आमच्या साहेबांचे श्‍वान त्यापुढे सगळे गुन्हे लहान ‘‘साहेब, दरोड्याचा तपास कोठपर्यंत आला आहे,’’ आम्ही खाली मान घालून हवालदारसाहेबांना विचारलं. ‘‘हे बघा, सध्या दरोडे, मारामाऱ्या, खून या गुन्ह्यांचा तपास करायला आमच्याकडे वेळ नाही. आमच्या साहेबांचे श्‍वान चोरीला गेले आहे. त्याच्या तपासात आम्ही सगळे आहोत. तुम्ही पुढल्या महिन्यांत या.’’ हवालदारसाहेबांनी आम्हाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. ‘‘पण साहेब, कुत्र्याच्या तपासापेक्षा....’’ आमचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच हवालदारसाहेबांच्या काठीने आमच्या नडगीचा वेध घेतला. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा ‘‘कुत्रा कोणाला म्हणतोस रे ! श्‍वान म्हण. तुमच्यासारख्या सर्वसामान्यांचं असतं ते कुत्रं. आमच्या साहेबांचे असतं ते श्‍वान. परत तसं म्हणालास तर तुझी मस्ती चांगलीच जिरवीन.’’ हवालदारसाहेबांनी आवाज चढवत म्हटलं. त्यावर आम्ही कान पकडून माफी मागितली व तेथून काढता पाय घेतला. आठवड्यापूर्वीच आमच्या घरी दरोडा पडला होता. तीन लाख रुपये रोख व वीस तोळ्यांचे दागिने असा ऐवज चोरीला गेला होता. त्याची फिर्याद आम्ही दाखल केली होती व तपास कोठपर्यंत आला, याच्या चौकशीसाठी आम्ही खेटे मारत होतो पण आमची दखल घ्यायला कोण तयार नव्हते. दुसऱ्या दिवशी आम्ही पोलिस ठाण्यावर गेलो. त्यावेळी तिथं शुकशुकाट होता. एका कोपऱ्यात दोन शिपाई सीसीटीव्ही बघत बसले होते. आम्ही त्यांनी नमस्कार घातला पण त्यांनी दुर्लक्ष केले. परत परत आम्ही नमस्कार घातला. शेवटी ‘‘काऽऽऽय हे.’’ असे म्हणत त्यातील एकजण आमच्यावर खवळला.  ‘‘पोलिस ठाण्यात आज एवढा शुकशुकाट का आहे? कोठे गेले सगळे’’ आम्ही घाबरत विचारले कारण आम्ही काहीही विचारले तर आमच्यावर कोणी ना कोणी सारखे खवळतच होते.  कॅम्पस प्लेसमेंटसाठी पात्र विद्यार्थ्यांनो, UGCची नवी नियमावली जाहीर! ‘‘आमच्या साहेबांचे श्‍वान चोरीला गेले आहे. त्याच्या तपासासाठी सगळे गेले आहेत. आम्हीही सीसीटीव्हीद्वारे त्या चोरांचा माग घेतो आहोत.’’ तेथील शिपायाने सांगितले.      मग आम्ही दरोड्याविषयी त्यांना सांगितले. त्यावर शिपाईसाहेब आमच्यावर चांगलेच खवळले. ‘‘तुम्हाला माहिती नाही का? पोलिस खातं सध्या कोणत्या महत्त्वाच्या तपासावर आहे ते. आम्ही आमच्या साहेबांच्या श्‍वानांचा तपास थांबवून, तुमच्या किरकोळ घरफोडीच्या प्रकरणात लक्ष घालावं, अशी तुमची इच्छा आहे का? ’’  शिपाईसाहेबांनी असं म्हटल्यावर आम्ही घरी आलो. परत दुसऱ्या दिवशी पोलिस ठाण्यात आलो. त्यावेळी डीजेच्या दणदणाटात कोणाची तरी मिरवणूक दिसली. आम्ही उत्सुकतेने पाहिले, त्यावेळी एका सजवलेल्या रथात एक परदेशी श्‍वान बसवले होते. त्याचीच मिरवणूक चालली होती. पोलिस ठाण्यात श्‍वानाला आणल्यानंतर तेथील कर्मचारी उपस्थित असणाऱ्यांना पेढे वाटत होते. अनेकजण जल्लोष करीत एकमेकांना ‘साहेबांचे श्‍वान सापडले’ अशी आनंदवार्ता देत होते. हद्द झाली! चोरट्यांनी पुण्याच्या एसीपींचा किंमती श्वान पळवला; अन्... दोन तास हा आनंदसोहळा ‘आम्ही याचि डोळी, याची देही पाहिला.’ सगळं शांत झाल्यानंतर आम्ही हवालदारसाहेबांची गाठ घेतली. ‘‘आमचा दरोड्याचा तपास...’’ आम्ही चाचरत म्हटलं. ‘‘हे बघा, तुमच्या दरोड्याचा तपास ज्यांच्याकडे होता, त्यांच्याकडेच साहेबांच्या श्‍वानाचा तपास होता. दिवस- रात्र मेहनत करून, त्यांनी श्‍वानाचा शोध लावला आहे. त्यामुळे ते खूप थकून गेले आहेत. त्यामुळे पुढील दहा- बारा दिवस ते रजेवर आहेत. तुम्ही त्यावेळी या. सध्या आमच्या खात्याच्या आनंदात तुम्हीही सहभागी व्हा,’’ असे म्हणत त्यांनी एक पेढा आमच्या हातावर ठेवला.  त्यावर आम्ही हळूच म्हटलं, ‘‘देवा, पुढील जन्मी आम्हाला सर्वसामान्य माणूस बनवण्यापेक्षा साहेबांचा श्‍वानच बनव.’’ Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 7, 2021

