Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 29, 2020

राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी हवालदिल
CAA : जन्माचा दाखला मी सुद्धा देऊ शकत नाही- छगन भुजबळ, #5मोठ्याबातम्या
'तुमच्या केसांना इथं सोन्याचा भाव आहे'
यवतमाळ पालिकेचे 36 कोटींचे शिल्लकी अंदाजपत्रक

यवतमाळ : नगरपालिकेचे 2019-20 चे सुधारित व 2020-21चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये अनुमानित शिल्लकेसह जमा 25 कोटी 91 लाख रुपये दर्शविण्यात आले. खर्चासाठी 213 कोटी 83 लाखांची तरतूद करण्यात आली. खर्च वजा जाता 37 कोटी आठ लाखांचे शिल्लकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. या शिल्लक रकमेत नगरपरिषदेचा निधी एक कोटी आठ लाख व शासकीय निधी शिल्लक 36 कोटी पाच लाख रुपये आहे. 

कामे होत नसल्याचा आरोप 

यवतमाळ नगरपालिकेची सभा शुक्रवारी (ता. 28) नगरभवनात पार पडली. नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी अंदाजपत्रक सभेपुढे ठेवले. यावेळी नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत आमची कामे होत नसल्याचा आरोप सभागृहात केला. दरवर्षी बजेट सादर केले जाते. त्यात आकडे फुगवले जातात. विकासकामांसाठी निधी दाखविला जातो. प्रत्यक्षात काम होत नसल्याची खंत नगरसेवक चंदू चौधरी यांनी व्यक्त केली. शहराच्या विकासासाठी काय नियोजन करण्यात आले, असा प्रश्‍न नगरसेवकांनी विचारला.

गरिबांची काम होत नाहीत.

मुख्याधिकारी एकही काम करीत नाही. गरिबांची काम होत नाहीत. मग त्यांनी जायचे कुठे, प्रकरणे निकाली न निघाल्यास शिवसेना स्टाईलने घेरण्याचा इशारा पिंटू बांगर यांनी दिला आहे. त्यावर सीओ शशीमोहन नंदा यांनी प्रश्‍न निकाली काढण्याचे आश्‍वासन दिले. पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी करवाढ करणे ही जनतेची लूट आहे. शहरात खुले मैदान, तलाव आहे. त्यातून उत्पन्नांचे स्त्रोत वाढविता येतील, असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी दर आकरण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली. नगरपालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या जागा बळकावण्यात आल्या आहेत. त्या जागेवर पोट भाडेकरू ठेवून लाखोंचा मलिदा लाटल्या जात आहे. या जागा परत घेण्याची मागणी करण्यात आली आहे. नगरसेवक प्रा. डॉ. प्रवीण प्रजापती, विजय खडसे, चंदू चौधरी, दिनेश चिंडाले, कीर्ती राऊत, वैशाली सवाई आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

हे वाचा— हैदराबाद पॅटर्न : या जिल्ह्यात घेण्यात आला व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे गुन्ह्याचा आढावा

सूचनांची अंमलबजावणी नाही

नगरसेवक सभेत सूचना मांडतात. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जात नाही. स्थायी समितीपुढे 'बजेट' मांडायला पाहिजे होते, तसेही झाले नाही. मालमत्ताधारकांना डिमांड पाठविली नाही. ही पालिकेची चूक आहे. उत्पन्न वाढीसाठी प्रशासन उदासीन आहे, असा आरोप माजी बांधकाम सभापती प्रा. डॉ. प्रवीण प्रजापती यांनी केला.

Video : शेतकरी मरेपर्यंत घेतील उद्धव ठाकरेंचे नाव, बच्चू कडूंनी दिला हा सल्ला

महसूली उत्पन्न

मालमत्ता कर -950 लाख
वृक्षकर -15 लाख
शो टॅक्‍स -18 लाख
दुकानभाडे -80 लाख
बाजार वसुली -110 लाख
विकास शुल्क -200 लाख
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

यवतमाळ पालिकेचे 36 कोटींचे शिल्लकी अंदाजपत्रक यवतमाळ : नगरपालिकेचे 2019-20 चे सुधारित व 2020-21चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये अनुमानित शिल्लकेसह जमा 25 कोटी 91 लाख रुपये दर्शविण्यात आले. खर्चासाठी 213 कोटी 83 लाखांची तरतूद करण्यात आली. खर्च वजा जाता 37 कोटी आठ लाखांचे शिल्लकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. या शिल्लक रकमेत नगरपरिषदेचा निधी एक कोटी आठ लाख व शासकीय निधी शिल्लक 36 कोटी पाच लाख रुपये आहे.  कामे होत नसल्याचा आरोप  यवतमाळ नगरपालिकेची सभा शुक्रवारी (ता. 28) नगरभवनात पार पडली. नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी अंदाजपत्रक सभेपुढे ठेवले. यावेळी नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत आमची कामे होत नसल्याचा आरोप सभागृहात केला. दरवर्षी बजेट सादर केले जाते. त्यात आकडे फुगवले जातात. विकासकामांसाठी निधी दाखविला जातो. प्रत्यक्षात काम होत नसल्याची खंत नगरसेवक चंदू चौधरी यांनी व्यक्त केली. शहराच्या विकासासाठी काय नियोजन करण्यात आले, असा प्रश्‍न नगरसेवकांनी विचारला. गरिबांची काम होत नाहीत. मुख्याधिकारी एकही काम करीत नाही. गरिबांची काम होत नाहीत. मग त्यांनी जायचे कुठे, प्रकरणे निकाली न निघाल्यास शिवसेना स्टाईलने घेरण्याचा इशारा पिंटू बांगर यांनी दिला आहे. त्यावर सीओ शशीमोहन नंदा यांनी प्रश्‍न निकाली काढण्याचे आश्‍वासन दिले. पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी करवाढ करणे ही जनतेची लूट आहे. शहरात खुले मैदान, तलाव आहे. त्यातून उत्पन्नांचे स्त्रोत वाढविता येतील, असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी दर आकरण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली. नगरपालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या जागा बळकावण्यात आल्या आहेत. त्या जागेवर पोट भाडेकरू ठेवून लाखोंचा मलिदा लाटल्या जात आहे. या जागा परत घेण्याची मागणी करण्यात आली आहे. नगरसेवक प्रा. डॉ. प्रवीण प्रजापती, विजय खडसे, चंदू चौधरी, दिनेश चिंडाले, कीर्ती राऊत, वैशाली सवाई आदींनी चर्चेत सहभाग घेतला. हे वाचा— हैदराबाद पॅटर्न : या जिल्ह्यात घेण्यात आला व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे गुन्ह्याचा आढावा सूचनांची अंमलबजावणी नाही नगरसेवक सभेत सूचना मांडतात. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जात नाही. स्थायी समितीपुढे 'बजेट' मांडायला पाहिजे होते, तसेही झाले नाही. मालमत्ताधारकांना डिमांड पाठविली नाही. ही पालिकेची चूक आहे. उत्पन्न वाढीसाठी प्रशासन उदासीन आहे, असा आरोप माजी बांधकाम सभापती प्रा. डॉ. प्रवीण प्रजापती यांनी केला. Video : शेतकरी मरेपर्यंत घेतील उद्धव ठाकरेंचे नाव, बच्चू कडूंनी दिला हा सल्ला महसूली उत्पन्न मालमत्ता कर -950 लाख वृक्षकर -15 लाख शो टॅक्‍स -18 लाख दुकानभाडे -80 लाख बाजार वसुली -110 लाख विकास शुल्क -200 लाख   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2vjEkZD
Read More
#SundayPositive : सौर ऊर्जेवरील ई-सायकल लई भारी, भावी अभियंत्यांचा प्रयोग (व्हिडिओ)

पुसद, (जि. यवतमाळ) : गरज ही शोधांची जननी म्हटल्या जाते. पेट्रोलसारख्या इंधनाची बचत करण्यासाठी पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवरील ई-सायकलची निर्मिती करून ऊर्जा बचतीत एक पाऊल पुढे टाकले आहे.

