सावंतवाडीत आठवडा बाजाराच्या जागेवरून वाद चिघळला, पण का? सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील आठवडा बाजाराच्या जागेवरून निर्माण झालेला वाद आज चिघळला. पालिकेने व्यापारी संघटनेला विश्‍वासात न घेतल्याने तसेच पालिकेतील बैठकीत सत्ताधाऱ्यांनी चांगली वागणूक मिळाली नसल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला. दोन्ही बाजूंनी भूमिका मांडण्यात आली. पालिकेतर्फे नगराध्यक्ष संजू परब यांनी जिमखाना येथेच आठवडा बाजार भरवणार असल्याचे स्पष्ट केले. ही जागा आम्हाला मान्य नसल्याचे व्यापारी संघटनेने सांगितले. त्यामुळे वाद चिघळण्याची शक्‍यता आहे.  उभा बाजार भागात आठवडा बाजार भरत होता; मात्र वाढते व्यापारी आणि अपुरी जागा यामुळे वाद होवू लागले. हा विषय नगराध्यक्ष परब यांच्याकडे नेण्यात आला. पालिकेने नव्या जागेत म्हणजे जिमखाना येथे आठवडा बाजार भरवण्याचे जाहिर केले. आज या नव्या जागेत पहिला बाजार भरला; मात्र त्यावरून वाद निर्माण झाला. व्यापारी संघटनेने नव्या जागेला विरोध केला. यासाठीच्या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी सायंकाळच्या टप्प्यात बंद पुकारला. याला चांगला प्रतिसाद मिळाला.  व्यापारी संघाने आपली भूमिका मांडतांना सांगितले की, पालिकेने व्यापाऱ्याना विश्‍वासात घेऊन सर्वाच्या हिताचा निर्णय घेणे गरजेचे होते आठवडा बाजारात येणाऱ्या भाजी व अन्य भाजी विक्रेत्यांच्या व्यापारावर इतर स्थानिकांचे व्यवसाय अंवलबून होते. त्यामुळे पालिकेने निश्‍चित केलेल्या जिमखाना मैदानाला आमचा विरोध आहे. याबाबत लवकरच संघटनेची बैठक घेऊन भूमिका जाहीर करू. व्यपारी संघटनेचे अध्यक्ष जगदिश मांजरेकर, बाळ बोर्डेकर, चंद्रकात शिरोडकर, पुंडलिक दळवी, चिंत्तरंजन रेडकर, हेंमत मुंज, विलास सावंत, महेश कोरगावकर, आबा केसरकर उपस्थित होते.  श्री मांजरेकर म्हणाले, ""आधीच महामार्ग शहराबाहेरून गेल्याने व्यापाऱ्यावर मोठा परिणाम झाला आहे. धंदा नसल्याने व्यापाऱ्यावर शेतकऱ्याप्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. आम्हाला विश्‍वासात न घेता आठवडा बाजार जिमखाना मैदानवार हलविला हे चुकीचे. गेल्या अठरा वर्ष उभा बाजार येथे आठवडा बाजार भरतो; मात्र काही किरकोळ लोंकाच्या मागणीवरून बाजार दुसरीकडे हलविणे योग्य नाही. नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्याशी वाद नाही, मात्र बाजार हलविताना इतर व्यावसायिकांचाही विचार करणे गरजेचे होते.''  बाळ बोर्डेकर म्हणाले, ""आठवडा बाजारावर पोट भरणारे शहरात अनेक छोटे मोठे व्यापारी आहेत. त्यांचा धंदा बंद पडणार आहे. आठवडा बाजार असणे गरजेचे आहे; मात्र परप्रांतिय लोकांना आवर घाला. आज साडेचारशे व्यापारी आहे. उद्या पाचशे होणार. त्यांना जागा कुठून देणार? उद्या जिमखाना मैदानावर हाच प्रकार होणार. तेथे व्यापारी वाढल्यास पुढे काय? व्यापाऱ्याच्या हिताच्या दृष्ठीने जिमखाना मैदानाला आमचा विरोधच राहील.''  