रेडझोनमध्ये खुलेआम बेकायदा जमीन विक्री पिंपरी - भोसरी, दिघी व वडमुखवाडी रेडझोन हद्दीबाबत महापालिका व जिल्हा प्रशासनामार्फत वारंवार जाहीर केले आहे. तरीही काही व्यक्ती प्लॉटिंग करून जमिनीची विक्री करीत असून, स्वस्तात जागा मिळत असल्याने नागरिकही घेत आहेत. बनावट कागदपत्रांद्वारे खरेदी-विक्री दाखवली जात आहे. अशा वडमुखवाडी रेडझोन हद्दीत महापालिकेने सलग दोन दिवस कारवाई करून ७९ बांधकामे पाडली आहेत. तरीही त्या परिसरात प्लॉटिंग सुरूच असून, नागरिक जागा खरेदी करण्यासाठी चौकशी करीत असल्याचे बुधवारी आढळून आले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा रेडझोनचा फलकच नाही शहरात भोसरी, दिघी, वडमुखवाडी, मोशी, चऱ्होली, तळवडे, रुपीनगर, निगडी, चिखली भागात संरक्षक विभागाच्या वेगवेगळ्या आस्थापनांमुळे रेडझोन आहे. मात्र, कुठेही रेडझोनची हद्द दर्शविणारे फलक नाहीत. शिवाय जागा विक्रेत्यांनी प्लॉटिंग करून कच्चे रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, अंतर्गत रस्त्यांवर पथदिव्यांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे नागरिकांची दिशाभूल होते व जागा खरेदी करून फसविले जातात.  मास्क न लावल्याने पिंपरी-चिंचवड महापौरांच्या मुलावर गुन्हा! नागरिक म्हणतात... शहरालगत रेडझोन आहे. आजूबाजूच्या परिसरात तीस ते चाळीस लाख रुपये गुंठ्याप्रमाणे जागा आहे. त्या तुलनेत दहा लाखांत एक गुंठा मिळाल्याने चार गुंठे जागा घेतली. पण, मी बांधलेली नाही, असे एका व्यावसायिकाने सांगितले. आम्ही पंचवीस वर्षांपूर्वी पाऊण गुंठा जागा घेतली आहे. पण, बांधकाम केले नव्हते, कागदपत्रही आमच्याकडे नव्हती. आता जागा मालक जास्त पैसे मागतो आहे, अशी व्यथा एका कामगाराने व त्यांच्या पत्नीने मांडली. नोंदणी महानिरीक्षकांना पत्र वडमुखवाडी क्रशर झोननजीक संरक्षण विभागाच्या काही भागात महापालिकेची परवानगी न घेता भूखंड मालक प्लॉटिंग करीत आहेत. कच्चे रस्ते, जागेस कुंपण करून प्लॉट विक्रीचा उद्देश दिसतो आहे. मात्र, संरक्षण विभागाच्या बाधित क्षेत्रात कोणत्याही बांधकामास परवानगी नाही. नागरिकांनी एक, दोन गुंठ्याचे प्लॉट खरेदी केल्यास त्यांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे या ठिकाणच्या अनधिकृत प्लॉटिंगची खरेदी-विक्री नोंद करू नये, असे पत्र व त्याबाबतचे स्मरण पत्र तत्कालीन महापालिका आयुक्तांनी मे २०१८ पासून वेळोवेळी नोंदणी महानिरीक्षकांना दिले आहे.  मोशी उपबाजारात हापूसचे आगमण  महावितरणलाही पत्र रेडझोन हद्दीत बांधलेल्या बांधकामांना वीजपुरवठा देऊ नये. दिलेला वीजपुरवठा खंडित करावा, असे पत्र महापालिका आयुक्तांनी जुलै २०१९ मध्ये महावितरणला दिले आहे. यामुळे, अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी महापालिका यंत्रणेवर येणारा ताण कमी होईल. नागरिकांचे नुकसान टळेल. पर्यावरणाचा व नैसर्गिक खनिज संपत्तीचा ऱ्हास थांबेल, असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे. तरीही वडमुखवाडी रेडझोनमधील बांधकामांना वीजपुरवठा केलेला असल्याचे आठ फेब्रुवारी रोजी केलेल्या कारवाईच्या वेळी आढळून आले. दृष्टिक्षेपात रेडझोनबाधित क्षेत्र गाव             सर्व्हे क्रमांक वडमुखवाडी    ८० ते १२०, १२७, १६२ ते १७६ संपूर्ण दिघी    ७५ ते ७८ पैकी भोसरी    ११३ ते १४६, १४८ ते १६४, १६६ ते १६९, १७१ ते १९७, २०२ ते २०४ संपूर्ण; १९८, २००, २०१, २०५ ते २०७ पैकी मोशी    जुने गट ४४२, ४४५ ते ४५० Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 24, 2021

