ग्राउंड रिपोर्टः हरियाणा की सड़कें खस्ताहाल, वाहन चलाना हुआ मुश्किल https://ift.tt/38gHMkR Latest news updates March 03, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
दिल्ली के हिंसा प्रभावित इलाकों में 5 को होगी शांति बैठक https://ift.tt/32O2oQi Latest news updates March 03, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
पैसों के लिए आकांक्षा पर डिपेंडेंट रहते थे पारस? एक्टर ने दिया जवाब https://ift.tt/38nbIvE Latest news updates March 03, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
कोरोना वायरस पर क्या कहना है WHO की चीफ साइंटिस्ट सौम्या स्वामीनाथन का https://ift.tt/3amL2gb Latest news updates March 03, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
प्लास्टिक पर 9 दिन तक जिंदा रह सकता है कोरोना वायरस! https://ift.tt/3ao0Jn7 Latest news updates March 03, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
विश्वास पाटील, विश्वास वसेकर यांना कवी अनंत फंदी पुरस्कार संगमनेर ः मराठी साहित्य विश्वातील प्रतिष्ठेचा, संगमनेर इतिहास संशोधन मंडळाच्यावतीने देण्यात येणारा कवी अनंत फंदी साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या नागकेशर या कादंबरीला व ज्येष्ठ कवी प्रा. विश्वास वसेकर ( पुणे ) यांच्या कलमी कविता या विडंबन काव्य संग्रहाला जाहीर झाला आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याच कार्यक्रमात डॉ. पराग सराफ यांचा कवी अनंत फंदी ज्ञान गौरव पुरस्कार देऊन तर सोमनाथ तात्याबा कळसकर गुरुजी यांचा कृतज्ञता गौरव सन्मान होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष डी. बी. राठी व कार्याध्यक्ष डॉ. संतोष खेडलेकर यांनी दिली. लोकसहभागातून दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे हे 15 वे वर्ष आहे. लेखक, कवींनी पाठवलेल्या साहित्यकृतीपेक्षा मागील तीन वर्षांपासून त्या वर्षात विविध क्षेत्रातील जाणकारांनी वाचलेल्या व सुचविलेल्या पुस्तकांचाही विचार करून हे पुरस्कार दिले जातात. सहकाराच्या पट्ट्यातील राजकिय घराण्यातील कौटूंबिक कलहाचे चित्रण असलेल्या नागकेशर ही कादंबरी तसेच विडंबन काव्यप्रकार समर्थपणे हाताळलेल्या प्रा. विश्वास वसेकर यांच्या कलमी कविता या काव्यसंग्रहाची निवड झाली आहे. शिक्षण आणि शैक्षणिक लेखन क्षेत्रात अनेक विक्रम प्रस्थापित केलेले प्रा. डॉ. पराग सराफ यांनी देशात सर्वात कमी वयात विद्यावाचस्पती पदवी मिळवली आहे. चार्टर्ड अकौटंट असलेल्या डॉ. सराफ यांची आजवर 135 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा पीएचडीचा शोध प्रबंध सार्क परिषदेत मान्य होवून, त्याचा बांगलादेशातील पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. तर शिक्षकीपेशात कार्यरत असताना आणि सेवानिवृत्तीनंतरही शिक्षणापासून वंचित राहिलेल्या भटक्या समाजातील मुलांना, स्वखर्चाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करणारे सोमनाथ तात्याबा कळसकर गुरुजी यांचा कृतज्ञता गौरव सन्मान या सोहळ्यात केला जाणार आहे. ज्येष्ठ कवी प्रा. संतोष पवार व अँड. रंजना गवांदे यांच्या समितीने यावर्षीच्या पुरस्कारप्राप्त साहित्यकृतींची निवड केली आहे. रविवार ( ता. 08 ) मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता, संगमनेर येथील व्यापारी मंडळ सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला मीना जगधने व नगराध्यक्ष दुर्गा तांबे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 03, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2TnyX4O Read More Read more No comments:
