खबरदारी बाळगा, सायबर हल्ला टाळा... ‘हल्लीची पिढी जरा जास्तच डिजिटल झालीये...’ असे शब्द अनेकदा कानावर पडत असतात. हे खरेही आहे. सोशल मीडिया, ऑनलाइन व्यवहार, ई-कॉमर्सचा वापर गेल्या काही वर्षांपासून अनेकपटींनी वाढला आहे. ऑनलाइन व्यवहार करताना सायबर हल्ल्या‍ची टांगती तलवार आपल्या मानगुटीवर असते. ऑनलाइन स्कॅमर्स नेहमीच आपली वैयक्तिक माहिती, क्रेडिट कार्ड आणि बॅंक अकाउंटच्या माहितीच्या शोधात असतात. या माहितीचा वापर ते बेकायदा बाबींसाठी करतात. काही सोप्या उपाययोजना केल्यास संभाव्य धोका टाळता येतो. त्याबाबत थोडक्‍यात...  बॅंक, क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट नियमित तपासा  ऑनलाइन व्यवहार करताना क्रेडिट कार्ड किंवा बॅंकेची माहिती चोरल्यास फार मोठे नुकसान होते. तुमच्या क्रेडिट कार्डचा परस्पर गैरवापर केला जातो. संशयास्पद व्यवहार लगेच लक्षात यावेत, म्हणून तुमचे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे. यामध्ये चुकीचे आढळल्यास क्रेडिट कार्ड कंपनीशी संपर्क साधा.  व्हीपीएनचा वापर करा  डिजिटल विश्वात खासगीपणा जपण्यासाठी व्हीपीएन म्हणजेच व्हर्च्युअल प्रायव्हेट अकाऊंट महत्त्वाचे साधन आहे. हॅकर्सना तुम्ही काय ब्राऊज करताय हे पाहण्यापासून रोखण्यासाठी व्हीपीएनचा वापर होतो. तुम्ही व्हीपीएनसह इंटरनेटवर सर्फिंग करता, त्यावेळी तुमचा आयपी ॲड्रेस तुमच्या व्हीपीएन प्रदात्याच्या सर्व्हरच्या आयपी ॲड्रेससारखाच भासतो. त्यामुळे तुमची ओळख, लोकेशन कुणालाही माहिती होत नाही. काही व्हीपीएन सेवा मोफतही उपलब्ध आहेत. मात्र, पैसे भरून तुम्ही अधिक सुरक्षा मिळवू शकता.  नव्या वर्षातील काही निवडक नवे मोबाईल्स कोणते आहेत पहा सार्वजनिक वाय-फायचा वापर टाळा  कॉफी शॉप्स, हॉटेल लॉबीज, रेल्वे स्थानक अशा ठिकाणी मोफत वाय-फायचा वापर करताना बॅंक अकाऊंट किंवा क्रेडिट कार्ड पोर्टलवर जाऊ नका. मोफत वाय-फाय अनेकदा सुरक्षित नसतात. सायबर गुन्हेगार या माध्यमातून तुमची माहिती चोरू शकतात. वैयक्तिक माहितीचा वापर होणार नाही, अशाच कामांसाठी सार्वजनिक वाय-फायचा वापर करा.  फिशिंग स्कॅम्सवर नजर ठेवा  तुमची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती, बॅंक अकाऊंट किंवा क्रेडिट कार्ड पोर्टल्सची माहिती घेण्यासाठी तुमच्या नकळत खोटे ई-मेल किंवा टेक्‍स्ट मेसेज पाठवले जातात. अनेकदा हे मेल तुमच्या बॅंकेनेच पाठवले असल्याप्रमाणे  हुबेहूब असतात. तुमची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती भरण्यासाठी एका वेबपेजवर नेणारी लिंक त्यात असते. अशी माहिती कधीही देऊ नका. तुमची बॅंक कधीही अशाप्रकारे ऑनलाइन माहिती विचारत नाही.  