पुण्यात आता गर्दीच्या ठिकाणी महापालिकेसह पोलिसांची राहणार गस्त पुणे - पुण्यात कोरोनाच्या रुग्णांचा रोजचा आकडा तीन हजारापर्यंत जात असल्याने धास्तावलेल्या महापालिकेने आता पुन्हा आपली यंत्रणा बाजारपेठांमध्ये उतरवून तेथील गर्दी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात दुकाने, हॉटेल, मॉल व अन्य गर्दीच्या ठिकाणी महापालिकेसह पोलिसांची गस्त राहणार आहे. ज्यामुळे सोशल डिस्टन्स पाळण्यापासून मास्क नसलेल्यांवर कारवाई होणार आहे. क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर नियोजन करीत, आपापल्या हद्दीत खबरदारीच्या उपायांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठीची ताकीद क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यात क्षेत्रीय अधिकाऱ्यांपासून त्यांच्याकडील आरोग्य खात्याची टीम पूर्णवेळ काम करेल, असे महापालिका प्रशासनाने बजावले आहे. या मोहिमेत पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तरीही सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी होत असल्याने परिस्थिती आणखी चिंताजनक होण्याची भीती आहे. मागील वर्षी मार्च ते सप्टेंबर या कालावधीत रोज सापडलेल्या रुग्णांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण होत असल्याचे आकडे आहेत. त्यातच सर्व व्यवहार सुरळीत असतानाही, खबरदारीच्या उपायांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता ज्या ठिकाणी तासनतास लोकांची गर्दी होत आहे, अशा ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयांकडील आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांकडे जबाबदारी दिली आहे.  ...तर ‘पीपीई किट’ घालून ‘एमपीएससी’ परीक्षा कडक कारवाई शहरातील भाजी मंडईमध्ये लोकांची गर्दी होत असल्याची बाब महापालिकेने गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळे अशा परिसरांत पहाटेपासून आरोग्य कर्मचाऱ्यांची गस्त राहणार आहे. विशेषतः मंडईमधील व्यापाऱ्यांनाच काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तरीही, कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांकडे दुर्लक्ष झाल्यास कारवाई होणार आहे.  तरुणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या सोसायट्यांमध्ये शिरकाव शहरातील सोसायट्यांमध्ये कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. बाणेर-बालेवाडी आणि पाषाण परिसरातील सोसायट्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पुणे महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या आढावा घेतल्यानंतर सोसायट्यांच्या परिसरात या विषाणूचा झपाट्याने प्रसार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षी पुणे शहरात कोरोना बाधितांचा पहिला रुग्ण हा सोसायटीमध्ये आढळून आला होता. त्यानंतर तो गावठाण आणि झोपडपट्ट्यांच्या परिसरात पसरला होता. दुसऱ्या लाटेत देखील पुन्हा तोच ट्रेन्ड असल्याचे दिसून आले आहे. बाणेर-बालेवाडी आणि पाषाण परिसरातील सोसायट्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे १४२ बाधित रुग्ण आहेत. त्या खालोखाल उर्वरित लोहगावच्या परिसरात ११९ रुग्ण असून सॅलिसबरी पार्क, आंबेगाव, दत्तनगर, कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, वडगावशेरी आणि कल्याणीनगर या परिसरात प्रत्येकी शंभरहून अधिक बाधित रुग्णांची संख्या आहे. क्षेत्रीय कार्यालयनिहाय आढावा घेतल्यानंतर सर्वाधिक रुग्ण हे हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आहेत. या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३०२ बाधित रुग्णांची संख्या आहे. तर नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २८०, औंध-बाणेर २३१, तर बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २०० बाधित रुग्ण आढळून आले आहेत. खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी लादलेल्या मर्यादांची अंमलबजावणी होत नसल्यानेच कोरोनाची साथ वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे यापुढे बाजारपेठांसह ज्या भागांत गर्दी होते, तेथे कारवाईची मोहीम असेल. - रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 19, 2021

