Click Live News Short news on Mobile 2019.....: News Story Feeds

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......
Showing posts with label News Story Feeds. Show all posts
Showing posts with label News Story Feeds. Show all posts

Sunday, January 17, 2021

ग्रामपंचायत निवडणुकीवरून नारी येथे दोन गटांत हाणामारी ! तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

पांगरी (सोलापूर) : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी मतदान केंद्रावर थांबण्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना नारी (ता. बार्शी) येथे घडली. याबाबत परस्पर विरोधी फिर्यादीवरून दोन गटांतील तीस जणांवर पांगरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत अण्णासाहेब दत्तात्रय साठे (वय 32, रा. नारी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की नारी गावच्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान केंद्रावर मतदान करून बाहेर आलो व मतदान केंद्राबाहेर थांबलो असता त्या वेळी अनिल लक्ष्मण कांबळे, सुनील लक्ष्मण कांबळे, संतोष लक्ष्मण कांबळे, प्रशांत बदाले, मंगेश पाटील, विशाल धर्मराज कदम, बाबासाहेब धर्मराज कदम, सुधीर बदाले, महादेव सुनील कांबळे, गोकुळ सुनील कांबळे (रा. सर्व नारी) यांनी तेथे येऊन तू बाहेर का थांबलास म्हणत शिवीगाळ करत लाथा- बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या वेळी अमोल रानमाळ, अण्णा शिंदे, अनिल बारंगुळे, सुनील बारंगुळे हे सोडवायला आले असता अमोल रानमाळ, अण्णा शिंदे यांना डोक्‍यात दगड घालून जखमी केले. 

तर अनिल लक्ष्मण कांबळे (वय 40, रा. नारी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की माझी पत्नी सुवर्णा ही गाव कामगार कोतवाल आहे. गावच्या निवडणुकीचे मतदान असल्याने निवडणुकीसाठी बाहेरून आलेल्या स्टाफसाठी जेवणाची व इतर व्यवस्था मी पाहत असताना रामचंद्र धर्मराज माळी याने मला, तू दिवसभर इथे का थांबलास, बाहेर जा म्हटल्याने आमच्या दोघांत किरकोळ बाचाबाची झाली. या वेळेस मी शाळेच्या बाहेर आलो असता अनिल भास्कर बारंगुळे, सुनील भास्कर बारंगुळे, अमोल अनिल रानमाळ, अमित अरुण कदम, अण्णा शिंदे, सूरज मोरे, अण्णासाहेब दत्तात्रय साठे, दयानंद दिलीप शिंदे, बालाजी भास्कर शिंदे, पांडुरंग नानासाहेब बदाले, सुजित सुरेश बदाले, दादासाहेब विजय कुरुंद, रामहारी दिलीप शिंदे, अतुल नामदेव बदाले, बलभीम रामा बिरंजे, दिलीप शिंदे, रोहित लक्ष्मण साकतकर, महादेव प्रकाश कोंढारे, लखन पोपट शिंदे, केशव वामन कदम (रा. सर्व नारी) यांनी मला व माझे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या साथीदारांना शिवीगाळ करून लाथा- बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या वेळी मंगेश पाटील, विशाल कदम यांना दगडाने मारहाण करून जखमी केले. 

या घटनेची पांगरी पोलिसांत नोंद झाली असून तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण शिरसट करत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ग्रामपंचायत निवडणुकीवरून नारी येथे दोन गटांत हाणामारी ! तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल  पांगरी (सोलापूर) : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी मतदान केंद्रावर थांबण्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना नारी (ता. बार्शी) येथे घडली. याबाबत परस्पर विरोधी फिर्यादीवरून दोन गटांतील तीस जणांवर पांगरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.  याबाबत अण्णासाहेब दत्तात्रय साठे (वय 32, रा. नारी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की नारी गावच्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान केंद्रावर मतदान करून बाहेर आलो व मतदान केंद्राबाहेर थांबलो असता त्या वेळी अनिल लक्ष्मण कांबळे, सुनील लक्ष्मण कांबळे, संतोष लक्ष्मण कांबळे, प्रशांत बदाले, मंगेश पाटील, विशाल धर्मराज कदम, बाबासाहेब धर्मराज कदम, सुधीर बदाले, महादेव सुनील कांबळे, गोकुळ सुनील कांबळे (रा. सर्व नारी) यांनी तेथे येऊन तू बाहेर का थांबलास म्हणत शिवीगाळ करत लाथा- बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या वेळी अमोल रानमाळ, अण्णा शिंदे, अनिल बारंगुळे, सुनील बारंगुळे हे सोडवायला आले असता अमोल रानमाळ, अण्णा शिंदे यांना डोक्‍यात दगड घालून जखमी केले.  तर अनिल लक्ष्मण कांबळे (वय 40, रा. नारी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की माझी पत्नी सुवर्णा ही गाव कामगार कोतवाल आहे. गावच्या निवडणुकीचे मतदान असल्याने निवडणुकीसाठी बाहेरून आलेल्या स्टाफसाठी जेवणाची व इतर व्यवस्था मी पाहत असताना रामचंद्र धर्मराज माळी याने मला, तू दिवसभर इथे का थांबलास, बाहेर जा म्हटल्याने आमच्या दोघांत किरकोळ बाचाबाची झाली. या वेळेस मी शाळेच्या बाहेर आलो असता अनिल भास्कर बारंगुळे, सुनील भास्कर बारंगुळे, अमोल अनिल रानमाळ, अमित अरुण कदम, अण्णा शिंदे, सूरज मोरे, अण्णासाहेब दत्तात्रय साठे, दयानंद दिलीप शिंदे, बालाजी भास्कर शिंदे, पांडुरंग नानासाहेब बदाले, सुजित सुरेश बदाले, दादासाहेब विजय कुरुंद, रामहारी दिलीप शिंदे, अतुल नामदेव बदाले, बलभीम रामा बिरंजे, दिलीप शिंदे, रोहित लक्ष्मण साकतकर, महादेव प्रकाश कोंढारे, लखन पोपट शिंदे, केशव वामन कदम (रा. सर्व नारी) यांनी मला व माझे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या साथीदारांना शिवीगाळ करून लाथा- बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या वेळी मंगेश पाटील, विशाल कदम यांना दगडाने मारहाण करून जखमी केले.  या घटनेची पांगरी पोलिसांत नोंद झाली असून तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण शिरसट करत आहेत.  संपादन : श्रीनिवास दुध्याल News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39KW14t
Read More
Unmasking Happiness | कोरोनामुक्त 80 टक्‍के रुग्णांमध्ये केसगळती; BMC रुग्णालयांत तक्रारींच्या संख्येत वाढ