सोलापूर जिल्ह्यात असा होतोय वाळू उपसा पंढरपूर (सोलापूर) : आंबे व चळे (ता. पंढरपूर) येथील भीमा नदीपात्रातील अवैध वाळू उपशाविरोधात आज पोलिसांनी कारवाई केली. कारवाईदरम्यान 24 ब्रास वाळूसह पाच लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आंबे व चळे येथील सात जणांविरोधात अवैध वाळू चोरीप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी बापूसाहेब मोरे यांनी फिर्याद दिली. आंबे (ता. पंढरपूर) शिवारातील भीमा नदीपात्रालगत असलेल्या आंबे ते चळे रस्त्यानजीक दत्तात्रय गायकवाड (रा. चळे) यांच्या शेताजवळ भीमा नदीपात्रातून ट्रॅक्टर व यारीच्या साहाय्याने अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी पोलिसांनी दत्तात्रय गायकवाड यांच्या शेताजवळील भीमा नदीपात्रात पाहणी केली असता एका विना क्रमांकाच्या स्वराज्य ट्रॅक्टरला यारी जोडून वाळू उपसा केला जात असल्याचे दिसून आले. कारवाईसाठी पोलिस आल्याचे कळताच वाळू उपसा करणारे अनोळखी सहा जण पळून गेले. कारवाईदरम्यान दत्तात्रय सुदाम गायकवाड, विठ्ठल यशवंत गायकवाड, यशवंत चौगुले यांच्या शेतात प्रत्येकी 40 हजार रुपयांची आठ ब्रास वाळूसह 60 हजार रुपयांची लोखंडी यारी सापडली. कारवाईदरम्यान सिधू नागणे (रा. आंबे), बापूराव मनोहर जाधव (आंबे), संजय चौगुले (रा. पंढरपूर), अनिकेत कांबळे (रा. आंबे) यांच्या शेतातही अवैध वाळू आणि यारीचे साहित्य आढळून आले म्हणून या संशयित आरोपींविरोधात अवैध वाळू उपसा करून पर्यावरणाचा ऱ्हास केला म्हणून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 03, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/38hpGzr Read More Read more No comments:
क्षणार्धात होत्याचं नव्हतं...काय घडलं? सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - खासकीलवाडा येथील रहिवासी सुरेश वारंग यांच्या पत्र्याची शेड असलेल्या मांगराला अचानक आग लागली. या आगीत त्यांच्या शेडमधील दोन दुचाकी गाड्या, तीन सायकल तसेच सिलेंडर, शेगडी, वोशिंग मशीन आदी बहुतांश साहित्य जळून खाक झाले. ही आग लागताच आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा केल्यामुळे अग्निशमन बंबला पाचारण करण्यात आले. त्यामुळे आग विझवण्यात यश आले. यात श्री. वारंग यांचे अंदाजे दीड लाखाचे नुकसान झाले असून याबाबत पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. खासकीलवाडा येथील रहिवासी श्री. वारंग यांच्या घराच्या खालच्या बाजूस पत्र्याची शेड आहे. या शेडमध्ये वापरातील तसेच विना वापरातील वस्तू आहेत. आज मध्यरात्री अडीचच्या सुमारास या शेडला अचानक आग लागली. त्यानंतर या शेडमध्ये असलेल्या तेलाच्या रिकाम्या कॅनमुळे या आगीने रौद्ररूप धारण केले. रात्री तेथील नागरिकांनी काही तरी जळण्याचा वास आल्याने त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता वारंग यांच्या शेडला आग लागल्याचे निदर्शनास आले. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी एकत्र येत श्री. वारंग यांना कल्पना दिली. तसेच घरातील पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीच्या झळा एवढ्या होत्या की ती विझवण्यात यश आले नाही. त्यानंतर तातडीने पालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत शेडमधील अर्धे अधिक समान जाळून खाक झाले. अखेरीस बंबने पाणी मारून ही आग विझवण्यात आली. आग लागलेल्या वेळी शेडमध्ये असलेल्या वारंग यांच्या दोन दुचाकी काढण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला; मात्र हॅंडल लॉक असल्यामुळे तसेच आगीचा भडका उडल्यामुळे यात यश आले नाही. या शेडमध्ये ठेवलेली दोन दुचाकी, वाॅशिंग मशीन, जुने साहित्य, गॅस शेगडी, तीन सायकल, घरगुती साहित्य, सिलेंडर आदी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या मांगरात कोणीही राहत नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. शिवाय आग वेळीच विझवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 03, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2Ig3oDv Read More Read more No comments:
सावंतवाडीत आठवडा बाजाराच्या जागेवरून वाद चिघळला, पण का? सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील आठवडा बाजाराच्या जागेवरून निर्माण झालेला वाद आज चिघळला. पालिकेने व्यापारी संघटनेला विश्वासात न घेतल्याने तसेच पालिकेतील बैठकीत सत्ताधाऱ्यांनी चांगली वागणूक मिळाली नसल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला. दोन्ही बाजूंनी भूमिका मांडण्यात आली. पालिकेतर्फे नगराध्यक्ष संजू परब यांनी जिमखाना येथेच आठवडा बाजार भरवणार असल्याचे स्पष्ट केले. ही जागा आम्हाला मान्य नसल्याचे व्यापारी संघटनेने सांगितले. त्यामुळे वाद चिघळण्याची शक्यता आहे. उभा बाजार भागात आठवडा बाजार भरत होता; मात्र वाढते व्यापारी आणि अपुरी जागा यामुळे वाद होवू लागले. हा विषय नगराध्यक्ष परब यांच्याकडे नेण्यात आला. पालिकेने नव्या जागेत म्हणजे जिमखाना येथे आठवडा बाजार भरवण्याचे जाहिर केले. आज या नव्या जागेत पहिला बाजार भरला; मात्र त्यावरून वाद निर्माण झाला. व्यापारी संघटनेने नव्या जागेला विरोध केला. यासाठीच्या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी सायंकाळच्या टप्प्यात बंद पुकारला. याला चांगला प्रतिसाद मिळाला. व्यापारी संघाने आपली भूमिका मांडतांना सांगितले की, पालिकेने व्यापाऱ्याना विश्वासात घेऊन सर्वाच्या हिताचा निर्णय घेणे गरजेचे होते आठवडा बाजारात येणाऱ्या भाजी व अन्य भाजी विक्रेत्यांच्या व्यापारावर इतर स्थानिकांचे व्यवसाय अंवलबून होते. त्यामुळे पालिकेने निश्चित केलेल्या जिमखाना मैदानाला आमचा विरोध आहे. याबाबत लवकरच संघटनेची बैठक घेऊन भूमिका जाहीर करू. व्यपारी संघटनेचे अध्यक्ष जगदिश मांजरेकर, बाळ बोर्डेकर, चंद्रकात शिरोडकर, पुंडलिक दळवी, चिंत्तरंजन रेडकर, हेंमत मुंज, विलास सावंत, महेश कोरगावकर, आबा केसरकर उपस्थित होते. श्री मांजरेकर म्हणाले, ""आधीच महामार्ग शहराबाहेरून गेल्याने व्यापाऱ्यावर मोठा परिणाम झाला आहे. धंदा नसल्याने व्यापाऱ्यावर शेतकऱ्याप्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. आम्हाला विश्वासात न घेता आठवडा बाजार जिमखाना मैदानवार हलविला हे चुकीचे. गेल्या अठरा वर्ष उभा बाजार येथे आठवडा बाजार भरतो; मात्र काही किरकोळ लोंकाच्या मागणीवरून बाजार दुसरीकडे हलविणे योग्य नाही. नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्याशी वाद नाही, मात्र बाजार हलविताना इतर व्यावसायिकांचाही विचार करणे गरजेचे होते.'' बाळ बोर्डेकर म्हणाले, ""आठवडा बाजारावर पोट भरणारे शहरात अनेक छोटे मोठे व्यापारी आहेत. त्यांचा धंदा बंद पडणार आहे. आठवडा बाजार असणे गरजेचे आहे; मात्र परप्रांतिय लोकांना आवर घाला. आज साडेचारशे व्यापारी आहे. उद्या पाचशे होणार. त्यांना जागा कुठून देणार? उद्या जिमखाना मैदानावर हाच प्रकार होणार. तेथे व्यापारी वाढल्यास पुढे काय? व्यापाऱ्याच्या हिताच्या दृष्ठीने जिमखाना