पैसेही गेले अन्‌ कपडेही  भावाच्या विवाहासाठी पैसेच नसल्यामुळे कुटुंबाला अश्रू अनावर येरवडा - कॅम्प परिसरातील ‘फॅशन स्ट्रीट’मधील रेडिमेड गारमेंट्स विक्रेता शाहनवाझ शेखचे संपूर्ण दुकान आगीत भस्मसात झाले आहे. मित्राच्या क्रेडिट कार्डवर त्याने तब्बल अडीच लाख रुपयांची कपडे खरेदी केली होती. पुढील महिन्यात त्याचा भाऊ शाहरूखचा विवाह असल्यामुळे तो पैसे जमवत होता. मात्र, दुकानातील सर्वच माल भस्मसात झाल्यामुळे भावाचा नियोजित विवाह कसा करायचा म्हणून त्याच्या संपूर्ण कुटुंबाला अश्रू अनावर झाले आहेत. फॅशन स्ट्रीटवर शाहनवाझ व शाहरुख हे दोघे भावंडे कपडे विकतात. शाहरूखचा पुढील महिन्यात विवाह ठरला होता. पैशाची जमवाजमव करताना शहानवाजने मित्राच्या क्रेडिट कार्डवर अडीच लाख रुपयांचे कर्ज घेऊन, दुकानात भरपूर माल भरला. त्यातून बऱ्यापैकी पैसे मिळतील, मित्राचे पैसे फेडू व विवाहासाठी पैसे गोळा होतील, असा उद्देश शाहनवाझचा होता. मात्र, शुक्रवारी लागलेल्या आगीत सर्व माल भस्मसात झाल्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब दु:खात बुडाले आहे. नियोजित विवाह कसा होईल, यामुळे संपूर्ण कुटुंबाला अश्रू अनावर झाले आहेत.  आगीच्या घटनेसंदर्भात शाहनवाझ म्हणाला, ‘‘शुक्रवारी रात्री साडेदहाला दुकान बंद करून घरी आलो. पंधरा मिनिटात आगीची घटना समजली. तसाच धावत दुकानाकडे गेलो. आग मोठी होती. त्यामुळे पुढे जाण्याची हिंमत झाली नाही. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशामक बंबाला येण्यास उशीर झाल्यामुळे आग भडकली. अनेकांच्या दुकानातील प्रत्येकी दीड  ते दोन लाख रुपयांचा  माल भस्मसात झाल्यामुळे अनेकजण रस्त्यावर आले आहेत. त्यांना सरकारने मदत देण्याची गरज आहे.’’ - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा व्यथा विक्रेत्यांच्या... बऱ्याच लोकांनी व्याज घेऊन, कर्ज काढून येथे स्टॉलमध्ये माल भरला होता. शॉर्ट सर्किटमुळे इतकी मोठी आगीची घटना घडणे शक्य नसावे. घटनेमुळे गरिबांना नुकसानीची भरपाई प्रशासनाने द्यावी. तसेच, या मार्केटची दुरुस्ती करून दुकाने सुरू करण्याची व्यवस्था करावी.   - रियाज अहमद खान, स्टॉलचालक मार्केटमध्ये आग लागताच सुरक्षारक्षकाने फोनवर आम्हाला माहिती दिली. तसेच अग्निशामक दलाला कळविले. मात्र, अग्निशामक दलाला या परिसरात यायला अर्धा ते एक तास लागला. तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणावर पसरली होती आणि सर्व माल त्यात खाक झाला.  - तौफिक शेख, विक्रेते  पुणे : अग्निशमनदलातील पदं भरतीला वेग येणार का?; तीन वर्षांपासून प्रस्ताव प्रलंबित कोट्यवधींच्या मालाचे नुकसान झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वीच कॅन्टोन्मेंट बोर्डाने फॅशनस्ट्रीटवर केस केली होती. काही दिवसांपासून या जागेला मोकळं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जोर लावला जात होता. काही बिल्डरसुद्धा या जागेवर डोळा ठेवून आहेत.  - सलीम आमीर, स्टॉलधारक अनेक वर्षांपासून फॅशन स्ट्रीट येथे मी नासीम कुरेशी यांच्या दुकानात काम करत आहे. यामुळेच आमचे घर चालत होते. कर्ज घेऊन व्यवसाय करत आहोत. या दुकानामुळे आमचे उत्पन्न सुरू होते. आधीच लॉकडाउनची चिंता होती; पण काल रात्रीच्या घटनेमुळे आता उत्पन्नाचा पर्याय हरवला असून, माझा परिवार रस्त्यावर आला आहे.  - अब्दुल कयूम, कामगार होळी सण आणि शनिवार-रविवार सुटीचे औचित्य साधून ग्राहक खरेदीसाठी येतील, यासाठी मोठ्या प्रमाणावर मालाचा साठाही करून ठेवला होता. मात्र नियतीच्या मनात भलतेच होते आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. - खालिद शेख  महावितरणचा अजब कारभार; बील भरूनही तोडले वीज कनेक्शन  अनलॉकनंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी उसनवार केली, कर्ज घेतले. त्यातून सावरत असताना दुकानांची राखरांगोळी झाली. एक-दोन नव्हे, तर तब्बल दीड-दोन हजार दुकानदारांसह कामगारांच्या कुटुंबांच्या पोटापाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  - शाहनवाज अल्लाना  अशा स्वरूपाची आग कधीच पाहिली नाही. माझ्यासह सर्वांचेच आयुष्य या आगीने संपवले आहे. येणाऱ्या सणासुदीच्या कालावधीत पैसे मिळतील आणि हळूहळू आपले जीवन पूर्वपदावर येईल असं वाटत होतं. शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस आमच्यादृष्टीने महत्त्वाचे होते; पण आज दुकानातील सर्व माल जळून खाक झाला. - मुनाफ कुरेशी  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 27, 2021

पैसेही गेले अन्‌ कपडेही  भावाच्या विवाहासाठी पैसेच नसल्यामुळे कुटुंबाला अश्रू अनावर येरवडा - कॅम्प परिसरातील ‘फॅशन स्ट्रीट’मधील रेडिमेड गारमेंट्स विक्रेता शाहनवाझ शेखचे संपूर्ण दुकान आगीत भस्मसात झाले आहे. मित्राच्या क्रेडिट कार्डवर त्याने तब्बल अडीच लाख रुपयांची कपडे खरेदी केली होती. पुढील महिन्यात त्याचा भाऊ शाहरूखचा विवाह असल्यामुळे तो पैसे जमवत होता. मात्र, दुकानातील सर्वच माल भस्मसात झाल्यामुळे भावाचा नियोजित विवाह कसा करायचा म्हणून त्याच्या संपूर्ण कुटुंबाला अश्रू अनावर झाले आहेत. फॅशन स्ट्रीटवर शाहनवाझ व शाहरुख हे दोघे भावंडे कपडे विकतात. शाहरूखचा पुढील महिन्यात विवाह ठरला होता. पैशाची जमवाजमव करताना शहानवाजने मित्राच्या क्रेडिट कार्डवर अडीच लाख रुपयांचे कर्ज घेऊन, दुकानात भरपूर माल भरला. त्यातून बऱ्यापैकी पैसे मिळतील, मित्राचे पैसे फेडू व विवाहासाठी पैसे गोळा होतील, असा उद्देश शाहनवाझचा होता. मात्र, शुक्रवारी लागलेल्या आगीत सर्व माल भस्मसात झाल्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब दु:खात बुडाले आहे. नियोजित विवाह कसा होईल, यामुळे संपूर्ण कुटुंबाला अश्रू अनावर झाले आहेत.  आगीच्या घटनेसंदर्भात शाहनवाझ म्हणाला, ‘‘शुक्रवारी रात्री साडेदहाला दुकान बंद करून घरी आलो. पंधरा मिनिटात आगीची घटना समजली. तसाच धावत दुकानाकडे गेलो. आग मोठी होती. त्यामुळे पुढे जाण्याची हिंमत झाली नाही. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशामक बंबाला येण्यास उशीर झाल्यामुळे आग भडकली. अनेकांच्या दुकानातील प्रत्येकी दीड  ते दोन लाख रुपयांचा  माल भस्मसात झाल्यामुळे अनेकजण रस्त्यावर आले आहेत. त्यांना सरकारने मदत देण्याची गरज आहे.’’ - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा व्यथा विक्रेत्यांच्या... बऱ्याच लोकांनी व्याज घेऊन, कर्ज काढून येथे स्टॉलमध्ये माल भरला होता. शॉर्ट सर्किटमुळे इतकी मोठी आगीची घटना घडणे शक्य नसावे. घटनेमुळे गरिबांना नुकसानीची भरपाई प्रशासनाने द्यावी. तसेच, या मार्केटची दुरुस्ती करून दुकाने सुरू करण्याची व्यवस्था करावी.   - रियाज अहमद खान, स्टॉलचालक मार्केटमध्ये आग लागताच सुरक्षारक्षकाने फोनवर आम्हाला माहिती दिली. तसेच अग्निशामक दलाला कळविले. मात्र, अग्निशामक दलाला या परिसरात यायला अर्धा ते एक तास लागला. तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणावर पसरली होती आणि सर्व माल त्यात खाक झाला.  - तौफिक शेख, विक्रेते  पुणे : अग्निशमनदलातील पदं भरतीला वेग येणार का?; तीन वर्षांपासून प्रस्ताव प्रलंबित कोट्यवधींच्या मालाचे नुकसान झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वीच कॅन्टोन्मेंट बोर्डाने फॅशनस्ट्रीटवर केस केली होती. काही दिवसांपासून या जागेला मोकळं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जोर लावला जात होता. काही बिल्डरसुद्धा या जागेवर डोळा ठेवून आहेत.  - सलीम आमीर, स्टॉलधारक अनेक वर्षांपासून फॅशन स्ट्रीट येथे मी नासीम कुरेशी यांच्या दुकानात काम करत आहे. यामुळेच आमचे घर चालत होते. कर्ज घेऊन व्यवसाय करत आहोत. या दुकानामुळे आमचे उत्पन्न सुरू होते. आधीच लॉकडाउनची चिंता होती; पण काल रात्रीच्या घटनेमुळे आता उत्पन्नाचा पर्याय हरवला असून, माझा परिवार रस्त्यावर आला आहे.  - अब्दुल कयूम, कामगार होळी सण आणि शनिवार-रविवार सुटीचे औचित्य साधून ग्राहक खरेदीसाठी येतील, यासाठी मोठ्या प्रमाणावर मालाचा साठाही करून ठेवला होता. मात्र नियतीच्या मनात भलतेच होते आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. - खालिद शेख  महावितरणचा अजब कारभार; बील भरूनही तोडले वीज कनेक्शन  अनलॉकनंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी उसनवार केली, कर्ज घेतले. त्यातून सावरत असताना दुकानांची राखरांगोळी झाली. एक-दोन नव्हे, तर तब्बल दीड-दोन हजार दुकानदारांसह कामगारांच्या कुटुंबांच्या पोटापाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  - शाहनवाज अल्लाना  अशा स्वरूपाची आग कधीच पाहिली नाही. माझ्यासह सर्वांचेच आयुष्य या आगीने संपवले आहे. येणाऱ्या सणासुदीच्या कालावधीत पैसे मिळतील आणि हळूहळू आपले जीवन पूर्वपदावर येईल असं वाटत होतं. शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस आमच्यादृष्टीने महत्त्वाचे होते; पण आज दुकानातील सर्व माल जळून खाक झाला. - मुनाफ कुरेशी  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3cs420p

No comments:

Post a Comment