मुंबई  : कोरोनातून बरे झालेल्या ८० टक्के जणांमध्ये इतर समस्येसह आता केसगळतीच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. शिवाय, ज्यांना कोरोना झालेला नाही अशांसमोर मानसिक ताणातून केसगळती होत असल्याचे पालिकेच्या रुग्णालयांत झालेल्या तपासणीत आढळले आहे.
पालिकेच्या केईएम रुग्णालयात कोरोनोत्तर (पोस्ट कोव्हिड) उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये केसगळतीची समस्या उद्‌भवली आहे. या संख्येत वाढ होत असल्याचे केईएम रुग्णालयाच्या त्वचाविकार विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. सिद्धी चिखळकर यांनी सांगितले.

Unmasking Happiness | राज्यातील 50 टक्के कोरोना मृत्यू सहव्याधींनी; 46.7 टक्के जणांचा उच्च रक्तदाबाने मृत्यू

केईएम रुग्णालयाच्या त्वचा विभागाच्या बाह्य रुग्ण विभागात केसगळतीच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांमध्ये गेल्या काही वर्षांच्या तुलनेत भर पडली आहे. त्यात कोरोना महासाथीत केसगळतीची समस्या निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

कोव्हिडमुळे अनेकांना केसगळती होत आहे. ज्यांना कोव्हिड झाला आहे तेही आणि ज्यांना नाही झाला त्यांनाही या समस्या जाणवत आहेत.
- डॉ. स्मिता घाटे,
 त्वचारोग तज्ज्ञ, सायन रुग्णालय

 

कोणत्याही विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर ताप येतो आणि त्यातून किमान दीड ते तीन महिन्यांदरम्यान केसगळतीची समस्या होते.
- डॉ. चित्रा नायक,
विभागप्रमुख, त्वचा रोग, नायर रुग्णालय

 

कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांनी साधारण तीन महिन्यांनंतर केस गळतीच्या तक्रारी केल्या आहेत. कोरोना काळात वाढलेल्या तणावातून केसगळती होऊ शकते, असे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. केईएम रुग्णालयात त्वचा विकारावरील उपचारांसाठी येणाऱ्या २५० रुग्णांमधील ३० टक्के रुग्णांनी केसगळतीची तक्रार केली आहे. व्हिटॅमिन डी, लोहाचे प्रमाण कमी झाल्यास केसगळती उद्‌भवते.
- डॉ. सिद्धी चिखळकर,
सहयोगी प्राध्यापक, त्वचाविकार विभाग, केईएम रुग्णालय

Unmasking Happiness Hair fall in 80% of corona-free patientsIncrease in the number of complaints in BMC hospitals