वेळोवेळी पासवर्ड बदला  नियमितपणे पासवर्ड बदलत राहिल्यास तुमचे ऑनलाइन अकाऊंट चोरण्यात हॅकर्सना अडचणी येतात. नवा पासवर्ड देताना तो काहीसा गुंतागुंतीचा, चटकन अंदाज लावता येणार नाही अशा प्रकारची चिन्हे, अंक, अक्षरे किंवा सांकेतिक आद्याक्षरांचा वापर करावा.  कोव्हिड काळात मोबाईलचा फुल्ल ‘डोस’ टू-फॅक्‍टर ऑथेंटिफिकेशनचा वापर  बॅंका, हेल्थकेअर आणि वित्तीय सेवांसाठी टू-फॅक्‍टर ऑथेंटिकेशनचा वापर करा. यात तुम्हाला तुमचे नाव आणि पासवर्ड टाकून नंतर ईमेल किंवा टेक्‍स्ट केला जाणारा कोड नंबर टाकायचा असतो. लॉगइनच्या या अतिरिक्त पायरीमुळे वेबसाईटवर हॅकर्सना प्रवेश मिळण्याची शक्‍यता कमी होते.  खासगीपणा जपा  सोशल मीडियावर तुम्ही पोस्ट केलेली माहिती हॅकर्स तुमची ओळख चोरण्यासाठी वापरू शकतात. मात्र, तुम्ही सोशल मीडियावरील खासगीपणा जपू शकता. यासाठी पोस्टबाबत सजग असणे आवश्‍यक आहे. तुमचा पत्ता, जन्मतारीख, फोन नंबर अशी वैयक्तिक माहिती देणे टाळा. तुमचे नाव आणि आडनाव पूर्ण वापरतानाही काळजी घ्या.  चिट कोड्‌सकडे दुर्लक्ष करा  अनेक लोकप्रिय व्हिडिओ गेम्स तुम्हाला इन-गेम करंसी, चिट कोड्‌स, वेपन्स अपग्रेड खरेदी करण्याची संधी देतात. या ऑफर्स बहुतांशवेळी स्कॅम असतात. त्यातून तुमच्या डिव्हाइसमध्ये मालवेअर किंवा स्पायवेअर सोडून तुमचे ऑनलाइन बॅंक अकाउंटमध्ये प्रवेश मिळवला जातो. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 3, 2021

खबरदारी बाळगा, सायबर हल्ला टाळा... ‘हल्लीची पिढी जरा जास्तच डिजिटल झालीये...’ असे शब्द अनेकदा कानावर पडत असतात. हे खरेही आहे. सोशल मीडिया, ऑनलाइन व्यवहार, ई-कॉमर्सचा वापर गेल्या काही वर्षांपासून अनेकपटींनी वाढला आहे. ऑनलाइन व्यवहार करताना सायबर हल्ल्या‍ची टांगती तलवार आपल्या मानगुटीवर असते. ऑनलाइन स्कॅमर्स नेहमीच आपली वैयक्तिक माहिती, क्रेडिट कार्ड आणि बॅंक अकाउंटच्या माहितीच्या शोधात असतात. या माहितीचा वापर ते बेकायदा बाबींसाठी करतात. काही सोप्या उपाययोजना केल्यास संभाव्य धोका टाळता येतो. त्याबाबत थोडक्‍यात...  बॅंक, क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट नियमित तपासा  ऑनलाइन व्यवहार करताना क्रेडिट कार्ड किंवा बॅंकेची माहिती चोरल्यास फार मोठे नुकसान होते. तुमच्या क्रेडिट कार्डचा परस्पर गैरवापर केला जातो. संशयास्पद व्यवहार लगेच लक्षात यावेत, म्हणून तुमचे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे. यामध्ये चुकीचे आढळल्यास क्रेडिट कार्ड कंपनीशी संपर्क साधा.  व्हीपीएनचा वापर करा  डिजिटल विश्वात खासगीपणा जपण्यासाठी व्हीपीएन म्हणजेच व्हर्च्युअल प्रायव्हेट अकाऊंट महत्त्वाचे साधन आहे. हॅकर्सना तुम्ही काय ब्राऊज करताय हे पाहण्यापासून रोखण्यासाठी व्हीपीएनचा वापर होतो. तुम्ही व्हीपीएनसह इंटरनेटवर सर्फिंग करता, त्यावेळी तुमचा आयपी ॲड्रेस तुमच्या व्हीपीएन प्रदात्याच्या सर्व्हरच्या आयपी ॲड्रेससारखाच भासतो. त्यामुळे तुमची ओळख, लोकेशन कुणालाही माहिती होत नाही. काही व्हीपीएन सेवा मोफतही उपलब्ध आहेत. मात्र, पैसे भरून तुम्ही अधिक सुरक्षा मिळवू शकता.  