शहरात दुचाकी वाहनांची संख्या वाढल्याने इंधनावर मोठा खर्च होतो. शिवाय प्रदूषण वेगळेच. वाहतूक कोंडीत ही वाहने अडसर ठरणारच. यावर नाईक अभियांत्रिकीच्या यांत्रिकी विभागातील भावी अभियंत्यांनी संशोधन केले. ई-सायकलची निर्मिती हा प्रकल्प त्यांनी हाती घेतला. यासाठी सायकल, इलेक्‍ट्रिक मोटर, लीड, ऍसिड बॅटरी, चार्जर, सायक्‍लोमीटर या साधनांचा उपयोग करण्यात आला. पुढे बॅटरीच्या चार्जिंगसाठी त्यांनी सोलर पॅनलचा वापर केला. या सायकलची ट्रायल यशस्वीरीत्या घेतल्यानंतर त्यांना ही ई-सायकल शहरातील रस्त्यांवर चालविण्यास उपयुक्त असल्याचे लक्षात आले.

 

 

या सायकलला ऍक्‍सीलरेटर बसविण्यात आले असून बॅटरी पूर्ण चार्ज असल्यास ताशी 22 ते 25 किलोमीटर वेगात धावते. एका चार्जिंगमध्ये 25 किलोमीटरचा पर्यंतचा प्रवास पूर्ण करते. केवळ 12 हजार रुपये एवढ्या खर्चात ही ई-सायकल रस्त्यावर धावू शकत असल्याने बाजारातील इतर सायकलींपेक्षा सामान्यांच्या खिशाला सहज परवडते. सौर ऊर्जेवरील ही ई-सायकल वाढत्या इंधन दराच्या काळात मोठा दिलासा देणारी ठरली आहे. या सायकलमुळे प्रदूषणाला आळा बसतो. शिवाय चढावर आवश्‍यक असल्यास पायडलचा उपयोग करता येतो.

- या जहाल नक्षलवाद्याकडे सापडली एके-४७, पोलिसांच्या वाढत्या दबावापुढे केले...
 

पेट्रोल दुचाकीला हा योग्य पर्याय असल्याचे मत प्रकल्पात सहभागी झालेले यांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी चैतन्य काण्णव, संदीप जोशी, अंकुश भोपळे, अनुज चव्हाण, शुभम राठोड, अर्जुन कुबडे, इंतेसार खान यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा.डॉ. संजय भागवत यांचे मार्गदर्शन मिळाले.बाबासाहेब नाईक अभियांत्रिकीच्या वार्षिक स्नेहसंमेलन 'गेटी-2020' मध्ये उद्घाटक पुसद वनविभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे व प्राचार्य डॉ. अविनाश वानखडे यांनी या ई-सायकलवर कॅम्पसमध्ये फेरी मारून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. संस्थेचे अध्यक्ष जय नाईक, प्राचार्य, व विभाग प्रमुख प्रा. जयदीप इंगळे यांनी विद्यार्थी संशोधकांचे कौतुक केले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

#SundayPositive : सौर ऊर्जेवरील ई-सायकल लई भारी, भावी अभियंत्यांचा प्रयोग (व्हिडिओ) पुसद, (जि. यवतमाळ) : गरज ही शोधांची जननी म्हटल्या जाते. पेट्रोलसारख्या इंधनाची बचत करण्यासाठी पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवरील ई-सायकलची निर्मिती करून ऊर्जा बचतीत एक पाऊल पुढे टाकले आहे. शहरात दुचाकी वाहनांची संख्या वाढल्याने इंधनावर मोठा खर्च होतो. शिवाय प्रदूषण वेगळेच. वाहतूक कोंडीत ही वाहने अडसर ठरणारच. यावर नाईक अभियांत्रिकीच्या यांत्रिकी विभागातील भावी अभियंत्यांनी संशोधन केले. ई-सायकलची निर्मिती हा प्रकल्प त्यांनी हाती घेतला. यासाठी सायकल, इलेक्‍ट्रिक मोटर, लीड, ऍसिड बॅटरी, चार्जर, सायक्‍लोमीटर या साधनांचा उपयोग करण्यात आला. पुढे बॅटरीच्या चार्जिंगसाठी त्यांनी सोलर पॅनलचा वापर केला. या सायकलची ट्रायल यशस्वीरीत्या घेतल्यानंतर त्यांना ही ई-सायकल शहरातील रस्त्यांवर चालविण्यास उपयुक्त असल्याचे लक्षात आले.     या सायकलला ऍक्‍सीलरेटर बसविण्यात आले असून बॅटरी पूर्ण चार्ज असल्यास ताशी 22 ते 25 किलोमीटर वेगात धावते. एका चार्जिंगमध्ये 25 किलोमीटरचा पर्यंतचा प्रवास पूर्ण करते. केवळ 12 हजार रुपये एवढ्या खर्चात ही ई-सायकल रस्त्यावर धावू शकत असल्याने बाजारातील इतर सायकलींपेक्षा सामान्यांच्या खिशाला सहज परवडते. सौर ऊर्जेवरील ही ई-सायकल वाढत्या इंधन दराच्या काळात मोठा दिलासा देणारी ठरली आहे. या सायकलमुळे प्रदूषणाला आळा बसतो. शिवाय चढावर आवश्‍यक असल्यास पायडलचा उपयोग करता येतो. - या जहाल नक्षलवाद्याकडे सापडली एके-४७, पोलिसांच्या वाढत्या दबावापुढे केले...   पेट्रोल दुचाकीला हा योग्य पर्याय असल्याचे मत प्रकल्पात सहभागी झालेले यांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी चैतन्य काण्णव, संदीप जोशी, अंकुश भोपळे, अनुज चव्हाण, शुभम राठोड, अर्जुन कुबडे, इंतेसार खान यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा.डॉ. संजय भागवत यांचे मार्गदर्शन मिळाले.बाबासाहेब नाईक अभियांत्रिकीच्या वार्षिक स्नेहसंमेलन 'गेटी-2020' मध्ये उद्घाटक पुसद वनविभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे व प्राचार्य डॉ. अविनाश वानखडे यांनी या ई-सायकलवर कॅम्पसमध्ये फेरी मारून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. संस्थेचे अध्यक्ष जय नाईक, प्राचार्य, व विभाग प्रमुख प्रा. जयदीप इंगळे यांनी विद्यार्थी संशोधकांचे कौतुक केले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2vjEksB
Read More
औरंगाबाद : दोन बहिणींचा त्याने केला विनयभंग, आता झाले असे...

औरंगाबाद : आयटीआय येथे शिक्षण घेणाऱ्या दोघा बहिणींना आपण एकाच जातीचे असल्याची बतावणी करून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न तसेच त्यांचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या आयटीआयचा शिल्प निदेशकाला दोन वर्षे सक्तमजुरी व विविध कलमांखाली २२ हजार ५०० रुपयांचा दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश डॉ. एम. एस. देशपांडे यांनी ठोठाविली. विशेष म्हणजे ठोठाविण्यात आलेल्या दंडाची रक्कम दोघा पीडितांना विभागणी करून देण्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. भगवान गोविंद पवार (४०)असे त्या आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा-  Video : भाजपला संधी द्या, औरंगाबादचे चित्रच बदलू : चंद्रकांत पाटील

१७ वर्षीय पीडितेने आयटीआयच्या एका कोर्ससाठी प्रथम वर्षात प्रवेश घेतला होता. प्रवेशाच्या १५ दिवसांनी दुपारी पीडिता व तिची बहीण आयटीआय परिसरात गप्पा मारत बसल्या होत्या. त्यावेळी आरोपी पवार त्यांच्या जवळ आला व त्याने त्यांना जात विचारली, आपण एकाच जातीचे असल्याचे सांगत त्याने आपण नातेवाईक असल्याची बतावणी केली. त्यानंतर भामट्याने दोघींचे मोबाइल क्रमांक घेतले व काही अडचण असल्यास मला भेटा असे सांगितले. त्यानंतर भामट्याने दोघींना पत्नी घरी नसून आपण हॉटेलमध्ये जेवण करायला जाऊ, माझे न ऐकल्यास परीक्षेत नुकसान करील अशी धमकी दिली. या घटनेनंतर आरोपी हा पीडिता व तिच्या बहिणीचा वारंवार पाठलाग व त्यांना फोन करून त्रास देत होता. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा- भाजपमधील आरोपींपासूनच महिलांना सर्वाधिक धोका

आठ साक्षीदारांचे नोंदविले जबाब
गुन्ह्यात तपास अधिकारी उपनिरीक्षक ए. व्ही. खंडागळे व डी. बी. कोपनार यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी, सहाय्यक लोकाभियोक्ता अनिल हिवराळे यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात पीडितेसह तिच्या बहिणीची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने भगवान पवार याला एक वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, इतर कलमान्वये सहा महिने सक्तमजुरी व अडीच हजार रुपये दंड, पोक्सोच्या कलमानुसार दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठाविली. खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून यू. एच. तायडे यांनी काम पाहिले.