पुण्यात आता गर्दीच्या ठिकाणी महापालिकेसह पोलिसांची राहणार गस्त पुणे - पुण्यात कोरोनाच्या रुग्णांचा रोजचा आकडा तीन हजारापर्यंत जात असल्याने धास्तावलेल्या महापालिकेने आता पुन्हा आपली यंत्रणा बाजारपेठांमध्ये उतरवून तेथील गर्दी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात दुकाने, हॉटेल, मॉल व अन्य गर्दीच्या ठिकाणी महापालिकेसह पोलिसांची गस्त राहणार आहे. ज्यामुळे सोशल डिस्टन्स पाळण्यापासून मास्क नसलेल्यांवर कारवाई होणार आहे. क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर नियोजन करीत, आपापल्या हद्दीत खबरदारीच्या उपायांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठीची ताकीद क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यात क्षेत्रीय अधिकाऱ्यांपासून त्यांच्याकडील आरोग्य खात्याची टीम पूर्णवेळ काम करेल, असे महापालिका प्रशासनाने बजावले आहे. या मोहिमेत पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तरीही सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी होत असल्याने परिस्थिती आणखी चिंताजनक होण्याची भीती आहे. मागील वर्षी मार्च ते सप्टेंबर या कालावधीत रोज सापडलेल्या रुग्णांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण होत असल्याचे आकडे आहेत. त्यातच सर्व व्यवहार सुरळीत असतानाही, खबरदारीच्या उपायांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता ज्या ठिकाणी तासनतास लोकांची गर्दी होत आहे, अशा ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयांकडील आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांकडे जबाबदारी दिली आहे.  ...तर ‘पीपीई किट’ घालून ‘एमपीएससी’ परीक्षा कडक कारवाई शहरातील भाजी मंडईमध्ये लोकांची गर्दी होत असल्याची बाब महापालिकेने गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळे अशा परिसरांत पहाटेपासून आरोग्य कर्मचाऱ्यांची गस्त राहणार आहे. विशेषतः मंडईमधील व्यापाऱ्यांनाच काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तरीही, कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांकडे दुर्लक्ष झाल्यास कारवाई होणार आहे.  तरुणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या सोसायट्यांमध्ये शिरकाव शहरातील सोसायट्यांमध्ये कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. बाणेर-बालेवाडी आणि पाषाण परिसरातील सोसायट्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पुणे महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या आढावा घेतल्यानंतर सोसायट्यांच्या परिसरात या विषाणूचा झपाट्याने प्रसार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षी पुणे शहरात कोरोना बाधितांचा पहिला रुग्ण हा सोसायटीमध्ये आढळून आला होता. त्यानंतर तो गावठाण आणि झोपडपट्ट्यांच्या परिसरात पसरला होता. दुसऱ्या लाटेत देखील पुन्हा तोच ट्रेन्ड असल्याचे दिसून आले आहे. बाणेर-बालेवाडी आणि पाषाण परिसरातील सोसायट्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे १४२ बाधित रुग्ण आहेत. त्या खालोखाल उर्वरित लोहगावच्या परिसरात ११९ रुग्ण असून सॅलिसबरी पार्क, आंबेगाव, दत्तनगर, कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, वडगावशेरी आणि कल्याणीनगर या परिसरात प्रत्येकी शंभरहून अधिक बाधित रुग्णांची संख्या आहे. क्षेत्रीय कार्यालयनिहाय आढावा घेतल्यानंतर सर्वाधिक रुग्ण हे हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आहेत. या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३०२ बाधित रुग्णांची संख्या आहे. तर नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २८०, औंध-बाणेर २३१, तर बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २०० बाधित रुग्ण आढळून आले आहेत. खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी लादलेल्या मर्यादांची अंमलबजावणी होत नसल्यानेच कोरोनाची साथ वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे यापुढे बाजारपेठांसह ज्या भागांत गर्दी होते, तेथे कारवाईची मोहीम असेल. - रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3vIcsbN

No comments:

Post a Comment