कोरोना धास्तीने पर्यटन पुन्हा "डाऊन'  मालवण (सिंधुदुर्ग) - ऐन पर्यटन हंगामात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि शासनाकडून लॉकडाऊन जाहीर होण्याच्या शक्‍यतेने विविध राज्यातून येणाऱ्या पर्यटकांनी येथील पर्यटनाकडे पाठ फिरविली आहे. परिणामी येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली असून पर्यटन व्यावसायिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. एरव्ही पर्यटकांच्या गर्दीने फुलून जाणारी बंदर जेटी, किनारपट्टी सध्या सुनीसुनी बनली आहे.  गतवर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. याचा मोठा फटका विविध व्यवसायांना तसेच जास्त करून पर्यटन व्यवसायाला बसल्याचे दिसून आले. लॉकडाऊनच्या काळात येथील पर्यटन पूर्णतः ठप्प झाले होते. परिणामी पर्यटन व्यावसायिकांना या काळात कर्मचाऱ्यांचे पगार, बॅंकांचे कर्ज, वीज बिल यासारख्या समस्या भेडसावत होत्या. कोरोनाचा प्रसार रोखण्यास प्रशासनास यश मिळाल्यानंतर ऑक्‍टोबर-नोव्हेंबरपासून येथील पर्यटनास काही प्रमाणात सुरवात झाली. वर्षभर आठ महिने घरात बसून कंटाळलेले नागरिक पर्यटनासाठी घराबाहेर पडू लागले. येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने येथील जलपर्यटन व्यवसायासह हॉटेल व्यवसायही हळूहळू पूर्वपदावर येत होते. पर्यटन सुरू झाले तरी शासनाने कोविड-19 च्या पार्श्‍वभूमीवर काही नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार पर्यटन व्यावसायिकांनी या नियमांचे पालन करून आपला व्यवसाय सुरू केला.  गेल्या दोन-तीन महिन्यात विविध राज्यातून येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत होती. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय तेजीत असल्याचे दिसून आले; मात्र ऐन पर्यटन हंगामात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने शासनाकडून लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विविध राज्यातून येथे येणाऱ्या पर्यटकांनी जे आगाऊ आरक्षण केले होते ते रद्द केल्याचे दिसून आले. याचा मोठा फटका पर्यटन व्यावसायिकांना बसला आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे विविध राज्यातून येथील पर्यटनाचा आनंद लुटण्यास येणाऱ्या पर्यटकांनी पाठ फिरविल्याने याचा फटका येथील पर्यटन व्यवसायास बसला आहे. पर्यटकांची संख्या रोडावल्याने पर्यटन व्यवसायावर तसेच यावर अवलंबून असलेल्या हॉटेल तसेच अन्य छोट्या, मोठ्या व्यवसायांवरही परिणाम झाल्याचे चित्र आहे.  लॉकडाऊनच्या काळात पर्यटन व्यवसाय ठप्प होता. परिणामी बॅंकांचे कर्ज, कर्मचाऱ्यांचे पगार, वीज बिल यासारख्या समस्यांना व्यावसायिकांना सामोरे जावे लागले. पर्यटन व्यावसायिकांकडून वीज बिले माफ करण्याची शासनाकडे विनंती करण्यात आली; मात्र वीज बिले माफ न झाल्याने तसेच यात सूटही न मिळाल्याने अनेक पर्यटन व्यावसायिकांना वीज बिले भरावी लागली. यात काही व्यावसायिकांचा वीज बिले न भरल्याने महावितरणकडून वीजपुरवठा खंडितही करण्यात आला. हळूहळू पर्यटन व्यवसाय बहरत असताना आता पुन्हा ऐन पर्यटन हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पर्यटकांनी येथील पर्यटनाकडे पाठ फिरविल्याने पर्यटन व्यावसायिकांच्या चिंतेत मोठी वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे. पुन्हा लॉकडाऊन झाल्यास कर्मचाऱ्यांचे पगार, बॅंकांची कर्जे, वीज बिल भरायचे कसे? असा प्रश्‍न पर्यटन व्यावसायिकांना पडला आहे.  कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर येथील किल्ले सिंधुदुर्गबरोबरच येथील जलपर्यटनाचा आनंद लुटण्यास राज्याच्या विविध भागातून तसेच अन्य राज्यातून येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत होते; मात्र गेल्या काही दिवसात राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरवात झाल्यानंतर येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या फारच कमी झाली आहे. तारकर्ली, देवबाग, वायरी भुतनाथ, किल्ले सिंधुदुर्ग याठिकाणी पर्यटकांची होणारी गर्दी कमी झाली असून बंदर जेटीसह, किनारपट्टी भाग सुनासुना झाला आहे. सध्या येथे काही किरकोळ पर्यटक दाखल झाले असले तरी त्यांच्याकडून खर्च करताना हात आखडता घेतला जात आहे. जेवणावळीसह स्वस्त दरात राहण्याच्या सुविधा कशी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न होत असल्याने त्याचा फटका निवास व्यवस्थेलाही बसला आहे. येथे येणारे पर्यटक हे किल्ले सिंधुदुर्गला मोठ्या प्रमाणात भेट देतात; मात्र गेल्या काही दिवसात पर्यटकांची संख्या रोडावल्याने याचा फटका किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवेसही बसला आहे. एरव्ही दिवसात सुमारे 50 हून अधिक फेऱ्या किल्ल्यावर होत्या; मात्र आजच्या दिवशी सायंकाळपर्यत केवळ चारच होड्या किल्ल्यावर सोडण्यात आल्याचे दिसून आले.  रॉकगार्डनमध्ये रात्री आठनंतर बंदी  येथील रॉकगार्डन पर्यटकांचे खास आकर्षण आहे. हंगामात रॉकगार्डनला हजारोंच्या संख्येने राज्यभरातील पर्यटक भेटी देतात. रॉकगार्डनमधील म्युझिकल फाउंटन हे पर्यटकांचे खास आकर्षण बनले आहे; मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच जिल्ह्यात लागू केलेली जमावबंदीच्या पार्श्‍वभूमीवर येथील रॉकगार्डन पर्यटकांसाठी रात्री आठनंतर बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. परिणामी याचा फटका स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना बसल्याचे दिसून येत आहे.  पुन्हा कोरोनाचा प्रसार  कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ऑक्‍टोबर, नोव्हेंबरपासून येथील पर्यटन सुरू झाले. शासनाने जी नियमावली घातली होती. त्यानुसार पर्यटन व्यावसायिकांनी आवश्‍यक ती खबरदारी घेत पर्यटन व्यवसाय सुरू केला. गेल्या तीन महिन्यात बऱ्यापैकी पर्यटन बहरत होते. पर्यटन व्यवसाय आता उभारी घेईल अशी चिन्हे निर्माण झाली असताना ऐन पर्यटन हंगामात पुन्हा कोरोनाचा प्रसार राज्यभरात वाढू लागला आहे, अशी खंत मिठबावकर यांनी व्यक्त केली.  शासनाकडून लॉकडाउन जाहीर होण्याची शक्‍यता वर्तवल्याने आगाऊ बुकींग केलेल्या पर्यटकांनी आपले बुकींग रद्द केले. परिणामी याचा फटका पर्यटन व्यावसायिकांना बसला. आपल्याकडे स्थानिक पर्यटकांपेक्षा राज्यभरातून तसेच अन्य विविध राज्यातून येथे पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यास येतात; मात्र लॉकडाउनच्या शक्‍यतेने पर्यटकांनी पूर्णतः पाठ फिरविली आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे.  - मिथिलेश मिठबावकर, पर्यटन व्यावसायिक  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, April 2, 2021

