Special Report | सायबर पोलिसांनी मुंबईकरांचे 15 कोटी वाचवले; फसवणुकीनंतर "गोल्डन अवर'मध्ये तक्रार आवश्‍यक मुंबई  ः सायबर गुन्हेगार दूरध्वनी करून सामान्यांच्या बॅंक खात्यांवर डल्ला मारत असताना अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी सायबर पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत. त्या अंतर्गत तुम्ही सायबर फसवणुकीला बळी पडल्यानंतर दोन तासांच्या आत सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यास तुमचे पैसे वाचू शकतात. 2020 मध्ये वर्षभरात अशाप्रकारे 15 कोटी रुपये वाचवण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.  सायबर गुन्हेगार सर्वसामान्य व्यक्तींना बोलण्यात गुंतवून त्यांच्या जन्मभराच्या कमाईवर डल्ला मारत आहेत. त्यामुळे लोकांचा हा पैसा वाचवण्यासाठी सहपोलिस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे यांनी सायबर पोलिसांना विशेष उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सायबर पोलिसांनी आरोपींच्या खात्यातील व्यवहार तत्काळ गोठवून गेल्या वर्षभरात मुंबईकरांचे 15 कोटी रुपये वाचवले आहेत. ज्याप्रमाणे रस्ते अपघातामध्ये अपघात झाल्याच्या काही कालावधीमध्ये जखमी व्यक्तीला उपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचू शकतात. त्या कालावधीला "गोल्डन अवर' म्हणतात. तसेच सायबर गुन्ह्यांमध्येही फसवणूक झाल्याच्या दोन तासांमध्ये सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांना हे पैसे वाचवणे शक्‍य होते. 2020 या वर्षभरात एकूण 15 कोटी रुपये वाचवण्यात आले आहेत. ते ई-मेल फिशिंग, ऑनलाईन जॉब फ्रॉड, क्‍लासिफाईड फ्रॉड, केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक, लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावरून ओळख करून फसवणूक, समाजमाध्यमांवरून ओळख करून फसवणूक, ओटीपी फसवणूक तसेच इतर कुठल्याही प्रकारात फसवणूक करण्यात आलेली ही रक्कम आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी ही रक्कम वाचवण्यात आली होती, अशा प्रकरणांमध्ये त्या वेळी गुन्हेही दाखल झाले नव्हते.  मुंबई, रायगड ठाणे परिसरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा दरम्यान, सायबर गुन्ह्यांमध्ये बॅंकेची पडताळणी व अहवाल येईपर्यंत गुन्हा दाखल होण्यातच आठवड्याचा कालावधी जातो. त्याचा फायदा उचलून आरोपी खात्यातील रक्कम काढतात. त्यामुळे सायबर पोलिस प्रथम संबंधित खात्यात गेलेल्या रकमेचा व्यवहार थांबवतात, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.  मुलीच्या लग्नाचे पैसे वाचवले  कुर्ल्यातील फहाद शेख याला केवायसीच्या नावाखाली आठ लाखांचा सायबर गंडा घालण्यात आला होता. त्याने तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर आरोपीच्या खात्यातील ही रक्कम तत्काळ गोठवण्यात आली. त्यामुळे ती आरोपीला काढता आली नाही. फहाद शेख यांनी मुलीच्या लग्नासाठी ही रक्कम जमा केली होती. Cyber ​​police save 15 crore Mumbaikars Complaint required in Golden Hour after fraud -------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे )   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, January 17, 2021

Special Report | सायबर पोलिसांनी मुंबईकरांचे 15 कोटी वाचवले; फसवणुकीनंतर "गोल्डन अवर'मध्ये तक्रार आवश्‍यक मुंबई  ः सायबर गुन्हेगार दूरध्वनी करून सामान्यांच्या बॅंक खात्यांवर डल्ला मारत असताना अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी सायबर पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत. त्या अंतर्गत तुम्ही सायबर फसवणुकीला बळी पडल्यानंतर दोन तासांच्या आत सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यास तुमचे पैसे वाचू शकतात. 2020 मध्ये वर्षभरात अशाप्रकारे 15 कोटी रुपये वाचवण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.  सायबर गुन्हेगार सर्वसामान्य व्यक्तींना बोलण्यात गुंतवून त्यांच्या जन्मभराच्या कमाईवर डल्ला मारत आहेत. त्यामुळे लोकांचा हा पैसा वाचवण्यासाठी सहपोलिस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे यांनी सायबर पोलिसांना विशेष उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सायबर पोलिसांनी आरोपींच्या खात्यातील व्यवहार तत्काळ गोठवून गेल्या वर्षभरात मुंबईकरांचे 15 कोटी रुपये वाचवले आहेत. ज्याप्रमाणे रस्ते अपघातामध्ये अपघात झाल्याच्या काही कालावधीमध्ये जखमी व्यक्तीला उपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचू शकतात. त्या कालावधीला "गोल्डन अवर' म्हणतात. तसेच सायबर गुन्ह्यांमध्येही फसवणूक झाल्याच्या दोन तासांमध्ये सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांना हे पैसे वाचवणे शक्‍य होते. 2020 या वर्षभरात एकूण 15 कोटी रुपये वाचवण्यात आले आहेत. ते ई-मेल फिशिंग, ऑनलाईन जॉब फ्रॉड, क्‍लासिफाईड फ्रॉड, केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक, लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावरून ओळख करून फसवणूक, समाजमाध्यमांवरून ओळख करून फसवणूक, ओटीपी फसवणूक तसेच इतर कुठल्याही प्रकारात फसवणूक करण्यात आलेली ही रक्कम आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी ही रक्कम वाचवण्यात आली होती, अशा प्रकरणांमध्ये त्या वेळी गुन्हेही दाखल झाले नव्हते.  मुंबई, रायगड ठाणे परिसरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा दरम्यान, सायबर गुन्ह्यांमध्ये बॅंकेची पडताळणी व अहवाल येईपर्यंत गुन्हा दाखल होण्यातच आठवड्याचा कालावधी जातो. त्याचा फायदा उचलून आरोपी खात्यातील रक्कम काढतात. त्यामुळे सायबर पोलिस प्रथम संबंधित खात्यात गेलेल्या रकमेचा व्यवहार थांबवतात, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.  मुलीच्या लग्नाचे पैसे वाचवले  कुर्ल्यातील फहाद शेख याला केवायसीच्या नावाखाली आठ लाखांचा सायबर गंडा घालण्यात आला होता. त्याने तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर आरोपीच्या खात्यातील ही रक्कम तत्काळ गोठवण्यात आली. त्यामुळे ती आरोपीला काढता आली नाही. फहाद शेख यांनी मुलीच्या लग्नासाठी ही रक्कम जमा केली होती. Cyber ​​police save 15 crore Mumbaikars Complaint required in Golden Hour after fraud -------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे )   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3nXudyG

No comments:

Post a Comment