मैदानाला आमचा विरोधच राहील.'' यासंदर्भात नगराध्यक्ष संजू परब म्हणाले, ""पालिका बैठकित व्यापाऱ्यामध्ये मतमंतातरे दिसून आली. काहींना जिमखान्याचा निर्णय योग्य वाटला तर काहींनी विरोध केला. पालिकेसमोच्या अडचणी लक्षात घेता उभा बाजारमधील आठवडा बाजार कायस्वरूपी बंद करून तो जिमखाना मैदान येथील डॉ. स्वार हॉस्पिटल समोर मोकळ्या मैदानातच भरविण्यात येणार आहे. उभा बाजार येथील स्थानिक रहीवाश्यांचा विरोध, गर्दीमुळे होणारी पाकिटमारी, चोऱ्या, महिलांना होणारी धक्काबुक्की, व्यापाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे बैठक व्यवस्था करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने आदी यामागची कारणे आहेत.'' ते म्हणाले, ""जिमखाना मैदानावर स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार असून परप्रांतियांचा नंतर विचार करण्यात येणार आहे. याबातत स्थानिक व्यापाऱ्यांना विश्वासात घेतले असता त्यांना हा निर्णय मान्य असल्याचे त्यांनी कबुल केले. काही व्यापारी नगराध्यक्ष व नगरसेवकांकडून बैठकीत चांगली वागणूक मिळाली नसल्याचा आरोप करत आहेत. ते चुकीचे आहे. व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांनी व्यापाऱ्यांना वेठीस धरून व्यापार बंद ठेऊ नये. अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात काही व्यापारी मला भेटतात यावरून अध्यक्षांच्या निर्णयालाच त्यांनी केराची टोपली दाखविली, हे सिध्द होते. त्यामुळे व्यापारी संघाच्या अध्यक्षांनी मला तोंड उघडायला लावू नये.'' यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, सभापती नाशिर शेख, ऍड. परिमल नाईक, राजू बेग, आंनद नेवगी, मनोज नाईक, उदय नाईक आदी उपस्थित होते. बंदला चांगला प्रतिसाद व्यापारी संघटनेच्या बंद हाकेला दुकानदारांनी चांगला प्रतिसाद दिला. बऱ्याच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. काही व्यापाऱ्यानी दुकाने सुरू ठेवल्याने अनेकांमध्ये संभ्रम होता. व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात फिरून आपली भूमिका सांगत दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. आठवडा बाजाराला गर्दी जिमखाना मैदानवार भरविलेल्या आठवडा बाजारात सायंकाळी मोठी गर्दी झाली. तेथील व्यवस्थेमुळे कोणतीही अडचण निर्माण झाली नाही; मात्र मैदानावरील धुळीचा त्रास अनेकांना जाणवला. दुपारी उन्हामुळे ग्राहकांनी पाठ फिरविली होती. ""पालिका प्रशासन किंवा सत्ताधाऱ्यांच्याशी वाकडे नाही; मात्र आठवडा बाजारासंदर्भात भूमिका ठरविताना व्यापारी संघटलेला विचारात घेणे गरजेचे होते. व्यापाऱ्यांच्या हितासाठीच आम्ही भूमिकेवर ठाम आहोत. जिमखान्यावरची जागा मान्य नाही. माझ्यावर झालेल्या वैयक्तिक आरोपाचे मी नंतर उत्तर देईन.'' - जगदीश मांजरेकर, व्यापारी संघटना अध्यक्ष, सावंतवाडी ""व्यापाऱ्यांची वाढती संख्या व त्यामुळे होणाऱ्या जागेचा प्रश्न यात स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी यामुळे आठवडा बाजार जिमखाना येथे हलविला. त्यात आमचा कुठलाही स्वार्थ नाही. नवीन जागेबाबत लवकरच समिती स्थापन करून नियमावली तयार करण्यात येणार आहे; मात्र आता जागेत बदल होणार नाही.'' - संजू परब, नगराध्यक्ष, सावंतवाडी News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 03, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2vs2Pnu Read More Read more No comments:
