचात किंवा आमच्या घरात कधीच एकरूप झाली नाही. तिच्या विचित्र वागण्याने मला सुरवातीपासूनच घटस्फोट घेऊन वेगळे व्हावेसे वाटत होते. पण ती माझा राग शांत करीत असे. मी पण त्यावर विश्‍वास ठेवून सोडून देत होतो. मात्र तिचे वागणे सुधारले नाही. आजही तिचा त्रास चालू आहे. या बाईने ना कधी शारीरिक सुख दिले, ना कधी मानसिक सुख दिले, माझा प्रपंच असा झालाच नाही. आम्हाला मूल झाले नाही. गेल्या तीन वर्षांपासून ती पार्किन्सन्स या मेंदूच्या विकाराने आजारी आहे. त्यामुळे बायकोची सर्व सेवा मलाच करावी लागते. हे सर्व करताना मला शारीरिक कष्टाबरोबर मानसिक कष्ट होतात. ज्या बाईने आपल्याला संसारात कधीच सुख दिले नाही तिची सेवा करण्याची पाळी आपल्यावर आली याचे खूप वाईट वाटते. तिचा आजार बरा होणे नाही. मग मी असेच आयुष्य रडतरडत जगायचे का? माझी प्रकृती चांगली आहे. या बाईच्या सेवेत आयुष्य बरबाद करण्याची इच्छा नाही. दुसरे लग्न करून उर्वरित आयुष्य घालवावे, असे वाटते. पण हिला घटस्फोट कसा देऊ आणि अशा असह्य अवस्थेत तिची सोय कशी करू, मार्गदर्शन करावे. ‘मनासारखा मिळे सवंगडी, खेळाया मग अविट गोडी’ असे म्हटले जाते. आपल्या मनासारखा आयुष्याचा साथीदार मिळाला तर संसार उत्तम होतो. परंतु तो मनासारखा मिळाला नाही तर आयुष्यभर मनस्ताप आणि त्रास सहन करावा लागतो, अशी अनेक उदाहरणे आहेत. सुरुवातीला त्या व्यक्तीतले चांगले गुण आपल्याला दिसले तरीही नंतर ते चांगले गुण आयुष्यभर राहतील असेही नाही. आता या वयात आणि या परिस्थितीत तुम्हाला तुमच्या पत्नीला सोडून देता येणे अवघड आहे. हा विचार तुम्ही फार आधी करायला हवा होता. झालेल्या गोष्टी आपल्याला बदलता येत नाहीत, त्यामुळे आता आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करणे, हेच गरजेचे आहे. तुम्हाला तुमच्या पत्नीची सेवा करण्यात अडचणी असतील तर नर्सिंगची व्यवस्था तुम्ही करू शकता. तिच्यामध्ये अडकून राहण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला तुमचे छंद जोपासता येतील. समवयस्क मित्र-मैत्रिणींमध्ये रमता येईल. तुमचा आनंद तुम्हाला शोधता येईल. परंतु तिच्या या काळात तिला साथ देणे हे महत्त्वाचे आहे. आपले काही देणे असते ते देऊनच जावे लागते. जी परिस्थिती आपण बदलू शकत नाही त्या परिस्थितीला सामोरे जाणे फार महत्त्वाचे असते. नाहीतर ती परिस्थिती स्वीकारताना खूप त्रास, मनस्ताप होतो, चिडचिड वाढते आणि मानसिक त्रास व्हायला सुरुवात होते. त्यामुळे परिस्थितीचा स्वीकार करा आणि स्वतःचा आनंद स्वतः शोधायला सुरुवात करा. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2wWFGtH
Read More
#WeCareForPune : पुण्यात १० खासगी रुग्णालयांत उपचार

coronavirus स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार; ३० खाटा निश्‍चित
पुणे - कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना आता शहरातील दहा खासगी रुग्णालयांमध्येही उपचारासाठी दाखल होता येईल. त्यासाठी या रुग्णालयांमध्ये स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार केले आहेत. या सर्व रुग्णालयांची तपासणी करून दहा रुग्णालयांमधील ३० खाटा निश्‍चित केल्या आहेत.

काम असेल तरच ऑफिसला या; राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त पुण्यात!

