स्थलांतरित कामगारांची मुलेही देणार आता दहावीची परीक्षा यवत - स्थलांतरित कामगारांच्या शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी नांदूरच्या रोहिणी लोखंडे या प्राथमिक शिक्षिका मागील अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशाच स्थलांतरित कामगारांच्या दोन मुलांना या वर्षी दहावीच्या परीक्षेला बसवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. शिक्षण विभागाच्या मदतीने सुरू असलेल्या ‘बालरक्षक’ उपक्रमाची त्यास चांगली साथ मिळाली. नांदूर परिसरातील दोन वेगवेगळ्या कुटुंबातील शुभम साळवे व नंदिनी राठोड या दहावीत शिकणाऱ्या मुलांना लोखंडे यांनी केलेल्या सहकार्यामुळे या वर्षी दहावीची परिक्षा देणे शक्य होणार आहे. यातील शुभम साळवे हा ऊसतोडणी मजुराचा मुलगा आहे. तर नंदिनी राठोड ही रस्ते बांधकाम करणाऱ्या मजुराची मुलगी आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लॉकडाऊनच्या काळात या दोघांच्या शिक्षणाची वाताहात झाली. दहावीच्या परीक्षेचे आवेदन पत्र भरणेही त्यांना शक्य झाले नव्हते. रोहिणी लोखंडे यांना हे समजताच त्यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले. शुभम हा नगर जिल्ह्यातील आहे. त्याने फॉर्म भरला नव्हता. फॉर्म भरण्यासाठी केवळ चार दिवसांची मुदत बाकी असताना त्यांनी प्रयत्न सूरू केले. संबंधित शाळेशी संपर्क साधला. त्यात त्यांना यश आले. त्यानंतर त्यांनी शुभमला दहावीची पुस्तके व इतर साहित्यही मिळवून दिले. तर नंदिनी राठोड ही मुळची अक्कलकोटची तिचे कुटुंब रस्ते बांधणी मजूर म्हणून नांदूर परिसरात काम करत होते. शालाबाह्य प्राथमिक मुलांचे सर्वेक्षण करताना त्यांना नंदिनीची अडचण समजली. तीच्या शैक्षणीक पालकत्वाची जबाबदारी स्वतःवर घेऊन त्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यातही यश आले. नाउमेद होऊन शिक्षणाला पूर्ण विराम देण्याच्या मानसिकतेपर्यंत आलेल्या या दोन विद्यार्थ्यांना लोखंडे यांच्या प्रयत्नांनी पुन्हा अलगद शिक्षणाच्या प्रवाहात आणले. लोखंडे यांना या कामात सहकारी शिक्षकांपासून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक दिनकर पाटील यांच्यासह विविध टप्प्यावर विविध व्यक्तींनी मदत केली. कोरोनाचा धोका वाढतोय; दौंड तालुक्यात वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोना, एकाने गमावला जीव अशी सुरू झाली बालरक्षक चळवळ   ‘जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ या शासन निर्णयानुसार तत्कालीन शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या संकल्पनेतून बालरक्षक चळवळ जन्माला आली. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा कार्यक्रम राबवला जात असताना असे लक्षात आले की शालाबाह्य, स्थलांतरित व अनियमित विद्यार्थ्यांचा प्रश्न मोठा आहे. शाळा प्रगत करायच्या असतील तर अगोदर शंभर टक्के विद्यार्थी शाळेत दाखल झाले पाहिजेत. ही मुले शाळेत टिकली पाहिजेत व शिकली पाहिजेत. हा प्रश्न एखाद्या स्वयंसेवी संस्थेकडून सोडवण्यापेक्षा राज्यभरातील लाखो शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने बालरक्षक बनून कार्य केले तर मोठ्या प्रमाणावर यश येऊ शकते. यातूनच बालरक्षक या संकल्पनेचा उदय झाला. राष्ट्रवादी काँग्रेसला दिलासा:कथित गैरव्यवहारप्रकरणात अजित पवारांसह ७६ जणांना क्लीन चीट बालरक्षक म्हणून ६ ते १४ वयोगटातील मुलांसाठी नेहमीच काम करत होते. परंतु दहावीच्या दोन विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणता आले. याचे खूप समाधान वाटत आहे. ही दोन मुले नसून दोन पिढ्या आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार या मुलांना त्यांचा शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळवून देता आला याचा बालरक्षक म्हणून अभिमान वाटतो.  - रोहिणी लोखंडे, प्राथमिक शिक्षिका मला पहिल्यापासून शिकण्याची आवड होती. पण परिस्थितीमुळे नववीनंतर शिक्षण सुटले. पुन्हा कधी शिकायला मिळेल असे वाटलेही नव्हते. लोखंडे मॅडममुळे शिकायला मिळत आहे. आता माझे कलेक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होईल.  - नंदिनी राठोड दहावीची परीक्षा द्यायला मिळतेय याचा खूप आनंद वाटतोय. माझे पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण होईल. सध्या ऊसतोडीमुळे जसा वेळ मिळेल तसा अभ्यास करत आहे. लोखंडे मॅडमने माझे शिक्षण चालू केले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. - शुभम साळवे Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 19, 2021

