जागतिक कर्करोग दिन विशेष : कोरोना जाईल; कर्करोगाचे काय? इसवीसनपूर्व काळात कर्करोग का होतो हे समजले, तरी त्यावर मात करणारी ठोस अशी कायमस्वरूपी उपचारपद्धती आजही हाती लागलेली नाही. त्याची लक्षणे वेगवेगळी असतात. उपचारासाठी शेकडो मार्ग उपलब्ध असले तरीही प्रतिबंधात्मक उपाय, खाद्य व जीवनशैलीतील बदल आणि सजगता हेच पर्याय आजतरी उपलब्ध आहेत. जगभरात आज (ता. ४ फेब्रुवारी) कर्करोग दिन पाळला जातो आहे. आज जरी आपण फक्त कोरोनाचा विचार करीत असलो तरी २०२०मध्ये कोरोनामुळे जेवढे लोक दगावले आहेत त्याच्या तिप्पट लोक कर्करोगामुळे दगावले आहेत, तर कोरोनाच्या सहापट अधिक कर्करुग्णांचे निदान झाले आहे. देशातील कर्करुग्णालये ओसंडून वाहत आहेत. उत्तरेकडे तर कर्करुग्णांसाठी खास रेल्वे सोडल्या जात आहेत. हे असेच चालू राहिले तर लोकांचे भविष्यातील आरोग्य अंधकारमय होईल आणि ते आपल्या आरोग्य सेवेच्या नियंत्रणाबाहेर जाईल.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा का होतो कर्करोग? शरीरातील गुणसूत्र बदलामुळे असामान्यपणे अमर्याद वाढणारे पेशीसमूह आणि त्याच्यामुळे होणार आजार म्हणजे कॅन्सर (कर्करोग) हे हिप्पोक्रेटिस या ग्रीक विचारवंताने सर्वात प्रथम इसवीसन पूर्व ३७०मध्ये जगासमोर आणले. तेव्हापासून कर्करोगाने मानवाची पाठ सोडलेली नाही. जवळपास ३५००वर्षांपासून कर्करोग समजून घेण्याचा, त्यावर निदान आणि उपचार पद्धती शोधण्यासाठी मानवतेने खूप संघर्ष केला आहे आणि आजही चालूच आहे. कर्करोगाचा काही पुरावा प्राचीन इजिप्तमधील मानवी ममींमध्ये जीवाश्‍म झालेल्या हाडांच्या सांगाड्यातही सापडतो. जवळजवळ प्रत्येक काळात कर्करोगाचे निदान त्याच्या दृश्‍यमान चिन्हे आणि लक्षणांवरून तसेच नंतरच्या टप्प्यावर रुग्णाची अवस्था यावरुन केले गेले. अगदी अलीकडच्या काळात म्हणजे आठराव्या शतकात कर्करोगासाठी शस्त्रक्रियेचा प्रयोग करण्यात आला. विसाव्या शतकाच्या सुरवातीला रेडिओथेरपी आणि १९६०नंतर किमोथेरपीचा प्रयोग सुरु झाला. सन १८७०च्या आसपास ब्रिटिश डॉक्‍टर क्‍लिनियन जॉन हिलने तंबाखूमुळे कर्करोग होतो, हे शोधून काढले. त्यानंतरच्या दीडशे वर्षात इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने (आयएआरसी) कर्करोग होण्यासाठी कारणीभूत असे दिडशेहून अधिक रसायनिक आणि जैविक पदार्थ शोधून काढले आहेत.      ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कर्करोगावरती सध्या शंभरपेक्षा अधिक प्रकारची केमोथेरपी औषधे उपलब्ध आहेत. केमोथेरपीच्या जोडीला रेडिओथेरपी हासुद्धा पर्याय उपलब्ध आहे. हे दोन्ही पर्याय नाही चालले तर शस्त्रक्रिया केली जाते. त्याचबरोबर जगभरात नवनवीन उपचारपद्धती विकसित केल्या जात आहेत. जगातील सर्वात जास्त संशोधनाचा निधी हा कर्करोग या एका आजारावर वापरला जातो आहे. तरीसुद्धा कर्करोग पूर्णपणे बरा होईल, अशी एकही उपचारपद्धती विकसित झालेली नाही. कर्करोग हा एकच आजार नसून तो अनेक आजरांचा समूह असतो. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये, म्हणजे जेव्हा कर्करोगाचा ट्युमर शरीरामध्ये वाढत असतो तेव्हा किंवा अगदी लहान असतो तेव्हा त्याचे निदान करता येत नाही किंवा आपल्याला कर्करोग झाला आहे, हेही समजत नाही. कर्करोगाची लक्षणेसुद्धा एकसारखी नसतात. त्यामुळे नक्की कर्करोग आहे की दुसरा कोणता आजार आहे हेही समजत नाही. कर्करोग नक्की कशामुळे होतो याचे ९५% कारण अजूनही सापडलेले नाही. त्यामुळे त्या आजाराचा अंदाजदेखील लावता येत नाही.  कर्करोग करतो स्वतःचे नियंत्रण कर्करोग हा आपल्या शरीराच्या आतील अजून एक शरीर असते. कर्करोग वेगाने वाढतो. केमोथेरपीच्या आणि रेडिओथेरपीच्या विरोधात लढण्यासाठी स्वतःची यंत्रणा उभी करतो. ट्युमरला रक्तपुरवठा होत नसेल तर स्वतः रक्तवाहिनींना जोडणारे जाळे तयार करतो. केमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा सर्जरी करूनसुद्धा कणभर जरी ट्युमर शिल्लक असेल तर पुन्हा तो शून्यातून उभारी घेत असतो. एका अवयवाचा कर्करोग बरा झाला, असे वाटत असते तेव्हाच तो दुसऱ्या कोणत्या तरी अवयवामध्ये पसरलेला असतो. शरीरामध्ये जसा मेंदू सर्व अवयवांचे नियंत्रण करतो तसेच कर्करोगसुद्धा स्वतःचे नियंत्रण करतो. या सर्व कारणामुळे कर्करोग नियंत्रणात येत नाही.  रोग वेळीच रोखता येईल? साधारणपणे तीस वर्षांपूर्वी गावामध्ये वर्षात एखादा कर्करुग्ण रुग्ण दगावत असे. आज मात्र रोजच्या रोज आपल्या गल्लीमध्ये, शेजारी किंवा पाहुण्यांमध्ये कर्करुग्ण सापडत आहेत. जगभरतील विविध आरोग्य संघटनांनी केलेल्या सर्वेनुसार सन २०५०मध्ये भारतात दर १०लोकांमागे तीनजणांना कर्करोग झालेला असेल. बदलेली जीवनशैली, वातावरणातील बदल, अयोग्य आहारपद्धती, शहरांमधील लोकांमधील व्यायामाचा अभाव, इतकेच काय शरीरावर भरमसाठ औषधांचा मारा यामुळेसुद्धा कर्करोग वेगाने पसरतो आहे.  आत्तापासूनच या आजाराबद्दल जनजागृती केली तर आपण वेळीच कर्करोगाला रोखू शकतो. महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशय यांचा कर्करोग वेगाने पसरतो आहे. त्यामुळे साधरणपणे वयाच्या चाळिशीनंतर महिलांनी वर्षातून एकदा स्तन आणि गर्भाशय यांची वैद्यकीय तपासणी करून घेतली पाहिजे. महिलांनी यासाठी स्वतःहून पुढे आले पाहिजे. तसेच सरकारी आणि खासगी यंत्रणेच्या मदतीने महिलांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम केले पाहिजेत. पुरुषांमध्ये तोंड, फुफ्फुस, मूत्राशय आणि आतड्यांचा कर्करोग वेगाने वाढतो आहे. पुरूषांमधील तंबाखू, सिगारेट आणि दारूचे व्यसन घटले पाहिजे. तसेच नेहमी बाहेरचे कमी शिजलेले अन्न खाणे टाळणे, रोजच्या रोज एक तास पळणे किंवा व्यायाम करणे, आठवड्यातून एखादा दिवस हलका आहार असे साधे जरी प्रयोग केले तरी आपण कर्करोगाला दूर ठेवू शकतो.