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या विलगीकरणासाठी पुणे महापालिकेचे डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालय; तर पिंपरी-चिंचवडसाठी ‘वायसीएम’ रुग्णालय निश्‍चित केले आहे. त्यामुळे लक्षणे दिसणाऱ्या किंवा कोरोनाचे निदान झालेल्या रुग्णांना याच दोन रुग्णालयांमधील विलगीकरण कक्षात राहण्याचा सल्ला सरकारी यंत्रणेतून दिला जाईल. खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होण्याचा सल्ला सरकारी व्यवस्थेतून दिला जाणार नाही. पण, एखाद्या रुग्णाने खासगी रुग्णालयात दाखल होण्याची इच्छा व्यक्त केली, तर त्यासाठी ही सुविधा उपलब्ध केली आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाचे संशयित किंवा निश्‍चित झालेले बहुतांश रुग्ण परदेशातून आलेले आहेत. त्यांना डॉ. नायडू रुग्णालयात विलगीकरण होणे शक्‍य होत नाही. त्यामुळे यापूर्वीच खासगी रुग्णालयांची तपासणी करून तेथील काही खाटा विलगीकरणासाठी निश्‍चित केल्या होत्या. त्याचा वापर आता महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे.

खासगी रुग्णालयांतील विलगीकरण कक्षात दाखल होणाऱ्या रुग्णाला तेथील सर्व खर्च स्वतःला करावा लागणार आहे. त्यासाठी सरकार कोणतीही सवलत किंवा उपचारांचा खर्च करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. हा खर्च रुग्ण करण्यास तयार असल्यास खासगी रुग्णालयात दाखल होण्याची परवानगी दिली जाण्याचे धोरण निश्‍चित झाले आहे.

Corona Updates : देशात रुग्णांच्या संख्येत वाढ; पुण्यात नवीन रुग्ण नाही

खासगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णाची प्राथमिक तपासणी डॉ. नायडू रुग्णालयात केली जाईल. त्याच्या घशातील द्रव पदार्थांचे नमुनेही तेथेच घेतले जातील. त्यानंतर संबंधित रुग्णाच्या इच्छेवरून त्याला खासगी रुग्णालयात विलगीकरणासाठी पाठविण्यात येईल. ज्या रुग्णांना खासगी रुग्णालयातील वैद्यकीय सेवेचा खर्च परवडणारा आहे, खासगी रुग्णालयास प्राधान्य दिले आहे, त्यांच्यासाठी ही सोय करण्यात आली आहे.

इतर देशांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच पुण्यातील आरोग्य यंत्रणा त्यासाठी सज्ज करण्यात आली. त्याअंतर्गत खासगी रुग्णालयांची तपासणी करून त्यातील सुविधांच्या आधारावर काही खाटा फेब्रुवारीमध्येच राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

