‘ॲप’निंग : छुपा कॅमेरा शोधताना आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणसाचे दैनंदिन जीवन सुकर झाले आहे. अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण याच आधुनिक तंत्रज्ञानाचा काही लोक गैरवापर करून इतरांना अडचणीत आणतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने होणाऱ्या गुन्हेगारीचे प्रमाण सध्या खूपच वाढले आहे. त्यामुळे आपले जीवन असुरक्षित झाले आहे. अशाच एका तंत्रज्ञानाचा सर्रास गैरवापर होताना दिसतो, तो म्हणजे छुपा कॅमेरा किंवा स्पाय कॅमेरा. छुप्या कॅमेऱ्याचा गैरवापर करण्याच्या प्रकारांना रोखण्यासाठी आता विविध ॲप उपलब्ध असून, ते अत्यंत उपयुक्त आहेत.  हिडन कॅमेरा आणि स्पाय कॅमेऱ्याचा वापर करून कित्येकांना, विशेषतः महिलांना अडचणीत आणले जाते. हॉटेल आणि तयार कपड्यांच्या शोरूममधील चेंजिग रूममध्ये छुपा कॅमेरा लावून चित्रीकरण केल्याच्या घटना वारंवार उघडकीस येत असतात. एखाद्यावर पाळत ठेवण्यासाठीदेखील स्पाय कॅमेऱ्याचा वापर केला जातो. हॉटेल, शॉपिंग मॉल, ऑफिस, घर कोठेही अशा कॅमेऱ्यांचा वापर केला जातो. तंत्रज्ञानाच्या अशा गैरवापरावर तंत्रज्ञानानेच आता उपाय शोधला आहे. तो म्हणजे स्पाय/हिडन कॅमेरे शोधणारे ॲप.  सतत कोणीतरी आपल्याला पाहत आहे, छुप्या कॅमेऱ्यातून आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे, असे तुम्हाला वाटते काय? छुपे कॅमेरे शोधणारे ॲप उपलब्ध असल्याने तुमची ही चिंता दूर होऊ शकते. ॲन्ड्रॉईड आणि आयफोनमध्ये हे ॲप वापरता येते. छुपे कॅमेरे शोधणाऱ्या ॲपमुळे तुम्ही कोठेही सुरक्षित राहू शकता. तसेच तुमच्या वैयक्तिक गोष्टींची गोपनीयता राखण्यासही त्यामुळे मदत होते. हॉटेल, शॉपिंग मॉल, ऑफिस, घर कोठेही हे ॲप वापरून तुम्ही छुपा कॅमेरा शोधू शकता.  कसे वापरावे छुपा कॅमेरा शोधणारे ॲप?  छुपा कॅमेरा शोधणाऱ्या ॲपद्वारे दोन पर्याय दिले जातात.  इन्फ्रेरड्‌ : मोबाईल कॅमेऱ्याचा वापर करून छुप्या कॅमेऱ्याचा शोध घेता येतो. बाथरुम, बेडरुम, चेंजिग रुम अथवा इतर कोणत्याही ठिकाणी वॉटर हिटर, आरसा, फ्लॉवरपॉट, बल्ब, ट्यूब, एसी, टीव्ही, कॉफी मशीन, हॅंगर यासारख्या संशयास्पद वस्तू स्कॅन करून मोबाईल कॅमेऱ्याद्वारे छुप्या कॅमेऱ्याचा शोध घेता येतो.  रेडिएशन : रेडिएशनद्वारे तुमच्या आसपास असलेल्या छुप्या कॅमेऱ्याची मोबाईलद्वारे माहिती मिळते. त्यानुसार छुप्या कॅमेऱ्याचा शोध घेता येतो.  छुपा कॅमेरा आढळल्यास काय करावे? १) सर्वांत आधी छुप्या कॅमेऱ्याचे फोटो पुरावा म्हणून काढून ठेवावेत. २) छुपा कॅमेरा कपड्याने झाकावा. ३) तातडीने पोलिसांना फोन करून संबधित प्रकाराची माहिती द्यावी. ४) संबंधित ठिकाणच्या व्यवस्थापकांना याबाबत माहिती देऊन त्यांच्याकडे विचारणा करावी. ५) इतरांना छुप्या कॅमेऱ्याबाबत कल्पना द्यावी.  छुपा कॅमेरा शोधणारे अनेक ॲप ‘प्ले स्टोअर’वर उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून आपण सार्वजनिक ठिकाणचा आपला वावर सुरक्षित करू शकतो. हे ॲप असेः १) रादरबोट फ्री (Radarbot Free) - ॲन्ड्रॉईड आणि आयफोन  २) स्पाय हिडन कॅमेरा डिटेक्‍टर - ॲन्ड्रॉईड आणि आयफोन ३) हिडन कॅमेरा डिटेक्‍टर - आयफोन ४) डोन्ट स्पाय- स्पाय डिव्हाईस डिटेक्‍टर - आयफोन ५) हिडन कॅमेरा डिटेक्‍टर - ॲन्ड्रॉइड ६) ॲन्टी- स्पाय कॅमेरा-ॲन्ड्रॉइड  ७) स्पॉय हिडन कॅमेरा डिटेक्‍टर - ॲन्ड्रॉइड  ८) स्पाय कॅमेरा डिटेक्‍टर - ॲन्ड्रॉइड  ९) हिडन कॅमेरा- ॲन्ड्रॉइड  १०) स्पाय कॅमेरा फाउंडर - ॲन्ड्रॉइड. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 13, 2020

‘ॲप’निंग : छुपा कॅमेरा शोधताना आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणसाचे दैनंदिन जीवन सुकर झाले आहे. अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण याच आधुनिक तंत्रज्ञानाचा काही लोक गैरवापर करून इतरांना अडचणीत आणतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने होणाऱ्या गुन्हेगारीचे प्रमाण सध्या खूपच वाढले आहे. त्यामुळे आपले जीवन असुरक्षित झाले आहे. अशाच एका तंत्रज्ञानाचा सर्रास गैरवापर होताना दिसतो, तो म्हणजे छुपा कॅमेरा किंवा स्पाय कॅमेरा. छुप्या कॅमेऱ्याचा गैरवापर करण्याच्या प्रकारांना रोखण्यासाठी आता विविध ॲप उपलब्ध असून, ते अत्यंत उपयुक्त आहेत.  हिडन कॅमेरा आणि स्पाय कॅमेऱ्याचा वापर करून कित्येकांना, विशेषतः महिलांना अडचणीत आणले जाते. हॉटेल आणि तयार कपड्यांच्या शोरूममधील चेंजिग रूममध्ये छुपा कॅमेरा लावून चित्रीकरण केल्याच्या घटना वारंवार उघडकीस येत असतात. एखाद्यावर पाळत ठेवण्यासाठीदेखील स्पाय कॅमेऱ्याचा वापर केला जातो. हॉटेल, शॉपिंग मॉल, ऑफिस, घर कोठेही अशा कॅमेऱ्यांचा वापर केला जातो. तंत्रज्ञानाच्या अशा गैरवापरावर तंत्रज्ञानानेच आता उपाय शोधला आहे. तो म्हणजे स्पाय/हिडन कॅमेरे शोधणारे ॲप.  सतत कोणीतरी आपल्याला पाहत आहे, छुप्या कॅमेऱ्यातून आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे, असे तुम्हाला वाटते काय? छुपे कॅमेरे शोधणारे ॲप उपलब्ध असल्याने तुमची ही चिंता दूर होऊ शकते. ॲन्ड्रॉईड आणि आयफोनमध्ये हे ॲप वापरता येते. छुपे कॅमेरे शोधणाऱ्या ॲपमुळे तुम्ही कोठेही सुरक्षित राहू शकता. तसेच तुमच्या वैयक्तिक गोष्टींची गोपनीयता राखण्यासही त्यामुळे मदत होते. हॉटेल, शॉपिंग मॉल, ऑफिस, घर कोठेही हे ॲप वापरून तुम्ही छुपा कॅमेरा शोधू शकता.  कसे वापरावे छुपा कॅमेरा शोधणारे ॲप?  छुपा कॅमेरा शोधणाऱ्या ॲपद्वारे दोन पर्याय दिले जातात.  इन्फ्रेरड्‌ : मोबाईल कॅमेऱ्याचा वापर करून छुप्या कॅमेऱ्याचा शोध घेता येतो. बाथरुम, बेडरुम, चेंजिग रुम अथवा इतर कोणत्याही ठिकाणी वॉटर हिटर, आरसा, फ्लॉवरपॉट, बल्ब, ट्यूब, एसी, टीव्ही, कॉफी मशीन, हॅंगर यासारख्या संशयास्पद वस्तू स्कॅन करून मोबाईल कॅमेऱ्याद्वारे छुप्या कॅमेऱ्याचा शोध घेता येतो.  रेडिएशन : रेडिएशनद्वारे तुमच्या आसपास असलेल्या छुप्या कॅमेऱ्याची मोबाईलद्वारे माहिती मिळते. त्यानुसार छुप्या कॅमेऱ्याचा शोध घेता येतो.  छुपा कॅमेरा आढळल्यास काय करावे? १) सर्वांत आधी छुप्या कॅमेऱ्याचे फोटो पुरावा म्हणून काढून ठेवावेत. २) छुपा कॅमेरा कपड्याने झाकावा. ३) तातडीने पोलिसांना फोन करून संबधित प्रकाराची माहिती द्यावी. ४) संबंधित ठिकाणच्या व्यवस्थापकांना याबाबत माहिती देऊन त्यांच्याकडे विचारणा करावी. ५) इतरांना छुप्या कॅमेऱ्याबाबत कल्पना द्यावी.  छुपा कॅमेरा शोधणारे अनेक ॲप ‘प्ले स्टोअर’वर उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून आपण सार्वजनिक ठिकाणचा आपला वावर सुरक्षित करू शकतो. हे ॲप असेः १) रादरबोट फ्री (Radarbot Free) - ॲन्ड्रॉईड आणि आयफोन  २) स्पाय हिडन कॅमेरा डिटेक्‍टर - ॲन्ड्रॉईड आणि आयफोन ३) हिडन कॅमेरा डिटेक्‍टर - आयफोन ४) डोन्ट स्पाय- स्पाय डिव्हाईस डिटेक्‍टर - आयफोन ५) हिडन कॅमेरा डिटेक्‍टर - ॲन्ड्रॉइड ६) ॲन्टी- स्पाय कॅमेरा-ॲन्ड्रॉइड  ७) स्पॉय हिडन कॅमेरा डिटेक्‍टर - ॲन्ड्रॉइड  ८) स्पाय कॅमेरा डिटेक्‍टर - ॲन्ड्रॉइड  ९) हिडन कॅमेरा- ॲन्ड्रॉइड  १०) स्पाय कॅमेरा फाउंडर - ॲन्ड्रॉइड. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2U3VOBn

No comments:

Post a Comment