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा लक्ष्यानुरोधी उपचारपद्धती कोरोना विषाणूसारखा आजार एकदा झाल्यानंतर पुन्हा-पुन्हा होत नाही. याउलट कर्करोग मात्र ९० टक्के पुन्हा उद्‌भवतो. अशा वेळी तो उपचारांच्या नियंत्रणाबाहेर जातो. अमेरिका, ब्रिटन किंवा जर्मनीमध्ये अत्याधुनिक अशी इम्युनोथेरपी किंवा लक्ष्यानुरोधी कर्करोग उपचारपद्धती विकसित झाली आहे. ती मात्र अतिशय खर्चिक आहे. सर्वसामान्य व्यक्तींना त्याचा खर्च परवडत नाही. बड्या सेलिब्रिटी, खेळाडू किंवा राजकीय नेते यांना त्याचा खर्च परवडतो. भारतामधूनसुद्धा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कर्करोगाचे निदान झालेले सेलिब्रिटीज हे अत्याधुनिक उपचारासाठी परदेशात जातात ते त्यासाठीच. (लेखक ऑक्‍सफर्ड विद्यापीठामध्ये (ब्रिटन) वैद्यक विज्ञान विभागात कर्करोगावर संशोधन करीत आहेत. युरोपियन कमिशनच्या कर्करोग मिशनचे (२०१८-२०२७) सदस्य आहेत. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 3, 2021

जागतिक कर्करोग दिन विशेष : कोरोना जाईल; कर्करोगाचे काय? इसवीसनपूर्व काळात कर्करोग का होतो हे समजले, तरी त्यावर मात करणारी ठोस अशी कायमस्वरूपी उपचारपद्धती आजही हाती लागलेली नाही. त्याची लक्षणे वेगवेगळी असतात. उपचारासाठी शेकडो मार्ग उपलब्ध असले तरीही प्रतिबंधात्मक उपाय, खाद्य व जीवनशैलीतील बदल आणि सजगता हेच पर्याय आजतरी उपलब्ध आहेत. जगभरात आज (ता. ४ फेब्रुवारी) कर्करोग दिन पाळला जातो आहे. आज जरी आपण फक्त कोरोनाचा विचार करीत असलो तरी २०२०मध्ये कोरोनामुळे जेवढे लोक दगावले आहेत त्याच्या तिप्पट लोक कर्करोगामुळे दगावले आहेत, तर कोरोनाच्या सहापट अधिक कर्करुग्णांचे निदान झाले आहे. देशातील कर्करुग्णालये ओसंडून वाहत आहेत. उत्तरेकडे तर कर्करुग्णांसाठी खास रेल्वे सोडल्या जात आहेत. हे असेच चालू राहिले तर लोकांचे भविष्यातील आरोग्य अंधकारमय होईल आणि ते आपल्या आरोग्य सेवेच्या नियंत्रणाबाहेर जाईल.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा का होतो कर्करोग? शरीरातील गुणसूत्र बदलामुळे असामान्यपणे अमर्याद वाढणारे पेशीसमूह आणि त्याच्यामुळे होणार आजार म्हणजे कॅन्सर (कर्करोग) हे हिप्पोक्रेटिस या ग्रीक विचारवंताने सर्वात प्रथम इसवीसन पूर्व ३७०मध्ये जगासमोर आणले. तेव्हापासून कर्करोगाने मानवाची पाठ सोडलेली नाही. जवळपास ३५००वर्षांपासून कर्करोग