नव्या वर्षातील काही निवडक नवे मोबाईल्स कोणते आहेत पहा सार्वजनिक वाय-फायचा वापर टाळा  कॉफी शॉप्स, हॉटेल लॉबीज, रेल्वे स्थानक अशा ठिकाणी मोफत वाय-फायचा वापर करताना बॅंक अकाऊंट किंवा क्रेडिट कार्ड पोर्टलवर जाऊ नका. मोफत वाय-फाय अनेकदा सुरक्षित नसतात. सायबर गुन्हेगार या माध्यमातून तुमची माहिती चोरू शकतात. वैयक्तिक माहितीचा वापर होणार नाही, अशाच कामांसाठी सार्वजनिक वाय-फायचा वापर करा.  फिशिंग स्कॅम्सवर नजर ठेवा  तुमची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती, बॅंक अकाऊंट किंवा क्रेडिट कार्ड पोर्टल्सची माहिती घेण्यासाठी तुमच्या नकळत खोटे ई-मेल किंवा टेक्‍स्ट मेसेज पाठवले जातात. अनेकदा हे मेल तुमच्या बॅंकेनेच पाठवले असल्याप्रमाणे  हुबेहूब असतात. तुमची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती भरण्यासाठी एका वेबपेजवर नेणारी लिंक त्यात असते. अशी माहिती कधीही देऊ नका. तुमची बॅंक कधीही अशाप्रकारे ऑनलाइन माहिती विचारत नाही.  वेळोवेळी पासवर्ड बदला  नियमितपणे पासवर्ड बदलत राहिल्यास तुमचे ऑनलाइन अकाऊंट चोरण्यात हॅकर्सना अडचणी येतात. नवा पासवर्ड देताना तो काहीसा गुंतागुंतीचा, चटकन अंदाज लावता येणार नाही अशा प्रकारची चिन्हे, अंक, अक्षरे किंवा सांकेतिक आद्याक्षरांचा वापर करावा.  कोव्हिड काळात मोबाईलचा फुल्ल ‘डोस’ टू-फॅक्‍टर ऑथेंटिफिकेशनचा वापर  बॅंका, हेल्थकेअर आणि वित्तीय सेवांसाठी टू-फॅक्‍टर ऑथेंटिकेशनचा वापर करा. यात तुम्हाला तुमचे नाव आणि पासवर्ड टाकून नंतर ईमेल किंवा टेक्‍स्ट केला जाणारा कोड नंबर टाकायचा असतो. लॉगइनच्या या अतिरिक्त पायरीमुळे वेबसाईटवर हॅकर्सना प्रवेश मिळण्याची शक्‍यता कमी होते.  खासगीपणा जपा  सोशल मीडियावर तुम्ही पोस्ट केलेली माहिती हॅकर्स तुमची ओळख चोरण्यासाठी वापरू शकतात. मात्र, तुम्ही सोशल मीडियावरील खासगीपणा जपू शकता. यासाठी पोस्टबाबत सजग असणे आवश्‍यक आहे. तुमचा पत्ता, जन्मतारीख, फोन नंबर अशी वैयक्तिक माहिती देणे टाळा. तुमचे नाव आणि आडनाव पूर्ण वापरतानाही काळजी घ्या.  चिट कोड्‌सकडे दुर्लक्ष करा  अनेक लोकप्रिय व्हिडिओ गेम्स तुम्हाला इन-गेम करंसी, चिट कोड्‌स, वेपन्स अपग्रेड खरेदी करण्याची संधी देतात. या ऑफर्स बहुतांशवेळी स्कॅम असतात. त्यातून तुमच्या डिव्हाइसमध्ये मालवेअर किंवा स्पायवेअर सोडून तुमचे ऑनलाइन बॅंक अकाउंटमध्ये प्रवेश मिळवला जातो. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3axY8st

No comments:

Post a Comment