यासंदर्भात नगराध्यक्ष संजू परब म्हणाले, ""पालिका बैठकित व्यापाऱ्यामध्ये मतमंतातरे दिसून आली. काहींना जिमखान्याचा निर्णय योग्य वाटला तर काहींनी विरोध केला. पालिकेसमोच्या अडचणी लक्षात घेता उभा बाजारमधील आठवडा बाजार कायस्वरूपी बंद करून तो जिमखाना मैदान येथील डॉ. स्वार हॉस्पिटल समोर मोकळ्या मैदानातच भरविण्यात येणार आहे. उभा बाजार येथील स्थानिक रहीवाश्‍यांचा विरोध, गर्दीमुळे होणारी पाकिटमारी, चोऱ्या, महिलांना होणारी धक्‍काबुक्की, व्यापाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे बैठक व्यवस्था करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने आदी यामागची कारणे आहेत.''  ते म्हणाले, ""जिमखाना मैदानावर स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार असून परप्रांतियांचा नंतर विचार करण्यात येणार आहे. याबातत स्थानिक व्यापाऱ्यांना विश्‍वासात घेतले असता त्यांना हा निर्णय मान्य असल्याचे त्यांनी कबुल केले. काही व्यापारी नगराध्यक्ष व नगरसेवकांकडून बैठकीत चांगली वागणूक मिळाली नसल्याचा आरोप करत आहेत. ते चुकीचे आहे. व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांनी व्यापाऱ्यांना वेठीस धरून व्यापार बंद ठेऊ नये. अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात काही व्यापारी मला भेटतात यावरून अध्यक्षांच्या निर्णयालाच त्यांनी केराची टोपली दाखविली, हे सिध्द होते. त्यामुळे व्यापारी संघाच्या अध्यक्षांनी मला तोंड उघडायला लावू नये.'' यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, सभापती नाशिर शेख, ऍड. परिमल नाईक, राजू बेग, आंनद नेवगी, मनोज नाईक, उदय नाईक आदी उपस्थित होते.  बंदला चांगला प्रतिसाद  व्यापारी संघटनेच्या बंद हाकेला दुकानदारांनी चांगला प्रतिसाद दिला. बऱ्याच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. काही व्यापाऱ्यानी दुकाने सुरू ठेवल्याने अनेकांमध्ये संभ्रम होता. व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात फिरून आपली भूमिका सांगत दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.  आठवडा बाजाराला गर्दी  जिमखाना मैदानवार भरविलेल्या आठवडा बाजारात सायंकाळी मोठी गर्दी झाली. तेथील व्यवस्थेमुळे कोणतीही अडचण निर्माण झाली नाही; मात्र मैदानावरील धुळीचा त्रास अनेकांना जाणवला. दुपारी उन्हामुळे ग्राहकांनी पाठ फिरविली होती.  ""पालिका प्रशासन किंवा सत्ताधाऱ्यांच्याशी वाकडे नाही; मात्र आठवडा बाजारासंदर्भात भूमिका ठरविताना व्यापारी संघटलेला विचारात घेणे गरजेचे होते. व्यापाऱ्यांच्या हितासाठीच आम्ही भूमिकेवर ठाम आहोत. जिमखान्यावरची जागा मान्य नाही. माझ्यावर झालेल्या वैयक्‍तिक आरोपाचे मी नंतर उत्तर देईन.''  - जगदीश मांजरेकर, व्यापारी संघटना अध्यक्ष, सावंतवाडी  ""व्यापाऱ्यांची वाढती संख्या व त्यामुळे होणाऱ्या जागेचा प्रश्‍न यात स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी यामुळे आठवडा बाजार जिमखाना येथे हलविला. त्यात आमचा कुठलाही स्वार्थ नाही. नवीन जागेबाबत लवकरच समिती स्थापन करून नियमावली तयार करण्यात येणार आहे; मात्र आता जागेत बदल होणार नाही.''  - संजू परब, नगराध्यक्ष, सावंतवाडी  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 3, 2020

