#PetrolPriceHike : पेट्रोल दरवाढीचा साखर कारखान्यांना फटका पुणे : पेट्रोलियम कंपन्यांकडून तीन राज्यांचा अपवाद वगळता इथेनॉलचे मिश्रण केंद्र सरकारने निश्चित केलेल्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात इथेनॉलचा साठा मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. त्यात पुन्हा पेट्रोलचे दर वाढल्याने त्याचा खप कमी झाला आहे. त्यामुळे इथेनॉलचे मिश्रणही कमी झाले असून, पेट्रोल दरवाढीचा फटका इथेनॉल उत्पादक कारखान्यांना बसला आहे. त्याची झळ उस उत्पादकांनाही बसणार आहे.  केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीबाबत सकारात्मक धोरण स्वीकारले आहे. पेट्रोलच्या आयातीवर होणारा खर्च कमी करण्यासाठी सुमारे दहा टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रण केले जाते. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, कर्नाटक राज्यात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण सुमारे ९ टक्के आहे. परंतु अन्य राज्यांमध्ये हे प्रमाण सहा टक्क्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्या संपूर्ण इथेनॉलची विक्री होत नाही.  - बेरोजगार तरुणांसाठी सरकारचं 'सक्षम' पाऊल; पोर्टलमधून मिळणार १० लाखांना रोजगार राज्यातील साखर कारखाने आणि आसवनी प्रकल्पांकडून चालू गाळप हंगामात १०५ कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी ६० कोटी लिटर इथेनॉल खरेदीच्या निविदा काढल्या आहेत. त्यापैकी गेल्या दोन महिन्यांत पेट्रोलियम कंपन्यांनी केवळ १० कोटी लिटर इथेनॉलची खरेदी केली आहे. सध्या कारखान्यांकडे पाच कोटी लिटर इथेनॉलचा साठा आहे. केवळ एका अंबालिका शुगर्स कारखान्याकडे ५५ लाख लिटर इथेनॉल शिल्लक असल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली. पेट्रोलियम कंपन्यांनी इथेनॉल न उचलल्यास साखरेनंतर इथेनॉलच्या उत्पादनातूनही फायदा होत नसेल तर इथेनॉल उत्पादन करण्यास कारखाने धजावणार नाहीत, असा सूर साखर उद्योगातून व्यक्त केला जात आहे.  - EPFO : भविष्य निर्वाह निधीवर मिळणार इतकं व्याज; जाणून घ्या कसा चेक करणार बॅलन्स​ पेट्रोलियम कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउनच्या कालावधीत वाहतुकीसह सर्वच व्यवहार ठप्प होते. त्यामुळे पेट्रोलच्या विक्रीत मोठी घट झाली. परिणामी इथेनॉल मिश्रणही न झाल्यामुळे खप कमी झाला आहे. पेट्रोलची दरवाढ आणि इथेनॉलचा खप कमी होणे यांचा फारसा संबंध येत नाही.  पेट्रोलचे दर वाढल्यामुळे वाहनचालकांकडून त्याचा वापर कमी झाला आहे. पेट्रोलचा खप कमी झाल्यामुळे इथेनॉलचाही खप कमी झाला आहे. परंतु हे तात्कालिक कारण असून, निविदा वर्षभरासाठी आहे. उर्वरित कालावधीत इथेनॉलचा पुरवठा पेट्रोलियम कंपन्यांना होइल, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.  - शेखर गायकवाड, साखर आयुक्त  - हेही वाचा - ताज महलमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवाच; नोकरभरती रद्द केल्याच्या रागातून केला प्रताप पेट्रोलच्या दरवाढीचा परिणाम इथेनॉलच्या खपावर झाला आहे. केंद्र सरकारने पेट्रोलमधील मिश्रणाचे प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत वाढवावे. डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे इथेनॉल टॅंकर वाहतुकीचे दरही वाढवून द्यावेत, अशी मागणी वेस्ट इंडिया शुगर मॅन्युफॅक्चरिंग (विस्मा) असोसिएशनने केंद्र सरकारकडे केली आहे.  - बी.बी. ठोंबरे, अध्यक्ष ‘विस्मा’  महाराष्ट्रातील इथेनॉल उत्पादन स्क्षिती :  चालू हंगामात अपेक्ष्ित इथेनॉल उत्पादन : १०५ कोटी लिटर  गेल्या दोन महिन्यांतील इथेनॉल पुरवठा : १० कोटी लिटर  मागील हंगामातील इथेनॉल पुरवठा : २१ कोटी लिटर  देशातील सरासरी इथेनॉल उत्पादन : २७० कोटी लिटर  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 4, 2021

