वाजले रे वाजले टोमॅटोचे ‘सूप’..! एक तास होऊन गेला तरी बायको टोमॅटो घेऊन आली नसल्याने संदीप चिंतेत पडला. ही बाजारामध्ये टोमॅटो आणायला गेली, की शेतात टोमॅटो तोडायला गेलीय, हेच त्याला कळेना. त्याने लगेच फोन लावला. ‘अगं कोठे गेली आहेस? इतका वेळ तुला साडी खरेदीलाही लागत नाही.’ चिडून संदीपने विचारले. ‘अहो, आज मी टोमॅटो सूप नाही बनवू शकणार. आजच्या दिवस भेंडीत पाणी ओतून ते गरम करा आणि ‘भेंडी सूप’ म्हणून प्या,’ बायकोने सल्ला दिला. ‘अगं पण तू आहेस कोठे?’ ‘अहो, माझा ॲक्सिडेंट झालाय. मी गाडीवरुन पडलेय. पण टोमॅटोला काही होऊ दिले नाही बरं का! ती सुखरुप आहेत. तुम्ही संध्याकाळी मला दवाखान्यात भेटायला याल, तेव्हा तुमच्याकडे देईल. मग आपण त्याचे सूप करु.’ बायकोची रेल्वे सुसाट सुटली होती. तिचे हे बोलणे ऐकून संदीप घाबरला. ‘अगं असा कसा झाला ॲक्सिडेंट? फार लागलं नाही ना?’ संदीपने विचारले. ‘अहो, मी शेजारच्या गल्लीतून टोमॅटो घेतली आणि घरी यायला निघाले, त्यावेळी वाहतूक पोलिसांनी मला थांबायला सांगितले. मला तर बाई कळेचना, की यांनी मला कशाला थांबायला सांगितलंय.’ - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बायकोचा हा फाफटपसारा ऐकून संदीपची सटकली. ‘अगं तू मुद्याचं बोल ना. ॲक्सिडेंट कसा झाला, ते सांग ना.’ संदीपने रागाने विचारले. ‘अहो, तेच तर सांगतेय. पोलिसांनी मला थांबायला का सांगितले असेल, हा विचार मनात यायला आणि माझी ट्यूब पेटायला एकच वेळ झाली. अहो, मी मास्क घातला नव्हता. आता आला का पाचशे रुपयांचा भुर्दंड! एक एक रुपया वाचवून मी काटकसरीने संसार करते आणि एकदम पाचशे रुपयांचा दंड भरायचा म्हणजे? तेवढ्या पैशात आपली वर्षभराची साखर येईल. या विचाराने मी अस्वस्थ झाले. तेवढ्यात मला एक आयडिया सुचली. आपण जर गाडीवरुन पडलो तर पोलिसांची आपल्याला सहानुभूती मिळेल व आपल्याला दंड न घेताच सोडून देतील, हा विचार माझ्या मनात आला व मी गाडी मुद्दाम पाडली. पण पडतानासुद्धा टोमॅटोचा चिखल होणार नाही, याची काळजी घेतली बरं का! आणि माझा अंदाज शंभर टक्के खरा ठरला. मी पडल्याचे पाहून पोलिस मदतीला धावले. त्यांनी प्यायला पाणी दिले आणि रुग्णवाहिका बोलावून मला त्यात बसवून दिले. वाचवले की नाही दंडाचे पाचशे रुपये’? ‘अगं तू कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेस?’ संदीपने विचारले. ‘दिनानाथमध्ये मला आणलंय. पाय फ्रॅक्चर आहे, असे डॉक्टरांनी सांगितलंय. 'तर पुन्हा उभारी घेणं महामुश्‍कील'; लॉकडाऊनबाबत पुण्यातील लघु उद्योजकांमध्ये भीती उद्या ऑपरेशन करावे लागेल, असे त्यांनी सांगितलंय. त्यामुळे मला पाच-सहा दिवस थांबावे लागेल, असं दिसतंय; पण तुम्ही काळजी करु नका. मी खंबीर आहे. फक्त स्वयंपाकीणबाईला आठवड्याची सुटी द्या. तुमच्या एकट्यासाठी स्वयंपाकाला बाई कशाला हवीय? तुम्ही आपला वरण-भाताचा कुकर लावत जा. तीन शिट्टया झाल्या की कुकर बंद करत जा. नाहीतर गॅस वाया घालवाल! तसेच भांडीवाल्या बाईलाही सुटी द्या. तुमची एकट्याची भांडी असून असून किती असणार? तेवढेच आपले पैसे वाचतील आणि हो संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये येताना टोमॅटो न्यायला पिशवी घेऊन या. विकत नका आणू. घरातीलच आणा. तेवढाच आपला खर्च वाचेल.’ ‘अगं, डॉक्टरांनी ऑपरेशनचा खर्च किती सांगितलाय? संदीपने विचारलं. ‘दीड लाखाच्या आसपास सांगितलाय; पण तुम्ही काळजी करु नका. आपण अजून काटकसर करु. आता मी आणलेल्या टोमॅटोवर आपण अजून दहा-बारा दिवस काढू. रोज फक्त वरण-भाताचाच कुकर लावू. पुढील महिनाभर ब्युटी पार्लरला जाणे मी बंद करते आणि विशेष म्हणजे मास्क घातल्याशिवाय दोघांनीही घराबाहेर पडायचं नाही, असा निर्धार करु.’’ Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 30, 2021