हे वाचलंत का? - औरंगाबाद मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी हर्षवर्धन जाधव, दाशरथे

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

औरंगाबाद : दोन बहिणींचा त्याने केला विनयभंग, आता झाले असे... औरंगाबाद : आयटीआय येथे शिक्षण घेणाऱ्या दोघा बहिणींना आपण एकाच जातीचे असल्याची बतावणी करून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न तसेच त्यांचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या आयटीआयचा शिल्प निदेशकाला दोन वर्षे सक्तमजुरी व विविध कलमांखाली २२ हजार ५०० रुपयांचा दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश डॉ. एम. एस. देशपांडे यांनी ठोठाविली. विशेष म्हणजे ठोठाविण्यात आलेल्या दंडाची रक्कम दोघा पीडितांना विभागणी करून देण्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. भगवान गोविंद पवार (४०)असे त्या आरोपीचे नाव आहे. हेही वाचा-  Video : भाजपला संधी द्या, औरंगाबादचे चित्रच बदलू : चंद्रकांत पाटील १७ वर्षीय पीडितेने आयटीआयच्या एका कोर्ससाठी प्रथम वर्षात प्रवेश घेतला होता. प्रवेशाच्या १५ दिवसांनी दुपारी पीडिता व तिची बहीण आयटीआय परिसरात गप्पा मारत बसल्या होत्या. त्यावेळी आरोपी पवार त्यांच्या जवळ आला व त्याने त्यांना जात विचारली, आपण एकाच जातीचे असल्याचे सांगत त्याने आपण नातेवाईक असल्याची बतावणी केली. त्यानंतर भामट्याने दोघींचे मोबाइल क्रमांक घेतले व काही अडचण असल्यास मला भेटा असे सांगितले. त्यानंतर भामट्याने दोघींना पत्नी घरी नसून आपण हॉटेलमध्ये जेवण करायला जाऊ, माझे न ऐकल्यास परीक्षेत नुकसान करील अशी धमकी दिली. या घटनेनंतर आरोपी हा पीडिता व तिच्या बहिणीचा वारंवार पाठलाग व त्यांना फोन करून त्रास देत होता. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हेही वाचा- भाजपमधील आरोपींपासूनच महिलांना सर्वाधिक धोका आठ साक्षीदारांचे नोंदविले जबाब गुन्ह्यात तपास अधिकारी उपनिरीक्षक ए. व्ही. खंडागळे व डी. बी. कोपनार यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी, सहाय्यक लोकाभियोक्ता अनिल हिवराळे यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात पीडितेसह तिच्या बहिणीची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने भगवान पवार याला एक वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, इतर कलमान्वये सहा महिने सक्तमजुरी व अडीच हजार रुपये दंड, पोक्सोच्या कलमानुसार दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठाविली. खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून यू. एच. तायडे यांनी काम पाहिले. हे वाचलंत का? - औरंगाबाद मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी हर्षवर्धन जाधव, दाशरथे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32BLrsi
Read More
हॉलीवुड फिल्मों में काम करने पर आया दीपिका का रिएक्शन, कही ये बात https://ift.tt/2TaW3vj
दिल्ली हिंसाचार: 'आमची चूक एकच होती, आम्ही जन्मानं मुस्लीम आहोत'
#MokaleVha : सासऱ्यांच्या आजारपणामुळे तणाव

सासऱ्यांच्या आजारपणामुळे तणाव
मी ३५ वर्षांची विवाहिता असून नवरा, ९ वर्षांचा मुलगा व सासू-सासरे यांच्यासमवेत राहते. सासरे ८० वर्षांचे असून, मागील तीन वर्षे सातत्याने त्यांचे आजारपण चालू आहे. माझ्या नवऱ्यावर सासूचा खूप दबाव आहे. सासूला घरात इतर कोणतेही काम करण्याची सवय नाही. फक्त सासऱ्यांना चहा-जेवण, औषधपाणी देणे एवढेच दिवसभर पाहतात. तेही नवरा कामावरून आल्यानंतर त्याच्याकडूनच करून घेतात. माझ्यासाठी व मुलासाठी त्यांच्याकडे वेळच नाही. आईसमोर असताना माझ्याशी छोट्याछोट्या गोष्टींवरून भांडतात. मुलावर आरडाओरडा करतात. त्यामुळे मला त्या घरात राहण्याची अजिबात इच्छा नाही. सासऱ्यांना जेवायला दिले, तरी १-२ तासांत ते विसरतात व तुम्ही मला जेवायला दिले नाही म्हणून चिडतात. त्यांच्यावर दिवसभर लक्ष ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे सासूदेखील माझ्यावर राग काढतात. ज्या घरात आपल्याला काहीही किंमत नाही अशा घरात का राहावे, असा प्रश्‍न मला पडतो. कधीकधी तर आत्महत्या करावी, असेही विचार मनात येतात.

वृद्धावस्थेत २४ तास लक्ष ठेवून व्यक्तीची सेवा करावी लागत असेल, तर कुटुंबातील इतर सर्वांवर त्याचा अतिरिक्त ताण येतो. सासऱ्यांचे आजारपण, त्यांच्या स्मरणशक्तीची समस्या हे ‘डोमेनशिया’ या आजाराचे लक्षण असण्याची शक्‍यता आहे.

सासूला घरातील इतर कामे नसली, तर आजारी व्यक्तीसोबत सातत्याने वावरणाऱ्या व्यक्तींच्या मानसिकतेवरही परिणाम होतोच. त्यामुळे नवरा व सासूमध्ये चिडचिडेपणा वाढला असावा. या सर्वांना सांभाळून घेण्याची कसरत यातून अत्यंत टोकाचा आत्महत्येचा विचार तुम्ही केलात. मानसिक तणावातून येणारे हे विचार आहेत.

जवळच्या विश्‍वासातील नातेवाईक, मैत्रिणीशी याबाबत चर्चा करूनही सहकार्य मिळू शकते. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मानसिक ताकद वाढविण्यासाठी व आजारी व्यक्तीची देखभाल करताना स्वतःचे स्वास्थ्यही महत्त्वाचे आहे, याची जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे. पुण्यात ‘तपस’ ही संस्था ‘डोमेनशिया’ या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचे काम करते. कुटुंबातील व्यक्तींचा ताण कमी करण्यासाठी दिवसभर रुग्णांना सांभाळणे अथवा १/२ महिने संस्थेतच राहून उपचारात्मक कामही करते. २४ तास लक्ष ठेवण्याची गरज असलेल्या कुटुंबातील रुग्णांची तेथील कार्यकर्ते देखभाल करतात, त्यातून कुटुंबावरील अतिरिक्त ताण कमी होतो. योग्य मार्गदर्शनाने इतरांचे स्वास्थ्य टिकून राहते व रुग्णालाही योग्य उपचार मिळतात. तपस ही संस्था ‘कृष्णानगर’, सोमेश्‍वरवाडी, पुणे-८ येथे कार्यरत आहे. 