#PetrolPriceHike : पेट्रोल दरवाढीचा साखर कारखान्यांना फटका पुणे : पेट्रोलियम कंपन्यांकडून तीन राज्यांचा अपवाद वगळता इथेनॉलचे मिश्रण केंद्र सरकारने निश्चित केलेल्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात इथेनॉलचा साठा मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. त्यात पुन्हा पेट्रोलचे दर वाढल्याने त्याचा खप कमी झाला आहे. त्यामुळे इथेनॉलचे मिश्रणही कमी झाले असून, पेट्रोल दरवाढीचा फटका इथेनॉल उत्पादक कारखान्यांना बसला आहे. त्याची झळ उस उत्पादकांनाही बसणार आहे.  केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीबाबत सकारात्मक धोरण स्वीकारले आहे. पेट्रोलच्या आयातीवर होणारा खर्च कमी करण्यासाठी सुमारे दहा टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रण केले जाते. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, कर्नाटक राज्यात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण सुमारे ९ टक्के आहे. परंतु अन्य राज्यांमध्ये हे प्रमाण सहा टक्क्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्या संपूर्ण इथेनॉलची विक्री होत नाही.  - बेरोजगार तरुणांसाठी सरकारचं 'सक्षम' पाऊल; पोर्टलमधून मिळणार १० लाखांना रोजगार राज्यातील साखर कारखाने आणि आसवनी प्रकल्पांकडून चालू गाळप हंगामात १०५ कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी ६० कोटी लिटर इथेनॉल खरेदीच्या निविदा काढल्या आहेत. त्यापैकी गेल्या दोन महिन्यांत पेट्रोलियम कंपन्यांनी केवळ १० कोटी लिटर इथेनॉलची खरेदी केली आहे. सध्या कारखान्यांकडे पाच कोटी लिटर इथेनॉलचा साठा आहे. केवळ एका अंबालिका शुगर्स कारखान्याकडे ५५ लाख लिटर इथेनॉल शिल्लक असल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली. पेट्रोलियम कंपन्यांनी इथेनॉल न उचलल्यास साखरेनंतर इथेनॉलच्या उत्पादनातूनही फायदा होत नसेल तर इथेनॉल उत्पादन करण्यास कारखाने धजावणार नाहीत, असा सूर साखर उद्योगातून व्यक्त केला जात आहे.  - EPFO : भविष्य निर्वाह निधीवर मिळणार इतकं व्याज; जाणून घ्या कसा चेक करणार बॅलन्स​ पेट्रोलियम कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउनच्या कालावधीत वाहतुकीसह सर्वच व्यवहार ठप्प होते. त्यामुळे पेट्रोलच्या विक्रीत मोठी घट झाली. परिणामी इथेनॉल मिश्रणही न झाल्यामुळे खप कमी झाला आहे. पेट्रोलची दरवाढ आणि इथेनॉलचा खप कमी होणे यांचा फारसा संबंध येत नाही.  पेट्रोलचे दर वाढल्यामुळे वाहनचालकांकडून त्याचा वापर कमी झाला आहे. पेट्रोलचा खप कमी झाल्यामुळे इथेनॉलचाही खप कमी झाला आहे. परंतु हे तात्कालिक कारण असून, निविदा वर्षभरासाठी आहे. उर्वरित कालावधीत इथेनॉलचा पुरवठा पेट्रोलियम कंपन्यांना होइल, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.  - शेखर गायकवाड, साखर आयुक्त  - हेही वाचा - ताज महलमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवाच; नोकरभरती रद्द केल्याच्या रागातून केला प्रताप पेट्रोलच्या दरवाढीचा परिणाम इथेनॉलच्या खपावर झाला आहे. केंद्र सरकारने पेट्रोलमधील मिश्रणाचे प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत वाढवावे. डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे इथेनॉल टॅंकर वाहतुकीचे दरही वाढवून द्यावेत, अशी मागणी वेस्ट इंडिया शुगर मॅन्युफॅक्चरिंग (विस्मा) असोसिएशनने केंद्र सरकारकडे केली आहे.  - बी.बी. ठोंबरे, अध्यक्ष ‘विस्मा’  महाराष्ट्रातील इथेनॉल उत्पादन स्क्षिती :  चालू हंगामात अपेक्ष्ित इथेनॉल उत्पादन : १०५ कोटी लिटर  गेल्या दोन महिन्यांतील इथेनॉल पुरवठा : १० कोटी लिटर  मागील हंगामातील इथेनॉल पुरवठा : २१ कोटी लिटर  देशातील सरासरी इथेनॉल उत्पादन : २७० कोटी लिटर  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2PEhOV7

No comments:

Post a Comment