ढिंग टांग - थेंबभर आभाळ! देहाच्या कटाहात उकळणाऱ्या रुधिराचा चटका सहन करत युगंधराने मिटून घेतले डोळे. युगांतापूर्वीचा काळोख दाटून आला रंध्रारंध्रात. डाव्या पायातून उफाळलेली अतितीव्र वेदना स्वीकारत त्याने व्याधाच्या विषाक्त बाणाने विंधलेल्या आपल्या पदाकडे पाहिले किलकिल्या डोळ्याने. अवताराचा अंत जवळ आल्याची संवेदना दाणकन येऊन आदळली जाणीवेच्या खडकावर. तेवढ्यात- रथातून उतरुन धावत आलेल्या उद्धवाने घाईघाईने गाठले त्याला. म्हणाला : बंधो, मी रुग्णरथ घेऊनच आलो आहे, त्वरित राजवैद्यांकडे निघावे, हे बरे!’’ उजव्या हाताने त्याला थांबवत क्षीण स्वरामध्ये उद्गारला युगंधर: नको रे उद्धवा, समोरच्या तडागातील हंस पाहिलास? स्थलांतराचा समय झाला की, तो पाण्यातून थेट आभाळात झेप घेतो, त्याच्या पंखांना पाण्याचा थेंब काही लागत नाही... जीवनातून प्रस्थान ठेवताना, आपणही असेच असावे...नाही का?’’ उद्धवाला भडभडून आले. ‘‘राधाधरा, असं का म्हणतोस? तू आणि मी विलग का आहोत? वृंदावनी तर मला तुझेच प्रतिरुप समजत असत. कंसवधानंतर तुझी पाठीवर थाप मारणारा पहिला मीच होतो... तुझ्या गोपिकांना समजावताना स्वत:च कृष्णभक्तीत रमलेला तो मीच! द्वारकेचे सोन्याचे कळस उभे राहिले, तेव्हाही मीच पर्यवेक्षक होतो. पांडवांच्या पक्षात ठामपणे उभा राहिलेला वासुदेव कृष्ण सर्वात जवळून मीच पाहिला. भारतीय युद्धाचे समालोचन करणाऱ्या संजयापेक्षा माझे अवलोकन अधिक सूक्ष्म होते, हे तूदेखील जाणतोस... आता एकमेकांच्या उरावर बसून विकारांच्या प्रस्फोटात अवघे यादवकुल आणि तुझी द्वारका उद्धवस्ताच्या उंबरठ्यावर उभी असताना, तू प्रस्थानाची भाषा करतोस? निर्मिती आणि विनाशाशी तुझा थेंबभरही संबंध नाही का, वासुदेवा?’’ नकारार्थी मान हलवत युगंधराने केले फक्त एक स्मित. तळ्यातील कलहंसांचा थवा तत्क्षणी उडाला, आणि त्यांच्या पंखावरले अखेरचे थेंब उद्धवाच्या अंगावर उडाले. तो गदगदून रडू लागला... Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 21, 2021

ढिंग टांग - थेंबभर आभाळ! देहाच्या कटाहात उकळणाऱ्या रुधिराचा चटका सहन करत युगंधराने मिटून घेतले डोळे. युगांतापूर्वीचा काळोख दाटून आला रंध्रारंध्रात. डाव्या पायातून उफाळलेली अतितीव्र वेदना स्वीकारत त्याने व्याधाच्या विषाक्त बाणाने विंधलेल्या आपल्या पदाकडे पाहिले किलकिल्या डोळ्याने. अवताराचा अंत जवळ आल्याची संवेदना दाणकन येऊन आदळली जाणीवेच्या खडकावर. तेवढ्यात- रथातून उतरुन धावत आलेल्या उद्धवाने घाईघाईने गाठले त्याला. म्हणाला : बंधो, मी रुग्णरथ घेऊनच आलो आहे, त्वरित राजवैद्यांकडे निघावे, हे बरे!’’ उजव्या हाताने त्याला थांबवत क्षीण स्वरामध्ये उद्गारला युगंधर: नको रे उद्धवा, समोरच्या तडागातील हंस पाहिलास? स्थलांतराचा समय झाला की, तो पाण्यातून थेट आभाळात झेप घेतो, त्याच्या पंखांना पाण्याचा थेंब काही लागत नाही... जीवनातून प्रस्थान ठेवताना, आपणही असेच असावे...नाही का?’’ उद्धवाला भडभडून आले. ‘‘राधाधरा, असं का म्हणतोस? तू आणि मी विलग का आहोत? वृंदावनी तर मला तुझेच प्रतिरुप समजत असत. कंसवधानंतर तुझी पाठीवर थाप मारणारा पहिला मीच होतो... तुझ्या गोपिकांना समजावताना स्वत:च कृष्णभक्तीत रमलेला तो मीच! द्वारकेचे सोन्याचे कळस उभे राहिले, तेव्हाही मीच पर्यवेक्षक होतो. पांडवांच्या पक्षात ठामपणे उभा राहिलेला वासुदेव कृष्ण सर्वात जवळून मीच पाहिला. भारतीय युद्धाचे समालोचन करणाऱ्या संजयापेक्षा माझे अवलोकन अधिक सूक्ष्म होते, हे तूदेखील जाणतोस... आता एकमेकांच्या उरावर बसून विकारांच्या प्रस्फोटात अवघे यादवकुल आणि तुझी द्वारका उद्धवस्ताच्या उंबरठ्यावर उभी असताना, तू प्रस्थानाची भाषा करतोस? निर्मिती आणि विनाशाशी तुझा थेंबभरही संबंध नाही का, वासुदेवा?’’ नकारार्थी मान हलवत युगंधराने केले फक्त एक स्मित. तळ्यातील कलहंसांचा थवा तत्क्षणी उडाला, आणि त्यांच्या पंखावरले अखेरचे थेंब उद्धवाच्या अंगावर उडाले. तो गदगदून रडू लागला... Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3c86l8N

No comments:

Post a Comment