बायकोचा दुसऱ्या अपत्यासाठी हट्ट
माझे वय ४२ असून, मी व माझी पत्नी दोघेही सरकारी नोकरीत आहोत. मला १० वर्षांचा मुलगा आहे. तो शाळेत हुशार मुलगा म्हणून नावाजला जावा, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी विशेष प्रयत्न करतो. कामावरून आल्यानंतर त्याच्यासोबत चर्चा करणे, मैदानावर खेळायला नेणे, त्याच्या प्रगतीबाबत चौकशी करणे. त्याने कोणाशी मैत्री करावी, याबाबतही मी दक्षता घेतो. परंतु, माझ्या पत्नीच्या मते एकच मुलगा असल्यामुळे मी खूप जास्त काळजी करतो. यातून मुलगा वैतागून जाईल, असे तिचे मत आहे. याला पर्याय म्हणून ती अजून एक मूल होऊ द्यावे, यासाठी माझ्याकडे वाद घालते. मला हे मान्य नाही. आजकालच्या स्पर्धेच्या युगात अजून एका मुलाला घडविण्यासाठी पैसा व वेळ खर्च करणे परवडण्यासारखे नाही. यावरून आमच्यात टोकाचे मतभेद आहेत. नोकरी करणारी स्त्री असून, तिला दुसऱ्या मुलाची अपेक्षा का आहे? यावरून तिला मानोसोपचारतज्ज्ञाकडे न्यावे का, असा प्रश्‍न पडतो.

कोणत्याही समस्येबाबत सल्लामसलत करण्यासाठी प्रत्येक वेळेस मानसशास्त्राचे ज्ञान असावेच, अशी अट नाही. अनुभवी, व्यवहारी शहाणपण असलेली व्यक्ती अनुभव व हुशारी या जोरावर सल्ला देऊ शकते. परंतु, मानसोपचार हे सल्लामसलतीपेक्षा अधिक सखोल असतात. मूल होऊ द्यावे की नाही? आजच्या काळात २ मुलांची जबाबदारी घेण्यास पालक म्हणून तुम्ही दोघेही सक्षम आहात का? ही व्यावहारिक समस्या सोडविणे, यासाठी मानसोपचारतज्ज्ञाची गरज नाही. परंतु, तुमच्या प्रश्‍नाभोवती निर्माण झालेले भावनिक ताणतणाव दूर करणे समस्येकडे तटस्थपणे पाहून शांतचित्ताने अधिक चांगल्या पर्यायांचा विचार करणे, हे मानोपचारतज्ज्ञ तुम्हा दोघांना समजावून सांगू शकतो. मुलांना शिस्त लावणे, त्यांना अभ्यासासाठी प्रेरित करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. परंतु, हे करीत असताना काळजीचे रूपांतर अवास्तव भीती, चिंता यातून मुलांवर ताण येईल इतकी बंधने लादली जात नाहीत ना? हे तपासून पाहणे आवश्‍यक असते. तुम्हा पती-पत्नींमधील टोकाचे मतभेद मुलाच्या विकासामध्ये त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करून कौटुंबिक अडचणी सोडविण्यास काहीच हरकत नाही. 

‘आई, तू पुन्हा लग्न करून चूक केली’
मी पुनर्विवाह केलेली महिला असून, पहिल्या लग्नापासून एक मुलगी आहे. घटस्फोट घेताना मुलगी लहान असल्याकारणाने माझ्याकडे जबाबदारी घेतली. पहिला नवरा व्यसनी तसेच कोणताही कामधंदा करीत नसे. दुसरे लग्न केले तेव्हा नवऱ्याने मुलीचीही जबाबदारी घेतो, असे कबूल केले होते. आता मुलगी १५ वर्षांची असून, या लग्नातून मुलगा झाला तो ७ वर्षांचा आहे. मुलगा झाल्यानंतर नवऱ्याचे वागणे बदलले. तो मुलीचा सतत रागराग करतो. तिच्या शिक्षणाचा खर्च मी करणार नाही, यावरून आमच्यात भांड णे झालेली मुलीने प्रत्यक्ष पाहिली आहेत. त्यामुळे तीही या नवऱ्याला वडील मानत नाही. त्या दोघांच्या वादात मी कोणाचीच बाजू घेऊ शकत नाही. परंतु, यावरूनही माझी मुलगी माझ्यावर चिडते. सध्या तिचे वागणे खूप बिघडलेले आहे. अभ्यास करीत नाही. मैत्रिणींच्या घरी न सांगता राहते. मी दुसरे लग्न करून चूक केली आहे, असे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे तुझेही काही ऐकणार नाही, असे म्हणते. मुलीच्या भविष्याबाबत खूप काळजी वाटते. आर्थिकदृष्ट्या मी नवऱ्यावर अवलंबून असल्याकारणाने त्याला बोलू शकत नाही. मी काय करावे? 

१५/१६ वर्षांतील मुला-मुलींमध्ये ‘बंडखोरपणे वागणे’ हे वयाचे वैशिष्ट्यच आहे. वाढत्या वयातील शारीरिक व मानसिक बदलाचे हे परिणाम आहेत. तुमची मुलगी याच वयोगटातील असल्याकारणाने तिला वडील आपला रागराग करतात, हे स्पष्टपणे कळले आहे. तिला आपण मोठे झालो आहोत, आपले निर्णय आपणच घ्यावे, असेही वाटत असेल. परंतु, अनुभवाच्या अभावातून विचारात तीव्रता असली, तरी ते परिपक्व व समंजस विचार नसतात. तुमच्याबाबतीत ती जे बोलते हे तुम्ही मनावर न घेता तिच्याशी वारंवार संवाद साधून तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होणार नाही, याचा प्रयत्न सातत्याने करा. तिच्या बोलण्याकडे काही वेळा दुर्लक्ष करून वाद टाळा. परंतु, तिच्या मैत्रिणी कोण आहेत? कोठे राहतात? याविषयी माहिती घ्या. त्या मैत्रिणींशीही संवाद ठेवा, यातून मुलीची सुरक्षिततेची काळजी घेऊ शकाल. मुलीची आर्थिक जबाबदारी तिचा शैक्षणिक खर्च याकरिता तुम्हाला स्वतः आर्थिकदृष्ट्या उत्पन्नाचे साधन शोधता येऊ शकते का? छोटीशी नोकरी करणे किंवा उत्पन्न मिळू शकेल असा व्यवसाय करणे जे तुम्हाला जमू शकेल, याबाबत प्रयत्न करा. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या प्रयत्नात या समस्येची तीव्रता कमी होण्याची शक्‍यता अधिक आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