#WeCareForPune : पुण्यात १० खासगी रुग्णालयांत उपचार coronavirus स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार; ३० खाटा निश्‍चित पुणे - कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना आता शहरातील दहा खासगी रुग्णालयांमध्येही उपचारासाठी दाखल होता येईल. त्यासाठी या रुग्णालयांमध्ये स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार केले आहेत. या सर्व रुग्णालयांची तपासणी करून दहा रुग्णालयांमधील ३० खाटा निश्‍चित केल्या आहेत. काम असेल तरच ऑफिसला या; राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त पुण्यात! कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या विलगीकरणासाठी पुणे महापालिकेचे डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालय; तर पिंपरी-चिंचवडसाठी ‘वायसीएम’ रुग्णालय निश्‍चित केले आहे. त्यामुळे लक्षणे दिसणाऱ्या किंवा कोरोनाचे निदान झालेल्या रुग्णांना याच दोन रुग्णालयांमधील विलगीकरण कक्षात राहण्याचा सल्ला सरकारी यंत्रणेतून दिला जाईल. खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होण्याचा सल्ला सरकारी व्यवस्थेतून दिला जाणार नाही. पण, एखाद्या रुग्णाने खासगी रुग्णालयात दाखल होण्याची इच्छा व्यक्त केली, तर त्यासाठी ही सुविधा उपलब्ध केली आहे.  आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  कोरोनाचे संशयित किंवा निश्‍चित झालेले बहुतांश रुग्ण परदेशातून आलेले आहेत. त्यांना डॉ. नायडू रुग्णालयात विलगीकरण होणे शक्‍य होत नाही. त्यामुळे यापूर्वीच खासगी रुग्णालयांची तपासणी करून तेथील काही खाटा विलगीकरणासाठी निश्‍चित केल्या होत्या. त्याचा वापर आता महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे. खासगी रुग्णालयांतील विलगीकरण कक्षात दाखल होणाऱ्या रुग्णाला तेथील सर्व खर्च स्वतःला करावा लागणार आहे. त्यासाठी सरकार कोणतीही सवलत किंवा उपचारांचा खर्च करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. हा खर्च रुग्ण करण्यास तयार असल्यास खासगी रुग्णालयात दाखल होण्याची परवानगी दिली जाण्याचे धोरण निश्‍चित झाले आहे. Corona Updates : देशात रुग्णांच्या संख्येत वाढ; पुण्यात नवीन रुग्ण नाही खासगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णाची प्राथमिक तपासणी डॉ. नायडू रुग्णालयात केली जाईल. त्याच्या घशातील द्रव पदार्थांचे नमुनेही तेथेच घेतले जातील. त्यानंतर संबंधित रुग्णाच्या इच्छेवरून त्याला खासगी रुग्णालयात विलगीकरणासाठी पाठविण्यात येईल. ज्या रुग्णांना खासगी रुग्णालयातील वैद्यकीय सेवेचा खर्च परवडणारा आहे, खासगी रुग्णालयास प्राधान्य दिले आहे, त्यांच्यासाठी ही सोय करण्यात आली आहे. इतर देशांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच पुण्यातील आरोग्य यंत्रणा त्यासाठी सज्ज करण्यात आली. त्याअंतर्गत खासगी रुग्णालयांची तपासणी करून त्यातील सुविधांच्या आधारावर काही खाटा फेब्रुवारीमध्येच राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aWUNlr
Read More
अमेरिका: डोनाल्ड ट्रंप के कोरोना वायरस की टेस्ट रिपोर्ट आई, डॉक्टरों ने दी ये राय https://ift.tt/2NfH8z5
महाराष्ट्र में कोरोना के एक संदिग्ध की मौत, सऊदी अरब से वापस आया था शख्स https://ift.tt/3cSHbJI
उद्योग बंद ठेवण्याबाबत अद्याप निर्णय नाही - सुभाष देसाई

पिंपरी - ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर उद्योग बंद ठेवण्याबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ‘सकाळ’ला सांगितले. उद्योग बंद ठेवल्यास कर्मचाऱ्यांना रोजगार कसा मिळणार, त्यामुळे यासंदर्भात राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरम्यान, हिंजवडी आणि तळवडे आयटी पार्कमधील सर्व कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिलेली नाही. येत्या दोन दिवसांत कोरोनाची परिस्थिती काय राहील, याचा आढावा घेऊन सोमवारी (ता. १६) त्यासंदर्भात कंपन्यांकडून निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे. सध्या अनेक कर्मचारी कंपन्यांमध्ये जाऊन काम करीत असले, तरी त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे कंपन्या काय निर्णय घेतात, याकडे आयटीयन्सचे लक्ष आहे.
महापालिकेकडून माहिती नाही.

कोरोनाचे तीन रुग्ण शहरात आढळल्यानंतर महापालिकेकडून एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये त्यासंदर्भात कोणती काळजी घ्यायची, याची माहिती देणे अपेक्षित होते.

