#WeCareForPune : घाबरू नका, वैद्यकीय सल्ला घ्या पुणे - तुम्ही परदेशात गेलेला नाही, परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातही आलेला नाही, तर तुम्ही कोरोनाच्या संसर्गाला घाबरू नका. सर्दी, खोकला असला तर काळजी घ्या. तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या. जर परदेशातून येऊन सर्दी, खोकला, ताप असल्यास तातडीने महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे. आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  सध्या हवामानात बदल होत आहे. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. त्यातच दिवसा उन्हाचा चटका आणि पहाटे गारठा असे वातावरण पुणेकर सध्या अनुभवताना दिसतात, त्यामुळे सामान्यतः सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. नेमक्‍या, याच वेळी कोरोनाचे रुग्ण पुणे शहर आणि पिंपरी- चिंचवडमध्ये आढळले आहेत. सर्दी, खोकला, ताप अशीच या आजाराची लक्षणे आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसते. त्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य खात्याने हे आवाहन केले आहे.  Corona Updates : देशात रुग्णांच्या संख्येत वाढ; पुण्यात नवीन रुग्ण नाही परदेशात प्रवास केलाय? परदेश प्रवास किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तीशी गेल्या काही दिवसांमध्ये संपर्क या दोन निकषांवर कोणी कोणत्या दवाखान्यात जायचं हे आता निश्‍चित केलं आहे. परदेश प्रवास किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तीशी संपर्क आलेल्यांनी आणि कोरोनाची लक्षणे दिसत असणाऱ्यांनी पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या दोन्ही निकषांमध्ये न बसणाऱ्यांनी इतर कोणत्याही वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. काम असेल तरच ऑफिसला या; राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त पुण्यात! स्वॅब घेणे म्हणजे काय? घशातील द्रवपदार्थाचा नमुना तपासणीसाठी घेण्याच्या प्रक्रियेला वैद्यकीय परिभाषेत स्वाब घेणे म्हणतात. हा स्वॅब तपासण्यासाठी ‘एनआयव्ही’ला पाठविला जातो. त्याच्या आधारावर त्या रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे किंवा नाही याचे निश्‍चित निदान होते. खासगी रुग्णालयांचे सहकार्य कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढल्यास खासगी रुग्णालयांची मदत घेण्यात येणार आहे, त्यासाठी दहा रुग्णालयांची तपासणी करून तेथे आपत्कालीन व्यवस्थेत रुग्णांना दाखल केले जाईल. या दहा रुग्णालयांमधील ४२ खाटा राखून ठेवण्यात आल्या आहेत. विलगीकरण कक्ष कुठे आहेत? सिंहगड रस्त्यावर वडगावमधील राजयोग सोसायटीच्या परिसरातील लायगुडे रुग्णालयात आणि सारस बागेजवळील सणस मैदानाच्या परिसरात विलगीकरण कक्ष सुरू केले आहेत. परदेशातून आलेल्या नागरिकांना कोणतीही लक्षणे दिसल्यास त्यांना येथे ठेवले जाईल. त्यांचा त्रास वाढल्यास त्यांना डॉ. नायडू रुग्णालयात दाखल करण्यात येईल. या प्रत्येक ठिकाणी ४० जणांची निवासाची व्यवस्था सज्ज ठेवली आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 14, 2020

#WeCareForPune : घाबरू नका, वैद्यकीय सल्ला घ्या पुणे - तुम्ही परदेशात गेलेला नाही, परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातही आलेला नाही, तर तुम्ही कोरोनाच्या संसर्गाला घाबरू नका. सर्दी, खोकला असला तर काळजी घ्या. तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या. जर परदेशातून येऊन सर्दी, खोकला, ताप असल्यास तातडीने महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे. आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  सध्या हवामानात बदल होत आहे. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. त्यातच दिवसा उन्हाचा चटका आणि पहाटे गारठा असे वातावरण पुणेकर सध्या अनुभवताना दिसतात, त्यामुळे सामान्यतः सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. नेमक्‍या, याच वेळी कोरोनाचे रुग्ण पुणे शहर आणि पिंपरी- चिंचवडमध्ये आढळले आहेत. सर्दी, खोकला, ताप अशीच या आजाराची लक्षणे आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसते. त्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य खात्याने हे आवाहन केले आहे.  Corona Updates : देशात रुग्णांच्या संख्येत वाढ; पुण्यात नवीन रुग्ण नाही परदेशात प्रवास केलाय? परदेश प्रवास किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तीशी गेल्या काही दिवसांमध्ये संपर्क या दोन निकषांवर कोणी कोणत्या दवाखान्यात जायचं हे आता निश्‍चित केलं आहे. परदेश प्रवास किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तीशी संपर्क आलेल्यांनी आणि कोरोनाची लक्षणे दिसत असणाऱ्यांनी पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या दोन्ही निकषांमध्ये न बसणाऱ्यांनी इतर कोणत्याही वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. काम असेल तरच ऑफिसला या; राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त पुण्यात! स्वॅब घेणे म्हणजे काय? घशातील द्रवपदार्थाचा नमुना तपासणीसाठी घेण्याच्या प्रक्रियेला वैद्यकीय परिभाषेत स्वाब घेणे म्हणतात. हा स्वॅब तपासण्यासाठी ‘एनआयव्ही’ला पाठविला जातो. त्याच्या आधारावर त्या रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे किंवा नाही याचे निश्‍चित निदान होते. खासगी रुग्णालयांचे सहकार्य कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढल्यास खासगी रुग्णालयांची मदत घेण्यात येणार आहे, त्यासाठी दहा रुग्णालयांची तपासणी करून तेथे आपत्कालीन व्यवस्थेत रुग्णांना दाखल केले जाईल. या दहा रुग्णालयांमधील ४२ खाटा राखून ठेवण्यात आल्या आहेत. विलगीकरण कक्ष कुठे आहेत? सिंहगड रस्त्यावर वडगावमधील राजयोग सोसायटीच्या परिसरातील लायगुडे रुग्णालयात आणि सारस बागेजवळील सणस मैदानाच्या परिसरात विलगीकरण कक्ष सुरू केले आहेत. परदेशातून आलेल्या नागरिकांना कोणतीही लक्षणे दिसल्यास त्यांना येथे ठेवले जाईल. त्यांचा त्रास वाढल्यास त्यांना डॉ. नायडू रुग्णालयात दाखल करण्यात येईल. या प्रत्येक ठिकाणी ४० जणांची निवासाची व्यवस्था सज्ज ठेवली आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2WaXtYB

No comments:

Post a Comment