कोरोना धास्तीने पर्यटन पुन्हा "डाऊन'  मालवण (सिंधुदुर्ग) - ऐन पर्यटन हंगामात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि शासनाकडून लॉकडाऊन जाहीर होण्याच्या शक्‍यतेने विविध राज्यातून येणाऱ्या पर्यटकांनी येथील पर्यटनाकडे पाठ फिरविली आहे. परिणामी येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली असून पर्यटन व्यावसायिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. एरव्ही पर्यटकांच्या गर्दीने फुलून जाणारी बंदर जेटी, किनारपट्टी सध्या सुनीसुनी बनली आहे.  गतवर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. याचा मोठा फटका विविध व्यवसायांना तसेच जास्त करून पर्यटन व्यवसायाला बसल्याचे दिसून आले. लॉकडाऊनच्या काळात येथील पर्यटन पूर्णतः ठप्प झाले होते. परिणामी पर्यटन व्यावसायिकांना या काळात कर्मचाऱ्यांचे पगार, बॅंकांचे कर्ज, वीज बिल यासारख्या समस्या भेडसावत होत्या. कोरोनाचा प्रसार रोखण्यास प्रशासनास यश मिळाल्यानंतर ऑक्‍टोबर-नोव्हेंबरपासून येथील पर्यटनास काही प्रमाणात सुरवात झाली. वर्षभर आठ महिने घरात बसून कंटाळलेले नागरिक पर्यटनासाठी घराबाहेर पडू लागले. येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने येथील जलपर्यटन व्यवसायासह हॉटेल व्यवसायही हळूहळू पूर्वपदावर येत होते. पर्यटन सुरू झाले तरी शासनाने कोविड-19 च्या पार्श्‍वभूमीवर काही नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार पर्यटन व्यावसायिकांनी या नियमांचे पालन करून आपला व्यवसाय सुरू केला.  गेल्या दोन-तीन महिन्यात विविध राज्यातून येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत होती. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय तेजीत असल्याचे दिसून आले; मात्र ऐन पर्यटन हंगामात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने शासनाकडून लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विविध राज्यातून येथे येणाऱ्या पर्यटकांनी जे आगाऊ आरक्षण केले होते ते रद्द केल्याचे दिसून आले. याचा मोठा फटका पर्यटन व्यावसायिकांना बसला आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे विविध राज्यातून येथील पर्यटनाचा आनंद लुटण्यास येणाऱ्या पर्यटकांनी पाठ फिरविल्याने याचा फटका येथील पर्यटन व्यवसायास बसला आहे. पर्यटकांची संख्या रोडावल्याने पर्यटन व्यवसायावर तसेच यावर अवलंबून असलेल्या हॉटेल तसेच अन्य छोट्या, मोठ्या व्यवसायांवरही परिणाम झाल्याचे चित्र आहे.  लॉकडाऊनच्या काळात पर्यटन व्यवसाय ठप्प होता. परिणामी बॅंकांचे कर्ज, कर्मचाऱ्यांचे पगार, वीज बिल यासारख्या समस्यांना व्यावसायिकांना सामोरे जावे लागले. पर्यटन व्यावसायिकांकडून वीज बिले माफ करण्याची शासनाकडे विनंती करण्यात आली; मात्र वीज बिले माफ न झाल्याने तसेच यात सूटही न मिळाल्याने अनेक पर्यटन व्यावसायिकांना वीज बिले भरावी लागली. यात काही व्यावसायिकांचा वीज बिले न भरल्याने महावितरणकडून वीजपुरवठा खंडितही करण्यात आला. हळूहळू पर्यटन व्यवसाय बहरत असताना आता पुन्हा ऐन पर्यटन हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पर्यटकांनी येथील पर्यटनाकडे पाठ फिरविल्याने पर्यटन व्यावसायिकांच्या चिंतेत मोठी वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे. पुन्हा लॉकडाऊन झाल्यास कर्मचाऱ्यांचे पगार, बॅंकांची कर्जे, वीज बिल भरायचे कसे? असा प्रश्‍न पर्यटन व्यावसायिकांना पडला आहे.  कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर येथील किल्ले सिंधुदुर्गबरोबरच येथील जलपर्यटनाचा आनंद लुटण्यास राज्याच्या विविध भागातून तसेच अन्य राज्यातून येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत होते; मात्र गेल्या काही दिवसात राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरवात झाल्यानंतर येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या फारच कमी झाली आहे. तारकर्ली, देवबाग, वायरी भुतनाथ, किल्ले सिंधुदुर्ग याठिकाणी पर्यटकांची होणारी गर्दी कमी झाली असून बंदर जेटीसह, किनारपट्टी भाग सुनासुना झाला आहे. सध्या येथे काही किरकोळ पर्यटक दाखल झाले असले तरी त्यांच्याकडून खर्च करताना हात आखडता घेतला जात आहे. जेवणावळीसह स्वस्त दरात राहण्याच्या सुविधा कशी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न होत असल्याने त्याचा फटका निवास व्यवस्थेलाही बसला आहे. येथे येणारे पर्यटक हे किल्ले सिंधुदुर्गला मोठ्या प्रमाणात भेट देतात; मात्र गेल्या काही दिवसात पर्यटकांची संख्या रोडावल्याने याचा फटका किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवेसही बसला आहे. एरव्ही दिवसात सुमारे 50 हून अधिक फेऱ्या किल्ल्यावर होत्या; मात्र आजच्या दिवशी सायंकाळपर्यत केवळ चारच होड्या किल्ल्यावर सोडण्यात आल्याचे दिसून आले.  रॉकगार्डनमध्ये रात्री आठनंतर बंदी  येथील रॉकगार्डन पर्यटकांचे खास आकर्षण आहे. हंगामात रॉकगार्डनला हजारोंच्या संख्येने राज्यभरातील पर्यटक भेटी देतात. रॉकगार्डनमधील म्युझिकल फाउंटन हे पर्यटकांचे खास आकर्षण बनले आहे; मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच जिल्ह्यात लागू केलेली जमावबंदीच्या पार्श्‍वभूमीवर येथील रॉकगार्डन पर्यटकांसाठी रात्री आठनंतर बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. परिणामी याचा फटका स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना बसल्याचे दिसून येत आहे.  पुन्हा कोरोनाचा प्रसार  कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ऑक्‍टोबर, नोव्हेंबरपासून येथील पर्यटन सुरू झाले. शासनाने जी नियमावली घातली होती. त्यानुसार पर्यटन व्यावसायिकांनी आवश्‍यक ती खबरदारी घेत पर्यटन व्यवसाय सुरू केला. गेल्या तीन महिन्यात बऱ्यापैकी पर्यटन बहरत होते. पर्यटन व्यवसाय आता उभारी घेईल अशी चिन्हे निर्माण झाली असताना ऐन पर्यटन हंगामात पुन्हा कोरोनाचा प्रसार राज्यभरात वाढू लागला आहे, अशी खंत मिठबावकर यांनी व्यक्त केली.  शासनाकडून लॉकडाउन जाहीर होण्याची शक्‍यता वर्तवल्याने आगाऊ बुकींग केलेल्या पर्यटकांनी आपले बुकींग रद्द केले. परिणामी याचा फटका पर्यटन व्यावसायिकांना बसला. आपल्याकडे स्थानिक पर्यटकांपेक्षा राज्यभरातून तसेच अन्य विविध राज्यातून येथे पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यास येतात; मात्र लॉकडाउनच्या शक्‍यतेने पर्यटकांनी पूर्णतः पाठ फिरविली आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे.  - मिथिलेश मिठबावकर, पर्यटन व्यावसायिक  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3uftfBu

No comments:

Post a Comment