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

उद्योग बंद ठेवण्याबाबत अद्याप निर्णय नाही - सुभाष देसाई पिंपरी - ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर उद्योग बंद ठेवण्याबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ‘सकाळ’ला सांगितले. उद्योग बंद ठेवल्यास कर्मचाऱ्यांना रोजगार कसा मिळणार, त्यामुळे यासंदर्भात राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  दरम्यान, हिंजवडी आणि तळवडे आयटी पार्कमधील सर्व कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिलेली नाही. येत्या दोन दिवसांत कोरोनाची परिस्थिती काय राहील, याचा आढावा घेऊन सोमवारी (ता. १६) त्यासंदर्भात कंपन्यांकडून निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे. सध्या अनेक कर्मचारी कंपन्यांमध्ये जाऊन काम करीत असले, तरी त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे कंपन्या काय निर्णय घेतात, याकडे आयटीयन्सचे लक्ष आहे. महापालिकेकडून माहिती नाही. कोरोनाचे तीन रुग्ण शहरात आढळल्यानंतर महापालिकेकडून एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये त्यासंदर्भात कोणती काळजी घ्यायची, याची माहिती देणे अपेक्षित होते.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TT0afY
Read More

Friday, March 13, 2020

...तर `या` शहरातील 30 हजार खुल्या फ्लॅटचा होणार लिलाव 

सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील खुल्या प्लॉटच्या तब्बल 30 हजार थकबाकीदार मिळकतदारांची नावे आज  शनिवारपासून वर्तमानपत्रात टप्याटप्प्याने प्रसिद्ध केली जाणार आहेत. दिलेल्या मुदतीत थकबाकी भरली नाही तर खुल्या मिळकतीवर बोजा चढवून त्यांचा लिलाव केला जाणार आहे.

दरम्यान यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी आयुक्त दीपक तावरे यांनी आढावा बैठक घेतली. सहायक आयुक्त एस. बी. पवार, मुख्य लेखापाल तथा नियंत्रण अधिकारी शिरीष धनवे, कर संकलन अधिकारी प्रदीप थडसरे, प्रवीण दंतकाळे उपस्थित होते. शहर विभागात 4 हजार 471 आणि हद्दवाढ भागात 25 हजार 814 खुल्या जागा आहेत. त्या मिळकतींची थकबाकी दहा हजार रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत आहे. अशा सर्व मिळकतींची यादी तयार करून थकबाकी भरण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. मुदतीत थकबाकी न भरल्यास संबंधित मिळकतींचा लिलाव करण्यात येऊन, त्यांची विक्री केली जाणार आहे. 

शहरातील विविध वर्तमानपत्रात थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध केली जाणार आहेत. संबंधित मिळकतदारांनी थकबाकी भरून सवलतीचा लाभ घ्यावा. शास्तीवर 75 टक्के सवलत योजना 31 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे लाखो रुपयांची थकबाकी असलेल्या मिळकतदाराला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेऊन संबंधितांनी आपल्या मिळकतीवर बोजा लागणार नाही याची दक्षता घ्यावी. मुदतीत थकबाकी न भरल्यास या मिळकतींवर बोजा चढविण्यात येईल, त्यानंतर त्या जप्त करण्यात येऊन त्यांचा लिलाव केला जाईल, असेही श्री. तावरे म्हणाले. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

...तर `या` शहरातील 30 हजार खुल्या फ्लॅटचा होणार लिलाव  सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील खुल्या प्लॉटच्या तब्बल 30 हजार थकबाकीदार मिळकतदारांची नावे आज  शनिवारपासून वर्तमानपत्रात टप्याटप्प्याने प्रसिद्ध केली जाणार आहेत. दिलेल्या मुदतीत थकबाकी भरली नाही तर खुल्या मिळकतीवर बोजा चढवून त्यांचा लिलाव केला जाणार आहे. दरम्यान यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी आयुक्त दीपक तावरे यांनी आढावा बैठक घेतली. सहायक आयुक्त एस. बी. पवार, मुख्य लेखापाल तथा नियंत्रण अधिकारी शिरीष धनवे, कर संकलन अधिकारी प्रदीप थडसरे, प्रवीण दंतकाळे उपस्थित होते. शहर विभागात 4 हजार 471 आणि हद्दवाढ भागात 25 हजार 814 खुल्या जागा आहेत. त्या मिळकतींची थकबाकी दहा हजार रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत आहे. अशा सर्व मिळकतींची यादी तयार करून थकबाकी भरण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. मुदतीत थकबाकी न भरल्यास संबंधित मिळकतींचा लिलाव करण्यात येऊन, त्यांची विक्री केली जाणार आहे.  शहरातील विविध वर्तमानपत्रात थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध केली जाणार आहेत. संबंधित मिळकतदारांनी थकबाकी भरून सवलतीचा लाभ घ्यावा. शास्तीवर 75 टक्के सवलत योजना 31 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे लाखो रुपयांची थकबाकी असलेल्या मिळकतदाराला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेऊन संबंधितांनी आपल्या मिळकतीवर बोजा लागणार नाही याची दक्षता घ्यावी. मुदतीत थकबाकी न भरल्यास या मिळकतींवर बोजा चढविण्यात येईल, त्यानंतर त्या जप्त करण्यात येऊन त्यांचा लिलाव केला जाईल, असेही श्री. तावरे म्हणाले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2U4DyI7
Read More
सावंतवाडी पालिका प्रशासन सतर्क

