विजेची तोडणी अन्‌ मनाची जोडणी मा. मुख्य अभियंता, सप्रेम नमस्कार! तुमची माणसे वीज तोडायला आली होती. त्यावेळी आम्ही त्यांचे हसत-मुखाने स्वागत केले व ‘चहा-पाणी घेणार का?’ असे सहज विचारले. आम्ही पुण्यात राहत असलो तरी दारी आलेल्या लोकांना चहा-पाण्याचे विचारतो. मात्र, आमचा प्रश्न ऐकून ही मंडळी भांबावली. ‘चहा-पाणी?’ असे चाचरत म्हणाली. नंतर आपापसांत चर्चा करून म्हणाली. ‘‘आता फार उशीर झालाय. आम्हाला वीज तोडायचा आदेश आहे,’’ असे म्हणून ही मंडळी आमचे चहा-पाणी न घेताच वीज तोडून निघून गेली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा साहेब, खरंतर हे पत्र आम्ही आपल्या  आभारासाठी लिहिले आहे. मागेही आमच्या मुलाचे लग्न नव्वद हजारांच्या वीजबिलामुळेच ठरले, याबद्दल आपले आभार मानले होते. ज्याला नव्वद हजारांचे वीजबिलच येते, त्यांचे घर केवढे असेल, या एकाच मुद्यावर मुलाचे लग्न ठरले. मात्र, हेच बिल सव्वा लाखावर गेल्यानंतर तुम्ही वीज तोडली. साहेब, वीज नसल्याने आमचे घर सध्या गुण्यागोविंदानं नांदू लागलंय. विजेअभावी टीव्ही चालत नाही. त्यामुळे तास न तास त्या इडियट बॉक्ससमोर कोणी बसत नाही. आपल्या घरात किती माणसे आहेत? त्यांचे स्वभाव कसे आहेत? याबाबतची माहिती आम्हाला नव्याने कळली. हल्ली आम्ही रोज एकमेकांशी मनोसक्त गप्पा मारतो. हसतो आणि खिदळतोही. खरंच सांगतो, आम्ही समजत होतो, तेवढी आमच्या घरातील माणसांचे स्वभाव वाईट नाहीत. स्वभावाबरोबरच वागणुकीलाही ती बरी वाटली. साहेब, पूर्वी आम्ही हॉटेलमध्ये जाऊन कॅंडल डिनरवर दोन-तीन हजार रुपये खर्च करायचो. मात्र, वीज नसल्यामुळे आम्ही हल्ली घरीच ‘कॅंडल डिनर’ करतो. एकमेकांशी गप्पा मारत जेवत असल्यामुळे जेवणाची चवही वाढली आहे. विजेअभावी मिक्सर चालत नाही. त्यामुळे अडगळीत पडलेले पाटा-वरवंटा वापरात आणला आहे. तुम्हाला सांगतो, भाजीची काय चव वाढलीय म्हणून सांगू?  पुणेकरांनो कोरोनाकाळात घ्या पुरेशी झोप; तज्ज्ञांनी सांगितले उपाय बॅटऱ्या उतरल्याने मोबाईलही कोणी फारसे वापरत नाही. त्यामुळे घरातील कोणीही टाइमपास करत नाहीत. हा वेळ सत्कारणी लागावा, यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. गिझर बंद असल्याने हल्ली आम्ही गॅसवरच पाणी तापवतो. हे तापवलेले पाणी दोन्ही हातात धरून बाथरूममध्ये नेतो. त्यामुळे सकाळी सकाळी वेट लिप्टिंगचा व्यायामही  घडतो. वॉशिंगमशीनचा उपयोग होत नसल्याने हाताने कपडे धुवावी लागतात. फ्रिजचा वापर होत नसल्याने रोज ताजा भाजीपाला खातोय. शिळंपाकं काही ठेवत नाही. कोणी पाहुणे येणार असतील तर इकडे वीज नाही, आपले येणे लांबणीवर टाकावे, असा निरोप देतो. मात्र, त्यातूनही कोणी आल्यास रात्रभर मच्छर व उकाड्याने हैराण होऊन, दुसऱ्या दिवशीच गाशा गुंडाळतो. साहेब, खरे तर आम्ही वीजबिल भरणार होतो. मात्र आपल्या खात्याच्या मंत्र्यांनीच वीजबिल माफ होईल, असे आश्वासन दिल्याने थांबलो. त्यानंतर दुसऱ्या एका मोठ्या नेत्याने बिल भरले नाही म्हणून वीज तोडणार नाही, अशी घोषणा केल्याने आम्ही निर्धास्त राहिलो. मात्र दोघांनीही घुमजाव केल्याने आमचे हाल झाले. कोणावरही विश्वास न ठेवता, आपण आपले बिल नियमित भरावे, हा धडा आम्ही यातून शिकलो आहोत.  *ता. क.* सव्वा लाखांचे बिल भरण्यासाठी आम्ही कर्जासाठी बॅंकांचे उंबरे झिजवत आहोत. कर्ज मंजूर झाल्यानंतर लगेचच बिल भरतो.  कळावे आपला विश्वासू  दिनुभाऊ पुणेकर Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 18, 2021

