अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला शेवटची मुदतवाढ पुणे - कोरोनामुळे अनेक क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. यामध्ये शिक्षण क्षेत्रातही अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ऑनलाइन शिक्षणाने यावर मार्ग निघाला असला तरी प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेत मात्र अडचणी आहेत. यामुळे अनेक ठिकाणी प्रवेशाचा गोंधळ झालेला दिसून येतो. यातच इयत्ता अकरावीच्या प्रवेशापासून काही विद्यार्थी वंचित राहिल्याचे निदर्शनास आले आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने राज्य सरकारकडे केली होती. या मागणीला मान्यता देण्यात आली असून शैक्षणिक वर्ष 2020-21 करिताच्या प्रवेश प्रक्रियेला अंतिम मुदतवाढ दिली आहे. त्या अंतर्गत अद्याप अकरावी प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) या तत्त्वावर प्रवेश घेण्यास 26 मार्चपर्यंत मान्यता दिल्याचे शालेय शिक्षण विभागाचे उप सचिव राजेंद्र पवार यांनी पत्राद्वारे कळविले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आता शेवटची मुदतवाढ देण्यात आल्याचं शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे. आता 26 मार्चनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रवेशासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच जे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत, केवळ अशाच विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अन्य विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलणे, किंवा अन्य कारणांसाठी पुन्हा प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात येणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 18, 2021

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला शेवटची मुदतवाढ पुणे - कोरोनामुळे अनेक क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. यामध्ये शिक्षण क्षेत्रातही अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ऑनलाइन शिक्षणाने यावर मार्ग निघाला असला तरी प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेत मात्र अडचणी आहेत. यामुळे अनेक ठिकाणी प्रवेशाचा गोंधळ झालेला दिसून येतो. यातच इयत्ता अकरावीच्या प्रवेशापासून काही विद्यार्थी वंचित राहिल्याचे निदर्शनास आले आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने राज्य सरकारकडे केली होती. या मागणीला मान्यता देण्यात आली असून शैक्षणिक वर्ष 2020-21 करिताच्या प्रवेश प्रक्रियेला अंतिम मुदतवाढ दिली आहे. त्या अंतर्गत अद्याप अकरावी प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) या तत्त्वावर प्रवेश घेण्यास 26 मार्चपर्यंत मान्यता दिल्याचे शालेय शिक्षण विभागाचे उप सचिव राजेंद्र पवार यांनी पत्राद्वारे कळविले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आता शेवटची मुदतवाढ देण्यात आल्याचं शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे. आता 26 मार्चनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रवेशासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच जे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत, केवळ अशाच विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अन्य विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलणे, किंवा अन्य कारणांसाठी पुन्हा प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात येणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3tF08az

No comments:

Post a Comment