Positive Story: हेल्परचा मुलगा झाला CA; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गाठलं यश सहकारनगर (पुणे) : दहा बाय दहा आकाराचं झोपडपट्टीत घर, घरची परिस्थिती हलाखीची, पण असं असतानाही परिस्थितीवर मात करून सिद्धार्थनगर येथील विकास अर्जुन लोखंडे याने चार्टर्ड अकाउटंट म्हणजे सीएची परीक्षा उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केलं आहे. वडील अर्जुन लोखंडे हे ऑटो इलेक्ट्रॉनिक गॅरेजमध्ये हेल्पर म्हणून काम करतात, तर आई धुणी-भांडी आणि घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विकास लोखंडे याने अवघड समजल्या जाणाऱ्या सीए परीक्षेत यश खेचून आणत वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. त्यामुळे विकासचे गावकऱ्यांकडून तसेच पुणे शहरातील मातंग समाजातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. - पुणे: कॉलेज सुरू करण्यासाठी ABVPचं आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात यश मिळाल्याचा आनंद साजरा करत असताना विकास म्हणाला, झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिक्षण घेताना खूप अडचणी येतात, मात्र प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रामाणिकपणे मेहनत केल्यावर यश हमखास मिळते. मला गणिताची आवड होती. सातवीत असताना शालेय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्याने मी पुढे सीए होण्याचे ठरवले आणि वडिलांचीही इच्छा होती म्हणून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दहावी पासून तयारी ठेवली. बारावीपासून सीएचा अभ्यास चालू ठेवला, अखेर बी.कॉमनंतर तिसऱ्या टप्प्यात सीएमध्ये यश मिळाले, हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. - Budget 2021: शिक्षण क्षेत्रासाठीची तरतूद म्हणजे `वाळवंटात हिरवळ फुलविण्याचा प्रयत्न’!​ मुलाच्या यशाबद्दल अर्जुन लोखंडे म्हणाले, सिद्धार्थनगरच्या पद्मावती-दाते बस थांबा येथील झोपडपट्टीत आम्ही राहत आहोत. माझ्या मुलांनी शिक्षण घेऊन मोठे व्हावे, असे मला नेहमी वाटत होते. त्यामुळे मी लहानपणापासून मुलांच्या शिक्षणकडे लक्ष देत होतो. आता एक मुलगा सीए झाला, तर दुसरा मुलगा स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 2, 2021

Positive Story: हेल्परचा मुलगा झाला CA; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गाठलं यश सहकारनगर (पुणे) : दहा बाय दहा आकाराचं झोपडपट्टीत घर, घरची परिस्थिती हलाखीची, पण असं असतानाही परिस्थितीवर मात करून सिद्धार्थनगर येथील विकास अर्जुन लोखंडे याने चार्टर्ड अकाउटंट म्हणजे सीएची परीक्षा उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केलं आहे. वडील अर्जुन लोखंडे हे ऑटो इलेक्ट्रॉनिक गॅरेजमध्ये हेल्पर म्हणून काम करतात, तर आई धुणी-भांडी आणि घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विकास लोखंडे याने अवघड समजल्या जाणाऱ्या सीए परीक्षेत यश खेचून आणत वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. त्यामुळे विकासचे गावकऱ्यांकडून तसेच पुणे शहरातील मातंग समाजातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. - पुणे: कॉलेज सुरू करण्यासाठी ABVPचं आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात यश मिळाल्याचा आनंद साजरा करत असताना विकास म्हणाला, झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिक्षण घेताना खूप अडचणी येतात, मात्र प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रामाणिकपणे मेहनत केल्यावर यश हमखास मिळते. मला गणिताची आवड होती. सातवीत असताना शालेय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्याने मी पुढे सीए होण्याचे ठरवले आणि वडिलांचीही इच्छा होती म्हणून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दहावी पासून तयारी ठेवली. बारावीपासून सीएचा अभ्यास चालू ठेवला, अखेर बी.कॉमनंतर तिसऱ्या टप्प्यात सीएमध्ये यश मिळाले, हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. - Budget 2021: शिक्षण क्षेत्रासाठीची तरतूद म्हणजे `वाळवंटात हिरवळ फुलविण्याचा प्रयत्न’!​ मुलाच्या यशाबद्दल अर्जुन लोखंडे म्हणाले, सिद्धार्थनगरच्या पद्मावती-दाते बस थांबा येथील झोपडपट्टीत आम्ही राहत आहोत. माझ्या मुलांनी शिक्षण घेऊन मोठे व्हावे, असे मला नेहमी वाटत होते. त्यामुळे मी लहानपणापासून मुलांच्या शिक्षणकडे लक्ष देत होतो. आता एक मुलगा सीए झाला, तर दुसरा मुलगा स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3rffFwh

No comments:

Post a Comment