विजेची तोडणी अन्‌ मनाची जोडणी मा. मुख्य अभियंता, सप्रेम नमस्कार! तुमची माणसे वीज तोडायला आली होती. त्यावेळी आम्ही त्यांचे हसत-मुखाने स्वागत केले व ‘चहा-पाणी घेणार का?’ असे सहज विचारले. आम्ही पुण्यात राहत असलो तरी दारी आलेल्या लोकांना चहा-पाण्याचे विचारतो. मात्र, आमचा प्रश्न ऐकून ही मंडळी भांबावली. ‘चहा-पाणी?’ असे चाचरत म्हणाली. नंतर आपापसांत चर्चा करून म्हणाली. ‘‘आता फार उशीर झालाय. आम्हाला वीज तोडायचा आदेश आहे,’’ असे म्हणून ही मंडळी आमचे चहा-पाणी न घेताच वीज तोडून निघून गेली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा साहेब, खरंतर हे पत्र आम्ही आपल्या  आभारासाठी लिहिले आहे. मागेही आमच्या मुलाचे लग्न नव्वद हजारांच्या वीजबिलामुळेच ठरले, याबद्दल आपले आभार मानले होते. ज्याला नव्वद हजारांचे वीजबिलच येते, त्यांचे घर केवढे असेल, या एकाच मुद्यावर मुलाचे लग्न ठरले. मात्र, हेच बिल सव्वा लाखावर गेल्यानंतर तुम्ही वीज तोडली. साहेब, वीज नसल्याने आमचे घर सध्या गुण्यागोविंदानं नांदू लागलंय. विजेअभावी टीव्ही चालत नाही. त्यामुळे तास न तास त्या इडियट बॉक्ससमोर कोणी बसत नाही. आपल्या घरात किती माणसे आहेत? त्यांचे स्वभाव कसे आहेत? याबाबतची माहिती आम्हाला नव्याने कळली. हल्ली आम्ही रोज एकमेकांशी मनोसक्त गप्पा मारतो. हसतो आणि खिदळतोही. खरंच सांगतो, आम्ही समजत होतो, तेवढी आमच्या घरातील माणसांचे स्वभाव वाईट नाहीत. स्वभावाबरोबरच वागणुकीलाही ती बरी वाटली. साहेब, पूर्वी आम्ही हॉटेलमध्ये जाऊन कॅंडल डिनरवर दोन-तीन हजार रुपये खर्च करायचो. मात्र, वीज नसल्यामुळे आम्ही हल्ली घरीच ‘कॅंडल डिनर’ करतो. एकमेकांशी गप्पा मारत जेवत असल्यामुळे जेवणाची चवही वाढली आहे. विजेअभावी मिक्सर चालत नाही. त्यामुळे अडगळीत पडलेले पाटा-वरवंटा वापरात आणला आहे. तुम्हाला सांगतो, भाजीची काय चव वाढलीय म्हणून सांगू?  पुणेकरांनो कोरोनाकाळात घ्या पुरेशी झोप; तज्ज्ञांनी सांगितले उपाय बॅटऱ्या उतरल्याने मोबाईलही कोणी फारसे वापरत नाही. त्यामुळे घरातील कोणीही टाइमपास करत नाहीत. हा वेळ सत्कारणी लागावा, यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. गिझर बंद असल्याने हल्ली आम्ही गॅसवरच पाणी तापवतो. हे तापवलेले पाणी दोन्ही हातात धरून बाथरूममध्ये नेतो. त्यामुळे सकाळी सकाळी वेट लिप्टिंगचा व्यायामही  घडतो. वॉशिंगमशीनचा उपयोग होत नसल्याने हाताने कपडे धुवावी लागतात. फ्रिजचा वापर होत नसल्याने रोज ताजा भाजीपाला खातोय. शिळंपाकं काही ठेवत नाही. कोणी पाहुणे येणार असतील तर इकडे वीज नाही, आपले येणे लांबणीवर टाकावे, असा निरोप देतो. मात्र, त्यातूनही कोणी आल्यास रात्रभर मच्छर व उकाड्याने हैराण होऊन, दुसऱ्या दिवशीच गाशा गुंडाळतो. साहेब, खरे तर आम्ही वीजबिल भरणार होतो. मात्र आपल्या खात्याच्या मंत्र्यांनीच वीजबिल माफ होईल, असे आश्वासन दिल्याने थांबलो. त्यानंतर दुसऱ्या एका मोठ्या नेत्याने बिल भरले नाही म्हणून वीज तोडणार नाही, अशी घोषणा केल्याने आम्ही निर्धास्त राहिलो. मात्र दोघांनीही घुमजाव केल्याने आमचे हाल झाले. कोणावरही विश्वास न ठेवता, आपण आपले बिल नियमित भरावे, हा धडा आम्ही यातून शिकलो आहोत.  *ता. क.* सव्वा लाखांचे बिल भरण्यासाठी आम्ही कर्जासाठी बॅंकांचे उंबरे झिजवत आहोत. कर्ज मंजूर झाल्यानंतर लगेचच बिल भरतो.  कळावे आपला विश्वासू  दिनुभाऊ पुणेकर Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/38Xl0Sl

No comments:

Post a Comment