नवले उड्डाणपूल दुर्घटनांचा प्रश्न सुटणार; उपाययोजनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली डेडलाइन पुणे : कात्रजच्या नवीन बोगद्यापासून नवले उड्डाणपूल आणि वारजेपर्यंत होणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. या महामार्गावर येत्या ३१ मार्चपर्यंत आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधित विभागाला दिल्या.  जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलिस अधिकाऱ्यांची गुरुवारी (ता.४) बैठक घेतली. - मोठी बातमी : गजा मारणे आणि साथीदारांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला​ महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी ‘सेव्ह लाइफ फौंडेशन’ या संस्थेने कात्रजच्या नवीन बोगद्यापासून नवले उड्डाणपूल आणि वारजेपर्यंत तसेच कात्रज चौकापर्यंत कोणत्या उपाययोजना कराव्यात, याचा अहवाल बैठकीत सादर केला. या अहवालात महामार्गाच्या सुरक्षिततेसाठी निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. त्यानुसार नवले उड्डाणपुलाच्या खाली पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी रस्ता नाही. रस्त्यावर क्रॅश बॅरिअर्सचा अभाव, सर्व्हिस लेनमध्ये पार्किंग आणि विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. - पुणे झेडपीतील अंतर्गत वादाची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली दखल; दोन्ही गटांची कानउघाडणी​ वाहनांसाठी वेग मर्यादा आणि इतर फलक नाहीत. महामार्गाच्या कडेला प्रवासी बसची वाट पाहत थांबलेले असतात. याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यासह प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. या अहवालातील निरीक्षणांनुसार जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. येत्या ३१ मार्चपर्यंत उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. - बेरोजगार तरुणांसाठी सरकारचं 'सक्षम' पाऊल; पोर्टलमधून मिळणार १० लाखांना रोजगार नवले उड्डाणपुलावरील अपघात रोखण्यासाठी कामे सुरू करण्यात आली आहेत. येत्या ३१ मार्चपर्यंत इतर उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यानंतर पुन्हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांसह महामार्गाची तपासणी करण्यात येणार आहे.  - डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 4, 2021

नवले उड्डाणपूल दुर्घटनांचा प्रश्न सुटणार; उपाययोजनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली डेडलाइन पुणे : कात्रजच्या नवीन बोगद्यापासून नवले उड्डाणपूल आणि वारजेपर्यंत होणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. या महामार्गावर येत्या ३१ मार्चपर्यंत आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधित विभागाला दिल्या.  जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलिस अधिकाऱ्यांची गुरुवारी (ता.४) बैठक घेतली. - मोठी बातमी : गजा मारणे आणि साथीदारांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला​ महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी ‘सेव्ह लाइफ फौंडेशन’ या संस्थेने कात्रजच्या नवीन बोगद्यापासून नवले उड्डाणपूल आणि वारजेपर्यंत तसेच कात्रज चौकापर्यंत कोणत्या उपाययोजना कराव्यात, याचा अहवाल बैठकीत सादर केला. या अहवालात महामार्गाच्या सुरक्षिततेसाठी निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. त्यानुसार नवले उड्डाणपुलाच्या खाली पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी रस्ता नाही. रस्त्यावर क्रॅश बॅरिअर्सचा अभाव, सर्व्हिस लेनमध्ये पार्किंग आणि विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. - पुणे झेडपीतील अंतर्गत वादाची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली दखल; दोन्ही गटांची कानउघाडणी​ वाहनांसाठी वेग मर्यादा आणि इतर फलक नाहीत. महामार्गाच्या कडेला प्रवासी बसची वाट पाहत थांबलेले असतात. याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यासह प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. या अहवालातील निरीक्षणांनुसार जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. येत्या ३१ मार्चपर्यंत उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. - बेरोजगार तरुणांसाठी सरकारचं 'सक्षम' पाऊल; पोर्टलमधून मिळणार १० लाखांना रोजगार नवले उड्डाणपुलावरील अपघात रोखण्यासाठी कामे सुरू करण्यात आली आहेत. येत्या ३१ मार्चपर्यंत इतर उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यानंतर पुन्हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांसह महामार्गाची तपासणी करण्यात येणार आहे.  - डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/30fp5wo

No comments:

Post a Comment