‘हरवलेल्या’ बाळाची कहाणी ‘अहो, काका खरंच सांगतो. मी हरवलो नाही की माझे अपहरणही झाले नाही. माझी आज क्रिकेटची मॅच आहे, तिकडे मी खेळायला चाललोय.’ काकुळतीला येत  दहा वर्षाच्या स्वप्नीलने म्हटले. ‘असं कसं ! आमच्या अनेक व्हॉटसअप ग्रुपवर ‘हरवलाय’ म्हणून तुझा फोटो आलाय. सुखरूप आणून देणाऱ्यास पन्नास हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केलंय. आम्ही एवढ्या पैशांवर पाणी सोडू म्हणतोस होय? जमणार नाही ! मुकाट्याने आमच्याबरोबर तुझ्या घरी चल.’ चाळिशीतील काकाने म्हटले. ‘अहो काका, दीड वर्षांपूर्वी मी चुकलो होतो हो ! त्यावेळी माझ्या मामाने एका व्हॉटसअप ग्रुपवर मी हरवलो असल्याची पोस्ट टाकली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी मला एका पोलिसकाकांनी सुखरूप घरी आणून सोडलं होतं. मात्र, तेव्हापासून मी रस्त्यात दिसलो, की माझे कसलेही म्हणणे न एेकता मला घरी आणून सोडतात. पहिले सहा महिने तर मला शाळेतही जाता आले नाही. शाळेत जायला लागलो, की लोकं मला रस्त्यात अडवून घरी सोडायचे. त्यानंतरचे सहा महिने लॉकडाऊनमध्ये गेल्याने घराबाहेरच पडलो नाही. पण आता कशासाठीही बाहेर पडलो तरी लोकं मला सरळ घरी आणून सोडतात. गेल्या दीड वर्षात ७२ वेळा लोकांनी मला घरी आणून सोडलंय. यामुळे मी आणि माझे कुटुंबीयदेखील वैतागून गेलोय.’ - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘काहीही थापा मारू नकोस. तू हरवला आहेस आणि तुला घरी सोडणं देशाचा सुजाण नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे. मला पैसे नाही मिळाले तरी चालतील पण तुला मी सुखरूप घरी सोडणार म्हणजे सोडणारच.’ काकांनीही आपला निर्धार व्यक्त केला. ‘ठीक आहे. तुमच्या इच्छेनुसार होऊ द्या पण माझी एवढी मॅच होऊ द्या. नाहीतरी आज मला न्यायला बाबा येणार नाहीत. तुम्ही मला घरी सोडा. पण घरी आल्यानंतर पैशांची मागणी करू नका. शिवाय चहा- पाणी मिळेल, अशी अपेक्षाही ठेवू नका.’ स्वप्नीलने म्हटले.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘आणि महत्त्वाचे म्हणजे आधारकार्ड वा लायसनची झेरॉक्स मला द्या. मी ती व्हॉटसअपवरून घरी पाठवतो म्हणजे माझे अपहरण झाल्यास तुम्हाला शोधणे सोपे होईल.’ स्वप्नीलने म्हटले. यावर ते काका कावरे बावरे झाले. ‘तुझी मॅच चार- पाच तास तरी चालेल. मला तेवढा वेळ नाही. तू चुकला नाहीस, यावर मी विश्‍वास ठेवतो.’’ असे म्हणून त्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास परत दोघांनी स्वप्नीलला अडवले व व्हॉटसअपमध्ये बघून खातरजमा केली. ‘अरे हाच आहे तो.’’ असे म्हणून त्यांनी स्वप्नीलचा हात धरला. मग त्याने सकाळचीच कॅसेट त्यांना ऐकवली. सगळं ऐकून घेतल्यानंतर त्या दोघांचाही विश्‍वास बसला. थोडं चालत गेल्यानंतर स्वप्नीलला रस्त्यात दोन पोलिस दिसले. त्यांना पाहून त्याला हायसे वाटले. ‘‘काका...काका मला वाचवा. मी कोणत्याही कामानिमित्त घराबाहेर पडलो तरी मला कोणीही धरते आणि घरी सोडते. अशा लोकांना तुम्ही शिक्षा करा.’ स्वप्नीलने विनवणी केली. त्यानंतर त्याने सगळी कहाणी सांगितली. त्यावर पोलिसकाका म्हणाले, ‘‘अरे बाळा ! यातून सुटण्याचा एक सोपा मार्ग आहे. बाहेर पडताना तोंडावर नेहमी मास्क लावत जा. त्यामुळे लोकांपासूनच काय पण कोरोनापासूनही तू वाचशील.’ स्वप्नीलला त्यांचे म्हणणे एकदम पटले.  ‘आणि आता मास्क घातला नाहीस, त्याचा पाचशे रूपये दंड भर. तुझ्याकडे एवढे पैसे नसतील तर तुला तुझ्या घरी सोडतो आणि घरच्यांकडून दंड वसूल करतो.’ असे म्हणून पोलिसकाकांनी स्वप्नीलला घरी सोडण्यासाठी गाडीवर बसवले. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 24, 2021