समजून घेण्याचा, त्यावर निदान आणि उपचार पद्धती शोधण्यासाठी मानवतेने खूप संघर्ष केला आहे आणि आजही चालूच आहे. कर्करोगाचा काही पुरावा प्राचीन इजिप्तमधील मानवी ममींमध्ये जीवाश्‍म झालेल्या हाडांच्या सांगाड्यातही सापडतो. जवळजवळ प्रत्येक काळात कर्करोगाचे निदान त्याच्या दृश्‍यमान चिन्हे आणि लक्षणांवरून तसेच नंतरच्या टप्प्यावर रुग्णाची अवस्था यावरुन केले गेले. अगदी अलीकडच्या काळात म्हणजे आठराव्या शतकात कर्करोगासाठी शस्त्रक्रियेचा प्रयोग करण्यात आला. विसाव्या शतकाच्या सुरवातीला रेडिओथेरपी आणि १९६०नंतर किमोथेरपीचा प्रयोग सुरु झाला. सन १८७०च्या आसपास ब्रिटिश डॉक्‍टर क्‍लिनियन जॉन हिलने तंबाखूमुळे कर्करोग होतो, हे शोधून काढले. त्यानंतरच्या दीडशे वर्षात इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने (आयएआरसी) कर्करोग होण्यासाठी कारणीभूत असे दिडशेहून अधिक रसायनिक आणि जैविक पदार्थ शोधून काढले आहेत.      ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कर्करोगावरती सध्या शंभरपेक्षा अधिक प्रकारची केमोथेरपी औषधे उपलब्ध आहेत. केमोथेरपीच्या जोडीला रेडिओथेरपी हासुद्धा पर्याय उपलब्ध आहे. हे दोन्ही पर्याय नाही चालले तर शस्त्रक्रिया केली जाते. त्याचबरोबर जगभरात नवनवीन उपचारपद्धती विकसित केल्या जात आहेत. जगातील सर्वात जास्त संशोधनाचा निधी हा कर्करोग या एका आजारावर वापरला जातो आहे. तरीसुद्धा कर्करोग पूर्णपणे बरा होईल, अशी एकही उपचारपद्धती विकसित झालेली नाही. कर्करोग हा एकच आजार नसून तो अनेक आजरांचा समूह असतो. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये, म्हणजे जेव्हा कर्करोगाचा ट्युमर शरीरामध्ये वाढत असतो तेव्हा किंवा अगदी लहान असतो तेव्हा त्याचे निदान करता येत नाही किंवा आपल्याला कर्करोग झाला आहे, हेही समजत नाही. कर्करोगाची लक्षणेसुद्धा एकसारखी नसतात. त्यामुळे नक्की कर्करोग आहे की दुसरा कोणता आजार आहे हेही समजत नाही. कर्करोग नक्की कशामुळे होतो याचे ९५% कारण अजूनही सापडलेले नाही. त्यामुळे त्या आजाराचा अंदाजदेखील लावता येत नाही.  कर्करोग करतो स्वतःचे नियंत्रण कर्करोग हा आपल्या शरीराच्या आतील अजून एक शरीर असते. कर्करोग वेगाने वाढतो. केमोथेरपीच्या आणि रेडिओथेरपीच्या विरोधात लढण्यासाठी स्वतःची यंत्रणा उभी करतो. ट्युमरला रक्तपुरवठा होत नसेल तर स्वतः रक्तवाहिनींना जोडणारे जाळे तयार करतो. केमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा सर्जरी करूनसुद्धा कणभर जरी ट्युमर शिल्लक असेल तर पुन्हा तो शून्यातून उभारी घेत असतो. एका अवयवाचा कर्करोग बरा झाला, असे वाटत असते तेव्हाच तो दुसऱ्या कोणत्या तरी अवयवामध्ये पसरलेला असतो. शरीरामध्ये जसा मेंदू सर्व अवयवांचे नियंत्रण करतो तसेच कर्करोगसुद्धा स्वतःचे नियंत्रण करतो. या सर्व कारणामुळे कर्करोग नियंत्रणात येत नाही.  