झूम... : एसयूव्हींची चलती... एसयूव्ही कारची भारतीय बाजारातील मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक वाहन कंपन्या अधिकाधिक एसयूव्हींना भारतीय बाजारामध्ये उतरविण्याच्या तयारीत आहेत. पुढील दोन महिन्यांत ५ एसयूव्ही बाजारात दाखल करण्यात येणार आहेत. त्यांच्याविषयी अधिक माहिती... फोक्सवॅगन टी-रॉक - या महिन्यात १८ मार्चला सादर करणार आहे. या कारमध्ये १.५ लिटर टीएसआय पेट्रोल इंजिनची सुविधा. १४७ बीएचपीची ऊर्जा आणि २०० न्यूटन मीटरचा टॉर्क निर्माण करते. पॅनोरोमिक सनरूफ, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, की लेस एंट्री आणि इंजिन स्टार्ट/स्टॉप बटनाची सुविधा. सुरक्षेसाठी ६ एअरबॅग्ज, एबीएस, ईएससी व टायर प्रेशन मॉनिटरिंग सिस्टिम. टोयोटा एसयूव्ही - टोयोटा किर्लोस्कर मोटर, व्हिटारा ब्रेझाच्या रिबॅज व्हर्जनला एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दाखल होण्याची शक्यता. दोन्ही कंपन्यांमधील करारानंतर या कंपन्या आपापले उत्पादन एकमेकांना देत आहेत. या कारमध्ये माइल्ड हायब्रिडसह १.५ लिटर ४ सिलिंडरचे पेट्रोल इंजिन. १०३ बीएचपीची ऊर्जा आणि १३८ न्यूटन मीटरचा टॉर्क निर्माण करते. व्हिटारा ब्रेझा दिसायला आकर्षक. ह्युंदाई टक्सन फेसलिफ्ट - मार्चच्या पहिल्या आठवड्यात सादर होण्याची शक्यता. बीएस ६, २.० लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिनची क्षमता. फ्री स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम. फोक्सवॅगन तिगुआन ऑल स्पेस - या आठवड्यात सादर होण्याची शक्यता. २.० लीटर टीएसआय टर्बो पेट्रोल इंजिनसह अनावरणाची शक्यता. इंजिन १८७ बीएचपीची ऊर्जा आणि ३२० न्यूटन मीटरचा टॉर्क निर्माण करते. ह्युंदाई क्रेटा - क्रेटा १७ मार्चला सादर होणार आहे. कंपनीने या कारला किआ सेल्टॉसच्या प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे. १.५ लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिनची सुविधा. १०.२५ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, पॅनोरोमिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग सुविधा. News Story Feeds https://ift.tt/2VDsLXQ Latest news updates March 03, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2IjnZXq Read More Read more No comments:
औद्योगिक सुरक्षा दिन विशेष : असुरक्षित यंत्रणा, आगीच्या घटनांमुळे होतेय वित्तहानीही सोलापूर : औद्योगिक सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यात 2018-19 मध्ये दोघांचा व चालू 2019-20 वर्षात तिघांचा अशा एकूण पाच कामगारांचा कारखान्यांमध्ये झालेल्या दुर्घटनेत बळी गेला आहे. सुरक्षा साधनांचा अभाव, सुरक्षा साधने असूनही कामगारांमध्ये साधनांबाबतीत असलेल्या माहितीच्या अभावामुळे तसेच कारखानदार व व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे असे अपघात होत असल्याची माहिती "सकाळ'शी बोलताना तज्ज्ञांनी दिली. शहरातील दोन एमआयडीसीतील उद्योगांमध्ये व जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणा सक्षम असून, काही उद्योगांमध्ये सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. चिंचोळी एमआयडीसी येथील अपघातांचे प्रमाण अत्यल्प व किरकोळ असून, अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील काही उद्योगांमध्ये सुरक्षा साधनांकडे दुर्लक्षामुळे वर्षातून 20 ते 25 आगीच्या दुर्घटना घडून कोट्यवधींची वित्तहानीही होते. दरवर्षी औद्योगिक सुरक्षा सप्ताहात महापालिका अग्निशामक दल व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागातर्फे उद्योजक व कामगारांमध्ये जागृती केली जाते. यात अग्निशमनाची प्रात्यक्षिके