प्लाझ्मासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ रक्तपेढ्यांमध्ये केवळ सोळा बॅग शिल्लक; रुग्ण वाढत असल्याने दात्यांनी पुढे येण्याची गरज पिंपरी - एकीकडे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच, प्लाझ्माचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिसरातील सहा रक्तपेढ्यांमध्ये सोळा बॅग शिल्लक आहेत. परिणामी, रुग्णांच्या नातेवाइकांना प्लाझ्मा मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. कोरोनाच्या रुग्णाला कोणती लक्षणे आहेत, त्यावरून उपचार केले जातात. ज्या रुग्णांना कोरोनाची गंभीर लक्षणे आहेत. त्यांना इतर औषधोपचार लागू पडत नाही. अशा रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी केली जाते. विशेषतः वयोवृद्ध नागरिकांना प्लाझ्मा दिला जातो. परंतु, सध्या दाते कमी झाल्याने प्लाझ्माचा तुटवडा निर्माण झाला आहे. ‘तुटवडा असल्याने प्लाझ्मा दाता घेऊन या आणि प्लाझ्मा घेऊन जा,’ असे रक्तपेढीतील कर्मचारी सांगत आहेत. सुरुवातीला प्लाझ्मादानाविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दान करणाऱ्या दात्यांची संख्या वाढली होती. या थेरपीमुळे अनेक रुग्ण बरे देखील झाले आहेत. नोव्हेंबरनंतर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. शहरातील रुग्णांचा आकडा हा शंभरच्या खाली आला होता. त्यामुळे कोरोना शहरातून हद्दपार झाला, अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे प्लाझ्मा दानाकडे दुर्लक्ष करण्यात आले. परंतु, पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून रोज १४०० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. मृत्यू होणाऱ्यांमध्ये वयोवृद्ध नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अशा नागरिकांना प्लाझ्माची गरज भासत आहे. पिंपरी-चिंचवड : क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश हे करू शकतात प्लाझ्मादान कोरोनाची तपासणी पॉझिटिव्ह आल्यापासून २८ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्लाझ्मादान करता येते. एका वेळेस ४००-५०० मिली प्लाझ्मादान करता येते. त्यानंतर साधारण १५ दिवसांच्या अंतराने दोन-तीन वेळेस प्लाझ्मादान करता येते. प्लाझ्मादान केल्याने कोणताही त्रास होत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्लाझ्माचा मोठा तुटवडा आहे. मागणी जास्त आहे; पण दाते कमी आहेत. दररोज ४० जणांकडून प्लाझ्माची मागणी केली जात आहे. आम्ही दिवसाला १५ ते १८ जणांनाच प्लाझ्मा देऊ शकतो. आता दातेच पुढे येत नाहीत. दुसरे म्हणजे हेल्थ वर्कर यांनी कोरोनाची लस घेतली आहे. लस घेतल्यामुळे ते ५६ दिवस प्लाझ्मा देऊ शकत नाहीत. पूर्वी हेल्थ वर्कर, पोलिस जास्त संख्येने पॉझिटिव्ह होते, त्यांनी मोठ्या प्रमाणात प्लाझ्मादान केले. पण, आता या सर्वांना कोरोनाची लस दिल्याने प्लाझ्माचा तुटवडा निर्माण झाला आहे. एका प्लाझ्मापासून दोन बॅग तयार होतात. दोघांना प्लाझ्मा देऊ शकतो. प्लाझ्मा दात्यांनी पुढे येणे आवश्यक आहे. - डॉ. शंकर मोसलगी, रक्त संक्रमण अधिकारी, वायसीएम रक्तपेढी पिंपरी-चिंचवडमध्ये आज नवीन १६९४ रुग्ण सरकारने प्लाझ्मादान करण्याची सक्ती केली पाहिजे. माझ्या मुलाला ‘ए’ रक्तगट हवा होता; पण मिळत नाहीये. प्रत्येक रुग्ण वाचला पाहिजे म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. मात्र, जे रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, ते प्लाझ्मा दाते पुढे येत नसल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. - स्मिता शिंदे, नातेवाईक, पिंपरीगाव Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 27, 2021