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Unmasking Happiness | कोरोनामुक्त 80 टक्‍के रुग्णांमध्ये केसगळती; BMC रुग्णालयांत तक्रारींच्या संख्येत वाढ मुंबई  : कोरोनातून बरे झालेल्या ८० टक्के जणांमध्ये इतर समस्येसह आता केसगळतीच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. शिवाय, ज्यांना कोरोना झालेला नाही अशांसमोर मानसिक ताणातून केसगळती होत असल्याचे पालिकेच्या रुग्णालयांत झालेल्या तपासणीत आढळले आहे. पालिकेच्या केईएम रुग्णालयात कोरोनोत्तर (पोस्ट कोव्हिड) उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये केसगळतीची समस्या उद्‌भवली आहे. या संख्येत वाढ होत असल्याचे केईएम रुग्णालयाच्या त्वचाविकार विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. सिद्धी चिखळकर यांनी सांगितले. Unmasking Happiness | राज्यातील 50 टक्के कोरोना मृत्यू सहव्याधींनी; 46.7 टक्के जणांचा उच्च रक्तदाबाने मृत्यू केईएम रुग्णालयाच्या त्वचा विभागाच्या बाह्य रुग्ण विभागात केसगळतीच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांमध्ये गेल्या काही वर्षांच्या तुलनेत भर पडली आहे. त्यात कोरोना महासाथीत केसगळतीची समस्या निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.   कोव्हिडमुळे अनेकांना केसगळती होत आहे. ज्यांना कोव्हिड झाला आहे तेही आणि ज्यांना नाही झाला त्यांनाही या समस्या जाणवत आहेत. - डॉ. स्मिता घाटे,  त्वचारोग तज्ज्ञ, सायन रुग्णालय   कोणत्याही विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर ताप येतो आणि त्यातून किमान दीड ते तीन महिन्यांदरम्यान केसगळतीची समस्या होते. - डॉ. चित्रा नायक, विभागप्रमुख, त्वचा रोग, नायर रुग्णालय   कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांनी साधारण तीन महिन्यांनंतर केस गळतीच्या तक्रारी केल्या आहेत. कोरोना काळात वाढलेल्या तणावातून केसगळती होऊ शकते, असे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. केईएम रुग्णालयात त्वचा विकारावरील उपचारांसाठी येणाऱ्या २५० रुग्णांमधील ३० टक्के रुग्णांनी केसगळतीची तक्रार केली आहे. व्हिटॅमिन डी, लोहाचे प्रमाण कमी झाल्यास केसगळती उद्‌भवते. - डॉ. सिद्धी चिखळकर, सहयोगी प्राध्यापक, त्वचाविकार विभाग, केईएम रुग्णालय Unmasking Happiness Hair fall in 80% of corona-free patientsIncrease in the number of complaints in BMC hospitals ----------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39Bl2ik
Read More
Success Story: ‘ट्रॅक्टर क्वीन’मल्लिका श्रीनिवासन!

ट्रॅक्टर चालविणारी आर्ची पाहिल्यानंतर सर्वच ‘सैराट’ झाले होते. आर्चीचा तो लुक आजही आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. मात्र, खऱ्या आयुष्यातील ‘ट्रॅक्टर क्वीन’ आहेत मल्लिका श्रीनिवासन! या ट्रॅक्टर चालविणाऱ्या नव्हे, तर ट्रॅक्टरची निर्मिती करणाऱ्या ‘ट्रॅक्टर अँड फॉर्म इक्विपमेंट्स’ (टॅफे) या कंपनीच्या अध्यक्षा आहेत. त्या देशातील सर्वांत प्रभावी महिलांपैकी एक आहेत. मल्लिका यांनी वाजवी दरात दर्जेदार ट्रॅक्टरची निर्मिती करीत जागतिक स्तरावर ख्याती मिळविली आहे. 

१९ नोव्हेंबर १९५९ रोजी जन्मलेल्या मल्लिका या दक्षिण भारतातील उद्योजक ए. शीवसैलम यांच्या मोठ्या कन्या आहेत. मद्रास विद्यापीठातून एम.ए. केल्यानंतर, त्यांच्या वडीलांनी त्यांना ‘लिटरेचर’ शिकण्याचा सल्ला दिला. परंतु, स्वतःची वेगळी स्वप्न असणाऱ्या मल्लिका यांनी ‘लिटरेचर’ला प्रवेश न घेता, पुढील शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेल्या. त्यांनी अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून एमबीए केले. 

Success Story:आईस्क्रीम, बिस्कीट आणि मिसेस बेक्टर!

भारतात परतल्यानंतर वयाच्या २७ व्या वर्षी त्यांनी ‘टॅफे’मध्ये ‘जनरल मॅनेजर’ पदावर काम करायला सुरवात केली. त्या म्हणतात, ‘कौटुंबिक व्यवसायात प्रवेश कर, असा कोणताही दबाव माझ्यावर नव्हता. परंतु, मला त्यासाठी प्रोत्साहन मिळाले होते, हे निश्‍चित!’

कंपनीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी सहजसोप्या रणनीती आखल्या. सुरवातीला त्यांनी शेतकऱ्यांना कसे ट्रॅक्टर हवे आहेत, हे जाणून घेतले. त्यासाठी त्यांनी देशभरात ग्राहक सेवा केंद्रे सुरू केले आणि ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद गांभीर्याने घेत, उत्पादनात बदल केला. मल्लिका या बाबतीत म्हणतात, की भारतीय शेतकरी आपला पैसा खूप विचारपूर्वक खर्च करतो. त्यामुळे आमच्यासमोरचे सर्वांत मोठे आव्हान म्हणजे ट्रॅक्टरचे अनेक वर्षांचे तंत्रज्ञान, डिझाइन आणि मॉडेल बदलणे. त्यांच्यामध्ये नवी वैशिष्ट्ये जोडणे, परंतु किंमत वाढू न देणे. नव्वदीच्या दशकात ट्रॅक्टर क्षेत्र मंदीच्या भोवऱ्यात सापडले. त्यावेळी इतर कंपन्यांनी ट्रॅक्टरची विक्री वाढविण्यासाठी डिलर्सवर दबाव आणला. परंतु, मल्लिका यांनी नफा पणाला लावून उत्पादन कमी केले. मंदीच्या काळातही कंपनी टिकवून ठेवण्यात त्या यशस्वी झाल्या. त्यांनी कंपनीत प्रवेश केला, तेव्हा कंपनीची उलाढाल ८६ कोटी रुपये होती, सध्या ती ९३०० कोटी रुपयांहून अधिक आहे. ही देशातील दुसरी, तर जगातील तिसऱ्या क्रमांकाची ट्रॅक्टर बनविणारी कंपनी आहे. जी कंपनी १९८५ मध्ये दरवर्षी केवळ ४००० ट्रॅक्टर बनवत होती, ती कंपनी सध्या १,५०,००० हून अधिक ट्रॅक्टर वर्षाला बनवीत आहे. मल्लिका यांच्या कार्यासाठी २०१४ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ किताबाने गौरविण्यात आले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Success Story: ‘ट्रॅक्टर क्वीन’मल्लिका श्रीनिवासन! ट्रॅक्टर चालविणारी आर्ची पाहिल्यानंतर सर्वच ‘सैराट’ झाले होते. आर्चीचा तो लुक आजही आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. मात्र, खऱ्या आयुष्यातील ‘ट्रॅक्टर क्वीन’ आहेत मल्लिका श्रीनिवासन! या ट्रॅक्टर चालविणाऱ्या नव्हे, तर ट्रॅक्टरची निर्मिती करणाऱ्या ‘ट्रॅक्टर अँड फॉर्म इक्विपमेंट्स’ (टॅफे) या कंपनीच्या अध्यक्षा आहेत. त्या देशातील सर्वांत प्रभावी महिलांपैकी एक आहेत. मल्लिका यांनी वाजवी दरात दर्जेदार ट्रॅक्टरची निर्मिती करीत जागतिक स्तरावर ख्याती मिळविली आहे.  १९ नोव्हेंबर १९५९ रोजी जन्मलेल्या मल्लिका या दक्षिण भारतातील उद्योजक ए. शीवसैलम यांच्या मोठ्या कन्या आहेत. मद्रास विद्यापीठातून एम.ए. केल्यानंतर, त्यांच्या वडीलांनी त्यांना ‘लिटरेचर’ शिकण्याचा सल्ला दिला. परंतु, स्वतःची वेगळी स्वप्न असणाऱ्या मल्लिका यांनी ‘लिटरेचर’ला प्रवेश न घेता, पुढील शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेल्या. त्यांनी अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून एमबीए केले.  Success Story:आईस्क्रीम, बिस्कीट आणि मिसेस बेक्टर! भारतात परतल्यानंतर वयाच्या २७ व्या वर्षी त्यांनी ‘टॅफे’मध्ये ‘जनरल मॅनेजर’ पदावर काम करायला सुरवात केली. त्या म्हणतात, ‘कौटुंबिक व्यवसायात प्रवेश कर, असा कोणताही दबाव माझ्यावर नव्हता. परंतु, मला त्यासाठी प्रोत्साहन मिळाले होते, हे निश्‍चित!’ कंपनीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी सहजसोप्या रणनीती आखल्या. सुरवातीला त्यांनी शेतकऱ्यांना कसे ट्रॅक्टर हवे आहेत, हे जाणून घेतले. त्यासाठी त्यांनी देशभरात ग्राहक सेवा केंद्रे सुरू केले आणि ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद गांभीर्याने घेत, उत्पादनात बदल केला. मल्लिका या बाबतीत म्हणतात, की भारतीय शेतकरी आपला पैसा खूप विचारपूर्वक खर्च करतो. त्यामुळे आमच्यासमोरचे सर्वांत मोठे आव्हान म्हणजे ट्रॅक्टरचे अनेक वर्षांचे तंत्रज्ञान, डिझाइन आणि मॉडेल बदलणे. त्यांच्यामध्ये नवी वैशिष्ट्ये जोडणे, परंतु किंमत वाढू न देणे. नव्वदीच्या दशकात ट्रॅक्टर क्षेत्र मंदीच्या भोवऱ्यात सापडले. त्यावेळी इतर कंपन्यांनी ट्रॅक्टरची विक्री वाढविण्यासाठी डिलर्सवर दबाव आणला. परंतु, मल्लिका यांनी नफा पणाला लावून उत्पादन कमी केले. मंदीच्या काळातही कंपनी टिकवून ठेवण्यात त्या यशस्वी झाल्या. त्यांनी कंपनीत प्रवेश केला, तेव्हा कंपनीची उलाढाल ८६ कोटी रुपये होती, सध्या ती ९३०० कोटी रुपयांहून अधिक आहे. ही देशातील दुसरी, तर जगातील तिसऱ्या क्रमांकाची ट्रॅक्टर बनविणारी कंपनी आहे. जी कंपनी १९८५ मध्ये दरवर्षी केवळ ४००० ट्रॅक्टर बनवत होती, ती कंपनी सध्या १,५०,००० हून अधिक ट्रॅक्टर वर्षाला बनवीत आहे. मल्लिका यांच्या कार्यासाठी २०१४ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ किताबाने गौरविण्यात आले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2LXAXiL
Read More
Special Report | सायबर पोलिसांनी मुंबईकरांचे 15 कोटी वाचवले; फसवणुकीनंतर "गोल्डन अवर'मध्ये तक्रार आवश्‍यक

मुंबई  ः सायबर गुन्हेगार दूरध्वनी करून सामान्यांच्या बॅंक खात्यांवर डल्ला मारत असताना अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी सायबर पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत. त्या अंतर्गत तुम्ही सायबर फसवणुकीला बळी पडल्यानंतर दोन तासांच्या आत सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यास तुमचे पैसे वाचू शकतात. 2020 मध्ये वर्षभरात अशाप्रकारे 15 कोटी रुपये वाचवण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. 