#MokaleVha : सासऱ्यांच्या आजारपणामुळे तणाव सासऱ्यांच्या आजारपणामुळे तणाव मी ३५ वर्षांची विवाहिता असून नवरा, ९ वर्षांचा मुलगा व सासू-सासरे यांच्यासमवेत राहते. सासरे ८० वर्षांचे असून, मागील तीन वर्षे सातत्याने त्यांचे आजारपण चालू आहे. माझ्या नवऱ्यावर सासूचा खूप दबाव आहे. सासूला घरात इतर कोणतेही काम करण्याची सवय नाही. फक्त सासऱ्यांना चहा-जेवण, औषधपाणी देणे एवढेच दिवसभर पाहतात. तेही नवरा कामावरून आल्यानंतर त्याच्याकडूनच करून घेतात. माझ्यासाठी व मुलासाठी त्यांच्याकडे वेळच नाही. आईसमोर असताना माझ्याशी छोट्याछोट्या गोष्टींवरून भांडतात. मुलावर आरडाओरडा करतात. त्यामुळे मला त्या घरात राहण्याची अजिबात इच्छा नाही. सासऱ्यांना जेवायला दिले, तरी १-२ तासांत ते विसरतात व तुम्ही मला जेवायला दिले नाही म्हणून चिडतात. त्यांच्यावर दिवसभर लक्ष ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे सासूदेखील माझ्यावर राग काढतात. ज्या घरात आपल्याला काहीही किंमत नाही अशा घरात का राहावे, असा प्रश्‍न मला पडतो. कधीकधी तर आत्महत्या करावी, असेही विचार मनात येतात. वृद्धावस्थेत २४ तास लक्ष ठेवून व्यक्तीची सेवा करावी लागत असेल, तर कुटुंबातील इतर सर्वांवर त्याचा अतिरिक्त ताण येतो. सासऱ्यांचे आजारपण, त्यांच्या स्मरणशक्तीची समस्या हे ‘डोमेनशिया’ या आजाराचे लक्षण असण्याची शक्‍यता आहे. सासूला घरातील इतर कामे नसली, तर आजारी व्यक्तीसोबत सातत्याने वावरणाऱ्या व्यक्तींच्या मानसिकतेवरही परिणाम होतोच. त्यामुळे नवरा व सासूमध्ये चिडचिडेपणा वाढला असावा. या सर्वांना सांभाळून घेण्याची कसरत यातून अत्यंत टोकाचा आत्महत्येचा विचार तुम्ही केलात. मानसिक तणावातून येणारे हे विचार आहेत. जवळच्या विश्‍वासातील नातेवाईक, मैत्रिणीशी याबाबत चर्चा करूनही सहकार्य मिळू शकते. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मानसिक ताकद वाढविण्यासाठी व आजारी व्यक्तीची देखभाल करताना स्वतःचे स्वास्थ्यही महत्त्वाचे आहे, याची जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे. पुण्यात ‘तपस’ ही संस्था ‘डोमेनशिया’ या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचे काम करते. कुटुंबातील व्यक्तींचा ताण कमी करण्यासाठी दिवसभर रुग्णांना सांभाळणे अथवा १/२ महिने संस्थेतच राहून उपचारात्मक कामही करते. २४ तास लक्ष ठेवण्याची गरज असलेल्या कुटुंबातील रुग्णांची तेथील कार्यकर्ते देखभाल करतात, त्यातून कुटुंबावरील अतिरिक्त ताण कमी होतो. योग्य मार्गदर्शनाने इतरांचे स्वास्थ्य टिकून राहते व रुग्णालाही योग्य उपचार मिळतात. तपस ही संस्था ‘कृष्णानगर’, सोमेश्‍वरवाडी, पुणे-८ येथे कार्यरत आहे.  बायकोचा दुसऱ्या अपत्यासाठी हट्ट माझे वय ४२ असून, मी व माझी पत्नी दोघेही सरकारी नोकरीत आहोत. मला १० वर्षांचा मुलगा आहे. तो शाळेत हुशार मुलगा म्हणून नावाजला जावा, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी विशेष प्रयत्न करतो. कामावरून आल्यानंतर त्याच्यासोबत चर्चा करणे, मैदानावर खेळायला नेणे, त्याच्या प्रगतीबाबत चौकशी करणे. त्याने कोणाशी मैत्री करावी, याबाबतही मी दक्षता घेतो. परंतु, माझ्या पत्नीच्या मते एकच मुलगा असल्यामुळे मी खूप जास्त काळजी करतो. यातून मुलगा वैतागून जाईल, असे तिचे मत आहे. याला पर्याय म्हणून ती अजून एक मूल होऊ द्यावे, यासाठी माझ्याकडे वाद घालते. मला हे मान्य नाही. आजकालच्या स्पर्धेच्या युगात अजून एका मुलाला घडविण्यासाठी पैसा व वेळ खर्च करणे परवडण्यासारखे नाही. यावरून आमच्यात टोकाचे मतभेद आहेत. नोकरी करणारी स्त्री असून, तिला दुसऱ्या मुलाची अपेक्षा का आहे? यावरून तिला मानोसोपचारतज्ज्ञाकडे न्यावे का, असा प्रश्‍न पडतो. कोणत्याही समस्येबाबत सल्लामसलत करण्यासाठी प्रत्येक वेळेस मानसशास्त्राचे ज्ञान असावेच, अशी अट नाही. अनुभवी, व्यवहारी शहाणपण असलेली व्यक्ती अनुभव व हुशारी या जोरावर सल्ला देऊ शकते. परंतु, मानसोपचार हे सल्लामसलतीपेक्षा अधिक सखोल असतात. मूल होऊ द्यावे की नाही? आजच्या काळात २ मुलांची जबाबदारी घेण्यास पालक म्हणून तुम्ही दोघेही सक्षम आहात का? ही व्यावहारिक समस्या सोडविणे, यासाठी मानसोपचारतज्ज्ञाची गरज नाही. परंतु, तुमच्या प्रश्‍नाभोवती निर्माण झालेले भावनिक ताणतणाव दूर करणे समस्येकडे तटस्थपणे पाहून शांतचित्ताने अधिक चांगल्या पर्यायांचा विचार करणे, हे मानोपचारतज्ज्ञ तुम्हा दोघांना समजावून सांगू शकतो. मुलांना शिस्त लावणे, त्यांना अभ्यासासाठी प्रेरित करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. परंतु, हे करीत असताना काळजीचे रूपांतर अवास्तव भीती, चिंता यातून मुलांवर ताण येईल इतकी बंधने लादली जात नाहीत ना? हे तपासून पाहणे आवश्‍यक असते. तुम्हा पती-पत्नींमधील टोकाचे मतभेद मुलाच्या विकासामध्ये त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करून कौटुंबिक अडचणी सोडविण्यास काहीच हरकत नाही.  ‘आई, तू पुन्हा लग्न करून चूक केली’ मी पुनर्विवाह केलेली महिला असून, पहिल्या लग्नापासून एक मुलगी आहे. घटस्फोट घेताना मुलगी लहान असल्याकारणाने माझ्याकडे जबाबदारी घेतली. पहिला नवरा व्यसनी तसेच कोणताही कामधंदा करीत नसे. दुसरे लग्न केले तेव्हा नवऱ्याने मुलीचीही जबाबदारी घेतो, असे कबूल केले होते. आता मुलगी १५ वर्षांची असून, या लग्नातून मुलगा झाला तो ७ वर्षांचा आहे. मुलगा झाल्यानंतर नवऱ्याचे वागणे बदलले. तो मुलीचा सतत रागराग करतो. तिच्या शिक्षणाचा खर्च मी करणार नाही, यावरून आमच्यात भांड णे झालेली मुलीने प्रत्यक्ष पाहिली आहेत. त्यामुळे तीही या नवऱ्याला वडील मानत नाही. त्या दोघांच्या वादात मी कोणाचीच बाजू घेऊ शकत नाही. परंतु, यावरूनही माझी मुलगी माझ्यावर चिडते. सध्या तिचे वागणे खूप बिघडलेले आहे. अभ्यास करीत नाही. मैत्रिणींच्या घरी न सांगता राहते. मी दुसरे लग्न करून चूक केली आहे, असे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे तुझेही काही ऐकणार नाही, असे म्हणते. मुलीच्या भविष्याबाबत खूप काळजी वाटते. आर्थिकदृष्ट्या मी नवऱ्यावर अवलंबून असल्याकारणाने त्याला बोलू शकत नाही. मी काय करावे?  १५/१६ वर्षांतील मुला-मुलींमध्ये ‘बंडखोरपणे वागणे’ हे वयाचे वैशिष्ट्यच आहे. वाढत्या वयातील शारीरिक व मानसिक बदलाचे हे परिणाम आहेत. तुमची मुलगी याच वयोगटातील असल्याकारणाने तिला वडील आपला रागराग करतात, हे स्पष्टपणे कळले आहे. तिला आपण मोठे झालो आहोत, आपले निर्णय आपणच घ्यावे, असेही वाटत असेल. परंतु, अनुभवाच्या अभावातून विचारात तीव्रता असली, तरी ते परिपक्व व समंजस विचार नसतात. तुमच्याबाबतीत ती जे बोलते हे तुम्ही मनावर न घेता तिच्याशी वारंवार संवाद साधून तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होणार नाही, याचा प्रयत्न सातत्याने करा. तिच्या बोलण्याकडे काही वेळा दुर्लक्ष करून वाद टाळा. परंतु, तिच्या मैत्रिणी कोण आहेत? कोठे राहतात? याविषयी माहिती घ्या. त्या मैत्रिणींशीही संवाद ठेवा, यातून मुलीची सुरक्षिततेची काळजी घेऊ शकाल. मुलीची आर्थिक जबाबदारी तिचा शैक्षणिक खर्च याकरिता तुम्हाला स्वतः आर्थिकदृष्ट्या उत्पन्नाचे साधन शोधता येऊ शकते का? छोटीशी नोकरी करणे किंवा उत्पन्न मिळू शकेल असा व्यवसाय करणे जे तुम्हाला जमू शकेल, याबाबत प्रयत्न करा. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या प्रयत्नात या समस्येची तीव्रता कमी होण्याची शक्‍यता अधिक आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38cDQBR
Read More
'बिग बॉस 13' नंतर पारस-माहिरा बनले नवरा नवरी..सोशल मिडीयावर झळकले फोटो

बिग बॉस 13 चे स्पर्धक पारस छाब्रा आणि माहिरा शर्मा पुन्हा एकत्र  आलेत..हे दोघंही एकत्र एक व्हिडीओ शूट करतायेत..यात माहिरा आणि पारस यांनी क्रिश्चन नवरा- नवरीचा वेश परिधान केलाय.