स्थलांतरित कामगारांची मुलेही देणार आता दहावीची परीक्षा यवत - स्थलांतरित कामगारांच्या शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी नांदूरच्या रोहिणी लोखंडे या प्राथमिक शिक्षिका मागील अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशाच स्थलांतरित कामगारांच्या दोन मुलांना या वर्षी दहावीच्या परीक्षेला बसवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. शिक्षण विभागाच्या मदतीने सुरू असलेल्या ‘बालरक्षक’ उपक्रमाची त्यास चांगली साथ मिळाली. नांदूर परिसरातील दोन वेगवेगळ्या कुटुंबातील शुभम साळवे व नंदिनी राठोड या दहावीत शिकणाऱ्या मुलांना लोखंडे यांनी केलेल्या सहकार्यामुळे या वर्षी दहावीची परिक्षा देणे शक्य होणार आहे. यातील शुभम साळवे हा ऊसतोडणी मजुराचा मुलगा आहे. तर नंदिनी राठोड ही रस्ते बांधकाम करणाऱ्या मजुराची मुलगी आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लॉकडाऊनच्या काळात या दोघांच्या शिक्षणाची वाताहात झाली. दहावीच्या परीक्षेचे आवेदन पत्र भरणेही त्यांना शक्य झाले नव्हते. रोहिणी लोखंडे यांना हे समजताच त्यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले. शुभम हा नगर जिल्ह्यातील आहे. त्याने फॉर्म भरला नव्हता. फॉर्म भरण्यासाठी केवळ चार दिवसांची मुदत बाकी असताना त्यांनी प्रयत्न सूरू केले. संबंधित शाळेशी संपर्क साधला. त्यात त्यांना यश आले. त्यानंतर त्यांनी शुभमला दहावीची पुस्तके व इतर साहित्यही मिळवून दिले. तर नंदिनी राठोड ही मुळची अक्कलकोटची तिचे कुटुंब रस्ते बांधणी मजूर म्हणून नांदूर परिसरात काम करत होते. शालाबाह्य प्राथमिक मुलांचे सर्वेक्षण करताना त्यांना नंदिनीची अडचण समजली. तीच्या शैक्षणीक पालकत्वाची जबाबदारी स्वतःवर घेऊन त्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यातही यश आले. नाउमेद होऊन शिक्षणाला पूर्ण विराम देण्याच्या मानसिकतेपर्यंत आलेल्या या दोन विद्यार्थ्यांना लोखंडे यांच्या प्रयत्नांनी पुन्हा अलगद शिक्षणाच्या प्रवाहात आणले. लोखंडे यांना या कामात सहकारी शिक्षकांपासून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक दिनकर पाटील यांच्यासह विविध टप्प्यावर विविध व्यक्तींनी मदत केली. कोरोनाचा धोका वाढतोय; दौंड तालुक्यात वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोना, एकाने गमावला जीव अशी सुरू झाली बालरक्षक चळवळ   ‘जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ या शासन निर्णयानुसार तत्कालीन शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या संकल्पनेतून बालरक्षक चळवळ जन्माला आली. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा कार्यक्रम राबवला जात असताना असे लक्षात आले की शालाबाह्य, स्थलांतरित व अनियमित विद्यार्थ्यांचा प्रश्न मोठा आहे. शाळा प्रगत करायच्या असतील तर अगोदर शंभर टक्के विद्यार्थी शाळेत दाखल झाले पाहिजेत. ही मुले शाळेत टिकली पाहिजेत व शिकली पाहिजेत. हा प्रश्न एखाद्या स्वयंसेवी संस्थेकडून सोडवण्यापेक्षा राज्यभरातील लाखो शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने बालरक्षक बनून कार्य केले तर मोठ्या प्रमाणावर यश येऊ शकते. यातूनच बालरक्षक या संकल्पनेचा उदय झाला. राष्ट्रवादी काँग्रेसला दिलासा:कथित गैरव्यवहारप्रकरणात अजित पवारांसह ७६ जणांना क्लीन चीट बालरक्षक म्हणून ६ ते १४ वयोगटातील मुलांसाठी नेहमीच काम करत होते. परंतु दहावीच्या दोन विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणता आले. याचे खूप समाधान वाटत आहे. ही दोन मुले नसून दोन पिढ्या आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार या मुलांना त्यांचा शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळवून देता आला याचा बालरक्षक म्हणून अभिमान वाटतो.  - रोहिणी लोखंडे, प्राथमिक शिक्षिका मला पहिल्यापासून शिकण्याची आवड होती. पण परिस्थितीमुळे नववीनंतर शिक्षण सुटले. पुन्हा कधी शिकायला मिळेल असे वाटलेही नव्हते. लोखंडे मॅडममुळे शिकायला मिळत आहे. आता माझे कलेक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होईल.  - नंदिनी राठोड दहावीची परीक्षा द्यायला मिळतेय याचा खूप आनंद वाटतोय. माझे पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण होईल. सध्या ऊसतोडीमुळे जसा वेळ मिळेल तसा अभ्यास करत आहे. लोखंडे मॅडमने माझे शिक्षण चालू केले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. - शुभम साळवे Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3s8oAjG

No comments:

Post a Comment