`रोजगार हमी`त पुन्हा सिंधुदुर्गची आघाडी  ओरोस (सिंधुदुर्ग) - दरवर्षीप्रमाणे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये उद्दीष्टपूर्तीच्या पुढे जावून काम केले आहे. तब्बल 12 कोटी 8 लाख 31 हजार रुपये एवढा निधी खर्च करण्यात आला आहे. 101.26 टक्के खर्च झाला आहे. तर 3 लाख 46 हजार एवढे मनुष्य बळाची निर्मिती करण्यात आली आहे. 106.07 टक्के खर्च करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळाले असून रोजंदारी उपलब्ध झाली आहे.  देशातील ग्रामीण जनतेला रोजंदारीवर मंजूरी मिळावी, यासाठी केंद्राने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरु केलेली आहे. या योजनेत 60 टक्के खर्च मंजूरीवर तर 40 टक्के खर्च साहीत्यावर केला जातो. योजनेंतर्गत मंजूरीसाठी नोंदणी करून जॉबकार्ड घेणाऱ्या व्यक्तीला नियमित रोजगार देण्याचे उद्दीष्ट या योजनेचे आहे. "मागेल त्याचा हाताला काम' हे ब्रीदवाक्‍य घेवून ही योजना राबविली जाते. जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तर महसुल अंतर्गत राज्य कृषी, सामाजिक वनीकरण, लघु पाटबंधारे यांच्यावतीने ही योजना राबविली जाते. सिंधुदुर्गात योजनेंतर्गत नवीन रस्ता पळीव, वैयक्तीक शेत विहीर, फळबाग लागवड, बाबू लागवड, रस्ते गटार, गांडूळखत, गुरे-शेळी गोठे बांधकाम, कुक्कुट पक्षी शेड, तलाव-विहीर गाळ काढणे, प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांच्या पाया खोदाई आदी कामे या योजनेतून घेतली जातात. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला 2020-21 या आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेंतर्गत 11 कोटी 93 लाख 30 हजार रुपये खर्चाचे उद्दीष्ट होते. जिल्हा परिषदेने 12 कोटी 8 लाख 31 हजार रुपये खर्च केला आहे. मनुष्यदिन निर्मितीसाठी 3 लाख 28 हजार एवढे उद्दिष्ट होते. जिल्हा परिषदेने 3 लाख 46 हजार एवढे मनुष्य दिन निर्मिती केली आहे. यात कुडाळ व मालवण पंचायत समितीने सर्वात वरचढ काम केले आहे. कुडाळ पंचायत समितीला 2 कोटी 16 लाख 34 हजार रुपये खर्चाचे उद्दिष्ट होते. 2 कोटी 60 लाख 87 हजार रुपये एवढा खर्च केला आहे. 60 हजार मनुष्यदिन निर्मितीचे उद्दिष्ट असताना 76 हजार एवढी मनुष्यदिन निर्मिती करण्यात आली आहे. मालवण पंचायत समितिला 2 कोटी 50 लाख 59 हजार एवढ्या खर्चाचे उद्दिष्ट होते. 2 कोटी 94 लाख 40 हजार रुपये एवढा खर्च केला आहे. मनुष्यदिन निर्मितीसाठी 69 हजार उद्दीष्ट असताना 73 हजार एवढे मनुष्यदिन निर्मिती करण्यात आली आहे.  देवगड तालुक्‍यासाठी 2 कोटी 13 लाख 59 हजार खर्चाचे उद्दिष्ट होते. 2 कोटी 1 लाख 63 हजार एवढा खर्च झाला आहे. मनुष्यदिन निर्मितीचे 59 हजार उद्दीष्ट असताना 64 हजार एवढी मनुष्यदिन निर्मिती करण्यात आली आहे. दोडामार्ग तालुक्‍याला 52 लाख 14 हजार रुपये खर्चाचे उद्दीष्ट असताना 55 लाख 54 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. 15 हजार मनुष्यदिन निर्मितीचे उद्दीष्ट असताना 16 हजार एवढी मनुष्यदिन निर्मिती करण्यात आली आहे.  