या म्युझिक व्हिडीओच्या शूटींग दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत..या फोटोंमध्ये माहिरा सफेद रंगाच्या गाऊनमध्ये तर पारस काळ्या रंगाच्या कोटमध्ये दिसून येतोय..या दोघांनी शूटींग दरम्यानचा एक व्हिडीओही पोस्ट केलाय ज्यात दोघंही एकत्र येऊन खूप खूष आहेत..

माहिरा शर्माने हा व्हिडीओ तिच्या इन्टाग्राम अकाऊंटववर पोस्ट करत म्हटलंय, 'आता काहीतरी मोठं घडणारे..तुम्ही सगळे यासाठी उत्सुक आहात ना? तर दुसरीकडे पारसनेही शूटींगचे काही खास फोटो शेअर करत 'वन वुमेन आर्मी' आणि 'काहीतरी नवीन पाहिरा' असं म्हटलंय...

कॉम्प्युटर शिकवायच्या नावाने यायचा आणि मुलींशी करायचा असं काही...

बिग बॉस 13' या शो मधील पारस-माहिराची मैत्री चर्चेचा विषय बनली होती..मात्र ही मैत्री नंतर प्रेमात बदलताना दिसून आली..या दोघांनी अनेकदा एकमेकांवरचं प्रेम व्यक्त केलं असलं तरी कुठलीच गोष्ट जाहीरपणे ठाम सांगितली नाही..माहिराने नुकतीच पारस आणि त्याची गर्लफ्रेंड आकांक्षा यांच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया दिली. ही खूपंच चूकीची गोष्ट आहे की पारस आणि आकांक्षाच्या ब्रेकअपसाठी मला जबाबदार धरलं जातंय..मी एक गोष्ट स्पष्ट सांगते की, जर या दोघांच्या ब्रेकअपसाठी मी जबाबदार असते तर आज मी पारसची गर्लफ्रेंड असते..मात्र आम्ही आजही एकमेकांचे चांगले मित्र आहोत.. जेव्हा मैत्री आणि रिलेशन बाबत बोलायची वेळ येते तेव्हा याबाबत मी नेहमीच स्पष्ट बोलणारी व्यक्ती असल्याचं माहिरा सांगते...

after bigg boss 13 finale mahira sharma and paras chhabra music video pictures viral

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

'बिग बॉस 13' नंतर पारस-माहिरा बनले नवरा नवरी..सोशल मिडीयावर झळकले फोटो बिग बॉस 13 चे स्पर्धक पारस छाब्रा आणि माहिरा शर्मा पुन्हा एकत्र  आलेत..हे दोघंही एकत्र एक व्हिडीओ शूट करतायेत..यात माहिरा आणि पारस यांनी क्रिश्चन नवरा- नवरीचा वेश परिधान केलाय. या म्युझिक व्हिडीओच्या शूटींग दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत..या फोटोंमध्ये माहिरा सफेद रंगाच्या गाऊनमध्ये तर पारस काळ्या रंगाच्या कोटमध्ये दिसून येतोय..या दोघांनी शूटींग दरम्यानचा एक व्हिडीओही पोस्ट केलाय ज्यात दोघंही एकत्र येऊन खूप खूष आहेत.. माहिरा शर्माने हा व्हिडीओ तिच्या इन्टाग्राम अकाऊंटववर पोस्ट करत म्हटलंय, 'आता काहीतरी मोठं घडणारे..तुम्ही सगळे यासाठी उत्सुक आहात ना? तर दुसरीकडे पारसनेही शूटींगचे काही खास फोटो शेअर करत 'वन वुमेन आर्मी' आणि 'काहीतरी नवीन पाहिरा' असं म्हटलंय... कॉम्प्युटर शिकवायच्या नावाने यायचा आणि मुलींशी करायचा असं काही... बिग बॉस 13' या शो मधील पारस-माहिराची मैत्री चर्चेचा विषय बनली होती..मात्र ही मैत्री नंतर प्रेमात बदलताना दिसून आली..या दोघांनी अनेकदा एकमेकांवरचं प्रेम व्यक्त केलं असलं तरी कुठलीच गोष्ट जाहीरपणे ठाम सांगितली नाही..माहिराने नुकतीच पारस आणि त्याची गर्लफ्रेंड आकांक्षा यांच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया दिली. ही खूपंच चूकीची गोष्ट आहे की पारस आणि आकांक्षाच्या ब्रेकअपसाठी मला जबाबदार धरलं जातंय..मी एक गोष्ट स्पष्ट सांगते की, जर या दोघांच्या ब्रेकअपसाठी मी जबाबदार असते तर आज मी पारसची गर्लफ्रेंड असते..मात्र आम्ही आजही एकमेकांचे चांगले मित्र आहोत.. जेव्हा मैत्री आणि रिलेशन बाबत बोलायची वेळ येते तेव्हा याबाबत मी नेहमीच स्पष्ट बोलणारी व्यक्ती असल्याचं माहिरा सांगते... after bigg boss 13 finale mahira sharma and paras chhabra music video pictures viral   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2I6a4nB
Read More
मराठा आरक्षणावरील सुनावणीच्या पूर्वतयारीची घेतली माहिती

मुंबई - मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने आज सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मुंबईला झालेल्या या बैठकीत समितीचे सदस्य नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी जोंधळे, राज्याचे महाधिवक्ता ॲड. आशुतोष कुंभकोणी, इतर वकील, अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी प्रामुख्याने येत्या १७ मार्चला होणाऱ्या सुनावणीमध्ये राज्य शासनाची बाजू भक्कमपणे मांडण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

Coronavirus:भारतातही कोरोनाचा धोका; मलेशियाहून परतलेल्या रुग्णाचा मृत्यू

या बैठकीनंतर चव्हाण म्हणाले, की मराठा आरक्षण कायदा टिकला पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागला पाहिजे, यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ नेमले आहेत. या विधिज्ञांबरोबर चर्चा करून या प्रकरणाच्या सुनावणीबाबत विविध पैलूंनी चर्चा करण्यात आली.