रोग वेळीच रोखता येईल? साधारणपणे तीस वर्षांपूर्वी गावामध्ये वर्षात एखादा कर्करुग्ण रुग्ण दगावत असे. आज मात्र रोजच्या रोज आपल्या गल्लीमध्ये, शेजारी किंवा पाहुण्यांमध्ये कर्करुग्ण सापडत आहेत. जगभरतील विविध आरोग्य संघटनांनी केलेल्या सर्वेनुसार सन २०५०मध्ये भारतात दर १०लोकांमागे तीनजणांना कर्करोग झालेला असेल. बदलेली जीवनशैली, वातावरणातील बदल, अयोग्य आहारपद्धती, शहरांमधील लोकांमधील व्यायामाचा अभाव, इतकेच काय शरीरावर भरमसाठ औषधांचा मारा यामुळेसुद्धा कर्करोग वेगाने पसरतो आहे.  आत्तापासूनच या आजाराबद्दल जनजागृती केली तर आपण वेळीच कर्करोगाला रोखू शकतो. महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशय यांचा कर्करोग वेगाने पसरतो आहे. त्यामुळे साधरणपणे वयाच्या चाळिशीनंतर महिलांनी वर्षातून एकदा स्तन आणि गर्भाशय यांची वैद्यकीय तपासणी करून घेतली पाहिजे. महिलांनी यासाठी स्वतःहून पुढे आले पाहिजे. तसेच सरकारी आणि खासगी यंत्रणेच्या मदतीने महिलांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम केले पाहिजेत. पुरुषांमध्ये तोंड, फुफ्फुस, मूत्राशय आणि आतड्यांचा कर्करोग वेगाने वाढतो आहे. पुरूषांमधील तंबाखू, सिगारेट आणि दारूचे व्यसन घटले पाहिजे. तसेच नेहमी बाहेरचे कमी शिजलेले अन्न खाणे टाळणे, रोजच्या रोज एक तास पळणे किंवा व्यायाम करणे, आठवड्यातून एखादा दिवस हलका आहार असे साधे जरी प्रयोग केले तरी आपण कर्करोगाला दूर ठेवू शकतो.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा लक्ष्यानुरोधी उपचारपद्धती कोरोना विषाणूसारखा आजार एकदा झाल्यानंतर पुन्हा-पुन्हा होत नाही. याउलट कर्करोग मात्र ९० टक्के पुन्हा उद्‌भवतो. अशा वेळी तो उपचारांच्या नियंत्रणाबाहेर जातो. अमेरिका, ब्रिटन किंवा जर्मनीमध्ये अत्याधुनिक अशी इम्युनोथेरपी किंवा लक्ष्यानुरोधी कर्करोग उपचारपद्धती विकसित झाली आहे. ती मात्र अतिशय खर्चिक आहे. सर्वसामान्य व्यक्तींना त्याचा खर्च परवडत नाही. बड्या सेलिब्रिटी, खेळाडू किंवा राजकीय नेते यांना त्याचा खर्च परवडतो. भारतामधूनसुद्धा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कर्करोगाचे निदान झालेले सेलिब्रिटीज हे अत्याधुनिक उपचारासाठी परदेशात जातात ते त्यासाठीच. (लेखक ऑक्‍सफर्ड विद्यापीठामध्ये (ब्रिटन) वैद्यक विज्ञान विभागात कर्करोगावर संशोधन करीत आहेत. युरोपियन कमिशनच्या कर्करोग मिशनचे (२०१८-२०२७) सदस्य आहेत. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3cDHQRv

No comments:

Post a Comment