काहीही आणि कसंही बोला, आम्ही तिरक्यातच जाणार! हल्ली कोणाशी कसं आणि काय बोलावं, हेच कळेनासे झालंय. एखाद्याला आनंदाची गोष्ट सांगायला जावं, तर आपलं म्हणणं मध्येच तोडत, ‘हे तर लई किरकोळ हाये, याच्यापेक्षा भारी गोष्ट सांगतो, असं म्हणून तासभर कंटाळवाणं चऱ्हाट लावतो. इच्छा नसतानाही अधून- मधून हशा व टाळ्या आपल्याला द्याव्या लागतात. एखाद्याला दुःख सांगायला जावं तर तो आपल्यापेक्षा दहापट दुः ख सांगून मोकळं होतो. वर ‘तुझं तरी बाबा बरं हाये, आमचं लई हाल,’ असं म्हणून तोंड कसनुसं करीत उसासे टाकतो. याच्यापेक्षाही तिसरा प्रकार गंभीर असतो. आपण काहीही आणि कितीही चांगलं म्हटलं तरी त्याचा तिरकस अर्थ घेण्यात ही मंडळी पटाईत असतात. कुठून आपण यांच्याशी बोललो, असं वाटत राहतं. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आज सकाळी मंडईत कॉलेजमधील मैत्रिण शलाका भेटली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर सहजपणे ‘मग कोरोनावरील लस घेतलीस की नाही? फेसबुकवर फोटो अजून टाकला नाही म्हणून विचारलं.’? यावर ती भडकली. ‘‘लस घ्यायला मी काय तुला साठ वर्षांपेक्षा जास्त वाटते का? ती फणकाऱ्याने म्हणाली. ‘अगं, तसं नाही. पंचेचाळीसच्या वयाच्या पुढंही देतात ना.’? आम्ही सावरून म्हटलं. ‘म्हणजे मी काय तुला व्याधीग्रस्त वाटले का? मला ह्दयविकार, मधुमेह, ब्लडप्रेशर असलं काही नाही. मी एकदम फीट आहे.’ शलाकाने म्हटले. ‘बरं ठीक आहे. नको घेऊस लस.’ आम्ही म्हटलं. ‘म्हणजे मला कोरोना झाला तरी चालेल. मला हॉस्पिटलमध्ये बेड नाही मिळाला तरी चालेल, असंच तुला म्हणायचं ना.’ ‘अगं मी कुठं तसं म्हणतोय. उलट तुला हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा, अशी परमेश्‍वराजवळ प्रार्थना करतो.’ आम्ही काकुळतीला येत म्हटले.  ‘हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा म्हणजे मला कोरोना व्हावा, अशीच तुझी इच्छा आहे तर.’ शलाकाने म्हटले.  सराफाला लुटले; पण एक आरोपी अवघ्या बारा तासांच्या आत अटक ‘हल्ली कोरोना पेशंटसाठी बेड मिळणं अवघड झालंय म्हणून म्हटलं. बरं अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या तरी घेतेस की नाही.’? हेही आम्ही सहज म्हटले.  ‘माझी प्रतिकारशक्ती फारच खराब आहे, असं तुला म्हणायचं का? तसं असेल तर ते चुकीचं आहे. मी रोज दोन तास व्यायाम करते.’ शलाकाने म्हटले. ‘बरं ते जाऊ द्या. हल्ली मार्केटमध्ये डुप्लीकेट सॅनिटायझर आलेत बरं का? काळजी घे.’ असं आम्ही काळजीपोटी म्हटलं. ‘म्हणजे मी डुप्लिकेट सॅनिटायझर वापरते, असं तुला म्हणायचं का? याचा अर्थी तू मला फारच कमी समजतोस. हे बघ ! ब्रॅंडेड कंपनीच्या सॅनिटायझरच्या बाटल्यांशिवाय मी काही वापरत नाही. खास परदेशावरून त्या मागवल्यात.’ असे म्हणून पर्समधून तिने एक बाटली काढली व माझ्या हातावर शिंपडल्यासारखे केले. त्यानंतर आम्ही विषयांतर करण्याचे ठरवले. ‘‘सासू व नणंदेबरोबरील तुझी भांडणं थांबली का गं’? यावर ती उसळून म्हणाली. पुण्यात दहशत निर्माण करणाऱ्या रोशन लोखंडे टोळीविरुद्ध 'मोक्का', पोलिस आयुक्तांकडून कडक कारवाई ‘म्हणजे  मी भांडकुदळ आहे, असं तुला म्हणायचं का? मी कधीच कोणाशी वाद- विवाद घालत नाही. माझा तो स्वभावच नाही. मात्र, लोकच वाकड्यात शिरतात. उगाचंच भांडण उकरून काढतात. आता तुझंच उदाहरण घे. काय कारण होतं का तुला माझ्याशी असं रस्त्यात वाद घालायला. पण तुझ्यासारखाच अनेकांचा स्वभाव असतो. तरी मी फार संयमाने घेते. मात्र, माझ्या सरळमार्गी स्वभावाचा अनेकजण फायदा घेतात....’ शलाका बराचवेळ असं बोलत होती. आम्हाला चक्कर आल्यासारखं झालं. मग आम्ही शनिपाराजवळील रसवंतीगृहात आलो. ‘अरे पंधरा- वीस मिनिटांत आमचे एवढे हाल होत असतील, तर तिच्या नवऱ्याचे काय होत असेल,’ या विचाराने ग्लासात बर्फाचे चार- पाच खडे टाकून, आम्ही उसाचा रस पिऊन थंडगार झालो. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 26, 2021

