कोरोनाच्या अस्वस्थ रूग्णांचे पुन्हा हाल; बेड उपलब्ध नसल्याचे सांगत खासगी रुग्णालयांकडून उदासीनता पुणे - कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी बेड उपलब्ध नाहीत, असे उत्तर खासगी रुग्णालयांतर्फे नातेवाइकांना देण्यात येत आहे. त्यांना थेट ससून रुग्णालय किंवा महापालिकेचे डॉ. नायडू रुग्णालयाचा रस्ता दाखवला जात असल्याची माहिती पुढे आली.  पुण्यात कोरोनाच्या उद्रेकामध्ये काही खासगी रुग्णालये कोरोना उपचारांसाठी राखीव ठेवली होती. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे ही खासगी रुग्णालये सामान्य रुग्णसेवेसाठी टप्प्या-टप्प्याने खुली करण्यात आली. पण, त्यानंतरही कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांसाठी काही खाटा राखीव ठेवण्याचे बंधन महापालिका प्रशासनाने शहरातील खासगी रुग्णालयांवर  घातले आहे.  पुणेकरांसाठी मोठी बातमी; नगर हायवेवरील वाहतूक कोंडी फोडणार 'नागपूर पॅटर्न'! प्रमुख रुग्णालयांमधील कोरोनासाठी राखीव खाटा आता पूर्ण क्षमतेने भरल्या आहेत. विशेषतः अतिदक्षता विभागात नव्याने आलेल्या रुग्णांना दाखल करण्यासाठी जागा नाही, अशी माहिती खासगी रुग्णालयांतर्फे नातेवाइकांना देण्यात आली.  या बद्दल रुग्णाचे नातेवाईक सुहास जोशी म्हणाले, “वयाच्या सत्तरीतील रुग्णाला कोरोनाची स्पष्ट लक्षणे दिसत होती. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातून त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांना दिला. पण, शहरातील प्रमुख रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागात जागा नसल्याचे सांगण्यात आले.” राजगडावर दुर्घटना; मुंबईहून आलेल्या ट्रेकरचा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू​ कोरोनासाठी अतिदक्षता विभागातील राखीव खाटा पूर्ण क्षमतेने भरलेल्या आहेत. या  रुग्णालयांमध्ये जागा नसल्याने रुग्णाला ससून रुग्णालय किंवा डॉ. नायडू रुग्णालयांमध्ये दाखल करण्याचा सल्लाही खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला, अशी माहिती आणखी एका रुग्णाचे नातेवाईक सुरेश चव्हाण  यांनी दिली. रुग्णालये काय म्हणतात... कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्याच वेळी इतर आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. नियोजित शस्त्रक्रिया पूर्ववत सुरू होत आहेत. त्यामुळे कोरोनासाठी राखीव खाटांची संख्या कमी झाली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाबाधीत रुग्णांवर रुग्णालयात उपचार करताना मर्यादा पडतात.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचारासाठी काही मोठ्या रुग्णालयांनी स्वतंत्र इमारतीमध्ये सुविधा केली आहे. त्यामुळे त्या रुग्णांना तेथेच दाखल करावे लागते.  ससून आणि महापालिकेच्या काही रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुविधा उपलब्ध आहेत. महापालिका यंत्रणा सतर्क पुण्यात कोरोनाची साथ गेल्या आठवडाभरापासून वाढू लागल्याने महापालिकेने खबरदारी म्हणून नव्या रुग्णांसह त्यांच्या सपंर्कातील व्यक्तींचा शोध व त्यांना लगेचच विलगीकृत करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. नव्याने दीड हजार चाचण्या वाढवून आता पुन्हा रोज पाच हजार लोकांची चाचणी करण्यात येणार आहे. दुसरीकडे, संसर्ग कमी करण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ला प्राधान्य देण्याचे आवाहन पुणेकरांना करण्यात आले आहे. मार्चपासून पुण्यात सतत वाढलेल्या कोरोनाचा संसर्ग तीन-सव्वातीन महिन्यांपासून कमी होत आहे. त्यात जानेवारीत रोज सरासरी जेमतेम दीडशे रुग्ण सापडल्याने हा संसर्ग कमी होत असल्याचे चित्र होते. गेल्या सात दिवसांपासून रोजच्या रुग्णसंख्येत जवळपास ७५ ते शंभर रुग्णांची भर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे शनिवारी एका दिवसातील रुग्णांची संख्या ३३१ पर्यंत गेली. रविवारी (ता. १४) ही संख्या ३५४ पर्यंत नोंदविण्यात आली. बाजारपेठा, कार्यालये, हॉटेल आणि अन्य खासगी कार्यक्रमांमधील गर्दी, लोकांचा निष्काळजीपणा यामुळे कोरोनाचा आजार पुन्हा पसरत आहे. चाचण्यांच्या तुलनेत गेल्या चार दिवसांत संसर्गाच्या वाढीचा वेग १० टक्क्यांपर्यंत पोचला आहे. दहा दिवसांपूर्वी तो चार ते पाच टक्के होता. -डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 14, 2021