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमिवर येथील पालिका सतर्क झाली आहे. स्वच्छता विभागाच्यावतीने सुरुवात होण्याआधीच या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंबर कसली आहे. आज पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांसह उपाययोजना आखण्या विषयी सूचना तसेच कामांचा आढावा घेतला. 

यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे, कार्यालयीन लिपिक आसावरी शिरोडकर, स्वच्छता पर्यवेक्षक रसिका नाडकर्णी, प्रभारी स्वच्छता निरीक्षक परवीन शेख, कर्मचारी दीपक म्हापसेकर, देविदास आडारकर, संजय वारंग, गजानन परब, रिजवान शेख आणि इतर सफाई कामगार यांनी शहरातील निरनिराळ्या ठिकाणी भेटी दिल्या.

यावेळी दिलेल्या माहिती सांगण्यात आले की, येथील मच्छी मार्केट कॉम्प्लेक्‍स हे दर दोन तासांनी धुण्यात येणार आहे. पालिका कर्मचाऱ्यांची जी कार्यालय आहेत. या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एक बेसिंग बसविण्यात आले असून हात धुण्यासाठी त्याठिकाणी हॅण्डवॉश ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्यांना हात घेऊनच पालिका कार्यालयात प्रवेश करावा. याशिवाय जनजागृतीसाठी सार्वजनिक ठिकाणी करुणा व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी दक्षता घ्याव्यात, अशा सूचनांचा बॅनर ही लावण्यात येणार आहे. 

शहरात जेवढे सुपर मार्केट आहे. त्याठिकाणी ग्राहकांना हात धुण्यासाठी हॅडवॉश ठेवण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. याची पाहणी करण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील हॉटेल लॉजिंग मालकांना राहण्यासाठी येणारे बाहेरून पर्यटक नागरिक यांची माहिती ती देण्यात यावी अशा सूचना देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती घरपट्टी वसुलीवेळी पालिका कर्मचाऱ्यांकडून घेतली जाणार आहे. 