सायबर गुन्हेगार सर्वसामान्य व्यक्तींना बोलण्यात गुंतवून त्यांच्या जन्मभराच्या कमाईवर डल्ला मारत आहेत. त्यामुळे लोकांचा हा पैसा वाचवण्यासाठी सहपोलिस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे यांनी सायबर पोलिसांना विशेष उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सायबर पोलिसांनी आरोपींच्या खात्यातील व्यवहार तत्काळ गोठवून गेल्या वर्षभरात मुंबईकरांचे 15 कोटी रुपये वाचवले आहेत. ज्याप्रमाणे रस्ते अपघातामध्ये अपघात झाल्याच्या काही कालावधीमध्ये जखमी व्यक्तीला उपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचू शकतात. त्या कालावधीला "गोल्डन अवर' म्हणतात. तसेच सायबर गुन्ह्यांमध्येही फसवणूक झाल्याच्या दोन तासांमध्ये सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांना हे पैसे वाचवणे शक्‍य होते. 2020 या वर्षभरात एकूण 15 कोटी रुपये वाचवण्यात आले आहेत. ते ई-मेल फिशिंग, ऑनलाईन जॉब फ्रॉड, क्‍लासिफाईड फ्रॉड, केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक, लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावरून ओळख करून फसवणूक, समाजमाध्यमांवरून ओळख करून फसवणूक, ओटीपी फसवणूक तसेच इतर कुठल्याही प्रकारात फसवणूक करण्यात आलेली ही रक्कम आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी ही रक्कम वाचवण्यात आली होती, अशा प्रकरणांमध्ये त्या वेळी गुन्हेही दाखल झाले नव्हते. 

मुंबई, रायगड ठाणे परिसरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

दरम्यान, सायबर गुन्ह्यांमध्ये बॅंकेची पडताळणी व अहवाल येईपर्यंत गुन्हा दाखल होण्यातच आठवड्याचा कालावधी जातो. त्याचा फायदा उचलून आरोपी खात्यातील रक्कम काढतात. त्यामुळे सायबर पोलिस प्रथम संबंधित खात्यात गेलेल्या रकमेचा व्यवहार थांबवतात, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. 

मुलीच्या लग्नाचे पैसे वाचवले 
कुर्ल्यातील फहाद शेख याला केवायसीच्या नावाखाली आठ लाखांचा सायबर गंडा घालण्यात आला होता. त्याने तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर आरोपीच्या खात्यातील ही रक्कम तत्काळ गोठवण्यात आली. त्यामुळे ती आरोपीला काढता आली नाही. फहाद शेख यांनी मुलीच्या लग्नासाठी ही रक्कम जमा केली होती.

Cyber ​​police save 15 crore Mumbaikars Complaint required in Golden Hour after fraud

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Special Report | सायबर पोलिसांनी मुंबईकरांचे 15 कोटी वाचवले; फसवणुकीनंतर "गोल्डन अवर'मध्ये तक्रार आवश्‍यक मुंबई  ः सायबर गुन्हेगार दूरध्वनी करून सामान्यांच्या बॅंक खात्यांवर डल्ला मारत असताना अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी सायबर पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत. त्या अंतर्गत तुम्ही सायबर फसवणुकीला बळी पडल्यानंतर दोन तासांच्या आत सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यास तुमचे पैसे वाचू शकतात. 2020 मध्ये वर्षभरात अशाप्रकारे 15 कोटी रुपये वाचवण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.  सायबर गुन्हेगार सर्वसामान्य व्यक्तींना बोलण्यात गुंतवून त्यांच्या जन्मभराच्या कमाईवर डल्ला मारत आहेत. त्यामुळे लोकांचा हा पैसा वाचवण्यासाठी सहपोलिस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे यांनी सायबर पोलिसांना विशेष उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सायबर पोलिसांनी आरोपींच्या खात्यातील व्यवहार तत्काळ गोठवून गेल्या वर्षभरात मुंबईकरांचे 15 कोटी रुपये वाचवले आहेत. ज्याप्रमाणे रस्ते अपघातामध्ये अपघात झाल्याच्या काही कालावधीमध्ये जखमी व्यक्तीला उपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचू शकतात. त्या कालावधीला "गोल्डन अवर' म्हणतात. तसेच सायबर गुन्ह्यांमध्येही फसवणूक झाल्याच्या दोन तासांमध्ये सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांना हे पैसे वाचवणे शक्‍य होते. 2020 या वर्षभरात एकूण 15 कोटी रुपये वाचवण्यात आले आहेत. ते ई-मेल फिशिंग, ऑनलाईन जॉब फ्रॉड, क्‍लासिफाईड फ्रॉड, केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक, लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावरून ओळख करून फसवणूक, समाजमाध्यमांवरून ओळख करून फसवणूक, ओटीपी फसवणूक तसेच इतर कुठल्याही प्रकारात फसवणूक करण्यात आलेली ही रक्कम आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी ही रक्कम वाचवण्यात आली होती, अशा प्रकरणांमध्ये त्या वेळी गुन्हेही दाखल झाले नव्हते.  मुंबई, रायगड ठाणे परिसरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा दरम्यान, सायबर गुन्ह्यांमध्ये बॅंकेची पडताळणी व अहवाल येईपर्यंत गुन्हा दाखल होण्यातच आठवड्याचा कालावधी जातो. त्याचा फायदा उचलून आरोपी खात्यातील रक्कम काढतात. त्यामुळे सायबर पोलिस प्रथम संबंधित खात्यात गेलेल्या रकमेचा व्यवहार थांबवतात, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.  मुलीच्या लग्नाचे पैसे वाचवले  कुर्ल्यातील फहाद शेख याला केवायसीच्या नावाखाली आठ लाखांचा सायबर गंडा घालण्यात आला होता. त्याने तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर आरोपीच्या खात्यातील ही रक्कम तत्काळ गोठवण्यात आली. त्यामुळे ती आरोपीला काढता आली नाही. फहाद शेख यांनी मुलीच्या लग्नासाठी ही रक्कम जमा केली होती. Cyber ​​police save 15 crore Mumbaikars Complaint required in Golden Hour after fraud -------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे )   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3nXudyG
Read More
मुंबईतील शाळांबाबत आज निर्णय? महापौर किशोरी पेडणेकरांच्या उपस्थितीत बैठक 