सावंतवाडीत आठवडा बाजाराच्या जागेवरून वाद चिघळला, पण का? सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील आठवडा बाजाराच्या जागेवरून निर्माण झालेला वाद आज चिघळला. पालिकेने व्यापारी संघटनेला विश्‍वासात न घेतल्याने तसेच पालिकेतील बैठकीत सत्ताधाऱ्यांनी चांगली वागणूक मिळाली नसल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला. दोन्ही बाजूंनी भूमिका मांडण्यात आली. पालिकेतर्फे नगराध्यक्ष संजू परब यांनी जिमखाना येथेच आठवडा बाजार भरवणार असल्याचे स्पष्ट केले. ही जागा आम्हाला मान्य नसल्याचे व्यापारी संघटनेने सांगितले. त्यामुळे वाद चिघळण्याची शक्‍यता आहे.  उभा बाजार भागात आठवडा बाजार भरत होता; मात्र वाढते व्यापारी आणि अपुरी जागा यामुळे वाद होवू लागले. हा विषय नगराध्यक्ष परब यांच्याकडे नेण्यात आला. पालिकेने नव्या जागेत म्हणजे जिमखाना येथे आठवडा बाजार भरवण्याचे जाहिर केले. आज या नव्या जागेत पहिला बाजार भरला; मात्र त्यावरून वाद निर्माण झाला. व्यापारी संघटनेने नव्या जागेला विरोध केला. यासाठीच्या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी सायंकाळच्या टप्प्यात बंद पुकारला. याला चांगला प्रतिसाद मिळाला.  व्यापारी संघाने आपली भूमिका मांडतांना सांगितले की, पालिकेने व्यापाऱ्याना विश्‍वासात घेऊन सर्वाच्या हिताचा निर्णय घेणे गरजेचे होते आठवडा बाजारात येणाऱ्या भाजी व अन्य भाजी विक्रेत्यांच्या व्यापारावर इतर स्थानिकांचे व्यवसाय अंवलबून होते. त्यामुळे पालिकेने निश्‍चित केलेल्या जिमखाना मैदानाला आमचा विरोध आहे. याबाबत लवकरच संघटनेची बैठक घेऊन भूमिका जाहीर करू. व्यपारी संघटनेचे अध्यक्ष जगदिश मांजरेकर, बाळ बोर्डेकर, चंद्रकात शिरोडकर, पुंडलिक दळवी, चिंत्तरंजन रेडकर, हेंमत मुंज, विलास सावंत, महेश कोरगावकर, आबा केसरकर उपस्थित होते.  श्री मांजरेकर म्हणाले, ""आधीच महामार्ग शहराबाहेरून गेल्याने व्यापाऱ्यावर मोठा परिणाम झाला आहे. धंदा नसल्याने व्यापाऱ्यावर शेतकऱ्याप्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. आम्हाला विश्‍वासात न घेता आठवडा बाजार जिमखाना मैदानवार हलविला हे चुकीचे. गेल्या अठरा वर्ष उभा बाजार येथे आठवडा बाजार भरतो; मात्र काही किरकोळ लोंकाच्या मागणीवरून बाजार दुसरीकडे हलविणे योग्य नाही. नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्याशी वाद नाही, मात्र बाजार हलविताना इतर व्यावसायिकांचाही विचार करणे गरजेचे होते.''  बाळ बोर्डेकर म्हणाले, ""आठवडा बाजारावर पोट भरणारे शहरात अनेक छोटे मोठे व्यापारी आहेत. त्यांचा धंदा बंद पडणार आहे. आठवडा बाजार असणे गरजेचे आहे; मात्र परप्रांतिय लोकांना आवर घाला. आज साडेचारशे व्यापारी आहे. उद्या पाचशे होणार. त्यांना जागा कुठून देणार? उद्या जिमखाना मैदानावर हाच प्रकार होणार. तेथे व्यापारी वाढल्यास पुढे काय? व्यापाऱ्याच्या हिताच्या दृष्ठीने जिमखाना मैदानाला आमचा विरोधच राहील.''  