प्लाझ्मासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ रक्तपेढ्यांमध्ये केवळ सोळा बॅग शिल्लक; रुग्ण वाढत असल्याने दात्यांनी पुढे येण्याची गरज पिंपरी - एकीकडे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच, प्लाझ्माचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिसरातील सहा रक्तपेढ्यांमध्ये सोळा बॅग शिल्लक आहेत. परिणामी, रुग्णांच्या नातेवाइकांना प्लाझ्मा मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. कोरोनाच्या रुग्णाला कोणती लक्षणे आहेत, त्यावरून उपचार केले जातात. ज्या रुग्णांना कोरोनाची गंभीर लक्षणे आहेत. त्यांना इतर औषधोपचार लागू पडत नाही. अशा रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी केली जाते. विशेषतः वयोवृद्ध नागरिकांना प्लाझ्मा दिला जातो. परंतु, सध्या दाते कमी झाल्याने प्लाझ्माचा तुटवडा निर्माण झाला आहे. ‘तुटवडा असल्याने प्लाझ्मा दाता घेऊन या आणि प्लाझ्मा घेऊन जा,’ असे रक्तपेढीतील कर्मचारी सांगत आहेत. सुरुवातीला प्लाझ्मादानाविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दान करणाऱ्या दात्यांची संख्या वाढली होती. या थेरपीमुळे अनेक रुग्ण बरे देखील झाले आहेत. नोव्हेंबरनंतर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. शहरातील रुग्णांचा आकडा हा शंभरच्या खाली आला होता. त्यामुळे कोरोना शहरातून हद्दपार झाला, अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे प्लाझ्मा दानाकडे दुर्लक्ष करण्यात आले. परंतु, पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून रोज १४०० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. मृत्यू होणाऱ्यांमध्ये वयोवृद्ध नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अशा नागरिकांना प्लाझ्माची गरज भासत आहे. पिंपरी-चिंचवड : क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश हे करू शकतात प्लाझ्मादान कोरोनाची तपासणी पॉझिटिव्ह आल्यापासून २८ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्लाझ्मादान करता येते. एका वेळेस ४००-५०० मिली प्लाझ्मादान करता येते. त्यानंतर साधारण १५ दिवसांच्या अंतराने दोन-तीन वेळेस प्लाझ्मादान करता येते. प्लाझ्मादान केल्याने कोणताही त्रास होत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्लाझ्माचा मोठा तुटवडा आहे. मागणी जास्त आहे; पण दाते कमी आहेत. दररोज ४० जणांकडून प्लाझ्माची मागणी केली जात आहे. आम्ही दिवसाला १५ ते १८ जणांनाच प्लाझ्मा देऊ शकतो. आता दातेच पुढे येत नाहीत. दुसरे म्हणजे हेल्थ वर्कर यांनी कोरोनाची लस घेतली आहे. लस घेतल्यामुळे ते ५६ दिवस प्लाझ्मा देऊ शकत नाहीत. पूर्वी हेल्थ वर्कर, पोलिस जास्त संख्येने पॉझिटिव्ह होते, त्यांनी मोठ्या प्रमाणात प्लाझ्मादान केले. पण, आता या सर्वांना कोरोनाची लस दिल्याने प्लाझ्माचा तुटवडा निर्माण झाला आहे. एका प्लाझ्मापासून दोन बॅग तयार होतात. दोघांना प्लाझ्मा देऊ शकतो. प्लाझ्मा दात्यांनी पुढे येणे आवश्यक आहे. - डॉ. शंकर मोसलगी, रक्त संक्रमण अधिकारी, वायसीएम रक्तपेढी पिंपरी-चिंचवडमध्ये आज नवीन १६९४ रुग्ण सरकारने प्लाझ्मादान करण्याची सक्ती केली पाहिजे. माझ्या मुलाला ‘ए’ रक्तगट हवा होता; पण मिळत नाहीये. प्रत्येक रुग्ण वाचला पाहिजे म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. मात्र, जे रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, ते प्लाझ्मा दाते पुढे येत नसल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. - स्मिता शिंदे, नातेवाईक, पिंपरीगाव Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2QLMAMc

No comments:

Post a Comment