रेडझोनमध्ये खुलेआम बेकायदा जमीन विक्री पिंपरी - भोसरी, दिघी व वडमुखवाडी रेडझोन हद्दीबाबत महापालिका व जिल्हा प्रशासनामार्फत वारंवार जाहीर केले आहे. तरीही काही व्यक्ती प्लॉटिंग करून जमिनीची विक्री करीत असून, स्वस्तात जागा मिळत असल्याने नागरिकही घेत आहेत. बनावट कागदपत्रांद्वारे खरेदी-विक्री दाखवली जात आहे. अशा वडमुखवाडी रेडझोन हद्दीत महापालिकेने सलग दोन दिवस कारवाई करून ७९ बांधकामे पाडली आहेत. तरीही त्या परिसरात प्लॉटिंग सुरूच असून, नागरिक जागा खरेदी करण्यासाठी चौकशी करीत असल्याचे बुधवारी आढळून आले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा रेडझोनचा फलकच नाही शहरात भोसरी, दिघी, वडमुखवाडी, मोशी, चऱ्होली, तळवडे, रुपीनगर, निगडी, चिखली भागात संरक्षक विभागाच्या वेगवेगळ्या आस्थापनांमुळे रेडझोन आहे. मात्र, कुठेही रेडझोनची हद्द दर्शविणारे फलक नाहीत. शिवाय जागा विक्रेत्यांनी प्लॉटिंग करून कच्चे रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, अंतर्गत रस्त्यांवर पथदिव्यांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे नागरिकांची दिशाभूल होते व जागा खरेदी करून फसविले जातात.  मास्क न लावल्याने पिंपरी-चिंचवड महापौरांच्या मुलावर गुन्हा! नागरिक म्हणतात... शहरालगत रेडझोन आहे. आजूबाजूच्या परिसरात तीस ते चाळीस लाख रुपये गुंठ्याप्रमाणे जागा आहे. त्या तुलनेत दहा लाखांत एक गुंठा मिळाल्याने चार गुंठे जागा घेतली. पण, मी बांधलेली नाही, असे एका व्यावसायिकाने सांगितले. आम्ही पंचवीस वर्षांपूर्वी पाऊण गुंठा जागा घेतली आहे. पण, बांधकाम केले नव्हते, कागदपत्रही आमच्याकडे नव्हती. आता जागा मालक जास्त पैसे मागतो आहे, अशी व्यथा एका कामगाराने व त्यांच्या पत्नीने मांडली. नोंदणी महानिरीक्षकांना पत्र वडमुखवाडी क्रशर झोननजीक संरक्षण विभागाच्या काही भागात महापालिकेची परवानगी न घेता भूखंड मालक प्लॉटिंग करीत आहेत. कच्चे रस्ते, जागेस कुंपण करून प्लॉट विक्रीचा उद्देश दिसतो आहे. मात्र, संरक्षण विभागाच्या बाधित क्षेत्रात कोणत्याही बांधकामास परवानगी नाही. नागरिकांनी एक, दोन गुंठ्याचे प्लॉट खरेदी केल्यास त्यांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे या ठिकाणच्या अनधिकृत प्लॉटिंगची खरेदी-विक्री नोंद करू नये, असे पत्र व त्याबाबतचे स्मरण पत्र तत्कालीन महापालिका आयुक्तांनी मे २०१८ पासून वेळोवेळी नोंदणी महानिरीक्षकांना दिले आहे.  मोशी उपबाजारात हापूसचे आगमण  महावितरणलाही पत्र रेडझोन हद्दीत बांधलेल्या बांधकामांना वीजपुरवठा देऊ नये. दिलेला वीजपुरवठा खंडित करावा, असे पत्र महापालिका आयुक्तांनी जुलै २०१९ मध्ये महावितरणला दिले आहे. यामुळे, अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी महापालिका यंत्रणेवर येणारा ताण कमी होईल. नागरिकांचे नुकसान टळेल. पर्यावरणाचा व नैसर्गिक खनिज संपत्तीचा ऱ्हास थांबेल, असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे. तरीही वडमुखवाडी रेडझोनमधील बांधकामांना वीजपुरवठा केलेला असल्याचे आठ फेब्रुवारी रोजी केलेल्या कारवाईच्या वेळी आढळून आले. दृष्टिक्षेपात रेडझोनबाधित क्षेत्र गाव             सर्व्हे क्रमांक वडमुखवाडी    ८० ते १२०, १२७, १६२ ते १७६ संपूर्ण दिघी    ७५ ते ७८ पैकी भोसरी    ११३ ते १४६, १४८ ते १६४, १६६ ते १६९, १७१ ते १९७, २०२ ते २०४ संपूर्ण; १९८, २००, २०१, २०५ ते २०७ पैकी मोशी    जुने गट ४४२, ४४५ ते ४५० Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3utSu3Y

No comments:

Post a Comment