आझाद मैदानावरील मराठा उमेदवारांच्या आंदोलनाबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात चव्हाण म्हणाले, की मराठा आरक्षण लागू झाले पाहिजे, हाच राज्य शासनाचा प्रयत्न आहे. या आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मराठा आरक्षणावरील सुनावणीच्या पूर्वतयारीची घेतली माहिती मुंबई - मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने आज सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  मुंबईला झालेल्या या बैठकीत समितीचे सदस्य नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी जोंधळे, राज्याचे महाधिवक्ता ॲड. आशुतोष कुंभकोणी, इतर वकील, अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी प्रामुख्याने येत्या १७ मार्चला होणाऱ्या सुनावणीमध्ये राज्य शासनाची बाजू भक्कमपणे मांडण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. Coronavirus:भारतातही कोरोनाचा धोका; मलेशियाहून परतलेल्या रुग्णाचा मृत्यू या बैठकीनंतर चव्हाण म्हणाले, की मराठा आरक्षण कायदा टिकला पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागला पाहिजे, यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ नेमले आहेत. या विधिज्ञांबरोबर चर्चा करून या प्रकरणाच्या सुनावणीबाबत विविध पैलूंनी चर्चा करण्यात आली. आझाद मैदानावरील मराठा उमेदवारांच्या आंदोलनाबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात चव्हाण म्हणाले, की मराठा आरक्षण लागू झाले पाहिजे, हाच राज्य शासनाचा प्रयत्न आहे. या आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VFqTO2
Read More
धक्कादायक : नववीतील मुलाने केला बापाचा खून, पुरले घरातच

कन्नड (जि. औरंगाबाद) - जामडी घाट (ता. कन्नड) येथे नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने वडिलांचा खून करून त्यांचा मृतदेह घरातच पुरून ठेवल्याची घटना शनिवारी (ता. २९) उघडकीस आली. सव्वादोन महिन्यांपूर्वी म्हणजे ता. २२ डिसेंबरला घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

जामडी घाट येथील नामदेव चव्हाण (वय ४७) ही व्यक्ती साधारण सव्वादोन महिन्यांपासून बेपत्ता होती. दरम्यान, ता. २८ जानेवारीला नामदेव पोमा चव्हाण हे बेपत्ता असल्याची तक्रार पत्नी लताबाई नामदेव चव्हाण हिने कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती. सव्वादोन महिन्यांपासून भाऊ बेपत्ता असल्याने किसन चव्हाण हेही बेचैन होते. म्हणून किसन चव्हाण यांनी मृताची पत्नी लताबाईसह नववीत शिकणाऱ्या मुलास विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी मुलाने सांगितले, की ता. २२ डिसेंबरला रात्रीच्या वेळी वडील नामदेव चव्हाण दारू पिऊन घरी आले होते. त्यावेळी आमच्यात भांडण होऊन वडिलांनी माझ्यावर कुऱ्हाडीने घाव घालण्याचा प्रयत्न केला.

हे वाचलंत का? - औरंगाबाद मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी हर्षवर्धन जाधव, दाशरथे

मात्र, मी वार चुकविला व स्वसंरक्षणासाठी काठी घेऊन ती वडिलांच्या मानेवर मारली. यामुळे वडील खाली कोसळले व ते बेशुद्ध पडले. मी घाबरून त्यांना दोरी घेऊन फाशी दिली व घरातच खड्डा खोदून त्यात त्यांचा मृतदेह पुरून विल्हेवाट लावली. त्या जागेवर सारवून घेतले. त्यावेळी आई घरी नव्हती, असे मुलाने सांगितले. मृत नामदेव चव्हाण यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, चार भाऊ असा परिवार आहे. 

 
चुलत्याने मायलेकास आणले पोलिस ठाण्यात 

मुलगा वडनेर (ता. कन्नड) येथील किसनराव थोरात विद्यालयात नववीत शिकत आहे. शनिवारी (ता.२९) किसन चव्हाण यांनी मायलेकास ग्रामीण पोलिस ठाण्यात आणून पोलिस निरीक्षक सुनील नेवसे यांच्या कानावर सर्व हकीकत घातली. पोलिसांनी मुलासह ताब्यात घेऊन नायब तहसीलदार शेख हारुण यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी जामडी घाट येथे दाखल झाले. घरातून खड्डा खोदून मृतदेह ताब्यात घेण्याची प्रक्रिया शनिवारी रात्री सुरू होती. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.  

हेही वाचा- भाजपमधील आरोपींपासूनच महिलांना सर्वाधिक धोका

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

धक्कादायक : नववीतील मुलाने केला बापाचा खून, पुरले घरातच कन्नड (जि. औरंगाबाद) - जामडी घाट (ता. कन्नड) येथे नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने वडिलांचा खून करून त्यांचा मृतदेह घरातच पुरून ठेवल्याची घटना शनिवारी (ता. २९) उघडकीस आली. सव्वादोन महिन्यांपूर्वी म्हणजे ता. २२ डिसेंबरला घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  जामडी घाट येथील नामदेव चव्हाण (वय ४७) ही व्यक्ती साधारण सव्वादोन महिन्यांपासून बेपत्ता होती. दरम्यान, ता. २८ जानेवारीला नामदेव पोमा चव्हाण हे बेपत्ता असल्याची तक्रार पत्नी लताबाई नामदेव चव्हाण हिने कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती. सव्वादोन महिन्यांपासून भाऊ बेपत्ता असल्याने किसन चव्हाण हेही बेचैन होते. म्हणून किसन चव्हाण यांनी मृताची पत्नी लताबाईसह नववीत शिकणाऱ्या मुलास विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी मुलाने सांगितले, की ता. २२ डिसेंबरला रात्रीच्या वेळी वडील नामदेव चव्हाण दारू पिऊन घरी आले होते. त्यावेळी आमच्यात भांडण होऊन वडिलांनी माझ्यावर कुऱ्हाडीने घाव घालण्याचा प्रयत्न केला. हे वाचलंत का? - औरंगाबाद मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी हर्षवर्धन जाधव, दाशरथे मात्र, मी वार चुकविला व स्वसंरक्षणासाठी काठी घेऊन ती वडिलांच्या मानेवर मारली. यामुळे वडील खाली कोसळले व ते बेशुद्ध पडले. मी घाबरून त्यांना दोरी घेऊन फाशी दिली व घरातच खड्डा खोदून त्यात त्यांचा मृतदेह पुरून विल्हेवाट लावली. त्या जागेवर सारवून घेतले. त्यावेळी आई घरी नव्हती, असे मुलाने सांगितले. मृत नामदेव चव्हाण यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, चार भाऊ असा परिवार आहे.    चुलत्याने मायलेकास आणले पोलिस ठाण्यात  मुलगा वडनेर (ता. कन्नड) येथील किसनराव थोरात विद्यालयात नववीत शिकत आहे. शनिवारी (ता.२९) किसन चव्हाण यांनी मायलेकास ग्रामीण पोलिस ठाण्यात आणून पोलिस निरीक्षक सुनील नेवसे यांच्या कानावर सर्व हकीकत घातली. पोलिसांनी मुलासह ताब्यात घेऊन नायब तहसीलदार शेख हारुण यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी जामडी घाट येथे दाखल झाले. घरातून खड्डा खोदून मृतदेह ताब्यात घेण्याची प्रक्रिया शनिवारी रात्री सुरू होती. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.   हेही वाचा- भाजपमधील आरोपींपासूनच महिलांना सर्वाधिक धोका News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TmiigE
Read More
दहशतवादाच्या सावटाखाली ‘चौथा स्तंभ’

पत्रकारितेचे काम जोखमीचे असते, हे वारंवार सिद्ध झाले आहे. विशेषतः पाकिस्तान तर पत्रकारांसाठी सर्वांत धोकादायक देश म्हणून ओळखला जातो. दहशतवादाच्या सावटाखाली राहणाऱ्या पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याविरुद्ध बातमी छापणे म्हणजे ‘आ बैल मुझे मार’ असे करण्यासारखेच आहे. जो बातमी देईल, तो जिवानिशी जातो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आत्तापर्यंत असेच घडत आले आहे. काही दिवसांपूर्वीच खैबर पख्तुनवा प्रांतातील पत्रकार जावेदुल्लाह खान (वय ३६) यांना अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केले. विशेष म्हणजे त्यांना पोलिस संरक्षण असतानाही हल्लेखोरांनी खान यांना टिपले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणी स्वीकारली नसली, तरी तेहरिक ए तालिबान संघटनेचा हात असल्याचे सांगितले जात आहे. 

जावेदुल्लाह हे ‘औसाफ’ या दैनिकासाठी काम करत होते. त्यांच्या कुटुंबातील आत्तापर्यंत १५ जणांची हत्या तालिबानपुरस्कृत संघटनेने केली आहे. हे हत्याकांड २००८ पासून चालत आले असून तालिबानविरोधी गटाचे सदस्य असल्या कारणाने दहशतवादी गटांनी खान कुटुंबीयांना लक्ष्य केले आहे. यात जावेदुल्लाहचे काका, पुतणे यांचा समावेश आहे. ते पीएमएलएन पक्षाचे स्थानिक नेते म्हणून काम करत असताना दहशतवाद विरोधी गटाचे सक्रिय कार्यकर्ते होते. 