वाजले रे वाजले टोमॅटोचे ‘सूप’..! एक तास होऊन गेला तरी बायको टोमॅटो घेऊन आली नसल्याने संदीप चिंतेत पडला. ही बाजारामध्ये टोमॅटो आणायला गेली, की शेतात टोमॅटो तोडायला गेलीय, हेच त्याला कळेना. त्याने लगेच फोन लावला. ‘अगं कोठे गेली आहेस? इतका वेळ तुला साडी खरेदीलाही लागत नाही.’ चिडून संदीपने विचारले. ‘अहो, आज मी टोमॅटो सूप नाही बनवू शकणार. आजच्या दिवस भेंडीत पाणी ओतून ते गरम करा आणि ‘भेंडी सूप’ म्हणून प्या,’ बायकोने सल्ला दिला. ‘अगं पण तू आहेस कोठे?’ ‘अहो, माझा ॲक्सिडेंट झालाय. मी गाडीवरुन पडलेय. पण टोमॅटोला काही होऊ दिले नाही बरं का! ती सुखरुप आहेत. तुम्ही संध्याकाळी मला दवाखान्यात भेटायला याल, तेव्हा तुमच्याकडे देईल. मग आपण त्याचे सूप करु.’ बायकोची रेल्वे सुसाट सुटली होती. तिचे हे बोलणे ऐकून संदीप घाबरला. ‘अगं असा कसा झाला ॲक्सिडेंट? फार लागलं नाही ना?’ संदीपने विचारले. ‘अहो, मी शेजारच्या गल्लीतून टोमॅटो घेतली आणि घरी यायला निघाले, त्यावेळी वाहतूक पोलिसांनी मला थांबायला सांगितले. मला तर बाई कळेचना, की यांनी मला कशाला थांबायला सांगितलंय.’ - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बायकोचा हा फाफटपसारा ऐकून संदीपची सटकली. ‘अगं तू मुद्याचं बोल ना. ॲक्सिडेंट कसा झाला, ते सांग ना.’ संदीपने रागाने विचारले. ‘अहो, तेच तर सांगतेय. पोलिसांनी मला थांबायला का सांगितले असेल, हा विचार मनात यायला आणि माझी ट्यूब पेटायला एकच वेळ झाली. अहो, मी मास्क घातला नव्हता. आता आला का पाचशे रुपयांचा भुर्दंड! एक एक रुपया वाचवून मी काटकसरीने संसार करते आणि एकदम पाचशे रुपयांचा दंड भरायचा म्हणजे? तेवढ्या पैशात आपली वर्षभराची साखर येईल. या विचाराने मी अस्वस्थ झाले. तेवढ्यात मला एक आयडिया सुचली. आपण जर गाडीवरुन पडलो तर पोलिसांची आपल्याला सहानुभूती मिळेल व आपल्याला दंड न घेताच सोडून देतील, हा विचार माझ्या मनात आला व मी गाडी मुद्दाम पाडली. पण पडतानासुद्धा टोमॅटोचा चिखल होणार नाही, याची काळजी घेतली बरं का! आणि माझा अंदाज शंभर टक्के खरा ठरला. मी पडल्याचे पाहून पोलिस मदतीला धावले. त्यांनी प्यायला पाणी दिले आणि रुग्णवाहिका बोलावून मला त्यात बसवून दिले. वाचवले की नाही दंडाचे पाचशे रुपये’? ‘अगं तू कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेस?’ संदीपने विचारले. ‘दिनानाथमध्ये मला आणलंय. पाय फ्रॅक्चर आहे, असे डॉक्टरांनी सांगितलंय. 'तर पुन्हा उभारी घेणं महामुश्‍कील'; लॉकडाऊनबाबत पुण्यातील लघु उद्योजकांमध्ये भीती उद्या ऑपरेशन करावे लागेल, असे त्यांनी सांगितलंय. त्यामुळे मला पाच-सहा दिवस थांबावे लागेल, असं दिसतंय; पण तुम्ही काळजी करु नका. मी खंबीर आहे. फक्त स्वयंपाकीणबाईला आठवड्याची सुटी द्या. तुमच्या एकट्यासाठी स्वयंपाकाला बाई कशाला हवीय? तुम्ही आपला वरण-भाताचा कुकर लावत जा. तीन शिट्टया झाल्या की कुकर बंद करत जा. नाहीतर गॅस वाया घालवाल! तसेच भांडीवाल्या बाईलाही सुटी द्या. तुमची एकट्याची भांडी असून असून किती असणार? तेवढेच आपले पैसे वाचतील आणि हो संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये येताना टोमॅटो न्यायला पिशवी घेऊन या. विकत नका आणू. घरातीलच आणा. तेवढाच आपला खर्च वाचेल.’ ‘अगं, डॉक्टरांनी ऑपरेशनचा खर्च किती सांगितलाय? संदीपने विचारलं. ‘दीड लाखाच्या आसपास सांगितलाय; पण तुम्ही काळजी करु नका. आपण अजून काटकसर करु. आता मी आणलेल्या टोमॅटोवर आपण अजून दहा-बारा दिवस काढू. रोज फक्त वरण-भाताचाच कुकर लावू. पुढील महिनाभर ब्युटी पार्लरला जाणे मी बंद करते आणि विशेष म्हणजे मास्क घातल्याशिवाय दोघांनीही घराबाहेर पडायचं नाही, असा निर्धार करु.’’ Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3dlmBmn

No comments:

Post a Comment