मुंबई : मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत उद्या (ता. 18) महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतरच शाळा सुरू होण्याची निश्‍चित तारीख ठरण्याची शक्‍यता आहे. 
कोव्हिड लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यापर्यंत 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे; मात्र अद्याप या वयोगटाखालील बालके आणि तरुणांना लस देण्याबाबत निर्णय झालेला नाही. मुंबईतील कोरोनाचा फास सैल झालेला आहे; मात्र अद्याप धोका टळलेला नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणे गरजेचे आहे. यासाठी आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागासोबत चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी उद्या ही बैठक बोलाविण्यात आली आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. 

लसीकरण रद्द नाही! 
कोव्हिडचे लसीकरण रद्द केलेले नाही. ते स्थगित केले आहे, असे महापौरांनी स्पष्ट केले. को-विन ऍपमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या दूर करण्यासाठी उद्यापर्यंत लसीकरण स्थगित केले आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत गैरसमज पसरवू नये, असे आवाहन महापौरांनी केले. 

परदेशातून येणाऱ्या काही प्रवाशांकडून पैसे घेऊन त्यांना बेकायदेशीररीत्या विलगीकरणातून सूट देण्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी दोषी असलेल्या दुय्यम अभियंत्यासह तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच आता त्यांच्यावर पोलिस कारवाई सुरू आहे. असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. 
- किशोरी पेडणेकर,
महापौर 

Decision regarding schools in Mumbai todayMeeting in the presence of Mayor Kishori Pednekar

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुंबईतील शाळांबाबत आज निर्णय? महापौर किशोरी पेडणेकरांच्या उपस्थितीत बैठक  मुंबई : मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत उद्या (ता. 18) महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतरच शाळा सुरू होण्याची निश्‍चित तारीख ठरण्याची शक्‍यता आहे.  कोव्हिड लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यापर्यंत 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे; मात्र अद्याप या वयोगटाखालील बालके आणि तरुणांना लस देण्याबाबत निर्णय झालेला नाही. मुंबईतील कोरोनाचा फास सैल झालेला आहे; मात्र अद्याप धोका टळलेला नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणे गरजेचे आहे. यासाठी आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागासोबत चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी उद्या ही बैठक बोलाविण्यात आली आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.  लसीकरण रद्द नाही!  कोव्हिडचे लसीकरण रद्द केलेले नाही. ते स्थगित केले आहे, असे महापौरांनी स्पष्ट केले. को-विन ऍपमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या दूर करण्यासाठी उद्यापर्यंत लसीकरण स्थगित केले आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत गैरसमज पसरवू नये, असे आवाहन महापौरांनी केले.  परदेशातून येणाऱ्या काही प्रवाशांकडून पैसे घेऊन त्यांना बेकायदेशीररीत्या विलगीकरणातून सूट देण्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी दोषी असलेल्या दुय्यम अभियंत्यासह तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच आता त्यांच्यावर पोलिस कारवाई सुरू आहे. असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत.  - किशोरी पेडणेकर, महापौर  Decision regarding schools in Mumbai todayMeeting in the presence of Mayor Kishori Pednekar ----------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3sAOdun
Read More
निती आयोगात नोकरीची मोठी संधी; पगार ६० हजार!

Niti Ayog Recruitment: पुणे : जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर निती आयोग तुमच्यासाठी एक मोठी संधी घेऊन आलं आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. ज्यांना निती आयोगामध्ये भरती व्हायचं आहे, त्यांनी नक्कीच या संधीचा फायदा घ्यावा. यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार निती आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. 

- MMRDA Jobs 2021: इंजिनिअर तरुण-तरुणींनो आताच करा अर्ज; पगार १ लाख ७७ हजारापर्यंत​

यंग प्रोफेशनल्सकडून निती आयोगाला खूप अपेक्षा आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून जास्तीत जास्त अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी तुमच्याकडे फक्त इंजिनिअरिंगची पदवी किंवा पदविका (डिप्लोमा) असणे आवश्यक आहे. एकूण १० पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. ही नोकरी दोन वर्षांच्या करार पद्धतीनुसार असेल. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ जानेवारी २०२१ आहे. त्यापूर्वी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

- IAF Recruitment 2021: १२वी पास उमेदवारांनो, एअरमन पदांसाठी निघाली भरती!​

ज्या १० पदांवर यंग प्रोफेशनल्स भरती करावयाचे आहेत त्यासाठी उमेदवाराचे कमाल वय ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे. रिक्त पदांवर भरती लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला मुलाखतीच्या आधारे अंतिम नियुक्ती पत्र दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ६० हजार रुपये पगार देण्यात येईल. रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अर्जासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. निवड झाल्यानंतर यशस्वी उमेदवारांना दिल्लीत नोकरी दिली जाईल.

