भावी सरन्यायाधीशांमध्ये न्यायासनावर राहणार ‘मराठी’ दबदबा नवी दिल्ली - भारताच्या सरन्यायाधीशपदास ४ वर्षांत तीन मराठी न्यायधीश लाभत आहेत. यातच आता न्या. भूषण गवई यांचाही समावेश झाला आहे. न्या. गवई मे २०२५ पासून सुमारे सहा महिन्यांसाठी देशाचे सरन्यायाधीशपद भूषवतील.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘यतो धर्मस्ततो जयः'' हे ब्रीदवाक्‍य असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या ७१ वर्षांच्या या दीर्घ काळातील ४७ पैकी अस्सल मराठी म्हणावे, असे जेमतेम दोन न्यायाधीश हे सरन्यायाधीश झाले. न्या. पी बी गजेंद्रगडकर ( फेब्रुवारी १९६४ ते १५ मार्च १९६६) आणि न्या. यशवंतराव चंद्रचूड ही त्यातील ठळक नावे. न्या. चंद्रचूड ( २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५) तर तब्बल सुमारे सव्वासात वर्षे इतक्‍या दीर्घकाळ सरन्यायाधीश राहिलेले अपवादात्मक न्यायाधीश ठरले. त्यांचे पुत्र न्या. धनंजय चंद्रचूड हेही आगामी काळात हे पद भूषविणार आहेत. याबाबत ‘सकाळ’ ने यापूर्वीही वृत्त दिले होते. न्या. चंद्रचूड यांच्याशिवाय सध्याचे सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, न्या. उदय ललित व न्या. भूषण गवई हे मराठी सरन्यायाधीशही देशाला मिळाले व मिळणार आहेत. न्या. चंद्रचूड व न्या. गवई यांच्या दरम्यान न्या. संजीव खन्ना (नोव्हेंबर २०२४- मे २०२५) हे सरन्यायाधीश होतील. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा याशिवाय सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अजय खानविलकर हे २९ जुलै २०२२ रोजी निवृत्त होतील. २६ जानेवारी १९५० पासून भारताच्या सरन्यायाधीशांच्या नियुक्तीला सुरवात झाली. न्या. एच. जे. कानिया हे स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश होते. न्यायपालिकेच्या कामकाजात व नियुक्‍त्यांमध्ये तसेच सरन्यायाधीशांच्या नियुक्‍त्यांमध्येही केंद्र सरकार सर्वसाधारणपणे थेट ढवळाढवळ न करण्याचे पथ्य पाळते. विद्यमान सरन्यायाधीशांच्या निवृत्तीला एक महिना राहिलेला असताना सरकार त्यांना त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांचे नाव घोषित करण्याची रीतसर विनंती करते. त्यानंतर ते नाव जाहीर होते व नियोजित दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते देशाच्या सरन्यायाधीशांचा शपथविधी होतो. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 30, 2021

भावी सरन्यायाधीशांमध्ये न्यायासनावर राहणार ‘मराठी’ दबदबा नवी दिल्ली - भारताच्या सरन्यायाधीशपदास ४ वर्षांत तीन मराठी न्यायधीश लाभत आहेत. यातच आता न्या. भूषण गवई यांचाही समावेश झाला आहे. न्या. गवई मे २०२५ पासून सुमारे सहा महिन्यांसाठी देशाचे सरन्यायाधीशपद भूषवतील.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘यतो धर्मस्ततो जयः'' हे ब्रीदवाक्‍य असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या ७१ वर्षांच्या या दीर्घ काळातील ४७ पैकी अस्सल मराठी म्हणावे, असे जेमतेम दोन न्यायाधीश हे सरन्यायाधीश झाले. न्या. पी बी गजेंद्रगडकर ( फेब्रुवारी १९६४ ते १५ मार्च १९६६) आणि न्या. यशवंतराव चंद्रचूड ही त्यातील ठळक नावे. न्या. चंद्रचूड ( २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५) तर तब्बल सुमारे सव्वासात वर्षे इतक्‍या दीर्घकाळ सरन्यायाधीश राहिलेले अपवादात्मक न्यायाधीश ठरले. त्यांचे पुत्र न्या. धनंजय चंद्रचूड हेही आगामी काळात हे पद भूषविणार आहेत. याबाबत ‘सकाळ’ ने यापूर्वीही वृत्त दिले होते. न्या. चंद्रचूड यांच्याशिवाय सध्याचे सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, न्या. उदय ललित व न्या. भूषण गवई हे मराठी सरन्यायाधीशही देशाला मिळाले व मिळणार आहेत. न्या. चंद्रचूड व न्या. गवई यांच्या दरम्यान न्या. संजीव खन्ना (नोव्हेंबर २०२४- मे २०२५) हे सरन्यायाधीश होतील. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा याशिवाय सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अजय खानविलकर हे २९ जुलै २०२२ रोजी निवृत्त होतील. २६ जानेवारी १९५० पासून भारताच्या सरन्यायाधीशांच्या नियुक्तीला सुरवात झाली. न्या. एच. जे. कानिया हे स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश होते. न्यायपालिकेच्या कामकाजात व नियुक्‍त्यांमध्ये तसेच सरन्यायाधीशांच्या नियुक्‍त्यांमध्येही केंद्र सरकार सर्वसाधारणपणे थेट ढवळाढवळ न करण्याचे पथ्य पाळते. विद्यमान सरन्यायाधीशांच्या निवृत्तीला एक महिना राहिलेला असताना सरकार त्यांना त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांचे नाव घोषित करण्याची रीतसर विनंती करते. त्यानंतर ते नाव जाहीर होते व नियोजित दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते देशाच्या सरन्यायाधीशांचा शपथविधी होतो. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3cGxSyJ

No comments:

Post a Comment