सादर केली जातात. त्याचप्रमाणे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागातर्फे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याकरिता करावयाच्या उपाययोजनांबाबत मॉक ड्रील केले जाते. याद्वारे कामगारांमध्ये सुरक्षिततेसंबंधी जागृती निर्माण करण्याचा हेतू असतो. मात्र प्रत्यक्षात कामावर असताना सुरक्षिततेबाबत कामगार जागरूक नसतात. उद्योजकही अग्निशमन यंत्रणांचे नूतनीकरण, त्यांची देखभाल याकडे दुर्लक्ष करतात. कमी पगारात अप्रशिक्षित व कंत्राटी कामगार नेमल्याने अपघाताच्या घटना घडतात. याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जाते. एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतर मग सुरक्षेसंबंधीचे गांभीर्य लक्षात येते. कालांतराने पुन्हा "जैसे थे'ची स्थिती दिसून येते. असुरक्षित यंत्रणेमुळे पाच बळींसह एक जखमी जिल्ह्यात दोन वर्षात घडलेल्या दुर्घटनेत अक्कलकोट रोड एमआयडीसी, खर्डी (ता. पंढरपूर), मंगळवेढा, टेंभुर्णी एमआयडीसी व मोहोळ तालुक्यातील जकराया शुगर येथील प्रत्येकी एका कामगाराचा मृत्यू झाला. चिंचोळी एमआयडीसीतील एका कारखान्याच्या छतावरून पडून एक कामगार जखमी झाला. हे सर्व अपघात सुरक्षा साधनांचा वापर न केल्याने झाल्याची माहिती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक प्रमोद सुरसे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. जिल्ह्यातील औद्योगिक सुरक्षा यंत्रणा चांगली असून, अपघातांचे प्रमाण कमी आहे. आमच्या विभागाकडून प्रत्येक कारखान्याला भेट देऊन तेथील औद्योगिक सुरक्षेसंबंधीची नियमित तपासणी तसेच कामगार व उद्योजकांमध्ये सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण केली जाते. काही ठिकाणी सुरक्षा साधने असूनही कामगार त्यांचा वापर करत नाहीत. कारखानदार व व्यवस्थापनाने कामगारांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. - प्रमोद सुरसे, उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, सोलापूर कारखानदारांनी शासनाने लागू केलेल्या फायर ऍक्टमधील तरतुदींचे तंतोतंत पालन केल्यास दुर्घटना टाळता येतील. त्यासाठी सक्षम अग्निशमन यंत्रणा (फायर हायडंट, स्प्रिंकलर, स्मोक डिटेक्टर व हीट डिटेक्टर सिस्टिम) आदी बसवणे आवश्यक आहे. अन्यथा मोठ्या आगीसारख्या आपत्तीला सामोरे जावे लागेल. अग्निशामक दलाच्या 9422457936 या क्रमांकावर फोन केल्यास विनामूल्य मार्गदर्शन, सल्ला व सेवा दिली जाईल. - केदार आवटे, अधीक्षक, महापालिका अग्निशामक दल News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 03, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2VGYqaN Read More Read more No comments:
उदगीर येथे कोरोनाच्या भितीमुळे मास्कचे दर वाढले तिप्पट उदगीर : नुकतेच तेलंगणा येथे कोरोना विषाणुचे दोन रुग्ण आढळल्याच्या बातम्यांमुळे उदगीरमध्ये तोंडाला लावण्यात येणारे मास्कचे दर तिप्पट झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी पाच रुपयाला मिळणारे मास्क बाजारातून गायब झाले आहेत. ठोक भावात खरेदी केली तर यापूर्वी तीनशे ते पाचशे रुपये मिळणारे मास्कचे बॉक्सचे भाव आता बाराशे ते पंधराशे झाले आहेत. संपूर्ण देशभर खबरदारी घेतली जात असताना तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या उदगीरमध्ये याबाबत उपाययोजना आणि रुग्ण आढळलेच तर कितपत तयारी आहे, याचा आढावा घेतला असता डाँक्टरांसह प्रयोगशाळा (लॅब) चालकांना अद्याप शासनस्तरावरून कसल्याही सूचना दिल्या गेल्या नसल्याचे आढळून आले. हे वाचलंत