Video : तुम्ही तिकडच्या मुली करता न? मग भोगा आता; जातपंचायतीने उगारला सामाजिक बहिष्काराचा आसूड नागपूर : बहिष्कृत कुटुंबातील मुलीसोबत लग्न केले म्हणून जातपंचायतीने नागपुरातील एका कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकला आहे. यांच्यासह विविध कारणांनी पस्तीसेक लोकांनाही बहिष्कृत केले आहे. यात तरुण मुली, मुले, एवढेच काय तर दोन आणि चार वर्षांच्या चिमुकल्यांचाही समावेश आहे. या कुटुंबासोबत संबंध न ठेवण्याचा अलिखित फतवा काढला आहे. नागपूर येथील शांतीनगर परिसरात गोंधळी समाजाची वस्ती आहे. गावांमध्ये भांडी विकून त्यांची गुजराण चालते. येथील दिलीप सूर्यभान इंगळे यांचा मुलगा सूरजचा विवाह वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील गोंधळी कुटुंबातील मुलीशी पार पडला. देवळी येथील काही कुटुंबे आधीच बहिष्कृत करण्यात आली होती. त्यांना त्यांच्या खानदानीचा पत्ता नाही, असे कारण दाखवून त्यांना जातपंचायतीने जातीबाहेर काढण्याचा आदेश दिला होता. अधिक वाचा - मातृत्व अनुभवण्यापूर्वीच झाला बाळाचा मृत्यू, महिलेचं कृत्य पाहून उपस्थितांचेही पाणावले डोळे ‘बहिष्कृत कुटुंबातील मुलीसोबत लग्न करता काय? दाखवतोच’, म्हणत शांतीनगरातील पंच आणि यवतमाळ जिल्ह्यातील एका पंचप्रमुखाने बहिष्काराचे तोंडी आदेश सर्वत्र दिले. कोणत्याही मंगल कार्यात त्यांना सहभागी करू, नका असे निरोप गोंधळी समाजाच्या राज्यभरातील वस्त्यांवर धाडले आहेत. आणखी वेगवेगळ्या प्रकरणात येथील पस्तीसेक लोक बहिष्कृत केले आहेत. दिलीप यांची पत्नी द्रौपदीबाई, सूरजची पत्नी वर्षा यांच्यासह राहुल दिलीप इंगळे, पवन रमेश धुर्वे, गणेश प्रकाश ओगले यांचा समावेश आहे. सकाळ प्रतिनिधीपुढे त्यांनी व्यथित अंतःकरणाने आपबिती मांडली. कोणत्याही मंगल कार्यात आम्हाला बोलवत नाहीत. आमच्यात एखाद्या कार्यक्रमात टिळा लावण्याची परंपरा आहे. भर कार्यक्रमात ज्यांना टिळा लावला नाही, ते बहिष्कृत असल्याचे सिद्ध होते. मग त्यांच्याशी संबंध ठेवले जात नाहीत. एकप्रकारे त्यांना वाळीतच टाकले जाते. जाणून घ्या - काळजात धस्स करणारी हिंगणघाटची घटना; काय घडले होते अंकितासोबत गतवर्षी ३ फेब्रुवारीला शांतीनगरात नात्यातील एका कुटुंबातील लग्न आहे. त्या लग्नाची पत्रिका इतर समाजातील लोकांनाही दिली गेली; परंतु आम्हाला दिलेली नाही. याची विचारणा केली असता तुम्ही तिकडच्या मुली करता न? मग भोगा आता, असे सांगण्यात आले. आमच्यासह गोपाल आणि पारी वाकोडे, महादेव वाकोडे, पवन गंगावणे, रोहित इंगळे, विजय ओगले, साहेब आणि शांताबाई इंगळे, शकुंतला शिंदे, रवी आणि दीपा धुमाळ, राहुल आणि दुर्गा इंगळे यांनाही जातीबाहेर काढले आहे. पूजा टिल्लू ओगले यांच्या पतीचे निधन झाले. त्यांना दोन वर्षांचे बाळ आहे. प्रदीप इंगळे आणि दुर्गा यांना चार वर्षांचा चिमुकला आहे. या चिमुकल्यांसह त्यांनाही बहिष्कृत करण्यात आले आहे. दहा हजार रुपये द्या मंग अंदर घेतो पंच लोक प्रॉब्लेम क्रिएट करतात. आमाले दंड मारला. दहा हजार रुपये द्या मंग अंदर घेतो, नाहीतर राहा जातीबाहेर म्हणाले.  - गणेश ओगले, बहिष्कृत कार्यकर्ता, गोंधळी समाज जाणून घ्या - शेतात रोडग्याचे जेवण करायला गेले, घरी पोहोचले अन् सुरू झाली एकच धावपळ भिकाऱ्यासारखा जीव झाला आमचा तीन वर्षांपासून आमाले जातीबाहीर टाकलं आहे. भिकाऱ्यासारखा जीव झाला आमचा. टिका लावत नायी. कार्यक्रमात येऊ देत नायी.  - दिलीप सूर्यभान इंगळे, जातपंचायतीने बहिष्कृत केलेले नागरिक Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 7, 2021