मच्छीमार्केटची पाहणी 
कोरोना वायरसच्या पार्श्‍वभूमीवर येथील नगरपालिका सतर्क झाली असून या व्हायरसचा प्रादुर्भाव यासाठी पालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी मच्छी मार्केट व इतर ठिकाणी जाऊन पाहणी केली तसेच यावेळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना सूचना दिली. पालिकेकडून वायरसबाबत नागरिकांनी घाबरून न जाण्याचे व स्वच्छतेविषयी योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सावंतवाडी पालिका प्रशासन सतर्क सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमिवर येथील पालिका सतर्क झाली आहे. स्वच्छता विभागाच्यावतीने सुरुवात होण्याआधीच या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंबर कसली आहे. आज पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांसह उपाययोजना आखण्या विषयी सूचना तसेच कामांचा आढावा घेतला.  यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे, कार्यालयीन लिपिक आसावरी शिरोडकर, स्वच्छता पर्यवेक्षक रसिका नाडकर्णी, प्रभारी स्वच्छता निरीक्षक परवीन शेख, कर्मचारी दीपक म्हापसेकर, देविदास आडारकर, संजय वारंग, गजानन परब, रिजवान शेख आणि इतर सफाई कामगार यांनी शहरातील निरनिराळ्या ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी दिलेल्या माहिती सांगण्यात आले की, येथील मच्छी मार्केट कॉम्प्लेक्‍स हे दर दोन तासांनी धुण्यात येणार आहे. पालिका कर्मचाऱ्यांची जी कार्यालय आहेत. या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एक बेसिंग बसविण्यात आले असून हात धुण्यासाठी त्याठिकाणी हॅण्डवॉश ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्यांना हात घेऊनच पालिका कार्यालयात प्रवेश करावा. याशिवाय जनजागृतीसाठी सार्वजनिक ठिकाणी करुणा व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी दक्षता घ्याव्यात, अशा सूचनांचा बॅनर ही लावण्यात येणार आहे.  शहरात जेवढे सुपर मार्केट आहे. त्याठिकाणी ग्राहकांना हात धुण्यासाठी हॅडवॉश ठेवण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. याची पाहणी करण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील हॉटेल लॉजिंग मालकांना राहण्यासाठी येणारे बाहेरून पर्यटक नागरिक यांची माहिती ती देण्यात यावी अशा सूचना देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती घरपट्टी वसुलीवेळी पालिका कर्मचाऱ्यांकडून घेतली जाणार आहे.  मच्छीमार्केटची पाहणी  कोरोना वायरसच्या पार्श्‍वभूमीवर येथील नगरपालिका सतर्क झाली असून या व्हायरसचा प्रादुर्भाव यासाठी पालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी मच्छी मार्केट व इतर ठिकाणी जाऊन पाहणी केली तसेच यावेळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना सूचना दिली. पालिकेकडून वायरसबाबत नागरिकांनी घाबरून न जाण्याचे व स्वच्छतेविषयी योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33jJG3f
Read More
‘ॲप’निंग : छुपा कॅमेरा शोधताना

आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणसाचे दैनंदिन जीवन सुकर झाले आहे. अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण याच आधुनिक तंत्रज्ञानाचा काही लोक गैरवापर करून इतरांना अडचणीत आणतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने होणाऱ्या गुन्हेगारीचे प्रमाण सध्या खूपच वाढले आहे. त्यामुळे आपले जीवन असुरक्षित झाले आहे. अशाच एका तंत्रज्ञानाचा सर्रास गैरवापर होताना दिसतो, तो म्हणजे छुपा कॅमेरा किंवा स्पाय कॅमेरा. छुप्या कॅमेऱ्याचा गैरवापर करण्याच्या प्रकारांना रोखण्यासाठी आता विविध ॲप उपलब्ध असून, ते अत्यंत उपयुक्त आहेत. 

हिडन कॅमेरा आणि स्पाय कॅमेऱ्याचा वापर करून कित्येकांना, विशेषतः महिलांना अडचणीत आणले जाते. हॉटेल आणि तयार कपड्यांच्या शोरूममधील चेंजिग रूममध्ये छुपा कॅमेरा लावून चित्रीकरण केल्याच्या घटना वारंवार उघडकीस येत असतात. एखाद्यावर पाळत ठेवण्यासाठीदेखील स्पाय कॅमेऱ्याचा वापर केला जातो. हॉटेल, शॉपिंग मॉल, ऑफिस, घर कोठेही अशा कॅमेऱ्यांचा वापर केला जातो. तंत्रज्ञानाच्या अशा गैरवापरावर तंत्रज्ञानानेच आता उपाय शोधला आहे. तो म्हणजे स्पाय/हिडन कॅमेरे शोधणारे ॲप. 

सतत कोणीतरी आपल्याला पाहत आहे, छुप्या कॅमेऱ्यातून आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे, असे तुम्हाला वाटते काय? छुपे कॅमेरे शोधणारे ॲप उपलब्ध असल्याने तुमची ही चिंता दूर होऊ शकते. ॲन्ड्रॉईड आणि आयफोनमध्ये हे ॲप वापरता येते. छुपे कॅमेरे शोधणाऱ्या ॲपमुळे तुम्ही कोठेही सुरक्षित राहू शकता. तसेच तुमच्या वैयक्तिक गोष्टींची गोपनीयता राखण्यासही त्यामुळे मदत होते. हॉटेल, शॉपिंग मॉल, ऑफिस, घर कोठेही हे ॲप वापरून तुम्ही छुपा कॅमेरा शोधू शकता. 

कसे वापरावे छुपा कॅमेरा शोधणारे ॲप? 
छुपा कॅमेरा शोधणाऱ्या ॲपद्वारे दोन पर्याय दिले जातात. 
इन्फ्रेरड्‌ : मोबाईल कॅमेऱ्याचा वापर करून छुप्या कॅमेऱ्याचा शोध घेता येतो. बाथरुम, बेडरुम, चेंजिग रुम अथवा इतर कोणत्याही ठिकाणी वॉटर हिटर, आरसा, फ्लॉवरपॉट, बल्ब, ट्यूब, एसी, टीव्ही, कॉफी मशीन, हॅंगर यासारख्या संशयास्पद वस्तू स्कॅन करून मोबाईल कॅमेऱ्याद्वारे छुप्या कॅमेऱ्याचा शोध घेता येतो. 
रेडिएशन : रेडिएशनद्वारे तुमच्या आसपास असलेल्या छुप्या कॅमेऱ्याची मोबाईलद्वारे माहिती मिळते. त्यानुसार छुप्या कॅमेऱ्याचा शोध घेता येतो. 

छुपा कॅमेरा आढळल्यास काय करावे?
१) सर्वांत आधी छुप्या कॅमेऱ्याचे फोटो पुरावा म्हणून काढून ठेवावेत.
२) छुपा कॅमेरा कपड्याने झाकावा.
३) तातडीने पोलिसांना फोन करून संबधित प्रकाराची माहिती द्यावी.
४) संबंधित ठिकाणच्या व्यवस्थापकांना याबाबत माहिती देऊन त्यांच्याकडे विचारणा करावी.
५) इतरांना छुप्या कॅमेऱ्याबाबत कल्पना द्यावी. 
छुपा कॅमेरा शोधणारे अनेक ॲप ‘प्ले स्टोअर’वर उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून आपण सार्वजनिक ठिकाणचा आपला वावर सुरक्षित करू शकतो. हे ॲप असेः १) रादरबोट फ्री (Radarbot Free) - ॲन्ड्रॉईड आणि आयफोन  २) स्पाय हिडन कॅमेरा डिटेक्‍टर - ॲन्ड्रॉईड आणि आयफोन ३) हिडन कॅमेरा डिटेक्‍टर - आयफोन ४) डोन्ट स्पाय- स्पाय डिव्हाईस डिटेक्‍टर - आयफोन ५) हिडन कॅमेरा डिटेक्‍टर - ॲन्ड्रॉइड ६) ॲन्टी- स्पाय कॅमेरा-ॲन्ड्रॉइड  ७) स्पॉय हिडन कॅमेरा डिटेक्‍टर - ॲन्ड्रॉइड  ८) स्पाय कॅमेरा डिटेक्‍टर - ॲन्ड्रॉइड  ९) हिडन कॅमेरा- ॲन्ड्रॉइड  १०) स्पाय कॅमेरा फाउंडर - ॲन्ड्रॉइड.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘ॲप’निंग : छुपा कॅमेरा शोधताना आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणसाचे दैनंदिन जीवन सुकर झाले आहे. अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण याच आधुनिक तंत्रज्ञानाचा काही लोक गैरवापर करून इतरांना अडचणीत आणतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने होणाऱ्या गुन्हेगारीचे प्रमाण सध्या खूपच वाढले आहे. त्यामुळे आपले जीवन असुरक्षित झाले आहे. अशाच एका तंत्रज्ञानाचा सर्रास गैरवापर होताना दिसतो, तो म्हणजे छुपा कॅमेरा किंवा स्पाय कॅमेरा. छुप्या कॅमेऱ्याचा गैरवापर करण्याच्या प्रकारांना रोखण्यासाठी आता विविध ॲप उपलब्ध असून, ते अत्यंत उपयुक्त आहेत.  