ढिंग टांग : आयर्नमॅन, स्पायडरमॅन...आणि सुपरमॅन! मा. उधोजीसाहेब यांसी अखेरचा जय महाराष्ट्र.   आपल्याला कल्पना असेलच की सध्या महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार असून आपण त्याचे प्रमुख आहा, आणि आम्हीही सरकारातील घटक पक्ष आहो! (आहे ना कल्पना? मीच अनेकदा विसरतो! असो!) आपले सगळे छान चालू आहे…तथापि, काही अपरिहार्य कारणाने हायकमांडने आमच्या पक्षात (अचानक ) भाकरी फिरवली असून आता मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी असणार नाही. यापुढे माझ्याऐवजी मा. नानासाहेब पटोलेजी आमच्या पक्षाचे नेतृत्त्व करतील, हे अधिकृतपणाने सांगतानी अतिशय आनंद होत आहे. भाकरी, घोडा आणि पाने अधूनमधून फिरवली नाहीत, तर प्रॉब्लेम होतो. भाकरी करपते, घोडा अडतो आणि पाने सडतात! याच कारणामुळे हायकमांडला भाकरी फिरवावी लागली आहे. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा गेले चौदा महिने सत्तेत असतानी आणि आपल्यासोबत समन्वयाने काम करतानी मजा आली! आमच्या पक्षाला आक्रमक, धडाकेबाज व हँडसम अध्यक्षाची गरज निर्माण झाल्याने हायकमांडला हा निर्णय घ्यावा लागला आहे. हँडसम असण्याची अट मी पूर्ण करत होतो, पण आक्रमक आणि धडाकेबाज असण्याची पूर्वअट मा. नानासाहेबांनी पूर्ण केली, शिवाय ते हँडसमदेखील आहेतच. सरकारातील घटक पक्ष या नात्याने आमच्या पक्षातील बदल आपल्याला कळवावा, असे वाटल्यामुळे हा पत्रप्रपंच. बाकी सारे आहे तसेच आहे! (हायकमांडने सांगेपर्यंत)  आपला. बाळासाहेब जोरात. ता. क. : दुसऱ्या घटक पक्षाचे राष्ट्रवादीवाले मा. दादासाहेब बारामतीकर यांना फोनवर कळवले आहे! (अपेक्षेप्रमाणे) ते गरम झाले आहेत, कृपया आपण समजूत काढावी!! बा. जो. ………. मा. उधोजीसाहेब यांसी, आत्ताच मला मा. बाळासाहेबांचा फोन आला होता. फोनवर कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण त्यांच्या हायकमांडने भाकरी फिरवल्याचे ते सांगत होते. मी म्हणालो, ‘‘येवढ्यात काय अडलंय? आता पुढली धावपळ कुणी करायची? तुम्ही भाकरी फिरवता आणि आमचे घोडे पळतात!’’ पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा मा. नानासाहेब आक्रमक, धडाकेबाज आणि हँडसम आहेत हे ठीक, पण ते काय सुपरमॅन आहेत का? उगीच भाकऱ्या कशाला फिरवतात? नुसता वैताग सगळा!! जाऊ दे. बाकी ठीक. (गेले चौदा महिने) आपला. दादासाहेब बारामतीकर (धाकले धनी). ……… मा. दादासाहेब यांसी जय महाराष्ट्र. आपले काळजीयुक्त पत्र मिळाले. का नाही मिळणार? मिळणारच. मा. नानासाहेब हे काँग्रेसचे नवे अध्यक्ष झाले आहेत, त्यांना शुभेच्छांचे एक कार्ड लागलीच पाठवून द्यावे. काँग्रेस पक्षाला (कधी नव्हे तो) आक्रमक, धडाकेबाज आणि हँडसम अध्यक्ष मिळाला आहे! परंतु, त्यांच्यापासून आपल्याला काहीही धोका नाही. कारण ते सुपरमॅन असले तर तुम्ही आयर्न मॅन आणि मी स्पायडर मॅन आहे, हे लक्षात ठेवा! आपण दोघेही काही कमी आक्रमक, धडाकेबाज आणि हँडसम नाही, हे विसरु नका!! जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा उलटपक्षी आता महाविकास आघाडीचे एकंदर नेतृत्त्वच आक्रमक, धडाकेबाज आणि हँडसम झाले आहे, हा आपला प्लस पॉइंट झाला आहे. काँग्रेसने अचानक भाकरी फिरवल्यामुळे त्यांची चूल पेटती आहे, एवढे तरी लोकांना कळले,हे काय कमी आहे? मी मा. नानासाहेबांना शुभेच्छांचे कार्ड ऑलरेडी टाकले आहे. सोबत एक मास्क, साबण आणि सॅनिटायझरची बाटलीदेखील पाठवली आहे.  कळावे. आपलाच. उधोजी. (मा. मु.) ता. क. : दरम्यान, तुम्हीही मास्क लावा, वारंवार हात धुवा आणि सॅनिटायझर वापरा! Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 7, 2021