- दहावी-बारावी पास उमेदवारांसाठी मोठी संधी; फक्त मुलाखत द्या अन् सरकारी नोकरी मिळवा​

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा
अधिसूचना पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

निती आयोगात नोकरीची मोठी संधी; पगार ६० हजार! Niti Ayog Recruitment: पुणे : जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर निती आयोग तुमच्यासाठी एक मोठी संधी घेऊन आलं आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. ज्यांना निती आयोगामध्ये भरती व्हायचं आहे, त्यांनी नक्कीच या संधीचा फायदा घ्यावा. यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार निती आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.  - MMRDA Jobs 2021: इंजिनिअर तरुण-तरुणींनो आताच करा अर्ज; पगार १ लाख ७७ हजारापर्यंत​ यंग प्रोफेशनल्सकडून निती आयोगाला खूप अपेक्षा आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून जास्तीत जास्त अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी तुमच्याकडे फक्त इंजिनिअरिंगची पदवी किंवा पदविका (डिप्लोमा) असणे आवश्यक आहे. एकूण १० पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. ही नोकरी दोन वर्षांच्या करार पद्धतीनुसार असेल. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ जानेवारी २०२१ आहे. त्यापूर्वी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. - IAF Recruitment 2021: १२वी पास उमेदवारांनो, एअरमन पदांसाठी निघाली भरती!​ ज्या १० पदांवर यंग प्रोफेशनल्स भरती करावयाचे आहेत त्यासाठी उमेदवाराचे कमाल वय ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे. रिक्त पदांवर भरती लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला मुलाखतीच्या आधारे अंतिम नियुक्ती पत्र दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ६० हजार रुपये पगार देण्यात येईल. रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अर्जासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. निवड झाल्यानंतर यशस्वी उमेदवारांना दिल्लीत नोकरी दिली जाईल. - दहावी-बारावी पास उमेदवारांसाठी मोठी संधी; फक्त मुलाखत द्या अन् सरकारी नोकरी मिळवा​ अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा अधिसूचना पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39KUJq9
Read More
पोलिस मोटर परिवहन विभागात सावळा गोंधळ; सीसीटीव्ही कॅमेरे बंद; वरिष्ठांचं दुर्लक्ष 

नागपूर ः पोलिस मुख्यालयाजवळील मोटर परिवहन विभागात (एमटीओ) मोठा सावळा गोंधळ सुरू आहे. पोलिस कर्मचारीच वाहनांची ॲडजेस्टमेंट म्हणून पोलिसांकडून चिरिमिरी घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वर्षानुवर्षे हाच प्रकार सुरू असून अनेक वाहनचालक पोलिस कर्मचारी या त्रासाला कंटाळले असून याबाबत वॉट्सॲप ग्रूपवर आपली खदखद व्यक्त करीत आहेत.

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस विभागाची रक्तवाहिनी म्हणून एमटीओ विभागाकडे बघितल्या जाते. शहर पोलिस दलात असलेल्या सर्वच वाहनांची नस मोटर परीवहन विभागाच्या हातात असते. मात्र गेल्या काही महिण्यांपासून या विभागात ‘गडबड-गोंधळ’ सुरू झाला आहे. एमटीओ परीसरात शासकीय पेट्रोल पम्प आहे. येथूनच सर्व शासकीय वाहनात पेट्रोल-डिजल भरल्या जाते. त्यामध्ये पॅट्रोलिंग बाईकपासून ते डग्गा वाहनांचा समावेश आहे. 

जाणून घ्या - आधी कापली हाताची नस, रुणालयात जाताना अचानक घेतली उडी अन् घडला थरकाप उडवणारा प्रसंग

एमटीओत काही पोलिस वाहनचालक पदावर कार्यरत आहेत. परंतु ते वाहन चालविण्यासाठी अनफिट असल्याचे सांगून कार्यालयात ‘वजनदार’ पोस्टवर बसून काम करतात. ‘गोंगल’गाय आणि पोटात पाय असलेल्या साहेबांचाही अशा चालक पोलिस कर्मचाऱ्यांना आशिर्वाद आहे. पोलिस ठाण्यासाठी कार्यरत असलेले पोलिस वाहने बिघडलेल्या स्थितीत असतात. तसेच चालक कर्मचारी वाहनांची लॉकबूकही व्यवस्थित मेंटन केल्या जात नाही. हा घोळ सांभाळण्यासाठी एमटीओमध्ये विशेष कर्मचारी नेमण्यात आला आहे. रजिस्टर आणि लॉकबूक व्यवस्थित करण्यासाठी चक्क चिरीमिरी द्यावी लागत असल्यामुळे अनेक वाहनचालक पोलिस कर्मचाऱ्यांनी एमटीओ विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

खासगी वाहनात भरल्या जाते पेट्रोल?