कोरोनाच्या अस्वस्थ रूग्णांचे पुन्हा हाल; बेड उपलब्ध नसल्याचे सांगत खासगी रुग्णालयांकडून उदासीनता पुणे - कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी बेड उपलब्ध नाहीत, असे उत्तर खासगी रुग्णालयांतर्फे नातेवाइकांना देण्यात येत आहे. त्यांना थेट ससून रुग्णालय किंवा महापालिकेचे डॉ. नायडू रुग्णालयाचा रस्ता दाखवला जात असल्याची माहिती पुढे आली.  पुण्यात कोरोनाच्या उद्रेकामध्ये काही खासगी रुग्णालये कोरोना उपचारांसाठी राखीव ठेवली होती. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे ही खासगी रुग्णालये सामान्य रुग्णसेवेसाठी टप्प्या-टप्प्याने खुली करण्यात आली. पण, त्यानंतरही कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांसाठी काही खाटा राखीव ठेवण्याचे बंधन महापालिका प्रशासनाने शहरातील खासगी रुग्णालयांवर  घातले आहे.  पुणेकरांसाठी मोठी बातमी; नगर हायवेवरील वाहतूक कोंडी फोडणार 'नागपूर पॅटर्न'! प्रमुख रुग्णालयांमधील कोरोनासाठी राखीव खाटा आता पूर्ण क्षमतेने भरल्या आहेत. विशेषतः अतिदक्षता विभागात नव्याने आलेल्या रुग्णांना दाखल करण्यासाठी जागा नाही, अशी माहिती खासगी रुग्णालयांतर्फे नातेवाइकांना देण्यात आली.  या बद्दल रुग्णाचे नातेवाईक सुहास जोशी म्हणाले, “वयाच्या सत्तरीतील रुग्णाला कोरोनाची स्पष्ट लक्षणे दिसत होती. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातून त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांना दिला. पण, शहरातील प्रमुख रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागात जागा नसल्याचे सांगण्यात आले.” राजगडावर दुर्घटना; मुंबईहून आलेल्या ट्रेकरचा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू​ कोरोनासाठी अतिदक्षता विभागातील राखीव खाटा पूर्ण क्षमतेने भरलेल्या आहेत. या  रुग्णालयांमध्ये जागा नसल्याने रुग्णाला ससून रुग्णालय किंवा डॉ. नायडू रुग्णालयांमध्ये दाखल करण्याचा सल्लाही खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला, अशी माहिती आणखी एका रुग्णाचे नातेवाईक सुरेश चव्हाण  यांनी दिली. रुग्णालये काय म्हणतात... कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्याच वेळी इतर आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. नियोजित शस्त्रक्रिया पूर्ववत सुरू होत आहेत. त्यामुळे कोरोनासाठी राखीव खाटांची संख्या कमी झाली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाबाधीत रुग्णांवर रुग्णालयात उपचार करताना मर्यादा पडतात.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचारासाठी काही मोठ्या रुग्णालयांनी स्वतंत्र इमारतीमध्ये सुविधा केली आहे. त्यामुळे त्या रुग्णांना तेथेच दाखल करावे लागते.  ससून आणि महापालिकेच्या काही रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुविधा उपलब्ध आहेत. महापालिका यंत्रणा सतर्क पुण्यात कोरोनाची साथ गेल्या आठवडाभरापासून वाढू लागल्याने महापालिकेने खबरदारी म्हणून नव्या रुग्णांसह त्यांच्या सपंर्कातील व्यक्तींचा शोध व त्यांना लगेचच विलगीकृत करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. नव्याने दीड हजार चाचण्या वाढवून आता पुन्हा रोज पाच हजार लोकांची चाचणी करण्यात येणार आहे. दुसरीकडे, संसर्ग कमी करण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ला प्राधान्य देण्याचे आवाहन पुणेकरांना करण्यात आले आहे. मार्चपासून पुण्यात सतत वाढलेल्या कोरोनाचा संसर्ग तीन-सव्वातीन महिन्यांपासून कमी होत आहे. त्यात जानेवारीत रोज सरासरी जेमतेम दीडशे रुग्ण सापडल्याने हा संसर्ग कमी होत असल्याचे चित्र होते. गेल्या सात दिवसांपासून रोजच्या रुग्णसंख्येत जवळपास ७५ ते शंभर रुग्णांची भर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे शनिवारी एका दिवसातील रुग्णांची संख्या ३३१ पर्यंत गेली. रविवारी (ता. १४) ही संख्या ३५४ पर्यंत नोंदविण्यात आली. बाजारपेठा, कार्यालये, हॉटेल आणि अन्य खासगी कार्यक्रमांमधील गर्दी, लोकांचा निष्काळजीपणा यामुळे कोरोनाचा आजार पुन्हा पसरत आहे. चाचण्यांच्या तुलनेत गेल्या चार दिवसांत संसर्गाच्या वाढीचा वेग १० टक्क्यांपर्यंत पोचला आहे. दहा दिवसांपूर्वी तो चार ते पाच टक्के होता. -डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/37cE1Q0

No comments:

Post a Comment