नखाएवढ्या मूर्ती त्यांनी साकारल्या छंदातून पुणे - तब्बल तीन दशकं ते वेगवेगळ्या मूर्तींना नवनवा साज देताहेत. त्यांच्या हातांनी अनेक बोलक्या-मोहक मूर्ती घडविल्या. हे करीत असतानाच नखाएवढ्या मूर्ती बनविण्याचा छंद त्यांना कधी जडला हे कळलंच नाही. त्यातूनच त्यांनी पन्नास मूर्ती साकारल्या. लॉकडाउनच्या काळात त्यांनी बनविलेल्या या मूर्ती पाहताक्षणी डोळ्यांत भरत आहेत. तर अर्धा ते दीड इंच आकाराच्या या कलाकृती साकारण्यासाठी ते एमसीलचा वापर करतात. त्रेसष्ठ वर्षीय या अवलियाचं नाव आहे हेमंत चिंचवले. नऱ्हे येथील रहिवासी असलेले चिंचवले तीस वर्षांपासून मूर्ती बनविण्याचे काम करताहेत. मोठ्या आकाराच्या मूर्तींबरोबरच सूक्ष्म स्वरूपाच्या कलात्मक वस्तू (मिनिएचर आर्ट) साकारण्याची त्यांची इच्छा होती; परंतु नेहमीच्या या कामातून स्वतःचा छंद त्यांना जपता आला नाही. मात्र लॉकडाउनने ती संधी मिळवून दिली सूक्ष्म कलाकृती तयार करता आल्या, असे ते आनंदानं सांगतात. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आजपर्यंत त्यांनी अनेक विविध प्रकारच्या मूर्ती बनविल्या; परंतु कोरोनामुळे अनेकांप्रमाणे त्यांचे काम थांबले. या वयात घरी बसून दिवस कसा घालवावा, हा प्रश्‍न त्यांना सतावत होता. पण त्यांनी लॉकडाउनला संधी समजून आपल्या जीवनातील त्या छंदाला जोपासले. जो त्यांना एरवी वेळेअभावी जपता आला नाही. लॉकडाउनच्या काळात त्यांनी तब्बल ५० विविध प्रकारच्या सुक्ष्म कलाकृती साकारल्या आहेत. या कलाकृती अर्धा ते दीड इंच आकाराच्या आहेत. यामध्ये घोड्यावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी समर्थ, रोमन कलाकृती, आफ्टर बाथ अशा विविध कलाकृतींचा समावेश आहे.  याबाबत चिंचवले म्हणाले, ‘‘मोठ्या कलाकृती व मूर्ती नेहमीच बनविल्या आहेत. तसेच या पूर्वी दाग दागिन्यांचेही काम केल्यामुळे बारीक कोरीव कामाचाही अनुभव या वेळी कामी आला. खरंतर मी साकारलेल्या या छोट्या कलाकृतीतून कलारसिकांना आनंद आणि इतर कलाकारांना प्रेरणा मिळावी, हा या मागचा उद्देश आहे. आगामी काळात गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’’ गृहमंत्र्यांपेक्षा पोलीस अधिकारीच येतात अलिशान वाहनांत! असं कसं चालेल - अजित पवार छोट्या कलाकृती साकारताना वेळ आणि संयमाची गरज असते. यासाठी माझा मुलगा शिवसंदेश मला मदत करतो. लॉकडाउनमध्ये मी शिल्पकार करमरकर यांनी साकारलेल्या मोठ्या कलाकृतींचे मी मिनीएचर आर्ट तयार केले आहे. या सर्व कलाकृतींचे लवकरच प्रदर्शन भरविणार आहे. - हेमंत चिंचवले, मूर्तीकार Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/3ayFOkn - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 19, 2021

नखाएवढ्या मूर्ती त्यांनी साकारल्या छंदातून पुणे - तब्बल तीन दशकं ते वेगवेगळ्या मूर्तींना नवनवा साज देताहेत. त्यांच्या हातांनी अनेक बोलक्या-मोहक मूर्ती घडविल्या. हे करीत असतानाच नखाएवढ्या मूर्ती बनविण्याचा छंद त्यांना कधी जडला हे कळलंच नाही. त्यातूनच त्यांनी पन्नास मूर्ती साकारल्या. लॉकडाउनच्या काळात त्यांनी बनविलेल्या या मूर्ती पाहताक्षणी डोळ्यांत भरत आहेत. तर अर्धा ते दीड इंच आकाराच्या या कलाकृती साकारण्यासाठी ते एमसीलचा वापर करतात. त्रेसष्ठ वर्षीय या अवलियाचं नाव आहे हेमंत चिंचवले. नऱ्हे येथील रहिवासी असलेले चिंचवले तीस वर्षांपासून मूर्ती बनविण्याचे काम करताहेत. मोठ्या आकाराच्या मूर्तींबरोबरच सूक्ष्म स्वरूपाच्या कलात्मक वस्तू (मिनिएचर आर्ट) साकारण्याची त्यांची इच्छा होती; परंतु नेहमीच्या या कामातून स्वतःचा छंद त्यांना जपता आला नाही. मात्र लॉकडाउनने ती संधी मिळवून दिली सूक्ष्म कलाकृती तयार करता आल्या, असे ते आनंदानं सांगतात. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आजपर्यंत त्यांनी अनेक विविध प्रकारच्या मूर्ती बनविल्या; परंतु कोरोनामुळे अनेकांप्रमाणे त्यांचे काम थांबले. या वयात घरी बसून दिवस कसा घालवावा, हा प्रश्‍न त्यांना सतावत होता. पण त्यांनी लॉकडाउनला संधी समजून आपल्या जीवनातील त्या छंदाला जोपासले. जो त्यांना एरवी वेळेअभावी जपता आला नाही. लॉकडाउनच्या काळात त्यांनी तब्बल ५० विविध प्रकारच्या सुक्ष्म कलाकृती साकारल्या आहेत. या कलाकृती अर्धा ते दीड इंच आकाराच्या आहेत. यामध्ये घोड्यावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी समर्थ, रोमन कलाकृती, आफ्टर बाथ अशा विविध कलाकृतींचा समावेश आहे.  याबाबत चिंचवले म्हणाले, ‘‘मोठ्या कलाकृती व मूर्ती नेहमीच बनविल्या आहेत. तसेच या पूर्वी दाग दागिन्यांचेही काम केल्यामुळे बारीक कोरीव कामाचाही अनुभव या वेळी कामी आला. खरंतर मी साकारलेल्या या छोट्या कलाकृतीतून कलारसिकांना आनंद आणि इतर कलाकारांना प्रेरणा मिळावी, हा या मागचा उद्देश आहे. आगामी काळात गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’’ गृहमंत्र्यांपेक्षा पोलीस अधिकारीच येतात अलिशान वाहनांत! असं कसं चालेल - अजित पवार छोट्या कलाकृती साकारताना वेळ आणि संयमाची गरज असते. यासाठी माझा मुलगा शिवसंदेश मला मदत करतो. लॉकडाउनमध्ये मी शिल्पकार करमरकर यांनी साकारलेल्या मोठ्या कलाकृतींचे मी मिनीएचर आर्ट तयार केले आहे. या सर्व कलाकृतींचे लवकरच प्रदर्शन भरविणार आहे. - हेमंत चिंचवले, मूर्तीकार Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/3ayFOkn


via Tajya news Feeds https://ift.tt/2ZzWYaQ

No comments:

Post a Comment