साथ नियंत्रण विभागच व्हेंटिलेटरवर सिंधुदुर्गनगरी -  राज्याच्या जिल्हा हिवताप विभागामध्ये जिल्हा हिवताप अधिकारी या प्रमुख पदासह तब्बल 94 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे साथीच्या आजारांवर उपाययोजना करणाऱ्या विभागालाच रिक्त पदांचा आजार जडला आहे.  राज्य शासनाचा जिल्हा हिवताप विभाग, जिल्ह्यात कार्यरत असून या विभागाचे जिल्हा हिवताप अधिकारी हे प्रमुख पद गेली तीन वर्षे रिक्त आहेत. या व्यतिरिक्त आरोग्य सेवकांच्या 94 मंजूर पदांपैकी 54 पदे भरली असून 40 पदे रिक्त आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ 39 मंजूर पदांपैकी केवळ 5 पदे भरली असून 34 पदे रिक्त आहेत. आरोग्य सहाय्यकांच्या 40 मंजूर पदांपैकी 24 पदे भरली असून 16 पदे रिक्त आहेत तर फिल्ड वर्करची 7 पदे मंजूर असून त्यापैकी 4 पदे भरली आहेत व 3 पदे रिक्त आहेत. जिल्हा हिवताप अधिकारी हे प्रमुख पद गेली तीन वर्षे रिक्त असून या पदाचा कार्यभार प्रभारी अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे. अशाप्रकारे जिल्ह्यातील साथरोगांवर नियंत्रण ठठेवणाऱ्या जिल्हा हिवताप विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह सद्यस्थितीत 94 पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी गतवर्षी राज्य शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार रिक्त पदे भरण्यासाठी गतवर्षी परीक्षेची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली; मात्र त्यानंतर ही पदे का भरण्यात आली नाहीत. याबाबत या विभागाकडे कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.  जिल्ह्यातील साथ रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रमुख भूमिका बजावणाऱ्या जिल्हा हिवताप विभाग रिक्त पदांमुळे कमकुवत बनला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिवताप, लेप्टो, डेंग्यू , माकड ताप, यासारखे विविध साथरोगाचे रूग्ण आढळतात. अशावेळी आरोग्य विभागाची धावपळ उड़ते. रिक्त पदांमुळे मनुष्यबळाअभावी साथ रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी कसरत करावी लागते. त्यामुळे जिल्हा हिवताप विभागाकडून रिक्त पदांचा अहवाल पाठवून ही पदे भरण्याबाबत वारंवार मागणी केली जात असतानाही अद्याप ही पदे भरण्यात आलेली नाही. रिक्त पदे भरण्यासाठी गतवर्षी परीक्षेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असली तरी ही पदे का भरली गेली नाहीत याबाबत शासनाकडून कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्याचा हिवताप विभाग रिक्त पदांमुळे कमकुवत बनला आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्यस्थितीत हिवताप, लेप्टो, डेंग्यू, चिकुनगुनिया, माकडताप, यासारखे कोणतेही साथीचे रुग्ण नाहीत; मात्र पावसाळ्यात लेप्टो, डेंग्यू, हिवताप, यासारखे साथीचे आजार पसरण्याची शक्‍यता असते. अशावेळी उद्भवलेल्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अधिक मनुष्यबळाची गरज असते; मात्र हिवताप विभागात विविध महत्त्वाची पदे रिक्त असल्यामुळे साथीच्या काळात कसरत करावी लागते. तरी शासनाने या विभागातील रिक्त पदे तातडीने भरणे अपेक्षित आहे.  - रमेश कर्तस्कर, प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 19, 2021

साथ नियंत्रण विभागच व्हेंटिलेटरवर सिंधुदुर्गनगरी -  राज्याच्या जिल्हा हिवताप विभागामध्ये जिल्हा हिवताप अधिकारी या प्रमुख पदासह तब्बल 94 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे साथीच्या आजारांवर उपाययोजना करणाऱ्या विभागालाच रिक्त पदांचा आजार जडला आहे.  राज्य शासनाचा जिल्हा हिवताप विभाग, जिल्ह्यात कार्यरत असून या विभागाचे जिल्हा हिवताप अधिकारी हे प्रमुख पद गेली तीन वर्षे रिक्त आहेत. या व्यतिरिक्त आरोग्य सेवकांच्या 94 मंजूर पदांपैकी 54 पदे भरली असून 40 पदे रिक्त आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ 39 मंजूर पदांपैकी केवळ 5 पदे भरली असून 34 पदे रिक्त आहेत. आरोग्य सहाय्यकांच्या 40 मंजूर पदांपैकी 24 पदे भरली असून 16 पदे रिक्त आहेत तर फिल्ड वर्करची 7 पदे मंजूर असून त्यापैकी 4 पदे भरली आहेत व 3 पदे रिक्त आहेत. जिल्हा हिवताप अधिकारी हे प्रमुख पद गेली तीन वर्षे रिक्त असून या पदाचा कार्यभार प्रभारी अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे. अशाप्रकारे जिल्ह्यातील साथरोगांवर नियंत्रण ठठेवणाऱ्या जिल्हा हिवताप विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह सद्यस्थितीत 94 पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी गतवर्षी राज्य शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार रिक्त पदे भरण्यासाठी गतवर्षी परीक्षेची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली; मात्र त्यानंतर ही पदे का भरण्यात आली नाहीत. याबाबत या विभागाकडे कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.  जिल्ह्यातील साथ रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रमुख भूमिका बजावणाऱ्या जिल्हा हिवताप विभाग रिक्त पदांमुळे कमकुवत बनला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिवताप, लेप्टो, डेंग्यू , माकड ताप, यासारखे विविध साथरोगाचे रूग्ण आढळतात. अशावेळी आरोग्य विभागाची धावपळ उड़ते. रिक्त पदांमुळे मनुष्यबळाअभावी साथ रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी कसरत करावी लागते. त्यामुळे जिल्हा हिवताप विभागाकडून रिक्त पदांचा अहवाल पाठवून ही पदे भरण्याबाबत वारंवार मागणी केली जात असतानाही अद्याप ही पदे भरण्यात आलेली नाही. रिक्त पदे भरण्यासाठी गतवर्षी परीक्षेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असली तरी ही पदे का भरली गेली नाहीत याबाबत शासनाकडून कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्याचा हिवताप विभाग रिक्त पदांमुळे कमकुवत बनला आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्यस्थितीत हिवताप, लेप्टो, डेंग्यू, चिकुनगुनिया, माकडताप, यासारखे कोणतेही साथीचे रुग्ण नाहीत; मात्र पावसाळ्यात लेप्टो, डेंग्यू, हिवताप, यासारखे साथीचे आजार पसरण्याची शक्‍यता असते. अशावेळी उद्भवलेल्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अधिक मनुष्यबळाची गरज असते; मात्र हिवताप विभागात विविध महत्त्वाची पदे रिक्त असल्यामुळे साथीच्या काळात कसरत करावी लागते. तरी शासनाने या विभागातील रिक्त पदे तातडीने भरणे अपेक्षित आहे.  - रमेश कर्तस्कर, प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3eYjvas

No comments:

Post a Comment