एमटीओतील शासकीय पेट्रोल पम्पावर काही खासगी चारचाकी आणि दुचाकी वाहनात पेट्रोल भरल्या जाते. त्यामुळे केवळ पेट्रोल पम्प वेंडींग मशिनकडे असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आल्याची चर्चा आहे. येथील कर्मचारी डबकीत पेट्रोल काढत असून महिन्याच्या शेवटी एका गॅरेजवर पोलिस वाहन नेऊन नेऊन वाहनाचे रिडींगचे मिटर वाढविण्यासही बाध्य करीत असल्याचे बोलले जाते. 

हेही वाचा - क्रूर नियतीचा खेळ! चिमुकल्यांच्या डोक्यावरून क्षणार्धात हरवलं माय-बापाचं छत्र अन् घडली जीव जाळून टाकणारी घटना 

साहेब...बदली एमटीओतच द्या !

एका पोलिस कर्मचाऱ्याची बदली अन्य ठिकाणी झाली होती. परंतु त्याने ‘साहेब...बदली एमटीओतच द्या’ असा पाढा वाचत अधिकाऱ्यांच्या घराचे उंबरठे झिजवले. त्याला बोगस मेडिकल सर्टीफिकेट जमविण्याची आयडीया देण्यात आली. त्यानुसार तो कर्मचारी आजही एमटीओतील मलाईदार पोस्टवर कार्यरत असल्याची चर्चा आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पोलिस मोटर परिवहन विभागात सावळा गोंधळ; सीसीटीव्ही कॅमेरे बंद; वरिष्ठांचं दुर्लक्ष  नागपूर ः पोलिस मुख्यालयाजवळील मोटर परिवहन विभागात (एमटीओ) मोठा सावळा गोंधळ सुरू आहे. पोलिस कर्मचारीच वाहनांची ॲडजेस्टमेंट म्हणून पोलिसांकडून चिरिमिरी घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वर्षानुवर्षे हाच प्रकार सुरू असून अनेक वाहनचालक पोलिस कर्मचारी या त्रासाला कंटाळले असून याबाबत वॉट्सॲप ग्रूपवर आपली खदखद व्यक्त करीत आहेत. विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस विभागाची रक्तवाहिनी म्हणून एमटीओ विभागाकडे बघितल्या जाते. शहर पोलिस दलात असलेल्या सर्वच वाहनांची नस मोटर परीवहन विभागाच्या हातात असते. मात्र गेल्या काही महिण्यांपासून या विभागात ‘गडबड-गोंधळ’ सुरू झाला आहे. एमटीओ परीसरात शासकीय पेट्रोल पम्प आहे. येथूनच सर्व शासकीय वाहनात पेट्रोल-डिजल भरल्या जाते. त्यामध्ये पॅट्रोलिंग बाईकपासून ते डग्गा वाहनांचा समावेश आहे.  जाणून घ्या - आधी कापली हाताची नस, रुणालयात जाताना अचानक घेतली उडी अन् घडला थरकाप उडवणारा प्रसंग एमटीओत काही पोलिस वाहनचालक पदावर कार्यरत आहेत. परंतु ते वाहन चालविण्यासाठी अनफिट असल्याचे सांगून कार्यालयात ‘वजनदार’ पोस्टवर बसून काम करतात. ‘गोंगल’गाय आणि पोटात पाय असलेल्या साहेबांचाही अशा चालक पोलिस कर्मचाऱ्यांना आशिर्वाद आहे. पोलिस ठाण्यासाठी कार्यरत असलेले पोलिस वाहने बिघडलेल्या स्थितीत असतात. तसेच चालक कर्मचारी वाहनांची लॉकबूकही व्यवस्थित मेंटन केल्या जात नाही. हा घोळ सांभाळण्यासाठी एमटीओमध्ये विशेष कर्मचारी नेमण्यात आला आहे. रजिस्टर आणि लॉकबूक व्यवस्थित करण्यासाठी चक्क चिरीमिरी द्यावी लागत असल्यामुळे अनेक वाहनचालक पोलिस कर्मचाऱ्यांनी एमटीओ विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. खासगी वाहनात भरल्या जाते पेट्रोल? एमटीओतील शासकीय पेट्रोल पम्पावर काही खासगी चारचाकी आणि दुचाकी वाहनात पेट्रोल भरल्या जाते. त्यामुळे केवळ पेट्रोल पम्प वेंडींग मशिनकडे असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आल्याची चर्चा आहे. येथील कर्मचारी डबकीत पेट्रोल काढत असून महिन्याच्या शेवटी एका गॅरेजवर पोलिस वाहन नेऊन नेऊन वाहनाचे रिडींगचे मिटर वाढविण्यासही बाध्य करीत असल्याचे बोलले जाते.  हेही वाचा - क्रूर नियतीचा खेळ! चिमुकल्यांच्या डोक्यावरून क्षणार्धात हरवलं माय-बापाचं छत्र अन् घडली जीव जाळून टाकणारी घटना  साहेब...बदली एमटीओतच द्या ! एका पोलिस कर्मचाऱ्याची बदली अन्य ठिकाणी झाली होती. परंतु त्याने ‘साहेब...बदली एमटीओतच द्या’ असा पाढा वाचत अधिकाऱ्यांच्या घराचे उंबरठे झिजवले. त्याला बोगस मेडिकल सर्टीफिकेट जमविण्याची आयडीया देण्यात आली. त्यानुसार तो कर्मचारी आजही एमटीओतील मलाईदार पोस्टवर कार्यरत असल्याची चर्चा आहे. संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ssWzUW
Read More