जागतिक चिमणीदिनाला कावळेदादांची काव काव!   ‘चिव...चिव...चिऽव...चिऽव...चिऽऽऽव....चिऽऽऽऽव...अहो, लक्ष कुठंय तुमचं? मघाधरनं चारवेळा मी तुम्हाला आवाज दिला. दिवसभरात ‘काडी’चं काम करत नाही. मी म्हणून टिकले नाहीतर दुसरी एखादी कधीच घरटं सोडून गेली असती.’’ आज सकाळीच चिमणीताईंनी चिमणरावांवर तोफ डागली. ‘आज जागतिक चिमणीदिन आहे. त्यामुळे तू फक्त आराम कर. घरट्यातील सगळी कामे मी करतो,’ असे आश्‍वासन चिमणरावांनी दिलं होतं. मात्र, ते हवेतच विरलं होतं.   ‘अगं, शेजारच्या घरट्यात एक नवीन चिमणी राहायला आलीय. तिच्याकडे बघत होतो. शेजारधर्म म्हणून तिची विचारपूस नको करायला?’’ चिमणरावांनी असं म्हटल्यावर चिमणीताईंचा राग अनावर झाला.  ‘तरी म्हटलं हा बाबा सकाळपासून आरशासमोर उभं राहून, एवढा का नटतोय?’ चिमणीताईंनी टोमणा मारला.  ‘अगं आज तरी माझ्यावर संशय घेऊ नकोस. तू घरट्यात असताना मी दुसऱ्या चिमणीकडे त्या नजरेने बघणे तरी शक्य आहे का?’ यावर चिमणीताई गप्प बसल्या. मात्र, दूरवर गिरक्या घेणाऱ्या चिमण्यांना पाहून, ‘या चिमण्यांनो, परत फिरा रे..’ हे गाणं गुणगुणत चिमणराव काम करू लागले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा   ‘हे बघा, व्हॉटसअप व फेसबुकवर चिमणीदिनाच्या आलेल्या शुभेच्छांना मी दिवसभर उत्तरं देत बसणार आहे. त्यामुळं पिल्लांना न्हाऊमुखू घालणं, गंध- पावडर करणं, त्यांना भरवणं ही कामे नीट करा आणि आपल्या दोघांसाठी छान, ताजे किडे आणि धान्ये आणा. रात्री आपण मस्त पार्टी करू.’ असं म्हणून चिमणीताईंनी मोबाईलमध्ये डोकं घातलं.  खरं तर वर्षातील एकच दिवस ‘चिमणीदिन’ म्हणून साजरा करावा व उर्वरित ३६४ दिवस घरट्यातील व घरट्याबाहेरही मरमर काम करणं, पिल्लांना वाढवणे, म्हाताऱ्या सासू- सासऱ्यांना दाणा- पाणी करणे, चिमणरावचे हवं- नको ते बघणे यातच चिमणीताईची तारेवरची कसरत सुरू असायची.  पुण्यात पाठोपाठ बारामतीत पसरतोय कोरोना  संसारातील कामे दोघांनीही निम्मी निम्मी वाटून घ्यावी, असे तिला सारखे वाटायचे. मात्र, प्रत्यक्षात ते होत नव्हतं. धांदरट, आळशी आणि घरट्यातील कामाची कोणतीही जबाबदारी टाळणाऱ्या चिमणरावांबरोबर संसार करून, तिचा जीव मेटाकुटीला यायचा. मात्र, याला काही पर्यायही नव्हता. मात्र, दरवर्षी २० मार्चला जागतिक चिमणीदिनानिमित्त चिमणराव चिमणीताईंना एक दिवस हक्काची सुटी द्यायचे. मात्र, काहीतरी घोळ घालून, तिचे काम आणखी वाढवून ठेवायचे. ही गेल्या काही वर्षाची परंपरा बनली होती.        थोड्याच वेळात घरट्याची बेल दोन- तीन वेळा वाजली. चिमणराव दरवाजाजवळ गेले. बाहेर कावळेदादा उभे होते. ‘चिऊताई.. चिऊताई दार उघड.’ असे ते म्हणत होते. अशावेळी काय करायचं असतं, हे चिमणरावांना कळेना. ‘चिमणराव, माझं घरटं वाहून गेलंय. मला तुमच्या घरट्यात आश्रय द्या. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही.’ कावळेदादांनी म्हटले.  ‘मला जरा हिचा सल्ला घ्यावा लागेल.’ चिमणरावांनी असे म्हटल्यावर कावळेदादांना मागचा प्रसंग आठवला. मागे एकदा घरटं वाहून गेल्यानंतर आश्रयासाठी आपण चिऊताईला किती विनवण्या केल्या होत्या. मात्र, ‘थांब माझ्या बाळाला न्हाऊ घालू दे...थांब माझ्या बाळाला गंध पावडर करू दे’ असे म्हणत रात्रभर तिष्ठत ठेवलं होतं. आताही तसेच घडेल, याची कावळेदादाला खात्री होती. पुणे : कोरोना विषाणूचं वर्तन बदलतंय?; एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींना होतेय लागण ‘चिमणराव, घरटं तुमच्या नावावर आहे. तुम्ही घरट्याचे मालक आहात. चिमणीताईला काय विचारताय? मला घरट्यात येऊ द्या. आपण मस्त ओली पार्टी करू.’’ कावळेदादांच्या या बोलण्यावर चिमणरावांनी मान डोलावली. ‘‘अगं, कावळेदादांचे घरटे वाहून गेलंय. आपली अडचण होईल पण सहन करू. चिमणीदिन पुढच्या आठवड्यात साजरा करू. आता थोडं आमच्या पार्टीचं बघ ना.’’ चिमणरावांनी असे म्हटल्यावर चिमणीताईंनी ‘तुम्हाला अक्कल कधी येणार?’ असे पुटपुटत पाय आपटत ती स्वयंपाकघरात गेली. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 20, 2021

जागतिक चिमणीदिनाला कावळेदादांची काव काव!   ‘चिव...चिव...चिऽव...चिऽव...चिऽऽऽव....चिऽऽऽऽव...अहो, लक्ष कुठंय तुमचं? मघाधरनं चारवेळा मी तुम्हाला आवाज दिला. दिवसभरात ‘काडी’चं काम करत नाही. मी म्हणून टिकले नाहीतर दुसरी एखादी कधीच घरटं सोडून गेली असती.’’ आज सकाळीच चिमणीताईंनी चिमणरावांवर तोफ डागली. ‘आज जागतिक चिमणीदिन आहे. त्यामुळे तू फक्त आराम कर. घरट्यातील सगळी कामे मी करतो,’ असे आश्‍वासन चिमणरावांनी दिलं होतं. मात्र, ते हवेतच विरलं होतं.   ‘अगं, शेजारच्या घरट्यात एक नवीन चिमणी राहायला आलीय. तिच्याकडे बघत होतो. शेजारधर्म म्हणून तिची विचारपूस नको करायला?’’ चिमणरावांनी असं म्हटल्यावर चिमणीताईंचा राग अनावर झाला.  ‘तरी म्हटलं हा बाबा सकाळपासून आरशासमोर उभं राहून, एवढा का नटतोय?’ चिमणीताईंनी टोमणा मारला.  ‘अगं आज तरी माझ्यावर संशय घेऊ नकोस. तू घरट्यात असताना मी दुसऱ्या चिमणीकडे त्या नजरेने बघणे तरी शक्य आहे का?’ यावर चिमणीताई गप्प बसल्या. मात्र, दूरवर गिरक्या घेणाऱ्या चिमण्यांना पाहून, ‘या चिमण्यांनो, परत फिरा रे..’ हे गाणं गुणगुणत चिमणराव काम करू लागले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा   ‘हे बघा, व्हॉटसअप व फेसबुकवर चिमणीदिनाच्या आलेल्या शुभेच्छांना मी दिवसभर उत्तरं देत बसणार आहे. त्यामुळं पिल्लांना न्हाऊमुखू घालणं, गंध- पावडर करणं, त्यांना भरवणं ही कामे नीट करा आणि आपल्या दोघांसाठी छान, ताजे किडे आणि धान्ये आणा. रात्री आपण मस्त पार्टी करू.’ असं म्हणून चिमणीताईंनी मोबाईलमध्ये डोकं घातलं.  खरं तर वर्षातील एकच दिवस ‘चिमणीदिन’ म्हणून साजरा करावा व उर्वरित ३६४ दिवस घरट्यातील व घरट्याबाहेरही मरमर काम करणं, पिल्लांना वाढवणे, म्हाताऱ्या सासू- सासऱ्यांना दाणा- पाणी करणे, चिमणरावचे हवं- नको ते बघणे यातच चिमणीताईची तारेवरची कसरत सुरू असायची.  पुण्यात पाठोपाठ बारामतीत पसरतोय कोरोना  संसारातील कामे दोघांनीही निम्मी निम्मी वाटून घ्यावी, असे तिला सारखे वाटायचे. मात्र, प्रत्यक्षात ते होत नव्हतं. धांदरट, आळशी आणि घरट्यातील कामाची कोणतीही जबाबदारी टाळणाऱ्या चिमणरावांबरोबर संसार करून, तिचा जीव मेटाकुटीला यायचा. मात्र, याला काही पर्यायही नव्हता. मात्र, दरवर्षी २० मार्चला जागतिक चिमणीदिनानिमित्त चिमणराव चिमणीताईंना एक दिवस हक्काची सुटी द्यायचे. मात्र, काहीतरी घोळ घालून, तिचे काम आणखी वाढवून ठेवायचे. ही गेल्या काही वर्षाची परंपरा बनली होती.        थोड्याच वेळात घरट्याची बेल दोन- तीन वेळा वाजली. चिमणराव दरवाजाजवळ गेले. बाहेर कावळेदादा उभे होते. ‘चिऊताई.. चिऊताई दार उघड.’ असे ते म्हणत होते. अशावेळी काय करायचं असतं, हे चिमणरावांना कळेना. ‘चिमणराव, माझं घरटं वाहून गेलंय. मला तुमच्या घरट्यात आश्रय द्या. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही.’ कावळेदादांनी म्हटले.  ‘मला जरा हिचा सल्ला घ्यावा लागेल.’ चिमणरावांनी असे म्हटल्यावर कावळेदादांना मागचा प्रसंग आठवला. मागे एकदा घरटं वाहून गेल्यानंतर आश्रयासाठी आपण चिऊताईला किती विनवण्या केल्या होत्या. मात्र, ‘थांब माझ्या बाळाला न्हाऊ घालू दे...थांब माझ्या बाळाला गंध पावडर करू दे’ असे म्हणत रात्रभर तिष्ठत ठेवलं होतं. आताही तसेच घडेल, याची कावळेदादाला खात्री होती. पुणे : कोरोना विषाणूचं वर्तन बदलतंय?; एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींना होतेय लागण ‘चिमणराव, घरटं तुमच्या नावावर आहे. तुम्ही घरट्याचे मालक आहात. चिमणीताईला काय विचारताय? मला घरट्यात येऊ द्या. आपण मस्त ओली पार्टी करू.’’ कावळेदादांच्या या बोलण्यावर चिमणरावांनी मान डोलावली. ‘‘अगं, कावळेदादांचे घरटे वाहून गेलंय. आपली अडचण होईल पण सहन करू. चिमणीदिन पुढच्या आठवड्यात साजरा करू. आता थोडं आमच्या पार्टीचं बघ ना.’’ चिमणरावांनी असे म्हटल्यावर चिमणीताईंनी ‘तुम्हाला अक्कल कधी येणार?’ असे पुटपुटत पाय आपटत ती स्वयंपाकघरात गेली. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3f6opCp

No comments:

Post a Comment