हिडन कॅमेरा आणि स्पाय कॅमेऱ्याचा वापर करून कित्येकांना, विशेषतः महिलांना अडचणीत आणले जाते. हॉटेल आणि तयार कपड्यांच्या शोरूममधील चेंजिग रूममध्ये छुपा कॅमेरा लावून चित्रीकरण केल्याच्या घटना वारंवार उघडकीस येत असतात. एखाद्यावर पाळत ठेवण्यासाठीदेखील स्पाय कॅमेऱ्याचा वापर केला जातो. हॉटेल, शॉपिंग मॉल, ऑफिस, घर कोठेही अशा कॅमेऱ्यांचा वापर केला जातो. तंत्रज्ञानाच्या अशा गैरवापरावर तंत्रज्ञानानेच आता उपाय शोधला आहे. तो म्हणजे स्पाय/हिडन कॅमेरे शोधणारे ॲप.  सतत कोणीतरी आपल्याला पाहत आहे, छुप्या कॅमेऱ्यातून आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे, असे तुम्हाला वाटते काय? छुपे कॅमेरे शोधणारे ॲप उपलब्ध असल्याने तुमची ही चिंता दूर होऊ शकते. ॲन्ड्रॉईड आणि आयफोनमध्ये हे ॲप वापरता येते. छुपे कॅमेरे शोधणाऱ्या ॲपमुळे तुम्ही कोठेही सुरक्षित राहू शकता. तसेच तुमच्या वैयक्तिक गोष्टींची गोपनीयता राखण्यासही त्यामुळे मदत होते. हॉटेल, शॉपिंग मॉल, ऑफिस, घर कोठेही हे ॲप वापरून तुम्ही छुपा कॅमेरा शोधू शकता.  कसे वापरावे छुपा कॅमेरा शोधणारे ॲप?  छुपा कॅमेरा शोधणाऱ्या ॲपद्वारे दोन पर्याय दिले जातात.  इन्फ्रेरड्‌ : मोबाईल कॅमेऱ्याचा वापर करून छुप्या कॅमेऱ्याचा शोध घेता येतो. बाथरुम, बेडरुम, चेंजिग रुम अथवा इतर कोणत्याही ठिकाणी वॉटर हिटर, आरसा, फ्लॉवरपॉट, बल्ब, ट्यूब, एसी, टीव्ही, कॉफी मशीन, हॅंगर यासारख्या संशयास्पद वस्तू स्कॅन करून मोबाईल कॅमेऱ्याद्वारे छुप्या कॅमेऱ्याचा शोध घेता येतो.  रेडिएशन : रेडिएशनद्वारे तुमच्या आसपास असलेल्या छुप्या कॅमेऱ्याची मोबाईलद्वारे माहिती मिळते. त्यानुसार छुप्या कॅमेऱ्याचा शोध घेता येतो.  छुपा कॅमेरा आढळल्यास काय करावे? १) सर्वांत आधी छुप्या कॅमेऱ्याचे फोटो पुरावा म्हणून काढून ठेवावेत. २) छुपा कॅमेरा कपड्याने झाकावा. ३) तातडीने पोलिसांना फोन करून संबधित प्रकाराची माहिती द्यावी. ४) संबंधित ठिकाणच्या व्यवस्थापकांना याबाबत माहिती देऊन त्यांच्याकडे विचारणा करावी. ५) इतरांना छुप्या कॅमेऱ्याबाबत कल्पना द्यावी.  छुपा कॅमेरा शोधणारे अनेक ॲप ‘प्ले स्टोअर’वर उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून आपण सार्वजनिक ठिकाणचा आपला वावर सुरक्षित करू शकतो. हे ॲप असेः १) रादरबोट फ्री (Radarbot Free) - ॲन्ड्रॉईड आणि आयफोन  २) स्पाय हिडन कॅमेरा डिटेक्‍टर - ॲन्ड्रॉईड आणि आयफोन ३) हिडन कॅमेरा डिटेक्‍टर - आयफोन ४) डोन्ट स्पाय- स्पाय डिव्हाईस डिटेक्‍टर - आयफोन ५) हिडन कॅमेरा डिटेक्‍टर - ॲन्ड्रॉइड ६) ॲन्टी- स्पाय कॅमेरा-ॲन्ड्रॉइड  ७) स्पॉय हिडन कॅमेरा डिटेक्‍टर - ॲन्ड्रॉइड  ८) स्पाय कॅमेरा डिटेक्‍टर - ॲन्ड्रॉइड  ९) हिडन कॅमेरा- ॲन्ड्रॉइड  १०) स्पाय कॅमेरा फाउंडर - ॲन्ड्रॉइड. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2U3VOBn
Read More