विश्वास पाटील, विश्वास वसेकर यांना कवी अनंत फंदी पुरस्कार  संगमनेर ः मराठी साहित्य विश्वातील प्रतिष्ठेचा, संगमनेर इतिहास संशोधन मंडळाच्यावतीने देण्यात येणारा कवी अनंत फंदी साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या नागकेशर या कादंबरीला व ज्येष्ठ कवी प्रा. विश्वास वसेकर ( पुणे ) यांच्या कलमी कविता या विडंबन काव्य संग्रहाला जाहीर झाला आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याच कार्यक्रमात डॉ. पराग सराफ यांचा कवी अनंत फंदी ज्ञान गौरव पुरस्कार देऊन तर सोमनाथ तात्याबा कळसकर गुरुजी यांचा कृतज्ञता गौरव सन्मान होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष डी. बी. राठी व कार्याध्यक्ष डॉ. संतोष खेडलेकर यांनी दिली.  लोकसहभागातून दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे हे 15 वे वर्ष आहे. लेखक, कवींनी पाठवलेल्या साहित्यकृतीपेक्षा मागील तीन वर्षांपासून त्या वर्षात विविध क्षेत्रातील जाणकारांनी वाचलेल्या व सुचविलेल्या पुस्तकांचाही विचार करून हे पुरस्कार दिले जातात. सहकाराच्या पट्ट्यातील राजकिय घराण्यातील कौटूंबिक कलहाचे चित्रण असलेल्या नागकेशर ही कादंबरी तसेच विडंबन काव्यप्रकार समर्थपणे हाताळलेल्या प्रा. विश्वास वसेकर यांच्या कलमी कविता या काव्यसंग्रहाची निवड झाली आहे. शिक्षण आणि शैक्षणिक लेखन क्षेत्रात अनेक विक्रम प्रस्थापित केलेले प्रा. डॉ. पराग सराफ यांनी देशात सर्वात कमी वयात विद्यावाचस्पती पदवी मिळवली आहे. चार्टर्ड अकौटंट असलेल्या डॉ. सराफ यांची आजवर 135 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा पीएचडीचा शोध प्रबंध सार्क परिषदेत मान्य होवून, त्याचा बांगलादेशातील पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. तर शिक्षकीपेशात कार्यरत असताना आणि सेवानिवृत्तीनंतरही शिक्षणापासून वंचित राहिलेल्या भटक्‍या समाजातील मुलांना, स्वखर्चाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करणारे सोमनाथ तात्याबा कळसकर गुरुजी यांचा कृतज्ञता गौरव सन्मान या सोहळ्यात केला जाणार आहे. ज्येष्ठ कवी प्रा. संतोष पवार व अँड. रंजना गवांदे यांच्या समितीने यावर्षीच्या पुरस्कारप्राप्त साहित्यकृतींची निवड केली आहे.  रविवार ( ता. 08 ) मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता, संगमनेर येथील व्यापारी मंडळ सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला मीना जगधने व नगराध्यक्ष दुर्गा तांबे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.      News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 3, 2020

विश्वास पाटील, विश्वास वसेकर यांना कवी अनंत फंदी पुरस्कार  संगमनेर ः मराठी साहित्य विश्वातील प्रतिष्ठेचा, संगमनेर इतिहास संशोधन मंडळाच्यावतीने देण्यात येणारा कवी अनंत फंदी साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या नागकेशर या कादंबरीला व ज्येष्ठ कवी प्रा. विश्वास वसेकर ( पुणे ) यांच्या कलमी कविता या विडंबन काव्य संग्रहाला जाहीर झाला आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याच कार्यक्रमात डॉ. पराग सराफ यांचा कवी अनंत फंदी ज्ञान गौरव पुरस्कार देऊन तर सोमनाथ तात्याबा कळसकर गुरुजी यांचा कृतज्ञता गौरव सन्मान होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष डी. बी. राठी व कार्याध्यक्ष डॉ. संतोष खेडलेकर यांनी दिली.  लोकसहभागातून दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे हे 15 वे वर्ष आहे. लेखक, कवींनी पाठवलेल्या साहित्यकृतीपेक्षा मागील तीन वर्षांपासून त्या वर्षात विविध क्षेत्रातील जाणकारांनी वाचलेल्या व सुचविलेल्या पुस्तकांचाही विचार करून हे पुरस्कार दिले जातात. सहकाराच्या पट्ट्यातील राजकिय घराण्यातील कौटूंबिक कलहाचे चित्रण असलेल्या नागकेशर ही कादंबरी तसेच विडंबन काव्यप्रकार समर्थपणे हाताळलेल्या प्रा. विश्वास वसेकर यांच्या कलमी कविता या काव्यसंग्रहाची निवड झाली आहे. शिक्षण आणि शैक्षणिक लेखन क्षेत्रात अनेक विक्रम प्रस्थापित केलेले प्रा. डॉ. पराग सराफ यांनी देशात सर्वात कमी वयात विद्यावाचस्पती पदवी मिळवली आहे. चार्टर्ड अकौटंट असलेल्या डॉ. सराफ यांची आजवर 135 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा पीएचडीचा शोध प्रबंध सार्क परिषदेत मान्य होवून, त्याचा बांगलादेशातील पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. तर शिक्षकीपेशात कार्यरत असताना आणि सेवानिवृत्तीनंतरही शिक्षणापासून वंचित राहिलेल्या भटक्‍या समाजातील मुलांना, स्वखर्चाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करणारे सोमनाथ तात्याबा कळसकर गुरुजी यांचा कृतज्ञता गौरव सन्मान या सोहळ्यात केला जाणार आहे. ज्येष्ठ कवी प्रा. संतोष पवार व अँड. रंजना गवांदे यांच्या समितीने यावर्षीच्या पुरस्कारप्राप्त साहित्यकृतींची निवड केली आहे.  रविवार ( ता. 08 ) मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता, संगमनेर येथील व्यापारी मंडळ सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला मीना जगधने व नगराध्यक्ष दुर्गा तांबे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.      News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2TnyX4O

No comments:

Post a Comment