गतवर्षी जिल्हा परिषदेचा खर्च 121 टक्के  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत 2019-20 या आर्थिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने मनुष्यादिन निर्मितीत 121.55 टक्के काम केले आहे. यात मालवण पंचायत समितीने सर्वाधिक 158.01 टक्के काम करीत आघाडी घेतली होती. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शासनाने जिल्हा परिषदेला मनुष्यदिन निर्मितीसाठी 3 लाख 34 हजार एवढे उद्दिष्ट दिले होते. आर्थिक खर्चासाठी 11 कोटी 99 लाख 49 हजार रुपये एवढे उद्दीष्ट दिले होते. जिल्हा परिषदेने आर्थिक वर्षात 4 लाख 7 हजार एवढे मनुष्यबळ निर्मिती करीत उद्दिष्टाच्या 121.55 टक्के काम केले आहे. तर 11 कोटी 26 लाख 54 हजार रूपये खर्च करीत उद्दीष्टाच्या 93.92 टक्के एवढे साध्य केले होते. यावर्षीही उद्दीष्टाच्या जास्त काम करीत जिल्हा परिषदेने सातत्य राखले आहे.  जिल्हा परिषद अंतर्गत आठ पंचायत समिती, 429 ग्रामपंचायती आहेत. यामध्ये सर्व कार्यरत यंत्रणेने चांगले काम केले आहे. त्यामुळे 100 टक्के उद्दीष्टाच्या पुढे जावून साध्य करता आले.  - विनायक ठाकुर, सहाय्यक गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद रोजगार हमी कक्ष.  2020-21 चे आर्थिक उद्दिष्ट व साध्य (लाखात)  *तालुका*एकूण लेबर बजेट खर्च*साध्य  *देवगड*213.59*201.63  *दोडामार्ग*52.14. *55.54  *कणकवली*207.60*169.38  *कुडाळ*216.34*260.87  *मालवण*250.59*294.40  *सावंतवाडी*128.33*119.93  *वैभववाडी*53.39*50.50  *वेंगुर्ले*71.33*56.05  *एकूण*1193.30*1208.31  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, April 2, 2021

`रोजगार हमी`त पुन्हा सिंधुदुर्गची आघाडी  ओरोस (सिंधुदुर्ग) - दरवर्षीप्रमाणे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये उद्दीष्टपूर्तीच्या पुढे जावून काम केले आहे. तब्बल 12 कोटी 8 लाख 31 हजार रुपये एवढा निधी खर्च करण्यात आला आहे. 101.26 टक्के खर्च झाला आहे. तर 3 लाख 46 हजार एवढे मनुष्य बळाची निर्मिती करण्यात आली आहे. 106.07 टक्के खर्च करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळाले असून रोजंदारी उपलब्ध झाली आहे.  देशातील ग्रामीण जनतेला रोजंदारीवर मंजूरी मिळावी, यासाठी केंद्राने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरु केलेली आहे. या योजनेत 60 टक्के खर्च मंजूरीवर तर 40 टक्के खर्च साहीत्यावर केला जातो. योजनेंतर्गत मंजूरीसाठी नोंदणी करून जॉबकार्ड घेणाऱ्या व्यक्तीला नियमित रोजगार देण्याचे उद्दीष्ट या योजनेचे आहे. "मागेल त्याचा हाताला काम' हे ब्रीदवाक्‍य घेवून ही योजना राबविली जाते. जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तर महसुल अंतर्गत राज्य कृषी, सामाजिक वनीकरण, लघु पाटबंधारे यांच्यावतीने ही योजना राबविली जाते. सिंधुदुर्गात योजनेंतर्गत नवीन रस्ता पळीव, वैयक्तीक शेत विहीर, फळबाग लागवड, बाबू लागवड, रस्ते गटार, गांडूळखत, गुरे-शेळी गोठे बांधकाम, कुक्कुट पक्षी शेड, तलाव-विहीर गाळ काढणे, प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांच्या पाया खोदाई आदी कामे या योजनेतून घेतली जातात. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला 2020-21 या आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेंतर्गत 11 कोटी 93 लाख 30 हजार रुपये खर्चाचे उद्दीष्ट होते. जिल्हा परिषदेने 12 कोटी 8 लाख 31 हजार रुपये खर्च केला आहे. मनुष्यदिन निर्मितीसाठी 3 लाख 28 हजार एवढे उद्दिष्ट होते. जिल्हा परिषदेने 3 लाख 46 हजार एवढे मनुष्य दिन निर्मिती केली आहे. यात कुडाळ व मालवण पंचायत समितीने सर्वात वरचढ काम केले आहे. कुडाळ पंचायत समितीला 2 कोटी 16 लाख 34 हजार रुपये खर्चाचे उद्दिष्ट होते. 2 कोटी 60 लाख 87 हजार रुपये एवढा खर्च केला आहे. 60 हजार मनुष्यदिन निर्मितीचे उद्दिष्ट असताना 76 हजार एवढी मनुष्यदिन निर्मिती करण्यात आली आहे. मालवण पंचायत समितिला 2 कोटी 50 लाख 59 हजार एवढ्या खर्चाचे उद्दिष्ट होते. 2 कोटी 94 लाख 40 हजार रुपये एवढा खर्च केला आहे. मनुष्यदिन निर्मितीसाठी 69 हजार उद्दीष्ट असताना 73 हजार एवढे मनुष्यदिन निर्मिती करण्यात आली आहे.  देवगड तालुक्‍यासाठी 2 कोटी 13 लाख 59 हजार खर्चाचे उद्दिष्ट होते. 2 कोटी 1 लाख 63 हजार एवढा खर्च झाला आहे. मनुष्यदिन निर्मितीचे 59 हजार उद्दीष्ट असताना 64 हजार एवढी मनुष्यदिन निर्मिती करण्यात आली आहे. दोडामार्ग तालुक्‍याला 52 लाख 14 हजार रुपये खर्चाचे उद्दीष्ट असताना 55 लाख 54 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. 15 हजार मनुष्यदिन निर्मितीचे उद्दीष्ट असताना 16 हजार एवढी मनुष्यदिन निर्मिती करण्यात आली आहे.  गतवर्षी जिल्हा परिषदेचा खर्च 121 टक्के  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत 2019-20 या आर्थिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने मनुष्यादिन निर्मितीत 121.55 टक्के काम केले आहे. यात मालवण पंचायत समितीने सर्वाधिक 158.01 टक्के काम करीत आघाडी घेतली होती. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शासनाने जिल्हा परिषदेला मनुष्यदिन निर्मितीसाठी 3 लाख 34 हजार एवढे उद्दिष्ट दिले होते. आर्थिक खर्चासाठी 11 कोटी 99 लाख 49 हजार रुपये एवढे उद्दीष्ट दिले होते. जिल्हा परिषदेने आर्थिक वर्षात 4 लाख 7 हजार एवढे मनुष्यबळ निर्मिती करीत उद्दिष्टाच्या 121.55 टक्के काम केले आहे. तर 11 कोटी 26 लाख 54 हजार रूपये खर्च करीत उद्दीष्टाच्या 93.92 टक्के एवढे साध्य केले होते. यावर्षीही उद्दीष्टाच्या जास्त काम करीत जिल्हा परिषदेने सातत्य राखले आहे.  जिल्हा परिषद अंतर्गत आठ पंचायत समिती, 429 ग्रामपंचायती आहेत. यामध्ये सर्व कार्यरत यंत्रणेने चांगले काम केले आहे. त्यामुळे 100 टक्के उद्दीष्टाच्या पुढे जावून साध्य करता आले.  - विनायक ठाकुर, सहाय्यक गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद रोजगार हमी कक्ष.  2020-21 चे आर्थिक उद्दिष्ट व साध्य (लाखात)  *तालुका*एकूण लेबर बजेट खर्च*साध्य  *देवगड*213.59*201.63  *दोडामार्ग*52.14. *55.54  *कणकवली*207.60*169.38  *कुडाळ*216.34*260.87  *मालवण*250.59*294.40  *सावंतवाडी*128.33*119.93  *वैभववाडी*53.39*50.50  *वेंगुर्ले*71.33*56.05  *एकूण*1193.30*1208.31  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2OfMqvw

No comments:

Post a Comment