आमच्या साहेबांचे श्‍वान त्यापुढे सगळे गुन्हे लहान ‘‘साहेब, दरोड्याचा तपास कोठपर्यंत आला आहे,’’ आम्ही खाली मान घालून हवालदारसाहेबांना विचारलं. ‘‘हे बघा, सध्या दरोडे, मारामाऱ्या, खून या गुन्ह्यांचा तपास करायला आमच्याकडे वेळ नाही. आमच्या साहेबांचे श्‍वान चोरीला गेले आहे. त्याच्या तपासात आम्ही सगळे आहोत. तुम्ही पुढल्या महिन्यांत या.’’ हवालदारसाहेबांनी आम्हाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. ‘‘पण साहेब, कुत्र्याच्या तपासापेक्षा....’’ आमचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच हवालदारसाहेबांच्या काठीने आमच्या नडगीचा वेध घेतला. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा ‘‘कुत्रा कोणाला म्हणतोस रे ! श्‍वान म्हण. तुमच्यासारख्या सर्वसामान्यांचं असतं ते कुत्रं. आमच्या साहेबांचे असतं ते श्‍वान. परत तसं म्हणालास तर तुझी मस्ती चांगलीच जिरवीन.’’ हवालदारसाहेबांनी आवाज चढवत म्हटलं. त्यावर आम्ही कान पकडून माफी मागितली व तेथून काढता पाय घेतला. आठवड्यापूर्वीच आमच्या घरी दरोडा पडला होता. तीन लाख रुपये रोख व वीस तोळ्यांचे दागिने असा ऐवज चोरीला गेला होता. त्याची फिर्याद आम्ही दाखल केली होती व तपास कोठपर्यंत आला, याच्या चौकशीसाठी आम्ही खेटे मारत होतो पण आमची दखल घ्यायला कोण तयार नव्हते. दुसऱ्या दिवशी आम्ही पोलिस ठाण्यावर गेलो. त्यावेळी तिथं शुकशुकाट होता. एका कोपऱ्यात दोन शिपाई सीसीटीव्ही बघत बसले होते. आम्ही त्यांनी नमस्कार घातला पण त्यांनी दुर्लक्ष केले. परत परत आम्ही नमस्कार घातला. शेवटी ‘‘काऽऽऽय हे.’’ असे म्हणत त्यातील एकजण आमच्यावर खवळला.  ‘‘पोलिस ठाण्यात आज एवढा शुकशुकाट का आहे? कोठे गेले सगळे’’ आम्ही घाबरत विचारले कारण आम्ही काहीही विचारले तर आमच्यावर कोणी ना कोणी सारखे खवळतच होते.  कॅम्पस प्लेसमेंटसाठी पात्र विद्यार्थ्यांनो, UGCची नवी नियमावली जाहीर! ‘‘आमच्या साहेबांचे श्‍वान चोरीला गेले आहे. त्याच्या तपासासाठी सगळे गेले आहेत. आम्हीही सीसीटीव्हीद्वारे त्या चोरांचा माग घेतो आहोत.’’ तेथील शिपायाने सांगितले.      मग आम्ही दरोड्याविषयी त्यांना सांगितले. त्यावर शिपाईसाहेब आमच्यावर चांगलेच खवळले. ‘‘तुम्हाला माहिती नाही का? पोलिस खातं सध्या कोणत्या महत्त्वाच्या तपासावर आहे ते. आम्ही आमच्या साहेबांच्या श्‍वानांचा तपास थांबवून, तुमच्या किरकोळ घरफोडीच्या प्रकरणात लक्ष घालावं, अशी तुमची इच्छा आहे का? ’’  शिपाईसाहेबांनी असं म्हटल्यावर आम्ही घरी आलो. परत दुसऱ्या दिवशी पोलिस ठाण्यात आलो. त्यावेळी डीजेच्या दणदणाटात कोणाची तरी मिरवणूक दिसली. आम्ही उत्सुकतेने पाहिले, त्यावेळी एका सजवलेल्या रथात एक परदेशी श्‍वान बसवले होते. त्याचीच मिरवणूक चालली होती. पोलिस ठाण्यात श्‍वानाला आणल्यानंतर तेथील कर्मचारी उपस्थित असणाऱ्यांना पेढे वाटत होते. अनेकजण जल्लोष करीत एकमेकांना ‘साहेबांचे श्‍वान सापडले’ अशी आनंदवार्ता देत होते. हद्द झाली! चोरट्यांनी पुण्याच्या एसीपींचा किंमती श्वान पळवला; अन्... दोन तास हा आनंदसोहळा ‘आम्ही याचि डोळी, याची देही पाहिला.’ सगळं शांत झाल्यानंतर आम्ही हवालदारसाहेबांची गाठ घेतली. ‘‘आमचा दरोड्याचा तपास...’’ आम्ही चाचरत म्हटलं. ‘‘हे बघा, तुमच्या दरोड्याचा तपास ज्यांच्याकडे होता, त्यांच्याकडेच साहेबांच्या श्‍वानाचा तपास होता. दिवस- रात्र मेहनत करून, त्यांनी श्‍वानाचा शोध लावला आहे. त्यामुळे ते खूप थकून गेले आहेत. त्यामुळे पुढील दहा- बारा दिवस ते रजेवर आहेत. तुम्ही त्यावेळी या. सध्या आमच्या खात्याच्या आनंदात तुम्हीही सहभागी व्हा,’’ असे म्हणत त्यांनी एक पेढा आमच्या हातावर ठेवला.  त्यावर आम्ही हळूच म्हटलं, ‘‘देवा, पुढील जन्मी आम्हाला सर्वसामान्य माणूस बनवण्यापेक्षा साहेबांचा श्‍वानच बनव.’’ Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/39YHkMw

No comments:

Post a Comment