मागील महिन्यात सिंध प्रांतात पत्रकार अजिज मेमन यांचा मृतदेह आढळून आला होता. पाकिस्तानमध्ये पत्रकारांवर हल्ले होण्याची नवीन घटना नाही. २०१३ ते २०१९ या काळात पाकिस्तानमध्ये सुमारे ३३ पत्रकारांची हत्या झाली आहे. परंतु पोलिसांनी केवळ २० प्रकरणांचीच नोंद केली आहे. यानुसार न्यायालयाने २० खटले चालू शकतात, असा निर्णय दिला होता. यापैकी सहा खटल्याचे कामकाज पूर्ण होऊ शकले आणि त्याचे प्रमाण १८ टक्केच आहे. सहापैकी एकाला शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

काही वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये गावाच्या सुरक्षेसाठी शांतता समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी दक्षता दलांना प्रोत्साहन देण्यात आले होते. दहशतवाद्यांपासून आदिवासी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे रक्षण करणे हे प्रमुख काम होते. परंतु पाकिस्तानात कायद्याच्या सुधारणेनंतर या समित्या भंग करण्यात आल्या. समित्यांमुळे दहशतवाद्यांचे जाळे बऱ्यापैकी नष्ट झाले, तरीही सरकारी धोरणाचे समर्थक असणाऱ्या गावातील आदिवासी समाजातील ज्येष्ठांना लक्ष्य करण्यात आले. काही भागात समितीच्या सदस्यांनाही लक्ष्य केले गेले. जावेदुल्लाह यांची हत्या या प्रकारातूनच घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. 

पाकिस्तानमध्ये पत्रकारांना सुरक्षा प्रदान करणारा ‘प्रोटेक्शन ऑफ जर्नालिस्ट ॲड मीडिया प्रोफेशनल्स ॲक्ट २०१९ विधेयक आणले आहे. यानुसार दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत नियमांचा वापर पत्रकारांविरुद्ध करता येणार नाही. याशिवाय विधेयकातील मसुद्यानुसार पत्रकारांसाठी आयोग नेमण्यात येणार असून त्याचे प्रमुख सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असतील. हा आयोग पत्रकारांचे अपहरण आणि आर्थिक अडचण सोडवण्याबाबत मदत करणार आहे. याशिवाय पत्रकारांना बातमीचा  स्रोत सांगण्यासाठी दबाव आणता येणार नाही आणि कर्तव्य बजावत असताना कोणीही अडथळा आणू शकणार नाही. दुसरीकडे खोट्या बातम्या पसरवण्यास पत्रकारांना मनाई केली आहे.  अर्थात पत्रकारांच्या हिताचे संरक्षण करणारे अनेक कायदे अगोदरपासून पाकिस्तानात अस्तित्वात आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. अशा स्थितीत नवीन विधेयक कितपत उपयुक्त ठरेल, असा संशय व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानात लोकशाही नसली तरी पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाते. हा स्तंभ उभा करण्यासाठी पाकिस्तानमध्ये अनेक पत्रकारांचे जीव गेले आहेत.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दहशतवादाच्या सावटाखाली ‘चौथा स्तंभ’ पत्रकारितेचे काम जोखमीचे असते, हे वारंवार सिद्ध झाले आहे. विशेषतः पाकिस्तान तर पत्रकारांसाठी सर्वांत धोकादायक देश म्हणून ओळखला जातो. दहशतवादाच्या सावटाखाली राहणाऱ्या पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याविरुद्ध बातमी छापणे म्हणजे ‘आ बैल मुझे मार’ असे करण्यासारखेच आहे. जो बातमी देईल, तो जिवानिशी जातो. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आत्तापर्यंत असेच घडत आले आहे. काही दिवसांपूर्वीच खैबर पख्तुनवा प्रांतातील पत्रकार जावेदुल्लाह खान (वय ३६) यांना अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केले. विशेष म्हणजे त्यांना पोलिस संरक्षण असतानाही हल्लेखोरांनी खान यांना टिपले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणी स्वीकारली नसली, तरी तेहरिक ए तालिबान संघटनेचा हात असल्याचे सांगितले जात आहे.  जावेदुल्लाह हे ‘औसाफ’ या दैनिकासाठी काम करत होते. त्यांच्या कुटुंबातील आत्तापर्यंत १५ जणांची हत्या तालिबानपुरस्कृत संघटनेने केली आहे. हे हत्याकांड २००८ पासून चालत आले असून तालिबानविरोधी गटाचे सदस्य असल्या कारणाने दहशतवादी गटांनी खान कुटुंबीयांना लक्ष्य केले आहे. यात जावेदुल्लाहचे काका, पुतणे यांचा समावेश आहे. ते पीएमएलएन पक्षाचे स्थानिक नेते म्हणून काम करत असताना दहशतवाद विरोधी गटाचे सक्रिय कार्यकर्ते होते.  मागील महिन्यात सिंध प्रांतात पत्रकार अजिज मेमन यांचा मृतदेह आढळून आला होता. पाकिस्तानमध्ये पत्रकारांवर हल्ले होण्याची नवीन घटना नाही. २०१३ ते २०१९ या काळात पाकिस्तानमध्ये सुमारे ३३ पत्रकारांची हत्या झाली आहे. परंतु पोलिसांनी केवळ २० प्रकरणांचीच नोंद केली आहे. यानुसार न्यायालयाने २० खटले चालू शकतात, असा निर्णय दिला होता. यापैकी सहा खटल्याचे कामकाज पूर्ण होऊ शकले आणि त्याचे प्रमाण १८ टक्केच आहे. सहापैकी एकाला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये गावाच्या सुरक्षेसाठी शांतता समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी दक्षता दलांना प्रोत्साहन देण्यात आले होते. दहशतवाद्यांपासून आदिवासी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे रक्षण करणे हे प्रमुख काम होते. परंतु पाकिस्तानात कायद्याच्या सुधारणेनंतर या समित्या भंग करण्यात आल्या. समित्यांमुळे दहशतवाद्यांचे जाळे बऱ्यापैकी नष्ट झाले, तरीही सरकारी धोरणाचे समर्थक असणाऱ्या गावातील आदिवासी समाजातील ज्येष्ठांना लक्ष्य करण्यात आले. काही भागात समितीच्या सदस्यांनाही लक्ष्य केले गेले. जावेदुल्लाह यांची हत्या या प्रकारातूनच घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.  पाकिस्तानमध्ये पत्रकारांना सुरक्षा प्रदान करणारा ‘प्रोटेक्शन ऑफ जर्नालिस्ट ॲड मीडिया प्रोफेशनल्स ॲक्ट २०१९ विधेयक आणले आहे. यानुसार दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत नियमांचा वापर पत्रकारांविरुद्ध करता येणार नाही. याशिवाय विधेयकातील मसुद्यानुसार पत्रकारांसाठी आयोग नेमण्यात येणार असून त्याचे प्रमुख सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असतील. हा आयोग पत्रकारांचे अपहरण आणि आर्थिक अडचण सोडवण्याबाबत मदत करणार आहे. याशिवाय पत्रकारांना बातमीचा  स्रोत सांगण्यासाठी दबाव आणता येणार नाही आणि कर्तव्य बजावत असताना कोणीही अडथळा आणू शकणार नाही. दुसरीकडे खोट्या बातम्या पसरवण्यास पत्रकारांना मनाई केली आहे.  अर्थात पत्रकारांच्या हिताचे संरक्षण करणारे अनेक कायदे अगोदरपासून पाकिस्तानात अस्तित्वात आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. अशा स्थितीत नवीन विधेयक कितपत उपयुक्त ठरेल, असा संशय व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानात लोकशाही नसली तरी पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाते. हा स्तंभ उभा करण्यासाठी पाकिस्तानमध्ये अनेक पत्रकारांचे जीव गेले आहेत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3akOOX9
Read More