पुणे - गंभीर कोरोना रुग्णांसाठी मोफत रेमडिसीव्हर; ग्रामीण रुग्णालयातही उपलब्ध पुणे -  पुणे व पिंपरी चिंचवड शहरापाठोपाठ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही गंभीर कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी मोफत रेमडिसीव्हर इंजेक्शन्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ५ हजार इंजेकशन्सचे डोस खरेदी करण्यात आले आहेत. येत्या आठवडाभरात जिल्ह्यातील सर्व जिल्हा उप रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये हे डोस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या डोसच्या माध्यमातून सुमारे एक हजार गंभीर रुग्णांवर उपचार करता येणार आहेत.  जिल्हा रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून या डोसची खरेदी करण्यात आली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सद्यःस्थितीत देशात सर्वात कमी दर करार हा राजस्थान सरकारचा आहे. या दर करारानुसार प्रति डोसची किंमत १ हजार ११ रुपये ३६ पैसे इतकी आहे. याउलट महाराष्ट्र सरकारच्या या औषधांच्या दरकरारानुसारची किंमत राजस्थानच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे राजस्थान सरकारच्या दर करारानुसार देशातील सर्वात कमी किमतीत हे इंजेक्शन्स खरेदी करण्यात आल्याचे जिल्हा रुग्णकल्याण समितीचे सहअध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी (ता. १९) सांगितले. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जिल्हास्तरावर जिल्हा रुग्ण कल्याण समिती कार्यरत आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे या जिल्हा रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष तर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे सहअध्यक्ष आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर हे या समितीचे सदस्य-सचिव आहेत. आपत्कालीन स्थितीत निर्माण झालेल्या संसर्गजन्य आजारांवरील उपचारांसाठी रुग्णांना मोफत औषधोपचार मिळावेत, यासाठी या समितीच्या माध्यमातून आवश्‍यकतेनुसार औषध खरेदी करण्यात येते. यानुसार पहिल्या टप्प्यात ५० लाख ५६ हजार ८०० रुपयांचे रेमडिसीव्हर इंजेक्शन्स खरेदी करण्यात आले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील गंभीर कोरोना रुग्णांनाही आता सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत रेमडिसीव्हरचा डोस मिळू शकणार आहे. पुणे जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयाव्यतिरिक्त पाच उपजिल्हा रुग्णालये आणि १९ ग्रामीण रुग्णालये अशी एकूण २४ सरकारी रुग्णालये कार्यरत आहेत. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 19, 2021

पुणे - गंभीर कोरोना रुग्णांसाठी मोफत रेमडिसीव्हर; ग्रामीण रुग्णालयातही उपलब्ध पुणे -  पुणे व पिंपरी चिंचवड शहरापाठोपाठ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही गंभीर कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी मोफत रेमडिसीव्हर इंजेक्शन्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ५ हजार इंजेकशन्सचे डोस खरेदी करण्यात आले आहेत. येत्या आठवडाभरात जिल्ह्यातील सर्व जिल्हा उप रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये हे डोस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या डोसच्या माध्यमातून सुमारे एक हजार गंभीर रुग्णांवर उपचार करता येणार आहेत.  जिल्हा रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून या डोसची खरेदी करण्यात आली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सद्यःस्थितीत देशात सर्वात कमी दर करार हा राजस्थान सरकारचा आहे. या दर करारानुसार प्रति डोसची किंमत १ हजार ११ रुपये ३६ पैसे इतकी आहे. याउलट महाराष्ट्र सरकारच्या या औषधांच्या दरकरारानुसारची किंमत राजस्थानच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे राजस्थान सरकारच्या दर करारानुसार देशातील सर्वात कमी किमतीत हे इंजेक्शन्स खरेदी करण्यात आल्याचे जिल्हा रुग्णकल्याण समितीचे सहअध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी (ता. १९) सांगितले. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जिल्हास्तरावर जिल्हा रुग्ण कल्याण समिती कार्यरत आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे या जिल्हा रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष तर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे सहअध्यक्ष आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर हे या समितीचे सदस्य-सचिव आहेत. आपत्कालीन स्थितीत निर्माण झालेल्या संसर्गजन्य आजारांवरील उपचारांसाठी रुग्णांना मोफत औषधोपचार मिळावेत, यासाठी या समितीच्या माध्यमातून आवश्‍यकतेनुसार औषध खरेदी करण्यात येते. यानुसार पहिल्या टप्प्यात ५० लाख ५६ हजार ८०० रुपयांचे रेमडिसीव्हर इंजेक्शन्स खरेदी करण्यात आले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील गंभीर कोरोना रुग्णांनाही आता सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत रेमडिसीव्हरचा डोस मिळू शकणार आहे. पुणे जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयाव्यतिरिक्त पाच उपजिल्हा रुग्णालये आणि १९ ग्रामीण रुग्णालये अशी एकूण २४ सरकारी रुग्णालये कार्यरत आहेत. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3c4DYsa

No comments:

Post a Comment