Video : तुम्ही तिकडच्या मुली करता न? मग भोगा आता; जातपंचायतीने उगारला सामाजिक बहिष्काराचा आसूड नागपूर : बहिष्कृत कुटुंबातील मुलीसोबत लग्न केले म्हणून जातपंचायतीने नागपुरातील एका कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकला आहे. यांच्यासह विविध कारणांनी पस्तीसेक लोकांनाही बहिष्कृत केले आहे. यात तरुण मुली, मुले, एवढेच काय तर दोन आणि चार वर्षांच्या चिमुकल्यांचाही समावेश आहे. या कुटुंबासोबत संबंध न ठेवण्याचा अलिखित फतवा काढला आहे. नागपूर येथील शांतीनगर परिसरात गोंधळी समाजाची वस्ती आहे. गावांमध्ये भांडी विकून त्यांची गुजराण चालते. येथील दिलीप सूर्यभान इंगळे यांचा मुलगा सूरजचा विवाह वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील गोंधळी कुटुंबातील मुलीशी पार पडला. देवळी येथील काही कुटुंबे आधीच बहिष्कृत करण्यात आली होती. त्यांना त्यांच्या खानदानीचा पत्ता नाही, असे कारण दाखवून त्यांना जातपंचायतीने जातीबाहेर काढण्याचा आदेश दिला होता. अधिक वाचा - मातृत्व अनुभवण्यापूर्वीच झाला बाळाचा मृत्यू, महिलेचं कृत्य पाहून उपस्थितांचेही पाणावले डोळे ‘बहिष्कृत कुटुंबातील मुलीसोबत लग्न करता काय? दाखवतोच’, म्हणत शांतीनगरातील पंच आणि यवतमाळ जिल्ह्यातील एका पंचप्रमुखाने बहिष्काराचे तोंडी आदेश सर्वत्र दिले. कोणत्याही मंगल कार्यात त्यांना सहभागी करू, नका असे निरोप गोंधळी समाजाच्या राज्यभरातील वस्त्यांवर धाडले आहेत. आणखी वेगवेगळ्या प्रकरणात येथील पस्तीसेक लोक बहिष्कृत केले आहेत. दिलीप यांची पत्नी द्रौपदीबाई, सूरजची पत्नी वर्षा यांच्यासह राहुल दिलीप इंगळे, पवन रमेश धुर्वे, गणेश प्रकाश ओगले यांचा समावेश आहे. सकाळ प्रतिनिधीपुढे त्यांनी व्यथित अंतःकरणाने आपबिती मांडली. कोणत्याही मंगल कार्यात आम्हाला बोलवत नाहीत. आमच्यात एखाद्या कार्यक्रमात टिळा लावण्याची परंपरा आहे. भर कार्यक्रमात ज्यांना टिळा लावला नाही, ते बहिष्कृत असल्याचे सिद्ध होते. मग त्यांच्याशी संबंध ठेवले जात नाहीत. एकप्रकारे त्यांना वाळीतच टाकले जाते. जाणून घ्या - काळजात धस्स करणारी हिंगणघाटची घटना; काय घडले होते अंकितासोबत गतवर्षी ३ फेब्रुवारीला शांतीनगरात नात्यातील एका कुटुंबातील लग्न आहे. त्या लग्नाची पत्रिका इतर समाजातील लोकांनाही दिली गेली; परंतु आम्हाला दिलेली नाही. याची विचारणा केली असता तुम्ही तिकडच्या मुली करता न? मग भोगा आता, असे सांगण्यात आले. आमच्यासह गोपाल आणि पारी वाकोडे, महादेव वाकोडे, पवन गंगावणे, रोहित इंगळे, विजय ओगले, साहेब आणि शांताबाई इंगळे, शकुंतला शिंदे, रवी आणि दीपा धुमाळ, राहुल आणि दुर्गा इंगळे यांनाही जातीबाहेर काढले आहे. पूजा टिल्लू ओगले यांच्या पतीचे निधन झाले. त्यांना दोन वर्षांचे बाळ आहे. प्रदीप इंगळे आणि दुर्गा यांना चार वर्षांचा चिमुकला आहे. या चिमुकल्यांसह त्यांनाही बहिष्कृत करण्यात आले आहे. दहा हजार रुपये द्या मंग अंदर घेतो पंच लोक प्रॉब्लेम क्रिएट करतात. आमाले दंड मारला. दहा हजार रुपये द्या मंग अंदर घेतो, नाहीतर राहा जातीबाहेर म्हणाले.  - गणेश ओगले, बहिष्कृत कार्यकर्ता, गोंधळी समाज जाणून घ्या - शेतात रोडग्याचे जेवण करायला गेले, घरी पोहोचले अन् सुरू झाली एकच धावपळ भिकाऱ्यासारखा जीव झाला आमचा तीन वर्षांपासून आमाले जातीबाहीर टाकलं आहे. भिकाऱ्यासारखा जीव झाला आमचा. टिका लावत नायी. कार्यक्रमात येऊ देत नायी.  - दिलीप सूर्यभान इंगळे, जातपंचायतीने बहिष्कृत केलेले नागरिक Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2MIgM9i

No comments:

Post a Comment