‘हरवलेल्या’ बाळाची कहाणी ‘अहो, काका खरंच सांगतो. मी हरवलो नाही की माझे अपहरणही झाले नाही. माझी आज क्रिकेटची मॅच आहे, तिकडे मी खेळायला चाललोय.’ काकुळतीला येत  दहा वर्षाच्या स्वप्नीलने म्हटले. ‘असं कसं ! आमच्या अनेक व्हॉटसअप ग्रुपवर ‘हरवलाय’ म्हणून तुझा फोटो आलाय. सुखरूप आणून देणाऱ्यास पन्नास हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केलंय. आम्ही एवढ्या पैशांवर पाणी सोडू म्हणतोस होय? जमणार नाही ! मुकाट्याने आमच्याबरोबर तुझ्या घरी चल.’ चाळिशीतील काकाने म्हटले. ‘अहो काका, दीड वर्षांपूर्वी मी चुकलो होतो हो ! त्यावेळी माझ्या मामाने एका व्हॉटसअप ग्रुपवर मी हरवलो असल्याची पोस्ट टाकली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी मला एका पोलिसकाकांनी सुखरूप घरी आणून सोडलं होतं. मात्र, तेव्हापासून मी रस्त्यात दिसलो, की माझे कसलेही म्हणणे न एेकता मला घरी आणून सोडतात. पहिले सहा महिने तर मला शाळेतही जाता आले नाही. शाळेत जायला लागलो, की लोकं मला रस्त्यात अडवून घरी सोडायचे. त्यानंतरचे सहा महिने लॉकडाऊनमध्ये गेल्याने घराबाहेरच पडलो नाही. पण आता कशासाठीही बाहेर पडलो तरी लोकं मला सरळ घरी आणून सोडतात. गेल्या दीड वर्षात ७२ वेळा लोकांनी मला घरी आणून सोडलंय. यामुळे मी आणि माझे कुटुंबीयदेखील वैतागून गेलोय.’ - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘काहीही थापा मारू नकोस. तू हरवला आहेस आणि तुला घरी सोडणं देशाचा सुजाण नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे. मला पैसे नाही मिळाले तरी चालतील पण तुला मी सुखरूप घरी सोडणार म्हणजे सोडणारच.’ काकांनीही आपला निर्धार व्यक्त केला. ‘ठीक आहे. तुमच्या इच्छेनुसार होऊ द्या पण माझी एवढी मॅच होऊ द्या. नाहीतरी आज मला न्यायला बाबा येणार नाहीत. तुम्ही मला घरी सोडा. पण घरी आल्यानंतर पैशांची मागणी करू नका. शिवाय चहा- पाणी मिळेल, अशी अपेक्षाही ठेवू नका.’ स्वप्नीलने म्हटले.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘आणि महत्त्वाचे म्हणजे आधारकार्ड वा लायसनची झेरॉक्स मला द्या. मी ती व्हॉटसअपवरून घरी पाठवतो म्हणजे माझे अपहरण झाल्यास तुम्हाला शोधणे सोपे होईल.’ स्वप्नीलने म्हटले. यावर ते काका कावरे बावरे झाले. ‘तुझी मॅच चार- पाच तास तरी चालेल. मला तेवढा वेळ नाही. तू चुकला नाहीस, यावर मी विश्‍वास ठेवतो.’’ असे म्हणून त्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास परत दोघांनी स्वप्नीलला अडवले व व्हॉटसअपमध्ये बघून खातरजमा केली. ‘अरे हाच आहे तो.’’ असे म्हणून त्यांनी स्वप्नीलचा हात धरला. मग त्याने सकाळचीच कॅसेट त्यांना ऐकवली. सगळं ऐकून घेतल्यानंतर त्या दोघांचाही विश्‍वास बसला. थोडं चालत गेल्यानंतर स्वप्नीलला रस्त्यात दोन पोलिस दिसले. त्यांना पाहून त्याला हायसे वाटले. ‘‘काका...काका मला वाचवा. मी कोणत्याही कामानिमित्त घराबाहेर पडलो तरी मला कोणीही धरते आणि घरी सोडते. अशा लोकांना तुम्ही शिक्षा करा.’ स्वप्नीलने विनवणी केली. त्यानंतर त्याने सगळी कहाणी सांगितली. त्यावर पोलिसकाका म्हणाले, ‘‘अरे बाळा ! यातून सुटण्याचा एक सोपा मार्ग आहे. बाहेर पडताना तोंडावर नेहमी मास्क लावत जा. त्यामुळे लोकांपासूनच काय पण कोरोनापासूनही तू वाचशील.’ स्वप्नीलला त्यांचे म्हणणे एकदम पटले.  ‘आणि आता मास्क घातला नाहीस, त्याचा पाचशे रूपये दंड भर. तुझ्याकडे एवढे पैसे नसतील तर तुला तुझ्या घरी सोडतो आणि घरच्यांकडून दंड वसूल करतो.’ असे म्हणून पोलिसकाकांनी स्वप्नीलला घरी सोडण्यासाठी गाडीवर बसवले. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3vYCB67

No comments:

Post a Comment