यासंदर्भात नगराध्यक्ष संजू परब म्हणाले, ""पालिका बैठकित व्यापाऱ्यामध्ये मतमंतातरे दिसून आली. काहींना जिमखान्याचा निर्णय योग्य वाटला तर काहींनी विरोध केला. पालिकेसमोच्या अडचणी लक्षात घेता उभा बाजारमधील आठवडा बाजार कायस्वरूपी बंद करून तो जिमखाना मैदान येथील डॉ. स्वार हॉस्पिटल समोर मोकळ्या मैदानातच भरविण्यात येणार आहे. उभा बाजार येथील स्थानिक रहीवाश्‍यांचा विरोध, गर्दीमुळे होणारी पाकिटमारी, चोऱ्या, महिलांना होणारी धक्‍काबुक्की, व्यापाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे बैठक व्यवस्था करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने आदी यामागची कारणे आहेत.''  ते म्हणाले, ""जिमखाना मैदानावर स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार असून परप्रांतियांचा नंतर विचार करण्यात येणार आहे. याबातत स्थानिक व्यापाऱ्यांना विश्‍वासात घेतले असता त्यांना हा निर्णय मान्य असल्याचे त्यांनी कबुल केले. काही व्यापारी नगराध्यक्ष व नगरसेवकांकडून बैठकीत चांगली वागणूक मिळाली नसल्याचा आरोप करत आहेत. ते चुकीचे आहे. व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांनी व्यापाऱ्यांना वेठीस धरून व्यापार बंद ठेऊ नये. अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात काही व्यापारी मला भेटतात यावरून अध्यक्षांच्या निर्णयालाच त्यांनी केराची टोपली दाखविली, हे सिध्द होते. त्यामुळे व्यापारी संघाच्या अध्यक्षांनी मला तोंड उघडायला लावू नये.'' यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, सभापती नाशिर शेख, ऍड. परिमल नाईक, राजू बेग, आंनद नेवगी, मनोज नाईक, उदय नाईक आदी उपस्थित होते.  बंदला चांगला प्रतिसाद  व्यापारी संघटनेच्या बंद हाकेला दुकानदारांनी चांगला प्रतिसाद दिला. बऱ्याच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. काही व्यापाऱ्यानी दुकाने सुरू ठेवल्याने अनेकांमध्ये संभ्रम होता. व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात फिरून आपली भूमिका सांगत दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.  आठवडा बाजाराला गर्दी  जिमखाना मैदानवार भरविलेल्या आठवडा बाजारात सायंकाळी मोठी गर्दी झाली. तेथील व्यवस्थेमुळे कोणतीही अडचण निर्माण झाली नाही; मात्र मैदानावरील धुळीचा त्रास अनेकांना जाणवला. दुपारी उन्हामुळे ग्राहकांनी पाठ फिरविली होती.  ""पालिका प्रशासन किंवा सत्ताधाऱ्यांच्याशी वाकडे नाही; मात्र आठवडा बाजारासंदर्भात भूमिका ठरविताना व्यापारी संघटलेला विचारात घेणे गरजेचे होते. व्यापाऱ्यांच्या हितासाठीच आम्ही भूमिकेवर ठाम आहोत. जिमखान्यावरची जागा मान्य नाही. माझ्यावर झालेल्या वैयक्‍तिक आरोपाचे मी नंतर उत्तर देईन.''  - जगदीश मांजरेकर, व्यापारी संघटना अध्यक्ष, सावंतवाडी  ""व्यापाऱ्यांची वाढती संख्या व त्यामुळे होणाऱ्या जागेचा प्रश्‍न यात स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी यामुळे आठवडा बाजार जिमखाना येथे हलविला. त्यात आमचा कुठलाही स्वार्थ नाही. नवीन जागेबाबत लवकरच समिती स्थापन करून नियमावली तयार करण्यात येणार आहे; मात्र आता जागेत बदल होणार नाही.''  - संजू परब, नगराध्यक्ष, सावंतवाडी  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2vs2Pnu

No comments:

Post a Comment