का- आधी पत्नीचा गळा घोटला, नंतर गर्भवती प्रेयसीलाही संपविले, बीडच्या हैवानाला जन्मठेप.. उदगीर हे तेलंगणाच्या सीमेवर असलेले शहर. उदगीरमधून रेल्वे आणि एसटी बसच्या माध्यमातून दररोज हजारो प्रवासी आणि व्यापारी तेलंगणा राज्यात जात येत असतात. यामुळे कोरोनाचा धोका आता उदगीरच्या सीमेवर आला आहे. मात्र याबाबत प्रशासकीय बाबतीत कमालीची उदासीनता दिसून येत आहे. कोरोना आजाराची लागण झाली असल्याचा संशय असेल तर या रुग्णाच्या तपासणीसाठी आवश्यक लॅबसुद्धा उदगीरमध्ये नाही. संशयित रुग्णांचे रक्त घायचे का स्वॅब घ्यायचा आणि तो तपासणीसाठी कोठे पाठवायचा या बाबत कसल्याही सूचना दिल्या गेल्या नाहीत. यामुळे असा संशयित रुग्ण आढळला तर नेमके काय करायचे याबाबत लॅब चालक आणि खासगी डॉक्टर संभ्रमात आहेत. संशयित रुग्णांसोबत राहणाऱ्या आणि उपचार करणाऱ्यांनी काय काळजी घ्यावी या बाबत जनजागृती बाबत सर्वच पातळीवर उदासीनता आहे. तातडीने जनजागृती करून खबरदारीचा उपाय म्हणून काय काळजी घेतली पाहिजे आणि संशयित रुग्णाची कशी काळजी घेतली पाहिजे या बाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. क्लिक करा- लातूरात मालमत्ता कराची सात दिवसांत एक कोटीची वसुली : मोठे थकबाकीदार मात्र मोकाटच हात स्वच्छ धुणे आवश्यक जेवन, शिंक आल्यानंतर , खोकल्यानंतर , आजारी व्यक्तीची काळजी घेण्यापूर्वी, स्वयंपाक करण्यापूर्वी आणि केल्यानंतर तसेच पाळीव प्राण्यांना हाताळल्यानंतर आणि विष्ठा काढल्यानंतर नागरिकांनी हात स्वच्छ धुवावेत असे आवाहन सामान्य रुग्णालय मार्फत करण्यात आले आहे. उदगीर येथून दररोज हजारो प्रवाशी तेलंगणात ये-जा करतात. यामुळे उदगीर येथे कोरोना विषाणुची शक्यता लक्षात घेऊन पाच बेडची स्वतंत्र व्यवस्था असणारा कक्ष तयार ठेण्यात आला आहे. संशयित रुग्णाच्या तापसणीसाठीची व्यवस्था नसल्यामुळे स्वॅब शासकीय रुग्णालयामार्फत पाठवून अहवाल निगेटिव्ह आल्यानंरच रुग्णाला घरी पाठविण्यात येणार आहे.साधारण पंधरा दिवस अशा रुग्णाची काळजी घेण्यासाठी लागणारी सर्व व्यवस्था तयार ठेवण्याबत स्टोअर विभागाला सांगण्यात आले आहे. नागरिकांमध्ये घबराट पसरू नये म्हणून शासन पातळीवरून अद्याप सूचना दिल्या गेल्या नाहीत, एखादा रुग्ण जरी संशयित आढळला तर अफवा पसरू शकतात म्हणून अशी काळजी घेतली जात आहे. कोणालाही सर्दी, ताप खोकला, श्वसनाला त्रास आदी लक्षणे असतील आणि सर्दी ताप कमी होत नसेल आणि तो जर कोरोना विषाणुबाधित रुग्णांच्या संपर्कात आला असेल तरच अशा रुग्णाची काळजी घेणे आवश्यक आहे. इतरांनी अशी लक्षणे दिसली म्हणून घाबरून जाऊ नये. कसलीही शंका असेल तर तातडीने शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. - डॉ. शशिकांत देशपांडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय उदगीर हेही वाचा- बेवारस कुत्रीच्या उपचारासाठी शिक्षकांचा पुढाकाराने रूग्णवाहिका आली धावून News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 03, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/32NtWp2 Read More Read more No comments:
दोषींची गय करू नका; मुख्यमंत्री केजरीवालांची पंतप्रधान मोदींकडे मागणी नवी दिल्ली - दिल्लीतील दंगलप्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांना त्यांचा पक्ष, पद आदींची पर्वा न करता कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आज व्यक्त केली. पश्चिम दिल्लीत अफवांचा बाजार रोखण्यासाठी रविवारी विलक्षण वेगाने काम करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी दंगलीच्या काळात इतकी तत्परता दाखविली असती तर अनेकांचे प्राण वाचू शकले असते, असे सांगून केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांच्या निष्क्रियतेकडेही अंगुलिनिर्देश केला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जीवघेण्या कोरोना विषाणूने दिल्लीतही शिरकाव केल्याचे आढळल्याने त्याच्या मुकाबल्यासाठी केंद्र व राज्य सरकार मिळून काम करतील असेही त्यांनी सांगितले. केजरीवाल यांनी आज संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर केजरीवाल यांनी मोदींची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ होती. फडणवीसांना दणका; सर्वोच्च न्यायालयात खटला चालणार अलीकडेच त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली होती. पत्रकारांशी बोलताना त्यांनी, पंतप्रधानांबरोबरची ही भेट एक राजशिष्टाचार होता असे सांगितले. यावेळी खासदार संजय सिंह, भगवंत मान आदी उपस्थित होते. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींवर भ्याड हल्ला; दिल्लीत घरात घुसून मारहाण तत्परता दाखविली असती तर... केजरीवाल म्हणाले की, ‘‘ दिल्ली ही देशाची राजधानी आहे. तेथे असे दंगेधोपे व्हायला नकोत; पण झालेल्या दंगलीस जे कोणी जबाबदार असतील, मग ते कोणत्याही पक्षाचे, धर्माचे असोत किंवा तो कितीही मोठा माणूस असो, त्यांना दयामाया दाखविता कामा नये. यासाठी राज्य सरकार म्हणून जे काही उपाय करायचे ते आम्ही करू. या दंगेखोरांवर कठोर कारवाई झाली तरच अशाप्रकारचे कृत्य कोणी करणार नाही भविष्यात अशा अप्रिय घटना दिल्लीत होऊ नयेत यासाठी दिल्ली सरकार केंद्राबरोबर काम करेल.पश्चिम दिल्लीत रविवारी जो अफवांचा बाजार गरम होता त्याचा निपटारा करण्यात जी विलक्षण तत्परता व जागरूकता पोलिसांनी दाखविली ती दंगल भडकलेल्या भागांत २३ व २४ फेब्रुवारीला पोलिस दाखविते तर मोठी जीवितहानी टळली असती.’’ दरम्यान पंतप्रधानांबरोबर आपण करोना विषाणूच्या दिल्लीतील प्रसाराबाबतही चर्चा केली असे सांगून केजरीवाल म्हणाले की, करोनाचा पहिला रूग्ण आढळल्यावर दिल्लीतही आम्ही करोनाला अटकाव करण्यासाठी केंद्राबरोबर मिळून काम करणार आहोत. पोलिसावर बंदूक रोखणारा शाहरुख अटकेत राजधानीतील हिंसाचारादरम्यान थेट पोलिस अधिकाऱ्यावर बंदूक रोखणारा माथेफिरू तरुण शाहरुख याला उत्तर प्रदेशातील मौजपूर येथून आज अटक करण्यात आली. शाहरुखला लवकरच दिल्लीमध्ये आणण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मागील आठवड्यामध्ये शाहरुखचे काही व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले होते यात तो एका पोलिस अधिकाऱ्यावर बंदूक रोखत धमकावत असल्याचे दिसून येते. भारताने खडसावले संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कांसाठीच्या उच्चायुक्तांनी नागरिकत्व कायद्याच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात धाव घेत या संदर्भातील माहिती जीनिव्हातील भारताच्या स्थायी प्रतिनिधींना कळविली होती. खुद्द परराष्ट्र मंत्रालयाकडूनच तशी माहिती देण्यात आली आहे. यावर परराष्ट्र मंत्रालयाने मात्र नागरिकत्व कायदा हा आमचा अंतर्गत मुद्दा असून, या संदर्भात कायदा तयार करण्याचा सार्वभौम हक्क हा भारतीय संसदेला असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. नागरिकत्व कायदा हा घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याची भारताची ठाम भूमिका आहे , असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 03, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/39no0Wb Read More Read more No comments: