अवैध मासेमारीविरूद्ध लवकरच कायदा ः शेख  मालवण (सिंधुदुर्ग) - राज्याच्या समुद्र किनाऱ्यावरील एलईडीद्वारे तसेच अवैध पर्ससीन नेटद्वारे व हायस्पीड बोटीद्वारे चालणाऱ्या मासेमारीविरुद्ध कारवाईसाठी राज्यशासन येत्या काही काळात कडक कायदा आणणार आहे. अशा अवैध मासेमारांविरुद्ध मोठ्या दंडात्मक कारवाईची यामध्ये तरतूद असेल. हा कायदा येईपर्यंत अशा घटनांवर तातडीने कडक कारवाई करण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती मत्स्यव्यवसाय, बंदर विकास मंत्री अस्लम शेख यांनी आज दिली. पर्ससीन नेटविरुद्ध पारंपरिक मच्छीमारांचे सुरू असलेले उपोषण थांबविण्याचे आवाहनही शेख यांनी केले.  दापोली, मंडणगड, गुहागर मच्छीमार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने श्री. शेख यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी श्री. शेख बोलत होते. यावेळी आमदार योगेश कदम, मत्स्य व्यवसाय विकास आयुक्त अतुल पाटणे यांच्यासह शिष्टमंडळातील बाळकृष्ण पावसे, प्रकाश रघुवीर, गोपीचंद चौगले, विष्णू ताबीब, सोमनाथ पावसे, गणेश घोगले, हरेश्वर कुलाबकर, यशवंत खोपटकर आदी उपस्थित होते. श्री. शेख म्हणाले, ""राज्याच्या समुद्र किनाऱ्यावर होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी राज्य शासन कडक कायदा करत आहे. येत्या काही काळातच हा कायदा लागू होईल. या कायद्यामध्ये अवैध पर्ससीन नेट, एलईडीद्वारे मासेमारी करणे तसेच हायस्पिड बोटींचा वापर करून मासेमारी करणे आदींविरुद्ध मोठ्या दंडात्मक कारवाईची तरतूद केली आहे. यामुळे अशा अवैध मासेमारींना आळा बसेल. तोपर्यंत सध्या अशा बोटींविरुद्ध कडक कारवाई करावी. या कारवाईसाठी विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पीड बोट देण्यात येईल. अवैध मासेमारीविरुद्ध कारवाईसाठी कोस्ट गार्डसह पोलीस व महसूल यंत्रणाबरोबर बैठक घेण्यात येईल.''  मत्स्य व्यवसाय आयुक्त पाटणे म्हणाले, ""अवैध मासेमारीविरुद्ध कारवाई सुरू आहे. इतर राज्यातून आलेल्या बोटींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीसांशी चर्चा झाली असून कारवाई सुरू करण्यात आली आहे. यासाठी अंमलबजावणी कक्ष सुरू करण्यात येणार आहे.''  कोकण किनारपट्टीवर तीन लॅडिंग पॉईंट  आमदार रमेश पाटील व चेतन पाटील यांच्या शिष्टमंडळानेही शेख यांची भेट घेतली. अवैध मासेमारी विरुद्ध कारवाई, सागरी किनाऱ्यावर जेट्टी, मासे उतरविण्यासाठी जागा उभारण्याची त्यांनी मागणी केली. त्यावर शेख म्हणाले, ""सागरी किनाऱ्यावरील जेट्टी, मासे उतरविण्याच्या जागा विकसित करणे, शीतगृह (कोल्ड स्टोअरेज) उभारणे आदी कामे सुरू करण्यात येत आहे. येत्या दोन ते तीन वर्षात ही कामे वेगाने पूर्ण होतील. कोकण किनारपट्टीवर येत्या काही काळात तीन मोठे लॅडिंग पॉईंट उभारण्यात येणार आहेत. समुद्र किनाऱ्यावरील गाळ काढण्यासाठी विशेष तरतूद करण्याचे निर्देशही दिले आहेत.''    संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 26, 2021

अवैध मासेमारीविरूद्ध लवकरच कायदा ः शेख  मालवण (सिंधुदुर्ग) - राज्याच्या समुद्र किनाऱ्यावरील एलईडीद्वारे तसेच अवैध पर्ससीन नेटद्वारे व हायस्पीड बोटीद्वारे चालणाऱ्या मासेमारीविरुद्ध कारवाईसाठी राज्यशासन येत्या काही काळात कडक कायदा आणणार आहे. अशा अवैध मासेमारांविरुद्ध मोठ्या दंडात्मक कारवाईची यामध्ये तरतूद असेल. हा कायदा येईपर्यंत अशा घटनांवर तातडीने कडक कारवाई करण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती मत्स्यव्यवसाय, बंदर विकास मंत्री अस्लम शेख यांनी आज दिली. पर्ससीन नेटविरुद्ध पारंपरिक मच्छीमारांचे सुरू असलेले उपोषण थांबविण्याचे आवाहनही शेख यांनी केले.  दापोली, मंडणगड, गुहागर मच्छीमार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने श्री. शेख यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी श्री. शेख बोलत होते. यावेळी आमदार योगेश कदम, मत्स्य व्यवसाय विकास आयुक्त अतुल पाटणे यांच्यासह शिष्टमंडळातील बाळकृष्ण पावसे, प्रकाश रघुवीर, गोपीचंद चौगले, विष्णू ताबीब, सोमनाथ पावसे, गणेश घोगले, हरेश्वर कुलाबकर, यशवंत खोपटकर आदी उपस्थित होते. श्री. शेख म्हणाले, ""राज्याच्या समुद्र किनाऱ्यावर होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी राज्य शासन कडक कायदा करत आहे. येत्या काही काळातच हा कायदा लागू होईल. या कायद्यामध्ये अवैध पर्ससीन नेट, एलईडीद्वारे मासेमारी करणे तसेच हायस्पिड बोटींचा वापर करून मासेमारी करणे आदींविरुद्ध मोठ्या दंडात्मक कारवाईची तरतूद केली आहे. यामुळे अशा अवैध मासेमारींना आळा बसेल. तोपर्यंत सध्या अशा बोटींविरुद्ध कडक कारवाई करावी. या कारवाईसाठी विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पीड बोट देण्यात येईल. अवैध मासेमारीविरुद्ध कारवाईसाठी कोस्ट गार्डसह पोलीस व महसूल यंत्रणाबरोबर बैठक घेण्यात येईल.''  मत्स्य व्यवसाय आयुक्त पाटणे म्हणाले, ""अवैध मासेमारीविरुद्ध कारवाई सुरू आहे. इतर राज्यातून आलेल्या बोटींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीसांशी चर्चा झाली असून कारवाई सुरू करण्यात आली आहे. यासाठी अंमलबजावणी कक्ष सुरू करण्यात येणार आहे.''  कोकण किनारपट्टीवर तीन लॅडिंग पॉईंट  आमदार रमेश पाटील व चेतन पाटील यांच्या शिष्टमंडळानेही शेख यांची भेट घेतली. अवैध मासेमारी विरुद्ध कारवाई, सागरी किनाऱ्यावर जेट्टी, मासे उतरविण्यासाठी जागा उभारण्याची त्यांनी मागणी केली. त्यावर शेख म्हणाले, ""सागरी किनाऱ्यावरील जेट्टी, मासे उतरविण्याच्या जागा विकसित करणे, शीतगृह (कोल्ड स्टोअरेज) उभारणे आदी कामे सुरू करण्यात येत आहे. येत्या दोन ते तीन वर्षात ही कामे वेगाने पूर्ण होतील. कोकण किनारपट्टीवर येत्या काही काळात तीन मोठे लॅडिंग पॉईंट उभारण्यात येणार आहेत. समुद्र किनाऱ्यावरील गाळ काढण्यासाठी विशेष तरतूद करण्याचे निर्देशही दिले आहेत.''    संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2QIEZhr

No comments:

Post a Comment