नवीन शिकण्यास पर्याय नाही वाचा सविस्तर.... आपण एखादी नोकरी करतो, तेव्हा संस्थेच्या आपल्याकडून काही  अपेक्षा असतात. पूर्वी नोकरी करणे तसे सोपे होते. आठ तासांचे रुटीन असायचे, कार्यालयात जाण्याच्या वेळा, जेवणाच्या वेळा आणि घरी परत येण्याच्या वेळा ठरलेल्या असत. कार्यालयामध्ये जाण्याच्या आणि बाहेर पडण्याच्या कालावधीमध्ये ठरलेलेच काम करायचे, बहुतांश वेळा वरिष्ठ सांगतील ते करायचे आणि महिन्याच्या शेवटी पगाराची वाट बघायची, असा तो एकूण मामला होता. सतत तीच ती कामे करत आल्यामुळे कर्मचारी त्यात एकदम तरबेज होत असत आणि सुरुवातीला जे काम करायला ७-८ तास लागत, ते काम ५-६ तासात पूर्ण होऊ लागे. या उरलेल्या वेळेत मग गप्पा आणि टाइमपास करणे, चहा पिणे वगैरे होऊ लागे. मात्र, हा उरलेला वेळ कोणत्यातरी उत्पादक कामासाठी वापरण्याची त्यांची इच्छा नसे.  हेही वाचा : नोकरी टिकवायची कशी? काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, कामाच्या पद्धतीही बदलल्या. परंतु, हे बदल होत असताना लागणारे कसब, कौशल्य ज्यांनी शिकवून घेतले, ते पुढे रोजगारक्षम राहिले. तंत्रज्ञानाचा वेग ज्या वेगाने वाढायला लागला, त्या वेगाने जे समोर येईल ते आत्मसात करण्याची गरज खरेतर होती. अजूनही आहे. पण हे कौशल्ये आत्मसात करताना कर्मचाऱ्यांची भयानक दमछाक होऊ लागली. भारतातील विद्यापीठे, शैक्षणिक संस्थाही पाहिजे ते कौशल्य शिकवण्यात कमी पडत आहेत. त्यामुळे एकीकडे संस्थेमध्ये आवश्यक असणाऱ्या रोजगारक्षम कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे, तर दुसरीकडे रोजगारक्षम नसणाऱ्या अथवा कौशल्य नसणाऱ्या शिक्षित विद्यार्थ्यांची आणि कर्मचाऱ्यांची संख्या यांचा ताळमेळ कोठेच बसत नाही. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप खरंतर नोकरी कोठेही करा, पण सतत शिकत राहा. एक साधा नियम आपण लक्षात ठेवायला हवा, ‘जे काम स्वयंचलित यंत्राद्वारे करता येते, यंत्रमानव अथवा संगणक करू शकतो, ते काम आपण आता करत असल्यास काहीतरी नवीन शिकायला लागा.’ मी एक साधे उदाहरण देतो. तुम्ही अकाउंट विभागात काम करत असाल आणि त्यातही देय खात्यात काम करत असाल (जेथे तुम्ही पुरवठादारांचे /कर्मचाऱ्याचे पेमेंट करत असाल) तर हा जॉब कधीही संगणक करू शकतो. (ऑटोमेशन). भारतातील काही संस्थांनी हा जॉब कधीच ऑटोमेट केलेला आहे. हे साधे उदाहरण आहे. उत्पादन क्षेत्रातीलच नव्हे, तर अश्या पांढरपेश्याची बरीच कामे सध्या ऑटोमेट झाली आहेत, होत आहेत. सध्यातरी काहीतरी नवीन शिकण्याव्यतिरिक्त आपल्याला पर्याय नाही.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 2, 2021

नवीन शिकण्यास पर्याय नाही वाचा सविस्तर.... आपण एखादी नोकरी करतो, तेव्हा संस्थेच्या आपल्याकडून काही  अपेक्षा असतात. पूर्वी नोकरी करणे तसे सोपे होते. आठ तासांचे रुटीन असायचे, कार्यालयात जाण्याच्या वेळा, जेवणाच्या वेळा आणि घरी परत येण्याच्या वेळा ठरलेल्या असत. कार्यालयामध्ये जाण्याच्या आणि बाहेर पडण्याच्या कालावधीमध्ये ठरलेलेच काम करायचे, बहुतांश वेळा वरिष्ठ सांगतील ते करायचे आणि महिन्याच्या शेवटी पगाराची वाट बघायची, असा तो एकूण मामला होता. सतत तीच ती कामे करत आल्यामुळे कर्मचारी त्यात एकदम तरबेज होत असत आणि सुरुवातीला जे काम करायला ७-८ तास लागत, ते काम ५-६ तासात पूर्ण होऊ लागे. या उरलेल्या वेळेत मग गप्पा आणि टाइमपास करणे, चहा पिणे वगैरे होऊ लागे. मात्र, हा उरलेला वेळ कोणत्यातरी उत्पादक कामासाठी वापरण्याची त्यांची इच्छा नसे.  हेही वाचा : नोकरी टिकवायची कशी? काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, कामाच्या पद्धतीही बदलल्या. परंतु, हे बदल होत असताना लागणारे कसब, कौशल्य ज्यांनी शिकवून घेतले, ते पुढे रोजगारक्षम राहिले. तंत्रज्ञानाचा वेग ज्या वेगाने वाढायला लागला, त्या वेगाने जे समोर येईल ते आत्मसात करण्याची गरज खरेतर होती. अजूनही आहे. पण हे कौशल्ये आत्मसात करताना कर्मचाऱ्यांची भयानक दमछाक होऊ लागली. भारतातील विद्यापीठे, शैक्षणिक संस्थाही पाहिजे ते कौशल्य शिकवण्यात कमी पडत आहेत. त्यामुळे एकीकडे संस्थेमध्ये आवश्यक असणाऱ्या रोजगारक्षम कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे, तर दुसरीकडे रोजगारक्षम नसणाऱ्या अथवा कौशल्य नसणाऱ्या शिक्षित विद्यार्थ्यांची आणि कर्मचाऱ्यांची संख्या यांचा ताळमेळ कोठेच बसत नाही. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप खरंतर नोकरी कोठेही करा, पण सतत शिकत राहा. एक साधा नियम आपण लक्षात ठेवायला हवा, ‘जे काम स्वयंचलित यंत्राद्वारे करता येते, यंत्रमानव अथवा संगणक करू शकतो, ते काम आपण आता करत असल्यास काहीतरी नवीन शिकायला लागा.’ मी एक साधे उदाहरण देतो. तुम्ही अकाउंट विभागात काम करत असाल आणि त्यातही देय खात्यात काम करत असाल (जेथे तुम्ही पुरवठादारांचे /कर्मचाऱ्याचे पेमेंट करत असाल) तर हा जॉब कधीही संगणक करू शकतो. (ऑटोमेशन). भारतातील काही संस्थांनी हा जॉब कधीच ऑटोमेट केलेला आहे. हे साधे उदाहरण आहे. उत्पादन क्षेत्रातीलच नव्हे, तर अश्या पांढरपेश्याची बरीच कामे सध्या ऑटोमेट झाली आहेत, होत आहेत. सध्यातरी काहीतरी नवीन शिकण्याव्यतिरिक्त आपल्याला पर्याय नाही.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3ree5eg

No comments:

Post a Comment