ढिंग टांग : आयर्नमॅन, स्पायडरमॅन...आणि सुपरमॅन! मा. उधोजीसाहेब यांसी अखेरचा जय महाराष्ट्र.   आपल्याला कल्पना असेलच की सध्या महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार असून आपण त्याचे प्रमुख आहा, आणि आम्हीही सरकारातील घटक पक्ष आहो! (आहे ना कल्पना? मीच अनेकदा विसरतो! असो!) आपले सगळे छान चालू आहे…तथापि, काही अपरिहार्य कारणाने हायकमांडने आमच्या पक्षात (अचानक ) भाकरी फिरवली असून आता मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी असणार नाही. यापुढे माझ्याऐवजी मा. नानासाहेब पटोलेजी आमच्या पक्षाचे नेतृत्त्व करतील, हे अधिकृतपणाने सांगतानी अतिशय आनंद होत आहे. भाकरी, घोडा आणि पाने अधूनमधून फिरवली नाहीत, तर प्रॉब्लेम होतो. भाकरी करपते, घोडा अडतो आणि पाने सडतात! याच कारणामुळे हायकमांडला भाकरी फिरवावी लागली आहे. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा गेले चौदा महिने सत्तेत असतानी आणि आपल्यासोबत समन्वयाने काम करतानी मजा आली! आमच्या पक्षाला आक्रमक, धडाकेबाज व हँडसम अध्यक्षाची गरज निर्माण झाल्याने हायकमांडला हा निर्णय घ्यावा लागला आहे. हँडसम असण्याची अट मी पूर्ण करत होतो, पण आक्रमक आणि धडाकेबाज असण्याची पूर्वअट मा. नानासाहेबांनी पूर्ण केली, शिवाय ते हँडसमदेखील आहेतच. सरकारातील घटक पक्ष या नात्याने आमच्या पक्षातील बदल आपल्याला कळवावा, असे वाटल्यामुळे हा पत्रप्रपंच. बाकी सारे आहे तसेच आहे! (हायकमांडने सांगेपर्यंत)  आपला. बाळासाहेब जोरात. ता. क. : दुसऱ्या घटक पक्षाचे राष्ट्रवादीवाले मा. दादासाहेब बारामतीकर यांना फोनवर कळवले आहे! (अपेक्षेप्रमाणे) ते गरम झाले आहेत, कृपया आपण समजूत काढावी!! बा. जो. ………. मा. उधोजीसाहेब यांसी, आत्ताच मला मा. बाळासाहेबांचा फोन आला होता. फोनवर कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण त्यांच्या हायकमांडने भाकरी फिरवल्याचे ते सांगत होते. मी म्हणालो, ‘‘येवढ्यात काय अडलंय? आता पुढली धावपळ कुणी करायची? तुम्ही भाकरी फिरवता आणि आमचे घोडे पळतात!’’ पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा मा. नानासाहेब आक्रमक, धडाकेबाज आणि हँडसम आहेत हे ठीक, पण ते काय सुपरमॅन आहेत का? उगीच भाकऱ्या कशाला फिरवतात? नुसता वैताग सगळा!! जाऊ दे. बाकी ठीक. (गेले चौदा महिने) आपला. दादासाहेब बारामतीकर (धाकले धनी). ……… मा. दादासाहेब यांसी जय महाराष्ट्र. आपले काळजीयुक्त पत्र मिळाले. का नाही मिळणार? मिळणारच. मा. नानासाहेब हे काँग्रेसचे नवे अध्यक्ष झाले आहेत, त्यांना शुभेच्छांचे एक कार्ड लागलीच पाठवून द्यावे. काँग्रेस पक्षाला (कधी नव्हे तो) आक्रमक, धडाकेबाज आणि हँडसम अध्यक्ष मिळाला आहे! परंतु, त्यांच्यापासून आपल्याला काहीही धोका नाही. कारण ते सुपरमॅन असले तर तुम्ही आयर्न मॅन आणि मी स्पायडर मॅन आहे, हे लक्षात ठेवा! आपण दोघेही काही कमी आक्रमक, धडाकेबाज आणि हँडसम नाही, हे विसरु नका!! जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा उलटपक्षी आता महाविकास आघाडीचे एकंदर नेतृत्त्वच आक्रमक, धडाकेबाज आणि हँडसम झाले आहे, हा आपला प्लस पॉइंट झाला आहे. काँग्रेसने अचानक भाकरी फिरवल्यामुळे त्यांची चूल पेटती आहे, एवढे तरी लोकांना कळले,हे काय कमी आहे? मी मा. नानासाहेबांना शुभेच्छांचे कार्ड ऑलरेडी टाकले आहे. सोबत एक मास्क, साबण आणि सॅनिटायझरची बाटलीदेखील पाठवली आहे.  कळावे. आपलाच. उधोजी. (मा. मु.) ता. क. : दरम्यान, तुम्हीही मास्क लावा, वारंवार हात धुवा आणि सॅनिटायझर वापरा! Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3ru4JLw

No comments:

Post a Comment