काहीही आणि कसंही बोला, आम्ही तिरक्यातच जाणार! हल्ली कोणाशी कसं आणि काय बोलावं, हेच कळेनासे झालंय. एखाद्याला आनंदाची गोष्ट सांगायला जावं, तर आपलं म्हणणं मध्येच तोडत, ‘हे तर लई किरकोळ हाये, याच्यापेक्षा भारी गोष्ट सांगतो, असं म्हणून तासभर कंटाळवाणं चऱ्हाट लावतो. इच्छा नसतानाही अधून- मधून हशा व टाळ्या आपल्याला द्याव्या लागतात. एखाद्याला दुःख सांगायला जावं तर तो आपल्यापेक्षा दहापट दुः ख सांगून मोकळं होतो. वर ‘तुझं तरी बाबा बरं हाये, आमचं लई हाल,’ असं म्हणून तोंड कसनुसं करीत उसासे टाकतो. याच्यापेक्षाही तिसरा प्रकार गंभीर असतो. आपण काहीही आणि कितीही चांगलं म्हटलं तरी त्याचा तिरकस अर्थ घेण्यात ही मंडळी पटाईत असतात. कुठून आपण यांच्याशी बोललो, असं वाटत राहतं. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आज सकाळी मंडईत कॉलेजमधील मैत्रिण शलाका भेटली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर सहजपणे ‘मग कोरोनावरील लस घेतलीस की नाही? फेसबुकवर फोटो अजून टाकला नाही म्हणून विचारलं.’? यावर ती भडकली. ‘‘लस घ्यायला मी काय तुला साठ वर्षांपेक्षा जास्त वाटते का? ती फणकाऱ्याने म्हणाली. ‘अगं, तसं नाही. पंचेचाळीसच्या वयाच्या पुढंही देतात ना.’? आम्ही सावरून म्हटलं. ‘म्हणजे मी काय तुला व्याधीग्रस्त वाटले का? मला ह्दयविकार, मधुमेह, ब्लडप्रेशर असलं काही नाही. मी एकदम फीट आहे.’ शलाकाने म्हटले. ‘बरं ठीक आहे. नको घेऊस लस.’ आम्ही म्हटलं. ‘म्हणजे मला कोरोना झाला तरी चालेल. मला हॉस्पिटलमध्ये बेड नाही मिळाला तरी चालेल, असंच तुला म्हणायचं ना.’ ‘अगं मी कुठं तसं म्हणतोय. उलट तुला हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा, अशी परमेश्‍वराजवळ प्रार्थना करतो.’ आम्ही काकुळतीला येत म्हटले.  ‘हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा म्हणजे मला कोरोना व्हावा, अशीच तुझी इच्छा आहे तर.’ शलाकाने म्हटले.  सराफाला लुटले; पण एक आरोपी अवघ्या बारा तासांच्या आत अटक ‘हल्ली कोरोना पेशंटसाठी बेड मिळणं अवघड झालंय म्हणून म्हटलं. बरं अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या तरी घेतेस की नाही.’? हेही आम्ही सहज म्हटले.  ‘माझी प्रतिकारशक्ती फारच खराब आहे, असं तुला म्हणायचं का? तसं असेल तर ते चुकीचं आहे. मी रोज दोन तास व्यायाम करते.’ शलाकाने म्हटले. ‘बरं ते जाऊ द्या. हल्ली मार्केटमध्ये डुप्लीकेट सॅनिटायझर आलेत बरं का? काळजी घे.’ असं आम्ही काळजीपोटी म्हटलं. ‘म्हणजे मी डुप्लिकेट सॅनिटायझर वापरते, असं तुला म्हणायचं का? याचा अर्थी तू मला फारच कमी समजतोस. हे बघ ! ब्रॅंडेड कंपनीच्या सॅनिटायझरच्या बाटल्यांशिवाय मी काही वापरत नाही. खास परदेशावरून त्या मागवल्यात.’ असे म्हणून पर्समधून तिने एक बाटली काढली व माझ्या हातावर शिंपडल्यासारखे केले. त्यानंतर आम्ही विषयांतर करण्याचे ठरवले. ‘‘सासू व नणंदेबरोबरील तुझी भांडणं थांबली का गं’? यावर ती उसळून म्हणाली. पुण्यात दहशत निर्माण करणाऱ्या रोशन लोखंडे टोळीविरुद्ध 'मोक्का', पोलिस आयुक्तांकडून कडक कारवाई ‘म्हणजे  मी भांडकुदळ आहे, असं तुला म्हणायचं का? मी कधीच कोणाशी वाद- विवाद घालत नाही. माझा तो स्वभावच नाही. मात्र, लोकच वाकड्यात शिरतात. उगाचंच भांडण उकरून काढतात. आता तुझंच उदाहरण घे. काय कारण होतं का तुला माझ्याशी असं रस्त्यात वाद घालायला. पण तुझ्यासारखाच अनेकांचा स्वभाव असतो. तरी मी फार संयमाने घेते. मात्र, माझ्या सरळमार्गी स्वभावाचा अनेकजण फायदा घेतात....’ शलाका बराचवेळ असं बोलत होती. आम्हाला चक्कर आल्यासारखं झालं. मग आम्ही शनिपाराजवळील रसवंतीगृहात आलो. ‘अरे पंधरा- वीस मिनिटांत आमचे एवढे हाल होत असतील, तर तिच्या नवऱ्याचे काय होत असेल,’ या विचाराने ग्लासात बर्फाचे चार- पाच खडे टाकून, आम्ही उसाचा रस पिऊन थंडगार झालो. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2PzmImc

No comments:

Post a Comment